नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 30, 2022

आजही तुझ्यावर प्रेम करते ..

खरच किती स्वार्थी झाले मी ..
किती सहज तुला विसरले ..

सहज विसरले नातं प्रेमाचे पवित्र ते ..


राधा कृष्णच नाव ऐकल की पहिला


तू आठवतोस ...


मग हुंदका उरी दाटतो ..


भावनांचा अनोखा सोहळा मनात रंगतो ..


तुझ्या आठवणीत जीव व्याकुळ होतो ..


तुझ्याशी बोलण्यासाठी तळमळते ..


आजही बंद खोलीत तुझ्यासाठीच विव्हळते ..


माझ्या आधी तुझा विचार करते .


खरचं तू हॅपी आहेस ना ? तुझ्या आयुष्यात स्वतःला च विचारते ..
आणि तू नाराज असल्याची चाहूल लागताच पुन्हा रडते .
कारण मी आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करते ..
दुर्गा मते


नातं तुझ नी माझ ...

पवित्र नातं ..
कुठल्याच बंधनात न बांधणार ..
मोज मापाच्या तराजूत न तोलता येणार ..
मुक्त पक्षाप्रमाणे प्रवाह करणार ..
नातं तुझ नी माझं ...
सात पावलांत गुंफलेल ..
सप्त सुरांच्या स्वरात विराजमान झालेलं ..
नवख्या चाहुलीनी  मोहरुन गेलेलं ...
एकमेकांमध्येचं गुरफटलेल ..
नातं तुझ नी माझं ..
कोमल स्पर्शात धुंद झालेलं ..
तुझ्या मिठीत गंधाललेलं ...
नातं तुझ नी माझं ..
गतजन्माच ह्या ही जन्मात ,
जुळलेलं एक पवित्र बंधन ..
जन्मोजन्मीचं ...
दुर्गा मते


ते क्षण पुन्हा यावे

मनातील डायरी चे पान विषय अंतर्गत :

ते क्षण पुन्हा परतून यावे ..
ओठांवरील हास्य नव्या दमाने वहावे ...

आयुष्याचा प्रवास थोडा मागे जावा ..

क्षण जगून झाल्यावर पुढे सरकावा ..


एकांतात मला पुन्हा विसरायचं आहे स्वतःला ..


माझ्याच विश्वात रमून जायला ...


खळखळून हसण्यासाठी पुन्हा एकदा मागे जावे वाटते .
बालपणीचे क्षण आठवावे वाटते ..

ओले दिवस ते प्रेमाचे ..
पुन्हा जीवनी रुजवावे ..


क्षण ते हातून निसटून गेलेले ..
पुन्हा जीवनी परतून यावे वाटते ..
दुर्गा मते

उगाच लेक परक्याची धन नाही म्हणत ..

उगाच लेक परक्याची धन नाही म्हणत ...ह्या वाक्यात पॉइंट आहे . तिचं सिध्द करते ती परक्याच धन आहे . ते तिच्या वागण्यातून तिच्या बोलण्यातून ती व्यक्त होत असताना सहज जाणवत  एकदा तिचं लग्न ठरलं ना की,  ती कळतं नकळत फक्त सासरचा विचार करते . आई मला हे  माझ्या घरी न्यायचं .मी लग्न झाल्यावर  हे घेऊन जाणार ते घेऊन जाणार   . तिच्या हक्काच्या घरी असताना ही  ती तिच्या सासरचा विचार करत असते .


आणि त्यातून ती कळतं नकळत ती स्वतःच सिध्द करत असते . की मी इथली पाहुणी आणि परक्याची अमानत आहे .


मी हा लेख स्वतःच्या अनुभवावरून लिहीत आहे .


जेव्हा माझ लग्न ठरल तेव्हा मी नाराज होते . पण जेव्हा मी सासू सासऱ्याशी व नवऱ्याशी बोलण सुरू केलं.  तेव्हा पासून मला त्याची खूप ओढ लागली . आमच्यात खूप छान नातं निर्माण झालं . आता तर मला त्यांच्याशी दिवसातून एकदा तरी बोलल्याशिवाय करमतचं नाही .

खरचं एका मुलीचं खरं घर तिच्या हक्काचं घर हे तिचं सासरच असतं . हे लग्न झाल्यावर नाही तर , लग्न होण्याआधी चं सिध्द होतं . आणि तिलाही मग माहेर पेक्षा सासरची ओढ अधिक असते ..

दुर्गा मते


Apr 29, 2022

फक्त तुझीच मी

एकाकी प्रवास जेव्हा करते .
तेव्हा तुझीच आठवण येते ..
आयुष्यात बऱ्यापैकी सेटल झाले .
तरीही अजुन तुझ्यातच आहे कुठेतरी अडकलेली ..

फुलस्टॉप जेव्हा येतात ..

तेव्हा विरह यातना मजला छळतात .

नव्याने जन्म घेतलेल्या नात्याच्या ओढीने ..

तुला विसरण्याचा प्रयत्न करते ..

विसरूनही पुन्हा पुन्हा तुला आठवते ..

तू पहिलं प्रेम आहेस माझं ..

तुला विसरु तरी कशी रे ?

तुझ्या सोबत आयुष्य घालवण्याचे भाग्य नाही मिळाले .

तुझ्या आठवणीत जगण्याचे पुण्य कमावते रे ..

फक्त तुझीच मी ..

तुझ्या आठवणीत जगणारी मी ..

सुर मी गाऊ कसे

एकांत हा सूना सूना
तुझ्या मैफिली शिवाय ..
सांग सख्या
सुर कसे मी गाऊ ..
तुझ्या सहवासाशिवाय ..

चिंब ओल्या पावसात मी कशी  बिजू ..


बिजलीच्या तालावर ठोका कसा धरू
मोरपिसा वरील छटा मी कशा शोधू

त्यावर स्वप्न प्रितीचे कसे रेखाटू ..


ह्या एकांतात तुझी प्रतीक्षा करण सोडू कशी .


आठवतय का तुला ?
तुझ्याशी अबोला धरलाय का कधी ?
तुझ्या शिवाय आनंद साजरा केलाय का कधी ?

सांग सख्या तूच सांग !
तुझ्याशिवाय सुर मी गाऊ कसे ?

तुझ्या सहवासाशिवाय सण मी साजरे करू कसे ?
दुर्गा मते

Apr 27, 2022

मी आजीबाई कशी होणार नवरी .

 सकाळी एक स्वप्न पडलं ..
सत्यात कधीच न उतरणार ..
मला माझ्याच विश्वात हरवून टाकणार ..
ओठांवर नाजूक स्मित फुलवणार .. 

मनमोहक अदा त्याची मनावर कोरली ..
होणार उद्या नवरी मी ......
प्रीत कोवळी लाजली ..
राजाची ओढ मजला छळू लागली ..

भास अनोखे डोळ्यासमोर दाटले ..
 प्रभात वेळी स्वप्न हे नवखे ..
पडू लागले .....

मी आजीबाई कशी होणार नवरी ..
नातीला पडणार स्वप्न रचू लागले ..
आणि खूपच हसले ..
दुर्गा मते

स्वप्नात प्रेमाची प्रतिमा

सकाळी सकाळी एक स्वप्न पडत ..
त्यात तुझ्या माझ्या प्रेमाच गुपित असतं ...

माझी नजर सतत तुला शोधत असते ..
तुझी आठवण मला वेड लावते ...

मी ही मग तुझ्या प्रेमात दंगते ...
सकाळी सकाळी स्वप्न माझे रंगते ...

स्वप्नात माझ्या तुच असतो ...
सत्यात ही मग सारखा तुझाच चेहरा दिसतो ..

तुझ्याशिवाय जीवन नकोस वाटत ...
उमलेल्या फुलावर आयुष्य हे परिधान करावंस वाटत ..

स्वप्नांत दिसलेलं चित्र सत्यात उतरतांना ,
बघण्यास डोळे ही आसुसले ...
तुझ्या मिठीत व्यक्त होण्यास मी ही आतूरले ...
दुर्गा मते

Apr 26, 2022

ठरलयं माझ , नाही परतायचं पुन्हा तुझ्या गावाला ..

का रे असं करतो ...
पुन्हा पुन्हा तुझ्यात गुंतवितो ...
पुन्हा पुन्हा स्वप्नात येतो ..
आभासी तुझ्या प्रेमात मला फसवतो ..

ठरलयं माझ ,
नाही परतायचं पुन्हा तुझ्या गावाला ..
नव्याने विरहाच्या असंख्य वेदना नाही ,
द्यायच्या माझ्या मनाला ....

सुटलेत आता हात ...
मनावर झालेत वार ..
नको आता पुन्हा एक होण्याचा नाद ..
हवा हवासां  वाटतो , मला तुझा माझा संपलेला संवाद ..

नको शोधू  आता एक होण्याचे बहाणे ..
नको ऐकुस पुन्हा नव्याने जीवन गाणे ..
तुझ्या माझ्या प्रेमाचे पुराणे ..
करू दे ना , मला संसार सुखाने ..

ठरलयं माझ ,
नाही परतायचं पुन्हा तुझ्या गावाला ..
नव्याने विरहाच्या असंख्य वेदना नाही ,
द्यायच्या माझ्या मनाला ....


दुर्गा मते

Apr 25, 2022

संघर्षावर मात करायची ...

नात्यांची घडी जेव्हा विसकटते - खूप प्रयत्न करूनही अपयश पदरी पडते .  तेव्हा सुरू होतो मनाचा संघर्ष .....

किरकोळ गैर समजामुळे जेव्हा आपल्यावर बोटं दाखवलं जातं . आपलीच माणसं आपल्याला नको  नको ते  बोल लावतात . तेव्हा सुरू होतो खरा मानसिक त्रास आणि मनाचा संघर्ष ...त्या संघर्षावर जो मात करतो . तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो .

वाद - विवाद करून काहीही साध्य होतं नसतं , शांततेचा


मार्ग अवलंबून शांत राहणच योग्य असतं . हे फक्त ज्ञानी  आणि सयंमी   माणसाला कळतं . 


संघर्ष काळाची गरज आहे . माणसाला समोर येणाऱ्या संकटावर मात करण्याची जिद्द आणि ज्ञान हा संघर्ष चं देत असतो.  त्यामुळे  आपल्या आयुष्यात खूप संघर्ष आहे . आणि वेळोवेळी खूप संकट येतात म्हणून हतबल व्हायचं नसतं . तर  येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला नेटाने तोंड द्यायचं असतं . आणि आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं .


मानसिक त्रास झाल्यानंतर जो संघर्ष आपण करत असतो .तो खूपच मोठा असतो . अगदी जीवघेणा असतो . कारण त्या वेळेस आपल्याला आधार देणारेच कधी कधी बोल लावत असतात . त्यामुळे आपण अजूनच खचून जातो . पण तेव्हाही धीराने प्रत्येक परिस्थितीवर मात करायची.  आणि आपल्याला आपल्या माणसांशी गरज असताना कोण आपल्याशी कसं वागतो . हे फक्त लक्षात ठेवायचं . कधी बोलून नाही दाखवायचं . आणि सरळ मार्गाने पुढे चालायचं . आणि आपलं आयुष्य हे आनंदाने जगायचं .

दुर्गा मते

Apr 24, 2022

साथ जन्मोजन्मीची

बंद डोळ्यांच्या कडानी अजुनही पाहते तुला ,
सभोवताली असूनही दूरवर शोधते तुला ..

विसरूनही पुन्हा आठवते तुला ...
साद पोहचणार नाही तुजपाशी माहीत असूनही ..
साद घालते तुला ....

हरवतांना माझ्यात  मी , शोधते तुला ..
एकाकी आयुष्य जगताना मागते तुला ..
साथ जन्मोजन्मीची ...
सख्या बघुया आपण स्वप्न सुखी संसाराची ....

जन्मोजन्मीची साथ तुझी हवी मला ..

सांगते आज तुला .....
सांग सख्या ..देशील ना रे साथ मला ..
दुर्गा मते


असू दे मला आधार तुझ्या सहवासाचा ...

सुख दुःखात देईल तुझी साथ ..

तुझ्या हातात दिलायं ना हात

नाही घेणार कधी माघार ..

करेन तुझ हर एक स्वप्न साकार ..

होईल आपला संसार सुखाचा ...

असू दे मला आधार तुझ्या सहवासाचा ..

अर्धांगिनी होण्याआधी तुझी मैत्रीण होईल ...
प्रेयसी होऊन प्रेमाची कबुली मी  देईल ..

सप्तपदी  चाललेलं प्रत्येक वचन मी निभवेन ...

शेवटच्या  श्वासापर्यंत मी फक्त आणि  फक्त तुझ्यासाठीचं जगेन ...

पुन्हा एकदा सांगते आत्मविश्वासाने ..
होईल आपला संसार सुखाचा ..
असू दे मला आधार तुझ्या सहवासाचा ..
दुर्गा मते...

