नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.
Sep 29, 2022
अपूर्ण ईशा..
Sep 22, 2022
तुला बिलगावस वाटतं ..
खर सांगते तुझ्या आठवणींना कुरवलावंस वाटतं .
पुन्हा एकदा नव्याने तुला बिलगावस वाटतं ...
आठवांचे पाखरू अवती - भवती बागडते ..
तुझ्या माझ्या प्रेमाचे दिवस ते ओले मजला साद घालते ..
बहार प्रेमाची किती सुंदर होती ..
फुललेली बाग सुगंध देत होती ..
पहाटेचा उनाड वारा आज ही साद घालतो ..
मला तुझ्याकडे आकर्षित करतो ...
काळया कुट्ट अंधारातून घन ओले बरसते ...
मला क्षण ते विरहाचे आठवते ..
खर सांगते आज तुला बीलगावस वाटतं ..
कोवळ प्रेम ते नव्याने अनुभवावंस वाटतं ..
दुर्गा मते
ते नशिबात नव्हत कधी..
हॉस्टेल लाईफ कधी नशिबीच नव्हत ..
पण मात्र मी ते अनुभवलं होतं ..
प्रत्येक्षात तिथे हजर नव्हते ..
पण अप्रत्यक्षरित्या त्या वातावरणात समरस होत होते ..
मैत्रिणी सांगायच्या त्याच्या गोष्टी ...
त्या ऐकूनच खुश व्हायचे ...
हॉस्टेल लाईफ जगले नाही .. विसरायचे ..
फिल्म स्टोरी मध्ये तर चक्क बघायचे अनुभव ..
त्यातूनच इमॅजिन करायचे स्वअनुभव ..
हॉस्टेल लाईफ जवळून पाहिले नव्हते ..
पण मी कधी त्यापासून अलिप्त ही नव्हते ..
एकूण साठ ते नशिबात नसूनही ..
नशिबात असल्यासारखच होतं ..
दुर्गा मते ..
Sep 20, 2022
हळहळ
Sep 18, 2022
जीवन अध्याय ...
गीत गाणे..
प्रेमाच्या वाटेवरती साथ तुझी हवी ...
रेशमी ह्या धुक्याला चादर नवी ..
तुझ्या - माझ्या प्रेमाची बिलगली सावली ..
हसू तुझे मी भाळी गोंधते ..
आसवे तुझे आनंदाने पिते ..
एक सुरेल गाणे ...तुझ्या साथीने गाते ..
लाभले तुझ्यामुळे सुखी आयुष्य ..
पाहायचे तुझ्या साथीनेचं माझे उज्वल भविष्य ..
मगचं रंगेल गीत गाणे आयुष्याचे ...
साथीने एकमेकांच्या एकमेकांचे ..
दुर्गा मते ..
एक तारा स्वतःसाठी ...
आकाशात एक तारा ,
मी ही शोधलाय ..
सुख दुःख व्यक्त करण्यासाठी ..
त्याला आपलसं करण्यासाठी ..
रडताना हळूच आसवे .
त्याच्याकडे सुपूर्त करण्यासाठी ..
आकाशात मी ही शोधलाय ..
एक तारा स्वतःसाठी ..
त्याच्याकडे बघताच ..
ताज्या झालेल्या आठवणी लोप पावतील ..
मला खळखळून हसवतीलं ..
आकाशात मी ही शोधलाय ..
एक तारा स्वतःसाठी ..
एखादं अवघड समीकरण सोडवण्यासाठी ..
अडकून पडले ना ...
लगेच त्याच्याकडे धावत जाऊन ..
समीकरण सोडवून घेईल ..
आणि ओरडून सांगेन मी त्याला ..
तुला शोधलं य मी स्वतःसाठी ..
आकाशात एक तारा शोधलाय मी स्वतःसाठी ..
एक तारा जपलाय मी मनाच्या समधानासाठी ..
दुर्गा मते
Sep 17, 2022
मी तुझी राणी आणि तू माझा राजा ..
Sep 15, 2022
दुःख मनात ठेवावं वाटतं.
देवा मी अस काय पाप केलं ...
की तू मला आजवर दुःखचं दिलं ..
नको होती मला कुनाची साथ ..
केली असती मी माझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात .
देवा तू का मला ?
खोट्या प्रेमाचे भास दिले ..
का ह्या वेड्या मनाने ही ,
सुखी आयुष्याचे स्वप्न पाहिले ...
