मनाची तयारी झाली नव्हती ...
तुझ्यासोबत जगण्याची तर स्वप्न पाहिली होती ,
रित्या ह्या मनाला अजुनही भीतीची सवय होती ,
तुझ्या अस्तित्वाचीचं जाणीव नव्हती ..
ओळखीची वाट ही अनोळखी भासत होती ,
तुझ्या सहवासातही आज मी एकटीच होरपळत होती ..
तुला तर त्याची कल्पनाच नव्हती ...
बरीच खलबत झाली होती ,
तुझ्या माझ्या नात्याची कोणी गिणतीच नव्हती केली ,
कोणी आपल्या नात्याला समजून घेईल ,
हे नातं आनंदाने स्वीकारेल .....
हे मान्य करायला अजुन मनाची तयारी झालीच नव्हती ...
छान 👌
ReplyDeleteसुंदरच...👌
आबा 🙏
खूपच सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDelete