ऊर्मी आज सकाळपासून लस घेण्यासाठी गेली होती .
आईने तिला अनेकदा सांगितल . " जाऊ नकोस तुला लस मिळणार नाही . कारण तुला 18 पूर्ण व्हायला कंप्लीट 1 महिना बाकी आहे . "
पण ऊर्मी हट्टी तिच्या मनात जे असेल , तेच ती करायची.
ती गेलीस शेवटी लस घ्यायला . दोनदा नंबर येऊन ही तिला लस दिली . उन्हात तिच्या जीवाची ल्हाई ल्हाई झाली होती . त्यामुळे ती खूपच संतापली होती .
मागे उभी असणारी ऊर्मी समोर येऊन लस देणाऱ्या व्यक्तीवर चांगलीच बडकली आणि तिने तिच्या तोंडाचा पट्टा सुरू केला .
" ओ सर , मला लस द्या की ..किती वेळ झाला . मी
लाईन मध्ये नुसतं वेड्या सारखी उभी आहे . माझ्या पाठीमागून आलेल्या लोकांना तुम्ही लस दिली. आणि माझ्याकडे साधं बघत ही नाही आहात . अशी कुठली तुमची वागण्याची पद्धत ? "
तिच्या अश्या बोलण्यावर समोर असणारा व्यक्ती काही बोलणारच तर समोरून एक पोलिस ऑफिसर आला .
दिसायला एकदम हॅण्डसम कोणतीही मुलगी सहज त्याच्यावर भालेल . बोलण्यात ही खूप टॅलेंट .. तो ऊर्मी ला समजावू लागला ..
" Exuse me mam ..तुम्हाला लस मिळणार नाही ."
" पण का ? " ऊर्मी उंच आवाजात बोलली .
" अहो तुमचं वय नाही बसत. " तो i.p.s ऑफिसर तितक्याच समजूत दारिने बोलला ..
" अहो बसत ना . पुढच्या महिन्यात मला 18 पूर्ण होणार ."
ती बोलली.
" अहो मग पुढच्या महिन्यात पण डोस येणार . तेव्हाच घ्या ना तुम्ही . " I.p.s ऑफिसर .
" आता काय प्रोब्लेम " ऊर्मी जिद्दीने बोलली .
" आता मिळणार नाही .". I.p s ऑफिसर
" पण का ? " ऊर्मी .
" पुढच्या महिन्यात मिळणार " i.p.s ऑफिसर .
" ओके . पण मला कोण सांगणार डोस आला ते .." ऊर्मी उंच आवाजात बोलली .
" मी सांगतो ." I.p.s ऑफिसर
" हो ..खरच ..मोबाईल नंबर द्या ." ऊर्मी ..
" काय ? " I.p.s ऑफिसर
" मोबाईल नंबर .." ऊर्मी
ऊर्मी एवढी जिद्दीला पेटली होती . की शेवटी त्या पोलीस ऑफिसर ने तिला आपला मोबाईल नंबर दिला .
ती thanks बोलून निघणार तेवढ्यात ..ती thanks बोलल्यानंतर काळजी घ्या . अस बोलल्यावर त्याने तिला सहज विचारलं .." काळजी का घेऊ .."
ती चिडून बोलली .." मग आजारी पडा ..आणि कोणाच्याही प्रेमात पडणार नाही . ह्याची काळजी घ्या .
विशेष करून माझ्या .." हे शब्द तोंडातून बाहेर पडत नाही . तर तिने तिथून धूम ठोकली . पोलिस ऑफिसर ला तिचा बोलण्याचा हेतू समजला तेव्हा ती किती तरी दूर गेली होती . तो पोलीस तिच्यावर हसला आणि तिला त्याचे बोल ऐकू जाईल . एवढ्या उंच आवाजात बोल ला .
" अहो तुमच्या बोलण्याचा मी नक्की काय अर्थ घ्यायचा ."
तिच्या कानावर त्याचे बोल पडले होते . तिनेही उंच आवाजात रिप्लाय दिला .
" तुम्हाला जो अर्थ घ्यायचा आहे तो घ्या.
ती हसत ही हसत घरी गेला . आणि तो ही हसत हसत घरी गेला ..
Love at first sight होतं ते ....