Apr 23, 2022

इस रूह को।।

इस रूह को 
अब तेरी तलाश क्यूं  , जानती नहीं ,
तेरे आने का इंतजार मै करती हूं ।

 तेरे खयालों में , मै खो जाती हूं ।
अक्सर तुझे पाने की कोशिश करती हूं ।।

तस्वीर तेरी आंखो में सजी ।
फिर भी इस दिल क्यू है नाराजगी  ।।
जानती नहीं ।।

सजना संवरना तेरे लिए सीख रही हूं ।
तेरे आखों में , मै खो जाना चाहती हूं ।।
क्या कबुल है तुम्हे , मेरे लिए जीना और मरना ।

करना चाहते हो आप फिर से ,
मुझ से वहीं मोहब्बत ।।
करोगे क्या ? आप मेरे प्यार का सम्मान ! 
दिल से ।।
दुर्गा मते

पुस्तक एक मित्र ..

 माणसाला माणसाचं आत्मदर्शन घडवत ..निती मूल्य तत्व ह्याची योग्य सांगड घालण्याची परिभाषा हे पुस्तक शिकवत .

कोणी आसपास असो नसो पण एक पुस्तक मात्र माणसाकडे  आवरजुन असावं . एकटेपणा पुस्तकाच्या सहवासाने नाहीसा होतो .

मानवाच्या आयुष्यात अन्न  , वस्त्र, निवारा ह्या गरजे प्रमाणे 4 थी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक आणि शिक्षण त्याच्या शिवाय मानव जातीचा विकास होणं शक्यच नाही .


पुस्तक जर जवळ असेल ना , तर ना मित्र आठवतो . ना मैत्रीण आठवते . डोळ्यांसमोर स्वप्नांची पहाट फुलते .


पुस्तकात कधीतरी आपलेही व्यक्ती महत्व झलकाव ..


हा विचार मनाला नकळत बिलगून जातो .


पुस्तकाच्या कोऱ्या पानात सजतात स्वप्न कोवळ्या मनाची .....


स्वप्नांना ही ओढ असते पूर्ण होण्याची ..


असतात ना ती ही , अपूर्ण राहिलेली कित्येक वर्षांची .


आणि कित्येक जणांची ..


आईची माया लेकीला स्वप्न दाखवते ...


बापाची कणखर सावली तिच्या स्वप्नांत जिद्द ओतते...


पुस्तकाच्या कोऱ्या पानातच आई वडिलांचे स्वप्न रुजते ..
लेकीच्या रूपाने जणू त्याला नव्याने पालवी फुटते ..

पुस्तकांचं प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे . पुस्तकाच्या रुपात एक नवा मित्रच आपल्याला भेटतो . नुसतंच भेटत नाही तर , तो आपल्याला खूप काही शिकवत ही असतो . आपल्यात खूप सारे चांगले बदल ही त्याच्या अस्तित्वाने घडत असतात . त्यामुळे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पुस्तक नावाचा चांगला मित्र असावा . नुसतं मित्रच असू नये तर त्याच्याबद्दल ओढ ही असावी . त्याच्यावर जीवापाड प्रेम ही असावं . तरच आपल्याला पुस्तकाचं महत्व कळेल ..
आणि आयुष्य सुखकर होईल .
दुर्गा मते

Apr 22, 2022

प्रणय ..

आजचा विषय खूपच छान आहे . अंध श्रद्धा आणि आपल्या लिखानातून अंधश्रधेला आला घालण्याचा काम माझ्या एवढं परफेक्ट कुठलाच लेखक करू शकत नाही .
कारण मी विषय खूप आगळा वेगळा निवडते . सहसा ज्या विषयावर कोणी बोलण्याची सुद्धा हिमंत करत नाही . अशाच विषयावर मला लिखाण करायला जास्त आवडतं .
जरा जास्तच कौतुक केलं का मी स्वतःच 😝😝पण काय करणार truth आहे . आणि शिवाय सर्व लीपिला मान्य आहे . असो हा झाला गंमतीचा विषय आता मी मेन मुद्द्यावर येते ..

माझ्या विषयाचं शिर्षक आहे .

" त्या filings चुकीच्या नसतात "

आता विषय पाहून प्रेम वैगरे ह्या विषयावर मी लिखाण करण्याचा विचार केला असेल असं तुम्हाला वाटतं असेल पण तो तुमचा गोड गैर समज आहे .

मी आज जरा outstanding विषयावर लिहिणार आहे . विषय खूपच नाजूक आहे . कृपया गैरसमज करून घेऊ नका .. माझ् लिखाण हे माझं फॅशन आहे . आणि माझे विचार हे माझं गॉड गिफ्ट आहे . आणि मी तेच गिफ्ट हळुवार पने सर्वांसमोर ओपन करत असते .

   प्रणय ह्यालाच दिलेली छान उपमा म्हणजे स्वर्ग सुख ..
प्रत्येकाला ते सुख अनुभवण्याची ईशा असते . शिवाय ते सुख अनुभवन प्रत्येकाचा अधिकार आहे . म्हणण्यापेक्षा ती फिजिकली गरज ही आहे . ती फिजिकली गरज फक्त नवरा बायकोच एकमेकांच्या पूर्ण करू शकतात अस नाही हे किंवा त्यांनीच त्या फिजिकल गरजा पूर्ण करायला हव्या . असा ही काही ठराव नाही हे .

लग्न झालेला पुरुष शरीराची भूक भागवण्यासाठी पर स्त्री कडे जातो . ह्यात काही गैर नाही . किंवा लग्न झालेली स्त्री दुसऱ्या पर पुरुषांकडे आकर्षित होते . ह्यात काहीही गैर नाही .

लग्न झालेला पुरुष किंवा स्त्री दुसऱ्या व्यक्ती कडे आकर्षित झाले म्हणजे . ते एकमेकांना धोका देतात . किंवा नवरा बायको तील प्रेम कमी झालेलं असतं . ह्या frod कल्पना आहेत . मला माहितेय माझे विचार तुम्हाला पटणार नाही . पण हा लेख अभ्यास करून लिहितेय . ह्यात फेका फेक नाही हे ,   मी अभ्यास पूर्व लिहितेय . मला अनुभव नाही हे पण filings मला ही कळतात कारण शेवटी मी पण एक माणूस आहे .

अनेकदा काय होतं स्त्री असो किंवा पुरुष ते एकमेकांना
वेळ देऊ शकत नाही . परिणामी ते एकमेकांच्या शारीरिक गरजा पूर्ण करू शकत नाही . एकमेकांच्या शारीरिक गरजा पूर्ण झाल्या नाही तर त्याची चीड चीड होते . जीवन जगण्यात त्याला रस राहत नाही . मर मर राबा यचं आणि शारीरिक भूक मिटत नसेल तर कुडत बसायचं . स्त्री यांच्या ही बाबतीत सेम हेच होतं . 

आयुष्य जगायचं म्हणून जे जगत असतात ना , त्यांच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती आल्यानंतर अर्थात त्यांच्या आयुष्यात खूप बदल घडतात . ते naturally होतं . त्याला आपण चुकीचं नाही ठरवू शकत .

माणूस हा सुखासाठी जगत असतो . मग ते मानसिक असो किंवा शारीरिक माणूस हा सुखाच्या शोधात भटकत असतो . भटकता भटकता त्याला ते सुख कुठेतरी भेटतं आणि तो ते सुख पुरेपूर उपभोगतो तेव्हा तो वाईट नसतो.  फरक एवढाच असतो त्याचा त्याच्या मनावर ताबा नसतो .

शरीराची भूक मिटवण्यासाठी एक पुरुष पर स्त्री कडे जातो हे जर चुकीचं असतं . तर कुठल्याच परिस्तिथीत वेशा ह्या व्यवसायांची उत्क्रांती झालीच नसती .

कित्येक वर्षांपासून वेशा हा धंदा अस्तित्वात आहे . मान्य आहे तो गुन्हा आहे . पण तो गुन्हा करायला  कित्येक चांगल्या  घरातील माणस सज्ज असतात.  कारण फिजिकल प्रोब्लेम . मला तुम्हाला हे सांगायचं नाही हे की तुम्ही रोज तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेशा कडे जा मला ते आवडत नाही आणि मान्य ही नाही .

आणि माझा सांगण्याचा मुद्दा खूप वेगळा आणि तो मी खूपच थोडक्यात सांगणार आहे . कारण विषय वाढवला तर तो चर्चेचा विषय होऊ शकतो .

एखाद कुटुंब असेल त्या कुटुंबात  पती पत्नी एकमेकांना वेळ देऊ शकत नसतील , तेव्हा पुरूषाने  किंवा स्त्रीने शारीरिक सुख किंवा मानसिक सुख बाहेर शोधल तर ते चुकीचे ठरत नसतात.  तुम्ही त्यांच्या गरजा पूर्ण करू शकले नाही . म्हणून ते त्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेर पडतात .  ह्याचा अर्थ त्यांनी तुमचा विश्वास घात केला . त्यांचं तुमच्यावरच प्रेम कमी झालं . त्यांनी तुम्हाला धोका दिला असा होत नाही . तुम्ही त्यांच्या गरजा पूर्ण करा.  ते  त्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेर पडनार नाहीत .

जेव्हा ही ही घटना कुठल्याही फॅमिलीत घडते.  तेव्हा त्याचा बाऊ करू नये.  फिजिकली होतं ते ,  कळतं नकळत मनावरचा ताबा कधी सुटेल सांगता ही येत नाही.

जो मनापासून प्रेम करतो ना तो एकदाचं चुकतो वारंवार नाही . एवढंच लक्षात ठेवलं म्हणजे खूप झाल ..


😊😊


मला अजुन खूप लिहायचं होतं . पण स्टडी कमी पडला काय करणार लिहिलं असतं चांगल्या पद्धतीने लोकांनी लक्षात घेतले असतील वाईट हेतू . आणि ह्या सगळ्यात वाईट ठरले असते मी . पण मला खूप लिहायचं ह्या विषयावर पण असच नाही काल्पनिक थोडा अभ्यास करून लिहायचं .

दुर्गा मते .

काही चुकल असेल तर क्षमा करा .


Apr 21, 2022

छंद जपावा .

एक तरी छंद असावा माणसाला वेड  लावणारा

जीवन काय आणि कसं जगावं समजून सांगणारा...

लोकं वेड म्हणतात ...

म्हणून छंद जोपासण् सोडू नये ..

आपल्या कलेला आतल्या आत मारू नये ..

लोकं फक्त नाव ठेवायची काम करतात ...

का माहितेय का ? नसेल माहीत तर मी सांगते

कोणाला सांगू नका हा 😝😝

जी लोकं नाव ठेवायची काम करतात ना ..

त्यांनाच काही काम नसतात ..

कटू आहे पण हेच सत्य आहे .. just a jok dont be siriys 

छंद असावा वेड लावणारा ..

मनी आत्मविश्वास जागविणारा ..

शेवटच्या श्वासापर्यंत जपता येईल ..

असा असावा छंद मनी जपलेला ..

आपली आवड आपण जोपासायची .

मनाला ह्या लालचं नसावी कौतुकाची .

तळहात जपतो जसा ..

तसाच छंद जपण्याचा घ्यावा वसा ..

आपला छंद आपणच असतो जपायचा .
त्यालाही अधिकार आहे वृध्दींगत होण्याचा...
दुर्गा मते


जादूचा बगीचा ..

जादूच्या बगीच्यात राजा मला घेऊन गेला ..
विविध स्वप्न पाहू लागला ...

बगीचा जादूचा मन घाबरलं ..
मला बाई खूपच टेन्शन आलं ..

राजाशी मी बोलणं सुरू केलं ..
काहीही झाल तरी माझा हात सोडायचं नाही ..
वचन मागितलं ...

राजाने ही तोऱ्यात वचन दिलं ..
काय ग राणी ? घाबरते स की काय सहज विचारलं ..

हो ...म्हणजे नाही ...
जादूचा बगीचा म्हणून जरा खूप नाही जरा घाबरते ..
राजेसा हेब तोऱ्यात खूपच हसले ...
माझे मग डोकेच फिरले ..😝😝

मी त्यांच्या जवळ गेले ...
प्रेमाने किस करेन म्हटल ,
कानात खूप जोरात ओरडले 🤪🤪🤪

राजे साहेब उभे होते चक्क घाबरून
जमिनीवर बेशुद्ध पडले ..
😝😝🤪🤪😂😂
म्हने मी कोणाला घाबरत नाही ..
कस घाबर वलं म्हणून खूप हसले ..
दुर्गा मते

काल्पनिक रचना 

stay always happy ..

आनंद ह्याचाच आहे तू खुश आहेस ..
तुझ्या आयुष्यात तू समाधानी आहेस ..

मला विसरला छान झालं ..
माझ्या नावाच काटेरी झुडूप
 तुझ्या आयुष्यातून निघून गेलं .
आनंद ह्याचाच आहे ..

तू happy रहावं सारखं वाटायचं ..
तुला दुःखी कधीच नव्हत बघायचं ..

देवा समोर रोज प्राथर्ना करायचे ..
तुझ्या सुखासाठी - तुझ्या आनंदासाठी ..
तु मला कायमचं विसराव ह्यासाठी ..

