नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 31, 2021

निरोप देताना तुला...

नीरोप देताना तुला ,
डोळे माझे पानावले ,
मैत्रीचे हे बंध नकळत जुळले ..
हसू ओंठावर फुलले ,
हुंदके उरात दाटले ...

निरोप देताना तुला ,
डोळे माझे पानवले ..

हर्षाचे क्षण ,एक  झालेले मन ,
हळुवार बोलके झाले होते स्पंदन ,
किती ही हृदयात साठवू आठवण ..

निरोप देताना तुला ,
डोळे माझे पानवले ,
नवीन वर्षाच्या सुरुवातीला ,
बंध हे मैत्रीचे हळुवार उसवले ,
एक झालेले मन हळुवार अलिप्त झाले ,
हे बंध रेशमाचे कायमचे संपले ...

निरोप देताना तुला ,
डोळे माझे पानवले ..
हुंदके उरात दाटले ,
हसु ओंठा वर फुलले ...

Written by - durga mate .

काल्पनिक रचना

Dec 30, 2021

एक अनुभव ...

आपण इथे कुठल्याही विषयावर लिहू शकतो ना इथे आपल्याला पूर्ण लिखाणाचं स्वंतत्र आहे . मग का कोण्या वाचकाने आपल्याला धमक्या द्याव्या की मी तुम्हाला कोर्टात घेईन वैगरे.  काय अधिकार आहे एका वाचकाला लेखनाच्या लिखाणावर आरोप करण्याचा . 
त्याच खरच लिखाण चुकीचं असेल तर , खुशाल आरोप करा . तो ते स्विकारतो ही पण त्याच लिखाण चुकीचं नसेल तर का त्याने मान्य करावं . का नमत घ्यावं . 

    माझ्या अनुभवावरून हा लेख लिहितेय . मी 13 डिसेंबर ला एक पोस्ट शेअर केली होती.  त्याचा त्रास ती लोक मला आज पर्यंत मला देताय....

हे योग्य आहे का ? किती दिवस किती रात्र उलटून गेल्या . तरीही ते त्याचं प्रश्नांवर अडून का राहिले . माझी तर कुठेच काहीच चूक नाही .

त्याच्या साठी स्वारी पण बोलले पण त्याने ही त्याच समाधान झाल नाही . अजुन काय करायला हवं मी चूक नसताना स्वारी बोलले . मग अजुन काय करू .

मुळात लेखकाने कोणत्या विषयावर लिखाण करायचं. हा ज्या त्या लेखकाचा प्रश्न. आहे . कुठल्याच वाचक नाही सांगू शकत लेखकाला तुम्ही विषयावर लिखाण करू नका .

वाचाय च असेल तर वाचा , नाही तर सोडून द्या.  तो तुम्हाला विनंती नाही करत  माझ लिखाण वाचा म्हणून .

आणि सर्वात जास्त वाईट तर ह्या गोष्टीचं वाटतंय त्यातील एक माझा खूप जवळचा मित्र होता . आणि एक स्त्री असून एका स्त्री च्या विरोधात कशी काय बोलू शकते . 
तिची काहीही चूक नसताना ...

कोड च आहे सार ....

मला हे सगळं नवीन आहे . कधी कोणाशी दुष्मनी नाही केली . जो माझ्याशी जसा वागला . मी ही त्याच्याशी तशीच वागले . 

जेव्हा मनासारखी वागले तेव्हा हवी हवी वाटले , आणि आता नकोशी ही कुठली पद्धत आहे वागण्याची...
खरच लोकांची मानसिकता खूपच बदलते ....

कलियुग आहे कोणाच्या ग्रह कधी फिरतील सांगता येत नाही . 

सांगायचं एवढंच आपल्याला अधिकार नाही हे . कुठल्याच लेखकाला त्यांच्या लिखाणाचा विषय बदल म्हणून सांगण्याचा ......

वाचक असाल वाचायचं असेल तर वाचा नाहीतर सोडून द्या.  पण निदान त्यांच्या लिखाणावर टीका तरी करू नका ... 


Dec 29, 2021

व्यभिचार ...

व्यभिचार ...

नको मानवा तू मानवास रडवू ,
इतरांच्या डोळ्यातील अश्रू पाहून खुश होवू ...

आज तू ज्याच्यावर हसशील ,
काय सांगा उद्या तू त्याच्या मुळेच रडशील ...

वेळ ही  कधीच स्थिर नसते ,
सतत बदलतं असते ....

माणुसकी ची शिकवण तू कधीही विसरू नको ,
माणुसकीचे मोल जपण्यास माघार घेऊ नकोस ...

सोडून दे व्यभिचार ,
जो करेल तुझ्या मनाचा नास ,
जग रे मानवा तू माणूस म्हणून खास ..

Written by - durga mate ..


छंद जोपासणे चांगलं...

छंद हा जोपासावा ,
आनंद सुद्धा भरून यावा ....

