माणूस तिथे माणूस राहत नाही ,
स्वतःला काय वाटतं ते ही सांगत नाही ..
दुःखाने पिडतो , सुखासाठी दडपडतो ,
आपण माणूस म्हणून जन्माला आलो ,हेचं विसरतो .
माणूस तिथे माणूस राहत नाही ...
अहंकार त्याचा उंचावतो ,
मनाचा मोठेपणा कुठेतरी विसावतो ,
माणूस तिथे माणूस राहत नाही ...
उच्च - नीच्चता जिथे बघायला मिळते ,
वर्ण भेदाची कळी उमललेली असते ,
श्रेष्ठ - कनिष्ठ जिथे मनी रूजलेलं असतं ,
माणूस तिथे माणूस राहत नाही ...
परकेपणाचे सतत दर्शन होते ,
पांग फेडण्याच मानव जातीचा ,
हा जन्म लाभला ..
हा विचाराचं मनी कधी नाही रुजला ,
तिथे माणूस माणूस म्हणून जन्माला आला तरी कसा ?
माणूस तिथे माणूस राहत नाही ,
स्वतःला काय वाटतं ते ही सांगत नाही ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.