तुझ्या दुःखाचं कारण मला कधीच नव्हत व्हायचं ..
माझ्या कडून देतात येईल तेव्हढ सुख होतं द्यायचं ..

बघ ,
माझ्या मनासारखं झाल ..
तू मला विसरला आणि तुझ्या आयुष्यात 
हॅपी ही राहू लागला ..
आज ह्या क्षणी ही रचना लिहिताना मला खूप आनंद झाला ....

आयुष्य भरासाठी ...

भेटू नव्या वळणावर ..
अनोळखी अंतरपटलावर ..

असू दे आता अंतर .
होऊ एक नंतर    - निरंतर ..

विसरू नको ह्या वेड्या मैत्रिणीला ..
सरत्या राती ये रे सोबतिला


नको तुझे प्रेम मला ..
सांगते तुला ....

हवी मला भाषा कडवट ..
नात्याची वीण ही अल्लड अन् बावलट ..

नको रे तोडू मैत्री ही  मित्रा ...
आयुष्य भरासाठी मनात राह ना ..

विसर निखळ  मैत्री  काही क्षणांसाठी
वीण जप मात्र  आयुष्यभरासाठी 😊😊😊
दुर्गा मते

जन्म भाग्याचा ..

दुःख तिचे नाही क्षणासाठी ...
नाही तिचे जगणे स्वतःसाठी ..

ह्याचं करेन त्याचं करेन ..
ह्यातच तिचं आयुष्य सरेन ..

प्रेम माया ममता ह्याची ती सावली ..
स्त्री ही उभ्या  जगाची माऊली ...

सोसते कळा , जन्म देण्यास बाळा ..
लावला तिने ह्या सृष्टिस लळा ..

स्त्री जन्म हा भाग्याचा ..
फेडे ऋण उभ्या आयुष्याचा ..
दुर्गा मते

मुझे गले से लगाओ ।।

तुझको छोडकर मै जाऊंगी कहा पिया ।
जल रहा है , प्यार का दिया ।।

एक तरफ मेरे मा बाप है ।
एक तरफ तेरा प्यार है ।।

किसको को मै चुनू समझ नहीं रहा है ।
मेरा दिल तेरे ओर बढ़ रहा है ।।

पापा को मनाऊंगी वादा करती हु ।
तेरे ही हात से मेरे माथे में सिंदूर भरूंगी ।।
साफ साफ कहती हूं ।।

प्लीज़ रूठो मत मुझसे बात करो ।
प्यार से गले लगाओ ।।
मुझे ठुकरा ओ मत , अपना होने से रोको मत 
आ मुझे गले से लगाओ  ।।
दुर्गा मते

मनासारखं असावं ..

फुल पाखरासंगे गीत गाते , गीत गाते ..
आई संगे मौन धरते , मौन धरते ..

कोमजलेल्या प्राजक्ताचा गंध घेते , गंध घेते ..
अल्लड वाऱ्याशी मैत्री करते , मैत्री करते ..

धरणीच्या कुशीत एक डुलकी घेते , डुलकी घेते ..

नव चैतन्याचे स्वप्न उरी गोंधते ...उरी गोंधते ..

उमदिने जगण्याचे बळ मला दे आई ...

मागणे मागते ..मागणे मागते ..

जिद्द - कसोटी ह्यांच्याशी नाळ जोडीते , नाळ जोडीते .

मन सारखे आणि मन  भरून जगणे मला आवडते ...
मन मारून जगणे मनास न भावते ..
मनासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न मी पाहते ..

आयुष्य हे  माझे मला प्रिय आहे ...
मनासारखे जीवन जगेन ह्यावर मी ठाम आहे ..
दुर्गा मते

पुरुषाच्या नजरेतून

पुरुषाच्या नजरेतून आज एक मत मी ही मांडते ..
आज जरा त्याच्याच बाजूने बोलते ..

राब राबतो तो ...घराचा पालन हार तो ...
तरीही घोकून ठेवले पुरुष पुरुषार्थ गाजवतो ..

त्याच्याशिवाय बाईचं अस्तित्व शून्य ..

तरीही नाही दिसत कोणालाही त्याच्यात नावीन्य ..

जितका कठोर तितकाच हळवा ...

खरचं प्रामाणिकपणे सांगते ...

बाई पेक्षा कित्येक पट्टीत पुरुष हा चांगलाच असतो ..

त्याच्या मनात वाईट साईट काहीच नसतं ...

स्त्री नजर संशयी हे कोणालाच मान्य नसतं ..

जरी पुरुषार्थ गाजवतो तरी तो ग्रेट असतो ..

कारण शेवटी तो एक पुरुष असतो ...


दुर्गा मते

आना चाहती हूं आपके पास।

नहीं लगता है ।
दिल मेरा यहां ।।

आना चाहती हूं आपके पास ।
कोन है मेरा यहां ।।

आपके रूह में ।
देखी थी मैने जिंदगी मेरी ।।
रह गई अब वो अधूरी ।

ढूंढ़ना चाहती हूं आपका पता ।
हो गय वो आप , जिंदगी से लापता ।।

दर्द मेरा लेके गये ।

सपने मेरे टूटे हुए थे ।।

आप ने जोड़ दिय थे ।

कितना चाहने लगी थी मैं आपके ।

जानते भी हो क्या ।।
अब सांसे तो चल रही है ।

लेकिन जिंदगी खत्म हो चुकी है ।।

सच कह रही हूं ।

आना चाहती हूं आपके पास ।।

होईल का रे स्वप्न पुरे ..

किती सुंदर सजलाय बगीचा ..

चल आपण करू कविता ...

फुला फुलाचे रंग पाहू ..

उडत्या फुलपाखरांना गुंज सांगू ..

धबधबा हा मुक्त वाहे ...

कोकिळेचे सुर काळजाला छेडे .

एक मुक्त स्वप्न मला ही पडे ..

त्या स्वप्नात दिसे एक चिमुकला ..

साद घाले ह्या वेड्या आईला ...

लागे क्षणात मला त्याचा लळा ..

बोल बोबडे शब्द त्याचे ...

काळजात रुजे ...

वात्सलेल्या ह्या नवी पालवी फुटे ..

सांग ना सख्या ...

होईल का रे हे स्वप्न पुरे ..

नाही राहणार ना रे अधुरें ..
दुर्गा मते

Apr 20, 2022

सुंदर दिसण्याच हेच एक सिक्रेट..

आपण खूप प्रयत्न करतो . सुंदर दिसण्याचा पण अनेकदा त्या प्रयत्नांना अपयशच येतं . आणि मग  आपण स्वतःला आरशात बघतो . आणि आपल्या सुंदर असलेल्या सौंदर्याला ही कुरूप समजतो . आणि ह्याचे साईड इफेक्ट म्हणजे आपल्या मनात न्यूनगंड निर्माण होतो . की आपण
सौंदर्याहिन आहोत.  आणि हा न्यूनगंड आपल्या मनात नकारात्मक विचार स्प्रेड करतो .

33 कोटी यौनिनंतर लाभलेला हा मनुष्य देह आणि मनुष्य जन्म आपल्याला नकोसा वाटायला लागतो . का तर केवळ आपण दिसायला सुंदर नाही म्हणून ..पण खरं सांगायचं म्हटलं तर माणसाचं सौदर्य हे त्याच्या दिसण्यावरुन जज करूच नये . कारण त्याच्या शारीरिक


सौंदर्यावर त्यांची सुंदरता dipend नसते .


त्याची सुंदरता dipend असते ती त्याच्या विचारावर त्याचा संस्करावर त्याच्या टॅलेंटवर त्याच्या प्रामाणिक तेवर आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे मानवाची सुंदरता dipend असते ती त्याच्या स्वभावावर ..


  व्यक्ती दिसायला किती सुंदर आहे . हे बघण्यापेक्षा तो मनाने आणि स्वभावाने कसा आहे. आचराने आणि विचाराने कसा आहे . हे बघण केव्हाही चांगलं .


कारण शारीरिक सुंदरता हि जस जस वय वाढेल . तस तशी ती लयास जाते . पण मनाची सुंदरता ही मात्र शेवटचा जो एक क्षण एक श्वास आपल्याकडे असतो . त्याही क्षणी ती सुंदरता आणि ते साैंदर्य आपल्याकडे शाबूत असतं .


   लोकं आपल्याकडे आपण किती सुंदर दिसतो . हा पॉईंट लक्षात घेऊन काही  क्षणासार्ठी आकर्षित होतात . तर त्याच्याच विरुद्ध आपले आचार विचार आणि स्वभाव लक्षात घेऊन लोकं आपल्याकडे आयुष्य भरासाठी आकर्षित होतात . आणि आपल्यावर भरभरून प्रेम ही करतात .


आपण जेव्हा  सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो . तेव्हा खरं तर  खूप मोठी चूक करत असतो . सुंदर दिसण्या पेक्षा सुंदर व्यक्ती महत्त्व आणि आपल्या प्रतिमेच सुंदर अस्तित्व बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे .


तेच जीवन जगण्यासाठी महत्वाचं आहे .


आता सुंदर असणं म्हणजे काय  ? हा प्रश्न पडला असेल तुम्हाला तर , सुंदर असणं म्हणजे आपल्या बोलण्याची पद्धत अशी असावी ..की समोरच्याला आपलं बोलण ऐकतच रहावं वाटलं पाहिजे . आपली एक smile बघून

समोरच्या मध्ये एनर्जी यायला हवी . आपला फेस समोरच्या व्यक्तीसाठी लकी फेस ठरायला पाहिजे . आपलं राहणीमान standred हवं . गाबाळ नको . आपला सहवास आपल्या सहवासात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवा हवासा वाटला पाहिजे . हे असतं सुंदर असणं . सुंदर दिसण्यासाठी स्टोअर मध्ये वेगळ्या वेगळ्या क्रीम सहज मिळतात . पण सुंदर असण्यासाठी मनाची किनार स्वश्च  असायला हवी . आणि रक्तातच ती सुंदरता असायला हवी . म्हणजे एक  सुंदर अस्तित्व आणि व्यक्ती महत्त्व व्हायला वेळ नाही लागणार .😊😊😊😊

आणि हे व्यक्ती महत्त्व च सुंदर दिसण्याच एकमेव सिक्रेट आहे .

आता तुम्हीच ठरवा तुम्हाला सुंदर दिसायचं की सुंदर व्हायचं आहे .😊😊😘😘🥰🥰🥰🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

दुर्गा मते


सिक्रेट गिफ्ट

 तू माझ्यात इंव्होल झालास ..नंतर मला सोडून गेलास .
माझ्या वरती नको नको ते आरोप केले ....

मी नाही विचारणार जाब तू अस का वागलास ?

समजावलंय स्वतःला तू माझ्या चांगुलपणाचा आणि सरळ साध्या स्वभावाचा फायदा घेतलास आणि माझ्या मनावर बलात्कार केलास . कटू आहे पण हेच सत्य आहे .


मला माहितेय हे तू कधीच मान्य करणार नाही . कारण तुझा स्वभाव !  आणि मला माहितेय स्वभावाला औषध नसतं . त्यामुळे माझा तुझ्यावर कधीचं राग नव्हता . आणि कधीचं नसेन ...


फक्त ओढ होती  मला   तुझी ...


त्या ओढीमध्ये काळजी होती माझी ..


प्रेम होतं की नाही ,  माहीत. नाही ..


पण आपुलकीची वीण होती तुझ्याशी ..


जपली होती नाळ मी विश्वासाची ..


कळत नकळत क्रॉस झाली लिमिट तुझ्या स्पंदनाची ..


दोरी तुटली तुझ्या माझ्या हृदयाची ...


सावली माझी मलाच दुरावली ..


जी होती मी तुझ्यात पाहिलेली ..


हळव्या क्षणांना ठेवले होते मनात जपून ..


तुझ्या उन्नाड स्वप्नांनी गेले ते क्षण गारठून ..


मला तुला एकमेकांपासून दूर केले ..


बोल हे फक्त नशिबाचे फेरे सुरू झाले ..


नाही रे तुझ्या वागण्याचे हे वाईट परिणाम मला दिसले ..


म्हणून मी तुझ्यापासून दूर झाले .


मी ही बंधन मुक्त झाले ...


आणि आनंदाने तुलाही बंधन मुक्त केले ..


आज मी खूप खुश आहे .  माझ्या आयुष्यात तुझी आठवण पण नाही येतं . तुझी पूर्वी होती तेवढी ओढ  आज मला बिलकुल नाही हे आणि हेच एक प्रामाणिक सत्य आहे .


वाईट एकाच गोष्टीचं वाटतेय . तू चुकीचं वागलेला असताना सुद्धा मला चुकीचं ठरवून नको नको ते कलंक माझ्या माथी मारून तू पाठ फिरवलीस . तुझ्यात मनात आजही ग्रेट पर्सन म्हणून माझी place save आहे. माहितेय मला कारण आज ..तुझ्यात आणि माझ्यातील नातं जरी संपलेल असेल तरीही आजही मला तुझ्या स्पंदंनाची पूर्वी जशी साद ऐकू यायची ना . तिचं same साद आजही ऐकू येते ...


