नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 30, 2021

होऊन जाऊ स्वप्नांत दंग

होऊन जाऊ स्वप्नांत दंग ,
आपुल्या  स्पंदणाला देऊया प्रेमाचे रंग ,

ओठ रिते ते कोमल स्पर्शासाठी ,


घेऊन ये ती आसुसलेली लाट  माझ्यासाठी ,
गगनाला ही बोलवले मी तुझ्या स्वागतासाठी ,
सजले रे सख्या आज  खास तुझ्यासाठी ...

सांज वेळी गेले भाराऊनी ,
लाजू लागले मनातल्या मनात हसू लागले ,
ते क्षण खास ठरले तुझ्या स्पर्शा हुनही ,

माझ्या कल्पनेतील भाव त्यात उतरले
मनास माझ्या आपरुक वाटू लागले ,
तुझ्या भेटीसाठी तन मन माझे आ तुरले ,

तू येताना चिंता सोडून ये दूरदेशी ,
एकरूप हो माझ्याशी ,
दोघे मिळून होऊन जाऊ स्वप्नांत दंग ,
आपुल्या स्पंदणाला देऊया प्रेमाचे रंग ,



पैंजण

आनंदी बापाची लाडकी लेक . तिच्यासाठी उभ्या जगाशी भांडणारा हा जगातील पहिला बाप असेल . आपल्या लाडोबला कधीही बिना पैंजनाच ठेवायचं नाही . हा त्याचा हट्टचं का आणि कशासाठी हे आनंदीला कधीचं नाही समजलं ....
" पहिली बेटी धन की पेटी " असं म्हणत राजाराम भाऊने आनंदीला लहानाचं मोठं केलं . तिच्या पहिल्याbirthday पासून ते आनंदीला एकच gipt देत आले ते म्हणजे पैंजण आणि ते ही ,  ते पैंजण ते स्वतः तिच्या पायात घालायचे अगदी आनंदाने , कोणी जळाव आणि दृष्ट लागेल असं प्रेम होत . बापलेकीच एकमेंकावर ...
आता आनंदीचा अठरावा birthday जवळ आला होता . ती बाबाला सहज बोलून जाते .  " बाबा तुम्ही मला दरवेळेस birthday ला पैंजण गिफ्ट देता ह्या वेळेस काहीतरी वेगळं द्या ना , आणि जर पैंजण च द्यायचं असेल तर मग पैंजण च का ह्याचं सिक्रेट सांगा . "
बाबा मोरक हसतात आणि म्हणतात , " मी तुला ह्या वेळेस काहीतरी वेगळं गिफ्ट देईन आणि पैंजण च का ह्याचं सिक्रेट पण सांगेन . अठरावा birthday स्पेशल असेल माझ्या लाडोबाचा . " 
ती मोठ्या  उत्सुकतेने विचारते , "बाबा काय गिफ्ट देणार तुम्ही मला अठराव्या birthday ला सांगा ना प्लीज , "     " अरे ते सरप्राइज आहे ना आधीच कसं सांगणार , सांगेन वेळ आल्यावर . काळजी करू नकोस गिफ्ट तुला आवडेल असच असेल ."
ती म्हणते , " ठीक है बाबा तुम्ही बोलतायं म्हणजे गिफ्ट छान असणारं असं म्हणत ती घराबाहेर पडते . "
Birthday ला तिच्या मोजून दोन च दिवस बाकी होते म्हणून ती काही हट्ट करत नाही . बाबाचा लाडोबा असला तरी खूप समजूतदार होता तो लाडोबा ...
आज खूप उशीर झाला होता तिला , घरी परतायला म्हणून तिचे बाबा खूप काळजी करत होते . सांजवेळ सरुन गेली होती . एवढा उशीर आजपर्यंत तिला कधीचं झाला नव्हता म्हणून आई ही काळजी करत होती .
तेवढ्यात एक अनोळखी नंबर वरुन कॉल येतो . आनंदी देसाई आपली मुलगी आहे का तिचा बायपास हाय वे वर खूप मोठा axident झाला आहे . तुम्ही तात्काळ " सिटी हॉस्पिटलमध्ये पोहचा . "
फोन खाली ठेवताच क्षणाचाही विलंब न करता ते हॉस्पिटलमध्ये पोहोचतात . लाडक्या लेकीचं  अंग रक्ताने माखलेले पाहून राजाराम भाऊ खूप अस्वस्थ होतात . पण
घरच्या लक्ष्मीला सावरत ते म्हणतात  , " काही होणार नाही आपल्या लाडोबाला तो वर बसलाय ना तो सार सुरळीत करेन . "
तेवढ्यात डॉक्टर येतात आणि म्हणतात  ,  " तुमच्या मुलीची conditition खूप क्रिटिकल आहे . वेळेत हवी ती अँक्शन घेतली नाही तर , जीवास धोका पोहचू शकतो . "
तेवढ्यात राजाराम भाऊ बोलतात , " जेवढे पैसे लागतील तेवढे लावायची तयारी आहे माझी लवकरात लवकर तुम्ही हवी ती अक्शन घ्या . उपचारात कसलीही कमतरता राहायला नको . "
त्यावर डॉक्टर म्हणतात ,  " तुमच्या मुलीचं हृदय कामातून गेलंय ते चेंज करावं , त्यासाठी आपल्याला hurt doner
शोधावा लागेल . आणि कोणतंही  हृदय नाही . जे मॅच होईल तिच्या हृदयाला तेचं हवं . "
राजाराम भाऊ डॉक्टरांचं बोलणं ऐकून खूप tress घेतात . पण धीर नाही सोडत . लागलीच ते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन hurt doner शोधतात . पण यश काही मिळतं नाही . सेम टू सेम hurt doner काही मिळाला नाही . मग शेवटी राजाराम भाऊ स्वतः चं हृदय तिला अर्पण करायचं ठरवतात . साऱ्या प्रोसिजर क्लिअर करून ते तिला आपल हृदय अर्पण करतात .
Hurtdonet करण्यापूर्वी ते एक ऑडिओ क्लिप तयार करतात . आणि मगच प्रोसीजर साठी जातात .
आपल्या लाडोबाला जीवदान देताना आपल कपाळा च कुंकू मिटल्या जाणार माहीत असताना सुद्धा खंबीर रहाणाऱ्या त्याच्या अर्धांगीला माझा सलाम ...
प्रोसिजिर होतात . Hurtdonet करता क्षणीच राजाराम भाऊ हे जग सोडून जातात .
आकाशात  तारा होऊन चमकतात .
आता त्यांच्या मुलीची परिस्तिथी बऱ्यापैकी बरी होती . तिला ऐन तिच्या birthday च्या दिवशीच सुट्टी मिळते .
आणि ती तिच्या आईबरोबर घरी येते . सारे दिसताय पण आपला लाडका बाबा दिसत नाही ह्या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटतं . ती आई ला म्हणते , " आई बाबा कुठं य ग मला सगळ्यांत आधी त्याच्या कुशीत शिरून रडायचं ग मी बरी झाले ह्याचा आनंद सेलिब्रेट करायचा ,  ग बोलव ना त्याला लवकर  . आज माझा birthday ही आहे . तो मला काहीतरी स्पेशल गिफ्ट देणार होता त्याची तयारी करतोय का ? " तिची काहीचं न बोलता बाबां च्या फोटोकडे हात दाखवत म्हणते , " तो तिथे य तुझा बाबा , आणि ती तिथे जी फोटोखाली जी क्लिप ठेवलीय ना ती क्लिप च तुझी ह्या birthday च गिफ्ट आहे बेटा ."
निशब्द होऊन आनंदी ती क्लिप हातात घेते आणि क्षणाचा ही विलंब न करता ती क्लिप ऐकते .
बेटा तू मला सतत विचारायची ना मी पैंजण च  का गिफ्ट करतो तर ऐक बेटा , " तुझ्या पैंजनची छुन छुन ऐकल्यानंतर तू आनंदात आहे असं मला फिल व्हायचं माझं अल्लड पिल्लू कायम आनंदित राहावं असच मला वाटयाच म्हणून मी तुला नेहमी पैंजण गिफ्ट करायचो .
तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यानंतर तू मला परकी तर होशिलच पण अबोलही होशील . प्लीज बाळा मी काळाच्या ओघात असेन नसेन पण प्लीज तू तुझे पाय बिना पैंजनाचे कधीचं ठेवायचे नाही . हे माझ्याकडून तुला शेवटचं पैंजण माझी आठवण म्हणून कायम जप बाळा याला . आणि तू मला विचारलं होत ना मला अठराव्या birthday ला काय स्पेशल गिफ्ट देशील तर मी तुला माझं हृदय गिफ्ट दिलंय , तुला पुनर्जन्म दिलाय आवडलं ना गिफ्ट तुझा प्रिय बाबा ....नेहमी सुखात रहा बाळा माझं संपूर्ण आयुष्य तुला लाभो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना...!!"

क्लिप ऐकुन आनंदी च्या पायाखालची जमीनच सरकते .
ती ओक्साबोक्सी रडते आणि म्हणते , " बाबा मी तुझी आठवण जिवापाड जपेन आणि वचन देते तुला मी माझे पायात पैंजण नेहमी घालत जाईन ...."


नशिबावर केलेली सुंदर रचना

कोऱ्या ह्या पाटीवर ,
श्री गणेशा लिहूया लवकर ,
गिर्वूया नशिबाचे अक्षर ,
रचू या रचना आयुष्यावर सुंदर ....!!!!

