नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 30, 2021

प्रेम बंधन भाग - 14

नित्या आणि राहुलने त्यांचं नातं हळदी समारंभा पर्यंत लपवून ठेवल होत . पण नंतर त्यांची खूपच मस्ती सुरू झाली . लोकांना डाऊट यायला लागला . हा नक्की मित्र आहे  कोणाचा ?  नवऱ्या  मुलाचा की नवऱ्या मुलीचा . 
लोकांना अशी शंका यायला लागली . हे लक्षात येताच राहुलने तिथून पल्टी खाल्ली . 
हळदी समारंभानंतर होणारे सर्व विधी व्यवस्थित रित्या पार पडले . 
" किती वेळ झाला राहुलला जाऊन अजुन कसा परत आला नाही . " ह्या विचारातच नित्या अडकली होती . 
आज तर तिला तिचा  मोबाईल बघायला  वेळच नव्हत . 
तिच्या सोबत असणाऱ्या तिच्या करवल्या तिला त्यांच्या होणाऱ्या जिजूच्या नावाने खूपच चिडवत होत्या . ती त्यांच्यात मिसलेली जरी वाटत होती. तरी ती राहुलच्याच विचारत गुंतलेली होती .
" ह्या नवीन शहरात तो कुठे गेला असेल ? इथे माझ्याशिवाय त्याला दुसर कोणीही ओळखत नाही . "
तिला काय करावं काहीच सुचत नव्हतं . 
तेवढ्यात वैशू , तिच्या मैत्रिणीच्या मदतीने तिचा मोबाईल मिळवते . आणि बाजूला जाऊन त्याला कॉल करते . 
" कुठे आहेस तू ? "
" आहे की इथेच . तुझ्या डोक्यावर अक्षदा टाकल्याशिवाय कोल्हापूरला परत नाही जाणार . "
" जेवलास का ? "
" कुठे जेवणार ? "
" ये मग लवकर सोबत जेऊ . तू येईपर्यंत मी थांबते जेवायची . "
" खर की काय ? तुझ्या डांबरठ करवल्या सोडतील का तुला ? "
" हो सोडतील तू ये लवकर मी वाट बघतेय . "
" ओके आलोच बघ . "
" कुठे आलास ? "
" तू मागे वळून तर बघ . "
ती लगेच मागे वळून बघते . आणि राहुल तिच्यासमोर उभा असतो . आता नित्या तर खूपच छान दिसत होती .
राहुलचा बीपी हाय होऊन त्याला अटॅक यायचा तेवढा बाकी राहिला होता .
आंबडा बांधलेला त्यावर पांढरा शुभ्र गजरा माळलेला
 डोळ्यात काजळ , पायात पैंजण , ओंठावर लाली ,
पिवळ्या रंगाची जरीची साडी त्यात शोभून दिसत होती .
नीत्याराणी ...एकच नंबर ...
ते दोघेही तिच्या रूम मध्ये जातात . तोपर्यंत वैशू त्यांच्यासाठी जेवण आणायला जाते . 
ती एवढी सुंदर दिसत होती की कुठल्याही पुरुषाचा तोल जाईल . 
ते दोघेच रूममध्ये  म्हंटल्यावर काही पहायचं कामचं नाही . कोणी येईल म्हणून दरवाजा बंद करून बसतात. 
राहुल एकसारखं तिच्याकडे बघत असतो . त्याची नजर काही केल्या तिच्यावरून हटेना . त्याची त्या  नजरेत तिला जरा अवघडल्यासारख  वाटत होत . 
ती त्यांच्या नजरेसमोरून दूर जायचं म्हणून खिडकीपाशी जाऊन उभी राहते . 
तो ही तीच्या पाठोपाठ जातो . तिचे दोन्ही हात खिडकीवर विसावलेले असतात . विसावलेले तिचे ते दोन हात आपल्या हातात घेत . तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता . 
त्याच्या स्पर्शात अप्रामाणिकपना किंवा परकेपणा नव्हता  . त्यामुळे तिला त्याचा तो स्पर्श हवा हवासा वाटत होता . तो तिच्या खूपच जवळ आला होता . त्याच्यातील अंतर आज तो मिटवण्याचा प्रयत्न करत होता . त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवन्यासाठी आसुसलेले होते . त्या एका क्षणासाठी ते कोण आहेत एकमेकांचे . त्याचे नेमके नाते काय ? हे ते पूर्णपणे विसरून गेले होते . तिलाही त्याने आपल्याला दिलेल्या आपलेपणा हवा हवासा वाटत होता .
त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकणारच तेवढ्यात दरवाजावर कोणीतरी टिक टिक वाजवत . 
तो जरा आतमध्ये जाऊन लपून बसतो . नित्या दरवाजा ओपन करते . बघते तर वैशूने त्या दोघांसाठी जेवण आणालेले असते . 
" वैशू तू , मला वाटलं दुसर कोणी आलं ? थॅन्क्स हा जेवण आणलं स त्यासाठी . "
" थॅन्क्स काय ? मैत्रिणीचा एवढाही अधिकार नाही का?"
तिच्या त्या एका शब्दाने तिच्यामध्ये धीर येतो . वैशू तिथून निघून जाते . ती राहुलला आवाज देते . ते दोघेही मस्त जेवून घेतात . 
नंतर तो झोपण्यासाठी बाहेर जातो . ती ही लगेच झोपी जाते .
ती झोपण्याचा खूप प्रयत्न करत होती . पण तिला काही झोप येत नव्हती . एक तासापूर्वी घडलेला सारा प्रकार पुन्हा पुन्हा आठवत होता . आज आपण असं कस आपलं सर्व स्व राहुलला अर्पणार होतो . तिला तिचीच चीड यायला लागली होती . पण आज तिला बोलून दाखवण्याची भीती होती . कारण तिने जर बोलून दाखवलं असतं तर राहुल खूप hurt झाला असता .
      
     तिकडे राहुलची ही तीच गत झाली होती . त्याच्या डोळ्यांसमोर सतत नित्याचा चेहरा येत होता . आणि आज आपला असा कसा तोल गेला . काय विचार करत असेल ती आपल्याबद्दल हाच हा ना शेवटी पुरुष ते पुरुषच . सगळे एकाच जातीचे असतात .
आपण आज असं नव्हत वागायला पाहिजे . चूक केली आपण खूप मोठी . असं म्हणत तो स्वतःला दोष देत होता . दोघानाही काही केल्या झोप येत नव्हती . 
मग त्यांनी केलं प्रतीलीली ओपन आणि करायला लागले tyipe .....

राहुल ची पोस्ट ...

आज पिवळ्या रंगाच्या साडीत ती एकदम टवका दिसत होती , काही केल्या तोल सावरलाच नाही . तोल सावरता आला नाही . पण मनात अपवित्रता नव्हती हे 💯 
होत ते फक्त प्रेम निरागस भावना . क्रूरता कुठेच नाही .

ती त्याच्या ह्या पोस्ट ला रिप्लाय देते .
" All fair love and war "
आता तिचा हा रिप्लाय वाचून त्याच्या जीवात जीव आलेला असतो . 

ती ही एक पोस्ट करते . 
 कैसी भी मेरी किस्मत है ।
जहा मेरा प्यार है ।।
वहा तो मेरा सिर्फ नाम है ।
सासे तो कहीं और है ।।
 
तिच्या ह्या पोस्ट ला काय रिप्लाय द्यावा त्याला काहीच सुचेना . 
त्याने फक्त " वेरी नाइस " 👌👌👌👌❣️❣️❣️
म्हणून रिप्लाय दिला . 

तिच्याही जीवात जीव आला . ते दोघेही मग निवांत झोपी गेले . दुसऱ्या दिवशी दुपारचं लग्न होतं . त्याच्या आणि तिची गाठभेट झालीच नाही . 
ती आज खूप छान दिसत होती . तिची आज एकच  इच्छा होती . मला ह्या गेट अप मध्ये सर्वात आधी राहुलने बघावं . 
ती आता मेक अप रूम मध्ये एकटीच होती . ती लगेच राहुल ला कॉल करते ." राहुल तू ये इकडे मेक अप रूम मध्ये . माझी इच्छा आहे तू आज मला सगळ्यात आधी बघावं . "
तो तिला नाहीच म्हणतो . पण ती हट्टाला च पेटलेली असते . तो तिला परत नकोच म्हणतो , " मी तिकडे आल्यानंतर माझा तोल गेला तर , त्यापेक्षा नकोच."

" जाऊ दे तोल पण तू ये . "
" अगं असं कसं "
" ये ना प्लीज मी शरीराने दुसऱ्याची होणार आहे . मनाने फक्त तुझीच आहे . आणि तुझीच राहणार . "

" ओके येतो ." असं म्हणत तो तिच्या मेक अप रूम मध्ये जातो . 
ती खूपच छान दिसत होती . ते दोघेही सेल्फी काढतात .
तो त्याचे ओठ अलगद तिच्या कपाळावर टेकवत तिला किस करतो . आणि तिथून निघून जाण्यापूर्वी त्याने तिच्यासाठी आणलेले गिफ्ट सोन्याची चैन तिला present देतो . आणि आवडली का म्हणून विचारतो .
" आवडली का काय ? खूप आवडली आयुष्यभर तुझी आठवण म्हणून खूप जपेंन ह्याला thanks मित्रा "

तो बाहेर जाते ती ही लग्नमंडपात जाते . आता तिचे वडील राहुलला सारखे म्हणत होते . "जा तुम्ही नवऱ्या मुलाकडे आला तुमचा मित्र आता आमचं कर्तव्य संपलं ."
" हो हो " आता त्याला काही च समजेना कारण नवऱ्या मुलाकडच कोणीच त्याला ओळखेना सर्व जण त्याला हाच प्रश्न विचारत होते.
"  कोण आपण ? कोठून आला त ? "
मी लग्नासाठी आले लो आहे . असच तो फक्त उत्तर देत होता . पण चर्चा पसरायची म्हंटल्यावर कशीही पसरतेच 
सगळीकडे हीच चर्चा हा नवीन मुलगा आहे कोण ? कोणत्या साईड ने आहे ."
आता त्यांना दोघांनाही खूप भीती वाटत होती . 
आपण लपवलेले आपल नातं आज जगासमोर येत की काय ? 
तिचे आणि त्याचे पाण्याने तुडुंब भरले ले डोळे , एकमेकां डे त्यांच्या असणाऱ्या नजरा . ह्याच्यावरून च शेखरणे ओळखं ल होत . हे दोघे एकमेकांना ओळखतात . तेवढ्यात तो कोणाच्याही नावाची बदनामी होऊ नये म्हणून लगेच कबुल करतो . हा माझाच मित्र आहे . त्याच्या गळ्यात जाऊन पडतो . " काय मित्रा कसा आहेस ? वैगरे वैगरे ..
आणि लग्न समारंभाच्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतात . लग्न तर एकदम भारी होत . 
पाठवणीच्या वेळेस ही शेखर राहुल ला आपल्या सोबत आपल्या घरी येण्यास सांगतो . शेखरचे हे वाक्य ऐकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर अनोखे तेज पसरते .
राहुलला इथे नित्या शिवाय कोणीही ओळखत नव्हत . मग काय तो त्यांच्यासोबत जायला होकार च देतो ...

शेखरने राहुलला का बरं त्याच्यासोबत यायला सांगितल असेल ते बघुया पुढच्या भागात तो पर्यंत वाचत रहा ..
मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ठ ह्या ठिकाणी क्लिक करा .  

Nov 29, 2021

गुलाबी थंडी..

गुलाबी थंडीचे दिवस ते छान ,
धुक्यात हरवलेले तुझे माझे भान .

स्वप्न आकाशी विहरलेला तू ,
सोबत घेऊन मला ...

सांजवेळी सुर्य ढळता ,
डोळ्यांची पापणी मिठता ,
तू मला मिठीत घेता ,
सुवर्ण क्षण ते भासे मला ...

महाबळेश्वर ची ती थंडी हवा ,
त्यात सुरू झालेला आपल्या नात्याचा प्रवास नवा ..

ते क्षण आजही आठवतात ,
गेलेले ते दिवस नव्याने परतून यावे ,
तू माझ्याशी मी तुझ्याशी ,
पुन्हा एकदा एकरूप व्हावे ...

आयुष्य माझे हसत खेळत पेलले ...

भरारी घ्यायच काही ठरलं नव्हतं ,
वेळेवर तस काही कळलं नव्हतं .....

जन्मतःच माणुसकीचं वरदान लाभलेले ,
मानव जातीचे मी पांग फेडले ....

आतापर्यंत अल्लड होते , आता समजूतदार झाले ,
माझ्याच माणसांसाठी खूप काही शिकले ,
अल्लडपना जपण्याचे स्वप्नही विसरले ...

आयुष्यात मी कधीही काहीही ठरवले नव्हते ,
समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे गेले ,
आयुष्य माझे हसत - खेळत पेलले ...

Nov 28, 2021

हेडफोन्स तिची आठवण ....

आज सकाळ पासून तिला तिचं हेड फोन मिळत नव्हत . ती खूपच चिडली होती . ते हेडफोन्स सापडत नव्हते म्हणून तिने हक्क घर डोक्यावर घेतलं होत . सकाळ पासून ती चिडचिड करत होती . समोर येणाऱ्या प्रत्येकावर ताण खात होती . 
विवेक : तिचा नवरा " एवढं काय अडलय त्या हेडफोन वाचून एखाद नवीन घेऊन टाक . फार फार तर दीडशे रुपयाला येईल . "
 " तुम्ही व्हा बाजूला मला ते हेडफोन्स शोधू देत . "

" अगं नाही सापडणार आता ते परत "

" म्हणजे "

" ते चुकून माझ्याकडुन भंगार वाल्याला दिलं गेलं "

" अहो असं कसं भंगार वाल्याला दिलं तुम्ही , कोणत्या भंगार वाल्याला दिलं लवकर सांगा मला " ( तिचे सुर आता वरचढ झाले होते.)

" तो आपल्या शेजारचा चहाच्या टपरी जवळचा भंगार वाला आहे , ना त्यालाच दिलं . "

त्याच हे उत्तर ऐकून भार्गवी लगेच त्या भंगार वाल्याच्या दिशेने धाव घेऊ लागली . तिच्या मागोमाग शेखर ही धावू लागला . ती गेली आणि लगेच तिने भंगार वाल्याने एकत्र करून ठेवलेलं सार भंगार उचक - पाचक करू लागली. आणि त्यात ती आपलं हरवलेलं हेडफोन्स शोधू लागली . 
शेखर तिच्या कडे बघतच होता . साधं हेडफोन्स तर हरवलं ह्यात एवढं काय ? चिडचिड करण्यासारखं असं स्वतःलाच विचारू लागला . 

तिने सार भंगार उचकुन ठेवलं पण ; त्यात काही तिला तिचे हेडफोन्स सापडले नाहीत . ती हताश झाली . 
जणू आपला श्वासच आपल्यापासून दूर गेला असे तिला भासू लागले . तिची तशी अवस्था पाहून शेखर ही हताश झाला . थोड्याच वेळात तो भंगार वाला आतमध्ये आला . आणि तिच्यावर चांगलाच चिरकला . चिरलेल्या भंगार वाल्यावर मग शेखर ही चांगलाच बिघडला . 
" बाई माणसांशी अशी पद्धत आहे का ? बोलण्याची " असं म्हणत त्याला दम देऊ लागला . "

भंगार वाला मग तिची माफी मागू लागला . स्वारी भाभिजी पण ; आमची ही कामाची वेळ आहे . आणि त्यात तुम्ही सकाळी सकाळी सारा पसारा करून ठेवला .
म्हणून जरा तोल गेला . माफ करा भाभिजी .."

" राहू द्या दादा माफी नका मागू " असं म्हणत ती तिचे डोळे पुसू लागली . "

" एवढं काय शोधत होता तुम्ही की त्या वस्तू साठी तुमचे एवढे डोळे भरून आले . "

" मी माझे हेडफोन्स शोधत होते . " 

" हेडफोन्स "

" हो माझे हेडफोन्स , दादा आम्ही तुम्हाला दिलेलं भंगार कुठे आहे . " असं ती त्या भंगार वाल्याला विचारू लागली . 

" तुम्ही काल दिलं ना भंगार , ते हवेली वर ठेवलेलं आहे ."

" कुठे आहे हवेली सांगा मला जाऊन शोधते मी तिथे "

" अहो हे काही सोप काम नाही. तिथे आमचे मालक असतात . ते कोणतेच भंगार परत घेऊ देत नाही . तसा त्यांचा नियमच आहे . "

" तुम्ही सांगा मला कुठे आहे . ती हवेली मी हातापाया पडेन . हवं तर त्यांना काही पेमेंट देईन . पण मला ते हेडफोन्स हवेत . 
" शेखर तू तरी सांग यांना विचार ना हवेली कुठे आहे ते "
असं म्हणत ती सतत रडत होती . 

शेखरला तिची अवस्था बघवेनाशी झाली होती . त्याने त्या भंगार वाल्याला हवेलीचा पत्ता विचारला आणि तो भार्गवीला घेऊन त्या हवेलिवर गेला .
ते तिथे जसे गेले , तसे त्यांना तिथे दोन बॉडीगार्ड आडवे झाले . ते त्यांचा रस्ता अडवत त्यांना विचारू लागले . "

" कोण तुम्ही आणि इथे अचानक कसे काय आलात "
" आम्ही इथे आमची एक गोष्ट शोधण्यासाठी आलो आहोत . "
शेखर असं म्हणत आम्हाला आतमध्ये जाऊ द्या . अशी विनंती त्या बॉडीगार्ड ना करू लागला . ते बॉडीगार्ड काही ऐकेना . मग थोडीशी बाचा बाची झाली . आणि तेवढ्यात हवेलीचे मालक बाहेर आले . 
" काय प्रोब्लेम आहे . आणि कोण हे " अस ते त्या बॉडीगार्ड ना विचारू लागले . 
तेवढ्यात भार्गवी हात जोडून पुढे येऊन त्याचे पाय धरत गयावया करू लागली . " आमचे हेडफोन्स शोधण्यासाठी आम्ही इथे आलोत प्लीज काका आम्हाला ते इथे शोधू द्या . हवं तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ . पण प्लीज तुम्ही आम्हाला ते हेडफोन्स शोधू द्या . "

तिची अवस्था पाहून कोनालाही दया येईल . तो मालक तिची तशी अवस्था पाहून हताश झाला . आणि तिला तिचं हेडफोन्स शोधण्याची परमिशन दिली . 