तू मान्य कर नको करू अजुनही  तुझ्या सुख दुःखाचा पासवर्ड अगदी तोंडपाठ आहे मला ...नातं तुटलं रे मन नाही .  मनाचा चांगुलपणा नाही . तो अजुनही तेवढाच शाबूत आहे . ज्या स्वभावावर आणि ज्या मनावर तू जिवापाड प्रेम केलं होतंस ते अजुनही माझ्याकडे आहे . हा फक्त एकच बदल त्याने स्वीकार लेला आहे . तो म्हणजे हाच की त्याला आज तुझी ओढ नाही . तुझी गरज आणि तुझ अस्त्वित्व आज माझ्या आयुष्यात महत्वाचं नाही ..


तुझी ओढ लयास गेली ..


तिथेच एक प्रेम कहाणी संपली ..
नशीब चांगलं म्हणून लवकर संपली .
आयुष्याची बरबादी नाही झाली .
Tnx देवा तू हे सिक्रेट गिफ्ट बॉक्स दिलं ..
त्यात माझ्या हकाच्या राजकुमाराच् वरदान मला लाभलं .
मनापासून धन्यवाद देवा ह्या सिक्रेट गिफ्ट साठी ..
दुर्गा मते

काल्पनिक कहाणी आयुष्याची संबंध जोडू नका ..


Apr 19, 2022

मैत्री महत्वाची .

प्रेम की मैत्री ह्यात नेहमी द्वंद असते ..
पण मी सांगते ...
प्रेमापेक्षा नेहमीच मैत्री श्रेष्ठ असते .....

प्रेम आलं की अधिकार येतो . शिवाय असलेली मैत्री ही गमवण्याची भीती असते . त्यापेक्षा केवळ निखळ मैत्री काय वाईट आहे . अगदी शेवटपर्यंत निखळ मैत्री जपण्याची वचन देणं ह्यात काय गैर आहे.

प्रेम करून ते प्रेम अर्ध्यावर सोडून जाण्याला समोरच्याच आयुष्य बरबाद करण्याचा  काय अधिकार आहे आपल्याला ...

त्यापेक्षा मैत्रीचं किती श्रेष्ठ आहे . ना आपण कोणाचेही आयुष्य बरबाद करण्याचं कारण ठरतो . ना आपण कोणाच्या भावना दुखावतो . ना आपण कोणालाही अर्ध्यावर सोडून जातो. कुठलीच पोकळी मनात घर करुन राहत नाही . कीवा मनाला जखम करत नाही . आपण कोणाचं तरी आयुष्य बरबाद केलं ह्याचा कलंक ही माथी लागतं नाही .

नातं नवरा बायकोचं असो . किंवा प्रियकर प्रेयसी चं त्यामध्ये मैत्रीच्या व्याख्या वापरन नेहमीच योग्य असतं .


नवरा बायको म्हंटल तर पुरुष हा पुरुषार्थ गाजवतो . त्यापेक्षा नवरा एक मित्र म्हणून आपल्याशी कनेक्ट झाला तर काय फरक पडेल . उलट आपलं  नात अजुनही strong आणि परफेक्ट असेल.


नातं कोणतेही असो . मैत्रीची परिभाषा त्या नात्याला देणं किंवा जोडण महत्वाचं असतं.  कारण ह्या जगातील सर्वात सुंदर नातं जर कोणतं असेल तर फक्त मैत्रीच आहे . त्यामुळे प्रत्येक नात्यात फ्रीडम आणि फ्रेंडशिप ला सर्वात जास्त महत्त्व असावं अस मला मनापासून वाटतं .

दुर्गा मते

आई ही माझी लाडकी ...

 आई ही माझी लाडकी ...
गोड गोड बोलते ...
खोट खोट रागवते ..

आई ही माझी लाडकी ..
भातुकलीचा खेळ आम्हा शिकवते ..
बाराखडीचा खेळ आम्हा खेळून दाखवते ..

आई ही माझी लाडकी ..
छान छान जेवण बनवते ..
चिऊ ताईची गोष्ट सांगत सांगत घास भरवते ..

आई ही माझी लाडकी ..
डोळ्यांवर पट्टी बांधते ...
अनुभवाचे मोल आम्हां सांगते ..

आई ही माझी लाडकी ...

छोटया छोटया गोष्टीतून. आनंद घ्यायचा सांगते ..
रडायचे नाही कधी हेच नेहमी शिकवते ..

आई ही माझी लाडकी ..
आहे जगात भारी ..
नाही करू शकत कोणी तिची बराबरी ..
आई ही माझी लाडकी

दुर्गा मते

जीवाहून. तुला जपते ..

एकदा पाह ना रे माझ्याकडे ..

नको बघू त्या चंद्राकडे ..

लागेल नजर तुझ्या चांदणीला ..

सांगते मी आजच्या रातीला ....

हास्य तुझे मला हवे हवे वाटते ..

शब्द तुझे ओठातून माझ्या ..
गुण गुणावे वाटते ..

शांत ह्या मुखड्याला नजर लागेल ..

का उगी वाटते ...

जिवावून प्यारा ...तूच रे मला राजा ..

सांगते आज तुला .....

जसे मी जपते तुला.  तू ही जप रे मला .

.ओठातून तुझ्या सुर माझ्यासाठी येते .

कर्ण ही माझे हळुवार लाजते ..

मी तुझ्यावर प्रेम करते ...
जीवहून माझ्या मी तुला जपते ..
दुर्गा मते

Apr 18, 2022

तुझ दुःख मीच मांडते ...

तुझ्या मनाचं दुःख मीच मांडते ..
पुन्हा एकदा प्रेमाने एक आर्त साद घालते ...

नको हळहळ व्यक्त करू मी सोडून जाते .
म्हणून नको उगी डोळे पाणाऊ ..
मला वाईट वाटते....

अर्ध्यावर सोडून चालले डाव प्रेमाचा ..
दारी सजला मंडप लग्नाचा ....
हा आगळा वेगळा खेळ रंगला नशिबाचा ..

जीव माझा तुझ्यात गुंतलेला ...
तू जणू  जन्म माझ्यासाठीच घेतलेला ..
जीव तुझा माझ्यासाठी वेडावलेला ..

कळतेय दुःख तुझ्या मनाच ...
नाही रे त्या दुःखाला सावरायला पुरेस ..
आलिंगन ह्या शब्दाचं ..

तरीही करतेय प्रयत्न तुझ दुःख मांडण्याचा ..
प्रयास आहे माझा तुला थोड तरी सावरण्याचा ..

सोडून तुला जाताना तुझ्या चेहऱ्यावर हास्य उमटवण्याचा


नको रे पाणाऊ डोळे तुझे ..


तुझ्यासाठी एकच स्वप्न माझे ..


जरी नाही होऊ शकले अर्धांगिनी ...


तरीही आयुष्यभरासाठी राहील ही प्रेयसी मैत्रीण म्हणून
कायमस्वरूपी ....
सावली बनुन साथीला तुझ्या नेहमीसाठी ...
दुर्गा मते

आबा आई आणि बाबा शब्दाची व्याख्या

आबा ..


आई आणि बाबा ...
शब्दांचा अर्थ कळला ,
आयुष्यात आले आबा ...

मानलेली नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही ..
ग्रेट वाटतात ...
जेव्हा आबा सारखी माणस आयुष्यात येतात ..

एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ...
सांगण्यास शब्द कमी पडतील ,
असे त्यांचे कर्तृत्व ....

मला तर लेकच मानतात ..
आठवड्यातून एकदा तरी माझ्याशी बोलतात ..
Hallo ! Nitya beta ..
Are you happy ..
Stay always happy my dear child !!

एवढंस त्यांचं बोलणं ..
हवं हवंस वाटणारं ..
काळजात घर करून राहणार ..

आपले आबा सर्वांनाच माहित असतील खूप दिवसापासून मनात होतं त्यांच्यासाठी एक रचना करावी ...
प्रतीलीपिवर ओळख झाली . बाप आणि लेक ह्या नवीन नात्याची विण गुंफली ..मी लहान म्हणून सर्वांची लाडकी . लिखाणाची शैली सर्वात आगळी वेगळी . म्हणून तर अजूनच सर्वांना आवडते . आबांची पण लाडकी लेक आहे . ग्रुप वर सर्वात जास्त धम्माल मी करते.  शेंडेफळ आहे ना ग्रुपच मग काय माझ्या चुका सर्वच इग्नोर करतात . कारण मी एक दिवस जरी ग्रुप वर गेले नाही . तर सर्वांनाच खूप सूंन सून वाटतं . आणि कधी कधी काही इशू झाला तरी सगळे खूप समजून घेता त  त्यात आबा जरा जास्त च . मेन म्हणजे आमच्या ग्रुप मध्ये आबांना कोणीच आबा म्हणत नाही.  आबा sir च म्हणतात.  मी एकटीच आहे . बिनधास्त आबा बोलते . मला तेच आवडतं आणि मी तेच बोलणार शेवट पर्यंत कारण आबा ह्या शब्दातच मला आई आणि बाबा चं प्रेम मिळालं ..

थँक्यू आबा तुम्ही आमच्या सर्वांसाठी खूप केलं . आता एकच ईशा आहे.  आपण जे हातात काम घेतलेलं आहे . ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळावं ....

Once again thankyou so much !!!!
😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🌹🌹🌹🌹🌹🌹


Apr 17, 2022

आस

प्रेम सक्सेस झालं नाही ,
म्हणून मैत्री अर्ध्यावर सोडतोस ..
का रे तू मला असा छळतोस ..

नाही होतं मला सहन ..
माझ्या शिवाय तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे ..
माझा विचार तू मनातून काढून टाकला ..
ही कल्पनाही नाही बघवत मला ..

तू खुश रहाव असं सारखं वाटतं ..

तुझ्या खुश राहण्याच कारण मी असावं.
मनाला भावतं .....

खरचं सांगते तुझ्यापासून दूर तर गेले ..
पण अजुन ही तुझ्याच प्रतीक्षेत मी जगते ..
पाहते वाट तू परतून येण्याची ..

पुन्हा मैत्रीचा हात पुढे करशील ह्याचीच आहे आस ..
म्हणूनच तर पाहते तुझी वाट खास ..
दुर्गा मते


काल्पनिक रचना माझ्या आयुष्याशी संबधित नाही. 

जादुई जंगलात ...

जादुई जंगलात तो आणि मी गेलो ..
तो झाला जंगलाचा राजा आणि मी राणी झाले ..

त्याने एक झाडावर घरटे पाहिले ..
त्या घरट्यात त्याचे माझे पिल्ल पाहिले .

फुलांच्या पाकळ्या बघून तो हरवला ...
मला शोधण्यासाठी धावू लागला ..

जादुई जंगलात मी हरवून गेले ..
त्याची जरा मजाक घेऊ लागले ..

बिचाऱ्याला  मला शोधण्याची ओढ लालजवाब ..

त्याला बघून मला खूप आले हसायला ..

बिचारा तो हळव्या मनाचा ..
सापडेना मी वाटला त्याला  विरह कित्येक वर्षांचा ..

पाहून त्याची  तशी अवस्था मी समोर गेले ..
त्याच्यावर खूपच हसले ..

काय रे राजा ? तुला मजाक ही कळतं नाही ..
म्हणून त्याला खूप चिडवायला लागले ..

जादुई ह्या जंगलात तूच शिकव मला मजा क ..
घ्यायची कशी ? आणि करायची कशी ...
असं म्हणत तो ही खूप हसला ..
आणि पुन्हा माझ्या प्रेमात पडला ...

दुर्गा मते

काल्पनिक रचना ...

Apr 16, 2022

राजा तुझ्यासाठी ...

सजले मी तुझ्यासाठी ..
राजा तुझ्या सुखासाठी ..
घामात माखले मी ...
राजा तुझ्या संसारासाठी ..

चिमणीचा खोपा , जिवापलिकडे जपला ..

लक्ष्मीच्या पावलांनी भाग्योदय झाला ..

तुझ्या संसाराचा फुलोरा फुलला ....

तुझ्यासाठी देह मी झिजविला ..

सांज वेळी थकूनही सजायचे ...

तुझ्यासाठी मोहरुन यायचे ..

गुलाबाच्या फुलापरी सुंदर शोभून दिसायचे ..

सांज श्रृंगार तुझ्यासाठी करायचे....

लाजळूचे झाड

तुझ्या स्पर्शानी बहरले ..

तुझ्या सानिध्यात मनमोकळे जगू लागले ..
आकाशालाही त्याचे नवलं वाटले ..
राजा तुझ्यामुळे मला हे सुगीचे दिवस दिसले ..
तुझ्यासाठी आयुष्य माझे पणाला लावले ..
दुर्गा मते ..

न्याय भीक मागत फिरतोय ..

न्याय भीक मागत फिरतोय ..
अन्याय करणाऱ्याचा रुबाब वाढतोय .

    न्याय मिळवण्यासाठी जो लढतो .. 

   तो आयुष्यभर रडतचं राहतो ..


