नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jul 31, 2023

विसरून मतभेद सारे ..

विसरून मतभेद सारे ... जपूया जिव्हाळा आपुलकीचा ..


Let's forget all the differences... let's preserve the intimate affection


Let's forget all the differences... let's preserve the intimate affection




वाढला दुरावा नात्यातला 

जपुया ओलावा प्रेमातला ..
देऊ बळी रागाचा ..
घेऊ वसा विश्र्वासांचा ..
अबोला हा सोडून देऊ ..
विसरून मतभेद सारे ..
एकमेकांना आनंदाचा घास भरू ..
सल मनातली मनातच मारू ..
पुन्हा एकदा नव्याने ..
आपल्या नात्याचा श्री गणेशा


 preserve-intimate-affection

Jul 30, 2023

स्वीकार नात्याचा ...

स्वीकार नात्याचा



Acceptance of relationship :


करशील का ?
स्वीकार कधी तुझ्या माझ्या मैत्रीचा ..
राखशिल का मान ...आपल्या नात्याचा ..

ओढ तुझी ..
हवी हवीशी वाटणारी ...
सर्वांगावर शहारा आणणारी ..
कधी मिटवशिल का ?

मन जाणून माझं ..
त्याला आपुलकीची ऊब देशील का ?

विसरून सारे विरहाचे क्षण मला मिठीत घेशील का ? 

Acceptance of relationship : by - Durga 

तिच्यासाठी त्याचा त्याग

तिच्यासाठी त्याचा त्याग

थोडक्यात कथेचा बोध ..

His sacrifice for her



His sacrifice for her

प्रेम हे प्रेम असतं ...सोबत नसूनही नेहमीच आठवणीत राहत ...सहवास नाही लाभला ..आवडीच्या व्यक्तीचा हरकत नाही ..त्याच्यासाठी त्याग करण्याचा मोठेपणा मनी असावा ...

कथेची सुरुवात...

" अर्जुन ...तू नेहमी लग्न हा विषय आला की का नेहमी टाळाटाळ करतो . जर तुला लग्नच करायचं नव्हत तर. ...का उगाच मला प्रेमात पाडलं ...उगाच तुझ्यात गुंतवून ठेवलं ..."

ती जिवाच्या आकांताने त्याच्यावर ओरडत त्याला जाब विचारत होती ..

" राधा प्लीज शांत हो ....असा आरडा ओरडा करून जगाला तमाशा नको दाखवू ..."

तो तिच्या एका हाताचा दंड पकडून तिला आपल्या जवळ ओढून घेत तिच्या डोळ्यांत डोळे घालून ..शांत रहायला सांगितल ....

" लिव्ह माय हॅण्ड ......."

ती त्याच्या हाताला हिसका देत म्हणाली ..

" तू जर माझ्याशी लग्न करायला नकार देत असशील तर तुला माझा असा हात पकडण्याचा काहीचं अधिकार नाही हे ... कळल .."

ती त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाली ...

" मला कळतो य. .तुझा राग ..तुझी चिडचिड सगळ जाणतो मी ....पण तुझ माझ लग्न कधीही टिकू नाही शकणार ...हे विधिलिखित सत्य आहे ..आणि ते सत्य मी मनापासून स्वीकारलं आहे .. तस तू ही स्वीकार  .."

त्याने तिला हळूच तिला आपल्या मिठीत घेतल ..तिच्या सिल्की केसांवर किस करत तो तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागला ....त्याच्या तस जवळ घेतल्याने तिचा राग पूर्ण पने आटोक्यात आला ...

" अर्जुन अस का वाटत तुला की आपलं लग्न सक्सेस होऊ शकणार नाही ."

ती उलट्या हाताने आसू पुसत ती आवंढा गिळत म्हणाली ...

" तू एका खूप मोठ्या घरातील मुलगी ...आणि मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आपल स्टेटस कधीच मॅच नाही होऊ शकणार ....आणि तू ही कधीच माझ्या फॅमिली त अडजस्त नाही होऊ शकणार ...मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो ..मला तुला कधीच दुःखात नाही बघायचं ..नेहमी खळखळून हसतांना बघायचं आहे ...

माझ्या फॅमिली त तुला अश्रू शिवाय दुसर काहीही .....देऊ शकणार नाही ..."

बोलतांना आता तो ही खूपच जास्त इमोशनल झाला होता .....नकळत त्याच्या दोन्ही ही डोळ्यातून अश्रू ओघळत गलावर येत होते ....

त्याच्या बोलण्यावर तिला काय रिअँक्ट करावं तेच कळतं नव्हत ..कारण किड्या मुंग्यासारख आयुष्य जगण्याच स्वप्न तिने पाहिलेलं नव्हत ......

ती फक्त हुंदके देत देत रडत होती .....

" रडू नकोस राधा ... मी तुझ्याशी लग्न केलं नाही ..तरीही मी तुला कधीच अंतर देणार नाही ...मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या प्रेमाचा त्याग नाही करत हे ...तर तुझ्या सुखासाठी माझ्या प्रेमाचा त्याग करतोय.  प्लीज समजून घे राधा मला ..."

तो डोळे घट्ट मिटून रडू लागला ..ती ही हुंदके देत देत मान हलवत होकार दर्शवत रडू लागली ...


His sacrifice for her: by- Durga 

his-sacrifice 

Jul 29, 2023

प्रयत्नांती परमेश्वर

प्रयत्नांती परमेश्वर



Lord in effort

स्वप्नांच पर्व राहिलं अधूर .

मनाने पाहिलेले स्वप्न मधुर

मातीत मिसळल ..

येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं जावं ..

किती का येईना दुःख वाट्याला ..
माणसाला खळखळून हसता यावं ..
हेचं ह्या सुंदर आयुष्याकडून शिकावं ..

ही ही वेळ निघून जाईल ..
ह्या आशेवर वाईट दिवस काढावे ...
चांगलं दिवस येण्यासाठी प्रयत्न करत रहावे ..

Lord in effort - by दुर्गा मते

lord-in-effort

परिस्थितीची जाणीव

परिस्थितीची जाणीव

Situational awareness

situational-awareness

परिस्थितीची जाणीव ....ती नेहमीचं स्वप्न बघायची...

तिच्या मनात विविध विचारांची गर्दी व्हायची...

फुलांच्या सुगंधाची भाषा तिला भारी आवडायची. 
फुल पाखरांसारखे आपण ही बाग डावे..

मनी  इच्छा दाटायची .....
कोवळी पोर ती परिस्थितीची जाणीव होताच ..
कोलमडून जायची ...
मनी रुजलेली इच्छा आतल्या आत च दाबायची ..

आणि त्या परिस्थितीच जगण्याचा खळखळून आनंद अनुभवत खळखळून हसायची ..

तीच शिक्षण 10 वी पर्यंत च झालेलं ..पुढे जाऊन खूप शिकण्याची  तिची इच्छा होती ..पण  ती इच्छा तिला आतल्या आतच मारावी लागली ..

कारण  परिस्तिथी ..

वडील आजाराने पिडलेले ... आई दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करायची ..घरात लहान भावंडे तिचं तेवढी मोठी आईच्या संसाराला तिच्या भावा बहिणीं च्या शिक्षणाला हातभार लावायची ....

भाऊ जिल्हापरिषद शाळेत इयत्ता दुसरीत शिकायचा तर तिची बहीण सुरभी इयत्ता सातवीत शिकायची ..दोन वर्षांपूर्वी ती 10 वी उत्तीर्ण झालेली ..

वयाच्या मानाने मन खूप मोठं होतं तिचं ...

10 वी नंतर तिने शिक्षणाला पूर्ण विराम दिला ...आणि शिवणकाम विणकाम सुरू केलं ...त्यातून जे पैसे मिळायचे ...त्यात भावा बहिणींच्या शिक्षणाला बाबांच्या आजार पणात लागायचे ...

फॅमिली साठी तिने तिच्या स्वप्नाला पूर्ण विराम दिला ..

परिस्थितीला सामोरं जाण्याच विचार पक्का केला ..

पण जेव्हा ही केव्हा ती मुलांना शाळेत जातांना बघते ..तेव्हा तिला वाटायचं आपण अजुन शिकलो असतो  ..तर किती बरं झालं असतं ...

तो विचार मनात येताच ती सकारात्मक तेणे विचार झटकायची ....