ती लगिबघिने आतमध्ये गेली आणि तिचे हेडफोन्स शोधू लागली . समोरच एक खूप मोठा गठ्ठा पडलेला होता . त्यात तिला तिचे ते हेडफोन्स सापडले . ते हेडफोन्स बघून तिला अजूनच गहिवरून आले . ती खूप रडली . तिची ती अवस्था पाहून सारेच स्तब्ध झाले होते . 

तिला शेखरने धीर दिला . " रडू नको प्लीज शांत हो "
असं म्हणत तो तिला सावरू लागला . "

तेवढ्यात तो मालक आतमध्ये आला आणि तिला विचारू लागला . " ताई तुम्ही ज्या हेडफोन्स साठी एवढं रडताय म्हणजे नक्कीच ते तुमच्यासाठी खूपच महत्वाचं असेल ."

" हो काका हे हेडफोन्स माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत . हे फक्त हेडफोन्स नाहीत . ही आठवण आहे माझ्या एका जीवा भावाच्या मैत्रिणीची .."

" म्हणजे " 

" म्हणजे हे हेडफोन्स माझे नाहीत ते माझ्या मैत्रिणी चे आहेत . तिची तेवढीच एक माझ्या कडे आठवण आहे . ती आज हे जग सोडून खूप दूर गेली तिचे ते हेडफोन्स माझ्याकडे ठेवून गेली ."

"कशामुळे ते हे जग सोडून गेली ."

" तिचं एका मुलावर खूप प्रेम होतं . ती त्याच्यासाठी जीवही द्यायला तयार होती . तिची स्टोरी समाजापासून जेव्हा लपलेली होती . तेव्हा फक्त मलाच माहीत होती .
नकळतपणे मीच तिचं हे जग सोडून जायला कारण ठरले होते . ती रोज माझ्या घरी येऊन त्याच्याशी गप्पा मारायची . मी तिला खूप समजावयाचे . असं नको करू तुझ आयुष्य बरबाद होईल . पण तिच्या डोळ्यावर प्रेम नावाची पट्टी बांधलेली होती . ती खूप आंधळी झाली होती त्याच्या प्रेमात . तोच तिच्यासाठी तिचं आयुष्य झालं होता . जगापासून ही स्टोरी लपलेली होती . तोपर्यंत सगळं ठीक होत . पण जेव्हा ही स्टोरी जगासमोर आली तेव्हा तिची फारच बदनामी झाली होती . 

जगाने तिने न केलेल्या चुकीची ही तिला शिक्षा दिली . तिला नको नको बोलून तिचं जगणं असह्य केलं . तिच्या प्रियकराने ही तिची साथ सोडून दिली . ती तर फारच खचून गेली होती . तिला श्वास घेणं ही मुश्किल झालं होतं . जगणं नकोस वाटत होत . 
घरच्यांनी तर तिला वाळीतच टाकलं होतं . तिला तर ते आपल्या कुटुंबाला लागलेली कीड समजू लागले होते . 
तिला नियतीने ठोकरल होतं . तिला सारचं असह्य झालं होतं . तिने मन घट्ट करून एक निर्णय घेतला होता . तिने जो निर्णय घेतला होता , त्याची पहिली साक्षीदार फक्त मी होते . 

कडक उन्हाळ्याचे दिवस होते . पाळूच्या वाटेवर मी नेहमीप्रमाणे बसले होते . निसर्गाचा आनंद घेत होते . ती तेवढ्यात माझ्याकडे रडत रडत आली . तिच्या हातात काहीतरी होत . तिने लगेच ते माझ्या हातात दिलं . मी तिला विचारणारच तेवढ्यात " ही माझी शेवटची आठवण भार्गु तुझ्यासाठी " 
असं म्हणत तिने त्या तलावात उडी मारली . आणि ह्या सुंदर आयुष्याला ती कायमची मुकली तेव्हापासून हे हेडफोन्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण हे हेडफोन्स फक्त हेडफोन्स नाही तर , हे हेडफोन्स तिची शेवटची आठवण आहे . ती आठवण मला अत्यंत प्रिय आहे ."

ही स्टोरी ऐकुन सर्वांचे डोळे भरून आले होते . शेखर एवढंच तिला बोलला ही आठवण तू कायम जपून ठेव .
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत .....
" Hmm " अस म्हणत तीने उत्तर दिलं . आणि ते ते हेडफोन्स घेऊन आनंदाने घरी गेले ....

दुर्गा मते ......



नातं हे मैत्रीचं ...


माणुसकी म्हणजे काय त्याच्याकडून शिकले ,
त्याला 85 वर्षाची म्हातारी म्हणून खूपच छळले ...

कोणाचा मन तो चुकूनही दुखवत नाही ,
कोणाला आपल्यामुळे त्रास होईल असं तो वागत नाही ..

स्त्रियांची करतो तो खूप कदर ,

म्हणूनच तर माझ्या good list मध्ये आहे तो हजर ..


किती मी  त्याला इग्नोर केलं ,
तरी त्याने आपलेपणाच दिला ,
निर्मळ मैत्रीचा झरा हा वाहतच गेला ..

नातं

आमचं हे मैत्रीचं ,


काव्य पुष्प समुहामुळे खूपच छान बहरल ...

नाती कशी धरून ठेवायची ,
त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे ...

कधी फिरतात आमचे ग्रह ,


पण आमच्या नात्याची एक वेगळीच व्याख्या आहे ..

थोड हसू , थोड रुसू ,
काहीही झालं तरी गोड बोलू ,
सतीश खरे बद्दल मी अजुन काय  बोलू .....

आमचं हे नातं केवळ मैत्रीचं आहे . तो मनाने खूप चांगला आहे . म्हणून त्याच्यासाठी एक रचना करायची अस खूप दिवसापासून मनात होत . पण एवढे दिवस वेळ नाही मिळाला . आज मिळाला त्यामुळे केली ...

आयुष्याने ह्या खूप काही शिकवलं ...

 ह्या आयुष्याने खूप काही दिलय ,
खूप काही हिरावून घेतलय ..

आयुष्याने फुलासारखं फुलायला शिकवलं ,
कोलमडलेल्या मनाला माझ्या उमलण्याच बळ दिलं ..

आयुष्याने सूर्याची कठोरता माझ्यात सामावली ,
चंद्राची शीतलता सामावण्यासाठी माझी निवड केली ..

आयुष्याने आपलेपणा जपायचा शिकवला ,
क्षणात परकेपणा देनाऱ्यालाही आपलचं मानण्याच वरदान दिल ..

ह्या आयुष्याने नदीच्या पात्रासारखं पवित्र राहण्यास शिकवलं ,
तुझ्या पात्रातील अपवित्रता ही तुझ्यात सामावून घे ,
हक्काने सांगितल ...

आयुष्याने ह्या खूप काही शिकवलं ,
तुटलेलं मन , तडा गेलेले हृदय पुन्हा कसायला शिकवलं ..

उसवले धागे ...

उसवले धागे ,
तुझ्या माझ्या प्रेमाचे ...
आकाश विरले हे ...
तुझ्या माझ्या स्वप्नांचे ...

तुझ्यात गुरफटने असह्य झाले ,
माझे मलाच सतावणे योग्य नाही वाटले ...

परक्यासारखे तुझे वागणे ,
हृदयावर घाव करू लागले ..
म्हणून तुझ्यामागे लागणे मी सोडून दिले ....


बास झालं इथे अडकत बसणं ...

ह्या नात्यात गुरफटणे आता शक्य नाही ,
माझेच मला सतावणे आता शक्य नाही ...

इथे अडकत बसण्यापेक्षा दूर जाते मी एकांतात ,
माझ्या स्वतःच्याच सहावसात ,
पर्सनल अँड बिझी आयुष्यात ......

खूप झालं ,
इथे अडकून बसून स्वतःला त्रास करून घेणं ,
काहीचं नाही लागत मी इथे भावनांच देणं ..

बास झालं इथे अडकत बसण ,
आता माघारी जाणं हेच माझं प्रथम कर्तव्य ...

Nov 27, 2021

व्यथा सासुरवाशिणीची ....

व्यथा माझ्या सासुरवाशीण मैत्रिणीची ,
माझ्या जीवा भावाच्या सखीची ...
ती निःशब्द होती ,
तुडुंब भरलेल्या नयनात ,
तिची कहाणी दडली होती ...
ओठांवर हलकेसे येणार हसू ,
काय बाई मी तिची व्यथा सांगू ..
भावना तिच्या मी समजू शकते ,
इवल्याशा तिच्या रोपटला ,
गर्भात वाढवलेल्या तिच्या पणतीला ,
ढुंकूनही न पाहिले तिच्या सासूने ,
हळवे तिचे मन सांगत होते मला हक्काने ,
काय बाई हा डाव मांडला नियतीने ,
काय करावे आजच्या सुशिक्षित पिढीने .....
विचारत होती मला तिची भाषा रसाळ ,
तुझी प्रिन्सेस आहे मधाळ ,
जिवापाड कर ग तिचा सांभाळ ...
एवढेच मी बोलू शकले ....

आजही खूप ठिकाणी पहिला मुलगाच हवा असतो ,
मी माझ्या दोन मैत्रिणींच्या कहाणी पहिल्या त्यावरून लिहिले ...खरच किती मागासलेल्या विचारांचा आहे आजही हा समाज मला तर खरच खूप चीड येते . एका सासुरवाशिनीची व्यथा मी फारच कमी शब्दात सांगितली .
खेड्यात - पाड्यात आजही सासुरवास होतो . सुनांना कुठे साधं बाहेर जायचं असेल , तर तीन ते चार वेळेस घरच्यांची परमिशन घ्यावी लागते . न सांगताच सून कुठे बाहेर गेली तर , तिला घरात ही घेतल्या जात नाही . मी स्वतः पाहिलेल्या घटना आहेत . माझ्याच कॉलनीत पाहिलेल्या आहेत ...
सून कमवत असली तरी तिला तिचा स्वतःचा पैसा सासूच्या हाती द्यावा लागतो . जेव्हा तिला एखादी गोष्ट खरेदी करण्याची इच्छा झाली . आणि सासू कुठे बाहेर गेली असेल तर , तिला ती इच्छा अनेकदा मारावी लागते . 

कित्येकदा पहिला मुलगाच हवा , ह्या हट्टाहासाने तिचे अनेकदा गर्भपात केले जातात . तिला न सांगताच तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जातात . 

अनेक मुलींना लग्नानंतर शिकण्याची इच्छा असते . पण ती इच्छा पूर्ण करण्यात येतच नाही . खरच मला खूप वाईट वाटतं . काही काही गोष्टीबद्दल खूप तिरस्कार आहे माझ्या मनात तो तिरस्कार कधी संपणार पण नाही .

आज तिच्या पानवलेल्या डोळ्यांनी ,
खूप काही सांगितल ,
मी इतक्यात तरी लग्न करायचं नाही ..
असच आज ठरवल ,
नकोय मला एवढ्यात एवढा ताण ,
सुंदर आयुष्यात पिढा ही घान ....



अजुन किती तुझ्यापासून दूर जाऊ ...

तुझ्या असण्याच्या बसण्याच्या किती नोंदी ठेवू ,
अजुन किती तुझ्यापासून दूर जाऊ ...?

दुरावा हा किती वाढलेला ,
एक घाव मनात खोलवर रुजलेला ...

तुझ्या माझ्या प्रेमाचे साक्षीदार ते ,
निरभ्र आकाश ....

माझ्या प्रेमाचा तुझ्यापर्यंत ,
कधी पोहोचेल रे प्रकाश ...

Nov 26, 2021

अक्षदा ....

हा जन्म आहे मानवाचा ,
जसा सावळ्या मेघांचा ...
ध्रुव तारे नक्षत्रांचा ,
ओल्याचिंब पापण्यांचा ....

सहवास उमलता हास्याचा ,
अगंणी फुले पिसारा प्राजक्ताचा ...
तुझ्या माझ्या प्रेमाचा ...
डाव हा क्षणोक्षणीचा ...

मेघ ओले ते गरजु लागले ,
पापण्यांना माझ्या श्वास तुझे गोंदु लागले ,
प्रीत वेडी हि पाहून अंबर हसू लागले ...
अक्षदा पडता डोईवर ,
माझ्यातील लाजाळूचे झाड लाजू लागले ....

माझं स्वप्न...

माझं स्वप्न खूप सिंपल आहे . फार काही मोठं नाही . 
केवळ एक आदर्श स्त्री होण्याचं आहे . 
सर्वात आधी एक चांगली व्यक्ती होण्याचं आहे .
मग एक चांगली मैत्रीण , एक चांगली मुलगी , एक चांगली बहिण , एक चांगली बायको , एक चांगली आई , एक चांगली सून आणि मग ह्या सगळ्यांच्या समिकरणातून एक आदर्श स्त्री ......
एवढंच माझ स्वप्न ....
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल , एवढी चांगली मुलगी एकविसाव्या शतकात एवढं सामान्य स्वप्न बघते . 

हो बघते मी एवढं सिंपल स्वप्न ...मला अभ्यासात कमी आहे असं काही नाही . माझ्या वर्गातील टॉपच्या मुलींबरोबर मी सहज गणल्या जायची . परिस्थिती नाही शिकण्याची असही काही नाही . आणि शिक्षण इथेच थांबवायचं आहे . हे ही नक्की नाही . शिकायचं पण आहे . पण ते फक्त डिग्री मिळवण्यासाठी नोकरी करण्यासाठी नाही . 

माझी बिलकुल ईच्शा नाही बाहेर जाऊन नोकरी करण्याची . डेरिंग नाही असं ही काही डेरिंग पण आहे . सर्व काही असताना ही स्वप्न माझं एक चांगली हाऊस वाइफ होण्याचंच आहे . 

मी हाऊस वाइफ होण्याच स्वप्न बघायचं म्हणून नाही बघितलं . त्यामागेही कारण आहेत काही ..मी जर उद्या कामासाठी बाहेर पडले तर मग माझ्या कुटुंबाचं काय ? हा विचार मनात येतो . आणि मग नकोस वाटतं बाहेर जाऊन काम कारण . कारण एवढं सोपं नक्कीच नाही . घर सांभाळून नोकरी करण .

पैसा येतो म्हणून आपण तडजोड करण एकवेळेस स्विकारतो ही , पण खरच काहीही गरज नाही , ही तडजोड करण्याची . काय फरक पडतो एक स्त्री केवळ एक हाऊस वाइफ असली तरी , मला विचारलं तर काहीही फरक पडत नाही . आणि एक हाऊस वाइफ असण्यात काही कमीपणा ही नाही . उलट एक चांगली हाऊस वाइफ होऊन एका आदर्श स्त्रीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडन हेच महत्वाचं आहे . आणि हेच माझं माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर स्वप्न आहे . 

मला नाही intrest बाहेर जाऊन 10 - 15 हजार रुपयांसाठी नोकरी करण्यात याचा अर्थ मला नवऱ्याच्या जीवावर आइश करायची असाही होत नाही . Infact मला दुसऱ्या समोर पैशाची भीक ही मागायला आवडत नाही . गेल्या दोन वर्षांपासून मी किती वेळेस वडिलांकडे पैसे मागितले असतील हे मला आठवतही नाही . मी स्वतःच्या जीवावर आइश करणारी मुलगी आहे . कोणावर अवलंबून रहायला ना कधी मला आवडलं ना कधी आवडेल ....

घरी राहूनचं एखादा छानसा छोटासा पैसे कमवण्यासाठी उद्योग ही करणार आणि एक आदर्श हाऊस वाइफ ही होणार .....

भले मी बाहेर जाऊन पन्नास हजार रुपये कमवत असेल , पण ; मी घरच्यासांठीचं वेळ देऊ शकत नसेल तर काय कामाचे ते पन्नास हजार रुपये . मी माझ्या मुलांसाठी कमी पडत असेल , माझ्या आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची सेवा करण्यात कमी पडत असेल तर काय कामाचं मला मिळणार स्वत्रंत आयुष्य ...
नंदा घरी आल्या आणि मी ऑफिस मध्ये का जीव अडकेन त्या बीचाऱ्यांचा तरी माझ्यामध्ये .. मला प्रत्येकाला लळा लावायचा आहे . माझ्या माणसांना जिंकून घ्यायचं आहे . त्यासाठी माझं स्वप्न एक चांगली हाऊस वाइफ होणेच आहे . कारण डिग्र्या रस्त्यावर पडलेल्या आहेत . नोकऱ्या नाही . हे पण लक्षात ठेवायला प्रत्येक स्त्रीने ....मला लग्नानंतर निदान 20 ते 25 वर्ष कुटुंबासाठी द्यायची आणि मग नंतरची माझ्या स्वतःसाठी . तुम्ही आता म्हणाल मी खूप मागासलेल्या विचारांची आहे . तर आहे बाई मी मागासलेल्या विचारांची . मला प्रोब्लेम नाही ...
 
मी माझं स्वप्न सांगितल तुम्ही बघा स्वप्न वेगळी नोकरी करण्याची मला प्रोब्लेम नाही ...


भ्रष्टाचार माणसाला मागे खेचतो , याच एक छोटंसं उदाहरण ..

मला सुगावा लागला नाही ,
हाती काहीच लागले नाही ...

प्रयत्न माझे निष्फळ ठरले ,
शोध घेण्यास मी अपूर्ण पडले ...

परीकष्टा केली होती प्रयत्नांची ,
साथ नाही मिळाली नशीबाची ...

रोज पुरावे शोधत होते ,
कोर्टात मात्र साक्ष देण्यास साक्षीदार नव्हते ...

माझी बाजू सत्याची होती ,
मला घाबरण्याची भीतीच नव्हती ....