एक काजवा येईल  न्याय देण्यास ..

आपल्यावर होणारा अन्याय दूर करण्यास ..

ह्याचं आशेवर

जगतोय सर्वसामान्य माणूस ..

न्याय देणाराचं सांगतोय ,  तू स्वप्न पाहतोय फडतूस  ..


       भ्रष्टाचाराचे प्रकार वाढीस लागले .. 

त्यात गरिबीचे हाल - हाल झाले ..


अन्यायाने शिखर गाठले ..
न्यायाला भिकेला लावले ..

      आजही न्याय भीक मागत फिरतोय ..
      अन्याय करणाऱ्याचा रुबाब वाढतोय ..
दुर्गा मते

Apr 15, 2022

आवडल असतं मला मुलगा म्हणून जन्माला यायला ..

आवडलं असतं मला ...
मुलगा म्हणून जन्माला यायला ..
आवडत असतं मला...
आई वडिलांची जबाबदारी स्वीकारायला .

आवडलं असतं मला ..
एक सच्चा नागरिक म्हणून मिरवायला ..
शिवबाचा शिवभक्त व्हायला ..
त्याचेच गुण आत्मसात करायला ..
खरच आवडलं असतं मला ..
मुलगा म्हणून जन्माला यायला ..

स्त्रियांवर होणारे अत्याचार - बलात्कार ..
थांबवण्यासाठी यायला हवं होतं ..
मी मुलगा म्हणून जन्माला ..
अनेक भगिनीच दुःख दूर करायला आवडल असतं मला .

जगातील सर्वात भाग्यवान स्त्रीच्या ..
भाग्याचं कारण व्हायला आवडल असतं मला .
राधा सारखी एक मैत्रीण ,
आयुष्यात कमवायला आवडल असतं  मला ..
खरच एक मुलगा म्हणून जन्माला यायला आवडल असतं मला ..

एक आदर्श पती ..
मुलगा आणि एक आदर्श व्यक्ती महत्व व्हायला आवडल असतं मला ..
खरच ह्या आधी ..
मुलगा म्हणून जन्माला यायला आवडलं असतं मला .

स्त्री आदर्श असतेच हा जन्म मला प्रिय आहेच .पण ह्यापेक्षा ही जास्त आवडलं असतं मला मुलगा म्हणून जन्माला यायला ..


भाग्यवान मी ..

तो  आपल्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी घेणार . 
त्याच्या सोबत आपल्याला सात पावलं चालावी लागणार
त्याच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्णचं वाटणार .
तो आला की आयुष्याला पूर्णत्व मिळणार . तो अनोळखीच असतो . आई वडील योग जुळवतात . त्याच्या हातात आपला हात देतात . त्याला आपला जीवनसाथी म्हणून निवडतात . आणि ह्या साऱ्या filings त्या खास माणसासाठीचं असतात . 

खरचं हा अनुभव आहे . माझा स्वतःच . जेव्हा माझ लग्न ठरलं तेव्हा मी बिलकुल खुश नव्हते.  मला ह्या मुलासोबत सात पावलं चालायची होती की नाही माहीत नाही.  पण सुरुवातीला मला हे लग्न नकोच होत. त्याला विविध कारण आहेत . ती मी सोशल मीडिया वर नाही सांगत . 

पण जेव्हा आमच्यातील छोटे मोठे जे गैरसमज होते ते दूर झाल्यानंतर मी खूप खूष राहू लागले . त्याच्यासाठी जगण्याची स्वप्न पाहू लागले.  

तो बिचारा साधा भोळा मनाने खूप चांगला . खूप बिझी असतो . संपूर्ण फॅमिलीची जबाबदारी त्याच्यावरच.  खर तर मला त्याची कीव येते . की एवढं काम करूनही त्याला स्वतःला जेवण्यासाठी वेळ नसतो .  आणि  तो मला वेळ देत नाही . म्हणून मी त्याच्यावर तान खाते.  एक दिवस कॉल करते . तर पुढचे चार दिवस कॉल करत नाही . तरीही तो बिचारा काहीही मनावर घेत नाही . लहान समजून माफ करतो .

खरचं मी खूपच लवकर त्याच्या प्रेमात पडले . खर  तर , त्याच्या भेटीत मी जून सारं विसरले . त्याच्या रंगा रुपावर नाही .तर त्याच्या स्वभावा वर भाळले . 

मी अल्लड तो खूप शांत ..
मी ही घेते समजून ..
तो ही घेतो समजून ..
म्हणून तर सारे येते उमजून ..

खरचं खुप भाग्यवान आहे .मी मला एवढा छान लाईफ पार्टनर मिळाला . खूप शांत आणि निरागस त्याला पाहिलं ना तर जगावेगळी फिलिंग होती . आणि ती स्पेशलचं असते ...मी आता खऱ्या अर्थाने पुर्ण झाले .दोन शतके ओलांडलेला कोणीतरी माझा हक्काचा माझ्या आयुष्यात माझी एक गोड smile बनुन आला ..
थँक्यू डिअर ..

पण एक तक्रार अजुनही आहे . तो मला कधीचं स्वतःहून कॉल नाही करत 😔😔😔. पण त्यासाठी एक दिवस भांडनार आहे मी चांगली ..हा पण समजून उमजून त्याला आयुष्यात कधीच दुखावणार नाही .😊😊

कोण आहे मी तुझी.

कोण आहे मी तुझी ..
कोणीच नाही ..
काय नातं आहे आपलं
काहीचं नाही...

तरीही तुझ्या आठवणीने ,
जीव व्याकूळ होतो..
तुझ्याशी संवाद साधन्यास ..
नेहमी आतुर होतो ..

काय संबंध तुझा माझा ..
काहीचं नाही ...
तरीही का मला ओढ तुझी ..
कळतंचं नाही ....

दोन ध्रुवांवर दोघे आपण ..

अनोळखीच आहोत .

.तरीही का तू एवढा ओळखीचा भासतो ..

माझा नसूनही तू मला माझाच वाटतो ..

कळतच नाही काय नातं आहे ..

तुझ माझ् ....

काय जादू केली अशी ...

की मी स्वप्न पाहतेय ...

फक्त तुझीच म्हणून जगण्याची ...

दुर्गा मते

जेव्हा मी लिहायला लागली ..

लिहायला सुरुवात केली ...
आयुष्यातील दुःख सरली ..
स्वतःचीच एक ओळख निर्माण झाली ..

भेट झाली माझी ..
माझ्यातीलचं कवयित्रीशी ..
आयडीया आली.
स्वतःशी संवाद साधन्याची ..

खळखळून हसायला शिकले ..
मनभरून रडायला शिकले ..
स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यास सज्ज झाले ..

प्रेमाची परिभाषा कशी कळली ...
माझी मलाच नाही समजली ..
माझी प्रीत कधी बहरली ..

प्रीतीनेच त्या  विरहाची वाट कशी पत्करली ..
आज ही  नाही समजली ...
प्रेमाची परिभाषा कशी उमगली ..

स्वतःशीच एक ओळख निर्माण झाली ..
जेव्हा मी कवयित्री म्हणून लिहायला लागली ..
अनुभवांची शिदोरी सोबतीला आली ..
माझ्यातील कवयित्री खऱ्या अर्थाने कवयित्री झाली .
दुर्गा मते


Apr 14, 2022

साजरा होऊ दे सोहळा ..

एक सुरेल गाने गाऊया आपण जोडीने ..
बाग संसाराची फुलवूया प्रेमाने ..

सांजेला त्या गुपित सांगुया .....
मिलनाची रात ही डोळ्यात साठवूया ..

पारखून घेऊ एकमेकांस नव्याने ...
 हळव्या ह्या भावनेला अनुभवूया उघड्या डोळ्याने ..

केसांच्या रचनेत माझ्या ..
तू ही शोध छटा तुझ्या ..

पावलांनी माझ्या मागितले पैंजण राजा ..
साजरा करण्यास ह्या मिलनाचा सोहळा ..

गजरा माझा आसुसला तुझ्या स्पर्शासाठी . 
रात्र ही थांबली तुझ्या माझ्या मिलनासाठी ..

गंध तू घे ह्या कोवळ्या मनाचा ...
कर साजरा हा सोहळा मिलनाचा ..

दुर्गा मते

कवितेतील शब्द

माझ्या कवितेतील भाव तू वाचून बघ ..

शब्दां शब्दांना पारखून बघ ..

कवितेतील प्रत्येक शब्द तुझ्यासाठीच आहे रचला ..

तुझ्या प्रेमाने आयुष्याचा इतिहास घडवला ..

मुके भाव येतात का तुला वाचता ..

एकदा वाचून बघ .....

कवितेतील शब्दांना तुझ्या अस्तित्वाने एक वेगळीच चव आली ......

कवितांना माझ्या तुझ्या प्रेमाची ओढ लागली ..

कविता माझी तुझ्या मुखातून जन्म घेऊ पाहते ..

एक आर्त साद आज मी तुला घालते  ...

कवितेतील शब्द माझे एकदा वाचून बघ ..
त्या शब्दातील भावनांना एकदा पारखून बघ ..
दुर्गा मते

Apr 13, 2022

कुठलं नाव देऊ ह्या नात्याला ...


काय नाव देऊ ह्या नात्याला .

कुठलं ठिगळ जोडू तुटलेल्या ह्रदयाला ..

होता भास तू पाहुणा पूर्व जन्मीचा खास ...

प्रत्यक्षात तुला न  भेटता ही पूर्ण झाली  भेटण्याची आस ..तुझ्या मनाने थेट संवाद साधला माझ्या मनाशी ..

संबंध जोडला माझ्या आयुष्याशी ....

रिक्त जागा आयुष्यातील तू पूर्ण केली ..

पूर्ण केलेली जागा नियतीने मात्र ओघळली ....

माहीत नाही रे कुठल्या जन्मीचं होत हे नातं ..

अपूर्ण राहिलेलं ...

ह्याही जन्मी अपूर्णच राहील ..

कधी होईल हे नातं पूर्ण ..
आयुष्य माझ होईल संपूर्ण ..
दुर्गा मते

ही रचना काल्पनिक आहे . माझ्या वैयक्तिक आयुष्याशी संबधित नाही ...



Apr 12, 2022

पुरुषाला ही असते की वेदना ..

कोण म्हणतं पुरुषाला वेदना  नसते .
पुरुषाला ही असते की वो वेदना ..

विरहात तो ही रडतो ..
प्रेयसीसाठी लिहिलेले प्रेम पत्र ..
त्याच्याच आसवांत भिजवतो. 

त्याला ही हव् असतं कोणीतरी हक्काचं ..
भरभरून प्रेम करणार कोणीतरी जिवाभावाच ..

त्याला ही हवा असतो मुक्त संवाद ..

नको असतात वाद विवाद ..

त्याची ही अपेक्षा असते ..
कोणीतरी आपल्याला समजून घेण्याची ..

त्यालाही गरज असते एका प्रेमळ मैत्रीनीची .

गरज काळाची पुरुषी वेदना समजून घेण्याची ..

कोण म्हणत पुरुषाला वेदना नसते ..

त्याला खळखळून रडण्यासाठी ..

आणि मन मोकळं करण्यासाठी हक्काचं ठिकाणचं नसत .आणि हीच प्रत्येक पुरुषाची सर्वात मोठी वेदना असते .

दुर्गा मते


फिजिकल प्रोब्लेम लक्षात घेणं ही गरजेचं असतं .

Hi friends 🙋🙋

आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी घेऊन आली आहे . मला खात्री आहे . ती तुम्हाला आवडलेच आणि नाही आवडली तरी हरकत नाही . 🤪🤪
पण तरीही वाचा तुम्ही कारण मला खात्री आहे तुम्हाला आवडेलच ..

      ही स्टोरी नैना आणि धीरजची ...

नैना एक छोटस फॅशन इन्स्टिट्यूट चालवणारी मुलगी . आई लहान असतानाच देवाघरी गेले . वडील अपंग  पदरात दोन लहान भावंड...घराची सारी जबाबदारी नकळत्या वयात नैनावर येऊन पडली . आणि तिने ही त्या काळी स्विकारलेली जबाबदारी ती आज ही नेटाने पेलत होती .

  तर धीरज पाटील घराण्यातील एकुलता एक मुलगा लाडाकोडात वाढलेला . श्रीमंत बापाचा श्रीमंत मुलगा आपल्या श्रीमंतीचा त्याला जराही गर्व नव्हता . स्त्रियांची तो खूप आदर करायचा . आणि ह्याच ही खूप मोठं हेल्थ क्लब होतं . अगदी नैना च्याच इन्स्टिट्यूट समोर .
त्यामुळे त्यांची सतत गाठ भेट व्हायची .

नैना दिसायला तर सुंदर होतीच पण मनाने आणि स्वभावाने ही खूप सुंदर होती . तिच्यासाठी आपलं परक अस काही नव्हत . ती सर्वांना आपलच मानायची .
आणि तिच्या ह्या दिलदार स्वभावावर च तो खूप भाळला .