शिकलो असतो ..तर छान झालं असतं ..पण जे आहे ते ही काही वाईट नाही ....म्हणत खळखळून हसायची ..कारण तिला परिस्तिथी बदलता येत नव्हती ..तिला परिस्थितीची जाणीव होती ..म्हणून तिने मनस्थिती बदलली होती ...


Situational awareness - By- Durga Mate

situational-awareness

Jul 28, 2023

वेड होऊन जगाव

वेड होऊन जगाव 



Live crazy

आनंदी राहणं ..आवडत मला..
रूसून बसून काय करायचं मला ..
बोल बोबडे बोल नव्याने शिकायचे ..
शहान असल्यासारखे वर्तन काय कामाचे ..
ज्याला वेड होता येत ..
त्याला आयुष्य जगता येतं...
शहाणा होऊन जगणारा आतल्या 
अट च कूडत राहतो ..

Live crazy

By: Durga

live-crazy

Jul 22, 2023

आशेवर त्याच्या जगणं

आशेवर त्याच्या जगणं

His living on hope


His living on hope

मैत्रीच्या थोड्या पलिकडे ..

प्रेमाच्या थोड्या आलीकडे

असच होतं नातं आपलं ..

तास न तास गप्पा मारण ..

मनातलं गुपित शेअर करण ..

नुसती फ्रेंड शिप नव्हती ...

त्याला प्रेमाची ही साथ होती...

नियतीची नजर लागली ..

अर्ध्यावर च राहिली ..

ही प्रेमकहाणी ..

आशेवर त्याच्या जगणं, ...... खरच किती छान होतं.  आपलं नातं ..कुणाचीही नजर लागेल.  अगदी तस .  आणि शेवटी लागलीच त्याला नजर नियतीची काळाची ...गेलास तू सोडून मला एकटीला...


अचानक तू आयुष्यातून निघून गेला ...आणि हे आयुष्य जगायचं मी विसरून गेले होते ... तो येईल ही आस खोटी असून ही त्याच्याच आठवणीत जगत होते.  माहीत होतं. 

आता त्याच्यावर प्रेम करन निव्वळ वेडेपणा आहे.   तो वेडेपणा जपण्यात ही वेगळीच मजा होती.  त्या वेडेपणातही फक्त त्याच्या येण्याची आस होती....

रोज त्याच्या साठी महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चा करण ..त्याच्यासाठी फक्त त्या मंदिराला नित्या नेमाने 108 प्रदक्षिणा घालून तिथेच त्याची वाट बघत बसण...

खरच सारं सार आवडायचं...आयुष्याची संध्याकाळी काम च काय होतं ..... तिला ..

ती त्याच्याच विचारत गर्क असायची.   तो अनपेक्षित वळणावर तिला भेटलेला....तिच्या रक्ताच्या नात्यांनी जेव्हा तिला वाऱ्यावर सोडले ल.  तेव्हा तोच तर आलेला ..तिच्या आयुष्यात देवधुत बनुन....त्याच्या संगीत न तिचं आयुष्य रंगून गेलं होतं ...

ते एकमेकांच्या कुणीच नसताना ...एकमेकांसाठी खूप काही फिल करत होते ......

अनपेक्षित वळणावर झालेली भेट...जग दोघांनाही वेड्यात काढायचं .  ते मात्र दिलखुलासपणे जगायचे.   जगाकडे दुर्लक्ष करत .. कारण त्या दोघांनाही आपल्याच मुलांनी घराबाहेर काढलं होतं ..अनपेक्षित वळणावर एकमेकाच्या साथीने ते पुन्हा जगायला शिकले ....एकमेकांचा सहारा बनले...पण तो अचानक तिला सोडून गेला ....आणि पुन्हा एकदा उघड्यावर पडली .......

जाताना तो म्हणाला होता मी येईल परतून ..म्हणून ती खूप आशेने त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती ..

खूप आतुरतेने त्याच्या येण्याची वाट बघत होती ....तो येईल ही आशा ..त्या आशेवर जगणं ..तिचं आयुष्य सुंदर करत होतं ..


.



काल्पनिक कथा

His living on hope : by दुर्गा मते

living-hope

Jul 20, 2023

निशब्द भावना

निशब्द भावना

निशब्द भावना

निशब्द भावना

गोठलेल्या भावनेला सय येईना ..
निशब्द झालेल्या भावंनांना वाचा फुटेना ...
झाली होती  राख रांगोळी स्वप्नांची .....
पेटत होती होळी नजरेसमोर माझ्या आयुष्याची..
तरीही मी घेतली होती शपथ मौनांची ....

जगाला वाटतं होतं .. मी खुश होती ...पण नाही ते तर फोटो ग्राफर म्हणत होता ...smile कर..म्हणून मी smile करत होती ..नाही तर मनात हजारो आसवांची रौंदल होती ...

वेदनाच होती तशी गहिरी ...

हळद अंगाला लागत होती ...जखम मात्र खोल काळजात रुतत होती ...एवढे दिवस पाहिलेली स्वप्न क्षणात लयास जात होती ....राज कुमार मनात वेगळाच घर करून राहिलेला ....आयुष्यात मात्र वेगळ्याच पुरुषा सोबत सप्तपदी चालले ...

माझ्या स्वतःच्या च नजरेतून उतरले....निशब्द झाले..

त्याच्या डोळ्यांतील भावना वाचतांना रडकुंडीला होते आले....डोळेही होते पाणावले तरीही मी खुश रहाण्याचे सोंग केले ....

त्याच्या असलेल्या माझ्या हृदयातून उतरून गेले ....

भीती वाटते आज ही त्याच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची ...काय चूक त्याची आज ही विचारते स्वतःला ..

प्रेम केलं त्याने जीव लावला तुझ्यावर हाच का त्याचा गुन्हा ...... जेल मध्ये सडतोय न केलेल्या गुन्ह्याची सजा भोगत ...मी तर मोकळी झाली...तुला ओळखत नाही म्हणून क्षणात त्याला परक करून टाकलं .....स्वतच्या हृदया बरोबर त्याचं ही हृदय चिरून टाकलं ...

तरीही मी समोर दिसताच त्याला तो छाती ठोकून म्हणतो ..

ऑल फेअर् इन लव्ह अँड वॉर ..तू फक्त माझी आहेस फक्त माझी ...

खरचं निशब्द होऊन जाते मी तेव्हा ..रड ल्याशिवाय पर्याय च नाही उरत माझ्याकडे आता ...

काल्पनिक आहे हे सार ...

