नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Aug 31, 2022

अपमानाचे प्रत्युत्तर ..

एक वेळेस आदर देणाऱ्या व्यक्तीला आदर कमी दिला तरी चालेल ..पण अपमानाचं प्रत्युत्तर एवढं द्यावं  की अपमान करणाऱ्या च्या शेवट पर्यंत ते लक्षात राहील ..

या जगात आई वडील सोडले ना की , कोण कोणाचं नसतं  म्हणूनच अपमानाच ओझ कधीही गिळायच नसतं .


अपमान करणाऱ्या व्यक्तीला ज्यादा झाडांवर चढू द्यायचं नसतं . कधीतरी आपल्याच युक्तीने अपमान करणाऱ्यालाचं झाडावर चढता चढता खाली पडायचं असतं .


अपमानाला प्रत्युत्तर अपमानच द्यायचं असतं ..

आपण मुह गिळून अपमान सहन करत गप्प बसलो ना , की लोकं आपला फायदा घ्यायला लागतील . फायदा घेता घेता आपल्यावर हसायला लागतील . आपली किंमत त्यांच्याच नजरेत काय ? आपल्याही नजरेत शून्य करून टाकतील . त्यामुळे  अपमानाच प्रत्युत्तर अपमान चं देणं केव्हाही हिताचं ठरेल .


जिंदगी खूबसूरती के साथ जीनी है !


तो अपना रास्ता खुद चुनो ।।


अपने आप को कभी कमजोर मत समझो ।


कभी भी , किसी को भी


अपने साधे -  सरल  और अच्छे दिल का ,


फायदा मत उठाने दो ।।


जहा आपको प्यार मिल रहा है ।


वहा प्यार ही बांटना ।


और  जहां आप के लिए नफरत है ।।


वहा ठहरना भी मत ।


वो आपके लिए और आपके
फ़्यूचर के लिए भी बहुत ही हानिकारक है ।।


Aug 29, 2022

आयुष्य एक सुंदर प्रवास

काय लिहलय आयुष्याच्या भाळी ..
काळोख पसरलाय रित्या आभाळी ..

वाऱ्याचा मंद स्पर्श उभारी जीवनाला देतो ..
अंधाऱ्या रातीतून सुर्य रोज नव्याने जन्म घेतो ..

 वृक्ष - तरू - वेली मोकळा श्वास घेण्यास मदत करतात ..
सांजवेळी भविष्याच्या सुंदर गुजगोष्टी मजला आठवतात.

मुक्तपणे   जीवन मी जगते ....
निसर्गाच्या सानिध्यात रोज आनंदी राहते ..

आयुष्य सुंदर आहे की नाही , माहीत नाही ..
पण मी त्याला सुंदर बनवलय ..
जेव्हा जेव्हा परिस्थितीने त्याच्याकडे पाठ फिरवली ..
तेव्हा तेव्हा मीच त्याला मनवलयं .. 

आयुष्य नावाचा सुंदर प्रवास आनंदाने पार केला ..
नियतीच्या क्रूर चक्रात विजय माझाच झाला ..
 मग माझ्या आयुष्याला मीच सलाम केला ..

दुर्गा मते

Aug 28, 2022

बाप्पा मोरया...

बाप्पा तुझ्या आशीर्वादाने ..
बहरू दे तुझ्या बालकांचे जीवन ..
आरोग्यदायी आयुष्य तू सर्वांना बहाल कर ..
माणुसकीची ज्योत मनोमनी पेटू दे ..
आयुष्य मुक्या पिल्लांचेही सार्थकी होऊ दे ..
आजन्म तुझी भक्ती करण्याची शिकवण तू आम्हांस दे ..

असावं असं एक नातं

असावं अस एक नातं ..
सर्वात सुंदर अंतर मनात रुजणार ..
ओझे मनाचे हलके करणार ..
सुखद क्षण आयुष्यात आणणार ..

दुःखद क्षण त्याच्या मिठीत सामावून घेणार ..

असावं अस एक नातं ..
मैत्रीच्या धाग्यात गुंफनार ...
वेळोवेळी निस्वार्थीपणे साथ देणार ...
आपुलकीने विचारपुस करणार .
मायेने जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवनार .

असावं असं एक नातं...
रक्ताच्या नात्याच्या  पलिकडे मला जपणार .
निस्वार्थीपणे जिवापाड प्रेम करणार ..
कधीचं न तुटणार ..
असावं असं एक बंधन ..
जन्मो जन्मीचं पावन संगम. .

दुर्गा मते

Aug 27, 2022

शेवटी सख्ख ते सख्खचं ..

सावत्र आई ती सावत्रचं असते ..
तिला सख्या आईची सर नसते ..

लेकरू सवतीच डोळ्यांत तिच्या सलतंचं ..
त्याच्यासाठी तिच्या मनात प्रेम नसतंच ..

वाऱ्यावर ते लेकरू पडलेलं असतं ..
मायेचे छत्र त्याच्यावर नसतं ..

सख्खी आई जेवढं तिच्या लेकरासाठी करते ..
तितकं सावत्र आई करत नसते ..

नऊ महिने गर्भात वाढवलेल्या आईचा वेगळाच महिमा असतो ...
त्याचा थांग पत्ता ही सावत्र आईला लागत नसतो .. 

शेवटी सख्खी आई ती सख्खी आई असते ..
तिची आणि आपलीच रक्ताची आणि मायेची नाळ जुळलेली असते ..

दुर्गा मते ..

Aug 25, 2022

तू भाग्य दिले..

रोज होतो मला स्पर्श तुझ्या आभासांचा ..


ऋतु हा बरसून आला आठवांचा ...
दारी सजला सोहळा सुखाचा
पार झाला डोंगर दुःखाचा ....

तुझी जिद्द झाली पुरी ..

नाही राहिली स्वप्न अधुरी ..


नशिबाने ही साथ दिली ..


दिल में जो तम्मना थी ..


वो पुरी हो गयी .


परदेशी तुझे गीत गाऊ लागले ..


मायदेशी आई वडील तुझे भाराऊन गेले ...


यश तुझे पाहून आनंदून गेले ...


तुझे स्वप्न या जीवनी येऊन तू साकार केले ...


तुझ्या. आई वडिलांच्या कष्टाचेही चीज झाले ..


तू त्यांना भाग्य दिले ...
आई वडिलांच्या जन्माचे ऋण फेडले ...

दुर्गा मते..

एकटेपणा चे ओझे दुरावले ..

परदेशी माझे स्वप्न फुलले ..
मायदेशी जे मी होते रुजवलेले ..

मानवजातीचे पांग फिटले ..
सौभाग्याचे लेणे सजले ..

स्त्रित्वाचे बीज गर्भात अंकुरले ..
आनंदाने डोळे भरुनी आले ..

जणू आयुष्याला लागली नवती ..
देवाने आई होण्याची दिली पावती ..

दूरदेशी सासर माझे ..

आई वडील मला दुरावले ..

बाप्पाने आई होण्याचे भाग्य दिले ..
एकटेपणाचे ओझे दुरावले ...
मी आनंदाने सुखावले ..
दुर्गा मते

Aug 24, 2022

गोष्ट एका राजा राणी ची. .

किती हा दुरावा तुझ्यात आणि  माझ्यात ...


एक अनामिक हूर हूर आपुल्या नात्यात
वेगळीच गोडी तुझ्यासाठी माझ्या उरात ..
दाटली चाऊल सुखाची तुझ्या स्पंदनात ..

साक्षीदार मी तुझ्या प्रेमाची ...
मीच लिहिली गाणी तुझ्या प्रितीची ..
का घेतली अंगावर ओढून चादर दुःखाची ..
कुठे हरवून गेली गोडी तुझ्या इश्काची ..

क्षण दुरावले सुखाचे .
ढग दाटून आले दुःखाचे ..
त्यानेच मन घायाळ झाले राजाचे ..
अन् डोळे भरून आले राणीचे ..

जणू प्रेमकहाणी त्यांची विरली ..
राजा पासून त्याची राणी दुरावली ..
राणीने राजाला बघताच मान मुरडली .
राजाने ही मग राणीकडे पाठ फिरवली ..

दुर्गा मते

Aug 14, 2022

तुझ्याशीच एकरूप व्हावंसं वाटतं ..