प्रेम फिलॉसॉफी हे त्यांच्या तत्वात ही नव्हत . पण नैनाच्या येण्याने त्याची सर्व तत्व मोडीत निघाली . तो तिच्या प्रेमात पडला आणि कधी नव्हे ते कोणाच तरी आयुष्य बरबाद करण्याचं कारण ठरला . त्याने जाणून बुजून नव्हत केलं अस . कळत नकळत घडलं होतं . फिजिकल atraction मुळे .

बघुया काय घडलं होतं त्याच्या आणि तिच्या आयुष्यात ते थोडक्यात .....

    नातं तसं त्यांचं मैत्रीचं  होतं . नावाला मैत्रीचं होतं . तस मैत्री पेक्षाही खास होतं . ती त्याच्यावर एक मित्र म्हणून खूप प्रेम करायची.  आणि तो ही तिच्यावर एक मैत्रीण म्हणून खूप प्रेम करायचा . Bf - gf ला ही लाजवेल अशी त्यांची प्रेम कहाणी होती . निस्वार्थ प्रेमाची निस्वार्थ कहाणी ...

त्यांच्या जरी खूप छान नातं असलं एकमेकांवर खूप विश्वास असला तरी ही नैनाला धीरजची एक गोष्ट खूप खटकायची . ती म्हणजे तो कधी कधी एवढं छान वागायचा की कोणीही म्हणेल तो नैनाच्या प्रेमात आहे . आणि कधी कधी असं वागायचा नैनाला ही त्याच्या तस वागण्याचा खूप राग यायचा . तो डायरेक्ट तिला अनोळखी समजून तिला ओळख न दाखवता इग्नोर करायचा ..


तेव्हा ती आतून खूप दुखावली जायची . कारण ती ठरवून ही त्याच्याशी तशी वागू शकत नव्हती . ती नेहमीच त्याच्याशी प्रेमाने वागायची . अनेकदा तिने त्याला त्याच्या तसं वागण्याचं कारण विचारल . पण त्याने तेव्हा सर्व काही हसण्यावर नेलं . आणि उत्तर द्यायला टाळाटाळ केली .

पण एक दिवस ती हट्टालाच पेटली तेव्हा त्याने थोडक्यात त्याची लव्ह स्टोरी तिला सांगितली . तिला ही  खूप वाईट वाटलं त्याची लव्ह स्टोरी ऐकुन ती ही हळवी झाली . आणि त्याच तस  वागणं स्वाभाविक आहे . असा समज करून शांत झाली . पुन्हा तिने त्यांचं तिला अचानक इग्नोर करण मनावर घेतल नाही . तर त्या परिस्थितीत तिने त्याला नेहमीच समजून घेतलं . एक छान मैत्रीण म्हणून आलिंगन दिलं . आणि तिच्या त्या निरागस बाबड्या मनाच्या एका कोपऱ्यावर अलगद धीरज च नावं लिहिलं गेलं  .


ती त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करू लागली . कुठल्याही अपेक्षाशिवाय तो ही तिच्यावर प्रेम करायचा . अगदी निस्वार्थच ...पण एक दीड महिन्यात एकदा तरी त्याला अटॅक यायचा . तो अटॅक एका आजाराचं स्वरूप आहे . असं म्हटल तरी हरकत नव्हती . आणि त्या अटॅकचा तिला खूप राग यायचा . तो अटॅक त्याचं रूप एक दीड महिना दाखवायचा . एक दीड महिना त्यांच्यात खूप अंतर पडायचं . आणि ते अंतर तिला नकोस वाटायचं .

नको रे दुरावा हा असा नात्यात ..
नाही जातं रे क्षण आनंदात ..
जेव्हा तू असतोस सहवासात ..
तेव्हा दुःखच नाही राहत रे आयुष्यात ..
तूच आहेस माझ्या सुखाची किनार ..
कधी रे तुला कळणार ..
तुझे असे वाऱ्यासारखे वागणे कधी रे बदलणार ..

ती त्याच्या आठवणीत रात्र रात्र जागायची . ओक्साबोक्सी रडायची आणि जेव्हा तो त्या अटॅक मधून बाहेर यायचा . तेव्हा ती त्याला एक घट्ट मिठी मारायची.  आणि एक दीड महिन्याचा विरह विसरण्याचा प्रयत्न करायची .

ह्या वेळेस ही असच झालं . तो अटॅक मधून बाहेर आला आणि तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करू लागला . त्याला मध्येचं भलते सलते अटॅक येतात ये ही तो विसरला आणि तिला ही वाटलं की त्याला तसे अटॅक येणं बंद झालं . कारण एक वर्ष होतं आलं होतं . त्याने नैनाला इग्नोर केलं नव्हत . बहुतेक नैना च्या भेटीत धीरज धीरज चा past विसरला होता . त्याने एका नवीन आयुष्याची सुरुवात केली होती . ती ही त्याच्यावर वेड्या सारखं प्रेम करू लागली होती .

तुझ्या भेटीत सारचं मिळाला ..
आकाश चांदण्यांनी सजल ..
तुझ्यात माझं मन रमलं ...
आयुष्य अर्धवट राहता राहता पूर्ण झालं ..
तुझ्या भेटीत सारचं मिळालं ...

ती आणि तो खूप खुश होता . चोवीस वर्षांनंतर तो आज पहिल्यांदाच नैना बरोबर त्याचा birthday selibreat करण्यासाठी तयार झाला होता . केवळ नैनाला आवडत म्हणून तो birthday selibreat करणार होता .

सर्व प्लॅनिंग तिनेच केलं होतं . फक्त तो तिला फॉलो करत होता.  आज तो पूर्णपणे तिला समर्पित झाला होता.  तिच्या मनासारखं वागत होता .

सर्व काही सुरळीत चाललं होतं . आजचा दिवस दोघांसाठी ही खास होता . कारण आज ते दोघेच होते फक्त एकमेकांसाठी एकमेकांच्या आयुष्यात ...

    फॉर्म हाऊस वर तिने त्याच्या birthday ची प्लॅनिंग केली होती .

पूर्ण फॉर्म हाऊस काळोखात कँडलने सजलेला . नैना ने ही नेव्ही ब्लु कलरची साडी घातली वन साईड पदर घेतलेला  आणि केस मोकळे  ती त्या लुक मध्ये खूपच सुंदर दिसत होती न कुठल्याही  पुरुषाला त्या क्षणी कोणत्याच filings control होऊ शकल्या नसत्या . आणि धीरजच्या ही बाबतीत नेमकं तेच घडलं .

         त्या क्षणी त्याच्या फिजिकल गरजा वाढल्या . आणि तो तिच्याकडे attract झाला . दोघांच्याही मनाचे ताबे सुटले आणि त्या रात्री नको ती घटना त्यांच्या आयुष्यात घडली ...


आणि आजची संध्याकाळ तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक  . तो जरी तिच्या ओळखीचा होता . तरी आज तो तिला अनोळखी वाटतं होता . त्याच्या स्पर्शात प्रेम .. ममता ..वात्सल्य नव्हत . होती ती फक्त एक अनामिक ओढ .  त्याच्यात दडलेली राक्षसी वृत्तीशी  तिची आज ओळख झाली होती . आणि ती ओळख तिला फार महागात पडली ...


तिने त्याला खूप प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला . पण तिची क्षमता कमीच पडली . आणि तिचं  चारित्र्य पणाला


लागले .


तिने त्याला जाब ही विचारला तू का केलंस अस ? तेव्हा तिच्या ह्या प्रश्नावर त्याने प्रतिऊत्तर   दिले ...


" हे बघ नैना ..मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती . ती आजपर्यंत लपवून ठेवलेली आहे . हे बघ मला ते अटॅक वैगरे काहीही येतं नव्हत . तो एक ड्रामा होता .


तुझा विश्वास जिंकण्यासाठी . मी वाईट आहे अस नाही . कुठल्याही मुलीला पाहिलं की माझ्या मनात तिच्या विषयी एक अनामिक ओढ दाटून येते   . मुलींविषयी मला फिजिकल attraction जास्त आहे . म्हणून मी कुठल्याच मुलीशी कनेक्ट होत नाही . आणि झालो तरी तिच्यात इंव्होल होतं नाही  . कारण त्याचे फार वाईट परिणाम त्या बिचारीला भोगावे लागतात . फिजिकल अँड मेडिकल प्रोब्लेम आहे .  मी काहीही मुद्दाम हून करत नाही . कळत नकळत घडत ग माझ्या हातुन .." आणि तो खाली बसून चेहऱ्यावर हात ठेवून ओक्साबोक्सी रडु लागतो . त्याच्या वागण्याचा त्याला खूप पश्चाताप होतो. 


तिला ह्या क्षणी त्याचा राग नाही तर , त्याची कीव येत होती .


" रडू नकोस धीरज काही हरकत नाही.  माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे . तू त्या प्रेमाचा स्वीकार कर . मला वाळीत नको टाकू मला नव्हतं रे माहीत तुझ्या ह्या प्रोब्लेम बद्दल मी कधीच तुझ्यात इंव्होल नसते झाले . पण आता एक कर माझ्याशी ह्या क्षणी लग्न कर .."


ती त्याचा हात आपल्या हातात घेऊन त्याला विनंती करते .  तो ही तिच्या त्या प्रेमाचा स्वीकार करतो .


आणि तिच्याशी लग्न करायला तयार होतो .


चूक केली म्हणजे आपण चुकीचे ठरत नसतो . ती चूक योग्य रित्या सुधारता आली पाहिजे.  जर ती चूक न सुधारता आपण वारंवार तिचं चूक पुन्हा पुन्हा करत राहिलो तर आपण चुकीचे ठरत असतो . आणि कधी कधी फिजिकल प्रोब्लेम ही लक्षात घ्यावा माणसाने . समोरच्याचा राग नाही येत . कीव येते . जर फिजिकल प्रोब्लेम खरोखर अस्तित्वात असेल तर ..समोरच्याची मनस्थिती लक्षांत घेणं आणि त्याला समजून घेणं सर्वात महत्वाचं असतं .

ही कथा माझ्या कल्पना विश्वातील आहे . ह्याचा वास्तवाशी काहीही  संबंध नाही . आणि काही संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा .
ह्यात मांडले ला फिजिकल प्रोब्लेम ही मी कल्पनेतून मांडलेला आहे ..


.संसाराच रहाटगाड असच चालवायच असतं

एकाने तानल की दुसऱ्याने सावरायचं असतं .
एकाने समजून सांगायचं असतं तर ,
दुसऱ्याने समजून घ्यायचं असतं ..

एक कठोर झाला ,  तर दुसऱ्याने मृदू व्हायचं असतं .

संसाराच रहाटगाड असच  चालवायचं असतं .

एकाने अपेक्षा ठेवल्या तर , दुसऱ्याने त्या पूर्ण करायच्या असतात ...

एकाची स्वप्न मृत पावली तर , दुसऱ्याने त्याचं स्वप्नांना जन्म द्यायचा असतो .

एकाने रागवायच असतं तर , दुसऱ्याचे मनवायच असतं .संसाराच रहाटगाड असच  चालवायचं असतं ..स्वतःसाठी नाही एकमेकांसाठी जगायचं असतं .तडजोडीच आयुष्य स्वीकारायचं  असतं .

एकमेकांना समजून घेण्यात सुख मानायच असतं .

संसाराच रहाटगाड असच  चालवायचं असतं .
दुर्गा मते


Apr 11, 2022

निस्वार्थ प्रेमाची व्याख्या ..

नऊ महिन्यांचा प्रवास नात्याचा ..
त्याच्या माझ्या सुरेल मैत्रीचा ..

वाद - विवाद खूप होते ..
एकमेकांना आदर देणे ठरलेले होते ..
त्याला मला समजून घेणे भाग होते ..

ऑनलाईन रोज भेट व्हायची ..
प्रत्यक्षात भेट होता होताच रहायची ..

वयाने तो मोठा होता नेहमी समजून घ्यायचा .
जिवापाड प्रेम माझ्यावर करायचा ..
प्रेम ऋतु त्याच्या मनी सतत फुलायचा ..

निस्वार्थ प्रेमाची व्याख्या त्याच्यामुळेच कळली ..
त्याच्या हृदयाला जखमा देणारी छबी माझीच ठरली .
दुर्गा मते


Apr 10, 2022

धागा विश्वासाचा ..

एक धागा विश्र्वासाचा कळत नकळत जुळल्या जातो . तो क्षण आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण असतो.  एका मनाचा दुसऱ्या मनाशी थेट संवाद साधला जातो . आयुष्य परिपूर्ण होतं जेव्हा एक हळवं मन दुसऱ्या हळव्या मनाला पूर्णपणे समरपित होतं . आणि तिथे जुळला जातो . एका धागा विश्वासाचा ..सुरू होतो प्रवास एका सुरेल नात्याचा .

हा लेख मी मनाचं समाधान म्हणून लिहिते आहे .

