नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jul 19, 2023

गोष्ट तिची

गोष्ट तिची

गोष्ट तिची


गोष्ट तिची.....ती दिसायला एकदम सुंदर कोणत्याही पुरुषाला सहज
तिची प्रतिमा तिच्याकडे आकर्षित करेन . रंगाने गोरी गोरी पान फुलासारखी छान दिसायची . ओठांवर येणाऱ्या smile ने अजुन खुलायची . तिच्याकडे बघताक्षणी डोळे सुखावत . लहापणापासून राणी सारखी तिची ऐस पैस
लग्नानंतरही ती तशीच राहिली राजमहालात ल्या राणी सारखी . नवऱ्याच्या जीवावर  आईश करायची .
टवटवतीत फुललेल्या फुलासारखी दिसायची .
पण आता ते टवटवीत असलेलं फुल सुखल होत . तरीही तेवढंच सुंदर दिसत होत .
दोन वर्षांपूर्वी नवऱ्याचा अक्सी डेंट झाला आणि नवरा कायमचा पांगळा झाला . मुलबाळ काहीचं नव्हतं . पण तरीही आर्थिक परिस्तिथी खालावली होती . नवऱ्याच , मेडिकल सासू सासऱ्यांच दुखणं खुपण सार बघांव लागायचं . पैशांची कमतरता जाणवते हे लक्षात घेऊन ती काम शोधण्यासाठी घराबाहेर पडते . जगाशी फार काही ओळख नव्हती . बाहेरचं जग कसं असतं माहीतच नव्हतं . दोन दिवस काम शोधूनही मनासारखं काम आणि माणसं तिला मिळाली नाहीत . ती हार माननाऱ्यातील नव्हती . जिद्दीने पुन्हा पुन्हा प्रयत्न करणाऱ्या तील होती .
ती आज तिसऱ्यांदा घराबाहेर पडली होती .
आज तरी काम मिळेल ह्या आशेवर ती इंटरव्ह्यूला गेली .
ती इंटरव्ह्यू देण्यासाठी सरांच्या केबिनमध्ये गेली तर , ते sir तिच्याकडे विक्षिप्त नजरेने बघू लागले . तिला गरज स्पर्श करू लागले . तिची अंगकाठी विक्षिप्त नजरेने न्ह्याहळू लागले . तिला गिंग येत होती , त्याच्या विक्षिप्त नजरेची त्याच्या भीतीने ती स्वतःचं शरीर चोरत होती .
इंटरव्ह्यू न घेताच तो तिला सांगू लागला तुम्ही उद्यापासून कामावर रुजू होऊ शकता . ती विचारते , " असं कस तुम्ही मला इंटरव्ह्यू न घेताच कामावर रुजू व्हायला सांगितल .
काय बघितलं तुम्ही माझ्यात एवढं  की मला लगेच कामावर रुजू व्हायला सांगत आहात . "
Sir बोलले , " काही नाही ओ आमच्याइथे महिला स्टाफ कमी आहे ना म्हणून बाकी काही नाही . "
" व्वो अश्चा " असं म्हणत ती त्यांना thanks sir तुम्ही मला काम दिलं तुमची खूप आभारी आहे मी उद्यापासून जोईंड होते असं म्हणत निघते . त्या माणसांचे विचीत्र भाव लक्षात येत असताना सुद्धा केवळ परिस्तिथी मुळे ती त्या ठिकाणी कामावर रुजू होते .
कामावर रुजू झाल्यानंतर त्या मालकाचे हाव भाव लक्षात घेत ती त्याच्यापासून चार हात लांबच राहते . पण एके दिवशी ऑफिसमध्ये एकटीच असते . कमाचाही खूप लोड होता , त्यामुळे घरी जायला खूप उशीर झाला . बाहेर किर्र अंधार पडला होता . तिला भीतीही वाटत होती . घरी जायचं तर होत , तेवढ्यात ते sir म्हणतात . आज खूप उशीर झाला ना मी तुम्हाला घरी सोडतो . ती बिचारी हो म्हणते . ती गाडीत बसली घाबरत घाबरत च कारण ह्याचीही नजर काही चांगली नव्हती .