तिने नंबर तर घेतलाच होता . मग तो नंबर save केल्यानंतर सुरू झाला एका सुंदर नात्याचा प्रवास. मैत्री झाली . हळू हळू बोलण वाढल कॉलिंग वर ही बऱ्याचदा बोलण झालं. एकमेकांबद्दल आकर्षण ही वाढलं. आणि आला पुन्हा दुसरा डोस . ज्या दिवशी दुसरा डोस आला.
नेमका त्याच दिवशी उर्मीचा वाढदिवस आला .
I.p.s ऑफिसर ने सकाळीच तिला कॉल करून सांगितल . " आज लस मिळणार आहे . आणि पहिला नंबर तुझाच बर का ? " आणि त्याने फोन कट केला .
तिचा birthday होता . मग काय birthday girl काय कमी छान दिसणार का ? आई वडील घरी नसल्याचा तिने चांगलाच फायदा घेतला . छान रेड कलरची साडी घातली . केस मोकळे सोडले. ओंठावर डार्क लिपस्टिक लावलं . खुपचं छान दिसत होती ती त्या लुक मध्ये ...
ती गेली लस घ्यायला ..गर्दी कमी असल्यामुळे त्या पोलीस ऑफिसर ची नजर सहज तिच्यावर गेली . तिला त्या तशा लुक मध्ये पाहून त्याचा बीपी हाय झाला . तो चक्क पाच मिनिट नुसत तिच्याकडेच बघत होता ...
शेवटी हिचं गेली त्याच्याकडे. आणि त्याला जाऊन बोलली .
" ओ. काय बघता असा . ह्या पूर्वी काय मला पाहिलं नाही का ? "
" पाहिलं होतं ना ..पण एवढ्या सुंदर लुक मध्ये आज पहिली बार बघतोय ना .." तो तीच्यकडे एकटक बघतच बोलला ..
तिला तर त्याच फार हसू येत होतं. " हो का ? घ्या मग बघून जेवढं बघायचं आहे . तेवढं बघून घ्या आज "
त्याला कधाचित ती काय बोलली ते कळलंच नव्हत .तो बोलून गेला ." हो तेच तर करतोय "
तो असं बोलल्यावर तर तिला त्याच जाम हसू आलं . एवढं
आलं की ते तिला कंट्रोलच नाही झालं .तिच्या हसण्याचा जेव्हा त्याला आवाज आला . तेव्हा कुठे तो भानावर आला ..
" काय ग काय झालं ? का हसतेस ? " तो विचारू लागला .
" काही नाही . मी आलेच लस घेऊन ." असं म्हणत ती हसत हसतच लस घ्यायला गेली .
तेवढ्यात त्याच्याकडे एक मुलगी गुलाबाची परडी घेऊन .
गुलाब विकणारी चिमुरडी मुलगी आली .
" दादा फुल घ्या ना " अस म्हणत ती त्याला विनवणी करत होती . त्याने गुलाबाचे खूप सारे फुल घेऊन त्याचा एक छानसा गुश्चा तयार केला . आणि त्या चिमुरडीच्या परडीत चार ते पाच हजार रुपये ठेवले . हे सारं दृश्य ऊर्मी दुरूनच बघत होती .
ती चिमुरडी निघून गेली . आणि ऊर्मी ही लस घेऊन आली . तो तिला विचारू लागला .." घेतलीस का लस "
" हो घेतली " कापसाने लस घेतलेल्या जागेवर चोलत ऊर्मी बोलली ..
" त्रास होतोय का खूप " तो काळजी ने बोलला ..
" नाही .." ती हसतच बोलली ..
तो तिच्या समोर गुढग्यावर टेकून उभा राहिला .आणि हातात असलेले गुलाबाचे फूल घेऊन तिला प्रपोज करू लागला .
तिने ही आनंदाने ते फुल घेतले . आणि त्याला एक घट्ट मिठी मारत ती बोलली .." म्हंटले होते ना प्रेमात पडशील ."
असं म्हणत ते दोघेही खूप हसले . आणि एकमेकांना मनापासून त्यांनी आपलं मानल.
कशी वाटली ही लॉक डाऊन नंतरची लव्हस्टोरी . कॉमेंट करून नक्की सांगा.