लग्न एक प्रथा खऱ्या आयुष्याची नवी सुरुवात ..ही सुरुवात एकमेकांना समजून घेत ह्यावी . एकमेकांना वेळ देण्याची ओढ असावी . एकमेकांवर अधिकार गाजवण्याचा अधिकार असावा . कायम तुझी सावली बनुन साथ देईल . तुझी साथ कधीच सोडणार नाही . तुला स्वतःपेक्षा जास्त जपेंन ही वाक्य  बोलली नाही  तरी चालतील .


पण  नात्यात फ्री  पणा असावा ..एकमेकांवर अधिकार गाजवण्याआधी एकमेकांचे मित्र होऊन एकमेकांना समजून घेता आलं पाहिजे .


एक धागा विश्वासाचा जुळन्या आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी एकमेकांना वेळ काढून वेळ देता आला पाहिजे . सुरुवातीच्या स्वतः पेक्षा जास्त विचार आपल्या लाईफ पार्टनर च्या मनाचा करता यायला पाहिजे .

लग्न ही फक्त एक प्रथा नाही हे . ही एक सुरुवात आहे . एका अनोळखी व्यक्तीचं आयुष्य दुसऱ्या अनोळखी व्यक्तीशी जुळल्या जात. एका वेगळ्याच बंधनात आपण बांधल्या जातो .त्या बंधनात जेव्हा  आपण बांधल्या जातो . तेव्हा आपण थोड्या काळासाठी स्वतःला विसरून गेलो तरी चालतं . पण ज्याच्यासोबत आयुष्य भरासाठी बांधल्या जाणार आहोत . त्याला क्षणोक्षणी आठवता आलं पाहिजे . त्याच्या मनाशी संवाद साधता आला पाहिजे .

एका नवीन आयुष्याची सुरुवात करताना एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांना वेळ देणं सर्वात महत्वाचं असतं . तरच ते नातं पूर्णत्वास जातं . नाहीतर आयुष्य एकमेकांस समजून घेण्यातच जातं जगणं जगायचं राहून जातं . त्यामुळे एका नवीन नात्याची सुरुवात करताना सर्वात आधी एकमेकांना वेळ द्यायलाच पाहिजे . आणि एकमेकांना समजून घेण्याची कला अवगत करता आली पाहिजे ..
दुर्गा मते

अपूर्ण कहाणी .

खूप आठवण येते तुझी ..
तुला येते का रे माझी ..

एकटी पडली रे तुझी राणी ..
तुझ्याशिवाय अपूर्णच राहिली कहाणी ..

स्वप्न होतास तू माझ सात पावलांच ..


नियतीने का लावलं उधळून असं ..

निस्वार्थ प्रेम होतं रे माझं तुझ्यावर ..


तितकंच निस्वार्थ प्रेम

तुझ ही  होतं का माझ्यावर ..

होतं तर मग का अर्ध्यावर साथ सोडली ..
राधा कृष्णाची कहाणी अपूर्णच ठेवली ..
दुर्गा मते

प्रेयसी च्या आयुष्याला समर्पित .

किती क्षणाच आयुष्य उरलय माझ् ..
करून करून किती करशील ग तिरस्कार आज ..

प्रेम केलं ह्याची का ही सजा ..
करतेय मला तुझ्या आयुष्यातून वजा .

काय मागितलं होत तुझ्याकडे ..
तुझ्या गोड आठवणी सोबत थोडासा सहवास ..
हवा होता मला माझ्याकडे ..

नसतं केलं तुझ्या आयुष्यात कधी इंटर फेअर ..
नेहमीच एक चांगला मित्र म्हणून घेतली असती केअर ..

शारीरिक सहवास नको हवा होता मला ..
तुझ्या मनाच्या एका कोपऱ्यात माझे नाव पाहिजे होते मला ...

प्रीतीला बहर नवा हवा होता ..
हा इरादाच कधी माझा नव्हता ..

तुझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार हवा होता ..
तुझा चांगला मित्र असण्याचा अधिकार मला गमवायचा नव्हता ..

तुला मनासारखा जोडीदार मिळाला ..

तो क्षण तुझ्याही पेक्षा खास माझ्यासाठी ठरला ..

कारण त्या दिवशी एक जिवलग कायमचा उध्वस्त झाला .प्रेयसीला तो आयुष्यातील वर्दळ वाटू लागला ..

रचना ही विषाचा एक घोट पिऊन रचली...
माझ्या प्रेयसीच्या सुखी आयुष्याला समर्पित केली .
दुर्गा मते

मेरे माही ..

तुझ्या शब्दात शोधते मला ..
माझ्या आयुष्यात पाहते तुला ..

    एक सुरेल गाणे दोघांच्या आयुष्याचे ..
    गाऊ संगतीने गीत हे प्रेमाचे ...

शोधू एक किनारा दोघांसाठी ..
हळव्या त्या एकांतासाठी ..

      स्वप्न मनीचे त्या एकांती सांगते तुला ..
      तू जन्मोजमी हवा मला ...

चांदणे पसरले अथांग त्या तलावात ..
होऊ एकरूप आपण एकमेकांत ..

     तुझ्याशिवाय  आता नको काही ..
      तूच माझी जिंदगी हो रे माही ..
दुर्गा मते

सदर रचना काल्पनिक आहे ..

Apr 9, 2022

लोकांना कितीही जीव लावला तरी ती आपली होतं नाही .

लोकांना कितीही जीव लावा ते कधीचं आपले होणार .
कटू आहे पण हेच जीवनातील एकमेव परिपूर्ण सत्य आहे .



खरच ह्या दुनियेत आपण लोकांना खूप जवळ करतो . लवकर आपलं मानतो . ती चूक करतो . कारण हे कलियुग आहे.  जो पर्यंत लोकांना आपली गरज आहे. किंवा आपण लोकांच्या मनासारखं वागतो . तो पर्यंत लोक आपल्याला त्यांच्या आयुष्यात स्थान देतात .
जेव्हा ती गरज संपते तेव्हा तिचं माणसं आपण वाऱ्यावर पडलो आहोत . अशी भावना मनात बाळगून आपल्याला आयुष्यातून बेदखल करतात .

तेव्हा आपण खूप रडारड करतो . डिस्टर्ब होतो . कुठे कमी पडले मी नातं निभवण्यात . मी खरच ह्यांच्या योग्यतेची नव्हती . का ? अशा  नकारात्मक दृष्टीने आपण ही आपल्यालाच दोष देत बसतो .

पण जेव्हा आपण स्वतःला दोष देत असतो . तेव्हा खरं तर खूप मोठी चूक करत असतो . लोकं आपल्याला दोषी ठरवतात तेव्हा आपण ही आपल्याला दोष देत बसू नये . मी निर्दोष आहे . पूर्णपणे निर्दोष अशी भावना मनात ठेवून स्वतःला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा . आणि स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करायचा .


ह्या कलियुगात खरं तर लोकांच्या मनाचा विचार करत जगणंच  चुकीचं आहे . कारण आजकाल ना खऱ्या माणसांची आणि खऱ्या भावनांची कदर केली जात नाही .


जी तोंडावर गोड गोड बोलतात आणि हळूवार पने पाठीत खंजीर खुपसतात तिचं माणस आजकाल लोकप्रिय व्हायला लागली .


त्यामुळे जगावं माणसाने स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी ..मी असो किंवा अजुन कोणी ही असो . स्वतः पेक्षा जास्त महत्त्व कोणालाही द्यायचं नाही . आणि जो व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त आपल्याला महत्व देतो . आपल्या आनंदाचा जास्त विचार करतो . त्याचा insult करायचा नाही . आणि ब्लॉक लिस्ट त्यांच्यासाठी कधी राखून ठेवायची नाही .


आणि सर्वात महत्त्वाच ..लोकांना कितीही जीव लावला तरी ती आपली होतं नाही . हे शेवटच्या श्वासापर्यंत नाही विसरायचं . ह्या जगात जिवापाड प्रेम करणारे फक्त आई वडील असतात . त्यांच्या आपल्याकडून काहीचं अपेक्षा नसतात.  बाकी सारं जग मतलबी त्यांच्या फायद्यानुसार आपल्याला महत्व देतात .

दुर्गा मते

कान्हा लाडका

जन्मलो पोटी देवकीच्या ..
खेळलो अंगा खांदयावर यशोदेच्या .

कान्हा लाडका यशोदेचा ..
काळजाचा तुकडा त्या देवकीचा ..

खोडकर नखरे झेले यशोदा आई ..
दोन आई नशिबी हीच साता जन्माची पुण्याई .

गोकुळात फुले नंदन वन ..
माय लेकराच्या गोड शब्दात ..

बासरीची धुंद यशोदेच्या जाई कानी ..
धुंद ती देवकीच्या डोळ्यात आने पाणी .

कान्हा लाडका मी यशोदेचा ..
काळजाचा तुकडा देवकीचा ..


Apr 8, 2022

निराश होऊ नको देऊ.

 आज माझ भांडण माझ्या आई वडिलांशी नाही .
आज माझ भांडण फक्त तुझ्याशी आहे देवा ..
तू गुन्हेगार आहेस माझा .
खूप मोठा गुन्हेगार ..
काय हवं होतं मला .
जे मनात होतं तेच तर नशिबात हवं होतं .
आणि जे नशिबात आहे . 
त्याच्यापेक्षा जे मनात होतं . 
ते खूप बेस्ट होतं हे तुला मान्य करावं लागेल ..

रोज भीक मागायचे रे तुझ्यासमोर का भीक नाही घातली पदरात   . एवढी गरिबी पसरलेली आहे का रे ? तुझ्या घरी की तू भीक नाही घालू. शकत तुझ्या भक्ताला ..

सहन करते म्हणून सहन करायला लावणारं का ? गप्प बसत राहिले म्हणून गप्प राहायला शिकवलं . हट्ट करायचं कधी जमलच नाही . जे आहे तसं मी स्वीकारलं . अगदी मनाविरुध्द ज्या गोष्टी करायला नाही . पाहिजे त्या ही गोष्टी केल्या . ह्यासाठी का मी जन्म घेतला होता देवा ? ह्यासाठी का मी स्वप्न पाहिली होती काही ? 

देवा सांग रे ? 

तू नेहमी गप्प राहते मी नेहमी बोलते . देवा तू जे सती युगात लिहून ठेवलं आहे ना . ते कलियुगात मॅच तर होतं.
पण सुट नाही होतं रे . 

माणूस जगतो . त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या ईश्चा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि तू त्याचं अर्ध्यावर सोडतो . मानवाला निराश करतोस . असं का रे देवा ? 
असं नको करू देवा .
मानवाची स्वप्न अर्ध्यावर सोडू नकोस . ते पूर्ण करण्याचं बळ त्याला दे . जेणेकरून तो नव्याने आयुष्याची सुरुवात झाली .

ज्या मुला मुलींच एकमेकांवर प्रेम आहे . त्यांना कधीच वेगळं करू नकोस . कारण त्यांना एकमेकांना पासून वेगळ करन म्हणजे जिवंत पणीच नरक यातना भोगायला पाठवण्यासारख आहे रे .

असं म्हणतात जे नशिबात असतं ..तेचं घडत मग देवा जे नशिबात असतं तेच तू का मनात नाही येऊ देत.  का नशिबाचे आणि मनाचे सुर नाही जुळू देत .

देवा मला टीका नाही करायची रे तुझ्यावर . फक्त प्रामाणिक पने विनंती करायची आहे . 

जी मुलं एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात . त्यांना कधीही वेगळ करू नकोस . जे प्रयत्न करतात . त्यांना अपयश देऊ नकोस . 
माणूस हा आशावादी प्राणी आहे रे ..त्याला कधीही निराश करू नकोस.  
दुर्गा मते ..

तुला माझ्या बोलण्याच वाईट वाटलं असेल तर मनापासून माफी मागते . माफ कर मला . आणि माझ्या भावनांचा जरा विचार कर ..
🙏🙏🙏🙏

तुझ अस्तित्व ही नकोय ..

आता थांबून काय फायदा ..
माझी वाट बघण्यात का येतेय तुला मजा ..
मिळेल रे ह्याची तुला फार मोठी सजा ..

वेदना मनाच्या नव्हत्या जाणल्यास कधी ..
मी तुझा विचार करायचे सर्वात आधी ..

पुन्हा  पुन्हा त्याच वाटेवर मिलन व्हायचं .
ज्या ठिकाणी आपलं सतत भांडण व्हायचं .

गैरसमजाच्या वेली अवती भवती पसरायच्या ..
विरहाच्या स्वरात आठवणी ठोके धरायच्या ..

हुंदक्याना मोकळीक द्यायच्या ..

पण गेल्या काही दिवसात हे सारं बंद झालंय ..
माझं तुझ्यावरच प्रेम आठलयं ....
मला आता तुझ अस्तित्व ही माझ्या आयुष्यात नकोय ..
दुर्गा मते

सुवासिनी हळव्या मनाची ..

मी तिला पुन्हा नव्याने भेटलो .
पाहता क्षणी तिच्यावर भाळलो ..

गुलाबाचे फूल तिच्यासाठी नेलेले ..
नकळत तिच्या केसांत मी माळले ..