भ्रष्टाचार एवढे वाढले ,
शेवटी मी हिंसेला बळी पडले ...
वकिली सोडून मी माझे योग्य आयुष्य घडवले ...

ही कविता काल्पनिक आहे वास्तवाशी संबधित नाही ..
कवितेच्या माध्यमातून वास्तविकता रेखाटण्याचा छोटासा प्रयत्न ... चुकीस क्षमस्व : 

Nov 25, 2021

खरं दुःख काय असतं ते आज खऱ्या अर्थाने कळलं ..

आज खूप काही शिकायला मिळालं . आणि माझ्या विचारांची गती बदलली . 
खरं दुःख काय असतं ते आज खऱ्या अर्थाने कळलं .
आज आता पर्यंत हॉस्पिटल मध्ये होते . आजचा अनुभव
आणि दिवस नकळत खूप काही शिकवून गेला ...
किती रुग्ण होते जिवंत पणीच मरण यातना सहन करनारे . दररोज मरणाशी झुंज देत होते . आपल्या आयुष्यातील एक एक दिवस कमी होत चालले आहे . हे उगड्या डोळ्यांनी बघत होते . तरीही श्वास घेतच होते , भेटायला आलेल्या माणसांना एक स्माईल देत जगतच होते . ते सारे क्षण डोळ्यात साठवून ठेवण्याजोगे होते . 
मी प्रत्येक वार्ड न्याहाळत होते . सगळीकडे दुःख दिसत होते , आपला माणूस नंक्की बरा होऊन परत आपल्या घरी परत येईल , ही आस धरून वर्षा नु वर्ष तिथे बसले ली माणस मी पाहिली . माझी अश्रू फुल नकळतपणे त्यांना वाहिली .
जसे दुःखी चेहरे दिसले तसेच सुखाने ओतप्रोत भरलेले मनही दिसले . ते डिलिवरी वार्ड मध्ये . कोमल स्पर्श एका आईचा तिच्या इवल्याशा बाळाला होणारा एक अनोखा आनंद देऊन गेला . आसवलेल्या डोळ्यांना माझ्या समाधान देऊन गेला . पण कुठेतरी तिथेही दुःख हे अस्तित्वात होतेच . एक आई हे जग कायमचं सोडून गेली होती , तिच्या इवल्याशा लेकराला ह्या एकटं सोडून कायमची त्याच्यापासून दूर गेली होती . त्या क्षणी तर मला खूप गहिवरून आलं . ते बाळ आईच्या पान्ह्यासाठी रड रडत होत . बिचाऱ्याला माहीतच नव्हतं आता आपण पोरको झालो . 
दुसरीकडे एक तरुण पंचवीस तीसितील असेल . तो त्याच्या अर्धागिनीला कायमचं सोडून गेला होता . त्याची गोंडस मुल आज कायमची पोरकी झाली होती . अर्धागिनी तर अर्धी झाली होती . तिथे मला खर दुःख काय असतं . ते उमगल ....!!!
खर दुःख बघायच असेल ना तर , एकदा तरी हॉस्पिटल मध्ये जावं . स्पेशली तेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं असेल , आपण खूप दुखी आहोत . मग कळेल आपल्याला आपलं जे दुःख आहे ना , ते काहीचं नाही हे . 
यापेक्षाही खूप मोठे दुःख उरात घेऊन माणस आयुष्याची वेल वाढावी ह्या आशेने जगत आहे .

एखाद्या प्रियकराने एखाद्या प्रेयसीला सोडून दिलं , हे दुःख काहीचं नाही . तिथे काय संघर्ष आहे . काहीच नाही साधी समजून घेण्याची ही ते रिस्पॉन्सबिलिटी घेत नाही .
म्हणून त्यांच्या वाट्याला दुःख येत . स्वतःहून दुःख ते अंगावर ओढून घेतात . 
खरं दुःख काय असतं ते एका हॉस्पिटल मध्ये गेल्यावर किंवा अनाथ आश्रमात गेल्यानंतर च कळत...

स्वतःपासून सुरुवात करावी ..

विचारांची अडगळ दूर करावी ,
स्वतःपासून सुरुवात करावी ....

ज्या गोष्टीने आपल्याला खूप त्रास होतो . त्या गोष्टी लगेच विसरून जायला शिकाव्या . कोणी आपल्याला योग्य सल्ला देईल . ह्याची वाट न बघता काही निर्णय स्वतःच घ्यावे . स्वतःपासून सुरुवात करावी . विचारांची अडगळ दूर करण्याची . मनावरचं ओझं जरा हलक करावं . 

मैत्री असो किंवा प्रेम असो , ज्यातून आपल्याला त्रास होतो ना ते नातं तिथेच स्टॉप केलेलं बरं असतं . उगाच स्वतःच मन दुखावून एखाद नातं कवटाळून बसण्यात काय पॉइंट आहे . 


Nov 24, 2021

प्रेम बंधन - 13

तीन दिवसानंतर राहुल पुन्हा ऑनलाईन येतो ...त्याने तिच्या पोस्ट वर केलेल्या कॉमेंटला तिने रिप्लाय दिला .
ती bussy नेहमी असते . पण त्याच्यासाठी आवरजुन
वेळ काढते . वेळ द्यायला जमलं नाही तर , निदान एक मेसेज तरी करते . तरीही ती त्याच्यासाठी कुठेतरी कमीच पडते . 
तो हा रिप्लाय वाचून तिच्या इनबॉक्स मध्ये एक मेसेज करतो . स्वारी म्हणून ती ऑनलाईन असल्यामुळे लगेच त्याला रिप्लाय देते . " आधी मन दुखवायचं आणि मग स्वारी बोलायचं . समजून नाही घ्यायचं तर मग हे नातं कसं टिकायच ."
" स्वारी यार खरच स्वारी "
" इट्स ओके . Bussy आहेस का ? "
" नाही . फ्री आहे म्हणून ऑनलाईन ."
" वाटलच मला wp vioce चालेल . "
" मनातलं बोललीस ."
" चल मग wp वर लवकर मी वाट बघतेय . "
" आलोच . तू हो पुढे . "
ती त्याला कॉल करते . खूप दिवसांनी ते एकमेकांशी बोलत होते , अश्रू अनावर झाले होते . तिने आज त्याला कॉल काही गोष्टी नीट समजावून सांगण्यासाठीचं केला होता . त्यालाही तिची मनस्थिती समजून घ्यायची होती .
मैत्रीची थांबवण्याची त्याची तयारीही होती . पण तिलाच ही मैत्री हवी होती . त्यामुळे ती मैत्री तो निभवण्याचा प्रयत्न करत होता . 

गुंतलेला होताच तिच्यात ,
बोलू कधी शकला नाही ...
मान्य करूनही त्याने मान्य केले नाही ..

तिच्यासाठी अश्रू त्याचे कधी थांबले नाही ..
ती आयुष्यात असो नसो तिच्यासाठी तो रचत होता खूप  काही . कधी तिच्या रचनेत , कधी तिच्या कवितेत स्वतःला शोधत होता . तिच्यासोबत त्याचे आयुष्य जोडू पाहत होता . तीही same तेचं करत होती . गुंतली होती त्याच्यात . त्याच्यासाठी एक अनोखे स्थान निर्मिले होते तिने तिच्या मनात कायमचे बंधिस्त करून ठेवले होते , त्याला तिच्या हृदयात .
त्याने तिला विचारल , " कशी आहेस ? "
" मी मस्त आहे . तू कसा आहेस ? "
" मी एकदम झकास . काय झालं नक्की ठरल का लग्न "
" हो ठरलंचं नाही तर सुपारी पण फुटली . "
" व्वा क्या बात है ! डबल धमाका ! "
" हो ऐक ना . "
" काय ग . "
" आता आपल्याला थोड्या कॉम्प्र माई  ज कराव्या लागतील . " 
" म्हणजे " 
" अरे समजून घेणा जरा ..."
" हा...आता तुला माझ्याशी बोलण्याची इच्छा नसेल ना आता संपली ना आपली मैत्री . "
" कोणी सांगितलं असं नाही . आपली मैत्री कधीही संपणार नाही . गॉड प्रॉमिस ."
" मग कसलं कॉम्प्र माई ज .."
" आपलं वेळेचं समीकरण बिघडत म्हणून अजिबात चिडायचं नाही . रागवायच नाही , अबोला धरायचा नाही.
एकमेकांना शक्य तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. " 
" ओके तेच करत आलो ना आतापर्यंत . "
" कोणी केला रे प्रयत्न "
" तूच . तुझा जन्मसिध्द अधिकार आहे ना तो समोरच्याला समजून घेणे . "
" हो आहे पण आता तू ही समजून घ्यायला हवं . थोड मला आता माझ्यावर एक नवीन जबाबदारी आहे . ती मला पुरेपूर पेलायची आहे . प्लीज समजून घे मला . "
" ओके i can understand ! You dont warry .."
" थँक्यू ! "
" बरं कसा आहे होणारा पती ."
" खूप छान आहे . Dashing अगदी मला हवा होता, तसाच आहे . "
" व्वा नशीब काढलं तू " 
" ते काय माहित अजुन , आता तरी चांगला वाटतो . नंतर ग्रह फिरले तर त्याच सांगता येणार नाही . पुरुष आहे कधीही बदलू शकतो . "
" म्हणजे म्हणायचं काय आहे तुला ."
" काही नाही सोड जाऊ दे तुला नाही कळणार कधी स्त्रीची व्यथा . "
" म्हणजे "
" अरे सोड ना "
" ओके "
" बरं ठेवू का आता "
" का ग . हो मिस्ट रांचा कॉल येत असेल . माहितेय मला . मुली ना खूप सेल्फिश असतात . "
" म्हणजे अरे ! असं काही नाही . पेपर आहेत माझे म्हणून जरा स्टडी . "
" स्वारी "
" Hmm . जरा विचार करून बोलावं माणसानं , सर्व मुली सारख्याच नसतात . "
" हो . म्हणूनच तर आजपर्यंत आपली मैत्री टिकून आहे ना . "
" आणि यानंतरही असेल कायमस्वरूपी . "
" तिचं आशा आहे . "
" आशाची निराशा कधीही होणार नाही . हा विश्वास माझा . "
" तो विश्वास कायमस्वरूपी टिकू देत हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना . "
" टिकेल . तथास्तु ! "
" Thankyou so much from bottom of my heart "
" ओके बर आता खरचं ठेवते मी . "
" ओके बाय बोलू नंतर , काळजी घे तुम्हा दोघांचीही "
" हो नक्की तू पण घे रिदिमा ची काळजी . "
" घेतोय म्हणून आजपर्यंत जिवंत आहे . नाहीतर केव्हाच देवाला भेटायला गेलो असतो . "
" ओके बाय " अस म्हणत ती फोन कट करते . आणि आपल्या कामाला लागते . "
तिचे पेपर असल्यामुळे तिचं आणि राहुलचं बरेच दिवस बोलण होतच नाही .  त्यांच्या नात्यातील संवाद हा संपला होता . तिच्या लग्नाची तारीख ही फिक्स ठरली होती . लग्नाला आठ दिवस बाकी असताना ती राहुल ला wp वर लग्नपत्रिका आणि आग्रहाचं निमंत्रण देते . राहुल काहीही कर पण लग्नाला नक्की ये . तू आणि रिदिमा दोघेही ती नाही आली तरी तू नक्की ये . मी वाट बघेन तू आल्याशिवाय मी लग्नमंडपात जाणार नाही .हे लक्षात ठेव . "
राहुल तिचा मेसेज बघुनही तिला रिप्लाय करत नाही . ती खूपच hurt होते . माझ्या आयुष्यातील हे एवढे आनंदाचे दिवस आहेत . हा असा चिडका वागून का खराब करतो . जाऊ दे सोडून देते मी ह्याचा विषय हा जरा जास्तच भाव खातो . "
ती आतुरतेने वाट बघत असते त्याच्या मेसेज ची पण काही रिप्लाय आलाच नव्हता . ती हिरमुसून जाते . अश्रू आज तिचे बरसू लागले होते . "
आज तिची मेहंदी होती , त्या मेहंदी वर त्याच्या आठवणींचे अश्रू ती सतत टिपत होती . सारखा मोबाईल फोन हातात घेऊन रिप्लाय आला की नाही चेक करत होती . उद्या हळद होती , पण म्हणावे तसे तेज आज तिच्या चेहऱ्यावर नव्हते . ती पार कोलमडून गेली होती .
होणाऱ्या नवऱ्यापेक्षा आजही  तिला तिचा मित्रच अनमोल होता . ते स्पष्ट स्पष्ट दिसत होते . "
हळदी च्या दिवशी ती सगळ्यात आधी उठली . रेडी झाली नवरी असल्यामुळे तिला फार काम नव्हतीच निवांत होती . 
ती जाऊन बागेत झुळणाऱ्या झोपाळ्यावर जाऊन  बसली . हातात मोबाईल फोन होताच data पहिलं notification आलं . R . Patil च तुझ्या घराचा मेन adress काय ? तो लगेच तिला कॉल करतो . 
स्वारी मी मेसेजला रिप्लाय केला नाही . " तुला serprise द्यायचे होते . पण adress माहीत नाही ना .
म्हणून serprise serprise नाही राहील . "
ती खूप हसली त्याच्यावर काय रे तू किती खडूस आहेस.
ती त्याला adress सांगते . पुढच्या दहा मिनि टा तचं तो हक्काच्या हक्का राहुल पाटील तिच्या समोर येऊन उभा राहतो . आकाश ठेंगणे झाले होते तिला . तिने कसलाच विचार न करता जाऊन त्याला एक घट्ट मिठी मारली . आणि ती खळखळून रडली . आणि तिच्या तोंडातून केवळ एकच शब्द बाहेर पडल . " Thankyou so much "
" Its ok " म्हणत तो ही तिला प्रतिसाद देऊ लागला . 
थोडा वेळ तिथेच त्या झोपाळ्यावर बसून ते एकमेकांशी गप्पा मारत होते . काही गोड क्षण त्यांच्या आयुष्यातील वजा झालेले पुन्हा पुन्हा आठवत होते . 
थोड्याच वेळात तिची आई आली आणि तिला विचारू लागली . 
" कोण ग हे ? "
" मित्र आहे लग्नासाठी आलेला . "
मित्र कोणाचा असं म्हणत नाही तर तिचे वडील येतात तेवढ्यात तिच्या आईकडे  " अग ते जावई बापूचे मित्र येणार आहेत . त्यांच्या राहण्याची सोय चांगली कर ."
असं म्हणून ते जातात . आणि तिची आई त्या राहुल लाच अग  बाई तुम्ही जावं ई बापूचे मित्र का ? मी भी ना जरा वेंधलीच आहे . तुम्हाला काय हवं नको ते मला आग्रहाने सांगा . "
त्या दोघांच्याही मनात लड्डू फुटत होते . नियतीने आज सर्वकाही त्यांच्या मनाप्रमाणे केले होते . 
तो " हो नक्की सांगेन काकू "
"बरं बाळा मी येते बोला तुम्ही "
" हो " 
ते दोघेही एकमेकांकडे बघून मोठं मोठ्याने हसू लागले . राहुल आज राज्य आपल आहे . आता तू माझ्या नवऱ्याचा मित्र बाबा मजा आहे तुझी . "
" काय माहित कोणाला कळायला नको मी तुझा मित्र आहे ."
" हो रे खरच आपण जरा काळजी घेऊ . "
" हो नक्की "

काय वाटतं तुम्हाला ते लपवून ठेवू शकतील का तो त्याचा नाही तिचा मित्र आहे . हे गुपित मला ही उत्सुक ता आहे पुढे काय होणार याची . 
 बघुया पुढच्या भागात कोणत्या नवीन वळणावर जाते हे प्रेम बंधन ...

मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ठ ह्या ठिकाणी क्लिक करा ...

थँक्यू 🙏🙏🙏🙏

अदृश्य ....

मी कधीच तुला विसरु शकत नाही ,
ईश्र्चा असूनही बोलू शकत नाही ...
अश्रू अनावर झाले , तरीही रडू शकत नाही ,
उरात दाटलेले हुंदके मी आवरू शकत नाही ..

मनात खोलवर रुजले तुझे नाव ,
दूरदेशी तुझे गाव ,
म्हणूनच इथेच थांबली आपल्या प्रेमाची न्हाव ,

किती दाटली होती अंतरंगी गोडी ,
शोभून दिसली असती लाखात एक जोडी ,

नियतीचीचं लागली आपल्या स्वप्नांना दृष्ट ,
झाले रे मग सारेच अदृश्य ....

एकांतात ...

समुद्र किनारी शांत बसाव ,
मनातलं वादळ मनातच शमाव ...

वाऱ्याची झुळूक अगांवर लेवून ,
त्या एकांतात जरास रमावं ...
आयुष्याचं वादळ जरास भुलाव ...

निसर्ग सृश्टीची चित्रे डोळ्यांत रेखाटावी ,
पानांचा येणारा टपटप आवाज आणि पाखरांची कुजबुज कानात साठवावी ...

मातीत हात घालून , मातीचे खोपे बनवावे ,
बनवलेल्या खोप्यात दुःख ओतून ते बंदिस्त करावे ...
त्या एकांतात मन जरा मोकळे होऊ द्यावे ,
ते वातावरण मनाची सर्वीसिंग करण्याचे ठिकाण ठरवावे .

Nov 23, 2021

स्वप्न प्रितीचे आज समर्पित केले ...

त्या अथांग सागरात सोडून आले मी एक मन ,
ज्यात साठवले होते काही गोड क्षण ,

स्वप्न प्रितीचे स्मशानात समर्पित केले ,
झगझगणाऱ्या ज्वालांना अश्रू हे  दान केले ..

अथांग सागराशी मी एकरूप झाले ,
त्यात स्वप्न प्रितीचे हे वाहून गेले ...

सागरात सूर्याचे  प्रतिबिंब साचले ,
त्यातच एक नवं उमेदीचे किरण दिसले ..

