सजले मी तुझ्यासाठी ..
राजा तुझ्या सुखासाठी ..
घामात माखले मी ...
राजा तुझ्या संसारासाठी ..
चिमणीचा खोपा , जिवापलिकडे जपला ..
लक्ष्मीच्या पावलांनी भाग्योदय झाला ..
तुझ्या संसाराचा फुलोरा फुलला ....
तुझ्यासाठी देह मी झिजविला ..
सांज वेळी थकूनही सजायचे ...
तुझ्यासाठी मोहरुन यायचे ..
गुलाबाच्या फुलापरी सुंदर शोभून दिसायचे ..
सांज श्रृंगार तुझ्यासाठी करायचे....
लाजळूचे झाड
तुझ्या स्पर्शानी बहरले ..
तुझ्या सानिध्यात मनमोकळे जगू लागले ..
आकाशालाही त्याचे नवलं वाटले ..
राजा तुझ्यामुळे मला हे सुगीचे दिवस दिसले ..
तुझ्यासाठी आयुष्य माझे पणाला लावले ..
दुर्गा मते ..
No comments:
Post a Comment
Comments plz.