तिचं घर आलं ती उतरणार तेवढ्यात तो म्हणतो , " मला घरी नाही का बोलवणार चहासाठी "
"या ना sir खूप उशीर झाला ना ,  म्हणून लक्षांत नाही आलं , प्लीज वेलकम इन माय हाऊस ".
" नो प्रोब्लेम असं म्हणत तो आला . "
कधाचीत त्याला तिच्या घरची परिस्थिती बघायची होती. तो तिच्या नवऱ्याला त्या अवस्थेत बगतो आणि मनोमन खुश झाला .  तिच्या नवऱ्याची अशी परिस्थिती बघून तो मनाने ठरवतो . ही गरीब तर आहेच दारिद्र्य जीवन जगत आहे . पण हिला शरीर सुखाचीही गरज असेल च की , ही
अजुन तरुण आहे . आणि तरुण असतानाच तिचा नवरा असा पांगळा झाला .
तो त्या दिवशी चहा वैगरे घेऊन , " काळजी घ्या आणि काही मदत लागली तर हक्काने सांगा . "
असं बोलतं घराबाहेर पडतो . तिच्या सासू सासरे खुश होत म्हणतात . " किती चांगला माणूस आहे हा एवढा मोठा असूनही आपल्यासारख्या गरीब घरी येऊन त्याने चहा घेतला . "
पण तिला त्याच्या बोलण्याच कोड उलगडल होत . तो असं का म्हणाला ,  त्याने आपल्याला का सहानुभूती दाखवली ह्याचही गुपित कळलं होत .पण बिचारी ती काहीचं न बोलता गप्प बसते . कारण त्याची नजर वाईट असली तरी , आजपर्यंत तो तिच्याशी अपशब्द बोलला नव्हता .
ती दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये जाते . तर लगेच तो तिला केबिनमध्ये बोलवतो . आणि advance पेमेंट देतो . ती खुश होते कारण तिला पैशांची गरज असते .
तो तिच्या हातात पैसे देताना , तिच्या हाताना स्पर्श करतो .
तो स्पर्श तिला खूप क्लेशकारक वाटतो . ती  हात मागे घेण्याचा प्रयत्न करते तर , तो तिचा हात अजुन घट्ट पकडतो . आणि बोलतो , " तुला मी वेळोवेळी पैसे पुरवत जाईन फक्त तू मला खुश ठेव . "
त्याच्या अश्या बोलण्याची तिला गींग येते . ती त्याच्या हातातून तिच्या हात कसाबसा सोडवते आणि म्हणते ,
" बाई काय फक्त पुरुषाला सुख देण्यासाठी असते का ? बरं असेलही मग काय तिने कुठल्याही पुरुषाला सुख द्यावं . मला पैशाची नड होती . म्हणून मी तुमची वाईट नजर लक्षात घेऊन ही घेतली नाही . पैशाची गरज असली तरी पैशासाठी स्वतःला विकणाऱ्याती ल बाई नाही . 
मला तुमच्यासारख्या विक्षिप्त माणसाचा हा पैसाही नको ."
ती त्याच्या तोंडावर ते पैसे फेकते आणि निघून जाते .

स्त्री केवळ उपभोगण्याची वस्तू नाही , तिच्याकडे केवळ उपभोगण्याची वस्तू म्हणून बघू नका . तिला सगळ्यांत जास्त प्रिय आहे ते तिचं चरित्र आणि तिचा स्वाभिमान तो
डीवसावण्याचा प्रयत्न कधीही करू नका .

ही कथा पूर्णतः काल्पणीकतेवर आधारित आहे .
कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा .


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...