हळूच येऊन ते कानात कुचबूजले ...
स्वप्न प्रितीचे हे मी अस्ताला जाणाऱ्या सूर्याला समर्पित केले ..

स्वप्न प्रितीचे हे मी आज स्वखुशीने समर्पित केले ,
आयुष्याला माझ्या एक नवीन वळण दिले ...

प्रेम बंधन भाग 12

काल नित्या आणि राहुलच् बोलण झाल , आणि आज ठरल्याप्रमाणे नीत्या ला बघायला पाऊने आले ..
थ्री फोर स्लिवज च ब्लाऊज ,  ग्रे कलरची साडी ,
ओठांवर नाजूक अशी रेड कलरची लिपस्टिक ,
केस मोकळे सोडलेले , एका हातात बांगड्या आणि एका हातात वॉच ...कपाळावर नाजूक स्टोन ची टिकली .
One side पदर ह्यात ती एवढी सुंदर दिसत होती . की कोणीही तिला पहिल्या नजरेत पसंद करेन . नाही म्हणायची कोणी हिंमत करणार नाही ..
तिला बघायला आलेला मुलगाही खूप हँडसम व्हाइट कलरच शर्ट , highted , p.s.i.म्हंटल्यावर काही पहायच काम होत का ? खूपच दशींग अशी त्याची वर्दी . त्याला बघूनही कोणतीच मुलगी लग्नासाठी नकार देणार नाही ....
त्याची तिची नजरेला नजर पडली ,
चेहऱ्यावर कळी उमलली ,
स्मित हास्य गाली उमटली ,
बाकीच्या पावण्यांनी दोघांची नजर न्याहळली ,
आजच सुपारी फोडूया अशी जबानी दिली ..
नवरी ती लाजत च किचन मध्ये पळून आली ..

दोघे एकमेकांना पसंद होतेच . पण त्यांना प्रत्यक्ष विचारून  " तुम्ही लग्नासाठी तयार  आहात का ? तशी खात्री करून घ्यायची होती ..तिने मानेनेच होकार दिला.
त्यानेही तिच्या हो , त . हो मिळवला . आणि मग लगेच ज्या दिवशी तिला बघायला पावणे आले त्याचं दिवशी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम ही झाला ..आणि लग्न फिक्स ठरल्याचं जाहीर ही झालं .. गावभर साखर वाटून तिच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला ...

तिलाही तो बघता क्षणी आवडला होता ,  म्हणून ती ही खूप खुश होती . 
ते जाईस्तोर त्यांची नजर एकमेकांना खेटलेली होती . 
स्पंद नात एक वेगळीच ऊर्जा खेळत होती ...सगळचं काही खूप छान होतं , हवं हवंस वाटणार होत . स्वप्नापेक्षा ही सुंदर त्याचं आज अस्तित्व होत . खरच आजचा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता . तिला आज एका क्षणासाठी का होईना , सर्वाचा विसर पडला होता . अगदी राहुल चा सुधा ती फक्त समोर उभ्या असणाऱ्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याचाच विचार करत होती . त्याच्याच विचारात ती बेधुंद झाली होती . हरवून गेली होती स्वतःच्याच विश्वात त्याच्या ओझरत्या श्वासात ...आजचा दिवस हा कलुच नये . सुर्य अस्ताला जाऊच नये . असं तिला सतत वाटायचं . तिचं मन त्याच्याकडे धाव घ्यायचं . 
ते गेल्यानंतर ही ती तासभर त्याच्या प्रतिमेला डोळ्यांसमोर साठवून त्याला पुन्हा पुन्हा आठवत होती .
आज तिच्यासाठी तोच तिचा सर्व स्व झाला होता ...

थोड्याच वेळात ती भानावर आली . तिने मोबाईल हातात घेतला . डाटा ऑन केला . तिला पाहिलं Notification आलं ते राहुलच्या मेसेजच . 
" काय ? झालं का बघण्याचा कार्यक्रम "
' काय झालं? आहे का यंदा कर्तव्य ! "

तिने त्याला आजचा घडले ला प्रकार सांगितला . त्याच्या मेसेज ला तिने रिप्लाय दिला . "
हो आहे लवकरच आज सुपारी फुटली ...काहीचं दिवसात एंगेजमेंट आणि मग लग्न ..करा मग तयारी आम्हाला भेटायला यायची ....
तो कधाचीत ऑफलाईन होता . त्यामुळेच तिच्या मेसेजला बराच वेळ होऊनही काही रिप्लाय आला नव्हता . वाट वाट बघून बघून शेवटी ती ऑफलाईन गेली  .
ऑफलाईन गेल्यानंतर तिला लगेच एक कॉल येतो . Unknowm नंबर असल्यामुळे तिने कॉल रिसिव्ह न करता कट केला . परत थोड्या वेळाने त्याचं नंबर वरुन तिला कॉल आला . तिने परत कट केला . त्याने परत कॉल केला मग हिने शेवटी रिसिव्ह केला . आणि तोंडाचा पट्टा न सांभाळता डायरेक्ट भांडली त्याच्याशी .
" काय आहे ? सारखा कॉल करताय काही काम नाहीत का तुम्हाला ? समोरचा व्यक्ती कॉल रिसिव्ह करत नाही.
ह्याचा अर्थ त्याला तुमच्याशी बोलायचं नाही . किंवा तो bussy असेल एवढी साधी गोष्टही लक्षात येत नाही का?
Exuse me!
समोरून फक्त एवढाच रिप्लाय आला ...तो रिप्लाय ऐकुन तापलेली नित्या जराशी थंड झाली . आणि कोमल आवाजात त्यांना विचारू लागली ..
" कोण आपण ? नाव काय आपलं ?
" माझं नाव शेखर "
" नावं कुठेतरी ऐकाल्या सारखं वाटतं ."
" Hmm आजच ऐकल की , एवढ्यात विसरलात ? "
ती जरा गोंधळली होती , आणि थोड्याच वेळात तिच्या लक्षात आलं . शेखर म्हणजे आपला होणारा नवरा . तिला आता तिचीच लाज वाटत होती ...तिचे बोलण्याचे सुरच बदलले ..
" स्वारी , स्वारी आय एम रिअली सॉरी ..."
तो हसतच इट्स ओके चालत अस कधी कधी.....
तुम्हाला शोभणार होतं ते वागणं . एका i.p.s च्या होणाऱ्या पत्नी आहात ना आपण एका . I.p.s ऑफिसरच्या पत्नी शोभता आपण ..."
 
ती जराशी कावरी बावरी होऊन लाजली , आणि हसली .
" थँक्यू आणि खरच स्वारी ..ओळखीचे नंबर फक्त मी रिसिव्ह करते . अनोळखी नाही ."

" हो ठीक आहे . पण अनोळखी ही करायला हवे . कधी कधी ते ही महत्वाचे असू शकतात .."

" Hmm यानंतर लक्षात ठेवेन.  थँक्यू बायदवे तुम्हाला माझा नंबर कोणी दिला ? "

" दिला नाही मीच घेतला . तुमचा मोबाईल बेड वर पडलेला होता . मी त्याच्यावरून माझ्या नंबरवर एक misscall केला होता .."

" Ohh ! nice ! तुम्हीही एक dashing . I.p.s शोभता  . "

" I.p.s ची वर्दी आम्हाला dashing वागायला भाग पाडते . "

" Hmm , i can understand "

" Hmm good , very good !"

" तुम्ही मला अरे तुरे करा ना ."

" अहो असं कसं एकेरी नावाने हाक मारणार "

" त्यात काय एवढं होणारे पती आहात तुम्ही माझे "

" Hmm correct आहे . मग तू ही अरे तुरे च कर की "

" अहो अशी कशी करणार ...अरे तुरे वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात . शिवाय होणारे पतीही आहात . "

" मग काय फरक पडतो . चालत सार जग किती पुढे चाललय आपण इथेच अडकून रहायचं का ?"

" ओके चालेल मी अरे तुरे करेन पण आपण दोघेच असताना . बाकीच्यासमोर अहो जाहो च करेन . चालेल ना ."

" Hnm चालेल . बरं मी ठेवतो मला एका महत्वाच्या कामासाठी जायचं आहे . बोलू नंतर बाय आता तरी नंबर save करून ठेव . "
.
" Hmm नक्की ठेवते . बाय टेक केअर .."
असं म्हणत ती हसतच फोन ठेवून देते ....आणि पुन्हा प्रतीलिपिवर् जाते ...

राहुलचा तिला रिप्लाय येऊन खूप वेळ झालेला असतो . आताही तो ऑफलाईन गेलेला असतो . Wp वर पण त्याने काही स्टिकर्स पाठवलेले असतात ..ती त्याला thanks म्हणून रिप्लाय करते.  बोलण तर त्यांचं होतच नाही .

ती अशीच एक पोस्ट करते ...

आजच्या ह्या क्षणाला ,
उदान आले होते मनाला ,
बावरलेल्या माझ्या सख्याला ,
सांगायचे होते खूप काही ..
पण न बोलताच तो ऑफलाईन गेला बाई ...

आणि लगेच ती ही ऑफलाईन जाते ...थोड्या राहुल ती पोस्ट वाचतो आणि तिला रिप्लाय देतो ..

आता तो ऑफलाईनच असणार ,
कारण तुच bussy असणार ...
आणि तो ही ऑफलाईन जातो ...दोन तीन दिवस होतात.  त्यांचं बोलणं होतच नाही ... काय माहित पुढे जाऊन होईल की नाही . दोघानाही आता भीती आहे . संपते की काय आता आपले प्रेम बंधन ...

मला ही भीती वाटते हे प्रेम बंधन संपते की काय ?
बघुया पुढच्या भागात ...
मागील पृष्ठ वाचण्यासाठी मागील पृष्ठ ह्या ठिकाणी क्लिक करा .....

🙏🙏🙏🙏🙏





थांबला प्रवास एका सुंदर नात्याचा ..

थांबला प्रवास एका सुंदर नात्याचा ,
जसा सायंकाळचा सुर्य नाही थांबत अस्ताचा ...

इवलस बीज रुजवलं होतं , दोन स्पंदनात ,
रोपट झालेलं झाड , आज कोलमडून पडलं एका क्षणात 

ना गेला होता तडा हृदयाला , ना मनाला ,
तरीही का थांबवावस वाटलं ह्या क्षणाला ..

भीती भविष्याच्या रम्य पहाटेची ,
तिनेच गोडी संपवून टाकली ह्या गोड नात्याची ...

 मनात असलेली स्वप्न भावना शून्य झाली ,
एकमेकांना विसरून जाण्याची पाळी त्यांच्यावर आली .

एकमेकांपासून दूर जाणं एवढं सोपं असतं का ?
ज्याची सवय झाली , त्याला नजर अंदाज करण शक्य असत का ?

खरच सलाम करायला हवा त्या दोघांना ,
ज्यांनी आपल सर्वस्व समर्पित केल होत एकमेकांना ..




Nov 22, 2021

व्यथा तिच्या आयुष्याची...भाग 1

ही कथा पूर्णतः काल्पनिक तेवर आधारित आहे . कोणत्याही घटनेशी किंवा व्यक्तीशी संबधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा .

व्यथा तिच्या आयुष्याची ,
कोमजून गेलेल्या एका कळीची ,
नियतीने वारंवार तिच्यावर अन्याय केला आणि एकटेपणाचा झरा दिला त्या मुलीची .............

आज ती खूप अस्वस्थ होती , तिच्या मनाची घालमेल न संपणारी होती . आयुष्याची व्यथाचं अशी होती की ही घालमेल कधीही न संपणारी होती . सांजवेळ सरून खूप वेळ झाला होता . सगळीकडेच अंधार पसरला होता , बाहेर लायटांचा लक्ख प्रकाश होता . हिच्या घरात मात्र आज किर्र अंधार दिसत होता . 
आयुष्यचं अंधारमय झाले होते , तर मग घरात प्रकाश असून काय फायदा होणार होता . आयुष्याची वेलचं करपली होती . तर मग फुले उमळतील तरी कशी अशी व्यथा तिच्या आयुष्याची होती .
डोक्यात हजारो प्रश्न घुमत होते , मनाला छळत होते . काय करावं सुचत नव्हतं , मनमोकळे पणाने कोणाशी बोलावं . कोण आपल्याला हक्काने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवून खळखळून रडून देईन ह्याचा ती विचार करत होती . तिच्या आयुष्यात चॉइस करण्यासाठी भरमसाठ माणसांची लिस्ट नव्हती . केवळ एकच जण तिला प्राणापेक्षाही जास्त प्रिय होती . ती अगदी तिच्या सावलीसारखी सतत तिच्या सोबत राहत होती . तिची प्राणप्रिय मैत्रीण ' सरिता ' ( बाई ) ती सरीताला बाईचं म्हणायची . आणि सरीता तिला म्हणजेच अनुष्काला
' अनु ' म्हणायची . 
खूप घट्ट मैत्रिणी एकमेकिंबरोबर सुखं - दुःख हक्काने शेअर करायच्या . दोघीं पैकी कोणीही चुकलं तरी हक्काने
एकमेकिंना आपल्या चुका दाखवायच्या . दोघींच्याही आयुष्याची व्यथा काही प्रमाणात सारखीच होती , असं म्हणायला हरकत नाही . त्यांची पहिली भेट महिला आश्रमात झाली होती . ' बाई ' महिला आश्रमात आरोग्य सेविका म्हणून काम करायची . ' अनु 'तिथे कशी आली ? का आली ? हे अजुनही कोणालाही माहीत नाही . आणि तिला कोणी तिच्या भूतकाळाबद्दल तिच्या फॅमिली बद्दल तिच्या पूर्व आयुष्याबद्दल विचारलं तर , तिला खूप त्रास व्हायचा . तो त्रास बघणाऱ्यालाही असह्य होणारा होता . त्यामुळे कोणीही तिच्या भूतकाळाबद्दल विचारण्याची तसदी घेत नव्हतं . 
महिला आश्रमाच्या ट्रस्टी यांना जी काही तिच्या बद्दल थोडी फार माहिती होती तेवढीच बाकी तिच्या पूर्व आयुष्याबद्दल कोणालाही काहीही कल्पना नव्हती . 
ट्रस्टी ने दिलेल्या माहितीनुसार , ती एका रात्री एकटीच भटकत होती . शरीराने खुपचं कमकुवत झालेली . सहनशीलता संपलेली . गरोदर असावी कधाचित सातवा महिना असेल . ती अचानक त्यांच्या गाडीला धडकून कोसळली आणि तिची बेशुद्ध हरपली . त्या अपघातात तिचं बाळही गेलं . बाळ गेल्याचा धक्का तिला सहन झाला
नव्हता ह्याचा पुरावा तिच्या ओक्साबोक्सी रडण्याने दिला होता .   
ती फार एकटी पडली होती . महिला आश्रमाने तिला आपुलकीचा हात दिला होता . म्हणून तिचा श्वास आज सुखरूप होता . असं असूनही ती सुरुवातीला फार काही त्यांच्यात मिसळत नव्हती . एकटी एकटी रहायची जेवढी काम नेमून दिलेली तेवढीच करायची . ती अशी का वागते ह्याचं कोड आजपर्यंत कोणालाही उलगडलेल नाही. ते कोड सोडवण्याचा कोणी प्रयत्नही केला नाही .
' सरीता ' म्हणजेच ( बाई ) ' आरोग्य सेविका ' चेकअप करण्यासाठी आश्रमात येते . तिने आज पहिल्यांदाच 'अनुला ' बघितलं होत . अनु एका बाकावर शांत बसली होती . ती तिच्याच विश्वात रमलेली असावी . बाई तिच्याजवळ गेली तिने दोनदा आवाज दिला , तिचं लक्षचं नव्हतं . मग बाई हळुवारपणे तिच्या पाठीवर हात फिरवत तिला विचारू लागली .
" कोण ग तू ? आणि एवढी शांत इथे एकटीच अशी का बसली ? " 
ती खूप घाबरली होती , बाईचा हात तिने खूप जोरात झटकला आणि तिथून काहीचं न बोलता निघून गेली . 
तिच्या अशा विचीत्र वागण्याचं कारण तिच्या लक्षात नाही आलं . तिने बाकीच्या महिलांना चेक केलं . आणि मग सरते शेवटी ती पुन्हा अनु कडे गेली तर , पुन्हा ती तिथून निघून गेली . कधाचीत तिचा होणारा स्पर्श तिला सहन होत नव्हता .  
ट्रस्टी चे नाव ' अनामिका ' महिला आश्रम असल्यामुळे साऱ्या मैत्रिणीच होत्या . जवळपास सगळ्यांच्या आयुष्याच्या व्यथा सारख्याच होत्या . त्या साऱ्या एकमेकींना नावानेच हाका मारायच्या . मॅडम , ताई , अशा हाका मारून दुरावा निर्माण करण्याची परमिशन तिथे नव्हती . अपवाद एकच होती ती म्हणजे सरीता , तिला सगळ्याजणी बाईच म्हणून हाक मारायच्या ती लाडकी होती . महिला आश्रमाचा आरसा होती . सकारात्मकतेची 
खाण होती . 
बाई जायच्या वेळेस अनामिका ला भेटते . आणि बोलता बोलता सहज विचारते , " ही नवीन आलेली मुलगी कोण ग ? इथे कशी आली ? आणि ती असं विक्षिप्त का वागते ? "

अनामिका खुर्चीवर बसलेली होती , ती उठली आणि जाऊन खिडकीजवळ जाऊन उभी राहिली . पाठोपाठ बाई ही जाऊन तिच्याबरोबर खिडकीजवळ उभी राहिली .   
अनामिका खिडकीतून अनुकडे बघत म्हणाली , " ही कोण आहे . आम्हालाही हीच्याबद्दल फार काही माहिती नाही . बाई तुला जेवढं मी हीच्याविषयी कॉलिंग वर सांगितलं तेवढंच माहिती आहे . यापलीकडे काहीचं नाही . " 

" ओह , आय सी असं आहे का काही , अनामिका मग तू काळजी करू नकोस . आता हीची केस मी हातात घेणार . 
हिच्या पूर्व आयुष्याबद्दल खडा न खडा माहिती काढणार."