Written by - Durga Mate

Jul 19, 2023

गोष्ट तिची

गोष्ट तिची

गोष्ट तिची


गोष्ट तिची.....ती दिसायला एकदम सुंदर कोणत्याही पुरुषाला सहज
तिची प्रतिमा तिच्याकडे आकर्षित करेन . रंगाने गोरी गोरी पान फुलासारखी छान दिसायची . ओठांवर येणाऱ्या smile ने अजुन खुलायची . तिच्याकडे बघताक्षणी डोळे सुखावत . लहापणापासून राणी सारखी तिची ऐस पैस
लग्नानंतरही ती तशीच राहिली राजमहालात ल्या राणी सारखी . नवऱ्याच्या जीवावर  आईश करायची .
टवटवतीत फुललेल्या फुलासारखी दिसायची .
पण आता ते टवटवीत असलेलं फुल सुखल होत . तरीही तेवढंच सुंदर दिसत होत .
दोन वर्षांपूर्वी नवऱ्याचा अक्सी डेंट झाला आणि नवरा कायमचा पांगळा झाला . मुलबाळ काहीचं नव्हतं . पण तरीही आर्थिक परिस्तिथी खालावली होती . नवऱ्याच , मेडिकल सासू सासऱ्यांच दुखणं खुपण सार बघांव लागायचं . पैशांची कमतरता जाणवते हे लक्षात घेऊन ती काम शोधण्यासाठी घराबाहेर पडते . जगाशी फार काही ओळख नव्हती . बाहेरचं जग कसं असतं माहीतच नव्हतं . दोन दिवस काम शोधूनही मनासारखं काम आणि माणसं तिला मिळाली नाहीत . ती हार माननाऱ्यातील नव्हती . जिद्दीने पुन्हा पुन्हा प्रयत्न करणाऱ्या तील होती .
ती आज तिसऱ्यांदा घराबाहेर पडली होती .
आज तरी काम मिळेल ह्या आशेवर ती इंटरव्ह्यूला गेली .
ती इंटरव्ह्यू देण्यासाठी सरांच्या केबिनमध्ये गेली तर , ते sir तिच्याकडे विक्षिप्त नजरेने बघू लागले . तिला गरज स्पर्श करू लागले . तिची अंगकाठी विक्षिप्त नजरेने न्ह्याहळू लागले . तिला गिंग येत होती , त्याच्या विक्षिप्त नजरेची त्याच्या भीतीने ती स्वतःचं शरीर चोरत होती .
इंटरव्ह्यू न घेताच तो तिला सांगू लागला तुम्ही उद्यापासून कामावर रुजू होऊ शकता . ती विचारते , " असं कस तुम्ही मला इंटरव्ह्यू न घेताच कामावर रुजू व्हायला सांगितल .
काय बघितलं तुम्ही माझ्यात एवढं  की मला लगेच कामावर रुजू व्हायला सांगत आहात . "
Sir बोलले , " काही नाही ओ आमच्याइथे महिला स्टाफ कमी आहे ना म्हणून बाकी काही नाही . "
" व्वो अश्चा " असं म्हणत ती त्यांना thanks sir तुम्ही मला काम दिलं तुमची खूप आभारी आहे मी उद्यापासून जोईंड होते असं म्हणत निघते . त्या माणसांचे विचीत्र भाव लक्षात येत असताना सुद्धा केवळ परिस्तिथी मुळे ती त्या ठिकाणी कामावर रुजू होते .
कामावर रुजू झाल्यानंतर त्या मालकाचे हाव भाव लक्षात घेत ती त्याच्यापासून चार हात लांबच राहते . पण एके दिवशी ऑफिसमध्ये एकटीच असते . कमाचाही खूप लोड होता , त्यामुळे घरी जायला खूप उशीर झाला . बाहेर किर्र अंधार पडला होता . तिला भीतीही वाटत होती . घरी जायचं तर होत , तेवढ्यात ते sir म्हणतात . आज खूप उशीर झाला ना मी तुम्हाला घरी सोडतो . ती बिचारी हो म्हणते . ती गाडीत बसली घाबरत घाबरत च कारण ह्याचीही नजर काही चांगली नव्हती .
तिचं घर आलं ती उतरणार तेवढ्यात तो म्हणतो , " मला घरी नाही का बोलवणार चहासाठी "
"या ना sir खूप उशीर झाला ना ,  म्हणून लक्षांत नाही आलं , प्लीज वेलकम इन माय हाऊस ".
" नो प्रोब्लेम असं म्हणत तो आला . "
कधाचीत त्याला तिच्या घरची परिस्थिती बघायची होती. तो तिच्या नवऱ्याला त्या अवस्थेत बगतो आणि मनोमन खुश झाला .  तिच्या नवऱ्याची अशी परिस्थिती बघून तो मनाने ठरवतो . ही गरीब तर आहेच दारिद्र्य जीवन जगत आहे . पण हिला शरीर सुखाचीही गरज असेल च की , ही
अजुन तरुण आहे . आणि तरुण असतानाच तिचा नवरा असा पांगळा झाला .
तो त्या दिवशी चहा वैगरे घेऊन , " काळजी घ्या आणि काही मदत लागली तर हक्काने सांगा . "
असं बोलतं घराबाहेर पडतो . तिच्या सासू सासरे खुश होत म्हणतात . " किती चांगला माणूस आहे हा एवढा मोठा असूनही आपल्यासारख्या गरीब घरी येऊन त्याने चहा घेतला . "
पण तिला त्याच्या बोलण्याच कोड उलगडल होत . तो असं का म्हणाला ,  त्याने आपल्याला का सहानुभूती दाखवली ह्याचही गुपित कळलं होत .पण बिचारी ती काहीचं न बोलता गप्प बसते . कारण त्याची नजर वाईट असली तरी , आजपर्यंत तो तिच्याशी अपशब्द बोलला नव्हता .
ती दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये जाते . तर लगेच तो तिला केबिनमध्ये बोलवतो . आणि advance पेमेंट देतो . ती खुश होते कारण तिला पैशांची गरज असते .
तो तिच्या हातात पैसे देताना , तिच्या हाताना स्पर्श करतो .
तो स्पर्श तिला खूप क्लेशकारक वाटतो . ती  हात मागे घेण्याचा प्रयत्न करते तर , तो तिचा हात अजुन घट्ट पकडतो . आणि बोलतो , " तुला मी वेळोवेळी पैसे पुरवत जाईन फक्त तू मला खुश ठेव . "
त्याच्या अश्या बोलण्याची तिला गींग येते . ती त्याच्या हातातून तिच्या हात कसाबसा सोडवते आणि म्हणते ,
" बाई काय फक्त पुरुषाला सुख देण्यासाठी असते का ? बरं असेलही मग काय तिने कुठल्याही पुरुषाला सुख द्यावं . मला पैशाची नड होती . म्हणून मी तुमची वाईट नजर लक्षात घेऊन ही घेतली नाही . पैशाची गरज असली तरी पैशासाठी स्वतःला विकणाऱ्याती ल बाई नाही . 
मला तुमच्यासारख्या विक्षिप्त माणसाचा हा पैसाही नको ."
ती त्याच्या तोंडावर ते पैसे फेकते आणि निघून जाते .

स्त्री केवळ उपभोगण्याची वस्तू नाही , तिच्याकडे केवळ उपभोगण्याची वस्तू म्हणून बघू नका . तिला सगळ्यांत जास्त प्रिय आहे ते तिचं चरित्र आणि तिचा स्वाभिमान तो
डीवसावण्याचा प्रयत्न कधीही करू नका .

ही कथा पूर्णतः काल्पणीकतेवर आधारित आहे .
कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा .


Jul 18, 2023

पवित्र बंधन ..

पवित्र बंधन

पवित्र बंधन ..


Sacred bond:

लव्ह मॅरेज...अरेंज मॅरेज.कोर्ट मॅरेज ..आता बऱ्याच ठिकाणी आंतर जातीय विवाह केल्या जातो ..आणि मग त्या त्या संस्कृती नुसार विवाह पद्धत सगळ्याच सुंदर पद्धती आहेत विवाहाच्या ...

लव्ह मॅरेज - मनासारखा जोडीदार मिळाला ...ज्याच्यावर जिवापाड आपण प्रेम करतो ..तोच जीवन साथी म्हणून आज माझ्या जीवनात आला ...ह्याचा आनंद खूप वेगळा असतो ...लव्ह मॅरेज बर्याच वेळेस फॅमिली मान्य नसतो .. कारण तो मुलगा तुमच्यासाठी योग्य नाही .. असं आपल्या घरच्यांना वाटतं असतं ...आणि ते अयोग्य ही नसतं ..
कारण आपल्याला फक्त प्रेम करण माहीत असतं . संसार करण्याचा अनुभव नसतो ..

तो मुलगा व्यवस्थित कमावतो की नाही .. आपला उदार निर्वाह करन्यासाठी सक्षम आहे की नाही . आपल्याला काहीच माहित नसतं . कारण आपण फक्त त्याने दिलेल्या 10 रू च्या dairy milk catbarry वर त्याच्यावर फिदा झालेलो असतो ...

अनेकदा मुलींना माझ्या घरी एवढी प्रॉफरटी तेवढी प्रोफरटी म्हणून त्यांची फसवणूक ही केली जाते . आणि मग नंतर रिअल परिस्तिथी बद्दल तिला समजत तेव्हा.  ती बिचारी खूप hurt होते ...कारण अनेकदा मुली प्रिय करासाठी जन्म दात्या आई वडिलांना कायमचं राम राम करायला ही मागे पुढे बघत नाही .....

अनेकदा खूप पस्ताव अशा मुलींना ..पण वेळ निघून गेलेली असते काहीच फायदा नसतो ..म्हणून लव्ह मॅरेज खूप विचार पुर्वक करायला हवं मुलींनी ..कुठल्याही वयात नाही ..तर सज्ञान झाल्यावर करायला .फक्त वयाने नाही तर ..आर्थिक दृष्ट्या ..वैचारिक दृष्ट्या सज्ञान झाल्यावर मुलांनी लव्ह मॅरेज करण्याचं पाऊल उचलाव ....

लव्ह मॅरेज करण्याआधी प्रत्येक मुलींनी विचार करावा ...आपण ज्याच्यासाठी हक्या जगाशी भांडलो ...त्याचं लग्नानंतर लव्ह कमी झालं तर ?
स्वतः ला प्रश्न विचारून बघावा ..प्रामाणिक पने जे उत्तर येईल ..त्या उत्तर चा ही थोडा फार विचार करून पुढचं पाऊल . टाकावं ..तर आयुष्याचं कल्याण ..नाही तर संपूर्ण आयुष्य अंधारात जाईल ...

