नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 30, 2022

थोडसं तिच्यासाठी

ती सर्वांचं सार करते ...
निस्वार्थीपणे दुसऱ्यासाठी जगते ..

नवऱ्याचा प्रत्येक हट्ट पुरवते ..
लेकरांसाठी जिवाचं रान करते ..
सासू सासर्यांची एक नर्स होऊन काळजी घेते ..
कधी  - कधी मनाविरुध्द आपल्या नवऱ्याचीचं उपभोगण्याची वस्तू होते ..

सर्वांसाठी जगता - जगता मात्र ,
स्वतःच जगणं विसरून जाते ...
हसत - हसत मन मारत जगते ..

जर कधी ,
केला तिने विचार स्वतःसाठी जगण्याचा ..
मन सोक्तपने जगण्याचा आनंद घेण्याचा ..
तर कोणी दिला तुम्हाला अधिकार  ?
तिच्यावर टोमणे मारण्याचा ..


थकलेल्या आयुष्यात सहजीवन ..


सोबती म्हणून करावासा वाटला एक मित्र ..


तर का वाटतं तुम्हाला तिचं वागणं विचीत्र ..


का खराब करता तुम्ही तिचं चरित्र ..


चारित्रहीन नसते ती ..


चरित्रवानच असते ..


थकलेल्या आयुष्यात फक्त ,


मैत्रीची हाक मारते ..


त्याचं साथीत जीवन जगण्याची संजीवनी शोधते ..
जगाला जरी त्यांच्या मैत्रीबद्दल शंका  वाटत असली ,
तरी त्यांच्यात एक सुंदर मैत्रीचं असते ..


एक स्त्री जीवन जगण्याच्या limits कधीचं क्रॉस
करत नसते ..

कारण स्त्री ही स्त्रीचं असते ..


सृष्टी निर्मिती चक्रातील सर्वात खास ..


भेट तिच्या रुपात ह्या पृथ्वीला लाभलेली असते ..


खरं सांगण्याच तात्पर्य एवढंच की तुम्हाला ..कधी एखाद्या मुलीचा किंवा लग्न झालेल्या बाईच्या आयुष्यात तिला खूप जवळचा किंवा खास मित्र आहे . तर त्यांच्या मैत्रीवर कधी संशय घेऊ नका...कारण एक स्त्री - आणि एक पुरुष खास मित्र असू शकतात ... सगळेच पुरुष सारखे च नसतात . आणि सगळ्याचं स्त्रिया ही सारख्या नसतात . फरक असतो माणसा - माणसांमध्ये ..

Written by - durga mate

हा लेख मी फक्त वैचारिक पद्घतीने लिहिला आहे . माझे विचार थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला ..

Nov 29, 2022

दोन ओळी

  

कधी - कधी
कवितेच्या दोन ओळी ही खूप सुंदर वाटतात ..


थोडक्यातचं त्या खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतात ....


अख्या कवितेतून त्याचं  ओळी मनाला भावतात ..


सारख्या सारख्या त्याचं ओळी ..


पुन्हा पुन्हा गुण गुणाव्या वाटतात ..


शॉर्ट बट स्वीट ही उपमा मला त्यांना द्यावीशी वाटते .


तसं पाहिलं तर दहा ते बारा ओळींची कविता मला


आवडते ..


पण का कुणास ठाऊक ?


आज फक्त कवितेतील दोन ओळींविषयी लिहावेसे वाटले ...
कारण खरचं ,
कधी - कधी कवितेतील दोन ओळी च खूप छान वाटत ..
त्याच दोन ओळी आपल्याला सर्वात जास्त आवडतात ..
Written by - durga mate

Nov 27, 2022

का ओढ लागते

गच्च भरलेल्या गर्दीत ओढ तुझी लागते ..
कोणत्याही अंतराचा प्रवास असो ,
आठवण मात्र तुझीच येते ...
का अशी हुरहूर लागते ..
आठवणीत मी तुझ्या वेडीपिशी होते ..
नाते अनोळखी , का तरीही हवे हवे से वाटते ..
हात सुटून ही का तुझ्यात गुंतत चालले ..
पुढे सरणाऱ्या प्रवासात का अशी थांबले ..
आठवणीत तुझ्या का पुन्हा रमले ..