अनामिका तिच्याकडे बघत आणि तिच्यासमोर हात जोडत , " हे बाई असे काहीही खटाटोप करू नको . तीला पूर्व आयुष्याबद्दल कोणीही काहीही विचारू नये . असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितल . " 

बाई , " पण का असं तिला काही विचारलं नाही तर , तिच्याबद्दल कसं कळणार आपल्याला . "

" ते कितीही खरं असलं तरी डॉक्टरांचं आपण ऐकायला हवं की नाही . "  
तिच्यावर जरा मोजक चिडत अनामिका तिला समजावू लागली .

बाई ती जिद्दी महत्वाकांक्षी जे हवं ते मिळवनारचं अशी तिची कॉलीटी . " पण एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे . " असं ती अनामिकाला सांगू लागली .

अनामिका हात जोडत , " नको बाई , तुला हीच्यात एवढाच इंटरेस असेल तर , एक कर हिच्याशी मैत्री कर .
ही आपल्यात कशी मिसळेल ह्याचा विचार कर . तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात व्हावी ह्यासाठी तिचा भूतकाळ विचारात घेण्याची गरज नाही . एक स्त्री म्हणून हिच्या आयुष्यात काय घडलं , ह्यापेक्षा आता हिच्या आयुष्यात काय घडायला हवं ह्याचा विचार आपण जास्त करायला हवा . आपल्या साऱ्यांच्या व्यथा काही प्रमाणात सारख्याच आहेत . म्हणून आपण इथे अश्या बांधल्या गेलेल्या आहोत . हीची कहाणी ही कधाचीत आपल्या सारखीच असेल . तिच्या त्या कहाणीचा तिला त्रास होत असेल . त्यामुळे आपण तिला न विचारलेलच बरं . सांगायचं असेल तर सांगेल कधीतरी स्वतःहून तो पर्यंत वाट बघू . " 
आणि ओठांवर नाजूक हास्य आणून ती तिच्याकडे बघत मान डोलवत " चालेल ना " बोलून गप्प बसते .

बाई तिचे गाल ओढत , " ओके डिअर मी नाही विचारणार तिला तिच्या भुतकालाबद्दल पण ; तिच्याशी मैत्री केली तर चालेल ना ? "

"हो ग माझी राणी चालेल , इन्फॅक्ट ही केस तू हॅण्डल करावी हिचं माझी आशा आहे . "

ओठांवर लांबलचक हास्य फुलवून बाई तुझी आशाची निराशा होऊ देणार नाही . " तिचं वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल करण्याची जबाबदारी माझी . तिच्या ओठांवर हास्य आणण्याची जबाबदारी माझी तिला आपल्यात सामावून घेण्याची जबाबदारी माझी तिच्या आयुष्याला वळण देण्याची जबाबदारी मात्र आपल्या सर्वांची . "

अनामिका हसत , हो ग आपण हिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचां . हिला आनंदी आयुष्य देण्याचा प्रयत्न
करायचां . बदलेल ती स्वतः ला हळूहळू . "

"हो ग असच होऊ दे " असं म्हणत बाई तिच्या हातात हात देऊन तिला धीर देते ..... 

तुम्हाला काय वाटतं अनु बदल करेल का स्वतःमध्ये ?
येईल का पुन्हा तिच्या चेहऱ्यावर हसू होईल का तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात ....?

बघुया पुढच्या भागात ...





पूर्णविराम ...

तुझ मन काही कळेना ,
मला माझेच मन सापडेना ...

गहिवरले रे हे क्षण ,
त्याहूनही खट्याळ तुझे मन ,
थाऱ्यावर नसतेच क्षण भर ...

तुझ काही कळत नाही ,
तेव्हा मला माझही कळत नाही ...

गुरफटते तुझ्यात पुन्हा पुन्हा ,
मग स्वतःच हरवून जाते ,
स्वतःलाच नकोशी वाटते ,
ही आस आता सरणावर धाव घेते ..
तुझ्या माझ्या नात्याला मी आज पूर्णविराम देते ...

उमेद ही सापडेना ..

मळभ मनावरचे जाईना ,
उमेद ही सापडेना ...

जगण्यास माझ्या पंख फुटेना ,
मेहनती स बळ हे लाभेना ...

फिरून फिरून मी तिथेच येऊन थांबते ,
जिथून माझ्या फिरण्याची सुरुवात होते ...

डोळ्यांसमोर किर्र अंधार पसरतो ,
त्या अंधारात प्रकाश किरण ही हरवून बसतो ...

लख लखणाऱ्या प्रकाशात ,
मी प्रगतीचे सुर शोधते ,
पण ते सूरही मला अप्रगती कडेच नेऊन सोडते ...

नियती ,
ढगाआड झालेला सुर्य पुन्हा पुन्हा उगवणे ,
 हजारो सुर्य उगवून ही ,
मला उमेद ही सापडेना ..
मलभ मनावरचे काही जाईना ...

Nov 21, 2021

मी त्याला असं उत्तर दिलं ...

त्याने मला विचारलं , 
मी तुझ्यासाठी काय आहे ? 
मी त्याला असं उत्तर दिलं ....
माझ्या हातावरील मेहंदीत मी टिपलेल एक अक्षर आहे ,
ज्याला बघून डोळ्याचे पारणे फिटतात ती पारणे आहे . 
माझ्या स्पंदनांची एक अनामिक ओढ आहे ..
माझ्या सकारात्मक तेची तू विचारसरणी आहे ..
मी घेते जो श्वास , त्या श्वासाचा तू ऑक्सीजन आहे ..
तू माझ पूर्व जन्मीच एक गुपित आहे ,
ह्या जन्मी तु माझ सात पावलांच एक निरागस स्वप्न आहेस ....




प्रेम बंधन 11

राहुल आणि नित्या लग्न झाल्यानंतरही त्यांची मैत्री जपू लागले . राहुल तिला रिदिमाचे एक एक नखरे सांगून हसवू लागला . तो रिदिमा बरोबर जराही खुश नव्हता हे तिला सहज कळलं होतं . पण तिने त्याला , " तू रीदिमा बरोबर खुश नाहीस ना " असं कधीही विचारलं नव्हत . कारण तिने जर तस त्याला विचारलं असतं तर , तो खूप hurt होईल ह्याची तिला खात्री होती . म्हणून ती कळूनही न कळल्या सारखी वागायची . 

त्याचं लग्न झालं होतं , पण तरीही तो अजुनही नित्या मध्ये गुंतलेला होता . अजुनही तो तिच्यासाठी रचना करायचा . तीच्यासाठी केलेली प्रत्येक रचना तिला आवडायची . त्या प्रत्येक रचनेला ती कॉमेंट करायची ..
त्याने तिच्यासाठी केलेली एक रचना अशी होती ...

भगवान ने भी क्या किया ,
जीसको मैने दिलं था दिया ..
उसी से ही अलविदा किया ..
मै भी अभी तक उसको भुल न पाया ..
क्या अजनबी है इस दिल की दास्तान ...

ही रचना वाचून नित्या एकदम भाऊक झाली . नकळत तिच्या डोळ्यातून ही अश्रू ओघळले ...
तिने त्याला कॉमेंट केली....
 
अलविदा नही ,
एक नये मोड पर ,
फिर उससे ही मिलाया है ..
जीसको आपने दिलं है दिया ...
उस रिश्ते की कोई पहचान न होगी 
लेकिन एक जरूर ,
उस प्यार की उमर बढ़ती ही रहेगी ।
जितना प्यार अब है ।
इस पल ,
उतना ही प्यार आखरी सांस तक रहेगा ।
इसी जन्म में नहीं ।
अगले सातो जन्मों तक रहेगा ।।
है वादा है मेरा आपसे ।
दिया हुआ दिल से  ....😊😊😊🥰🥰🥰🥰
राहुल कॉमेंट वाचून 👍👍👍असा रिप्लाय करतो ...
आणि लगेच तिला कॉल करतो ..

" हाय ! कशी आहेस ? "
" मी मस्त ..तू ? "
" मी पण एकदम झकास ."
" Hmm फ्री आहेस वाटत म्हणून कॉल केला . हो ना ."
" नाही "
" मग "
" बायको गेली ना माहेरी म्हणून " आणि मोठं मोठ्याने तो हसायला लागला ...
ती त्याच्यावर जराशी चिडली अलगद अशी हसत " राहुल तू पण ना "
" काय ग काय मी पण "
" काही नाही "
" सांग ना काय मी पण "
" खूप छुपा रुस्तम आहेस ..एक नंबरचा खडूस आहे . सारखा छळत असतो मला .."
तिच्या अश्या बोलण्यावर तो पुन्हा हसायला लागला . आणि तिला चिडवत बोलला , " हे बघ मी काही तुला छळत नाही ...तुला छलन हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे . तो काही विसरत नाही .." आणि परत हसायला लागला ..
ती जराशी रुसत आणि वाईट वाटल्याचा आव आणत ,
" जा नको बोलुस तू माझ्याशी ठेवते मी फोन .."
आणि ती लगेच फोन कट करते ...
तो परत तिला कॉल करतो ..
" अशी काय ग तू ? "
ती जरा हटके आणि मटक्या मारत .." कशी रे मी ? सांग बर जरा ."
" हे काय माझी बायको माहेरी गेली ना , जरा तिच्या जाण्याचा आनंद घेऊ दे ना मला .." 
" मग जा की हॉटेल मध्ये जेवायला . By yy"
असं म्हणत ती परत फोन कट करते ..तो परत तिला कॉल करतो ..
" काय चालू आहे तुझ ..का एवढा भाव खातेस ? "
" तू का मला एवढं छळतोस ? "
" स्वारी यार आय एम स्वारी .."
" Good mr . R. पाटील .."
" Love you "
" Love you to ..काय रे आज तू फ्री कस काय ? "
" आज काम थोडी होती . मग ऑफिस ला नाही गेलो .तुझी आठवण आली मग कॉल केला . नाही आवडल का ? "
" अशी बोलली का मी , तू पण ना मनाचे तर्क लावतो ."
" ती सवय आहे . तू अजुन मला पूर्ण जाणले नाही . त्या जाणून घे बालिके .."
" हो बालका ..नक्की प्रयत्न करते . आपले आशीर्वाद असू द्यावेत म्हणजे जाणून घ्यायला सोपं जाईल ."
" तथास्तु !!!"
" वेडा पेडा ...पुरे झाला हा तमाशा .."
तो हसत ती ही एक क्षण हसण्यात ते हरवून गेले ..
थोड्या वेळाने तो तिला विचारायला लागला . "तुझ्याकडे काही good news आहे की नाही ? "
" आहे ना उद्या बघायला मुलगा येणार ..बाबा मुलगा चांगला आहे . असं बोलले ... आय.पी.एस आहे .. त्या ला जर मी पसंद पडले . तर यंदा कर्तव्य आहे . "
" व्वा मस्तच ! मग तू माझा पिष्चा सोडणार तर , "
" म्हणजे तुला म्हणायचं काय ? "
" अगं तुझ लग्न झाल्यावर आपली मैत्री संपेन ना ."
" असं का वाटलं तुला . तुझ लग्न झाल्यावर संपली का आपली मैत्री ? नाही ना ! मग माझ लग्न झाल्यावर ही नाही संपणार . डोन्ट वरी .."
" नक्की ना " आता जरा तो भाऊक झाला होता ." 
" 💯टक्के नक्की .  अरे वेड्या तो आय .पी .एस आहे ना सारखं सारखं थोडी माझ्याजवळ असणार .." आणि ती हसायला लागली . 
" अग खर ग . देवाने हे एक बरं केलं बघ . रिदिमा actress आणि हा i.p.s.दोघेही bussy ."
" हो "
" मग उद्या तुझ लग्न नक्की ठरायला हवं ."
" ते तर नक्की होणारच राहुल .  त्याने पाहिलंय मला याआधी ...पण तू येशील ना माझ्या लग्नाला .."
" हो नक्की येईन . "
" मी वाट बघेन .. तू माझ्या लग्नाला यावं . माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोड क्षणाला तू तिथे असायला हवा. असं मला मनापासून वाटतं ."
" येईल की . तू फक्त लग्न चोरुन नको करू . कळव . मला हळदी पासून येइन् ."
" हो नक्की ..लव्ह यू बाय बाबा आले . बोलू नंतर ."
" हो काळजी घे .आणि आठवणीने कळव ..मी वाट बघतोय ..लव्ह यू टू .."
" Hmm " 
ती लगेच फोन कट करून खूप रडते ...आपल्यावर आता दोन दोन विश्वासू नात्याची जबाबदारी असणार . ती जबाबदारी आपण पेलवू शकू ना . ज्याने आपल्यावर जिवापाड प्रेम केलं . आपल्यापासून कधीही वेगळं  न होण्याचं  स्वप्न पाहिलं . त्याचं आपण ते स्वप्न पूर्ण करू शकू ना ..."

काय वाटतं तुम्हाला नित्याच्या लग्नाने त्यांचं प्रेम बंधन तुटेल का ? 
मलाही खूप प्रश्न पडलेत ती प्रश्नाची उत्तर मात्र मी नक्की शोधणार तो पर्यंत तुम्ही वाचत रहा . प्रेम बंधन ..

मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ठ ह्या ठिकाणी क्लिक करा ..

🙏🙏🙏🙏🙏


प्रेम मैफिल ...

मैफिल ही रंगली होती ,
मनात नवी पालवी फुटली होती ,

त्याला मी माझ्या हृदयाशी जोडले होते ,
त्यानेही काळजावर माझेच नाव कोरले होते ...

प्रेम मैफिल ही रंगली होती ,
प्रेम वेड्या राजा राणीची ...

मनात रोज पालवी फुटत होती ,
एकमेकांशी बोलण्याची ,
उणीव भासत होती ती वेळेची ..

राणी नाराज व्हायची ,
राजा bussy असायचा ,
तरीही हट्ट होता तिचा त्याला समजून घ्यायचा ,
समजून घेणाऱ्या राणीच्या प्रेमात राजा पुन्हा पुन्हा पडायचा ...
प्रेम मैफिलीला ह्या नव्याने रंग चडायचा ..

नातं कोणतेही असो समजून घेणं खूप गरजेचं असतं ..

Nov 20, 2021

मी लिहिते ...

मी लिहिते श्वास घेण्यासाठी ,

मी लिहिते समाजासाठी ,

मी लिहिते स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी ..

मी लिहिते भूतकाळ विसरण्यासाठी ,

 मी लिहिते उज्वल भवितव्यासाठी ,

मी लिहिते दिवसाची गोड आठवण रचनेत साठवून ठेवण्यासाठी ..

मी लिहिते एक क्षण अनेकदा आठवण्यासाठी ..

 मी लिहिते माझ्या आनंदासाठी ,

मी लिहिते माझ्या समाधानासाठी ..

मी लिहिते माझा छंद जोपासण्यासाठी ...

मी लिहिते माझ्याच विश्वात हरवून जाण्यासाठी ,

मी लिहिते स्वप्न पूर्तीसाठी ,

मी लिहिते ध्येयपूर्तीसाठी ..

मी लिहिते एक उत्तम लेखिका बनण्यासाठी ,

हजारो वाचकांच्या मनात घर करून राहण्यासाठी ,

युगान युगे माझ लिखाण अजरामर होण्यासाठी ,

स्वरगगवासी होऊनही रचनेच्या स्वरूपात जिवंत राहण्यासाठी ....

मी लिहिते एक मोकळा श्वास घेण्यासाठी .....

एकत्र राहण्यात खरी मजा आहे ...

नात्याची वीण नको उसवुस ,
नको उगाच वाद वाढवुस ....

समजून घे जरा ,
घर आहे भांड्याला भांडं लागणारच ,
भांडणे ही होणारच ...
नको एवढं मनाला लावून घेऊस ,

असा तावातावाने चुकीचा निर्णय घेऊन पस्तावशील ..
मग उगाच एकटी पडशील ,
तुझ्या आनंदाला तू मुकशील ,
मग रड रड रडशील ....

घर बांधून ठेवण्यातच खर स्त्रीत्व आहे ,
घराला घरपण आलेल्या घरातच तिचं अस्तित्व आहे ..
ते अस्तित्व जप , ह्या घराला बांधून ठेव ...
एकमेकांना समजून घेऊन एकत्र राहण्यातचं खरी मजा आहे हे जरा मान्य कर ....!!!

इथे यमक जुळल नाही ...कविता मुक्तछंद ह्या श्रेणीत आल्यामुळे एवढं लक्ष दिलं नाही ...



Nov 19, 2021

एक पुरुष ...

एक पुरुष मानल तर देवासमान आहे ,
 नाही मानल तर भावना शून्य आहे ...
पुरुष खूप काही करत असतो ,
 नियतीच्या डोळ्यांत तरीही कुठेतरी कमीच पडत असतो . दीन रात कुटुंबासाठी झिझत असतो ...
तरीही फॅमिलीत अकडू खडूस ह्या नावानेच फेमस असतो ..
कष्ट करतो झळ त्याच्या खिशाला लागते . काटकसरी चे लेक्चर तो देतो .
 काटकसरीचे लेक्चर देतो म्हणून तो चिकट म्हणून ओळखल्या जातो ...
स्वबळावर साऱ्या कुटुंबांचा कारभार तो चालवतो ,
 आपले कर्तव्य पुरेपूर पार पाडतो .
असा तो श्रेष्ठ पुरुष ,
 आजही कुठेतरी कमीच पडतो ,
असं ह्या जगाने विधिलिखित केलेलं ..
त्याच अस्तित्व पुरुष ते पुरुषच ह्या नावाने निर्मिलेल् .
योग्य आहे का ? कुठेतरी ते विधिलिखित केलेलं वाक्य बदलायला हवं ..त्यालाही जरा समजून घ्यायला हवं .
पुरुष आणि स्त्री हे दोन चाकं मिळून हे सृष्टी चक्र चालत .
मग दोघांनाही समान सर्व्हिस मिळायला हवी ..हो ना एकदा त्या देवासमान पुरुषालाही समजून घ्यायला हवं .
आयुष्याचं एक नवीन पल टायला हवं ...
त्याच्यावर पुरुष जातीच सन्मान करणार चिन्ह हवं नवं ..