लग्न म्हणजे काही भातु कलीचा खेळ नाही हे ..हा भाहुला आवडला नाही म्हणून मी भाहुला change करणार ...लग्न ही खूप मोठी कमिटमेंट आहे ...
आयुष्यभरासाठी ची आपल्या साठीही आणि समोरच्यासठी ....

" अरेंज मॅरेज -

अरेंज मॅरेज एक सुखद सहवास ..हवा हवासा वाटणारा ..तडजोड adjustment शिकवणारा एक सुंदर प्रवास..हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळेलच ..अस काही नसत हे मिळालं त्यात समाधानी रहायचं ...अरेंज मॅरेज मला असं वाटतं ..खूप कठीण पण तितकाच छान प्रवास आहे ..तो प्रवास मी स्वतः अनुभवला ..आहे ..

ज्या व्यक्ती ला कधीही ओळखत नव्हते ..त्याच्या सोबत आज गुण्या गोविंदाने राहते ..कितीही वाद झाले तर मिटवावे लागतात ..आणि त्याला ही नमत घ्यावचं लागतं .....कारण समाजाने आम्हाला लग्न या पवित्र बंधनात अडकवलं ..जे आम्हाला आयुष्यभर जपायच आहे ...

ओळख नव्हती ..प्रेम नव्हतं ..सहवासाने सगळ शक्य झालं ...प्रेम ही झालं ओळख ही आणि संसार ही छान सुरळीत चालू आहे ...लव्ह मॅरेज मध्ये एवढा छान नवरा मला नसता मिळाला ..आमच्यात भाडण होतात .. पण तरीही माझा नवरा नेहमी माझ्या समोर सावली सारखा उभा राहतो ..कारण माझ्या वडिलांना दिलेलं वचन तो निभवतो आहे ..


अरेंज मॅरेज चा फायदा .....

कोर्ट मॅरेज ...

लव्ह मॅरेज करणाऱ्यांसाठी च नाही ..तर गरीब सरिब लोकांसाठी ही असतो ..पण आपला सो कॉल्ड समाज ..हा गर्विष्ठ खूप हे ...एक वेळेस स्वतःच एक एकर विकायला काढेल .. पण सरळ साध्या पद्धतीने आणि त्यात ही कायद्याने लग्न करायला मान्यता देणार ..आणि एखदाया सुशिक्षित जोडप्याने करायचं ठरवलं ही ना ..तर ते करू देणार नाही ....त्या पवित्र बंधनावर कलंक लावायला मागे पुढे बघणार बघ नाही .....

आंतर जातीय विवाहात ..वेगळ्या वेगळ्या म्हणजे आपल्या आपल्या संस्कृती नुसार लग्न करन ..एक सुखद क्षण.

मॅरेज कोणतंही असो ...मॅरेज करण महत्वाचं नाही ..हे तर ते मॅरेज निभवण महत्वाचं आहे ...

आपल्या जोडीदाराला कोणत्याच परिस्तिथी त एकटं न सोडता ...त्याच्या सोबत नेहमी सावली सारखं उभं राहणं ..हे खरं लग्न करणाऱ्या जोडप्याच कर्तव्य आहे ..

नवरा..पुरुष म्हणून पुरुषार्थ गाजवनार ..लग्न ह्या पवित्र बंधनावर कलंक आहे ....

एकमेकांचे नवरा बायको होण्या आधी एकमेकांचे चांगले मित्र मैत्रीण होण गरजेचं असतं . आणि तिचं खरी सुरुवात असते ..आपल्या आयुष्याची आपल्या संसाराची ..ज्याने ती सुरुवात शेवट पर्यंत जपली त्याचा संसार आदर्श संसार नक्की होणार .......किती वाईट परिस्थिती आली तरी ते एकमेकांना जिवापाड जपणार .......हसत खेळत त्यांच्या संसाराचा आनंद लुटणार ...

Written by - durga mate


Jul 17, 2023

चल ना सख्या

चल ना सख्या

चल ना सख्या ...कोकण आणि पाऊस ...

त्यात मला भिजण्याची हौस ...
हातात हात गुंफूनी ..
येवू कोकण फिरुनी ...
चिंब चिंब भिजू ..
त्या गोड निसर्गाचा आनंद घेऊ ..

चल ना सख्या ..

धुंद पावसात त्या ..

चिंब चिंब भिजतांना ..

अलगद एकमेकांच्या मिठीत विसावू ..

पाऊस परतीला गेल्यावर ...

इंद्रधनुष्य चे रंग  पा हु सोबतीन ..

अथांग त्या आभाळाची ही सफर करू मग .

एकमेकांच्या सा थिन ...

चल ना सख्या ..

कोकणात जाऊ ..

चल ना सख्या .....दुर्गा मते..


Jul 14, 2023

भास की आभास ..

भास की आभास ..

भास की आभास ..

ओळख तुझी माझी..

आहे कालचीचं ..
तरीही का वाटते ..
आहे ती युगान युगाची ...
तरीही ओळखीचा का ?
भासे मजला ...
द्वंद्व तुझ्या माझ्या नात्याचे...
न उमजे मला ...
आधीच काळजावर उमटलेले ...
अनोळखी तरीही.....
का आज ओळखीचे वाटले ...
सत्य की असत्य ..
ओळख की अनोळखी ..
काहीचं न उमजे मला ..
स्पर्शून जाता जीवाला ..
वेगळाच आनंद होई ह्या मनाला ..

चेहरा तुझा अनोळखी ..

हास्य तुझे ...

तू भास की आभास ..

तरीही ही वीण नात्याची ...

दुर्गा मते


Jul 12, 2023

अनोळखी असूनही

अनोळखी असूनही

अनोळखी असूनही ते त्यांची कॉमेंट मेंट किती सिरीयसली निभावतात ..मला तर खूप अप्रूप वाटतं त्यांचं ....

प्रश्न पडला असेल ना कोणाचं ..तर मला अप्रूप वाटतं . अरेंज मॅरेज करणाऱ्याच ..

ना कधी एकमेकांना पाहिलेलं असतं.  ना एकमेकांबद्दल काही माहीत असतं . तरीही एकमेकांसोबत सप्तपदी चालण्याच  धाडस ते करतात .. जवळच्या मित्र मैत्रिणी ला ही आपण सहज वचन नाही देऊ शकत ...एवढ्या सहज वचन आपण त्या अनोळखी व्यक्तीला देऊन बसतो. 

आणि त्याच अनोळखी व्यक्ती सोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करतो ...

खरच खूप छान आहे ही प्रथा ...

अरेंज मॅरेज एक सुखद अनुभव ...हवा हवासा वाटणारा .

मला ना लग्ना अगोदर लव्ह मॅरेज करण्याची खूप इच्छा होती . पण नेमकं नशीब खराब ..लव्ह झालं आणि मॅरेज अर्धवटच राहील 😝😝😝

पण लग्ना नंतर खर सांगू कळून चुकलं लव्ह मॅरेज पेक्षा कित्येक पटीत अरेंज मॅरेज छान असतं ....

अनेक जण म्हणतात  लव्ह मॅरेज टिकत नाही . पण मी त्याला सहमत नाही .

खर प्रेम असेल तर ते शेवटच्या श्वासापर्यंत टिकतं ..मग ते लग्न बंधनात अडकलेलं असो नसो . प्रेम महत्वाचं ..

खर म्हणजे प्रेम ही भावनाच किती सुंदर आहे ...कोण असतो तो आपला ..ज्याच्यासाठी आपण आपला जीव ही गहाण ठेवायला तयार असतो ...

सुरुवातीला अनोळखीच असतो ना तो ..ज्याच्यावर आपण जीव जडलेला असतो ...किंवा जडत असतो .

अनोळखी व्यक्ती जेव्हा सहवासात येतो . तेव्हा atomatic त्याच्याशी एक बॉण्ड तयार होतो.  मग तो अनोळखीच व्यक्ती कधी ओलखी चा होऊन आवडीचा होतो कळतं ही नाही ....

प्रेमात तरी रिस्क असते . आवडीच्या व्यक्ती सोबत ही काही कारणाने माणूस नाराज होऊन ब्रेक अप करतो .पण अरेंज मॅरेज मध्ये अस काहीही नसतं ..

सहवासाने प्रेम होतं ....