माणसाची आवड मुळात छंद जोपासणे हवी . कलेची आर्द साद त्याच्या हृदयात वसायला हवी . छंदां ची साथ असेल जगण्याला तर मग बघा तिथे दुःखाची किनार वसणार नाही ...

     दुःख कितीही असले आयुष्य जगताना , तरीही ते मिसळून जाईल छंद जोपासताना छंदात ...सामील होईल ... संगीताच्या सुरात..कवितेच्या रचनेत , नृत्याच्या ठेक्यात ...ढोलकीच्या तालात ती बंधिस्त होईल ...

माणसाने छंद जोपासयला हवी ...जोपासलेली छंद जपायला हवी . दिवसातून एकदा तरी आपल्या आवडीच्या गोष्टी साठी वेळ काढावा .. म्हणजे जो आपला छंद असेल त्यासाठी .....

    काम हे मरे पर्यंत करावं लागतं . त्यामुळे नियमित थोडा तरी वेळ आपल्या आवडी साठी द्यायला हवा . तेवढाच जीवन जगताना थोडासा फ्रेश नेश येईल .....

छंद हे ठराविक चं असतात . असे काही नाही. छंद हा कोणत्याही प्रकारचा असू शकतो .

 कोणाला लिहिण्याचा असतो . कोणाला वाचण्याचा असतो . कोणाला गाणे ऐकन्याचा असतो . कोणाला दगड गोळा करण्याचा असतो . छंद हा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतो. सांगणं एकच ज्याचा जो छंद त्याने तो जोपासयलाच हवा . तेवढाच आनंदाला हातभार थोडासा . जेव्हा माणूस आपल्या आवडीच काम करत असतो ना , तेव्हा माणूस त्या कामाशी समरस होतो . एकरूप होऊन जातो. थोड्या काळासाठी का होईना ..
तो सार विसरून त्याच्या त्या कलेसाठी त्याच्या त्या छंदासाठी जगत असतो....

दुर्गा मते
©®

Dec 28, 2021

स्वप्न अशी बघावी....



स्वप्न अशी बघावी ,
जी तुमच्या आवाक्यात आहे . तुमच्या प्रयत्नाने सहज पूर्ण होतील . उगाच मोठं मोठी स्वप्न बघून . ती स्वप्न अपूर्ण राहतील आणि मनात उदासीनता पसरेल अशी स्वप्न बघायलाच नको ....

आपल्या परिस्थितीतिचा आणि मन स्थितीचा विचार करून स्वप्न बघावी ... 

झोपेत पडलेली स्वप्न ही मृगजळ असतात आभासी असतात . त्यांचा विचार कधीच नको करायला . ती फक्त झोपी तच छान वाटतात . स्वप्न ती खरी होतात जी आपण उघडया डोळ्यांनी बघत असतो . आणि जिद्दीने ती स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो ...

जर झोपीत पडलेली स्वप्न पूर्ण होत. असतील तर मग मलाही एक स्वप्न सारखं पडतं . स्वप्नात मला न्यूयॉर्कचा राजकुमार दिसतो . माझ्यासाठी थांबलेला .. माझी आतुरतेने वाट बघत असणारा ... आणि मला दोनशे टक्के खात्री आहे. हे स्वप्न एक मृगजळ आहे . फक्त एक आभास आहे ... त्यामुळे त्या स्वप्नाचा मी कधी विचार पण नाही करत आणि कधी करणार पण नाही . 

असो विषय भरकटत जाईल मी मेन मुद्यावर येते ....

स्वप्न हवेत तरंगणारी नको ,
जमिनीशी खेळणारी हवी ,
उदासीनता पसरवणारी नको ,
हर्ष फुलवणारी हवी ...

चंदनासारख झिजण्याची कुवत हवी ,
तरच निधड्या छातीने स्वप्न बघावी ,
बघितलेली स्वप्न सत्यात उतरवण्याची ,
ताकत मनगठात हवी ,
ती जगण्यास प्रेरणा देतील नवी ..
तरच स्वप्न बघावी ...

खूप सारी स्वप्न बघण्यापेक्षा एकच स्वप्न बघावं ,
त्या स्वप्न पूर्तीसाठी चं आयुष्य पणाला लावावं ...

दुर्गा मते
©®


























































आभासी ह्या जगात...

जागा की स्वप्नी ते कळेना ,
आभासी या दूनियेत मी रुळेना ...
 आभासी हे जग खूपच मतलबी ,
काय सांगू मी ह्या जगाची महती ...

लोकांच्या मनासारखे वागलो , 
तर आपण त्यांना हवेहवेसे वाटतो ,
मनाविरुद्ध वागलो की , लगेच मित्र असून ही शत्रू होतो ,
किती हा घाणेरडा प्रकार रोजचं घडतो ,

माणस माणसाला पाण्यात बघतात ,
गरजे पुरत नातं ठेवून एक व्यवहार करतात ,
व्यवहार संपला की नातं तोडून मोकळे होतात ...