जन्मतः च नशीबाची कोरी पाटी होती मिळाली ,
नशिबाला आजावण्यासाठी बुद्दीच होती गुरुकिल्ली ,

कुठल्या अक्षराने सुरुवात करावी लिहिण्याची ,
कसोटी होती बीच र्या बुध्दीची ,
पण सुरुवात तर तिलाच होती करायची ,

अ आ इ चा प्रवास सुरू झाला , 
बुध्दीला आरसा नवा मिळाला ,

शिक्षण , अनुभव , संघर्ष ,
यांनी रेखाटले आयुष्याचे सुंदर चित्र ,
नशिबाचे अक्षर गिर्वण्यासाठी हेच तर , होते खास मित्र ....


लेक माझी लाडकी

भलतीच चिंता सतावत आहे ,
बर झाल तुझी साथ आहे ,
पोरक्या कुशिला माझ्या तिचा च तर आधार आहे ,
तूच माझ्या आयुष्याची वेल वाढवणारी ,
स्त्री जन्म माझा सार्थक करणारी ,
तुझ्या बासरित माया माझी दरवळणारी ,

तुझे रडगाणे आनंदाने मी ऐकणारी ,
तुझ्या सहवासात दुःख सारे विसरणारी ,
चिंता जीवनाची तू लयास नेणारी ,
आनंदाची पोच पावती देणारी ,

आयुष्य माझ सावरणारी ,
आसू डोळ्यांतील पुसनारी ,
वेळ प्रसंगी आईच  कर्तव्य पार पाडनारी ,
तू ग लेक माझी लाडकी ...

तूच माझ आयुष्य

हे माझ्या राजकुमारा ,
तू ये माझ्या घरापुढे ,
मी सोबत तुझ्या येईन मांडवा मध्ये ,
तुझ्यासाठी करेन उपास तापास ,
स काळ सकाळी चहा करून देईन झकास ,
तुझ्या स्वपांचे होईल मी आकाश ,

तुझ्या - माझ्या स्वप्नांचे घर बांधेन मी आकाशात ,
आयुष्यभर तुझं च नाव असेल माझ्या ओठात ,
तुझ्या - माझ्या प्रेमाचा अंश वाढेल माझ्या पोटात ,

तू आयुष्य आहेस माझं ,
वटसावित्रीपौर्णिमिने सोभाग्य लाभेल तुझ ,

प्रत्येक जन्मात तूच मला हवा ,
तुझ्यासाठी स्त्री जन्म घेईन मी नवा ,

तुझी - माझी जोडी अमर व्हावी ,
त्याला न दृष्ट कुणाची लागावी ,
त्यासाठी प्राथना करू आपण बाप्पापाशी ,

आय लव्ह यू माय लाईफ ,
आय एम युअर बेस्ट वाइफ ....

इस दिल को तेरी चाहत है

इस दिल को तेरी आदत हो गई है ।
मेरी आखों की तू ही चाहत है ।।

न देखती हूं जब तुझे ।
मेरी सांसे मुझसे ही अलविदा होती हैं ।।

जब तुम मुझसे आते नहीं हो मिलने ।
तब तक हो जाती हूं मैं बेचैन ।।

क्या बताऊं तुझे क्या हाल है इस दिल का ।
हरपल में करती हूं इंतजार तेरे लफ्जो का ।।

तू जब आता है तब खुशी के तोफे लेकर आता है ।
मेरे आखों के आसू मुझसे छी न कर ले जाता हैं ।।

इस लिए तो मुझे हरपल तेरा इंतजार रहता है ।
तू मेरी खुशी का खजाना है ।।
मेरी दर्द की दवा है ।।


मेरा मन

मेरा मन ,
कह रहा है ,
प्यार कर ,

कैसे में उसे ,
समजाउ ,
लग रहा डर ,

जब से तुझसे ,
बात हुई ,
तब से धड़क ,
रहा है दिल ,

सासो में खुशबू ,
तेरे नाम की ,
महक रही है ,
कैसे में उसे रोकु ,


बरं झालं सोबत आहेस

 असते .भलतीच चिंता सतावत आहे ,
बरं झालं तुझी साथ आहे ,
नाहीतर कुणास ठाऊक मी कशी जगले असते ,
तुझ्याविना कोण नाही माझे हे कसे कळले

Sep 29, 2021

नको आज चार भिंतीतील शाळा

बाई नको आज चार भिंतीतील शाळा ,
आज जरा अनुभवुया निसर्गातील कला ,

थांबवूया जरा आपुले लिहिणे वाचणे ,
ऐकुया  भिरभिरणाऱ्या पाखरांचे जीवनगाणे ,

पुस्तकाला थोडा वेळ ठेऊया दफ्तरात ,
शाळा भरवूया निसर्गाच्या सानिध्यात ,

आज चार भिंतीतील शाळेला लावुया कुलूप ,
अन् जाऊया पाहायला निसर्गाचा मुलुख ,

पुस्तकातल्या शब्दाचे अर्थ शोधुया नंतर ,
आधी दुरावलेल्या मानव आणि निसर्गाचे कमी करूया अंतर ...

बाई वर्गात शिकवलेली कवीता  ,
मला निसर्गाच्या सानिध्यात ऐकवा ,

कवितेविषयीची गोडी माझी वाढवा ,
निसर्गावर सुंदर काव्य ही मला सुचवा ,

आज पुस्तकातील प्रश्नांना. बाजूला ठेवूया ,
निसर्गातील प्रश्नांची उत्तरे आपण शोधूया ,

चार भिंतीतील शाळेला आज आराम देऊया ,
निसर्गातील गमंती - जमंती नव्याने शिकुया .........


कसं कळणार

चूक बरोबर करून काय करणार ,
मनातील सल मनातच राहणार ,
आयुष्याच्या वळणावर सांज कशी वो फुलणार ,
जर तुम्ही चूक नाही विसरणार ,
तर आयुष्याला नवीन वळण कसं वो मिळणार ,
गुपित नियतीच कसं उलगडणार ,

तेरे बिना

तेरे बिना जीना नहीं मुझे ।
तेरे लिए क्या खाब हैं दिल में क्या बताऊं तुझे ।।

जिंदगी मैंने सीखी है आपसे ।
गुजरना चाहते आपके साथ कह रहे हैं कसम से ।।

तेरे संग गुजरा हुआ हर पल ।
जिंदगी का सुहाना था सफर ।।

जी न पाएंगे हम जब टूट जाएंगा वो सफर ।
रोती हुई आंखें भी पूछेगी तुझे ।।
क्या मेरे बिना जी सकते हो तुम ।