त्याच्या तिला किंवा तिच्या त्याला काही गोष्टी बद्दल तक्रार असली तरी ती तक्रार ओठांवर न येऊ देता .. मनातल्या मनातच दाबून तडजोड स्विकारल्या जाती ..सप्त पदी चालताना केलेली कमिटमेंट सिरीयसली निभावली जाती ....

खरच अरेंज मॅरेज चा प्रवास खूप सुरेख असतो...

अनोळखी तून ओळखीचा प्रवास ..प्रेम त्याग आणि तडजोड ...एक मेकांना समजून घेत ..आयुष्याचा प्रवास पुढे तसाच चालू ठेवणं खरच खूप अवघड असतं. . पण ते सगळं सहज सोप होऊन जातं अरेंज मॅरेज मध्ये .....

अरेंज मॅरेज करणारे सगळे अनोळखी असूनही ओळखीचे होऊन आयुष्यभर कमिटमेंट निभावतात ...

अनोळखी असूनही ......खरच खूप छान अनुभूती असते ...

अनोळखी बंध

अनोळखी बंध 



Strange bond:

अनोळखी असून ही ..

किती ओळखीची वाटतं होतो..

एकमेकांमध्ये नकळत गुंतलो होतो ....

एकमेकां च्या सुख दुःखात ..

आनंदाने सामील व्हायचो..

छोटी छोटी गोष्ट सुद्धा आंनदाने

एकमेकांशी शेअर करायचो ...

दिवस माझा ...

तुझ्याशी बोलल्याशिवाय कटायचा नाही ...

तुझ्यात गुंतलेला जीव ..

अजुनही बाहेर निघत नाही....

म्हणायला ऑनलाईन होत सारं...

प्रेम होतं की मैत्रीचं अनामिक बंध

अजुनही कळत नाही....

अनोळखी असूनही खूप आपुलकीचे बंद वाटायचे बाई ..

तुझ्यात हरवलेली मी ..

शोधत आहे अजुनही ..

माझ्या च घराच्या परतीच्या वाटा ...

त्या काही माझ्या वाट्याला येईना नाही ..

तुझ्यात गुंतलेला जीव मला सोडावा वाटतं नाही ..

Strange bond:  Written by - durga mate

strange-bond


Jul 11, 2023

कला माणसाला घडवते

कला माणसाला घडवते



Art makes man:

कला माणसाला घडवते..
आयुष्याचा शिल्पकार होते ..
एकटेपणात छान सोबती होते ..
आयुष्याला अर्थ नवा आणते ..

ऐकलय मी अस कलाकार कधीच उपाशी राहू शकत नाही ....ज्याच्याकडे कला ...तो हसत हसत सामोरे जावू शकतो समोर येणाऱ्या  प्रत्येक परिस्थितीला ....

कला माणसाला आनंदी रहायला शिकवते ..
दुःख विसरायला भाग पाडते .....
तिच्यात समरस व्हायला शिकवते ...

कला असताना ही जो माणूस ..
ती कला जपत नाही ..
तेव्हा ती कला ही हिरमसून जाते ..

मी जन्म घेतलाय ...ह्याचं आयुष्य सार्थकी करण्यासाठी

मग हा का चींगुसी


Art makes man ......कला कोणतीही असो...तिला जपणं वाव देणं त्या कलेला वृंदिगत करण हे प्रत्येक कलाकारच कर्तव्य असतं ..आणि ते प्रत्येक कलाकाराने पार पाडायला हव असं मला मनापासून वाटतं..

Written by - durga mate

Jul 10, 2023

पहिला पाऊस

पहिला पाऊस 


first-rain


First Rain

मी एखाद्या लहान मुलीसारंख ..

ह्या पावसात भिजाव ....

वाहणाऱ्या वाऱ्या सोबत बेभान व्हावं ..

मातीचा सुगंध घेत ..

अंगणात नाचावं ...

तुला पाहताना चोरुन लाजाव ..

तू अलगद त्या ..

बरसणाऱ्या पावसात मला मिठीत घ्यावं ..

माझ्यासोबत थोड तू ही रोमँटिक व्हावं ..

त्या धुंद सरीत ...

माझ्यात तू बेधुंद व्हावं ..

तुझ्या ओठांचा एक हळवा कोपरा.

मला देऊन तृप्त करावं ....
मला आयुष्यभर घेऊ दे
माझ्या आनंदात तू ही सामील होऊन ...
ह्या पावसाची चव घेऊन बघ ...

ह्या पहिल्या पावसाचा आनंद ..

Written by - durga mate

first rain


Jul 9, 2023

प्रेम सरी

प्रेम सरी

love shower:

love shower
The season of love has come...
Feelings started to go away..
Budding love blossomed...

आला प्रेम ऋतु ...

जावू लागल्या भावना उतू ..
अंकुरलेल्या प्रेमाला बहर नवा आला...
चिंब पावसात भिजताना...
प्रेम रंगी मी रंगले ...
माझ्यावर रूसून बसले ...
मी त्यांना तोऱ्यात बोलून गेले. .
तुझ्यासाठी काय पण?
तुझ्या माझ्या प्रेमाचे साक्षीदार ...
मला खूप प्यारे ...
मी तुझे मन चोरले ...

सुखाच्या सरी बरसू लागल्या ..

सभोवताली सुंदर बागा ही नटल्या ...

तुझ्या आगमनात ...

पाखरांचा किलबिलाट ही सुरेख रंगला ..

पाऊस राजा धरणीवर अवतरला ..

कोवळ्या वाऱ्याने अंग शहारले ...

तुला पाहता ते काळे ढग ..

मग ते ही आनदांने बरसले ...

सारे निसर्ग मित्र माझे ..

त्यांच्या साक्षीने ..पावसाच्या  ...

Love shower: Written by - Durga Mate

ओवाळनीची परतफेड

माधव आणि माधवी अनाथ पोर लहानपाणीच आईवडील देवाघरी गेले . पोरकेपन वाट्याला आले . माधव हा माधवी पेक्षा वयाने खूप लहान , माधवीने माधववर आईप्रमाणे प्रेम केले . त्याच्यावर कुठलही संकट येण्याआधी  तिने ते संकट झेलले  . कारण तिने शेवटच्या क्षणी आईला वचन दिलेले असते .  की मी माझ्या आधी नेहमीच माधवचा विचार करेन . त्याच्या सुख दुःखात त्याची सावली होईल . 
तुझी जागा तर , नाही घेऊ शकणार पण तुझी उणीव ही नाही भासू देणार . ते वचन तिने जिवापाड जपल ही आणि पाळल ही .....

                             माधव ही तिला आईच्या  जागी  मानत  होता  . तो त्याच्या ताईलाच आपलं सर्वस्व मानत होता . आई म्हणजे काय ? माहीत नव्हत पण ; ताई म्हणजे काय ते उत्तम रित्या माहीत होत . 

            ताई म्हणजे आईचचं दुसर रूप असत ,
            आयुष्याचं झाकतं माप असतं ,
            कोमल मन तिचं आयुष्य फुलवून टाकतो ,
            ताई हा शब्दच मला खूप अपरूक वाटतो ,
            
अशा सुंदर भावना ताई विषयीच्या माधवच्या मनात स्फुरलेल्या होत्या . त्याला वेळोवेळी खत पाणी घातलं होतं , ते माधवीच्या प्रेमळ स्वभावाने ,  तिच्या संस्काराने .
आई विना पोर होती ती तरी , ही खूप संस्कारी आणि स्वाभिमानी होती . आणि तिने माधवलाही तसचं घडवलं होतं .  लोकांनी जळावं आणि त्यांच्या नात्याला दृष्ट लागावी . असं त्यांचं नातं होतं . 

            चाफ्याच्या फुलाला अबोलीचा गंध ,
             माधवच्या ताईला माधवचाचं सुंगध ...

असं म्हणत त्याचं नातं फुलत गेलं . ते अगदी सुंदर  आनंदाने लहानाचे मोठे झाले . माधवीचे  लग्नाचे वय उलटुन गेले होते . पण माधवची सीता शोधल्याशिवाय आपण आपला राम शोधायचा  नाही . असं माधविने पक्क ठरवलेले होते . मग ते तर , माधवला मान्यच करावे लागले . पण ते मान्य जरी करायचे होते . तरी त्याला फार काही पटतं नव्हते . 