आभासी ह्या जगात हा प्रकार , रोजचं घडतो ,
 वेळ आणि व्यक्ती बदलतो ,
प्रकार मात्र रोज तोच घडतो .   

दुर्गा मते ...
©®


Dec 27, 2021

अबोला नको...

शरणागती पत्करावी लागेल ,

तरच कुठे ही नात्याची विण टिकेल ,

अबोला नको संवाद हवा ,

मिटण्यास गैरसमजुतीचा दुवा ...

संवाद हवा ...

मिटणार नाहीत प्रश्न अबोल्याने ,
बदलणार नाही सत्य , दुरावा हा वाढल्याने ..

शब्द तुझे जरी मुके झाले ,
तरीही मी हात पाय नाही घाळले ,
तुझ्यामुळेच मी ही आता कुठेतरी स्वतःला बदलले ...

दुर्गा मते
©®

तिने ज्याच्यासाठी आयुष्य पणाला लावले त्यानेच तिच्यावर बलात्कार केला ...

ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे . कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ....

ती एक गरीब घरची गरीब कारभारी न ...आपली शेती हेच तीच आयुष्य ..गुर - ढोर तिचा जीव की प्राण ..
दहा ते पंधरा शेळी तिच्याकडे आत्ता ही होत्या ...गाय , म्हैस , कुत्रा , घोडा , ससा ह्यासारखे विविध प्राणी तिच्या गोठ्यात आज ही होते .....

ती आज पूर्णपने खचून गेली होती . जिवंत पणीच मरणयातना भोगत होती ....लोकं तिच्यावर मिश्किल पने हसत होते ...तिला विचीत्र विचीत्र टोमणे मारत हिणवत होते .. तिचा जीव खूप कंटाळला होता ..ह्या सगळ्या विक्षप्त प्रकरणाने ..ती अगदी उध्वस्त झाली होती ...
का ती एवढी उधस्त्व झाली होती . हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला सांगते तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं कारण ही सांगते ....

      मगाशीच सांगितले मी जनावरे तिचे जीव की प्राण .
ती तिच्या सर्वच जनावरांवर खूप प्रेम करायची .
..आपल्या मुलाबाळां प्रमाणे त्याचे लाड करायची .
ती शेतात दिवस भर एकटीच असायची . तिचा कारभारी तिच्या भरोष्यावर सर्व कारभार सोडून आपली इतर कामे पार पाडायचा . दोघांचा संसार एकमेकांच्या आधारावर चांगलाच  फुलाला होता .....

      तिची सगळ्यात आवडती शेळी वसू .. तिला आज पिल्ल होणार होती . तिचे दिवस भरले होते ..ती आज खूप खुश होती कारण आज तिच्या परिवारात नवीन पाहुणा येणार असतो . आला ही तो पाहुणा सर्वांना हवा हवासा वाटणारा ...आज वसू ला दोन पिल्ले झाले ..
एक पाठ आणि एक बोकड ...

    पण वसू मात्र अचानक हे जग सोडून गेली . प्रसूती नंतर जनावरांच जो जार बाहेर पडायला हवा . तो किती तरी वेळ पडला चं नाही . आणि जेव्हा पडला तेव्हा कोणाचेही लक्ष नव्हतं . तो तिचा जार तिने खाल्ला आणि ती मृत पावली ...

ती मृत पावली ह्या गोष्टीचं सुनंदा ताईंना खूप वाईट वाटलं. पण जो जन्माला आला त्याला मरण कधी चुकले नाही ..अस म्हणत त्यांनी तिचे अंत्य संस्कार चांगल्या पद्धतीने पार पाडले ...

तिला ज्या ठिकाणी खड्डा करून पुरले त्या ठिकाणी गुल मोहऱ्याचं झाडं लावलं . ते झाड आता खूप मोठं आहे . आणि त्या झाडाच्या प्रत्येक हालचालीत वसू ची आठवण दडलेली आहे ...तीची शेवटची आठवण ह्या उद्देशानेच ते झाड लावले होते .  

    वसू गेल्यानंतर काहीचं दिवसात तिची लेक म्हणजेच ती पाठ पण मेली राहील फक्त ते बोकडूच ..सुनंदा ताईने त्या बोकड्या वर खूप प्रेम केलं . आईची पूर्ण माया त्या बोकडू ला दिली . ते बोकडू ही अगदी धश्ट पुष्ट झालं ..
धश्ट पुष्ट तर झालच पण खूप विक्षिप्त ही झालं .

एवढं मारायचं कोणालाही बाई असो वा पुरुष अंगावर धावून यायचं ...एक दिवस असच सुनंदा ताई त्याला खावू घालत होत्या ...त्याला खावू घालत असताना त्या इतर छोट्या छोट्या पिल्लांना पण खावू घालायच्या .
त्या पिल्लाक डे गेल्या की हा बोकडू त्याच्याकडे राक्षसी वृत्तीने बघायच्या ... त्यांना जावून बराच वेळ झाला होता. 