तेरे बिना मैं मेरे बिना तुम नहीं मान लो ।
साथ जीने का फिर से वादा कर लो ।।


कणेराचे फुल विक्षिप्त की माणसाची विचार शैली

कोणाला गुलाबाच फुल आवडत तर कोणाला जाई - जुईच् पण,
मला आवडत ते कनेराचे फुल ...
जरा जगावेगळी चॉईस आहे माझी पण काय करणार कनेराच्या
फुलाला  कोनीच् आपल मानत नाही . आणि मि सगळेजण करतात तसा अन्याय त्याच्यावर् करू शकत नाही . आता तुम्ही विचारालं फुलावरही कोणी अन्याय करत का ? तर मि सांगेन हो
फुलांवरही अन्याय होतो , मि स्वतः हा पाहीलंय् फुलांवर अन्याय. होताना  सर्वच् फुलांवर नाही होत पण बीचाऱ्या कनेरावर् मात्र नक्कीच् होतो .
शहरी भागात नसेल होत कनेरावर् अन्याय , कधाचीत् कनेराची गोष्ट च् माहित नसेल , पण मि खेड्यात राहते त्यामुळे माझा  कनेराशी संबध् आला आणि त्याची गोष्ट कळाली ........
माणसं माणसावर् अन्याय करतात हि तर मनात खंत आहेच् पण याहून मोठी खंत आहे  ति माणसाने निसर्गालाही नाही सोडलं या गोष्टीची .
माझ्या गावांत एक जागृत देवस्थान् आहे , त्यामुळे  रोज सकाळी लवकर उठायच् , बागेत जाऊन फुल आनायचे आणि देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जायचे हे आम्हा मैत्रीनीच्  ठरलेल
रुटीन आहे . ह्यात कधीच बदल नाही झाला कितीही. कामं असो आम्हचा नियम म्हणजे नियम् आहे . आम्ही मैत्रीनी सोबत जायचो , सोबत यायचो .पण आज मला जरा जास्तच उशीर झाला . मैत्रीनीही मला एकटीला मागे सोडून निघून गेल्या होत्या
मग काय मि एकटीच बागेत गेले , दररोजच्या सारखे आज तिथे फुलच् नव्हते . मात्र बघताक्षणी लक्ष वेधून घेणार एक फुलपाखरु मला दिसलं . काळ्या रंगाची बॉर्डर असलेलं ते फुलपाखरु  , छटा हि लाल पांढऱ्या रंगांच्या अगदी काळ्या बॉर्डरला शोभेल अशा , त्याच ते रूप बघून मि त्याच्याकडे एकटक् बघतच्  राहिले . नकळत त्याच्याजवळ गेले अन माझ्याकडून ते ज्या फुलझाडावर बसलेल् होत .ते झाडच् हाल्ल् आणि ते उडायला लागल् , मि हि त्याच्या मागे धावू लागले , खूप दुरवर् धावत गेले अगदी बागेच्या शेवटच्या टोकापर्यंत तिथेही डोळे दिपतील् असं निसर्गसौंदर्य बघायला मिळाल् जे आजपर्यँत मि  नव्हतं पाहिलं . उग्र वासाची घाणेरीची फुल तर होतीच् , पण त्याचबरोबर् होती ती मंद गुलाबी रंगाची कनेराची फुल त्याच्या सुंगधाने तर मनाला साद घातलीच् होती , पण रुपही मनाला मोहवनारच्  होत . ती फुल पाहून मि खूप खुश झाले . कारण आज वेगळया प्रकारची फुल मि मंदिरात घेऊन जाणार होते .
जे आजपर्यँत कोनीहि नेले नव्हते .
जवळ असलेल्या पारडीत् मि सारी फुल तोडून् ठेवली आणि घाई - घाईने मंदिराच्या दिशेने निघाले , तिथे गेल्यानंतर स्वप्नांतही विचार नव्हता केला असा प्रकार घडला . मि पूजा केल्यानंतर देवी समोर फुल ठेवणारच् तर ,  ती फुलाची पारडी एका बाईने
घेतली आणि ती कनेराची सारी फुल मंदिरापासुन् खूप दुरवर् असलेल्या कचऱ्याच्या पेटीत नेऊन टाकली . मला त्या बाईचा खूप राग आला , पण मि काहीच नाही बोलू शकले कारण ती गावातील् सर्वात वृद्ध स्त्री होती , शिवाय तिच्या अंगात देवी येते असंही म्हणतात . म्हणून मि काहीच न् विचारता तिनेच् , सांगीतल .
             तु आज कनेराची फुल आणली हरकत नाही , पण
यानंतर हि फुल मंदिरात तर आणूच् नको पण तूझ्या घरातील्
देवाऱ्यात् हि नको ठेवत जाऊ हि फुल भूत- प्रेत काढण्यासाठी
करणी करण्यासाठी वापरतात् त्यामुळे ती फुल कोणत्याच् देवाला चालत नाही . त्या बाईच् हे बोलणं मला विचित्र् वाटलं
हास्यास्पद वाटलं ,  देवाला फुल चालत नाही असंही कुठे असत का ? पण वाद न् घालता तिथून पळ काढन् मला योग्य वाटलं .
कारण आधीच् खूप उशीर झालेला आणि सोबतही कोणीच् नव्हतं .  म्हणून मि त्या बाईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि
घरी निघून आले .
पारडीत् असणारी सारी फुल त्या बाईने फेकली खरी पण कसं काय त्या पारडीत् एक फुल अडकून राहील् होत . ते फुल मि घरी आल्यानंतर बघीतल  , आणि दिवसमोर् ठेवलं  . त्या फुलाचा सुंगध घरभर् पसरला होता , त्याच्या सुंगधाने प्रसन्न वाटत होत .
अरे व्वा ! केवढा सुंदर  सुंगध येतोय आज कोणती अगरबत्ती लावली देवासमोर असं म्हणतं म्हणतं माने काकु आम्हच्या घरी आल्या आणि त्यांनी हे कनेराच् फुल बघून डोक्याला च् हात लावला . आणि म्हणाल्या  अग हे फुल का  आणलं ? आणि आणलं तर आणलं पण देवासमोर का ठेवलं .अस म्हनतच देवाऱ्यातल्  फुल उचलुन् बाजूला टाकलं . त्याचा तो  प्रश्न ऐकून मि तर चक्रावलेच् होते . मंदिरातही ती बाई तेच बोलली आणि आता माने काकू हि तेच बोलत होत्या . आता मात्र मला शहानिशा करायची होती . नेमक कनेराचे फुल देवासमोर् ठेवल्याने काय होत ? मि माने काकूना विचारलं काय हो काकू
काय फरक पडतो कनेराच फुल देवासमोर् ठेवल्याने . काय कमी आहे त्या फुलामध्ये अबोलीलाही लाजवेल् असा त्याचा रंग
आहे , मनमोहक् असा त्याचा सुंगध हे मग का ते देवाला चालत नाही . तर त्यावर त्या म्हणाल्या हे फुल करणी करण्यासाठी , भूत काढण्यासाठी ह्याचा वापर करतात ,  म्हणून ते देवाला चालत नाही .
मला तरीही ते पटत नव्हतं , मि त्यांना म्हणाले ज्याचा उपयोग् भूत प्रेत काढण्यासाठी होतो , त्याचा देवाला विटाळ कसा असेन ? उलट जे फुल वाईट गोष्टीचा  नायनाट करतो ते फुल
देवाला सर्वात प्रिय असायला हवं नाही का ? त्यावर त्या म्हणाल्या , " करणी करण तर वाईट च् आहे ना , लोकांच् आयुष्य बरबाद होत कोणी करणी केली तर "  आता माझ्याकडे
बोलायला शब्द नव्हते ,  पण तरीही मि  समजावण्याचा प्रयत्न केला यात फुलाची काय चुक ? फुल म्हणतं का मानसाला माझा
वापर करणी करण्यासाठी कर , लोकांच् वाईट करण्यासाठी कर
त्याला तर माहीतहि नसतं आपण नेमकं कुठे आहोत् , रस्त्याच्या
कडेला कि देवाऱ्यासमोर् लोकांनी जे स्थान दिल ते तो स्थान स्वीकारतो . हे ऐकल्यानंतर माने काकूही गप्प होतात . पण तरीही त्या पुन्हां म्हणाल्याच् तुझं म्हणणं काही मला पटत नाही .
मग  मिही त्याच्यासमोरच ते फुल घेतल् आणि पुन्हां देवाऱ्यात् ठेवल् .  आणि म्हणाले  बघा काकू देवाने तर फुल झीडकारल् नाही , स्वीकारलच् . उलट ह्या फुलाने माझं देवघर् अजून छान दिसतंय . त्या ह्यावर् काहीच नाही बोलल्या , मनाशीच पुटपुटल्या अशा आगाउच्या कोण नादी लागेल . आणि निघून गेल्या .
मि जे सांगत् होते ते अजूनही नव्हतं पटलं त्यांना .
खरं सांगायच झालं तर् विक्षीप्त् माणसाची विचारशैली आहे ,  कनेराच फुल नाही . मि कनेराचा स्वीकार केलाय आणि मला वाटतं देवानेही केला .मला एक कळत नाही
निसर्गातील्  प्रत्येक गोष्टीची निर्मिती देवाने केलीय मग देवच् त्याचा विटाळ कसा करेल ?

       हि स्टोरी पूर्णतः काल्पनिक आहे पण अशा अंधश्रद्धा
अजूनही बघायला मिळतात् ,  अशा कोणत्याही अंधश्रद्धेला वाव
देण्याचा माझा हेतू नाही तर , अंधश्रध्दा निर्मुलन करण्याचा हा एक छोटासा प्रयन्त आहे . काही चुकलं असेल तर माफी असावी . देव म्हटलं की भावना असतात आणि त्या दुःखवण्याचा माझा हेतू नाही ...


समलिंगी संबंध पाप नाही

आजचा माझा विषय आहे समलिंगी संबंध पाप नाही . आज जरा वेगळा विषय हाताळते , चुकून गैरसमज करून घेऊ नका की मला atracation आहे की काय एखाद्या मुलीबद्दल तर , असं काही नाही . मला सामाजिक विषय हाताळायला आवडतात म्हणून लिहितेय .

आज जग  पुढे गेलं असलं तरी काही , रुढी परंपरा अजुनही भूरसटलेल्या विचारांच्या आहे . प्रेम प्रकरण , जातीबाह्य विवाह करणारे लोक ह्यांना समाजात योग्य तो मान - सन्मान नाही मिळत . वेळप्रसंगी वाळीत टाकण्यात येत . ह्या रुढीबरोबरचं जोडण्यात आलेली आहे अजुन एक समलिंगी संबंधांची रुढी .....!!!!!

समलिंगी संबंध असलेल्या मुला मुलींना खूप तूच्श मानलं जातं . समलिंगी संबंध असणाऱ्या लोकांना एवढी भीती असते . की त्यांना त्यांचं नातं समाजापासून लपवून ठेवाव
लागतं . ते उगडिक आलं तर भयानक शिक्षा नां सामोरे जावं लागतं  .  " असं  का ?"
"  समलिंगी संबंध हे काही पाप आहे का ? ती काही चूक आहे का ? "

             ती चूक असेल तर मग ती त्यांच्या जन्मतःच झालेली आहे . ( हा पॉईंट मी धर्म आणि हिंसा ह्या पुस्तकातून घेतला आहे )
हो ती त्यांच्या जन्मतःच झालेली आहे .
       जन्मा ला येताना आपल्या लैंगिक प्रेरणा कशा असाव्यात हे ठरवणं माणसाच्या हातात नसतं . अशा वेळी बहुंताश माणसांच्या लैंगिक प्रेरणा ह्या भिन्नलिंगी आकर्षनाच्या असतात .  त्याचं बरोबर तुरळक लोकांच्या प्रेरणा समलिंगी आकर्षण च्या असतात . म्हणून त्या चूक हे ठरवण्याचा अधिकार कोणालाच असता नये . पण जे सर्वसामान्य नाही ते विकृत , अनैसरगिक , ईश्र्वर अमान्य , कारण ईश्र्वरान स्त्री निर्माण केली तिचं मुळी पुरुषांच्या सुखासाठी आणि प्रजोत्पसाठी अशा धारणा माणसाच्या मनात धर्मग्रथानी पक्क्या करून टाकल्या आणि त्याविरुद्ध जनाऱ्याला शिक्षाही निश्चित केली .
         शिक्षा अश्याच गुन्हयाला केली जाते . तो समजून ऊमजून केला जातो , ज्यांन दुसऱ्याच्या जीवित - वित्ताची हानी होते अथवा शारीरिक - मानसिक छळणुक केली जाते . पण एकतर समलिंगी संबंध ठेवणारी माणसं ही अन्य कोणाचीच कसलीच हानी करत नाही . आणि दुसरं म्हणजे समलिंगी संबंधांच आकर्षण ही जर चूक असेल , तो जर बिघाड असेल तर तो त्यांच्या जन्मतःच झालेला असतो .
           ज्या बिघाडामुळे अशी माणस ज्याला आपण सर्वसामान्य आयुष्य म्हणतो , तसं आयुष्य जगू शकत नाही . त्यांना त्यांच्या लैगिंक सुखासाठी वेगळ्या वाटा शोधव्या लागतात . आणि मुख्य म्हणजे ही त्यांची हौस नसते , हे त्यांना वाटणारं वैविध्यच आकर्षण नसतं , तर तो त्यांचा नाईलाज असतो .