मनाची चीलबिल होतं होती , ताई आधी आपलं लग्न आई बाबा असते . तर आधी ताईचं केलं असत अन् , मग आपल घोड नाचवलं असतं .  माधव ताईला म्हणाला , " मी लग्न करेन पण लग्नाआधी माझी जी  काहअट असेल ती तुला मान्य करावीच लागेल .

" कोणती अट माधू ? तू म्हणशील ती अट मला मान्य असेल . तू फक्त बोल " 

" ताई आपण दोघांनी एकाच मांडवात लग्न करायचं हिचं माझी अट " 

तेवढ्यात शामराव काका आले आणि " अगदी बरोबर बोललास माधू एकाच मांडवात दोघांचं शुभ मंगल करून टाकू " 

माधवी , " काका हे कसं शक्य आहे , किती धावपळ होईल . " 

श्यामराव काका , " मी असल्यावर धावपळ कशी होईल "

ठरल्याप्रमाणे माधवी आणि माधुच एकाच मांडवात लग्न होतं . सारं सुरळीत चाललेलं  होतं . माधू आणि माधवी सुखी संसारात खुश होते .  लग्नाला दीड वर्ष झालं .
माधवीला दिवस गेले . आपण मामा होणार ह्या बातमीने माधू खूप खुश झाला . ती ही खूप खुश होती . पण त्या आनंदावर विरजण हे पडलं .

माधवीच्या नवऱ्याला बिजनेस मध्ये खूप मोठा फटका बसला . खूप कर्ज झाल . कर्ज फेडण्यासाठी स्वतः च राहत घर विकाव लागलं . ते रस्त्यावर आले . ही बातमी माधूला कळताच तो रस्त्यावर आलेल्या आपल्या ताईला आणि भाऊजीला मायेचा आदर देतो . तो त्यांना आपल्या घरी राहण्याचा आग्रह करतो . माधवी खूप स्वाभिमानी माहेरी जायला राजीच होईना . हे माधु च्या लक्षात येताच तो म्हणतो ,  " अगं वेडा बाई मी तुला आणि माझ्या साल्याला भाऊ बिजेसाठी न्यायला आलो . उद्या दिवाळी आणि परवा भाऊ बीज मला ओवळणार नाही का ह्यवर्षी 

माधवी , " अरे माधू मी विसरले उद्या दिवाळी नाही का ?
भाऊ बिजेसाठी मी येते . पण भाऊ बीजेनंतर राहण्याचा आग्रह करायचा नाही . "


" मी का करू राहण्याचा आग्रह उगाच माझ्या घराला ओझ ... "  माधव लटक्या रागात ...

" हो का बरं चल आता जाऊ ह्या .... " माधवी 

माहेरी गेल्यानंतर चार दिवस तिला सुखाचे क्षण उपभोगता येतात . ओवळणीच्या दिवशी ती आपल्या भावाला ओवाळते . तिचा भाऊ ओवळणीत तिला नव्या घराची किल्ली देतो . ती बघून ती आश्चर्यचकित होते . 
ती माधूला विचारते , 

" काय माधू हे ?  कशाची किल्ली आहे . ?" 

" ती तुझी ओवाळणी आहे . तुझ्या नवीन हक्काच्या घराची किल्ली . "

" अरे पण कशासाठी नको अरे " ती खूप परावलंबी असल्यासारखी भाऊक होते . 
तेवढ्यात माधु म्हणतो , " ताई लहानपणापासून तूच शिकवलं ना ओवाळणी कधीही   परत  करायची नसते म्हणून ,  मग आज तूच ओवाळणी अशी परत करतेस . भावाची माया एका क्षणात झटकली . " 

" नाही रे  वेड्या असं काही नाही . माधू मी  ही भाऊबीज आणि  ही ओवाळणी  कधीच नाही विसरणार ह्याला जिवापाड जपणार . खूप खूप आभारी आहे तुझी" असं  बोलत असतानाच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात . माधु तिला त्यांच्या मायेची ऊब देतो . आणि दोघेही मन मोकळ रडतात आणि आई वडीलांच्या फोटो समोर हात जोडून नमस्कार करतात . 

दुसऱ्या दिवशी माधवी आपल्या नवीन घरी जाण्याची तयारी करत असते . ती गाडीत बसणार तेवढ्यात माधुची बायको नीलिमा हिला अचानक चक्कर येते आणि ती खाली कोसळते . तेवढ्यात तिला सावरायला माधवी येते .
आणि लगेच डॉक्टरांना कॉल करते .  

थोड्याच वेळात. डॉक्टर येतात  तिला चेक करतात . तेव्हा खूप वाईट बातमी ऐकायला मिळते . की निलिमा केव्हाही आई होऊ शकत नाही . बातमी ऐकून माधू पूर्ण पणे खचून गेला . नीलिमाची अवस्था तर  , बघन्याजोगी नव्हती . ती आतून खूप कोलमडून गेली होती . तिची ती अवस्था पाहून माधवीला खूप वाईट वाटत होत . काय करावं सुचत नव्हतं . तेवढ्यात तिचा हात आपल्या गर्भात वाढणाऱ्या अंकुराकडे गेला . आणि तिच्या डोक्यात ही परिस्तिथी बदलण्याची कल्पना आली . ती तशीच धावत जाऊन आपल्या नवऱ्याकडे गेली . डोक्यात आलेली कल्पना त्याला सांगितली . आणि त्याच्या सहखुशिने एक योग्य निर्णय घेतला . सर्वांच्या सुखी आयुष्यासाठी आनंदासाठी .

दुसऱ्या दिवशी ती माधूला म्हणते   " माधू नीलिमा कुठे ,? 
मला तिला आणि तुला एक good news द्यायची आहे"

" Good news कसली " 

"नीलिमा आल्यावरच सांगते " तेवढ्यात नीलिमा आली ती जाते आणि नीलिमाला आनंदाने एक मिठी मारते . आणि आनंदाने म्हणते , " अभिनंदन तू आई होणार आहेस " 

त्या वाक्याने नीलिमाचे डोळे भरून आले , आणि ती भरलेले डोळे पुसत म्हणते , " का उगाच मजाक घेता ताई माझ्या जखमेवर मीठ चोळताय " 

" अग मीठ नाही खरच तू आई होणार आहेस आणि ती नीलिमाचा हात आपल्या पोटावर फिरवत म्हणते हे बघ तुझ बाळ कसा वाटला त्याचा स्पर्श ? आवडला ना . "


"माधू. ,  काय बोलतेस ताई तू मला नाही कळलं काही "

"अरे दादा मी आणि यांनी असा निर्णय घेतला आम्ही आमचं पाहिलं बाळ  हे नीलिमाच्या पदरी दान करायच ठरवलं . मी पुन्हा आई होऊ शकते, पुन्हा चान्स घेऊ शकते .  नीलिमाची ओंजळ रिकामी राहू नये यासाठी मी हा निर्णय घेतला . ही तुमच्यावर मेहरबानी म्हणून नाही तर , ही तुझ्या ओवळणीची परत भेट आहे . त्यामुळे ती तुला स्विकारावीच लागेल.

ही बातमी ऐकून महाधू आणि   नीलिमाचे डोळे भरून येतात . ते हात जोडून त्या दोघांचे आभार मानतात . नीलिमाला तर कळतच नव्हतं आपल्या नंदेचे आभार कसे मानावे .  ती अगदी स्तंब्ध झाली होती .
तेवढ्यात माधवी आणि माधवीचा नवरा एका सुरात" काय मग आवडली ना ओवळणीची परत भेट स्विकारणार ना ?"

आवडली म्हणजे खूप आवडली तुम्ही आता नाही म्हटला तरी आम्ही ती स्विकारणार आहोत . असं म्हणत निलिमा  आपला आनंद व्यक्त करत होती  .  आनंदी निलिमाला बघून  माधवी खूप समाधान मिळते .  त्यांच्या भावा बहिणींच्या नात्यावर नव्याने वेगळाच सांज चढतो .

नात कोणतंही असो समजून घेणं  खूप गरजेचं असतं , नात्यात    वेळोवेळी आधार देण्याची खूप गरज असते  .दुसऱ्याच्या  सुखासाठी काळजाचा तुकडा ही त्याग करण्याची क्षमता असावी लागते . तेव्हा कुठे नातं टिकतं आणि फुलतं  त्यामुळे ,  आयुष्य सार्थकी होतं.

Jul 8, 2023

तुझ्या येण्याने

तुझ्या सहवासात आयुष्य रंगिन झालं ..


तुझ्या एवढं ह्या आधी ..


कोणीच महत्वाचं नाही वाटलं ..