ह्याची  भूक खूप वाढली होती . ह्याला आता भूक सहन चं होतं नव्हती . तेवढ्यात सुनंदा ताई  नेहमी प्रमाणे त्याच्यासमोर खाद्य ठेवण्यासाठी गेल्या तर  , त्या राक्षसाने आपल्या टोकदार शिं गाणे ताईच्या हृदयावर खूप खोलवर घाव घातले . ताई शेवटी रक्त बंभाळ होवून खाली कोसळल्या आणि तडफडू लागल्या ....
मदतीची याचना करू लागल्या ...

लोकं जेव्हा मदत करण्यासाठी धावून आले , तेव्हा सगळीकडे सुनंदा ताई वर बोकडू ने बलात्कार केला ही अफवा गावभर पसरली होती . आणि आजही तिचं अफवा त्यांना जिवंत पणीच मरणयातना देत होती ...

बाप्पा तुझ्यावर काय लिहू

बाप्पा तू विश्र्वदाता ,
 बाप्पा तू विघ्नहर्ता ,

तुझ्यावर रचना मी कशी लिहू ,
तुझा महिमा शब्दात कसा सांगू ,

पृथ्वी चे दर्शन घ्यायचे असेल तर आई वडिलांचे चरण शोधावे ,
तेच आपले पंढरपूर असावे ...
त्याच्यासाठी चं आयुष्य आपले झिजावे ,

तूच दिला हा अनमोल विद्येचा ठेवा ...
तुला मनापासून नमस्कार माझा देवा ...,🙏🙏🙏🙏

दुर्गा मते 

प्रवाहा नुसार माणसाला बदलाव लागतं ...

प्रवाहा नुसार माणसाला बदलाव लागतं ,
कधी खणकर , तर कधी शीतल व्हावं लागतं ....

कधी सर्वांच्या मनात घर करून राहावं लागतं ,
तर कधी घर करून राहिलेल्या मनातून उतरावं ही लागतं .....

जसा रस्ता असेल , तस वळावं लागतं ,
खाचं खळगे सगळचं स्वीकारावं लागतं ...

समोरचा आपल्याशी जसा वागतो , तसचं वागावं लागतं ,
तरच जीवनातील खरा आनंद गवसतो .....

कधी प्रामाणिक तर कधी अप्रामाणिक ,
होऊन आयुष्यातील प्रत्येक पात्र हे निभावाव लागतं ...

असं म्हणतात मनुष्य देह हा , 
84 लक्ष योनीतून गेल्यावर लाभला ,
त्या तत्वानुसार निधान 84 वेळेस तरी स्वतःला बदलाव लागतं ...
तरच कुठे जरास सुख मिळत ,
दुःख हे जीवनातील काही अंश का होईना नाहीस होतं ..

दुर्गा मते 
©®

तार हृदयाची

तार माझ्या हृदयाची ,
छेडली त्या हृदयाने ...
अंधारलेल्या आयुष्यात माझ्या ,
एक मोहक तारा बनुन आला तो राजा ..
आधार देण्यास जीवनी माझ्या ..


स्वप्न उसवलेली त्यांनीच विणली ,
रात काळोख्याची साथ मजला प्रकाशाची ,
सुंदर वेल गुंफली आयुष्याची ...


एक प्रखर तारा तो ,
आयुष्यात आला ,
आयुष्य म्हणजे काय ? शिकवून गेला .....

डोळ्यातील अश्रू त्यानेच पुसले ,
आनंदाचे अत्तर माझ्या आयुष्यात शिंपडले ...

आयुष्याचे सार्थक झाले ,
त्या अनमोल ताऱ्यानीच माझे आयुष्य घडवले ...

दुर्गा मते
©®

Dec 26, 2021

स्वतःसाठी जगायच ...

या खेळाचे नियम कोण जाणे ,
पुरे झाले हे हरण्याचे बहाणे ...

आता हरण्यासाठी नाही तर ,
जिकण्यासाठी खेळायच ,
शेवटच्या श्वासापर्यंत फक्त लढायच ...

येऊ देत हजार संकट रस्त्यावर ,
तरीही नाही सोडायचा डाव हा अर्ध्यावर ,
असायला हवे ना , आपल्या अस्तित्वाचे पुरावे ,
शाबीत मेल्यावर .... 

जगायचं स्वतःसाठी ,
लढायच हक्कासाठी ,
जीवन हे व्यतीत करायचं ...
अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी ....

दुर्गा मते ...
©®

Dec 25, 2021

अलक ( सुखद क्षण )

उमेद ही नवी असावी ,
आपुलकी ही जुनी असावी ...
ताऊ तू अशीच बहरणारी ,
फुल वेल असावी ,
शिवराज , आदी , मयंकची आवडती ,
फ्रेंड असावी ......!!!!