ह्या जगातील खूप सारे पुरुष हे खूप चांगले आहेत , काही वाईट प्रवुत्ती च्या माणसामुळे संपूर्ण पुरुष जातीलाच आपण वाईट नाही ठरवू शकत ...खूप सारी पुरुष हे देवासमान आहेत ..त्या देवासमान माणसांचा खरच सन्मान करायला हवा , मनापासून वाटतं ...

पुरुष दिनाच्या सर्व पुरुष वर्गाला खूप खूप शुभेच्छा ...💐💐💐💐💐💐💐




मनाची तयारी झाली नव्हती ...

बरीच खलबत झाली होती ,
मनाची तयारी झाली नव्हती ...

तुझ्यासोबत जगण्याची तर स्वप्न पाहिली होती ,
रित्या ह्या मनाला अजुनही भीतीची सवय होती ,
तुझ्या अस्तित्वाचीचं जाणीव नव्हती ..

ओळखीची वाट ही अनोळखी भासत होती ,
तुझ्या सहवासातही आज मी एकटीच होरपळत होती ..
तुला तर त्याची कल्पनाच नव्हती ...

बरीच खलबत झाली होती ,
तुझ्या माझ्या नात्याची कोणी गिणतीच नव्हती केली ,
कोणी आपल्या नात्याला समजून घेईल ,
हे नातं आनंदाने स्वीकारेल .....
हे मान्य करायला अजुन मनाची तयारी झालीच नव्हती ...

Nov 18, 2021

सांग सखे ..

पुन्हा एकदा सांग ना सखे ,
मनातलं तुझ्या ओळखायचे कसे ,
तुला डोळेभरून बघायचे कसे ,
सुर तुझ्या ओठातले छेडायचे कसे ,
नजरेने नजरेला इशारे करायचे तरी कसे ..
जग माझे तुझ्या शिवाय पूर्ण होऊ शकते ,
हे मान्य करायचे मी तरी कसे ,
तुझ्या शिवाय जगायचे तरी कसे ,
सांग सखे सांग सखे ...

प्रेम बंधन भाग 11

राहुलने नित्याला wp दिला होता . तिला खूप आनंद झाला होता . त्यालाही तिचा आवाज ऐकायचा होता . 
कितीतरी दिवसापासून त्याच्या मनात होतं . पण अस डायरेक्ट म्हणणार तरी कसं म्हणून त्याने टाळलं होतं . 
पण आता मनासारखं सार घडलं होतं . म्हणून दोघेही खूप खुश होते ...!!!
राहुलने ज्यादिवशी नंबर दिला , त्याच्या दुसऱ्या दिवशी स्पेशली तिच्याशी बोलण्यासाठी त्याने वेळ काढला होता . तिलाही फार आनंद झाला होता . पण त्याच असं विचीत्र वागणं जरा तिला खटकायच . ती त्याला डायरेक्ट तस् बोलूनही दाखवायची . तो त्याच्यावर फक्त तिची खिल्ली उडवायचा आणि तिचा जीव चिरखी आणायचा .  ती त्याच्यावर निशब्द व्हायची . 
बोलण्यासारखं काही तिच्याकडे रहायचं नाही . 
म्हणून स्वतःच विषय स्टॉप करायची ....आणि नवीन विषयाला हात घालायची ...
तो पण समजूत दार होता ..त्यामुळे नात्यात अडी निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता ...
खूप छान नातं त्यांचं रंगल प्रेमाने आता खूपच छान वळण घेतल होतं ..पण वेळ त्यांच्यात वेळेची खूपच कमतरता होती .. इच्शा असूनही ते एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हते . दोघांनाही वाईट वाटायचं मन खूप हळवं व्ह्यायच . पण एकमेकांना समजून घेण्या पलिकडे त्यांच्या हाती काहीच नव्हत .    

त्याने ज्यादिवशी तिच्यासाठी वेळ काढला होता . त्यादिवशी तीही जरा फ्री होती . म्हणून त्याच्याशी बोलू शकली होती . त्याने बोलता बोलता डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला . तिला खूप छान वाटलं , पण तिने कॉल कट केला . त्याने तिला परत कॉल केला , परत तिने कट केला . मग तिसऱ्यांदा तिने रिसिव्ह केला आणि मोबाईल स्क्रीन वर केली . तिने त्याला आपला चेहरा दाखवला चं नाही .  त्याने मग व्हिडीओ कॉल कट केला आणि व्हाइस कॉल केला . थोडंसं बोलले ते एकमेकांशी ती बोलता बोलता बोलून गेली . तू तर कॉल करणार नव्हता ना मग कसं काय केला ? "
असं ती विचारत नाही तर लगेच त्याने कॉल कट केला . 
आणि मेसेज केला " बघ तू म्हटली ना कॉल कट केला ." " अरे तू असा कसा रे खरच ग्रह फिरतात राहुल तुझे "
😂😂🤣🤣🤣तो ह्याच्यावर फक्त हसला . 
त्याने स्टिकर्स पाठवून तिला खूप हसवलं . सारे hurt स्टिकर्स होते . अलगद त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम तिच्यापर्यंत पोहोचत होत . पण  खरच तसचं असेल 
का ? इथे ती जराशी अडकत होती . 
पुढे जाऊन त्यांची स्टोरी खूप छान रंगात चालली होती .
दोघेही एकमेकांना आयुष्भर  साथ देण्याची सुखी संसाराची स्वप्न बघत होते . माहीत होत एकमेकांच्या आयुष्यात कधीही येऊ शकणार नाही . तरीही एकमेकांना जिवापाड जपणार अशी त्यांची शपथ होती . त्यांनी घेतलेली .  त्यांची लव्ह स्टोरी कुठेतरी थांबणार होती हे दोघांनाही माहीत होतं . तरीही त्यांनी एकमेकांशी concet रहायचं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत असं ठरवलं होतं .
आणि तसचं झालं राहुलला एका  खूप छान मुलींचं स्थळ आलं . त्याच्या आईने खूपच फोर्स केलेलं म्हणून त्याला नाईलाजाने लग्नासाठी होकार द्यावा लागला . 
रिदिमा राहुलची होणारी बायको एक छोटी मोठी अॅक्ट्रेस होती . फिल्म इंडस्ट्रीत करियर करायचं . हेचं तिचं स्वप्न होत . हे त्याला सुरुवातीला माहीत नव्हतं . लग्न झाल्यानंतर त्याच्या स्वप्नाशी तिची गाठभेट झाली होती . तो पर्यंत त्याला तिच्याबद्दल काहीचं माहीत नव्हत  . त्याला एकदम सिंपल मुलीशी लग्न करायचं होत . त्याच्या आईची मनापासून सेवा करणारी आणि आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी बायको त्याला अपेक्षित होती .पण नियतीने त्याच्या अपेक्षांचा अपेक्षाभंग केला . त्याला त्याच्या मनात असणारी छबी भेटलीच नाही ..भेटली ती काहीतरी वेगळीच अनोळखी.

राहुलचं लग्न झाल्यानंतर 1 महिन्याने नित्याला कळत की राहुलचं लग्न झालं .  ते ही शशी कडून तोपर्यंत तिला त्यांचं लग्न ठरल हे सुध्दा माहीत नव्हतं . तिला अचानक कळत त्यामुळे जरा धक्का बसला होता . डोळ्यांमधून अश्रू धारा नकळत वाहू लागल्या होत्या . शशी तिला सहज विचारतो , " एवढी मोठी गोष्ट राहुल ने तुझ्यापासून लपवून ठेवली . तुला सांगितल नव्हत त्यांचं लग्न ठरलं म्हणून ."
त्यावर नित्या डोळ्यांमधले अश्रू पुसत त्याच्या मेसेज ला रिप्लाय करते . " अरे सांगितल होत मला त्याने त्याच्या बायकोचा फोटो पण पाठवला होता . पण लग्नाला मी नव्हते येऊ शकणार म्हणून नाही आले . बाकी काही नाही . चल बाय आता बोलू नंतर . " अस म्हणत तीने कॉल कट केला . आणि राहुल ला hi , how are you असा मेसेज टाकला . एक दीड महिन्यापासून एकमेकांशी बोलण झाल नव्हत म्हणून कधाचीत नियतीला त्यांचं बोलणं घडवून आणायच होत . म्हणून नशिबाने आज राहुल ऑनलाईन होता . लगेच त्याने तिच्या मेसेज ला रिप्लाय केला . 
" मी मस्त आहे . "
" तू कशी आहेस ? I miss you "
तिने  त्याच्या ह्या मेसेजे ला त्याला रिप्लाय केला .
" मी पण खूप छान आहे . 👌👌👍👍🥰🥰🥰
अभिनंदन राहुल ...तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा एन्जॉय कर तुझ्या लाईफ पार्टनर सोबत ."💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫हे मेसेज करताना तिच्या भावना कोमजुन गेल्या होत्या . मन तळ मळ ल होतं . आपली हक्काची गोष्ट कोणीतरी हिरावून घेतली .
ह्या गोष्टीचं तिला सगळ्यात जास्त वाईट वाटलं होत .
राहुलने रिटर्न रिप्लाय फक्त thanks एवढाच केला . आणि वर मेसेज केला . 
" थट्टा करत आहेस का माझी ? "
तिला काही कळलं नव्हतं म्हणून तिने म्हणजे हा मेसेज तिला केला . 
त्याने , " काही नाही सोड बाय असा रिप्लाय केला ." 
तो डिस्टर्ब असल्याचं तिला जाणवलं मग लगेच तिने त्याला कॉल केला . त्यानेही रिसिव्ह केला , त्याच्याही मनात होतं तिच्याशी बोलून मोकळं व्हायचं . त्यांच्यात आलेला एक महिन्याचा दुरावा त्याला आवडलाच नव्हता.

तीही लगेच सुरू झाली .
      " काय राहुल बोलायची  इच्छा नाही का हक्कांची बायको आली म्हणून ही मैत्रीण परकी झाली का ?"
आणि रडवले ल्या स्वरात म्हणाली i miss you राहुल "
त्याने तिला सांगितल तू रडू नकोस आणि तिच्याबरोबर स्वतःही रडायला लागला . मग तिने ही त्याची उडवली .
" मला रडू नको म्हणतोस आणि स्वतःच रडतो . "
दोघेही रडायला लागले एक क्षण स्तब्ध झाले .

मनात साठवून दुःख ,
चेहऱ्यावर दाखवू लागले सुख ..
लपवून ते रडगाणे ,
गाऊ लागले सुर प्रितीचे नव्याने ...

दुभंगलेल्या रस्त्याला ,
तुटलेल्या मनाला ,
हळव्या झालेल्या ह्या क्षणाला ,
नव्याने पुन्हा एकदा प्रेम बंधनात ,
 बांधू लागली ही नियती ..
नव्याने एक वचन ती त्याला देऊ लागली ,
वचन मी पुरेपूर निभवेन राहुलची छबी तिला सांगू लागली ..

ओळखीच्याच अनोळखी झालेल्या दोन जीवांना एक करू लागली ही नियती ...पुन्हा नव्याने एका प्रेम बंधनात अडकवू लागली ही नियती ....

तो तिला सांगू लागला , " माझी इच्छा असताना ही मी तुला माझी अर्धांगिनी करू शकलो नाही . आय एम स्वारी ."
" इट्स ओके राहुल नशीब नव्हतं ते आपलं , ह्या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी मात्र मलाच तुझी अर्धांगि नी व्हायची य . पण  तू मला प्रॉमिस कर तू मला ह्या जन्मात एक मित्र म्हणून कधीही अंतर देणार नाही ..."
" कधीच नाही देणार .. थॅन्क्स नित्या तू ही मला एक प्रॉमिस कर , तू ही मला एक मैत्रीण म्हणून कधीही अंतर देणार नाही .."
" शक्यच नाही ..मी वचन देते राहुल तुला मी  एक मैत्रीण म्हणून कधीही अंतर देणार नाही .."
आपल प्रेम बंधन ह्या जन्मात तरी संपणार नाही . "
आयुष्याच्या कुठल्याच वळणावर आपण एकमेकांची साथ सोडणार नाही. जस नातं आपल्यात पूर्वी होतं तसचं आपण आताही ठेवू आपली कर्तव्य सांभाळून ..चालेल ना .."
"हो नक्की i love you "
" I love you to "

निभावू शकतील का ? राहुल नित्या त्याचं हे प्रेम बंधन कोणते कोणते वळण येतील त्यांच्या प्रेम बंधनात ते बघुया पुढच्या भागात ...
मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ठ ह्या ठिकाणी क्लिक करा ...




जुळता जुळता जुळल ..

जुळता जुळत जुळल ,
नातं हे अनोळखी ,
अनोळखी वळणावर येऊन थांबल ...

रुसवे फुगवे खूप होते ,
तरीही एकमेकांना एकमेकांचे ,
आकर्षण होते ...
समजून घेण्याचे पक्के इरादे होते ...

तो होताच आकडू ,
दिलदार मनाचा ,
म्हणून तर आज अनमोल हिस्सा माझ्या आयुष्याचा ..

रचना आणि स्टिकर्स मधून केव्हाच व्यक्त झालो ,
त्या अडीच शब्दांसाठी जरासो रेंगाळलो ,
आतुरतेने वाट बघू लागलो व्यक्त होण्याची ,
आयुष्याला एक नवीन वळण देण्याची ..
अपूर्ण ह्या नात्याला योग्य ते नाव देण्याची ...

सांग ना ग सखे ...

पुन्हा एकदा सांग ना सखे ,
मनातलं तुझ्या ओळखायचे कसे ...
तुझ्याशी न बोलता मी जगायचे कसे ...
तुझ्याविना जगासमोर होईल ग माझे हसे ...
माझ्या मनी आहे तुझ्याच विचारांचे ठसे ...

सांग ना ग सखे ,
तुझ्याविना मी जगायचे कसे ...
भरल्या ह्या संसारात रमायचे कसे ,
अगंन माझे हे तुझ्याविना सूने सूने ....
सांग ना ग सखे ,
तुझ्याविना मी जगायचे कसे ...

Nov 17, 2021

किती ह्या नात्याला सावरू..

किती ह्या नात्याला सावरू ,
तुला समजून घेता घेता किती हे मन आवरू ...

तुझ्यासाठी खूप काही करते ,
तरीही कुठेतरी कमीच पडते ...

तुला कधीही दुखवायचं नाही ,
आयुष्य सरलं तरी गमवायच नाही ..
मनात हेच पेरलंय ..
तुझ्यासाठी रे आयुष्य माझं मी बांधलंय ..

तुझी काळजी करण मला भावत ,
तुझ मला छळन खूपच आवडत ...
  धावणार मन हे कुठेतरी थांबत ...
तुझ्यापाशी येऊनच तर ते विसावत ...

सांग ना सख्या...
किती ह्या नात्याला सावरू ,
तुला समजून घेता घेता किती हे मन आवरू ....




मी फक्त तुझीच आहे ..

हेवे दावे हे कशाला ?
किती या वेदना मनाला ..

प्रेम दोघांचेही आहे ,
मग व्यक्त का तू एकट्याने व्हावे ,
तुझ्या अडीच शब्दांना , 
माझ्याही अडीच शब्दांचे किनार लाभावे ...

नको वेदना ह्या मनाला ,
सांगते तुला क्षणा क्षणाला ,
मी फक्त तुझीच आहे ,
आणि तू ही फक्त माझाच आहेस ..

ह्याचं जन्मी नाही तर , पुढच्या सातही जन्मी ..
 तुझ्यासोबत सप्तपदी चालण्याचे स्वप्न मी रोज बघत आहे ....



Nov 16, 2021

माझ्या ह्या सुरांना ...

हरवलेल्या माझ्या सुरांना , 
सुर जरा तू दे ,
मला तुझ्या मिठीत घे ..

अनोळखी ह्या वाटेवर रेंगाळले स्वर 
त्या स्वरांना सावर रे क्षण भर ..
हळुवार माझ्या मनाला घाल रे तू फुंकर ...

लाजुळूचे झाड मी तुझ्यात सामवण्यास लाजते ,
तुला बघताच भावनांचे फूल होऊन फुलते ..
तुझ्या स्पर्शाने अनोखेच तेज चेहऱ्यावर पसरते ..
कोमजूनही पुन्हा पुन्हा उमलते ....

नाते हे सप्त पदीचे निभवण्यास खंबीर होते ,
माझे अपूर्णत्व तुझ्यात सामावून घेते ..
माझ्या ह्या स्वरांना सुर तुझे जोडते ....

प्रेम बंधन भाग 10

राहुल नित्याचे लाईफ जरी खेळी मेळीने चालू असले .
तरी ,  त्याचा तिच्याकडे नंबर नसणं तिला खूप खटकायच. तो आपल्याला एवढं महत्व देतो , मग नंबरच का नाही .
आपण एवढं परको आहोत ह्याला की नंबर द्यायला टाळाटाळ करतो . तिला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं.
तो तिला एवढं छान बोलायचा की हाच तिचं आयुष्य आहे . तिला ही त्याचं तिचं तस वागणं खूप आवडायच, त्याचं अधिकार गाजवण तिला एक नवीन प्रेरणा देऊन जायचं . त्याच नातं खूप छान आहे , अस काहीस तिला वाटायचं .
होतच त्यांचं नातं खूप छान , त्या नात्याला नाव गाव काहीही नव्हत , तरी ते जगातील सर्वात सुंदर नातं भासत होत .
पण हल्ली जरा त्याचं विचीत्र वागणं  सुरू झालं होतं .
तो तिच्याशी concet तर होता . पण तिच्या पासून तो दूर दूर पळायचा अस काहीस तिला फिल व्हायचं . व्हायचं नाही तर , तसचं काहीस होतं 
त्याला भीती वाटायची .तिच्याच अडकण्याची , तिच्यात गुंतन्याची ह्याउलट ती होती , तिला अजिबात भीती वाटत नव्हती त्याच्यात अडकण्याची त्याच्यात गुंतंन्याची. कारण तिला त्यांची मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत निभावायची होती . मनापासून तिने त्याला आपला मित्र मानल होतं . प्रेम होतं की नाही माहीत नाही , पण मैत्रीचं नातं एवढं घट्ट होत की कोणी जलाव आणि त्यांच्या नात्याला दृष्ट लागावी . 
तो तिच्याशी concet होता , ती ही त्याच्याशी खूप concet होती . एकमेकांशी एक दिवस जरी बोलणं झालं नाही . तर त्यांना आपला दिवस पूर्ण झालाच नाही,
असं वाटायच . त्यांचं दररोज बोलण झाल नाही तरी दिवसातून एक तरी त्यांचा एकमेकांना मेसेज व्हायचा .
" Hi ,  how are you " आणि त्या मेसेज चे रिप्लाय यायचे हे ठरलेलं असायचं . त्यामुळे त्यांचं नातं कधीच disconcet झाल नाही .