नियतीने च तुझ्याशी एकरूप केलं ..
आणि नियतीनेच तुझ्यापासून मला दुरावल ..

अशी कशी खेळी नियतीची ..
जिने कास तोडली तुझ्या - माझ्या मैत्रीची ..

आयुष्याचं लेण नकोस वाटतं ..
मैत्रीचं विस्कटलेल दान मनात दाटतं.

आता मी हरवलीय हे ..


सापडता सापडतं नाही हे ..

बीज नव्याने रूजवावस वाटतय ..
तुला नव्याने भुलवाव मन सांगतय ..

खूप एकटं एकटं वाटतं ...
तुझ्याशिवाय जीवन हे अपूर्ण वाटतं ..
पुन्हा पुन्हा तुझ्याशीच एकरूप  व्हावंसं वाटतं ..

दुर्गा मते

Aug 12, 2022

पैंज प्रेमाची ..

लावली मी पैंज प्रेमाची ..
रेखा बदलली नशीबाची ..
तोडली नाळ पुस्तकांची ..

अल्लड वय निसटून गेले ..
मी प्रेम रंगी रंगले ...
शिकून मोठं होण्याचे स्वप्न ही भुलले ..

वेड विश्व मनानी तयार केलं ..
त्याच्या पायी शिक्षणाचं स्वप्न निकामी झालं ..
हसत्या- खेळत्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं ..

अस्थिर मन स्थिर झालं ..
आई वडिलांचं नाव धुळीस मिळालं ..
तेव्हाच कुठेतरी माझं चुकीचं स्वप्न खुंटल ..

दुर्गा मते

काल्पनिक रचना माझ्या आयुष्याशी संबधित नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी ..

Aug 11, 2022

एक धागा विश्वासाचा

राखी बांधते दादा विश्वासाची ..
तू घे हमी माझ्या रक्षणाची ..
जप मनी रास आपुलकीची ..

मी ताईडी तुझी लाडाची ..

द्वेष राग नको ठेवू मनी..
उंदंड आयुष्य लाभो तुला क्षणो क्षणी .
हीच प्रार्थना माझी बाप्पा पाशी ..
आज बांधते तुला राखी ..

खूप यश मिळो .. आशीर्वाद देते ...
तूच नको तर मी ही तुझी रक्षा करेन ..
ह्यासाठी तुला आज विश्वासाचा धागा बांधते ..

प्रतिलीपी वरील सर्वच बंधू वर्गाला समर्पित ..

का रे माझ्यावर असा अन्याय ..

तू देणार  होतास मला न्याय ..
मग आता का रे असा माझ्यावर अन्याय ...

तुला दिलेले वचन मी आजही जपते ..
तुझ्याही नकळत तुझ्याशी एकनिष्ठ राहते ...

देह रातोरात झिजवते  ,

का कुणास ठाउक तुझ्याच आठवणीत गुरफटते ..

छंद मला अजूनही तुझ्यातच रमण्याचा ..

अजुनही लळा मला तुझ्या सहवासात राहण्याचा ..

प्रेम पत्र लिहितांना नकळत आठवतोस तू .

डोळ्यांत ह्या बरसून येतो आसवांचा ऋतु ..

का रे माझ्यावर असा अन्याय ...

देणार होतास ना तू मला न्याय ..


दुर्गा मते


Aug 10, 2022

समजून घेण्यात सारं काही आहे..

रावसाहेब साधारणपणे पन्नाशी पार केलेले . प्रौढ व्यक्ती नुकतेच त्यांच्या पत्नीचे कॅन्सर अभावी निधन झालेले.
मुलाबालाचे लग्न झालेले घरी लेकी सूना आलेले .

घरची परिस्थिती खूपच छान कधी काही कमी पडणार नाही . वडीलापोर्जित प्रॉपर्टी असल्या मुळे परिस्थिती सर्वसामान्य होती .

त्यांची पती स्वर्गवासी झाल्यानंतर त्याच्यावर खूपच वाईट दिवस आले . शेवटी सूना ह्या सूना असतात . कितीही जीव लावला तरी ही त्या कधी लेक होत नसतात.

