आठवणीतील गाणी रुजले मनी ....
ते दिवस आठवतात क्षणो क्षणी ..
पहिल्या प्रेमाचे आहे ते साक्षी ..
झाली आज नव्याने त्यांच्याशी मैत्री ..
अबोल भावना नयनी रेंगाळली ..
प्रीत ती नव्याने आठवली ..
स्वप्न सारी अर्ध्यावर राहिली ..
राधा कृष्णाची मैत्री हिरमुसली ..
स्तब्ध झाला प्रवास प्रेमाचा ...
हर एक क्षण सूना सूना झाला ..
ह्या आयुष्याचा ..
No comments:
Post a Comment
Comments plz.