दुःखाची ओंजळ रिकामी होणार नव्हती .
तर का सुखाची ओंजळ दाखवली ..
का देवा तू गरज असतानाच ,
माझ्याकडे पाठ फिरवली ...
तुझ्या साक्षीने चं मी खूप जणांना जवळ केले ..
तुलाच माहीत त्यांनी मला कसे त्यांचे ..
रंग रूप दाखवले ..
देवा आज मनापासून सांगते .
आता कुठल्याही मैफिलीत सामील व्हावं वाटतं नाही .
दुःख ही माझं कोणापुढे ओकावस वाटतं नाही .
फक्त मनातल्या मनात धाबावस वाटतं.
दुर्गा मते
नशिबी तिच्या भोगचं आले ..
राणी ती आई बापाची ...
सोज्वळ मनाची ..
लाडाकोडात वाढली ...
आईची तर ती झाली सावली ..
वडिलांची लाडकी परी ..
स्वाभिमानी लाडकी लेक ती ..
राजा राणी ची ..
लग्नाच्या वयात ती भोवल्यावर चढली ..
सुखी संसाराची स्वप्न बघत सप्तपदी चालली ..
नियतीने मात्र तिची खेळी पालटवली ...
स्वप्न सारी तिची धुळीत मिळाली ..
नशिबी तिच्या भोगचं वाट्याला आले ...
सोनेरी आयुष्यात अंधाराचे जाळेचं पसरले .
दुर्गा मते..
Sep 14, 2022
मी निसर्गाची लेक...
गगनाला शब्द माझे भिडले ...
स्वप्न ह्या धरणीत रुजले ...
आयुष्य माझे नव्याने सजले ..
धरणीच्या कुशीत मी निजले ..
आई च्या गर्भात वाढले ..
तरीही ह्या निसर्गाची मी लेक आज झाले ..
गार वारा मनाला स्पर्शून जातो ..
ताई ताई म्हणून हाक मारतो ..
पाखरांचा किलबिलाट माझ्याशी मुक्त सवांद करतो .
तू निसर्गाची लेक ..
आमची लाडकी ताई ..
असं म्हणत त्यांच्या जगात माझं स्वागत करतो ..
Written by - durga mate
Sep 12, 2022
रात्र मिलनाची.
Sep 11, 2022
मी खूप प्रेम करते ..
मी प्रेम करते स्वतःवर ..
स्वतः पेक्षा जास्त माझ्या कलेवर ..
माझ्यातील चांगल्या वाईट गुणांवर ..
हसते , खेळते . रुसते ..
आनंदाचे गीत गाते ...
भावनांना शब्दांत उतरवते ..
स्वतःच्याच विश्वात हरवून जाते ..
सुखी आयुष्याचे सुंदर स्वप्न गुंफिते. .
मेहनतीने त्या स्वप्नांना सुंदर रित्या रंगविते ..
सावलीला म्हणते माझ्या ...
तू नेहमी सोबत रहा ..
तुझ्यामुळे अस्तित्व टिकून आहे माझं ..
तुझी गरज आहे शेवटच्या श्वासापर्यंत ....
मी खूप प्रेम करते ..
स्वतःवर .माझ्या कलेवर ..
आणि माझ्या अस्तित्वावर ..
Sep 10, 2022
एक हक्काचा माणूस दे..
मला मरण दे ..
पुनर्जन्म घेऊ दे ....
Sep 9, 2022
बायकोचे मनोगत ..
बायको प्रत्येक पुरुषाची हक्काची वस्तू . तो तिच्यावर कुठल्या पद्घतीने अधिकार गाजवेन . हे कोणीच सांगू शकत नाही . मग बायकोने ही मजबुरी समजून नवरा म्हणेल ती पूर्व दिशा मान्य केलं . पण त्या पुरुषाने विचार केलाय का कधी आपण जसं वागतो . ते वागणं आपल्या बायकोला आवडत की नाही . कधी समजून घेतलीय का कुठल्या पुरुषाने आपल्या बायकोच्या मनाची व्यथा ..
तिची व्यथा थोडक्यात माझ्या दृष्टी कोनातून ..
जस नवऱ्याला वाटतं माझ्या बायकोने नेहमी मला समजून घ्यावं . तसचं तिला नसेल का वाटतं की माझ्या ही नवऱ्याने मला समजून घ्यावं .