हे वाक्य कलियुगात घरोघरी रुजताना दिसतं . मुलांनी घर दार नावावर करून घेतले . वडिलांकडे दुर्लक्ष करू लागले . लेक सूनाच्या अशा वागणुकी नंतर रावसाहेब


रावांच्या डोक्यात खुळ शिरलं पुनर्विवाहाच त्यांच्या पुनर्विवाहा चा गावात चर्चेचा विषय झाला . हि बातमी त्यांच्या मुलांच्या कानावर पडली .


त्यांच्या दोन्हीही मुलांनी त्यांच्या अंगावर हात उचलला . त्याचा रावसाहेब रावांना खूप राग आला . नंतर त्यांनी निर्णय घेतला . लेका सूनातून वेगळ राहण्याचा . दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्यांचा पसारा उचलला . आणि ते घरापासून खूप दूर राहायला गेले .


सुरुवातीला त्यांना स्वयंपाक बनवता येत नसल्याने ते दुसऱ्याच्या चं घरी जेवायला जायचे . ज्या घरात ते नेहमी जेवायला जायचे. त्या घरात एकवीस वर्षाची तरुणी होती . अनामिका  तिचं नाव तिचं त्यांना जेवायला वाढायची . सकाळीच अंगोळीला पाणी नेऊन द्यायची. 


त्यांच्या पुनर्विवाहाची बातमी तिच्या ही कानावर पडली होती . त्यांच्या रूटीन ला जवळपास महिना झाला होता . कळत नकळत अनामिका राव साहेबाच्या प्रेमात पडली . आणि तिने एके दिवशी त्या प्रेमाची कबुली दिली .


त्या दिवशी राव साहेबांना खूप वाई ट वाटले .
" बाळा तू माझ्या मुलीप्रमाने आहेस . मी तुझ्या शी लग्न कस करणार.  तुझे आई वडील काय विचार करतील माझ्या बद्दल " ते तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागले . पण तिने काही समजून घेतले नाही . .

मुलगी हुड बुध्दीची आहे . हे लक्षात घेऊन रावसाहेब रावांनी ही बातमी तिच्या आई वडिलां च्या कानावर घालून तिचं लवकरात लवकर लग्न करून देण्याचं सुचवलं आणि तूर्तास त्यांचा तेथील मुक्काम काही काळासाठी स्थगित केला . आणि ठरल्या प्रमाणे पुनर्विवाह केला .


अनामिका चेही खूप सुंदर मुलाशी लग्न झाले . दोघेही आपल्या आपल्या आयुष्यात समाधानी आहेत . एकमेकांच्या मनात एकमेकांसाठी आदर ही आहे .

एक अनोखी प्रेम कहाणी

तो दूर देशी राहूनही तिच्या मनात वसला ..
राजा तो तिच्या स्वप्नातला ..

तिने मनोमनी डाव मांडला ..
धरतीवर ह्या प्रेम सोहळा रंगला ...

पाहता क्षणी ती तिच्यावर भाळली ..
प्रीत ही हळुवार लाजली ..

त्याच्या प्रेमळ स्पर्शाने ती शहारली ..


वेदना तिच्या मनाची हळुवार तिने सावरली ..


एक सुंदर स्वप्न ती त्याच्या साथीने पाहू लागली ..
राजा लाही राणी मनोमनी आवडली ..

एक अनोखी प्रेम कहाणी रंगली ..
राजा राणीची ती कहाणी पूर्ण होऊन अजरामर ही झाली ...

Aug 9, 2022

अनमोल साठा.

माणसाचं जीवन पैशाच्या जोरावर चालतं ..
गरिबीच ओझं साऱ्यांनाच नकोस वाटतं ..

पैसा म्हणजे सर्वकाही वाटायला लागतं ..
कधीतरी पैशासाठीचं नात्याच गणित ही चुकतं ..

पैशाने सारचं नाही घेता येत विकत ..
हे लक्षात ठेवावं आपण ..

जीवन जगताना पैसां आहेच महत्वाचा ..
पैशासाठी नाते पणाला लावणारा व्यवहार काय कामाचा .

पैसा जेवढ्या पुरता तेवढाच कमवावा ..
पैशा पेक्षा अनमोल तो नात्याचा साठा ..तोच मनी जपावा ..