       आज शेतात जायचं म्हणून मी लगीबगिणे आवरत होते . कढईत फोडणीसाठी मोहरी टाकले , आणि लक्षात आले . घरात तर कढी पत्ताच नाही .. गॅस तसाच बंद केला . ओढणी घेतली . आणि कढी पत्ता आणण्यासाठी घरा बाहेर पडले . 

घरापासून कढी पत्त्त्याच झाड बरच दूर होतं . आज पहिल्यांदा मी एकटीच त्या भयानव अरण्यात चालले होते . तिकडे जाण्याचा रस्ता जरा भयानकच होता . मी पाय उचलत पटपट चालू लागले . तेवढ्यात एक जोरात बुलट आली गावच्या पाटलाच्या मुलाची . मला बघून त्याने त्याचं रस्त्याने दोन तीन वेळेस जोरात बुलेट चालवली . पण मी दुर्लक्ष केलं ...मी दुर्लक्ष करतेय हे बघून त्याने ही आपला रस्ता बदलला .....

मी अजुनच चालण्याचा वेग वाढवला ...थोड चालले तर पाठीमागे कोणीतरी असल्याचा भास झाला . वळून पाहिले तर कोणीच दिसले नाही ...मी परत चालू लागले . थोडी भित भित पण वेगाने पाऊले टाकू लागले ..

थोड्या वेळाने कसला तरी विचीत्र आवाज ही कानावर पडला . माझ्या काळजाचा ठोका च चुकला , कढी पत्याच झाडापाशी गेले तर अचानक कोणीतरी माझ्या डोळ्यावर हात ठेवून माझे बंद केले . थोडा वेळासाठी तर माझा श्वास च बंद झाला होता ...

मी जराशी घाबरले , डोळ्या वरील हात काढण्याचा प्रयत्न करू लागले . मला त्या कोवळ्या हाताचा स्पर्श ओळखीचा वाटला . डोळे उघडून बघते तर समोर माझा सर्वात लाडका मित्र शिवराज ...!!!!

मला तो आज खूप दिवसांनी भेटला होता . त्याला मी एक घट्ट मिठी मारली ...आणि त्याने ही मला खूप गोड गोड पापे दिले ....आजचा तो क्षण मला खूप सुख देऊन गेला .. कारण शिवराज च नाही तर माझे सर्वच छोटे छोटे फ्रेंड आज मला भेटले होते ...

दुर्गा मते 
©®




Dec 24, 2021

घडलेल्या गोष्टीवर चर्चा करण्यात काहीच पॉइंट नसतो ..

घडलेल्या गोष्टीवर चर्चा करण्यात काहीच पॉइंट नसतो. 
आणि त्याच गोष्टी वारंवार आठवून शोक करण्यात तर काहीचं अर्थ नसतो. 

जे घडून जायचं होतं , ते घडून गेलेल असतं. मग का ते आठवत बसायचं . जेव्हा घडायचं होतं . तेव्हा ती गोष्ट घडू नये यासाठी जर आपण प्रयत्न केले नसतील तर मग आता तरी का शोक करत बसायचा ? 

जे घडल ते घडल पण आता परत तिचं गोष्ट नव्याने घडणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे.

आपल्या मुळे कोणाचंही मन दुखावल्या जाणार नाही . ह्यांच्याकडे ही लक्ष द्यायला हवं. बोलतांना समोरच्याच्या मनाचा विचार करून बोलायला हवं....
जेणेकरून प्रोब्लेम येणार नाही , आणि वाईट अस काही घडणार नाही.    

दुर्गा मते
©®

प्रेम बंधन भाग १७

कालच्या भागात आपण पाहिलं की शेखर आणि नित्या पुढील सुखी संसारासाठी आणि पुढील आयुष्यासाठी पुणे प्रवास करणार राहतात ...शेखर ची बदली झाल्यामुळे ते पुण्याला शिफ्ट होतात ...

आज त्यांचा पुण्यातील पहिला दिवस , नवीन घर , नवीन शहर आणि एका नवीन नात्याची सुरुवात सगळचं मस्त सुरू झालं होतं ...

आज शेखर पोलीस स्टेशन मध्ये जाणार नव्हता ..कारण
कॉटरस मधील 600 स्क्वेअर फूट चा फ्लॅट ..आणि त्याची आवरा आवर करायची होती ...ते दोघे मिळून त्याचं   इवलस घरट छान सजवत होते ...

नित्या सजावटीच्या कामात एकदम परफेक्ट होती ..
त्यामुळे शेखर फक्त  तिला तिचा हेल्पर म्हणून मदत करत होता ......

त्याला एक कॉल आला म्हणून तो घरात रेंज प्रोब्लेम असल्यामुळे बालकणीत गेला ....
नित्याला सुटकेस कपटावर ठेवायची होती . म्हणून ती स्टूल वर  उभा राहून  ते सुटकेस ती कपटावर ठेवण्याचा प्रयत्न करत असते ...जस सुटकेस कपाटावर व्यवस्थित सेट होतं . तसा नित्याचा तोल जातो ....ती पडणार तेवढ्यात 
शेखर धावून येतो ..आणि तिला सावरतो ..तिला सावरताना तिची आणि  त्यांची नजरा नजर होते ....
आणि नित्याच्या तोंडून नकळत  काही शब्द  बाहेर 
पडतात ...

     " कितना प्यार तेरी धड़कन में ,
       कितना अपना पन है ,
       तेरे हर एक लफ्ज़ में ,
       में खोने लगी हूं ,
      तेरे प्यार मै ,
     बहकने लगी हूं , तेरी हर  एक सांस में । 
     कितनी लकी हूं मैं ,
     शेखर आप जिंदगी में आए हो ।
      मेरा हमसफ़र बनकर ।।
     Thanks shekhar ...

असं म्हणून ती भानावर येते ..तो ही तिला एक गोड स्मित देतो . आणि माझ एक खूप महत्वाचं काम राहीलं. असं म्हणत बेडरूम मध्ये जातो ....


नित्या ही लवकर लवकर काम आवरून घेते ...फ्रेश होते  . चेंज करून घेते ...छान पैकी नेव्ही ब्ल्यू कलरचा गाऊन घालते . केस मोकळे सोडते . तिला त्या नवीन लुक मध्ये बघून शेखर ही घायाळ होतो ...तिच्याकडे बघून एक स्मॉई ल देत बोलतो .. " तू खूप छान दिसत आहे . ह्या नवीन लुक मध्ये ..." 
ती नाजूकसं लाजत  , smile देत ,  "    thanks 
शेखर " अस म्हणत किचन च्या दिशेने जाते ..


सकाळ पासून तिने आज मोबाईल हातात घेतलेल्या नसतो . त्यामुळे ती deta on करून मोबाईल चेक करते ..तर राहुल चे दहा ते पंधरा मेसेज आलेले असते ..

मेसेज ...

" कुठे आहेस तू ? "

" किती दिवस झाले , बोलण नाही आपल् "

" एवढीच का आपली मैत्री .."
......................

असे बरेच मेसेज त्याचे तिला आले होते . तिला त्याचे आलेले मेसेज बघून खूप वाईट वाटतं . कारण ती पुण्यात शिफ्ट होतेय ह्याची तिने त्याला कल्पना दिली नव्हती . लगेच ती त्याला रिप्लाय देते ..
" स्वारी मी मेसेज पाहिले नव्हते ... तुला उद्या कॉल करते .." 

" शेखर तू चहा घेणार का ? " किचन मधुनच ती उंच स्वरात शेखरला विचारते ...

" नक्कीच खूप गरज आहे आता " शेखर ही तिला बेडरूम मधूनच उत्तर देतो . ती छान चहा टाकते .. अद्रक  विलायची टाकून चहाचा स्वाद ही खूप सुंदर
 येतो ...

" हे घे गरमा गरम चहा .." अस म्हणत ती त्याच्यासमोर हातात असलेला ट्रे ठेवते ....आणि होम थेटर ऑन करते.
आणि त्यात ही खूप छान साँग लागतं ...

     " चूप तुम रहो , चूप हम रहे ..
       खामोशी से जिंदगी से बात करने दो ।।
       चुप तुम रहो , चुप हम रहे ।।

ते दोघेही काहीचं न बोलता ते साँग अनुभवत होते . नजरेने एकमेकांना इशारे देत ..स्मित करत होते ...
 किती तरी वेळ ते स्वतःला न्याहाळत होते ....न्याहाळता न्याहाळता कधी त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेकले ते कळलेच नाही ...चहा चा गोड स्वाद त्या ओठांवरील चवी पुढे फिका पडला होता . 

किती तरी वेळ तो गोड स्वाद ते दोघेही घेतच राहिले ...एवढे ते हरवून गेले स्वतःमध्ये की कोणीतरी दरवाजा वर उभ राहून केव्हापासून बेल वाजवत आहे . हे त्यांच्या लक्षातच आलं नाही ... मग बेल बंद झाली . आणि  जोर जोरात  दरवाजावर  पडणाऱ्या थापा त्यांना ऐकु आल्या.
त्या थाप्पानी ते भानावर आले ...

नित्या सैरा वैरा धावतच किचन मध्ये गेली . शेखर ने ही जावून लवकर दरवाजा ओपन केला . समोर बघतो तर काय ? डी . एस . पी . साहेब ...

     " डी . एस . पी साहेब  तुम्ही ! " शेखर ने विचारलं 

       " का ? काय झालं ...यायचं नव्हत का ? "
डी . एस . पी. साहेब मजाक करत बोलले ...

" नाही असं काही नाही . पण ह्या वेळेला याल.  याची कल्पना नव्हती . प्लीज वेल कम सर .." 
शेखर ने डी. एस.पी साहेबांना आत येण्यास सांगितले ..

" नित्या एक कप चहा आन प्लीज " शेखर ने बाहेरून आवाज देत नित्या ला चहा आणण्यास सांगितला ..