आवडेल का कुठल्या पुरुषाला त्याची बायको भर गावात डिजे समोर नाचताना तिला पहायला . मग कुठल्या पुरुषाने विचार केलाय का कधी ? आपण एवढ्या जल्लोषात डिजे समोर नाचतोय हे आपल्या बायकोला आवडेल ना ?
केलाय का कोणी विचार ..
जसं नवऱ्याला वाटतं माझ्या बायकोने कुठलीही गोष्ट करण्याआधी माझी परमिशन घ्यावी . तसचं तिलाही वाटतंचं असेल ना , कधीतरी एखादी गोष्ट करताना माझ्या नवऱ्याने ही माझी परमिशन घ्यावी .
जस नवऱ्याला वाटतं ना की , माझ्या बायकोला बाहेर एक ही मित्र नसावा . तसचं तिलाही वाटतं असेलच ना की माझ्या नवऱ्याच्या ही बाहेर कोणी मैत्रिणी नसाव्या.
जस ती तिचं माहेर ह्याच्यासाठी सोडून आली . मग तिची ही एक माफक अपेक्षा असेलच की . जेव्हा माझी ईशा होईल . माझ्या आई वडिलांना भेटायची . तेव्हा माझ्या नवऱ्याने मला त्यांना भेटायला न्यावं .
कधी विचार केलाय का कुठल्या बाईच्या मनाचा तिला काय वाटतंय. ती आपल्या सावलीत मोकळा श्वास घेतेय ना की नाही . नसेल केला तर प्लीज एकदा हा विचार जरूर करून पहा .
Written by - durga mate
गणपती बाप्पा मोरया..
बाप्पा तुमचं आगमन झालं.
आणि पुन्हा एकदा घराला घरपण आलं ..
तुमचे आशीर्वाद मिळाले ..
आनंदाचे मळे फुलले ..
आरती घेण्याचा पोरांचा उत्साह ..
सण साजरा केल्यागत वाटतो ..
गणेश स्थापनेने आयुष्य समृद्ध होत.
तुझ्या थोड्याशा भक्तीने खूप सुख मिळतं.
तू बुद्धीची देवता ..मांगल्याची मूर्ती ..
तुला आज साष्टांग नमस्कार ..
आज तू जाणार म्हणून डोळे पाणावले ..
एक कोपरा भक्ती भावाने सजलेला रिकामा होणार .
म्हणून जरा हळहळले ...
बाप्पा आज तुझ्यासमोर एकच प्राथर्ना करते...
पुढच्या वर्षी लवकर ये ..रिकामा झालेला कोपरा ..
पुन्हा एकदा मला आनंदाने सजवू दे ..
दुर्गा मते
तू कर पसंद ..
पाहीले तुला , पडले प्रेमात ..
तू ये ना रे , आता स्वप्नात ...
मनात वसला , ध्यानात बसला ..
जीव हा बावरा तुझ्यात गुंतला ..
भिर भिरणारे डोळे तुझे ..
त्यात रुतले स्वप्न माझे ..
ये माझ्या जीवनी रंगवून टाकण्यास आयुष्य ..
मी सजवेल रे , तुझे भविष्य ..
तू दे ना , हात हाती ..
प्रेमाचा टिळा लाव माझ्या माथी ...
होईल मी तुझी सावली
तुझ्यासाठी मी स्वप्न रंगवली ...
देवालाही रे , ही पोरगी पटली ..
तुझ्यासाठीचं रे आता नव्याने नटली ..
तू कर तिला लवकर पसंद ..
तुझ्याही जीवनी दरवळेल आनंद ..
हा आहे माझा शब्द ..
दुर्गा मते
Sep 8, 2022
तू ही सवार
छोटी सी है, ये जिंदगी ।
तू है मेरी जीवन की रोशनी ।।
तुझसे शुरी होती है कहानी ।
तेरी मां की नहीं है , जूठी जुबानी ।।
मेरे हर एक सपने में ।
तेरा ही चेहरा है ।।
तेरे लिए तो ही मेरी जिंदगी है ।
तुझ में ही , है मेरी सारी खुशियां ।
तू ही तो है , मेरी दुनिया ।।
मेरे लाडले राज कुमार ।
तू ही मेरी जिंदगी है ।।
मै सारी खुशियां तुझे दूंगी ।
फिर एक बात दिल से कहूंगी ।
तुम्हारी है , ये जिंदगी तो तू ही सवार ।।
तू प्यार कर
प्यार कर , तू प्यार कर ..।
ये दिल तुझसे मिले ।।
मै भगवान से यही क्वाइश करूंगी ।
तुझसे मेरी जिंदगी की कहानी शुरू होंगी। ।
तू है मेरी जिंदगी का !