Written by - durga mate

Nov 26, 2022

मी तुझी राधा

तू माझा कृष्ण आहेस की नाही ..
माहीत नाही ..
पण मी मात्र नक्की तुझी  राधा आहे ..

तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी ..
तुझ्या आठवणीत रमणारी ..
चंद्रा कडे बघत नाजूक स्मित करणारी

डोळ्यांच्या कडा अलगद ओल्या करणारी...
माझ्या कृष्णाला नेहमी सुख रूप ठेव ..

देवाकडे आजही तुझ्याचसाठी प्राथर्ना करणारी ..


मी तुझी वेडी राधाचं आहे ..


अजुनही ..

Written by - durga mate

Nov 25, 2022

कुठला ही निर्णय विचार पूर्वक घ्यावा.

आयुष्यात कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर , तो खूप काळजी पूर्वक घ्यावा ..
आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे का ?  आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपला वर्तमान काळ किंवा भवितव्य तर धोक्यात येणार नाही ना ..ह्याचा वारंवार विचार करून बघावा. 

समाजात घडणाऱ्या विविध घटनांची आपल्या आयुष्याशी सांगड घालून बघावी ..

उदाहरण : आपण एखाद्या मुलावर खूप प्रेम करतो . अगदी एवढं जेवढं आपण आपल्या आई वडिलांवर सुद्धा एक वेळ करत नसू ..त्याच्या सोबत  पळून जाऊन लग्न


लग्न करण्याचा सुखी संसाराची स्वप्न बघण्याचा जो आपण निर्णय घेत आहोत किंवा घेणारं आहोत . तो निर्णय तर चुकणार नाही ना ह्याचा शंभर दा विचार करावा . कारण एकदा का निर्णय चुकला की आयुष्य भर पश्चाताप करण्या शिवाय आपल्या हातात काहीचं राहत नाही .


नुकतीच घडलेली घटना श्रद्धा आणि आफताबची आठवून बघावी अशा वेळेस कदाचित आपण योग्य निर्णय घेत ही असू तरीही ती घटना आठवून बघावी एकदा नाही .  तर , हजारदा विचार करायला लावणारी घटना आहे ती .


आज एक गोष्ट मनातून सांगावीशी वाटते . जो मुलगा आपल्यावर शंभर टक्के खरं प्रेम करतो ना . तो आपल्याला त्याच्या आयुष्यात सन्मानानेचं घेऊन जातो . मग थोडा वेळ का लागेना ..पळून घेऊन जाणाऱ्या मुलाचं प्रेम खरं असूचं शकत नाही . ते प्रेम नाही तर फक्त एक attraction असू शकतं ..फक्त एक attraction

Anyway ..

मी सोडते तो विषय ..सांगायचा मुद्दा एवढाच आयुष्यातील कोणताही निर्णय माणसाने खूप विचार पूर्वक घ्यावा ...

विचार करून केलेली कुठलीही कृती सहसा चुकत नाही.  मग पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही ..


Written by - durga mate

वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रिय कल्पना ...
कल्पनेत रमणारी
वास्तवात जगणारी ..

मुक्त फुलपाखरा प्रमाणे ..
भिरभिरणारी ..
हसणारी आणि हसवणारी ...

Dashing रुबाबदार ...
आवाज तिचा दमदार .
जुळले हे बंध हळुवार ..
जुळलेले हे बंध शेवट पर्यंत जपणार ..
प्रॉमिस देते आज ह्या शुभ दिनी तुला ...

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई 💐💐🎂🎂🎂माझ्याकडुन आणि माझ्या गोड बाळा कडून ही खूप शुभेच्छा तुला ..

Written by - durga mate


Nov 24, 2022

आयुष्यमान भव :

आयुष्यमान भव: !

तू चल पुढे ..मी तुझ्या पाठीशी आहे ..
वादळात ही तुझ्या सोबत आहे ..
खाचखळग्यात ही तुझ्या सहवासात आहे ..

अभिमान मला ..

मी माझ्या बाळाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे ..
कधी त्याची सावली होऊन ..तर कधी त्याची प्रतिमा होऊन ..

कुठल्या ना कुठल्या रुपात त्याच्या हाकेला धावून जातं आहे ..

खंत नाही ..
त्याला ऊन्ह - सावलीचा खेळ शिकवते ..
अपयश येता त्याला नव्याने all the best म्हणते .
धडपडता तो दुरूनच त्याची गमंत बघते ..