नित्या लगेच ट्रे घेऊन आली . 

" तुझी बायको तर सुपर फास्ट आहे " डी.  एस.  पी . साहेब नित्यांच कौतुक करत बोलले ...

" मग बायको कोणाची आहे " शेखर ने प्रत्युत्तर दिलं . 
नित्या लाजतचं किचन मध्ये गेली ..

" शेखर मी इथे आलो , एका खूप महत्वाच्या कामासाठी"
डी. एस . पी .साहेब बोलले ...

" हो , सर बोला ना " शेखर ...

" आपल्याला आता लगेच ...मुंबई बंधोबस्त साठी जायचं आहे . तिथे खूप दहशत पसरली आहे.  तू न्यूज लाव आधी . "
शेखर लगेच टी. व्ही ऑन करतो.  आणि ती न्यूज बघतो.
नित्या त्यांचं बोलणं किचन मधून लक्षपूर्वक ऐकत होती. 
शेखर आपल्याला एकटीला सोडून जाणार ह्या विचारानेच तिच्या डोळ्यात पाणी आले होते...

" हो सर आपण लगेच निघतात ..."
 शेखर डी . एस . पी . साहेबांना हॉल मध्ये थोडा वेळ बसायला सांगतो.  आणि बेड रूम मध्ये आवरण्यासाठी येतो.  नित्या ही त्याच्या पाठो पाठ येते ...

डोळे पाण्याने तुडुंब भरलेले , " शेखर जावंच लागेल का?" 

" हो ...दुसरा ऑप्शन नाही काही ..."

" मी इथे एकटीच राहू " 

" आता एकटी राहण्याची सवय करून घ्यावी लागेल . तू एका dashing पोलीस ऑफिसर बायको आहे . "
असं बोलत शेखर नित्या ला समजावत होता. 
भरलेली बॅग घेऊन तो हॉल मध्ये आला . नित्या ही त्याच्या मागे आली . 

" डोन्ट वरी नित्या ..लवकरच तुमच्या पती देवांना तुमच्या पाशी सुखरूप पोहोचत करेन ..प्रॉमिस " 
डी. एस . पी.साहेब बोलले ...

नित्या ना त्यांच्या बोलण्यावर नाजूक स्मित करत मान हलवली ....

" चल शेखर " डी. एस.पी साहेब.....

" शेखर लवकर ये मी वाट बघतेय " नित्या रडवलेल्या स्वरांनी शेखर ला बाय बाय करते....
शेखर नजरेनेच होकार देतो .  

क्रमशः 

पुढील भाग लवकर...



तो बळीराजा ...

काळया आईला रोज ,
पुजतो बळीराजा ,
होऊन पोशिंदा उभ्या जगाचा ...

कष्टाचं खातो ,
काळया आईसंग ,
रोज नांदतो ,

जीवघेणा प्रवास त्याचा ,
सर्वसामान्य स खडतर वाटतो ,
त्याला मात्र तो हवा हवासा वाटतो ...

रक्ताच पाणी आठवण्यास ,
वरदान त्यास लाभले ,
धरणी मातेचे ,
पांग फेडन्यास काळया आईचे ,
मन त्याचे नेहमीच सज्ज असे ...

दुर्गा मते 
©®

बळीराजा ...[ अलक]
 
त्याची हरवलेली स्वप्न तो तिच्यात बघत होता ..तो गावातील सर्वात गरीब शेतकरी , अख्या गावाचा लाडका बळीराजा होता ...त्याची कन्या दहावीत टॉप वन वर आली ...तो खूप खुश झाला ..पाटलाच्या मुलींपेक्षा आपली मुलगी छान स्कोअर वर टॉप वन वर आली ..ह्याचा त्याला खूप आनंद झाला . 
         पुढे जाऊन तिने ' एम. जी. एम कॉलेजला प्रवेश घेतला ...डॉक्टर होण्याचं स्वप्न ती बघू लागली ..प्रत्येक वर्षी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण होऊ लागली ...

हॉस्पिटल मधील सर्वात उच्च डिग्री ल्यालेले डॉक्टर ही तिची जिद्द , चिकाटी बघून थक्क व्हायचे ...तिचं कौतुक करताना त्यांच्या मनात तिच्या बद्दल असलेला अभिमान त्याच्या शब्दा शब्दात व्यक्त व्हायचा ...

     शेवटच्या वर्षी ही तिने जिद्दीने अभ्यास केला ..यश तिच्या अगदी नजदीक आले होते ...का कुणास ठाऊक की नियतीची विक्षिप्त खेळी ..ती कोण्या परक्या मुलासोबत पळून गेली ...स्वप्न तिची अर्ध्यावरच राहिली .. 

गावातील लाडक्या बळीराजाची मान कायमची खाली झाली . ज्या लाडक्या लेकी मुळे त्याची मान अभिमानाने उंचावली होती . त्याच लाडक्या लेकी मुळे आज त्याची मान कायमची खाली झाली होती ...