प्यारा सपना ।।
तुझसे मिलने आयी हूं ,
तुझे अपना बनाकर ले जाऊंगी मेरी दुनिया में ।।
हो जाएंगे दो दिल एक ,
और प्यार करने मै भी हो जाएंगे सफल ।।
बस तू ...
प्यार कर . प्यार कर ..
दुर्गा मते
थॅन्क्स गॉड..
अंगणी माझ्या बीज रुजले नव चैतन्याचे ...
गर्भात माझ्या बीज अंकुरले प्रितीचे ...
स्त्री जन्म सार्थकी झाला ...
देव भेटीला आला ..
एक अंश त्याचा सुखरूप ठेवण्यास ..
माझ्याकडे दिला ....
माझा सारा प्राण त्याच्यात अडकला ..
माझ्या आधी मी त्याचा विचार करू लागले ..
जणू त्याच्यासाठीच आजवर मी आयुष्य माझे जगले ..
त्याच्या पेक्षा मोलाचं काही वाटतंचं नाही ..
तोच आहे आज माझं सर्व काही ..
तोच दृष्टिकोन माझ्या जगण्याचा ...
संकल्प करते मी आज त्याच्या योग्य संगोपणाचा ..
थॅन्क्स गॉड तू तुझा एक अंश मला दिला ..
माझा स्त्री जन्म खऱ्या अर्थाने सार्थकी झाला ..
Written by - Durga mate
Sep 7, 2022
ये मतलबी दुनिया ..
आज काल काय होतय , माहीत नाही ..
कुणाशीच संवाद साधावासां वाटतं नाही ..
नात्या वरचा विश्वास उडालाय माझा ..
आई वडील हेचं माझ दैवत म्हणत श्वास घेते ..
देवाकडे ही मी एकटेपणाचेचं वरदान मागते ..
राहून पाहिलं खेळीच्या वातावरणात ..
मला त्या ठिकाणी मतलबी दुनिया दिसली ..
प्रवाहात संगतीला सारी स्वार्थीच माणसं भेटली ..
मतलबी दूनियेकडून एक गोष्ट चांगली शिकले ..
ती म्हणजे मतलबी दूनियेपेक्षा चांगला एकटा जीव ..
सदा सोबती असेल शिव ..
दुर्गा मते
तुझी आठवण ...
तू रुजतोस मनात ..
तू ओसंडून वाहतो क्षणा क्षणात ..
तू बरसतो स माझ्या मनात ..
कधी आठवणींचा पूर होऊन ,
तर , कधी समईची ज्योत होऊन ..
अग्नीपरिक्षा वेळोवेळी दिली प्रेमाची ..
मनात रुजली आठवण तुझी कायमची ..
तुझ्या प्रतीक्षेत आता जगावं स वाटतं ..
तरीही का कुणास ठाऊक ..
तुझी आठवण काही मनातून जात नाही ..
दुर्गा मते
प्रेमाची व्याख्या ..
त्याच तिच्यावर खूप प्रेम आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याची त्यांनी स्वप्न पहिली होती .
पण ; काय माहित अचानक काय झालं ..
त्याने तिला एके दिवशी कॉफी साठी बोलावलं . आणि तिला सरळ सांगितल ..मी तुला दिलेली कमिटमेंट पूर्ण नाही करू शकत ...पण हो आयुष्यभर तुझी साथ देईल हे मात्र नक्की ..
म्हणजे मी तुझ्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत राहील . पण ते माझ्या बाळाच्या रूपात आणि तू ही माझ्या आयुष्यात राहशील ते ही तुझ्या बाळाच्या रुपात ...
आणि हीच असेल आपल्या प्रेमाची व्याख्या आणि प्रेमाची पूर्ण कमिटमेंट ..
दुर्गा मते...
Sep 6, 2022
सुंदर मैफिल ...
स्वतःच जीवन स्वतःच्याच कलेन जगायचं असतं ..
मेहनतीने त्याला फुलवायच असतं ....
मनाच्या अथांग भूमीत नव चैतन्याच बीज रुजवायच असतं ...
कष्टाच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं ..
जीवन जगताना खूप संकट येतात ...
येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करायची असते ..
दुःख झेलताना मुळू मुळू रडायचे नसते ..
