खरचं कुणीतरी असावं ..
विश्वासाने हातात हात घेणार.
धीराने आधार देणार.
खरचं कुणीतरी असावं
जीवाला जीव देणार
दोन शब्द प्रेमाने गोड बोलणार ,
आपुलकीने जवळ घेणार .
खरचं कुणीतरी असावं.
जीवाला जीव देणार...
चल माझ्या गावी...
ओंजळ तुझी सुखाने भरून देईल.
असं म्हणणार.
खरचं कुणीतरी असावं ...
जीवाला जीव देणार ...
तू घे भरारी ..
तुझ्या स्वप्नांना मी उमेदीच बळ लावीण ..
असं म्हणत प्रेरणा देणार.
खरचं कुणीतरी असावं.
जीवाला जीव देणार ..
तू आहेस जशी ..
तशीच हवी आहेस मला.
असं म्हणणार..
खरचं कुणीतरी असावं असं ...
जीवाला जीव देणार ..
जिवापाड प्रेम करणार ..
नातं हे काळजापल्याड जपणार ..
खरचं कुणीतरी असावं ...
जीवाला जीव देणार ...
Weitten by - durga mate