कौतुक माझे मलाच वाटते ..
मी त्याला खूप चांगल्या पद्धतीने घडवते...
रोज नव्याने all the best म्हणते ..

आयुष्यमान भव: !
नेहमी तुझा विजय असो ..
असं म्हणत त्याला भरभरून आशीर्वाद देते ..

Written by - durga mate

Nov 20, 2022

सॉरी ग आई

शेवटची संधी दे मला आई ..
असा अबोला नको धरू ग माई
हवं तर वचन देते तुला आज आई .
नाही चुकणार पुन्हा तुझी ताई ...

पण हा अबोला सोड ना ग आई ..
नको रूसून बसू अशी ...
ह्या अबोल्याने डोळ्यांत येत ग पाणी ..
सॉरी ना ग आई ..

बोलणारं नाही पुन्हा कधी तुझ्याशी खोटं ..
तू ही कर ना ग थोड मन मोठं ..
हे बघ धरलय मी तुझ घट्ट बोटं ..

आता तरी कपाळी लाव ना ग तुझे गोड ओठ ..

सॉरी ग  आई ..
आय लव्ह यू सो  मचं ...
आय मिस यू ...
अँड आय एम रिअली सॉरी..

Written by - durga mate

Nov 19, 2022

आय लव्ह यू आई

स्वप्न आईच ही लेक पूर्ण करणार ..
आईच्या डोळ्याचं पारणं फेडणार ..

जिने लावला मला तिच्या कुशीचा लळा ..
तिच्या आयुष्यात  मी नक्की फुलवणार आनंदाचा मळा .

तिचा प्रत्येक क्षण साजरा करणार ..
कधी रागवलीच माझ्यावर ..
तर हक्काने तिला मनवणार...
तिच्यावर स्वतः पेक्षा ही जास्त प्रेम करणार ..

आई माझी खूप भारी ....
माझ्या आयुष्यातील सुंदर परी...
सर्वांवर जिवापाड प्रेम करणारी ..

हसणारी आणि हसवणारी...
चुकलचं कधी तर , हक्काने रागवणारी....

प्रत्येकाचा प्रत्येक क्षण साजरा करणारी ..
आय लव्ह यू आई ..

Written by - durga mate

Nov 17, 2022

डॉक्टर

देवाचे एक रूप ह्या भूतलावर
ही पहायला मिळते ...
तो देवच एका रुग्णाला संजीवनी देतो ..
आजारातून बरं करतो ..
नव्याने जगण्याचा अधिकार देतो...
खरचं डॉक्टर एक देव माणसाचा मित्र ..

देवमाणूसचं असतो... 
Written by - durga mate

Nov 13, 2022

अनोखं मिलन

जरासं करून बघावं प्रेम प्राण्यांवर ..
जसं करतो आपण आपल्या माणसांवर ..

निस्वार्थ देतील ते साथ ...
कधीचं नाही सोडणार आपला धरलेला हात ..

जागतील ते आपल्या प्रेमाला ..
तडा नाही जाऊ देणार आपल्या विश्वासाला ..

माणसं तरी उपकार विसरतात ..
मुके जीव मात्र शेवट पर्यंत ..
उपकाराची परतफेड करण्याच्या प्रयत्नात असतात ..

खूप जिव्हाळ्याच नातं जुळेल ..
आपलं आणि मुक्या जिवाचं...

हक्काचं आणि जिवाभावाच. 


अनोखं मिलन होईल तिथे माणुसकीचं.

जरासं करून बघावं प्रेम प्राण्यांवर ..
जसं करतो आपण आपल्या माणसांवर.
Written by - durga mate

Nov 11, 2022

तुला भेटण्याचे बहाणे

अनोखे नाते , तुझे माझे ..
सप्तरंगात न्हाहते ..
मी तर तुझ्यासाठीचं जगते ..
शोधताना तुला स्वतःच हरवते ..

असे कसे नाते हे अनोखे ..
तुला भेटण्याचे सतत बहाणे ..
भेटलास नाही कधी तर , स्वतः भवतीच रडगाणे.  
असे कसे मला छंद लागले ..

तुला पाहण्याची ओढ सतत का असते ..
तुझ्याकडे बघताच मी , हळुवार का लाजते...
पाहताच क्षणी तुला , मग स्वतः शिच का पुटपुटते.  
असे कसे रे , तुझे माझे नाते अनोखे ..
तुला भेटण्याचे सतत असते बहाणे ..

