नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 5, 2023

आता प्रश्न पडतो

का मी तुला आठवावं ..
उगाच तुझ्यात गुंताव ..

का करावी आशा तुझ्या येण्याची ..
का झळ पचवू शकत नाही मी , ह्या वीरहाची ..

का उगाच वाट पहावी ..
तुझी किंमत मला न  परवडणारी ..
का सारखी ही गोष्ट मी विसरावी ..

का सावरू शकले नाही ..
मी अजुनही माझं मन ..
त्याला ही जगावंस वाटतं ..
तुझ्यासोबत आयुष्यातील प्रत्येक क्षण ..

का मी असं वागते ..
उगाच तुझ्यासाठी व्याकुळते .  

हाच प्रश्न आता रोज मला पडतो ..
उत्तर शोधतांना जीव मेटा कुटीला येतो...

Feb 4, 2023

व्याकुळलेला मी ..

जरी दूर तू ,
तरी अंतरी तुझा भास होतो ..

जीव हा तुझ्यात गुंततो ..


जरी माझी नाही झाली ..


तरी माहितेय मला ..


दुसऱ्याची होऊन सुध्दा ,


तू आहेस अजुनही माझी ..


स्पर्श तुझ्या प्रेमाचा मिटलाच नाही ..


ओलावा तुझ्या आठवणींचा सरलाच नाही ..


तुझी गुपित हृदयात साठवून ..


जगतोय स्वतःला फसवून ..


घेतलेय मी रडणारे हे डोळे घट्ट मिटवून ..

जरी दिसतोय हसतांना ..
तरी माझ मलाच माहीत ,
अन् तुलाच माहीत ...
किती गेलोय मी आतून कोलमडून ..

तरीही आज नव्याने ..
हे गीत लिहितोय मी ..
ओठांवर आणून हसू ..

जादू प्रेमाची ...

पाहतो तुला क्षणोक्षणी ...
पाहताना तुझ्यावर भाळतो मनोमनी ..

देइल साथ पदोपदी ...


जिगर आहे ह्या मर्दामदी ..


तुला राणी सारखं ठेवण्याची ..


सौभाग्यवती बनवून माझी .


चार - चौघात मिरवण्याची ...


भाग्य दिले तू मला ..


जगण्याचे सार झाले ....


प्रेमाचे माझ्या सार्थक झाले ..


तुला पाहिले ,


तेव्हाच अपूर्ण स्वप्न माझे ..


पूर्ण झाले ..


जीव गुंतवून बसलो तुझ्यात ..


हरवून गेलो मी माझ्याच विश्वात ..


जगण्याला सीमा नाही राहिली ..


तुझ्यावर जवा प्रीत जडली ..


साऱ्या जगाशी भांडण्याची हिमंत ठेवली ..


जेव्हा मला तुझ्या होकाराची चिट्टी आली ..


तुला लाजतान पाहिलं ..


काळीज माझं धडाडल ..


हसताना तुला पाहिले ..


तुझ्या डोळ्यांतील लाखमोलाचे ,


भाव वाचले ...


ओठांवर रेंगाळणारे गीत तुझे ..


अलगद माझ्या ओठी आले ..


मग स्वप्न दोघांचेही सत्यात उतरले ..


उशाखाली फोटो ठेवून तुझा ..


रोज रंगायचा माझ्या स्वप्नांचा सोहळा ..


अन् सारल्या जायचा ..


आठवणीतील हिंदोळा ..


अप्रतिम वाटू लागला चित्रपट आयुष्याचा ..


जेव्हा लाभला सहवास तुझ्या प्रेमाचा ..


देवाने तुला माझ्या आयुष्यात पाठवलं ..


तुझ्या रुपात अनमोल लेण मला लाभल ..


सुखी आयुष्याचं गुपित कळाल ..जेव्हा माझ्या नावाआधी ..

तुझ नाव कोणीतरी पुकारल ..

देवाच्या कृपेने ...

तुझ्या सोबत साथ जन्माची गाठ बांधली ..

मी तुझी सारी स्वप्न माझी ,

अन् माझी सारी स्वप्न तुझी मानली ..

तू मला बाप होण्याचं भाग्य दिलं ..

आयुष्यात काहीचं नाही अपूर्ण राहील ..

एकमेकांच्या सहवासाने आयुष्य परिपूर्ण झालं ...

सुखाच माप मी ओलांडल ...

तुझ्या प्रेमाने हे सारं शक्य झालं ..


जादूच म्हणावी लागेल ..
ह्याला तुझ्या प्रेमाची ...
खूप प्रगती झाली माझ्या आयुष्याची...

Feb 1, 2023

वेडी आशा..


पिकली पाने गळून पडली .......

संसारात गुंतून पडले , वर्ष पुढे  सरली ...

प्रेम मागे राहिले....

तुझ्या सवे जगण्याचे स्वप्न पाहिलेले..

ही ह्या मनाने परतून लावले...

मात्र तुझ्या आठवणीत आज ही गुंतून राहिले...

कॉन्टॅक्ट बंद होऊन किती दिवस सरले...

तरीही वाट पाहण्याचे हर्ष मनी कोरले..

तुझी वाट पाहणं म्हणजे ,

निव्वळ वेडेपणा .माहीत  मला ..

तरीही त्या वेडेपणाच सुख उपभोगायला ,

आवडतं मला...

सांगते तुला ...

वेड्या आशेवर , कोणत्या माहीत नाही.  

एका नव्या वळणावर..
तू नव्याने नक्की भेटशील...
या आशेवरच ,
मी अजुनही आहे तुझ्यातच रमलेली ...

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...