प्रेमपत्र पहिले लिहिलेले ..
तिने कधीचं नव्हते वाचललेले ..
तिला मी ते आज वाचण्यास दिले ..

शब्द आणि भावना ह्यांनी योग्य सांगड घातली ..
मोगऱ्याच्या मोहक सुंगधात  ही भेट घडली ..

आज ती तेवढीच सुंदर दिसत होती .

25 वर्षा पूर्वी दिसायची त्याहूनही सुंदर बहुधा

ती आज दिसत होती ..

हळव्या मनाची राणी माझी ...

कोणा दुसऱ्याची सुवासिनी म्हणून मला भेटायला आली होती ....

मी  पुन्हा भेटायला येईल ...

हे वचन तिने पाळले ..

मी तिच्यावर केलेल्या प्रेमाचे सार्थक झाले ..
दुर्गा मते


Apr 7, 2022

तुझे नि माझे ..

असे कोणते नाते हे ..
तुझे नि माझे ..
तुझे नि माझे ...

ओढ नात्यात दाटलेली ...

अबोल शब्दांची संगत सजली ...

दोन जीवांची प्रीत रंगली ..

सत्य कहाणी  स्वप्न भासू लागली ..

असे कोणते नाते ..
तुझे नि माझे
तुझे नि माझे ..


डोळ्याआड जाता सखा ..

सखीला त्याच्या राहवेना ..

घायाळ नजरेची व्यथा त्याच्या दिलाला पटेना. .

हळुवार कानी गुंजे स्वर तिच्या प्रितीचे. .

वर्णन करी उडत्या पाखरांचे ..

असे कोणते नाते ..
तुझे नि माझे ..
तुझे नि माझे ..
दुर्गा मते


सुगीचे दिवस आले..

आयुष्यात दुःखच नाही राहीलय काही ...
मनासारखा जोडीदार मिळाला आयुष्याचं सोन झाल

आई वडिलांनी फुलासारखं जपलं ..
दुःख आयुष्यातलं हलकं झालं ..

नियतीने वारंवार वार केले दुःखाचे ..

नशिबाने उधळवून लाविले ओल्या मातीत बीज रुजवले सुखाचे ..


आता खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आले ..

माझ्या आयुष्याचे सार्थक झाले ...


माझ्या नावापुढे नाव त्याचे लागले ..

आयुष्यास ह्या पूर्णत्व लाभले ..

दुर्गा मते ..

एकटीच चालली ..

 अंधाऱ्या वाटेवरून एकटीच मी चालते ..
प्रकाश किरण सोबतीला मागते ...
एकटीच मी चालते...

रात्र ती वैऱ्याची ....
निसटून गेली वीण हाडामासाची ..
सत्व परीक्षा होती ती माझ्या स्त्रित्वाची ..

आज ही मी ज्वालातून चालते ..
आगीतून  पुन्हा जन्म नवा घेते ..
एकटीच मी चालते ...

नियतीने सोडले वाऱ्यावर ..
घाव घातले माझ्या मनावर ..
शितोंडे उडविले चरित्रावर ....
नाही कुणी घातली फुंकर हळव्या वेदनेवर ..

गंध गेलेल्या फुलासम आयुष्य झाले ..
माझीच माणसे मला अनोळखी झाले ..

नात्याची वीण ही निसटून गेली ..
मी ह्या वाटेवरून एकटीच चालली ..
चालतांना प्रकाशाची भीक मागितली ..
दुर्गा मते .

कविता पूर्णतः काल्पनिक आहे माझ्या वैयक्तिक आयुष्याशी संबधित नाही ..ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी ..

कँडल लाईट डिनर ..

कँडल लाईट डिनर .

नभी सजला असेल मंडप चांदण्यांनी ..
काळोखात प्रकाश  दाटला असेल  ज्योतींनी ..

मंद मंद वारा सोबतीस स्वप्नांचा थवा ..

ह्या मनाचा त्या मनाला ठाव लागे नवा ..

भुरभुर उडणारे केस माझे ,  बोलके डोळे तुझे ..

आजानते नाते आपले सुर नवे शोधू पाहते ..

भेट पहिली अनोळखी दोंघाची ..

नयंनाची भाषा उमगली ..अनोळखी राहिली शब्दांची .

तू त्या किनाऱ्यावर मी ह्या किनाऱ्यावर ..

मी स्तब्ध राहिले तुझ्या अपूर्ण शब्दांवर ..

पहिल्या भेटीत तुला मी पाहतच राहिले ..
साथीला माझ्या कँडल लाईट डिनर ही सजले ..

जरी शब्द अपूर्ण राहिले , डोळ्यांनी मन मोकळे ..
आपले फर्स्ट कँडल लाईट डिनर सफल झाले ..
दुर्गा मते


Apr 6, 2022

गोष्ट एका राजा राणीची ..

 राजाला  त्याच्या राणीसाठी वेळच  नसतो ......


दिवसभर बिझी असतो ..रात्र झाली की थकतो ..

राणीसाठी वेळ काढण्याचा खूप प्रयत्न करतो ..
तरीही वेळ देण्यास असमर्थ ठरतो ..

राणी बिचारी वाट पाहून पाहून थकते ..
सजलेल्या सांजेला ही मग दृष्ट लागते ...

सांज ही हळुवार लयास जाते ..
राजाच्या प्रतीक्षेत मग राणी झोपून जाते ..

राजा बिचारा धमून थकून येतो ..
आपल्या प्रतीक्षेत झोपी गेलेल्या राणीला पाहून नाराज होतो ..

तिच्या चेहऱ्यावर पसरेल तेज तिचं त्याच्यावर असलेल्या
प्रेमाचं प्रतीक भासतं ....
राजाला ते त्याच्या जिवापेक्षा प्यार असतं ..

राजा हळुवार तिच्या जवळ जातो .
तिच्या कपाळावर नाजूक किस करतो ..

त्याच्या प्रेमळ स्पर्शाने ती ही मोहरते ..
स्पर्श होता त्याचा त्याला मिठीचे आलिंगन देते ..

दिवसभर वाट बघून थकलेल्या जीवाची तृष्णा मिठते ..
राजा राणीची एकमेकांना समजून घेण्याची पद्धत मला खूपच आवडते...
दुर्गा मते

Apr 5, 2022

अंतरीच्या वेदना.

अंतरीच्या वेदना माझ्या कुणाला दिसेल का ?
त्या वेदनेवर फुंकर  घालनारा पाहुणा ..
जीवनी येईल का ?

मला हसविण्यासाठी मला चीडवण्यासाठी ..
भास सत्यात उतरवण्यासाठी ..
येईल का ? माझ्या स्वप्नातला राजकुमाार ..
जो माझ्या शरीरावर नाही ..
माझ्या मनावर अधिकार गाजवेल..

माझ्या सोबत आयुष्यभर राहील
एक चांगला मित्र म्हणून ..
जिवापाड प्रेम करेल एक मित्र म्हणून .
निखळ नातं असेल त्याच आणि माझं निस्वार्थी ..
पने जगणं असेल माझ फक्त त्याच्यासाठी ..

दुर्गा मते


सावली निराशेची

येशील तू परत

ह्या आशेवर मी जगत आहे .

हसरा चेहरा दिसेल तुझा कधीतरी ..

त्या दिवसाची मी वाट पाहत आहे ..

विरहाच्या वळणावर मी थांबली आहे ..

त्याच वळणावर प्रेमाचा स्पर्श अनुभवण्याची ..

तळमळ आहे ....

निशब्द निसर्गाला न्याहाळत आहे .

मनाची हलचल आतल्या आतच दाबत आहे ..

कातरवेळी ह्या पुन्हा भावना दाटून येत आहे. 

निद्रस्त झालेल्या आठवणीं नव्याने जागी होत आहे ..

मनी हूर हूर तू येण्याची ..

आस जीवाला तू नव्याने मिठीत घेण्याची ..

मिठीत  घेता प्रेमाची कबुली देण्याची ..

जाळी ही गोड भासांची ..

कोलमडून जाई कळी माझ्या श्र्वांसांची ..

किमयाच वेगळी ही आभासी जगाची ..

पदरी पडे सावली निराशेची .
दुर्गा मते


Apr 4, 2022

सांग ना

आपल्या नात्याचा शेवट व्हावा ..
हे माझ्या ध्यानी - मनी ही नव्हतं ...
तरीही  माझ्यासोबत एंगेज राहण तुला मान्य नव्हतं ..
सांग ना ..?
एवढी कमकुवत होती का रे ? आपली मैत्री

माझ्याशिवाय पान ही हालत नव्हत ..


माझ्या शिवाय आयुष्य तुझ अपूर्ण वाटतं होतं .


माझं लग्न ठरलं आणि तुला मला इग्नोर करणं सोपं वाटलं .


सांग ना ..?


इग्नोर हा ऑप्शन आपल्या मैत्रीला परफेक्ट ठरला .

आपली मैत्री खूप छान होती .
मान्य आहे का ती केवळ मैत्रीचं होती ..
छे छे ...
ती ना मैत्री होती ना प्रेम होत.
ती तर जगातील सर्वात सुंदर नात्याची विण होती .
साक्ष देत होती नव्याने जन्मलेल्या राधा कृष्णाच्या नात्याची ...

सांग ना ? हे पटतय का तुला ??


मी दुसऱ्याची झाले ..


म्हणून ही विण तुटावी ,


एवढी कमकुवत होती का रे ही विण


सांग ना ...
दुर्गा मते


Apr 3, 2022

अभिमान वाटे मला ...

रुते पायात काटे ..
स्वप्न हे उरात दाटे .
मजला अभिमान वाटे ...

भेगाळलेल्या भिंती ..
पाहून मजला हसती ..
आभाळ भरून येता ..
थेंब  थुई थुई नाचती...

गार वारा स्पर्शून जाई ..
अंधाऱ्या खोलीत माझ्या .
बडबड गीत गाई ...

चांदणे सोबतीला येई ..
अंधाराला 

प्रकाशाची साथ देई .
झोपडीत माझ्या ज्योत नवी जन्म घेई ...

परिस्थितिचा अभिमान वाटे मला ..
सांगू मी कुणा कुणाला ..
काही कले मला ..
दुर्गा मते

संवाद संपला ..

वारंवार अविश्वास दाखवत होते तुझ्यावर .
तू कधीचं अविश्वास दाखवला नाहीस माझ्यावर .

मी शेवट पर्यंत प्रामाणिक राहिले ..
तू मात्र तुझ्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू दाखवले ..

मी इमोशनल तर तू प्रॅक्टीकल ..
त्यामुळेच नाही राहिली नात्याची ही विण सेंसिबल ..

तुला ताणून धरन्याची सवय ...
मला नेहमीच तुला मनवण्याची ..
काळजी होती ना आपल्या नात्याची ..
त्यामुळेचं जडली  तुला सवय मला गृहीत धरण्याची ..

जी चिंधड्या चिंधड्या उडवत होती माझ्या स्वाभिमानाची .

मी दाखवली मग मक्तेदारी अविश्वासाची ..

त्याच मक्तेदारिने धागा तोडला तुझ्या माझ्या मैत्रीचा .

शेवट झाला एका सुंदर नात्याचा ..

सुरू झाला प्रवास जिवंतपणीच
मरण यातना  भोगण्याचा ...
सवांद संपला दोन मनाचा ..


Apr 2, 2022

तुझ्या भेटीत ..

समुद्राच्या लाटेत  वाट बघण सामावल ..
सख्या तुझ्या भेटीत आयुष्याचं सुख गवसल ..

तुझी साथ लाभली ..
जशी धरणीला आकाशाची  किनार मिळाली ..

मुरगळेल्या फुलाला ही गंध आला .
तुझ्या भेटीत सारा आसमंत गहिवरला ..

हरवलेली स्वप्न पुन्हा नव्याने भेटली ..
वाळवंट आयुष्य होईल भीती मनात होती दाटली .
तुझ्या येण्याने  ती अनामिक भीती ही लयास गेली ..

दुर्गा मते

Apr 1, 2022

नवं वर्षाचे स्वागत करू..

सरले मराठी वर्ष

मनी विचार ठेवू आदर्श ..

सुरू होणार नव वर्षाचे नवे पर्व ..

चेहऱ्यावर फुलू देऊ हर्ष ..

जीवनात येतील चड उतार ..
नको घेऊ माणसा तू माघार ..
आजच्या दिवशी मनी रुजवू हाच विचार ..
जगणे आपले ठेवू ..आदर्श सुविचार ..

द्वेष रागाला dustbin दाखवू .
सभोवताली प्रेमाचे मळे फुलवू ..
माणुसकीची ज्योत पेटवू ..
आनंदाने नव वर्षाचे स्वागत करू .

रुसलेल्या दिलाला आज मनवू ..
प्रेमाचा- आपुलकीचा हात देऊ ..
नात्यातील गोडवा जपून ठेवू ..
वीण अतूट नात्यांची जपण्याची शपथ घेऊ ..
नव वर्षाचे स्वागत करू ..

मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ..
In advance ..💐💐💐💐🎂🎂🎂🍫🍫🍫🌹🌹🥰🥰😘😘

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...