तू आलीस आणि आयुष्यच बदलून गेलं ..


प्रेम करण काय असतं ? ..


काळजी करणं काय असतं ?


ह्याच्याशी नव्याने नातं जुळल ...


वाद झाला की ....


जीव तील तील तुटतो ...


वाद मिटवण्यासाठी नेहमीच तो ..


पुढाकार घेतो ....


तुझ महत्व


लग्नाच्या बेडीत अडकल्यावर नाही ..

तर तू क्षणभर मनापासून दूर गेल्यावर कळल 

पुन्हा तुझ्या येण्याने ..
आयुष्य रंगी न झालं ...
तुला सोडून जाणं मला कधीचं परवडणार नाही ..
नव्याने कळलं ...

Written by - durga mate

Jul 7, 2023

नियतीची खेळी

 मी कधीच कोणाचाही तिरस्कार करत नाही ..कारण तिरस्कार करण माझ्या स्वभावात च नाही .. ज्याने कधीतरी मला मनातून आउट ऑफ करून माझ्याशी वाईट वागल आहे ...त्यांना मी कधीच माझ्या सावलीला ही उभ करणार नाही ...ज्यांनी माझ्या हक्काच्या गोष्टी हिरावून घेतल्या आहे ...त्यांना मी कधीही  काडीचही महत्व देणार नाही ...ज्यांना मला चांगली वागणूक म्हण न्यापेक्षा समान वागणूक देता आली  नाही ...त्यांच्या खोट्या खोट्या चांगुलपणावर विश्वास ठेवून आता मी पुन्हा फसणार नाही ...अगदी फॅमिली तील मेंबर पासून ही दुनिया किती मतलबी आहे ..ह्याची अनुभूती घेतली आहे....अगदी हकाच्या नवर्यापासून ..


त्यामुळे आता खोट्या फसव्या नात्यावर विश्वास ठेवण्याची हिमंत मी पुन्हा करणार नाही...


अलोन बी हॅपी .हाच रुळ मी आता फॉलो करणार आहे ..ह्या सगळ्यात जग काय म्हणत ह्याचा विचार मी कधीच करना र नाही ...कारन जग दुःख वाटून घेणार नाही ..माझ्यावर जो अन्याय होतो ..तो कोणी वाटून घेणार नाही.....


आता माझं वाईट वागण लोकांना दिसेल ..बऱ्याच जणांना खटकेल ही बट आय डोन्ट केअर् ....


कारण त्यांना हिस्टरी माहीतच नसते ..आपण किती वाईट आहे ...आपल्याला वाईट ज्यांना ठरवायचं आहे .. ते फक्त त्यांचा चांगुलपणा घेऊन मिळवणार आपल्याला बदनाम च करणार ..त्यामुळे त्या फालतू लोकांना कडे लक्ष द्यायला ही माझ्याकडे वेळ नाही हे ...


एक आत्मविश्वास ने सांगू शकते ...मी एवढी सायको कधीच नव्हते ...पण मी ज्या माणसांत एवून मिसळले ना त्याचं लोकांनी मला सायको केलं आहे .....आणि आता मी पुन्हा त्या लोकांसाठी तरी मी कधीच चांगली होऊ शकत नाही . .


कारण जेव्हा माझी डिलिवरी झाली ना. .तेव्हा पासून म्हणण्या पेक्षा जेव्हा मला सातवा महिना चालू होता ना तेव्हा पासून मी सगळ्यांचे स्वभाव खूप जवळून ओळखले आहे .. आणि तेव्हा पासून माझी त्यांच्यावरची भावना उडाली आहे ...


कारण मला खोटा खोटा चांगुलपणा आणि खोटी खोटी आपुलकी कधीच आवडली नाही ...आणि नशिबाने तेच माझ्या आयुष्यात लिहून ठेवलं आहे.  


लग्न झालं आणि माझ्या स्वभावा बरोबरच माझ आयुष्यच बदलून गेलं ...सुखाचा जीव मी दुःखात घातला असं वाटतं मला कधी कधी .... खरचं मी खूप चांगला डिजर्व केला ह्याची सल माझ्या मनात आयुष्यभर बोचत राहणार आहे ....


मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करते.  पण लग्नाच्या बाबतीत जरा त्यांनी घाईच केली ..त्यासाठी मी त्यांना  कधीच माफ करू शकत नाही .....आय एम स्वारी आई मी त्या वेळेस तुझ ऐकल असतं तर आज मी इतकी नकारात्मक झालीच नसते....


जे आहे ते स्वीकारलं आहे..पण ह्यात मी कधीच सुखी आणि समाधानी राहू शकत नाही ...कळून चुकलं आहे मला ...


किती वाईट असते नियतीची खेळी आज कळ ल ..

राजाच्या मुलीच्या आयुष्यात नेहमी वनवासच राहतो . ती कितीही चांगली असली ..तरी तिच्या माथ्यावर कलंक च लावल्या जातो ... तिला अग्नी परीक्षा पार कराव्याच लागतात ....

खरच किती वाईट असते ना नियतीची खेळी ..

Written by - durga mate

Jul 5, 2023

हक्क नात्याचा

तुझी माझी भेट होण ..
हक्क आहे आपल्या नात्याचा ...
जगाला विसरून ..

एकमेकांत हरवून जान ..

हक्क आहे आपल्या नात्याचा ..

खूप सोस ला विरह दोघांनीही...

खूप थांबवलं स्वतःला ..

एकमेकांना भेटण्यासाठी ....

किती जाळला जीव अबोल प्रेम व्यक्त करण्यासाठी ..

पण आता व्यक्त होण .

हक्क आहे आपल्या नात्याचा ..

आपली भेटीला जगाने ..

अनैतिक तेची उपमा दिली ...

तरी चालेल .....

स्वतःच्या नजरेला नजर देऊ शकतो ..

एवढ्या विश्वासाचं नातं नक्कीच आहे ...

आता आपली भेट होण..
खरच हक्क आहे ..
आपल्या नात्याचा ..

Written by - durga mate

संघर्ष

संघर्ष ही माणसाची हक्काची लढाई आहे ...आणि प्रत्येकाने लढायलाच हवी ..... वादळात चालतांना मनात कसलीच भीती नसावी ...कमजोर कमकुवत करणाऱ्या काटेरी वाटेवर विश्वासाची फुले आपणच लावावी ..
काळया कुट्ट अंधारात रडत बसून राहण काहीचं फायद्याचं नाही ...त्या अंधारातून बाहेर पडायचं असेल तर हिमतीने प्रकाशाचा शोध घेणं खूप गरजेचं आहे ..

पाचीच्या  दिवशी सट वाईने काय नशीब लिहून ठेवलं माझ ..अस म्हणत नशिबाला दोष देउन तिथल्या तिथेच चाचपडत राहण म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे .


परिस्थिती कितीही वाईट असू ..आपण हिम्मत हारू द्यायची नाही .. कारण जो हिमंत हारून सहज सार गिव अप करतो ..माझ्या नजरेत तो माणूस च नाही ..असच कोणीतरी आहे...


" जन्माला आला हेला पाणी वाहू वाहू गेला "


हीच उपमा मी त्याला देईल ...


आयुष्य आहे चार क्षणाचचं ...


इथे संघरश तर करावाच लागेल ...


तेव्हा कुठे ह्या मतलबी दुनियेत आपला निभाव लागेल...


ही लढाई परायाची नाही हे ..


ही लढाई तर स्वतःची च आहे ....


हीच ती खरी वेळ असते ..


स्वतःला सिध्द करण्याची ...


आपलं कर्तव्य पार पाडण्याची ...


ऐकलयं मी जेव्हा आपल्यावर चांगली वेळ असते ..तेव्हा आपल्या सुखात  सारे साथीदार होतात ..पण नियती आपली खेळी बदलते ... जरास कुठे लॉस झाला की लगेच आपलीच माणसं आपल्या  पासून दूर  जाण्याचे रस्ते शोधतात ..आणि आपण बऱ्याचदा एकटे पडतो .. 


जे आपले असतात तेचं कठीण परस्थितीत आपल्या सोबत असतात ...बदललेली परिस्थिती नकळत माणसाला खूप काही शिकवून जाते ..... आयुष्यभराचा अनुभव देऊन जाते ... सघंर्ष करायला शिकवते ..संकटावर मात करायला शिकवते . आलेल्या परिस्थितीला सामोरं जायला शिकवते .....