पण हल्लीच त्याच तस् वागणं तिला असंख्य वेदना देऊन जायचं . तिला खूप त्रास व्हायचा , तो आपल्यापासून दूर दूर पळतो . ही वेदना तिच्यासाठी खूप मोठी होती .
कारण तिने त्याच्यावर कधीच बंधने लादली नव्हती . एक मैत्रीण म्हणून तिने त्याला त्याने तिला पूर्ण फ्रीडम दिलं होतं . त्यांच्या नात्यात खूप फ्रीडम होतं .  
आपलेपणा होता ओढ होती ...

म्हणून तर तिचा त्याच्याकडे नंबर नसणं तिला न पटण्यासारखे होत . तिने आता हट्टच धरला होता . की त्याने आपल्याला आता तरी त्याचा नंबर द्यावा . आणि त्याला ही वाटायचं हिने आपल्याला तिचा फोटो पाठवावा . ती हट्टाला पेटली होती की त्याने आपल्याला नंबर द्यावा . आणि तो ही हट्टाला पेटला होता की हिने आपल्याला फोटो द्यावा . 
तो तिचा सुपर फॅन झाला होता . त्याला वाटल ती आपल्याला सहज फोटो पाठवेन . पण आता ती काही त्याचा नंबर घेतल्याशिवाय शांत बसणार नव्हती .
त्याने तिला मेसेज केलेला होता . 
" फोटो पाठव की प्रतिलीपी वर chat room मध्ये "
तिने त्याला असा रिप्लाय केला .
" राहुल मी का रे तुझ्या तालावर नाचाव " 
" नाच की आपल्याच माणसाच्या तालावर नाचायचं असतं ना "
" हो का ?  मग तू नाच की काय फरक पडतो . "
" मी फक्त बायकोच्या तालावर नाचणारे "
" नाच मग , पण मी नाही कोणाच्या तालावर नाचणार 
नवऱ्याच्या सुधा .."
" जाऊ दे सोड मग "
" म्हणजे "
" काही नाही "
" ग्रह फिरतात की काय राहुल तुझे "
" हो ग्रह हे फिरण्यासाठीच असतात . एका जागी स्थिर राहिले तर , हवामान कसे बदलणार ."
" खरच तुझे ग्रह बदलतात . तू ना एक जगावेगळ
प्रकरण आहे . ते कोणीही वाचू नाही शकणार . जाऊ दे देते मी विषय सोडून "
" Hmm "
" म्हणजे मी काय समजावं नक्की " 
" ते सोड तू मला फोटो पाठव आधी "
" तू मला wp दे . मी लगेच पाठवते ."
" देतो पण तू आधी पाठव ."
" ओके "
तो तिला नंबर देतो . आज ती खूप खूश होती . आज आपण काहीतरी मिळवलं त्यांच्या मनात आपल्या नाव रुजवलं . ह्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं .
तो ही खुश होता . त्याच्या ही मनात होत आता मैत्री पुढे जावी . म्हणून त्याने तिला प्रत्येक गोष्टीसाठी रिस्पॉन्स दिला . 
Wp वर आल्यानंतर त्याने तिला त्याचे सर्व फोटो पाठवले . हिने तिचे त्याला सर्व फोटो पाठवले . त्याला तिचा आवाज ऐकायचा होता . म्हणून त्याने एक vioce मेसेज केला . आणि आता तू पाठव अस ही सांगितल .
मला नाही येत अस सांगून ती मोकळी झाली . ओके तो चिडला जरा स्टिकर्स पाठवले . खूप हसले एकमेकांशी आणखी concet झाले ...
ती त्याला आवडायची तो ही तिला आवडायचा , स्टिकर्स मधून ते व्यक्त व्हायचे . अजुन बोलायला घाबरत होते . कुठेतरी थांबले होते. की एकमेकांसाठी वेळ मागत होते देव जाणे . " 
पण अजूनही ते अव्यक्त होते ...काय माहित कधी होणार व्यक्त होतील की नाही ते ही माहीत नाही . पण हे नातं कधी पडद्याआड होणार नाही . हे मात्र नक्की ...

ते व्यक्त होणार की नाही ते बघुया पुढच्या भागात तो पर्यंत वाचत रहा ...
मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ठ ह्या ठिकाणी क्लिक करा ...

उगवणे - मावळने ...

मावळता तो सूर्य माझा ,
घेऊन गेला सारी चिंता ,
उगवता तो सूर्य राजा ,
घेऊन आला आनंद वार्ता ...

मावळत्या सूर्याने वेचून नेले दुःख ,
उगवत्या सूर्याने ओंजळीत टाकले सुख ,
मावळत्या सूर्याने अपयश नेले सारे ,
उगवत्या सूर्याने खेचून आणले प्रगतीचे वारे ...

मावळत्या ने मिठीत घेतले सारे कुविचार ,
उगवत्या किरणांनी पाठवले सारे सुविचार ,
मावळत्याने अहंकाराला मावळायला सांगितले ,
उगवत्या ने माणसाला माणुसकी चे वरदान दिले ..

जसे सुख मावळते , तसे दुःखही मावळते ,
अपयशावर मात करून, पुन्हा यश उगवते ,
उगवणे - मावळने हीच खरी नियती ,
या नियतीवर अवलंबून माणसाची प्रगती ..

पुन्हा एक नवी सुरुवात ...

लढायची खुम खुमी होती ,
जगण्याची धुंदी तेवढी होती .

गड किल्ले ही सर करायचे ,
पर्वत रांगेचे वादळ हातात पेलायचे ...

शेवटच्या टोकावर तिरंगा फडकवा यचा ,
तोल जाता जाता सावरायचा ,
धीर हा नाही डगमगावायचा ....

हाती घेतलेले काम पूर्ण करायचे ,
मग क्षण भर थांबायचे ,
आणि पुन्हा नव्याने नवीन पर्वत सर करण्याचे ,
स्वप्न उराशी बाळगायचे ..


Nov 15, 2021

प्रेयसी ..

डोळ्यात रचलेले काव्य मी वाचले ,
मनात आसवांचे काहूर दाटून आले ..

जुन्या पाऊलखुणा नव्याने आठवल्या ,
क्षणा क्षणाला हळव्या करून गेल्या ..

रचलेल्या काव्यात प्रेम ओसंडून वाहत होते ,
तुझ्याशिवाय आज ही अपूर्णच होते ..

अस्तित्व माझे त्या रचनेत आजही तुला शोधत होते ,
तुझ्या अस्तित्वात माझे अस्तित्व मिसळू पाहत होते ..

डोळ्यांमध्ये रचलेल्या काव्यात तुझी मी वट सावित्री होती ,साता जन्माची तुझी अर्धांगिनी होती ..
त्या काव्यात मी तुझी प्रेयसी होती ..

प्रेम बंधन भाग 9

मैत्री पुढे जायचं म्हणजे नक्की राहुलला काय म्हणायचं होतं . नक्की त्याच्या मनात आहे तरी काय ? प्रेम असेल तर मग खरच इथेच थांबवायला हवी ही मैत्री कारण मला नाही जायचं मैत्री पुढे . पण नको मला ही मैत्री थांबवायची पण नाही . जाऊ दे जे होईल ते होईल सोडून देते मी विषय ... ती तर पूर्णपणे गोंधळून गेली होती . ती द्वीदा  मनःस्थितीत होती . विषयच तसा गंभीर होता . तिला तिचंच काही कळत नव्हतं . 
ती परत त्याच्याशी बोलते , तो ही बोलतो . ती बोलता बोलता सहज बोलून जाते . " शेअर chat वर खूप छान बोलता येत . व्यक्ती ऑनलाईन आहे की नाही ते पण सहज कळत . "
तो तिला विचारतो , " ते काय आहे "
" ऍप्लिकेशन आहे "
" मग मी ओपन करू का "
" As your wish "
" त्याच्यापेक्षा wp पण छान आहे ना . "
तिला तर आता शॉक बसतो . हा wp बोलतो , म्हणजे ह्याच्या मनात नेमकं आहे तरी काय ? "
" तुला चालेल का ? Wp "
" हो आता चालेल . "
" म्हणजे "
" काही नाही सोड तू "
" ओके "
" Hmm नंबर दे ना wp मेसेज करायला लागेल ना ."
" ओके " तिने लगेच त्याला मेसेज केला . संध्याकाळी करतो . आता काम आहेत . असं म्हणून तो तिला बाय बाय करतो . 
सांजवेळ ही सरली , रात्र ही सरली , तरी राहुल ची गाडी काही वळणावर नाही आली . त्याने तिला wp च काय प्रतिलीपी वर सुधा मेसेज केला नव्हता . प्लस तो लीपिवरून तीन दिवस गायब झाला . तिने शशिला खूप वेळेस विचारल , " तो कुठे गेला ? काही आयडिया "
तो म्हणाला , "काही माहीत नाही . काय ग तू त्याची एवढी काळजी करतेस त्याचा एवढा आदर करतेस .
" काय संबंध ग त्याचा आणि तुझा "
" संबंध काही नाही . असच सहज कनेक्ट आहे ना त्यामुळे ." 
त्याने तिला तस विचारलं होत . त्याच तिला खूप वाईट वाटतं . खरच काय संबंध आपला आणि राहुलचा का आपण त्याच्यासाठी आपली एनर्जी खर्च करतो . स्वतःही त्रास करून घेतो आणि इतरांनाही देतो .
जाऊ दे त्याला आपली पर्वा नाही मग आपण तरी का त्याची पर्वा करायची . का त्याच्या अनु उपस्थित एवढ अपसेट व्हायचं . काहीचं कारण नाही त्याचा विचार करण्याचं . तिने सार तिच्याच मनाने ठरवून मोकळी झाली . परिस्थिती काय होती , याचा विचार न करता ती अचानक त्याच्यापासून unconect झाली . 
तिचं असं unconect होण त्याला विचीत्र वाटलं . त्याने पुढाकार घेऊन तिला hi , कशी आहेस ? असे मेसेज केले . तीचा रिप्लाय न आलेला पाहून त्याने परत मेसेज टाकले . बहिणीचा साखरपुडा होता . त्यामुळे आलेलो नव्हतो . यायला वेळचं नाही झाला . स्वारी "
ती त्याचे मेसेज वाचते . तिला खूपच वाईट वाटल , आपण उगाच स्वतःच सार ठरवून मोकळ झालो . तिने त्याला बरं वाटावं म्हणून , " अरे काही हरकत नाही . Its ok swary नको बोलू . " 😊😊😊😊
मेसेज सेंड केला . त्यालाही बरं वाटलं . त्याचं नातं पुन्हा नव्या वळणावर आलं . 
 ती मैत्री नव्हतीच ते होतं प्रेम दोघांनीही unseen केलेलं  .

जाणून ही अजाण राहिले  घायाळ पक्षी ,
नजरेची जादू रेखाटू लागली सुंदर नक्षी ..

श्वासात श्वास मिसळून ही , 
शोध घेऊ लागले ऑक्सीजनचा ,
ती त्याच्या अस्तित्वाचा , तो तिच्या अस्तित्वाचा ..

 एक मन एक क्षण एक आयुष्य ,
दोघांचेही घडविणारं होते भविष्य ..
आयुष्याला नवीनच मिळाले होते वळण ,
त्या वळणावर कुठेतरी थांबेवेसे वाटले क्षण भर ,
तिलाही त्यालाही जड झाले होते , 
त्या वळणावर थांबणे ,
एकमेकांना कायमचे by by करणे ...

राहुल आज मुलगी बघायला जाणार होता . त्याने नित्या ला तिचा फोटो ही दाखवला होता . तिला एक क्षण खूप वाईट वाटलं , डोळ्यांत अश्रुं चं आभाळ दाटून आलं . दाटून आलेलं आभाळ तिने जरा सावरलं . राहुलला अभिनंदन राहुल , 💐💐💐💐💐खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्यासाठी enjoy the life 👍👍👍👍👍👍👍👍enjoy the every moment of your life with your life partner ..💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫😊😊😊😊😊👍👍👍
त्यानेही तिला hmm म्हणून रिप्लाय दिला . पाहिजे तेवढा खुश तो आज नव्हताच . कारण तो तर फक्त मजाक करत होता . नित्याची , तिचं मन बघत होता . 
दुसऱ्या दिवशी नित्याने परत त्याला  मेसेज केला .
"  राहुल काय झालं ? काल ठरल का लग्न ? "
त्याला तिला रस्थाली आणायचं होतं . म्हणून तो तिला आधी हो बोलला पण नंतर तो खूपच फेकायला लागला.  कोणाच्या हि सहज लक्षात येईल . की हा फेकतो य . त्याने खूप पुड्या सोडल्या . मग नित्याने ही एक पुढी सोडली . 
व्वा छान राहुल तुझ आणि माझं लग्न एकाच वर्षी होणार  . आता त्याचे भाव बदलले होते . तिच्या अशा मध्येचं बोलण्याने त्याची हवा जमिनीला खेटाळली होती  . तो लगेच बोलून मोकळा झाला . "तुझच आहे लग्न यावर्षी , माझं नाही इतक्यात ."
तिने लगेच रिप्लाय दिला . " ते माहीत होतं मला . "😊😊😊😊😊😊😊
" खूप हुशार आहेस ग तू लगेच कबुल करायला लावते . खोटेपणा सहज शब्दात पकडते ."
" ती सवय आहे . "
" व्वा खूप छान तू ना खूप चांगली वकील होऊ शकते ?"
" तेच व्हायचं होतं . पण बाबांना पटलं नाही ना माझ्या म्हणून d.ed केलं . "
" बरं झालं पटलं नाही . नाहीतर कोर्टात सारा झांज्या उडवला  असता . "
" नाही रे अस काही नसत केलं . एक पण केस हरले 
 नसते . केस जिंकूनच शांत झाले असते . "
" हो ग हो भारतातील बेस्ट लॉयर झाली असती . पण वरुन 1 नंबर की खालून 1 नंबर हे तुझ तुलाच माहीत ."
😂😂🤣🤣🤣🤣
" वरून 1 नंबर झाले असते . "
" ते तुलाच माहीत ."
😂😂😂😂🤣🤣🤣
" म्हणजे तुला म्हणायचं काय आहे . "
" काही नाही . बोलू नंतर बाय बाय ."
😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣👏👏👏👏.

परत त्यांचं नातं नव्या मोडवर येऊन थांबत . एकमेकांचां सहवास अवांतर मिळो . हाच त्यांचा एकमेव दृढ विश्वास आणि श्रद्धा होती . हे आगळीच ओढ होती ,  ती  ओढ त्यांना हवी हवीशी वाटणारी होती ...त्यांच्या त्या ओढीची धाव कुठ पर्यंत होती . ते बघुया पुढच्या भागात ...

मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ठ ह्या ठिकाणी क्लिक करा ... 

उम्मीद के आयने ।

मेरे जीवन में रंग है अनोखे ।
जिसे चाहती हूं दिल से ।।
उन्होने ने ही दिखाए है सपने ।
सपने में वही है मेरे दिल के राजे ।।

दोनों ने संग जीने के किए हैं वादे ।
हालत कैसी भी हो , कभी जुदा न होना यही है इरादे ।।

सावन जैसा आया है एक मेहमा ।
मेरे आखों ने खोया है एक सपना ।।

संग जीना है उसके , यही है दिल के मायने ।
हातो में है उम्मीद के  नए सवेरे के आयने ।।

ती एक रचना ...

किती तरी दिवसांनी ते काव्य वाचले ,
भाव अनोखे पुन्हा डोळ्यासमोर सजले ,

जुने क्षण नव्याने जागी झाले ,
त्याच्या माझ्या प्रेमाचे साक्षीदार झाले ...

त्या रचनेने तो माझ्यावर इंप्रेस झाला ,
मैत्रीने मैत्री पुढचा पल्ला गाठला ...

तू तर सुंदर आहेसच ,
पण तुझ्या हूनही सुंदर तुझे विचार ,
असं म्हणत म्हणत ,
रेखाटला सुंदर संसार त्याच्या माझ्या प्रेमाचा ...

ती एक रचना मला त्याच्याशी कनेक्ट करून गेली ,
ही फक्त तुझीच आहे , त्याच्या मनात बीज हे रुजवून गेली ....

नकळत मैत्री पुढचा प्रवास सुरू झाला ,
आम्हाला मात्र अंधारातच ठेवून गेला ....


Nov 14, 2021

प्रेम बंधन भाग 8

राहुल नित्या वर एवढा चिडला होता , की तो तिला समजून घेण्याच्या मन स्थितीतच नव्हता . तिने त्याला खूप समजावल होत . ती त्याला एकदा नाही , दोनदा नाही  , तीनदा नाही दररोज सकाळी उठल्या उठल्या सॉरी हा मेसेज टाकायची . रिप्लाय येणार नाही , माहीत असताना सुद्धा रिप्लाय ची वाट बघायची . 
मावळणरा सूर्य रोज मावळयचा ती त्यालाही हसत हसत बाय बाय  आणि नव्या उमेदीने उगवणाऱ्या सूर्याची वाट बघायची .

