नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jul 20, 2023

निशब्द भावना

निशब्द भावना

निशब्द भावना

निशब्द भावना

गोठलेल्या भावनेला सय येईना ..
निशब्द झालेल्या भावंनांना वाचा फुटेना ...
झाली होती  राख रांगोळी स्वप्नांची .....
पेटत होती होळी नजरेसमोर माझ्या आयुष्याची..
तरीही मी घेतली होती शपथ मौनांची ....

जगाला वाटतं होतं .. मी खुश होती ...पण नाही ते तर फोटो ग्राफर म्हणत होता ...smile कर..म्हणून मी smile करत होती ..नाही तर मनात हजारो आसवांची रौंदल होती ...

वेदनाच होती तशी गहिरी ...

हळद अंगाला लागत होती ...जखम मात्र खोल काळजात रुतत होती ...एवढे दिवस पाहिलेली स्वप्न क्षणात लयास जात होती ....राज कुमार मनात वेगळाच घर करून राहिलेला ....आयुष्यात मात्र वेगळ्याच पुरुषा सोबत सप्तपदी चालले ...

माझ्या स्वतःच्या च नजरेतून उतरले....निशब्द झाले..

त्याच्या डोळ्यांतील भावना वाचतांना रडकुंडीला होते आले....डोळेही होते पाणावले तरीही मी खुश रहाण्याचे सोंग केले ....

त्याच्या असलेल्या माझ्या हृदयातून उतरून गेले ....

भीती वाटते आज ही त्याच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची ...काय चूक त्याची आज ही विचारते स्वतःला ..

प्रेम केलं त्याने जीव लावला तुझ्यावर हाच का त्याचा गुन्हा ...... जेल मध्ये सडतोय न केलेल्या गुन्ह्याची सजा भोगत ...मी तर मोकळी झाली...तुला ओळखत नाही म्हणून क्षणात त्याला परक करून टाकलं .....स्वतच्या हृदया बरोबर त्याचं ही हृदय चिरून टाकलं ...

तरीही मी समोर दिसताच त्याला तो छाती ठोकून म्हणतो ..

ऑल फेअर् इन लव्ह अँड वॉर ..तू फक्त माझी आहेस फक्त माझी ...

खरचं निशब्द होऊन जाते मी तेव्हा ..रड ल्याशिवाय पर्याय च नाही उरत माझ्याकडे आता ...

काल्पनिक आहे हे सार ...

Written by - Durga Mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...