त्यामुळे वाईट वेळ ही आयुष्यात येणं गरजेचं असतं .. तिचं वाईट वेळ आपल्या ला परफेक्ट करत असते ..आणि संघर्षावर  मात करायला शिकवत असते ....

Good morning all of you dear readers 😊☕☕☕

Jul 4, 2023

नव्याने भेट

तुझी माझी भेट होईल खरच मला स्वप्नात हि वाटलं नव्हत . आपण पुन्हा एकदा नवीन वळणावर भेटू .. तू जेव्हा मला  मनात अडी ठेवून वीरहात सोडून गेलास ..तेव्हा अनंत यातना मला झालेल्या...गहिऱ्या आठवणी मनात साच लेल्या ...पुन्हा तुझ्यात कधीचं गुंतायच नव्हत ...फक्त misunderstading दूर करायच्या होत्या ...मला तुझ्या नजरेला नव्हत कधी काही सिद्द्द करायचं ..मला तर स्वतःच्या नजरेत स्वतःला सिध्द करायचं होतं ...हरवलेलं नातं नव्हत पुन्हा शोधायचं ..नव्हती आशा कधी तुझ्या मनाला सावरण्याची ..पण खरच आज खूप छान क्षण नशिबाने घडवून आणला ..मला स्वतःला तुझ्या माझ्या नजरेत सिध्द करण्यासाठी तुझ्या मनाने तुलाच हरवलं ...आणि मी पुन्हा एकदा जिंकले ..ह्या नात्यांच्या लढाईत स्वतःला सिध्द करून परिपूर्ण झाले ...तुझ्या मनातील गैरसमज दूर करण्यात मला यश आलं ...आयुष्यातील सर्वांत सुंदर नात जपता आलं ..खरच भाग्यवान समजते मी स्वतःला ..पुन्हा पुन्हा एकदा मला तुला नव्याने भेटता आलं ..

Written by - durga mate


Jul 3, 2023

माझे पहिले गुरू

दिव्यांग विश्व टाइम्स समूह अंतर्गत ..

विषय - गुरु पौर्णिमा ..

दिनांक - 3 जुलै 2023 ..

नाव - दुर्गा मते .

शीर्षक - माझे पहिले गुरू ..

पहिले गुरू माझे माय बाप ..
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दिली मोलाची साथ ..

बापाने चांगले संस्कार केले ...
आईने धाकात ठेवून उत्तम कर्तव्य बजावले ..

बोट धरून जो सोबत चालला ...
तो गुरू च माझा श्रेष्ठ गुरु ठरला ..


संकट येतात ..आपण ती फेस करावी ...

मनात बाळगलेली भीती सोडून द्यावी ...


अनमोल संदेश मनी रुजला ..


बाप माझा ग्रेट गुरु झाला ...


त्यांच्या नंतर अनेकांनी सुंदर शिकवण दिली ..


तरीही माझ्या वडिलां सारखी गुरु दक्षिणा ..


मला कुठूनच नाही मिळाली ..


माझ्या आयुष्याचा बेस त्यांनीच पक्का केला ..


माझ्या आयुष्याला सुंदर आकार मिळाला ..


अभिमानाने सांगावस वाटतं आज ..


माझा पहिला गुरु माझा बाप ...


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनीच दिली मला मोलाची साथ ...


आजच्या ह्या दिवशी त्यांना मनापासून धन्यवाद....


ईश्र्वर चरणी हीच प्रार्थना ...
आजन्म तुम्हीच असावे माझे माय - बाप ..

Jul 2, 2023

लोकांनी ऑन द स्पॉट असावं..

जे बोलतो ते घडत ..
असं कुठ असत का ?
मनात जे असत...
ते कधी नशिबी रूजत का ?

मनी वसे ते स्वप्नी दिसे.  ही फक्त म्हण आहे. मनात जे असतं ते स्वप्नात कधीतरी च दिसेल आणि सत्यात उतरन तर फार दूरची गोष्ट आहे ...

उलट जे ठरवतो ..त्याच्या सारं मनाविरुध्द च गोष्टी ठरतात ..त्यामुळे ठरवून काम न केलेलीच बरी असतात. .
जी काम आपण ठरवून करतो . त्यापेक्षा जी काम आपण ठरवून करत नाही.... ती काम किती तरी पटीने चांगली होतं असतात ...विश्वास नसेल तर अनुभव घेऊन पहा .   

लोकांनी कसं असावं तर मी सांगेन ऑन द स्पॉट असावं ..
जसं एखादा व्यक्ती मध्येचं उठून ई श्चा झाली म्हणून ऑन द स्पॉट भाषण ठोकतो आणि नेमकं तेच भाषण अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ठरतं ...अगदी तसच लोकांनी ऑन स्पॉट वागणं ठेवलं ना ..तर एक आदर्श व्यक्ती महत्त्व तयार व्हायला नक्कीच मदत होऊ शकते .....


आपण कितीही प्रामाणिक असलो ..अगदी जेव्हा गरज असेल समोरच्याला तेव्हा पटकन हातातील काम सोडून धावत जातं असू त्यांच्या मदतीला ..तरीही आपण त्यांच्या मनाचा ठाव घ्यायला कुठेतरी कमी च पडू ...नेहमी मदतीला धावून जाणारा एखादं वेळेस नाही जाऊ शकला की लगेच त्याची निंदा केली जाते .....आणि गरज नसल्यासारखं बोलण ही सुरू होऊन जातं . त्यापेक्षा माणसाने जशाच तस असावं असं मला मनापासून वाटतं ...

उगाच मी एक आदर्श व्यक्ती महत्त्व आहे ...अस दाखवण्यासाठी नको तितका चांगुल पना दाखवण्याची गरज नाही ....आपण फक्त आपल्या नजरेत चांगलं राहून एक आदर्श व्यक्ती महत्त्व ठरू शकतो ..

आपण कधी कोणाला फसवतोय का ? किंवा फसवल आहे का ? किंवा कोणी आपल्या hurt झालाय का ? किंवा कधी हयाआधी कोणाला  hurt केलय का ? उत्तर जर नाही येत असेल तर तुम्ही नक्कीच एक आदर्श व्यक्ती महत्त्व आहात ......

वागण्याची पण एक लिमिट असते ...
समोरचा आपला गैरफायदा घेऊन मोकळा होईल ..
एवढं ही काही चांगल वागण्याची गरज नसते ...

Written by - durga mate

Jul 1, 2023

सरोगेट मदर

सर्वात आधी.....ज्यांनी ज्यांनी सरोगसी मान्य करून कोणालातरी आई वडील होण्याचा आयुष्यातील सर्वांत मोठा आनंद दिला ...त्या सर्व सरोगेट मदर्स ना सल्युट ..

सोप नसत ..9 महिने कोणाच तरी म्हणन्या पेक्षा स्वतःच बाळ पोटात वाढवन आणि नंतर काळजावर दगड ठेवून तेच बाळ दुसऱ्याच्या हातात सोपवन खरच खूप अवघड गोष्ट आहे ...... ते सहज अस कुणालाही नाही जमत .. त्यासाठी खूप डेरिंग सहन शिलता आणि मोठं मन असावं लागतं ....


कुणाची मजबुरी असते ...कुणाला आर्थिक गरज असते ...कोणावर कसली वेळ तर कोणावर कसली वेळ ...कारण काही का असेना एखादी बाई सरोगसी साठी तयार होते ...ही खरच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे ..


मी त्या आयांसाठी कितीही लिहिलं तरी लिहायला मला शब्द मला कमीच पडतील ...त्यांचं कौतुक कोणत्या शब्दात करावं हेच मला कळेना झालं .....

मी फक्त आज त्यांना मना पासून सलाम करू इश्चिते ... त्याच बरोबर ही सरोगसी व्यवस्थित पार पडते ज्यांच्या under खाली त्या देवधुत डॉक्टरांना सुद्धा माझा मनाचा मुजरा ...

हॅपी डॉक्टर्स  डे...

मनातलं वादळ

चिंब चिंब पावसात मी भिजले ..
सप्तरंगी इंद्रधनुष्य बघतांना ..
तुझे नाव ओठी आले ....

      रंगाचं लेबल काळजाची धडाडी ..
       एकदम अचानक वीज कडाडली ..
        वादलांशी दोन हात करताना मी घाबरली ..

नकळत त्या पावसात ..
अवचित तुझी भेट जरा हलक वाटलं .
नकळत तुझ्या खांद्यावर मी डोकं टेकवल ..
मनातलं वादळ क्षणात मिटल ...

दुर्गा मते

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...