 त्यांचं नातं कोलमडून गेलं होतं , फुल फुलता फुलता पाकळ्यांनी साथ सोडली होती , जरी पाकळ्यांनी साथ सोडली होती , तरी फुलाने फुलण्याचीचं ईच्शा व्यक्त केली होती . नव्या उमेदीने पुन्हा एकदा सुंदर आयुष्याची सुंदर स्वप्न पहिली होती . 

दिवसामागून दिवस गेले , 1 महिना त्यांनी एकमेकांशी अबोला धरला . राहुललाही तिची खूप आठवण यायची.
तिला तर त्याच्या आठवणीने गहिवरून यायचे . उगाच आपण बोलण्याची limits kros  केल्या आणि एवढ्या सुंदर मैत्रीला कायमचं मुकलो . 
राहुल तिची परीक्षा घ्यायची होती की काय काही माहीत नाही पण , तो परत आला एक नवीन ओळख घेऊन प्रतिलीपीच्याच कट्ट्यावर आयुष्याची डायरी ह्या नवीन नावाने त्याने अकाऊंट ओपन केलं . ती त्याला कधीच विसरू शकणार नव्हती . त्याला ओळखन तिला कधीच जड नव्हत . तिने सहज ओळखलं राहुल ला . तो तिला काही केल्या ओळख द्यायला तयार नव्हता . तिला आता खूप त्रास होत होता . पण बोलावं तर कोणाजवळ शशी होता , पण त्याच्याजवळ तरी कसं कुठल्या अधिकाराने बोलणार म्हणून ती काही गोष्टी मनातल्या मनात चं दाबून ठेवते . 
प्रतिलीपी वर तिच्या खूप साऱ्या मैत्रिणी होत्या . त्यांच्यातल्या बऱ्याच जणींना तिने सांगितलं होतं . तुम्ही त्याची ओळख काढा . प्रत्येकीने काढण्याचा प्रयत्न केला  . 
तो प्रत्येकीला खोटं बोलला मी राहुल नाहीतर दुसराच कोणीतरी आहे . असं भासवत राहिला . तरी हीच मन तिला हेच सांगत होता . की दुसरा तिसरा कोणी नाही . हा राहुल च आहे . हा जर राहुल नसेल तर मग एवढं साम्य कसं काय ? थोडफार असू शकत एवढं साम्य  असू शकत नाही . 

ती त्याच्या पोस्ट वर कॉमेंट पण करायची . तो सर्वांना रिस्पॉन्स द्यायचा . हिला मात्र त्याचा काहीचं रिस्पॉन्स नव्हता . त्याची हर एक अदा हिला घायाळ करणारी होती . हर अदा हेच सुचवत होती हाच राहुल आहे . 
शहानिशा करण्यासाठी हिने त्याला hi असा मेसेज केला. दोन दिवस रिप्लाय ची वाट पाहिली . तरी काही ही रिप्लाय आलेला नसतो . नंतर ती ही त्याच्या नादी लागली नाही . तिने विषय सोडून दिला . 
दोन दिवस तिने त्याला इग्नोर केलं . ही आपल्याला परत कसा रिस्पॉन्स देईल ह्या आयडिया ने त्याने असा dipi ठेवला की नित्या परत comfuse झाली . 
आता नित्याने डायरेक्ट त्याला मेसेज केला . 
" Hi तू राहुल आहेस का ? राहुल असशील तर मग असं का वागतोस . "
ह्या मेसेजलाही त्याचा तिला काहीचं रिप्लाय नसतो .
ती खूप गोंधळून गेली होती . हताश होऊन तिने त्याचा नाद सोडून दिला होता . ही आपल्याला काहीचं रिस्पॉन्स देत नाही . हे बघून राहुल ने पुढाकार घेतला . तो तिचा superfan झाला . ही परत त्याला सॉरी बोलली . त्यानेही हिला माफ केलं . त्यांच्या नात्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली .
आता त्यांचं नातं नवीन वळणावर येऊन थांबल होतं , आता नात्यात अजूनच ओलावा निर्माण झाला होता .
राहुल सहज बोलून गेला , मी तुला खूप मिस केलं . तुझ्याशी बोलत नव्हतो ; पण तुझ साहित्य डेली वाचत होतो . ती ही त्याला बोलली मी ही तुला खूप म्हणजे खूप मिस केलं .
 "का असं वागलास ? का एवढं छळलं ? आनंद वाटतो का मला छळण्यात " 😢😢
" हो खूप मजा येते तुझ्यासोबत भांडण्यात ."😂😂😂
" तुझ्याशी भांडल की नवीन एनर्जी मिळते ."😂😂
" हो का मग रोज भांडत जा माझ्याशी पण ; असा अबोला धरून कधीही छळू नको . अटॅक येईल रे मला हरवून जाईल मी ह्या आयुष्याला . "
" इट्स ओके खूप झालं आपली मैत्री आता कधीही तुटणार नाही . अजुन बहरणार हे माझं वचन .आवडेल ना आपली मैत्री पुढे गेली तर , की नाही ."
" थँक्यू सो मच हो नक्की आवडेल आपली मैत्री पुढे गेली तर once again thankyou so much , i miss you "
" Miss you to बोलू परत आता थोड काम आहे ."
" Ok tc "

नित्या आज खूपच खूष होती.  तिने आज खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला होता . आनंद तिचा गगनात मावेनासा झाला होता . पण एक प्रश्न तिच्या मनात सतत रेंगाळत होता . मैत्रीत पुढे जायचं म्हणजे नेमकं काय म्हणायचं होतं ह्याला , ह्या प्रश्नाने तिला जर त्याच्याकडे ओढल होतं .

तुम्हीही रेंगाळला ना ह्या प्रश्नांपाशी मी पण सोडूया ह्या प्रश्नाचं उत्तर पुढील भागात तो पर्यंत वाचत रहा . एन्जॉय करा .
मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ठ ह्या ठिकाणी क्लिक करा .

प्रीत ही परतली ...

पावसात मी न्हाले ,
अबोळीच्या गंधाने प्रफुल्लित झाले ...

प्राजक्ताच्या फुलांने माया ही लावली ,
श्रावण बाळाची आज हसरी कळी कुठे गेली ..

चाफ्याच्या फुलाला अबोलीचा गंध ,
श्रावणाला माझ्या वेड्या आईचा हा छंद ..

प्रीत ही आज दूरदेशी गेली ,
आई ही रडून घायाळ झाली ,
श्रावणाला आपल्या कुशीत घेत कुरवाळू लागली ..

मुक्या भावनांना आज वाचा फुटली ,
शब्दांनी सावली बनुन साथ दिली ,
दूरदेशी गेलेली प्रीत आज मायदेशी परतली ...

कैफ ..

कैफ ही अशीच रेंगाळली
माझ्यातली मी पुन्हा  पुन्हा शोधली,

माझ्यातली मी शोधता शोधता ,
पुरा आसमंत गहिवरला ,
कैफ हा असाच रेंगाळत राहिला ...

सारी सृष्टी फिकी पडली ,
माझा शोध घेता घेता ती ही थकली ...

तेज ल्यालेले पर्न ही , निस्तेज झाले ,
इंद्र धनुष्याचे रंग ही हरवून गेले ,
माझ्यातली मी शोधता शोधता साऱ्यांचे नाकीनऊ आले ,

अजुनही माझ्या अस्तित्वाचा शोध बाकीचं आहे ,
शोध मोहीम ही सुरूच आहे ,
रित्या वाटेवर कैफ ही तशीच रेंगाळत आहे ...


कैफ ...

कैफ ही अशीच रेंगाळली
माझ्यातली मी पुन्हा  पुन्हा शोधली,

माझ्यातली मी शोधता शोधता ,
पुरा आसमंत गहिवरला ,
कैफ हा असाच रेंगाळत राहिला ...

सारी सृष्टी फिकी पडली ,
माझा शोध घेता घेता ती ही थकली ...

तेज ल्यालेले पर्न ही , निस्तेज झाले ,
इंद्र धनुष्याचे रंग ही हरवून गेले ,
माझ्यातली मी शोधता शोधता साऱ्यांचे नाकीनऊ आले ,

अजुनही माझ्या अस्तित्वाचा शोध बाकीचं आहे ,
शोध मोहीम ही सुरूच आहे ,
रित्या वाटेवर कैफ ही तशीच रेंगाळत आहे ...


Nov 13, 2021

मी त्याच्याशी नातं कायमचं तोडायचं ठरवलं .

तो मला खूप आवडतो , पण तरीही आज मी त्याच्याशी नातं तोडायचं ठरवलं . कारण तो माझ्यापासून दूर दूर पळतो . आणि त्याच ते दूर दूर पळन मला मी नातं निभवण्यात कुठेतरी कमी पडते . अशी फिलिंग करून देतो . कोणीही माझ्यापासून दूर पळाव एवढी वाईट मी नक्कीच नाही.  त्याच्या दूर पळण्याचा मला खूप त्रास होतो . त्याला नातं नको तर ,  मग मी तरी का ते नातं टिकवण्याचा प्रयत्न करावा . असं आज एक क्षण वाटलं  . 
आणि मग त्याच्यापासून कायमचं दूर होण्यातच त्याचं आणि माझं सुख आहे. असं नव्याने उमगल आणि मी आमचं नात इथेच थांबवायचं ठरवल .
 कारण मी पण तिथे अडकते आणि मग माझा दिनक्रम तर बिघडतोच . पण मन खूप दुखावल्या जात . 
त्यापेक्षा नकोच ते आपण भलं आणि आपलं काम भलं .
ज्याला आपल्या भावनांची कदर नाही , मग का तरी आपण त्याच्याशी नातं ठेवायचं . उगाच त्यालाही आपल्यात अडकवायच आणि आपणही त्याच्यात अडकायच . 
मी सहजा सहजी कोणालाही out of करत नाही आयुष्यातून पण ज्याला ही कोणाला करते ना परत त्याला आयुष्यात एन्ट्री देण्याचे चान्से स खूप कमी असतात . मी  आधीच दोन जणांना माझ्या आयुष्यातून out of केलय बहुतेक तिसरा नंबर ह्याचाच आहे . देव करून नसावा ...नाहीतर बीचाऱ्याच काही खर नाही ..

काल्पनिक : 





प्रेम बंधन भाग7

👌👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰👍👍👍👍👍👍👍👍
तुझा dipi बघून माझा बीपी हाय झाला .
Dipi बघून बीपी हाय नाही झाला तर मग ते प्रेम कसलं .👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰
मला हर्ट अटॅक एवढा बाकी राहिला होता . 
तू खूप खूप छान दिसतेस. पिवळ्या साडीत एकदम शोभून दिसते . 
 - " बास , बास "
" का ग " 
" असच एवढं कौतुक ऐकुन मी खूप हवेत जाईल . "
" अग खरच ग खूप छान दिसतेस तू " 
" थँक्यू "
😊😊😊
" वरती बाकी जोक छान केला . 
तुझा dipi बघून माझा बीपी हाय झाला ."😊😊😂😂😂🤣🤣🤣
" हो जोक करण माझा जन्मसिध्द हक्क आहे . आणि प्रतिलीपी ने ती जबाबदारी माझ्यावर दिली आहे . मग बाबा ती पाळावीच लागते . नाहीतर मग ते मला आउट ऑफ करतील ना . " 😂😂😂🤣🤣🤣
" हो हो ते पण खरच आहे . " 😂😂😂🤣🤣🤣🤣
" काय रे राहुल आज पण bussy काल पण तू bussy च होता . तुझ्यामुळे मला माझा फोटो dipivr एवढा वेळ ठेवावा लागला . "
" म्हणजे "🤔🤔🤔
" काही नाही , काही नाही सोड रे ते "
" Ok as your wish "
" Hmm" 😊😊😊
" Hmm" 
" बरं सांग ना आज पण bussy असणार का ? "
" ते काही सांगता येणार नाही . कामं अचानक येतात ."
" Hmm ते पण खरं आहे . "
" हो ना "
" हो मी समजू शकते . "
" बरं ऐक ना dipi बदल . "
" म्हणजे "
आता राहुलला तिला सांगायचं होत dipi बदल . पण तो असं डायरेक्ट सांगू शकत नव्हता . म्हणून तो तिला फिरवून फिरवून सांगतो . 
" अगं म्हणजे तू dipi ठेवलास तर , तुला खूप सारे मेसेज येतील आणि तुला त्याचं मेसेजला रिप्लाय देत बसावे लागेलं . आणि चुकून कोणाचा बीपी हाय झाला तर . "
" होऊ शकतो का ? "
" कोणाचा होईल की नाही माहीत नाही ; पण माझा मात्र नक्की होईल . त्यामुळे बदल तू dipi प्लीज . "
" हो बदलते पण नंतर आता बोलुयात . "
" नाही आधी कर मग बोलू . "
" हो ना करते ना रे "
" आधी कर "
" ओके " असं म्हणत ती लगेच dipi change करते . "
" Good ☕☕☕ये tea घ्यायला . "
" हो मी आताच घेतला . तू घे ."
" हो बाकी काय म्हणतोस " 
" बाकी काही नाही ऑफिस आणि घर हेच माझ विश्व . "
"छान आहे तुझ विश्व . "
" हो" 
त्यानंतर त्यांचं बोलणं बंद होतं दोघांनाही अचानक कामं येतात . मग ते आपल्या आपल्या कामाला लागतात . कामं संपून पुन्हा एकदा बोलण्याची ओढ ही लागलेली असते . पण आता मात्र ती ओढ वाढतच चालली होती . 
त्यांचं वेळेचं नियोजन कोणत्याच पद्धतीने बसत नव्हत . 
ही जेव्हा फ्री असायची तेव्हा तो bussy असायचा,आणि तो जेव्हा फ्री असायचा तेव्हा ही bussy असायची . आठ दिवस हेच गणित गणिताला योग्य उत्तर मिळेना .
मग एके दिवशी सकाळी च राहुल good morning असा मेसेज नीत्याला टाकतो . बहुतेक ती  bussy      होती . त्यामुळे रिप्लाय दिला नव्हता . मग न राहवून तो पुन्हा एक मेसेज टाकतो . आज आपण तीन साडे तीन वाजता बोलुयात तीन नंतर मी फ्री असणार .
तिने ओके म्हणून रिप्लाय दिला होता . पण त्याच दिवशी नेमकी खूप मोठा प्रोब्लेम तिच्या आयुष्यात झाला होता .
जून वादळ उठून पुन्हा नव्यानं उभ राहील होतं , त्यालाच साथ द्यायला एक नवीन वादळ ही त्याची पाठराखी न झालं होतं .
त्या दिवशी एक वाजता तिच्या मैत्रिणीच आणि तीच खूप मोठं भांडण झालं . कारण काय तिच्या बॉय फ्रेंड ने तिला प्रपोज करण्या ऐवजी हीलाच प्रपोज केलं . हीची काहीही चूक नसताना तिची मैत्रीण हीलाच भांडली . 
तू आमच्या दोघांमध्ये का आलीस ? असं म्हणत हीलाच वेठीस धरलं . तिने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती काही ऐकेना . आजपासून आपली मैत्री कायमची संपली असं म्हणून ती ताणाताणाने घरी निघून गेली. ती जात नाही तर ती ज्या मुलाला आवडायची तो मुलगा घरी आला . आणि पुन्हा जुन्या विरळेल्या खपल्या ओल्या करून गेला . 
ती त्या दिवशी रड रडली आपली काहीचं चूक नसताना जग आपल्याला वेठीस धरून मोकळं होतं .
आपण ज्याच्यासाठी एवढं केलं  तिनेच आपल्याला दूर केलं . ज्या माणसाचा कधी आपल्या अस्तित्वाशी संबंध नव्हता , त्याने आपल्या अस्तित्वाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. हे सगळ असं का ? काय चूक आहे देवा माझी अस म्हणत ती देवासमोर खूप रडली . एवढी रडली की शेवटी तिची डोकेदुखी सुरू झाली . 
थोड्याच वेळात ती भानावर आली . सकाळी राहुलने केलेल्या मेसेज ची तिला आठवण झाली . 
राहुलचा hi म्हणून दोनदा मेसेज आलेले असते . तिला बोलण्याची इच्छा नव्हती त्याला वाईट वाटेल म्हणून ती बोलते . थोड ते चांगले बोलतात राहुलचा स्वभाव मुळातच कॉमेडी त्यामुळे वेळ काळ न बघत सतत तो कॉमेडी करत असतो . 
आज ती बिलकुल मूड मध्ये नव्हती . अशातच गैर समज निर्माण होतात आणि ती राहुल ला अचानक बोलून जाते.
तुला लग्नानंतर मैत्री तोडायची असेल तर , मग आताच आपण आपली मैत्री थांबवु या . नंतर भानावर न राहता . सकाळपासून घडलेल्या सर्व घटनांचा राग ती त्याच्यावर काढते . त्याला पण खूप वाईट वाटतं . तो by ok म्हणून रिप्लाय येतो . त्याच्याशी बोलणं झाल्यानंतर ती पुन्हा खूप रडते.  
थोड्या वेळाने शांत झाल्यावर ती पुन्हा भानावर आली . मोबाईल तिच्या हातात तसाच होता . ती पुन्हा त्यांचे मेसेज वाचते . डोक्याला हात लावत पुन्हा खूप रडते . आपण आज सगळा राग उगाच राहुल वर काढला . किती वाईट वाटलं असेल बिचाऱ्याला आपणही तेच केलं ना ज्याची चूक नव्हती त्यालाच वेठीस धरलं .
ती पुन्हा राहुल ला स्वारी म्हणून खूप मेसेज टाकते . पण तो आतून इतका दुखावला गेला होता . की त्याला सावरायला थोडा वेळ लागणार होता . 
पण हिला मात्र खूप भीती वाटतं होती . राहुल पुन्हा आपल्याशी कधीच बोलला नाहीतर , आमची मैत्री कायमची तुटली तर अशा प्रश्नांनी मनात घर निर्माण केलं होतं .

काय वाटतं तुम्हाला बोलेल का राहुल नित्याशी पुन्हा नव्याने सुरळीत येईल का त्यांची मैत्री नव्या वळणावर .
बघुया पुढच्या भागात .
मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ठावर क्लिक करा ..

 

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...