मग त्यांचा नाईलाज आपण चूक कसा म्हणू शकतो . समलिंगी संबंध हे पाप नाही . ती त्यांची हौस नाही . मग तरीही का समाज त्यांना स्वीकारत नाही . का त्यांना आपले संबंध समाजापासून लपवून ठेवावें लागतात .
का मनामारुंन  आयुष्य जगावं लागतं .

हा विचार बदलायला हवा त्यांना ही समाजात योग्य तो मान सन्मान मिळायला हवा . त्यांनाही ही आपलं नातं मिरवण्याचा एक मोकळा श्वास घेण्याचा अधिकार आहे . तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही .

ओवाळणीची परतफेड

माधव आणि माधवी अनाथ पोर लहानपाणीच आईवडील देवाघरी गेले . पोरकेपन वाट्याला आले . माधव हा माधवी पेक्षा वयाने खूप लहान , माधवीने माधववर आईप्रमाणे प्रेम केले . त्याच्यावर कुठलही संकट येण्याआधी  तिने ते संकट झेलले  . कारण तिने शेवटच्या क्षणी आईला वचन दिलेले असते .  की मी माझ्या आधी नेहमीच माधवचा विचार करेन . त्याच्या सुख दुःखात त्याची सावली होईल .


तुझी जागा तर , नाही घेऊ शकणार पण तुझी उणीव ही नाही भासू देणार . ते वचन तिने जिवापाड जपल ही आणि पाळल ही .....


                             माधव ही तिला आईच्या  जागी  मानत  होता  . तो त्याच्या ताईलाच आपलं सर्वस्व मानत होता . आई म्हणजे काय ? माहीत नव्हत पण ; ताई म्हणजे काय ते उत्तम रित्या माहीत होत .


            ताई म्हणजे आईचचं दुसर रूप असत ,


            आयुष्याचं झाकतं माप असतं ,


            कोमल मन तिचं आयुष्य फुलवून टाकतो ,


            ताई हा शब्दच मला खूप अपरूक वाटतो ,


           


अशा सुंदर भावना ताई विषयीच्या माधवच्या मनात स्फुरलेल्या होत्या . त्याला वेळोवेळी खत पाणी घातलं होतं , ते माधवीच्या प्रेमळ स्वभावाने ,  तिच्या संस्काराने .


आई विना पोर होती ती तरी , ही खूप संस्कारी आणि स्वाभिमानी होती . आणि तिने माधवलाही तसचं घडवलं होतं .  लोकांनी जळावं आणि त्यांच्या नात्याला दृष्ट लागावी . असं त्यांचं नातं होतं .


            चाफ्याच्या फुलाला अबोलीचा गंध ,


             माधवच्या ताईला माधवचाचं सुंगध ...


असं म्हणत त्याचं नातं फुलत गेलं . ते अगदी सुंदर  आनंदाने लहानाचे मोठे झाले . माधवीचे  लग्नाचे वय उलटुन गेले होते . पण माधवची सीता शोधल्याशिवाय आपण आपला राम शोधायचा  नाही . असं माधविने पक्क ठरवलेले होते . मग ते तर , माधवला मान्यच करावे लागले . पण ते मान्य जरी करायचे होते . तरी त्याला फार काही पटतं नव्हते .


मनाची चीलबिल होतं होती , ताई आधी आपलं लग्न आई बाबा असते . तर आधी ताईचं केलं असत अन् , मग आपल घोड नाचवलं असतं .  माधव ताईला म्हणाला , " मी लग्न करेन पण लग्नाआधी माझी जी  काहअट असेल ती तुला मान्य करावीच लागेल .


" कोणती अट माधू ? तू म्हणशील ती अट मला मान्य असेल . तू फक्त बोल "


" ताई आपण दोघांनी एकाच मांडवात लग्न करायचं हिचं माझी अट "


तेवढ्यात शामराव काका आले आणि " अगदी बरोबर बोललास माधू एकाच मांडवात दोघांचं शुभ मंगल करून टाकू "


माधवी ,

" काका हे कसं शक्य आहे , किती धावपळ होईल . "


श्यामराव काका , " मी असल्यावर धावपळ कशी होईल "


ठरल्याप्रमाणे माधवी आणि माधुच एकाच मांडवात लग्न होतं . सारं सुरळीत चाललेलं  होतं . माधू आणि माधवी सुखी संसारात खुश होते .  लग्नाला दीड वर्ष झालं .


माधवीला दिवस गेले . आपण मामा होणार ह्या बातमीने माधू खूप खुश झाला . ती ही खूप खुश होती . पण त्या आनंदावर विरजण हे पडलं .


माधवीच्या नवऱ्याला बिजनेस मध्ये खूप मोठा फटका बसला . खूप कर्ज झाल . कर्ज फेडण्यासाठी स्वतः च राहत घर विकाव लागलं . ते रस्त्यावर आले . ही बातमी माधूला कळताच तो रस्त्यावर आलेल्या आपल्या ताईला आणि भाऊजीला मायेचा आदर देतो . तो त्यांना आपल्या घरी राहण्याचा आग्रह करतो . माधवी खूप स्वाभिमानी माहेरी जायला राजीच होईना . हे माधु च्या लक्षात येताच तो म्हणतो ,  " अगं वेडा बाई मी तुला आणि माझ्या साल्याला भाऊ बिजेसाठी न्यायला आलो . उद्या दिवाळी आणि परवा भाऊ बीज मला ओवळणार नाही का ह्यवर्षी


माधवी , " अरे माधू मी विसरले उद्या दिवाळी नाही का ?


भाऊ बिजेसाठी मी येते . पण भाऊ बीजेनंतर राहण्याचा आग्रह करायचा नाही . "


" मी का करू राहण्याचा आग्रह उगाच माझ्या घराला ओझ ... "  माधव लटक्या रागात ...


" हो का बरं चल आता जाऊ ह्या .... " माधवी


माहेरी गेल्यानंतर चार दिवस तिला सुखाचे क्षण उपभोगता येतात . ओवळणीच्या दिवशी ती आपल्या भावाला ओवाळते . तिचा भाऊ ओवळणीत तिला नव्या घराची किल्ली देतो . ती बघून ती आश्चर्यचकित होते .


ती माधूला विचारते ,


" काय माधू हे ?  कशाची किल्ली आहे . ?"


" ती तुझी ओवाळणी आहे . तुझ्या नवीन हक्काच्या घराची किल्ली . "


" अरे पण कशासाठी नको अरे " ती खूप परावलंबी असल्यासारखी भाऊक होते .


तेवढ्यात माधु म्हणतो , " ताई लहानपणापासून तूच शिकवलं ना ओवाळणी कधीही   परत  करायची नसते म्हणून ,  मग आज तूच ओवाळणी अशी परत करतेस . भावाची माया एका क्षणात झटकली . "


" नाही रे  वेड्या असं काही नाही . माधू मी  ही भाऊबीज आणि  ही ओवाळणी  कधीच नाही विसरणार ह्याला जिवापाड जपणार . खूप खूप आभारी आहे तुझी" असं  बोलत असतानाच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात . माधु तिला त्यांच्या मायेची ऊब देतो . आणि दोघेही मन मोकळ रडतात आणि आई वडीलांच्या फोटो समोर हात जोडून नमस्कार करतात .


दुसऱ्या दिवशी माधवी आपल्या नवीन घरी जाण्याची तयारी करत असते . ती गाडीत बसणार तेवढ्यात माधुची बायको नीलिमा हिला अचानक चक्कर येते आणि ती खाली कोसळते . तेवढ्यात तिला सावरायला माधवी येते .
आणि लगेच डॉक्टरांना कॉल करते . 


थोड्याच

वेळात. डॉक्टर येतात  तिला चेक करतात . तेव्हा खूप वाईट बातमी ऐकायला मिळते . की निलिमा केव्हाही आई होऊ शकत नाही . बातमी ऐकून माधू पूर्ण पणे खचून गेला . नीलिमाची अवस्था तर  , बघन्याजोगी नव्हती . ती आतून खूप कोलमडून गेली होती . तिची ती अवस्था पाहून माधवीला खूप वाईट वाटत होत . काय करावं सुचत नव्हतं . तेवढ्यात तिचा हात आपल्या गर्भात वाढणाऱ्या अंकुराकडे गेला . आणि तिच्या डोक्यात ही परिस्तिथी बदलण्याची कल्पना आली . ती तशीच धावत जाऊन आपल्या नवऱ्याकडे गेली . डोक्यात आलेली कल्पना त्याला सांगितली . आणि त्याच्या सहखुशिने एक योग्य निर्णय घेतला . सर्वांच्या सुखी आयुष्यासाठी आनंदासाठी .


दुसऱ्या दिवशी ती माधूला म्हणते   " माधू नीलिमा कुठे ,?