Aug 8, 2022

मैत्री

बालपणीची मैत्री दुरावली ..

आठवणीत फक्त दुनियादारी राहिली ..


क्षण अल्लड अवखळ हरवले ..
या कुमार अवस्थेत नाही कधी ते गवसले ..

बालपण गोंडस मी जगले ...
ते दिवस अजुनही नाही विसरले ..

बालपण सरले तरुणपण आले ..
उच्च माध्यमिक विद्यालयात मैत्रिणीचे ग्रुप वाढले ..

आठवी ते दहावीच्या बॅच मध्ये खूप मैत्रिणी भेटल्या ..
त्या अजुनही नाही विसरता आल्या .

वर्ष वर्ष भेट होत नाही ..
असा एक ही दिवस जात नाही ..
ज्या दिवशी आमचं बोलणं होत नाही ..

लिपीवर ही खूप जणांशी मैत्री झाली ..


अनोळखी वीण ओळख निर्माण करू लागली ..


ऑनलाईन मैत्री ही नाही ऑनलाईन वाटू लागली ..


ती निस्वार्थ मैत्री ही जिवाभावाची वाटू लागली ..

रक्ताच्या नात्या पलिकडील नातं मैत्रीचं ..
तेच नातं खरं हक्काचं ..

Aug 4, 2022

क्षण सूना झाला..

आठवणीतील गाणी रुजले मनी ....
ते दिवस आठवतात क्षणो क्षणी ..


पहिल्या प्रेमाचे आहे ते साक्षी ..

झाली आज नव्याने त्यांच्याशी मैत्री ..


अबोल भावना नयनी रेंगाळली ..


प्रीत ती नव्याने आठवली ..


स्वप्न सारी अर्ध्यावर राहिली ..


राधा कृष्णाची मैत्री हिरमुसली ..


स्तब्ध झाला प्रवास प्रेमाचा ...
हर एक क्षण सूना सूना झाला ..
ह्या आयुष्याचा ..

Aug 2, 2022

माझा राजा..

कधीकधी कंटाळा येतो तुझा ..
तुझ्याच साठी जीव तुटतो माझा ..
तूच माझा लाडका राजा ..

खूप त्रास देतो मला ..
आईची काळजीच नाही रे तुला ..

सांगू मी माझी व्यथा कुणाला ..

जो सर्वात जास्त आवडतो ..
त्याचाच सर्वात जास्त राग येतो ..
कारण तोच मला सर्वात जास्त त्रास देतो .
आणि तोच माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो ..

हरवून जाते मी

वेड तुझे लागताच मनी हूर हूर दाटते ..
प्रणयाची ती रात्र आस लावते ..

भेबान होतो जीव स्पर्शास तुझ्या ..
वाटत तू असावस सतत जवळ माझ्या ..

गोड सुर तुझे ऐका वेसे वाटतात ..
प्रेमाचे धुके नयनी दाटतात ..

स्वप्न मी मनोमनी रंगवते ..
 सोबतचे क्षण तुझ्या स्वर्ग सुख देऊन जाते ..

मी तुझ्यात दंगते ..सुर काळजाचे छेडते ..
नजरेला नजर तुझी भिडते ..
मी कुठेतरी हरवून जाते ..

आठवणींचा पाऊस..

ओल्या सांजवेळी नको तुझ्या आठवणींचा पाऊस ..
पुरी झालीय आतुरलेल्या नयंनाची हाऊस ..

बरसणार नाही पाऊस मनासारखा ..
कोवळा ऋतु ही कुठे राहिलाय पहिल्यासारखा ..

भेभान तो कडाडतो , जीव  हा भांबावतो ...
तुझ्या सहवासात वावरतांना अनुभव नवा अध्याय उलगडतो ...

सांजवेळ ही सरली य हुरहूर लावणारी ..
आज फुलते सांज कावरी बावरी...

आठवण एक आगळी वेगळी जीवास वेड लावणारी ..
आयुष्य माझे कमी करणारी ....

नकोच ही सांजवेळ आठवणींचा पाऊस बरसणारी ..
दुर्गा मते

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...