त्यातूनही नवं उमेदीने सुखाचे प्रवाह शोधायचे असते ..
आयुष्य मैफिल सुंदर रंगाची ..
मनात तस्वीर राखून ठेवायची असते प्रत्येक क्षणाची ..
दुर्गा मते
Sep 5, 2022
जिंदगी की क्वाइश अभी भी बाकी है ।
जिंदगी की क्वाइश अभी भी बाकी है ।
इस दिल को , आज भी तेरी चाहत है ।।
किस्मत की लकीर में तू ना थी ।
फिर भी तेरी तस्वीर मेरे आखों में सजी है ।।
एक गहरी याद तेरी ।
जिंदगी बन गयी है मेरी ।।
जीने की मंजिल मैंने खोई थी ।
किस्मत अश्ची - भगवान ने फिर से जीने की राह दिखाई ।।
एक नए मोड़ पर , फिर भगवान ने ।
मुझे तुमसे मिलाया ..और मिलके भी तुझसे ,
मै जुदा हो गया ।।
जुदा होने के बाद ।
एक राझ दिल में छुपाया ।।
और उस राझ को ही ।
प्यार से पाल रहा हूं ।।
जिंदगी की जो क्वाइश बाकी है ।
वो धीरे - धीरे पूरी करने की कोशिश कर रहा हूं ।।
दुर्गा मते
🌹🌹 तो शिक्षकच असतो ..🌹🌹
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देतो ...
विद्यार्थ्यांची स्वप्न साकार करण्यास मदत करतो. .
तो शिक्षकच असतो .....
माझी मुलं माझी मुल म्हणत ...
हजारोंच्या दिलावर राज्य करतो ...
आदर्श व्यक्ती महत्त्व म्हणून अजरामर होतो .
तो शिक्षकच असतो ..
कधी प्रेमळ तर , कधी कठोर भाषेत ....
विद्यार्थ्यांना प्रगतीची दिशा दाखवतो ..
आणि निरोप देताना भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा देतो ...
तो मोठ्या मनाचा शिक्षकच असतो .
एका सर्वसामान्य मुलाचं आयुष्य घडवतो ...
घरोघरी जाऊन शिक्षण गंगेचे बीज रुजवतो ..
तो शिक्षकच असतो ..
Durga mate
आज 5 सप्टेंबर म्हणजेच डॉ ..सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस ..त्यांचा जन्म दिवसच आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो .
शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
Sep 4, 2022
स्वप्न सत्यात उतरले
Sep 1, 2022
happy birthday dada
आनंदाची बरसात तुमच्या जीवनी होवो
निष्ठावंत प्रेरणादायक व्यक्तिमत्व तुमचं ..
त्याचा आदर्श सर्वांच्या जीवनी घडो ..
देवांच्या चरणी मी आज मनोभावे हीच प्रार्थना करते...
अनिल दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ...
बाप्पा चरणी एक गुपित सांगते ...
मला माझ्या अनिल दादांना त्यांच्या 100 व्या वाढदिवशी ही शुभेछा देण्याची सुवर्ण संधी दे बाप्पा ...
अनिल दादा तापकीर वयाने खूप मोठे ...मला माझ्या वडिलांच्या जागी आणि ते ही मला लेकचं मानतात ..
आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या ह्या लेकिकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🍫🍫
सर्वांचा आदर करणारे ...
अगदी सहज सर्वांना आपले मानणारे ..
खूप कमी वेळात सर्वांमध्ये मिसळणारे ...
अनिल दादा तापकीर ह्याचं व्यक्तीमत्व मला खूपच आवडतं .. त्यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐🎂🎂🎂🍫🍫🍫🍫
इंटरेस्ट जपून ठेवावा
उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...
-
डोळ्यात सारे शब्द पाणावले , भाव ते अंतरी का उठले , माझ्या मनाशी एकरूप झाले , शब्द जे होते मुके तुझे , ते एक स्वप्न होते माझे ... वेड्या मनाल...
-
भलतीच चिंता सतावत आहे , बर झाल तुझी साथ आहे , पोरक्या कुशिला माझ्या तिचा च तर आधार आहे , तूच माझ्या आयुष्याची वेल वाढवणारी , स्त...
-
तमा कशाची मी बाळगली नाही , तुझा द्वेष मी कधी करूच शकत नाही तुला जेवढी नावं , तोंडावर ठेवते , तेवढीच नावं पाठीमागून ठेवते .. Attitude , igo ...