तुझी माझी भेट,
चहाच्या टपरीवर व्हावी ..
मनसोक्त मग गप्पा मारू ..
एकमेकांना समजून घेऊ ...
सुख दुःखाच्या गोष्टी करू ,
एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून ..
वेगळ्याच विश्वात स्वार होऊ ..
तू माझं हळुवार लाजन ..
डोळ्यांत तुझ्या साचवाव ..
त्याला बघून मग मी तुझ्यात हरवून जावं ..
कडक चहा चा एक थेंब ,
माझ्या हातावर सांडावा ..
त्याला सहवास ..
तुझ्या प्रेमळ फुंक रेचा मिळावा ..
अनोखा भेटीचा क्षण तो ..
आपण साजरी करावा ..
अविस्मरणीय क्षण तो ,
चहाच्या टपरीवर च घडावा ..
Written by - durga mate