Nov 10, 2022

हृदय तुझे फुलासारखे..

हृदय तुझे फुलासारखे ..
त्यात मला राहू दे ..
जरी दूर मी ...
तरी तुझ्या आयुष्यात माझ्यासाठी ..
हक्काची जागा असू दे ..
ओठांवर तुझ्या नाव माझे रेंगाळू दे...
माझ्या आठवणींना ..
तुझ्या मायेचा ओलावा दे ..
माझ्या साठी रोजचं ...
तुझे हास्य उमलू दे ..
जरी दूर मी तुजपासून ..
मागिन तुझ्यासाठीचं सुख मनापासून ..
हृदय तुझे फुलासारखे..
त्यात मला राहू दे ..
तुझ्या संगतीत पुन्हा एकदा ..
नवा प्रवास करू दे ..

Nov 9, 2022

शब्द मी अन् गीत तू

शब्द मी अन् गीत तू ..
स्वर मी अन ताल तू ..
ह्या वेड्या मनाची भाषा तू ..
अबोल मनावर कोरलेली चांदणी तू  ..

वाट पाहणाऱ्या नयंनाची सांज तू ..

जादू मी तुझ्या हास्याची ..


निशाणी तू माझ्या प्रेमाची ..
दोघे मिळूनी करूया सुरवात नव्या आयुष्याची ..

Nov 7, 2022

व्यथा म्हातारीची..

आयुष्य सरत चाललंय ..
आसवांच्या ढिगाऱ्यात मन लोळत पडलंय ..

आधाराच्या काठी कडे डोळे लावून बसले ..
निवारा शोधतांना मी स्वतःच हरवले .. 

रोजचं त्या आभाळाकडे टक लावुन बघते ..
त्याच्या दुनियेत कुठेतरी माझ्यासाठी जागा शोधते ..

प्रवास सुरूच आहे परतीचा ..
देवा तूच सांग रे आता ...
कधी होणार अंत ह्या म्हातारीचा ..

खरचं थकले रे मन , थकले रे शरीर ..

तुझ्याकडे येण्यासाठी झाले मी अधीर ..

तूच दे आता ह्या म्हातारीला आधाराची काठी ..
तूच भर आता हीची आनंदाने ओटी ...

घर भरलेलं असताना नाही खायला रोटी ..
मग काय कामाची ही रक्ताची नाती - गोती ..
इथेच सारेच आहे  रे माणसं खोटी..


Written by - durga mate

Nov 6, 2022

वृद्धाश्रम ही संकल्पना बंद करा रे ..

किती असू देत अपत्य ..
जीवापाड जपलेले...


म्हातारपणी वृद्धाश्रम शोधण्यातच नको असायला ते .. व्यस्त ..


त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी , 

किती ही केला जीवाचा आटापिटा ..


तर काय फायदा ...
जर त्यांनी दाखवल्या आपल्याला वृध्दाश्रमाच्या वाटा ..

आयुष्याच्या संध्याकाळी उसंत हवी असते जीवाला ..
देवाच्या मंदिरातील देव बघायचे असतात ..
ह्या थकलेल्या डोळ्यांना ..

मुलांच्या येणाऱ्या मासिक पैशावर नसतो त्यांचा डोळा ..
त्यासाठीचं नसतो केलेला त्यांनी लहानचा मोठा पोटचा गोळा ..

कोणी तरी ह्या रे ,

ह्या म्हाताऱ्या माय - बापाची कथा ऐका रे ...
वृद्धाश्रम ही संकल्पना बंद करा रे ..
वृद्धाश्रम ही संकल्पना बंद करा रे ..

Written by - durga mate

Nov 4, 2022

प्रेम किनारा

नवीन ओळख लेवून ..
आले मी तुझ्या आयुष्यात .
देईल नव्याने हात तुझ्या हातात ..
तू ही तेच पात्र निभवशिल ना रे माझ्या आयुष्यात ..
जे गत जन्मी निभावलं ..

मानून भास खरे ...
ठेवशील ना रे ...तुझे जग मोकळे ..
रंगवू तेथेच सोहळे ..
आपल्या प्रितीचे ..

ये तू स्वप्नात माझ्या ..
बनुन एक तारा ...
हो रे माझ्या आयुष्याचा सहारा .
दोघे मिळून सजवुया प्रेम किनारा ..