मला तिला आणि तुला एक good news द्यायची आहे"


" Good news कसली "


"नीलिमा आल्यावरच सांगते " तेवढ्यात नीलिमा आली ती जाते आणि नीलिमाला आनंदाने एक मिठी मारते . आणि आनंदाने म्हणते , " अभिनंदन तू आई होणार आहेस "


त्या वाक्याने नीलिमाचे डोळे भरून आले , आणि ती भरलेले डोळे पुसत म्हणते , " का उगाच मजाक घेता ताई माझ्या जखमेवर मीठ चोळताय "


" अग मीठ नाही खरच तू आई होणार आहेस आणि ती नीलिमाचा हात आपल्या पोटावर फिरवत म्हणते हे बघ तुझ बाळ कसा वाटला त्याचा स्पर्श ? आवडला ना . "

"माधू. ,  काय बोलतेस ताई तू मला नाही कळलं काही "


"अरे दादा मी आणि यांनी असा निर्णय घेतला आम्ही आमचं पाहिलं बाळ  हे नीलिमाच्या पदरी दान करायच ठरवलं . मी पुन्हा आई होऊ शकते, पुन्हा चान्स घेऊ शकते .  नीलिमाची ओंजळ रिकामी राहू नये यासाठी मी हा निर्णय घेतला . ही तुमच्यावर मेहरबानी म्हणून नाही तर , ही तुझ्या ओवळणीची परत भेट आहे . त्यामुळे ती तुला स्विकारावीच लागेल.

ही बातमी ऐकून महाधू आणि   नीलिमाचे डोळे भरून येतात . ते हात जोडून त्या दोघांचे आभार मानतात . नीलिमाला तर कळतच नव्हतं आपल्या नंदेचे आभार कसे मानावे .  ती अगदी स्तंब्ध झाली होती .


तेवढ्यात माधवी आणि माधवीचा नवरा एका सुरात" काय मग आवडली ना ओवळणीची परत भेट स्विकारणार ना ?"


आवडली म्हणजे खूप आवडली तुम्ही आता नाही म्हटला तरी आम्ही ती स्विकारणार आहोत . असं म्हणत निलिमा  आपला आनंद व्यक्त करत होती  .  आनंदी निलिमाला बघून  माधवी खूप समाधान मिळते .  त्यांच्या भावा बहिणींच्या नात्यावर नव्याने वेगळाच सांज चढतो .


नात कोणतंही असो समजून घेणं  खूप गरजेचं असतं , नात्यात    वेळोवेळी आधार देण्याची खूप गरज असते  .दुसऱ्याच्या  सुखासाठी काळजाचा तुकडा ही त्याग करण्याची क्षमता असावी लागते . तेव्हा कुठे नातं टिकतं आणि फुलतं  त्यामुळे ,  आयुष्य सार्थकी होतं.



गंध सावळ्या सख्यचा

गंध सावळ्या सख्याचा मनास बिलगून गेला ,
  स्पंदनात माझ्या बीज प्रितीचे रुजवून गेला ,
   सुर काळजाचे छेडून गेला  , 

  सुंगध  प्रीतीचा तो घेऊन आला ,
  आसपास माझ्या  दरवळू लागला  ,

जसा अल्लड वारा काळजाचा ठोका चुकवी ,
सावळा रंग दिसे असा  की त्यास  दृष्ट लागावी ,

मर्द रांगडा गडी तो ,
सावळ्या रंगात शोभून दिसतो ,
त्याच्या नजरेचा बाण हृदयाला छेडतो  ,

साद  घातली त्याने  मनाला ,
ओढ लावली ह्या आसवलेल्या  तनाला ,
तुला बघण्यास व्याकूळ झालेल्या ह्या नयनाला ,

गंध सावळ्या सख्याचा मनास बिलगून गेला ,
  स्पंदनात माझ्या बीज प्रितीचे रुजवून गेला ,


चूक बरोबर करून काय करणार ,
मनातील सल मनातच राहणार ,
 कोण चूक  कोण बरोबर असं म्हणत वेळ वाया जाणार ,
त्यापेक्षा शांत राहून आयुष्य जगा .

Sep 28, 2021

     

जोपर्यंतवर  खांद्यावर पदर
  तोपर्यंत मला तुझी कदर
  तू माझा आदर कदर 

मी नेहमीच तुझा सन्मान करेन .

तुला नेहमीच माझ्या मनात पाहिलं स्थान असेल ,

पण प्लीज तू पुरुष आहेस  म्हणून माझ्यावर अधिकार गाजवू नको ....

हेचं माझंमोलाचं सांगणं असेल .

शेवटच्या श्वासापर्यंत तुझे विचार बदलण्याचाचं माझा संकल्प असेन ...

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
पदर घेऊन दाराआड लप असं चुकूनही सांगू नको . ते मला आणि माझ्यातील कणखर स्त्री ला कधीही मान्य होणार नाही . तू माझ्यापासून माझ् स्वांत्रत कधीही हिरावून घेऊ नको . ते तुला कधीच परवडणार नाही .मी जर हातात बांगड्या घातल्या असल्या तरी ,  मला कमी समजू नको . 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹मी एक स्वाभिमानी स्त्री आहे . होते आणि असेनआता तर अजुन सक्षम होण्याचा प्रयत्न करेन . तुझी मान्य असो नसो मी तुझ्यासाठी माझं व्यक्ती महत्त्व बदलणार नाही .🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌺🌺 🌺 सांगणं एकच तू माझा विचार कर 🌺🌺

🌺🌺🌺 मी तुझा विचार करेन . 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺स्त्री पुरुष समानता एवढंच मान्य कर 🌺🌺🌺🌺🌺 आयुष्य रंगून  जाईन बघ 🌺🌺🌺

  

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🌺🌺🌺कोणी असं ही म्हणत नाही ,🌺🌺🌺🌺
🌺🌺🌺ऐकुन ही कोणी घेत नाही ,🌺🌺🌺🌺🌺
🌺🌺🌺मनाला माझ्या कोणी सावरत नाही ,🌺🌺
🌺🌺चार समजुतीच्या गोष्टी कोणी शिकवत नाही🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

धन्य झाले मी

आई होन म्हणजेच आयुष्यातील सर्वांत मोठ सुख . स्त्रीचं अस्तित्व म्हणजे तिचं मातृत्व . जशी वेल फुलाविना वांझ ठरते , तशीच एक स्त्री तिच्या बाळा वीणा वांझ ठरते . दुर्दैव म्हणून निसर्गाने वांझ पणा दिला . कुस माझी अपूर्ण  ठेवली .  घराला घरपण म्हणजे काय असतं काहीचं कळत नव्हतं . पती कामात असल्यामुळे व्यस्त असायचे . एवढ्या मोठ्या घरात एकटीच राहायचे  ते उदास घर मला खायला उठायचं . त्या बिचाऱ्याच आयुष्यही माझ्या सारखंच उदास झाल होत . शेवटी त्यालाही त्याच्या अंगणात दुडूदुडू खेळणारी पाऊल हवी होती . बाळाची घरभर पसरली असती तर , एक वेगळीच शोभा माझ्या घराला आली असती . पण ती एका दुर्दैवी स्त्रिची केवळ कल्पना होती . वास्तविकता तिला माहीतच नव्हती . वांझ असल्यामुळे गावच्या बायका मला त्यांच्यात मिसळू देत नव्हत्या , माझ्या घराकडे कोणाचही येणं - जाणं नव्हतं .
नशिबाने लहान पणापासून पोरकेपणा दिलेला अजुनही गेलेला नव्हता . लहान असतानाच आई वडिलांच्या प्रेमाला मुकले , लग्नानंतर काहीचं दिवसांनी प्रेमळ सासू सासरे स्वर्गवासी झाले . नियतीने परकेपणा जणू माझ्या पाचीलाच पूजला होता . म्हणूनच पोरकेपणाने  अजुनही  माझी पाठ सोडली नव्हती . आता तर हे परकेपण माझ्या जीवावर आलं होतं . आपल वाटणारं हक्काचं घरही आता  सोडून जावं लागणार होत . सासू सासरे ह्यांच्या आठवणीने भरलेलं त्यांच्या आशीर्वादाने समृध्द  असलेलं माझं हक्काचं घर मला सोडून जावं लागणार होत. पर्याय नव्हता दुसरा काही कारण नवऱ्याची पोस्टिंग झाली होती ,  दुसऱ्या गावी मग काय करणार माझ्या हक्काच्या घराला रामराम करावाच लागला. 
आयुष्याला नवीन वळन  मिळेल ह्या आशेने मी गाव सोडले होते . कारण इथे तर आम्हाला सगळ्यांनीच वाळीत टाकलं होतं . आता नवीन ठिकाणी तरी आपल्याला जवळ करणार कोणीतरी असेल ह्या आशेवर मी गाव सोडले होते . कारण खेड्यातील माणस प्रेमळ असतात . हे एकलेलं होत . आता त्यांच्या सोबतच रहायला मिळणारं होत , आता तरी माझ्यावर माया करेन कोणीतरी ; नवरा जिवापाड प्रेम करायचा . त्याच्याकडून कधीचं काही त्रास नाही झाला . मी भुकेली होती ती मातृत्वाची एका कोमल स्पर्शाची मी आजपर्यंत कोणत्याही लहान बाळाला स्पर्श केलेला नव्हता . आता तरी मला तो स्पर्श अनुभवायला मिळेल . म्हणून मी गाव सोडले .
"रामपुर " हे माझं नवीन गाव . डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं निसर्गरम्य वातावरणाने समृध्द असलेलं रामपुर हे ते खेडेगाव . माझं घराचा परिसर खूप सुंदर होता . घर छोट होत , पण आकर्षित करणार होत . मी लगेच त्याला माझ्या आवडीप्रमाणे सजवल , घर सेट झाल्यानंतर एक छोटीशी पूजा ही ठेवली होती . शेजारच्या बायकानांही बोलावलं होतं . सगळ्याजणी अगदी उत्साहाने आल्या . सकाळी मदतीसाठी ही न बोलावता आल्या मला आता खूप छान वाटत होत . गावं सोडल्याचा आता आनंद वाटू लागला होता . पूजा संपल्यानंतरही , " तुम्ही घरं खूप छान सजवलं असं म्हणत सर्वांनी माझं कौतुक केलं . आणि काही मदत लागली तर हक्काने सांगा आम्ही आपलीच माणसं आहोत . असं म्हणत त्या साऱ्याजणी गेल्या .
आज मला खुश बघून नवराही खूप खुश झाला . कारण त्याने मला एवढं खुश सासू सासरे गेल्यानंतर  आज पहिल्यांदा पहिले होते .
आज मी त्यांच्यासाठी खूप छान रेडी झाले होते , मग काय बायकोला एवढं सुंदर तयार झालेलं बघून कुठलाही नवरा रोमँटिक होणारच , त्याने अलगद मला त्याच्या जवळ ओढलं आणि त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकवत मला एक किस दिलं . मी लाजत , " अरे हे काय खिडकी उगडीच आहे आपल लक्ष नाही गेलं ." आणि ती खिडकी बंद करण्यासाठी धावत जाते . काळ्याकुट्ट आकाशात एवढ्या सुंदर चांदण्या दिसत होत्या , मला त्यांच्याकडे आकर्षित करत होत्या . तेवढ्यात माझं लक्ष  चांदण्या न्याहळणाऱ्या एका गोंडस बाळाकडे गेलं . जाऊन त्याला
खुशीत घ्यावं असं वाटतं होत. पण तेवढ्यात नवरा आला आणि कल्पना कल्पनाच राहिली . तो खिडकी बंद करत असताना , " कोणीही बघितलं तरी काय काय हरकत आहे . मी तुझा हक्काचा नवरा आणि तू माझी हक्काची बायको आहेस . "
मी ही लाजत त्याची नजर चोरत हक्काची असले तरी ,  "आता खूप रात्र झाली आहे . झोपुया आपण असे म्हणत झोपायला गेले . "
आम्हची सकाळ ही खूप छान झाली . अगदी रोमँटिक आज त्याचा कामाचा पहिला दिवस म्हणून मी खूप छान रेडी झाले . त्याच्यासाठी खमंग असा नाश्ता बनवला . टीफिनलाही ही त्याच्याच आवडीच बनवल . म्हणून तो तर
आज जास्तच खुश झाला होता . जातांना , "गुड बाय काळजी घे मी संध्यकाळी लवकर येईन वाट बघं असे म्हणत परत एकदा त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकवत माझ्या  दिवसाची सुरुवात सुंदर करून तो ऑफिसमध्ये  गेला .
माझी कामं आवरल्यानंतर मी दुपारी बाहेर खुर्शीवर बसून वर्तमानपत्र वाचत बसले होते . अचानक एक बॉल आला आणि माझ्या डोक्याला लागला . हा बॉल कोणाचा आहे असं विचारायला जाईन म्हटल तर , एक गोंडस बाळ ,   "सॉरी आंटी ,  हा बॉल लागला का तुम्हाला मुद्दामहून नाही ओ मारला चुकून लागला . असं म्हणत तो माझ्याकडे घरी सांगू नका अशी गयावया करू लागला . "
त्याची ती अल्लड अदा पाहून मी त्याच्यावर फिदाच झाले .  मी त्याची मजाक घेत , " तू चूक केलीस शिक्षा तर भोगावीच लागणार . भोगणार ना शिक्षा ? "
तो बिचारा हिरमुसला त्याचे डोळे खोल गेेले होते . मान खाली घालून तो बोलला , " बोला आंटी काय पनिशमेंट आहे माझी ? "
मी त्याला मायेने जवळ घेतल त्याचा मुका घेतला . आंजरलं गोंजारलं त्याला तर माझं असं वागणं जरा विचीत्र वाटलं होतं . पण नंतर त्यानेही मला एक मिठी मारली आणि बोलला , " आंटी तू किती गोड आहेस . मला 
पनिशमेंट द्यायची गेली विसरून , तू तर माझे  लाड करतीय . "
मी ही त्याचा गोड पापा घेत बोलले , " तू आहेसच एवढा गोड की तुला कोणीही पनिशमेंट द्यायचं विसरून जाईल ."
मी त्याला घरात नेलं आणि विचारलं तुला काय आवडतं खायला सांग मी लवकर बनवून तुला खायला देते . तो म्हणाला , " आंटी आज नको नंतर कधीतरी प्रॉमिस मी इथेच राहतो . खेळताना रोजचं तुला बॉल लागतं जाईन .आज खरचं खुप उशीर झालाय अभ्यासही पेंडींग आहे . कंप्लीट करावा लागेल नाहीतर बाबा रागवतिल असं म्हणत तो ' बाय सी यू अगेन ' म्हणून माझा मला एक गोड पापा देऊन जातो . "
मी तर त्यालाच बघत राहते . तो ही सारखं मला मागे वळून - वळून पाहत होता . खूप दूरवर हात हलवून बाय बाय करत होता .

तो गेला आणि पतिदेव आले . पत्नीचा मुड आज तर खूप खुश दिसतोय असं म्हणत मला चिडवू लागला . " बघ तू ते गावं सोडलं आणि तुझ आयुष्यचं बदललं . "
मी ही हसत , " आपण गावं सोडायला उशीरच केला नाही का ? "
आणि दोघेही हसत हसत घरात गेलो . रात्री जेवण झाल्यानंतर मिस्ट रांनी विचारलं , " आज नेमकं काय घडलं की , मॅडम एवढ्या खुश दिसताय . ?"
मी त्याच्याजवळ जाऊन खूप आनंदाने आणि उत्साहाने सांगू लागले , " तुला माहितेय का आज काय घडलं ? "
तो मध्येचं , " हो मी ऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर एक गाढ झोप घेतली , आणि मला काय स्वप्न पडलं माहितेय का ? "
मी सिरियसली आणि त्याला द