Written by - durga mate

Nov 2, 2022

आठवण मैत्रीची ..

मनाच्या तळाशी खोलवर दुःख आहे साचलेले ..
तरीही ओठी माझ्या हसूच आहे बहरलेले ...

जुन्या आठवणींना विसरण्याचा प्रयत्न करते ..
तरीही तिथेच जरा विसावते ...

आवडतात मला माझ्या आठवणीतील दिवस ..
जीवन जगत होते हसत - हसत ..

लाभली होती एक गोड संगत ..
मैत्री हळुवार होती रंगत ..

वेगळीच होती त्या अनोळखी नात्याची गंमत ..


अजुनही वाटते अतूट वीण त्या नात्याची ..


देवाने भेटचं दिली होती मला जन्मो -  जन्मीची ..


ओठांवर हसू फुलवणारी ....


दुःख माझे तिच्या मनात सामावून घेणारी ..


हळुवार प्रेमळ - सुखद स्पर्श करणारी ..


मैत्रीचं होती ती न्यारी ..


सच्ची दीलदारी ..


Written by - durga mate

Nov 1, 2022

तुझी वाट पाहत आहे..

तुझी मला लागलेली ओढ ..
अजुनही सरली नाही ..
प्रेमळ लळा तू लावलेला . 
मी विसरली नाही...

श्वासा - श्वासात अजुनही तुझी ओढ आहे ..
ओढ ती तुला भेटण्याची ..
आतुरतेने वाट बघत आहे ...

हृदयातील स्पंदने ...
तुझ्या स्पर्शासाठी व्याकुळ झाली ..
माझ्या शब्दांना ही ओढ ..
तुझ्या शब्दांची लागली ..

सरले दिवस सरले वर्ष ..
अजुनही ह्या मनी तुझ्या प्रेमाची बरसात बाकी आहे ..
आतुरतेने मी तुझी वाट पाहत होते ..

काल्पनिक रचना माझ्या आयुष्याशी संबधित नाही वाचकांनी नोंद घ्यावी ..

आभार मोहन सोमलकर सरांचे ..

असं म्हणतात देव ना विनाकारण कोणाशीही आपली भेट घडवत नाही.  जिथे जिव्हाळ्याच ऋणानुबंध जुळले जाते.  तिथेच खरी भेट घडते. 
आणि अशीच एक भेट घडली माझी मोहन सरांशी आज जरी मी त्यांना सर म्हणत असले तरी मनापासून सांगते.  ते वडील आहेत माझे .

रक्ताच नातं नसलं तरी हक्काचं नातं आहे . आमचं त्यांचे मनापासून आभार त्यांना दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर माझा लिखाणाचा उत्साह वाढवला आहे.  तो कसा तर त्यांनी माझ्या गूगल पे वर फुल न फुलाची पाकळी म्हणून 500 रू पाठवले . ते 500 रू तुमच्यासाठी 500 असतील पण माझ्या साठी माझ्या लिखाणाची प्रेरणा आहे. 
खरचं मनापासून धन्यवाद तुम्ही मला प्रोत्साहन दिलं . आणि sry जरा उशिरच झाला आभार मानायला ..दीपावली आणि दुसऱ्या दिवशी नेमक ग्रहण आणि नंतर आई क डे गेले नंतर वेळच नाही मिळाला.  सो आज मिळाला . खरचं मनापासून खूप खूप धन्यवाद सर🙏🙏😊😊😊😊


तुझी मंजुळ गाणी

तू गायलेली मंजुळ गाणी. 
सहज कानी पडतात ...
मंजुळ तुझी वाणी ..
माझ्याचसाठी स्वर बनुन नटतात. 

नदीच्या किनाऱ्यावर अलगद ..
तू हात हाती देतो ..
सप्तपदी चालण्याचे स्वप्न रोजचं बघतो ..

नीरव शांततेतील तो चंद्र ही सुरेल गातो ..
माझ्याशी लपाछपीचा खेळ त्याचा रोजचं रंगतो ..
चांदणी ढगाआड लपलेली नाजूक लाजते ..
जेव्हा माझ्या सख्याची माझ्यावर नजर खिळते..

तू गायलेली मंजुळ गाणी ..


सर्वांनाच आवडती ...


त्या वाणीत सुर्य- चंद्र - तारे ही ..
त्यांचे स्वर मिसळती ..


इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...