टावत , " काय रे ?  , तू ऑफिसमध्ये झोपायला जातोस का ?  "
डोक्याला हात लावत , " अगं बाई मजाक केली ग तुझी , मला काय स्वप्न पडलं का इथे काय घडलं त्याचं "
मी जीभ बाहेर काढत आणि डोळ्यांवर हात टेकवत ,  "अरे स्वारी रे , माझ्या लक्षात नाही आलं . त्याचा हात हातात घेत . आणि सैरभैर होऊन , आज ना एका गोड मुलाशी माझी मैत्री झाली . त्याने माझं खूप कौतुक केलं आणि मला खूप गोड गोड पापे दिले . मला खूप छान वाटलं रे ज्या एका स्पर्शासाठी मी एवढे दिवस आसुसले होते . तो गोड स्पर्श आज मला पहिली बार अनुभवायला मिळाला . "
" अरे व्वा फार छान झालं . आता तू रोजचं खुश असणारं ओठांवर गोड हसू रोज असणारं , हो ना ?"
" ह्म्म " मी प्रत्युत्तर दिलं आणि खिडकी लावण्यासाठी खिडकीजवळ गेले . तर आजही कालचा मुलगा मला चांदण्या न्याहळताना दिसला . तो मुलगा म्हणजे मला आज जो भेटला ना तोच होता .
मी - "अरे , जरा ऐकतोस का ?"
"काय गं मला झोप आली आता झोपू दे . "
"चिडत , एक मिनिट ये "
" बरं थांब येतो . काय झालं बोल "
" मी तुला बोललेली आज माझा एक नवीन मित्र झाला अरे हा तोच आहे . कालही हा इथेचं बसून त्या आकाशाकडे टक लावुन बघत होता . अरे आजही तो असा वागत जशी मी भुकेली आहे ना मातृत्वाची तसा तो ही भुकेला आहे . असं मला जाणवलं ."
" हे बघ खूप उशीर झालाय . तू त्याला पहिल्यांदा भेटली म्हणून जाणवलं असेल . तू आज पहिल्यांदा लहान बाळाला स्पर्श केला म्हणून जाणवतं असेल . जास्त विचार करू नको झोप आता आणि मलाही झोपू दे शुभ रात्री . "
तो झोपला आणि मी ही झोपले तो सांगत होता . तसचं असेल . असं म्हणत मी ही झोपी गेले .
दुसऱ्या दिवशी ते ऑफिसला गेल्यानंतर तो गोड मुलगा मला भेटायला आला . मी त्याला विचारलं , "काय रे बाळा नाव काय तुझ ? "
" स्पर्श " आईच्या स्पर्शाला भुकेला आहे ना हा स्पर्श म्हणून स्पर्श . "
चेहरा कोलमडून गेला होता तरी , ओठांवरची स्माईल  जागृत होती .
मी त्याच्या पाठीवर प्रेमाने अलगद हात फिरवत विचारलं , " म्हणजे काय रे ? मला नाही कळलं . "
आता त्याचा आवाज खोल गेला होता आणि चेहऱ्यावरही उदासीनता पसरली होती . तो खोल आवाजातच माझ्याशी बोलू लागला . अगं आंटी काही नाही ग माझे आई  वडील लहान असतानाच मला सोडून दूरदेशी निघून गेले . आई बाबांचं प्रेम काय असतं हे मला माहीतच नाही ."
एम
त्याच्या त्या बोलण्याने मी खूप भाऊक होते . त्याला ते जाणवत लगेच तो  बोलतो . " अगं आंटी तू एवढं भाऊक नको होऊ माझे आई वडील येणार आहेत ."
मी , " कधी ?"
तो , " ज्या दिवशी आकाशात एकही चांदणी दिसणार नाही ना त्या दिवशी येईल . "
मी काहीचं बोलू शकत नव्हते का बोलू शकत नाही ते ही कळतं नव्हतं . तेवढ्यात स्पर्शला कोणीतरी आवाज देतं . तो बाय आंटी बोलतो आणि मला एक गोड पापा देतो . त्याच्या त्या मुक्याने मी भानावर येते . आणि त्याला ही एक गोड पापा देऊन बाय बोलते . तो दरवाजात जाऊन परत माझ्याकडे वापस आला आणि मला विचारू लागला , " आंटी सॉरी वाईट वाटून घेऊ नको मी तुला आई म्हणून हाक मारली तर चालेल का ? "
मी काहीचं न बोलता त्याला घट्ट मिठी मारली आणि हुंदके देत रडवलेल्या स्वरात बोलले , " हो बाळा तू मला आई म्हणून हाक मारू शकतो . थॅन्क्स बेटा माझ्या आयुष्यात आलास मला आई म्हणून हाक मारलीस मी धन्य झाले . "
तो माझे पुसत बोलतो , "आई रडू नकोस मी परत रात्री येईन तुला भेटायला . "
" हो बाळा नक्की ये मी वाट बघेन जेवायला ये . "
तो परत एक गोड मुका देऊन बाय बोलतो .आणि ठरल्याप्रमाणे रात्री जेवायला येतो . माझ्या नवऱ्याला ही त्याने खूप लवकर आपलसं केलं त्याच्या गोड स्वभावाने जेवल्यानंतर आम्ही खूप मस्ती केली . अगदी हरवून गेलो आम्ही तिघेही एकमेकांमध्ये मिसळून गेलो होतो . आम्ही बेस्ट फॅमिली वाटतं होतो . आमचा धिंगाणा चालू असतानाच माझ्या नवऱ्याला ऑफिसमधून कॉल आला आणि आमच्या आनंदावर विरजण पडलं . त्याला आठ दिवसांठी मुंबईला जावं लागणार . ह्या बातमीने माझ्या डोळ्यांत तर पाणीच आलं . ते दोघेही मला समजावू लागले अगं रडूबाई रडू नको , डोळ्यांत पाणी आणू नकोस . " तू रडते आणि वेदना आम्हाला होतात . " हो ना रे  बाबा ? "
बाबा आम्ही दोघेही एकमेकांकडे डोळे भरून बघतो . आणि दोघांनी मिळून स्पर्शाला  एक घट्ट मिठी मारली .
त्यानेही आम्हाला त्याच्या मायेची ऊब दिली . दोघांनाही गोड पापे दिले . " ही माझी आई असेल तर तू माझा बाबा च ना ? "
काहीचं न बोलता  मान हलवत , " हो बेटा "
दोघांचेही डोळे आनंद अश्रू ने ओलेचिंब झाले होते .
नवरा बोलतं नसला तरी त्याला बाबा ही हाक ऐकून तो खूप समाधानी झाला होता . त्याचेही कान आसुसले होते , बाबा ही हाक ऐकन्यासाठी . ते ठरल्याप्रमाणे ऑफिसच्या कामासाठी मुंबईला जातात . ते जेवढे दिवस मुंबईला होते . तेवढे दिवस स्पर्श माझी सावली होऊन माझ्यासोबत राहिला मी ही त्याचा अभ्यास घेत त्याच्याशी खेळत आम्ही भेटलो नाही ना तर दिवस पूर्ण झालाच नाही असं आम्हाला वाटायचं . एके दिवशी त्याची आजी त्याला शोधत शोधत माझ्या घरी येते . पूर्ण रिटायर झालेली हाड खीळखीळ झालेली . महिना भरात स्वर्गवासी होईल एवढी परिस्तिथी नाजूक होती . मी स्पर्श वर एवढं प्रेम करते . त्याच्यावर मुलासारखी माया करते हे बघून आजी ही खूप खुश होतात . आणि काळजात लपलेलं एक गुपित त्या मला सांगतात . " पोरी ह्या पोराला तू आपलं मान लं
त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं . खूप उपकार आहेत तुझे माझ्यावर आता एक कर ह्या लेकराला कायमचं तुझ्या पदरात घे . मी हात जोडते पोरी तू ह्याला तुमचं नावं दे पदरात घे माझ्या नातवाला " ओक्साबोक्सी रडतं त्या विनंती करत असतानच माझा नवरा आला आणि आईने जोडलेले हात आपल्या हातात घेतले आणि त्यांच्या मांडीवर डोकं टेकवत तो म्हणाला , आजी हात तर आम्ही जोडायला हवेत तुम्ही तुम्हचा नातू आमच्या पदरात टाकताय . मनापासून आभार आजी तुमचे . पण  एक अट मान्य करावी लागेल . स्पर्श बरोबर तुम्हालाही आमच्याबरोबर राहावं लागेल . आजी हो बोलल्या . त्यांनी त्यांचे  डोळे पुसले आणि त्यांना प्रेमाने जवळ घेतले . " "अरे पण स्पर्श कुठे ?"
मी डोळे पुसत "मला माहितेय स्पर्श कुठे आहे ते " आणि लवकर त्या दोघांना घेऊन स्पर्श कडे गेले . तर आकाशात एकही चांदणी त्याला दिसत नव्हती . म्हणून तो टक लावुन आकाशाकडे बघत होता . आम्ही दोघेही त्याच्याजवळ गेलो आणि मी त्याच्या तोंडावरून हात फिरवत बोलले , " स्पर्श आकाशात आज एकही चांदणी दिसत नाही . कारण तुझे आई वडील तुझ्यासमोर उभे आहेत . दोघेही एका सुरात बाळा आम्हीच तुझे आईवडील आहोत बाळा " आणि दोघांनी ही त्याला कवेत घेण्यासाठी हात समोर केले . तो ही क्षणाचाही विलंब न करता खुशीत शिरला आनंद अश्रू थांबत नव्हते . तेवढ्यात डोळे पुसत ते बोलतात .   "अजुन एक गोड बातमी उद्या आपण आपल्या जुन्या घरात परत जाणार आहोत . आवडेल ना स्पर्श तुला आमच्या जुन्या घरी रहायला ?"
तो हो  अनमोल आहे . हा माझ्या आयुष्यातील कधीचं न
विसरता येणार अविस्मरणीय अनुभव ....



मन हे पाखरू , 
कसे मी  आवरू ,
स्वप्नांना माझ्या कसे सावरू ...

गुंज मनाचे तुझ कसे सांगू ,
मनास माझ्या हुर हूर तुझी किती ,
हे सांगण्यास वाटते रे भीती ,

अल्लड मन माझे ,
झाले रे तुझे ,
काय रे हे नखरे मनाचे ,
कसे सांगू मोल त्याचे ,
बदलते क्षणाक्षणाचे ,

नजरेने तार तुझ्या ,
हृदयाची छेडली ,
मी माझीच न राहिली ,
सर्वस्व तुझ्यासाठी रे त्यागली ,




🌺🌺🌺🌺 कुर्बान 🌺🌺🌺🌺

ये दिल तो तुमपर कुर्बान है ।
तेरे बिना जीना अब नामुनकिन है।।
हर पल तेरी याद मुझे सताती है ।
दिल में आग बनकर तड़पाती है ।।
क्या बताऊं साहेबा तेरे बिना जीना मुश्किल है ।।
मर के भी माही तेरे लिए वापस आना है ।
जिंदगी का हर एक पल तेरे संग गुजरना है ।।
बची हुई सांसे तेरे संग बितानी है ।
जिंदगी का सुहाना सफर तेरे ,।
संग बांटना चाहती हूं
ये दिल अब तुजपर कुर्बान करना चाहती हूं ।।


🌺🌺 जगताना खूप सहन केलं 🌺🌺

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कोणी अस म्हणत नाही ,
कोणी ऐकुन ही घेत नाही ,

चूक मी केलीच नाही ,
तरीही का शिक्षा मज दिली गेली ,
का कोणी माझी बाजू न ऐकली ,

घाव मनावर वेदनेचे घातले ,
उरावर डीग संशयाचे दाटले ,
कोण आपले , कोण परके कळेनासे झाले ...

कोणी मला माझे दुःखही विचारत नाही ,
 डोळे पुसवयास कोणी धावत ही नाही 
ओरडून ओरडून सांगितले तरीही त्यांना बाजू पटत नाही ...

आता खूप झालं खूप सहन केलं ,
जगताना मन माझं मेलं ,
सरणावर जातांना मन मोकळं केलं ,
देवाऱ्यासमोर मनातल्या प्रश्नाचं उत्तर मागितलं ....

जगताना खूप सहन केलं ,
निदान सरणावर जातांना तरी सुख दे गाऱ्हाणं केलं ...

काल्पनिक कविता माझ्या जीवनाशी संबंधित नाही . मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Sep 27, 2021

चूक केली म्हणजे अपराधी होत नाही

अपराध माझे खूप असतील ,
अवेळी मला सतावतील ,

वेदना मनातील निष्टुर होईल ,
तरीही जखम ओलीच राहील ,

चूक केल्याची जाणीव सतत होईल ,
अपराध मनाचे मनाला खात राहतील ,

शिक्षा देण्यास त्यास कोणीही नसेल ,
टोमणे मारणारे आपलेच दात आणि आपलेच ओठ असेल ,

चुकीची आठवण करून देणारे आसपास असतील ,
अपराधी पणाची भावना मनात रुजवतील ,

घाबरून जाऊ नका , दोष मनाला देऊ नका ,
संयमाने येणाऱ्या परिस्थितीवर मात करत रहा ,
चूक करणे मानव धर्म तो स्वीकारा ,
अपराधी पणाच्या ओझ्याखाली राहू नका ...

चूक केली म्हणजे अपराधी तुम्ही अपराधी आहात ,
असं होत नाही .... चूक कळत नकळत होते ,


जीवन

जीवन आहे सुख - दुःखाच्या वाटा ,
त्या वाटेतच उमलतात आनंदाच्या लाटा ,

जीवनात असतो कधी दुःख - प्रवास ,
तर कधी असतो सुख प्रवास ,

जीवन आहे सुख दुःखाची सावली ,
जीवन आहे जगण्याची माऊली ,

जीवन आहे चंद्र मेहंदी च्या  खुणा ,
आनंदाच्या पापण्या ...

जीवनाच्या वाटेवर कोण नाही कोणाचे ,
सर्व जीवन आपणच निभावे ,

जीवनात नाही घडत मनासारखे ,
म्हणून आपले मन ठेवावे फुलासारखे ,

मैत्री

हा लेख काही स्पेशल मुलांसाठी किंवा मुलीनसाठीच नाही तर , सर्वांसाठी आहे . मैत्री कोणत्याही नात्यात असो ती मैत्री असते . कोणाच्यातरी येण्याने आपली मैत्री तुटेल एवढी कमकुवत मैत्री नक्कीच नसावी .
                       रुसवे फुगवे भांडण भरभरून असावे . पण अबोला आणि दुरावा नकोच मैत्रीत . अबोला धरला तर मग ती मैत्री कशी असेल ? बोलून भांडून मोकळं होण ही खरी मैत्रीची ओळख असते . सार मनात साचवून समोरच्याबद्दल मनात गैरसमजाची अडी धरून अबोला धरण त्याची विचारपूस न करण ही असते का मैत्री ?
माझ्या मते मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नातं - मैत्री हे एक असं नातं आहे जे वय जात - पात न बघता केलं जातं .
        मग ही मैत्री तात्पुरती का असावी ? कम्पल्सरी नाही असू शकत का ? मी अनेकदा पाहिलंय अक्च्युअली माझा exparience आहे . माझा ना एक खूप चांगला मित्र होता . भरपूर आहेत marid -  unmarid सगळ्यांसोबत मी फ्री आहे .
सारे जण ताई म्हणून हाक मारतात त्यामुळे ही आणि तसंही मला कोणत्याच मैत्रीत काही वावग वाटतच नाही .

( काल्पनिक आहे )
हा तर माझा एक मित्र होता . तो आणि मी खूप गप्पा मारायचो अगदी लग्न लागण्याच्या क्षणापर्यंत आम्ही एमेकांशी बोलायचो . फॅक्ट आहे बरं का ? रिमुवर अस काही नाही .   आमची जोडी तशी राधा कृष्णाची जोडी म्हणून ओळखली जायची  .  आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो , तो तर मी लहान असताना मला कडेवर घेऊन गावभर फिरायचा . माझ्या भातुकलितील तोच माझा भाऊला होता . मी स्वप्नातही विचार नव्हता केला त्याची आणि माझी मैत्री कधी तुटेल म्हणून ह्याचा ,
पण ज्याचा कधी विचार नव्हता केला तेच घडलं . आमची
मैत्री कायमची तुटली . मला खूप वाईट वाटलं एक चांगला मित्र गमावल्याच गिल्ट मनात राहील .

पण नंतर विषय सोडून दिला . जर मी एक चांगला मित्र गमवला तर , त्यानेही एक चांगली मैत्रीण गमावली की नुकसान दोघांचंही झालं . नात्याचा अपमान दोघांनीही  केला . एकमेकांशी बोलून दोघांनाही बर वाटायचं मैत्री ही
कधीचं बळजबरीने नव्हती केलेली . दोघांनीही स्वखुशीने केलेली होती .  मग एवढी सुंदर मैत्री होती तर , ती लग्नानंतर तोडण्याचं कारण काय होतं ? ह्या प्रश्नाचं उत्तर त्याने मला कधीचं दिलं नाही . आणि मी ही कधि मागितलं 
नाही . ज्याला नात्याची परिभाषा कळली नाही , त्याला भावना तरी कशी कळेल . असं समजून सोडून दिलं आयुष्याला नवीन वळण मिळाल .

पण आजही मनात gilt आहे ह्या गोष्टीचं लग्न झालं म्हणजे , पूर्वीच्या नात्यांना काही महत्व नसत का ?
आपली बायको आज आली . मैत्रीण तर  हिच्या आधी  खूप दिवसांपासून होती . मग हिच्या येण्याने तिची किंमत लगेचच कमी कशी काय होते . ?

तिला तुम्ही डायरेक्ट रस्त्यावर पडेल असल्याची फिलिंग का देता ? कोणी अधिकार दिला असं वागण्याचा मानव जातीला हे शोभणार नाही हे , पाहिले गोष्ट सांगायची ठरली तर , एक स्त्री आणि पुरूष कधीचं मित्र - मैत्रीण असू शकत नाही . हे समाजाने गृहीत धरलं ही सर्वात मोठी खंत आहे . समाजाने हा विचार बदलला तर , खरचं खूप चांगल होईल . स्त्री - पुरुषांकडे संशयाच्या दृष्टीने पाहणे कितपत योग्य आहे . हेच मला कळतं नाही . एक स्त्री आणि पुरुष चांगले मित्र असू शकतात . नक्कीचं असू शकतात .  पण भूरस्टलेला समाज हे  कधी मान्य करणार . हे समजत नाही हे ....!!!!

तुम्ही एखद्याशी मैत्री unmarid असताना केली असेल तर , प्लीज marid झाल्यानंतर ती मैत्री कधीच तोडू नका . कारण तुमची wife तुमच्या आयुष्यात येण्याआधी ती मैत्रीण तुमच्या आयुष्यातील  खूप महत्त्वाची place असते . मग ती दुसरी मैत्रीण आल्यानंतर लगेच निकामी कशी होऊ शकते .

प्लीज कोणाशीही मैत्री करण्याआधी विचार करा . की आपण ही मैत्री शेवट पर्यंत निभावू शकेन की नाही ह्याचा . टाइमपास म्हणून मैत्री करू नका . टाइमपास करायला ते काही मनोरंजनाचा साधनं नाही . भावनांनी भरलेलं जिवंत माणसाचं निरागस मन आहे .  ते पायदळी तुडवू नका .

टाइम पास म्हणून  माणसांचा वापर कधी ही करायचा नसतो . टाइम पास करण्यासाठी खूप गोष्टी अवेलेबल आहे . त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे . टाइमपास करण त्यांचा अधिकार माणसाने का हिरावून घ्यावा . प्लीज मैत्री कधीही तुटू देऊ नका कितीही विघ्न आले तरीही , कायमस्वरूपी टिकते तिचं खरी मैत्री असते .


🌹🌹🌹🌹अमानत 🌹🌹🌹🌹

तुझे देखती हूं सारे गम में भूल जाती हूं ।
आंखो में तेरी तस्वीर सजाने लगती हूं ।।

तेरी  हर एक सांस मेरा एहसास है ।
क्या करे ये दिल है जो तुमपर फिदा है  ।।
ऊपरवाला जो खुदा है ।
मुझे तेरी ओर खींच रहा है ।।

में भी जब  तुझे देखती हूं ।
अपने आप से पराई हो जाती हूं ।।
सिर्फ तेरी बनकर रहना चाहती हूं ।
दुनिया के सारे मायने तेरे लिए बदलना चाहती हूं ।।

तेरे प्यार में खोना चाहती हूं ।
मेरा दर्द तेरे संग बांटना चाहती हूं ।।
तेरी चेहरे की खुशी में बनना चाहती हूं ।
तेरी जिंदगी की एक क्वाइश बनना चाहती हूं ।।
में तो तेरी दिल की  अमानत बनना चाहती  है ।


छान पांग फेडले

अपराध माझे खूप असतील ,

अवेळी मला सतावतील ,

तुझ्या मनात मी भावना शून्य असेल ,

वेदने तूला सहज कळेल ,

प्रानाहूनही तू प्रिय माझ्यासाठी ,
आयुष्याच्या सांजवेळी आधाराची काठी ,

तुला लहानाचे मोठे करताना कमी पडले असेल ,

ठीफी मागण्याची तडजोड नसेल ,

रक्ताचे पाणी तुझ्यासाठी आटवले ,
ओंजळभर सुख कधी नाही जपले ,
तुझ्यासाठी दुःख मी अंगावर झेलले ,
काय चुकले माझे आजही नाही कळले ,

तू उतार वयात वृध्द आश्रमाचे दरवाजे दाखवले ,
सनाथ असतानाही अनाथ केले ,
मी माया आणि प्रेम दिले ,
तू  परके पणाचे घाव दिले ,

असे कसे रे पांग आई बाबा चे फेडले ,
उतारवयात रस्तावर सोडले ,
ह्यासाठी का तुला लहानाचे मोठे केले ?
छानच उपकार फेडले जन्म दात्याचे ....

Sep 25, 2021

काळोख्या ला गरज प्रकाशाची

"Durga1" 
काळोख्या ला गरज प्रकाशाची ,
प्रकाशाला गरज काळोख्याची ,
पुस्तकाला गरज वाचंकाची ,
वाचकांना गरज पुस्तकांची ,
लिखाणाला गरज विचारांची ,
विचारांना गरज प्रेरणेची ,

समाजाला गरज कुटुंबाची ,
कुटुंबांना गरज समाजाची ,
मित्रांना गरज चांगल्या मित्रांची ,
मैत्रिणींना गरज चांगल्या मैत्रिणींची ,
चार भिंतीना गरज घराची ,
घराला गरज बोलक्या माणसांची ,

एका दगडाला गरज एका मुर्तिकाराची ,
मुर्तिका राला गरज त्याच्या कलेची ,
लिहिणाऱ्या पेनाला गरज वहीच्या पानाची ,
पा नाला गरज सुंदर अक्षरांची ,

उगवणाऱ्या सुर्यालाही गरज , मावळ नाऱ्या सूर्याची ,
प्रत्येकाला गरज असतेच प्रत्येकाची ,
मला काही गरज नाही ,
ह्या वाक्याला अर्थ नाही काही ..
"Durga".

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...