दुर्गा मते...
©®

मला चर्चा करण्यात रस नाही ....

चर्चा करण्यात आता काही रस नाही ,
जे काही झालं त्यात माझा दोष नाही ....

तू ही बोललास दोन शब्द जास्त ,
मी ही बोलले दोन शब्द जास्त ...
चूक दोघांचीही होती , मान्य कर बिनधास्त ...

नको एवढं ताणून धरू ,
विभक्त होण्याचा घाई घाईत निर्णय घेऊ  .. 

मी काही सरणावर पेटलेल प्रेत नाही ,
की मला भाव भावना नाहीत ...

मलाही मन आहे ,
तू ते कधी पाहिलीस नाही ,
मलाही राग येतो ,
तू कधी मनवलस नाही ,
तुझ्या परके पणाच वागणं सतत खटकतं ,
तू कधी आपले पना दिलास नाही ....

ह्यात माझी काहीचं चूक नाही ,
चर्चा करण्यात मला रस नाही ....

दुर्गा मते ...
©® 

Dec 23, 2021

तिचा राजकुमार ..( अलक )

दिशाहीन वाऱ्याची साक्ष देते ,
अनोळखी ह्या वाटेवरून चालू पाहते ...
नशिबाचे भोग मी आज भोगते ...
भरकटलेल्या स्वप्नांना माझ्या आज जरा सावरते ...

     ती आज खूप उदास होती ...घरात तिच्या आनंदाचं वातावरण होतं . बीचारींच मन त्या सगळ्यांना पाहून नाराज असूनही खुश होत होतं ...

कारण तिला आज बघायला मुलगा येणार असतो ..तिची बिलकुल  इच्छा नव्हती एवढ्यात तरी लग्न करण्याची ...
पण आई वडिलांच्या इश्चे खातर ती लग्नासाठी होकार देते ....!!!

      पाहुण्यांनी  " मुलगी पसंद आहे . " म्हणून होकार दर्शवला ...तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पाहुणे गेल्यानंतर तिने आईला एक घट्ट मिठी मारली ...आणि " थँक्यू " बोलली ...


कारण तिला बघायला आलेला मुलगा , तिच्या मनातील, तिच्या  स्पंदनातील तिचाच राजकुमार होता .....!!!


हा मी पहिलाच अलक लिहिला कोणाच्याही मदतशिवाय चुकलं असेल तर कॉमेंट मध्ये जरूर सांगा ...


वर्दळ असलेल्या आयुष्यात

दिशाहीन वाऱ्याची सोबत मागू पाहतो ,
अनोळखी वाटेवरून आता चालू पाहतो....

गर्दीत ह्या व्याकुळ झाला जीव ,

आपलीच माणसं न  करू लागली किंव ...


अस्थिर झालेलं मन , एकांत मागू लागल ,


वर्दळ असलेलं हे जग सोडून जावंस वाटलं ...

अनोळखी वाटेवर घर नव बांधावस वाटतं ,
ओळखीच्या पाखरालाही तिथे अलाउड नसावं असं वाटतं ....

एक क्षण स्वतः साठी जगावंस वाटतं ,
हे जीवन विसरून जिवंत पणीच , स्वर्ग सुख ,
अनुभवावंस वाटतं .....

स्वतःच्या विश्वात हरवून जावंस वाटतं ,
अनोळखी ह्या वाटेवरून चालावस वाटतं ,
वर्दळ असलेलं आयुष्य विसरून जावंस वाटतं ....

दुर्गा मते
©®



( तहान )

तिला आज ऑफिसमधून घरी जायला खूप उशीर झाला होता . थंडीचे दिवस असल्यामुळे अंग ही चांगलच गारठल होत . आणि घसा ही चांगलाच कोरडा ठाक पडला होता .
रात्रीचे नऊ साडे नऊ वाजले असतील ....
    ती घरी पोहिचली आणि तिने आपल्याकडे असल्याने चावीने दरवाजा उघडला . घरात सगळीकडे अंधार पसरला होता . घरात कोणी दिसत ही नव्हत .तिचे डोके दुखत होते. हातात असलेली पर्स डायनिंग टेबलवर ठेवली. दिवे लावले पण दिवे लागले नाही कदाचित लाईट गेली होती. तीने आपल्या कडील मोबाईल पहिला तो पण बंद झाला होता.आसपास चा अंदाज घेत ती किचन मध्ये आली.
फ्रीज उघडून पाण्याची बॉटल घेतली ....पिण्यासाठी घाई घाईने तोंडाला लावली तर ती रिकामीच होती ...नंतर माठा कडे वळाली . माठमधे ग्लास घातला पण माठ ही कोरडा ठाक पडलेला होता... तीने अजुन पाण्याची भांडी पहिली. पण सर्व भांडी रिकामी होती. आज तिच्या घरात पिण्याच पाणीच नव्हतं .... साठी जीव तहानेने व्याकुळ ला होता आणि तिच्या घरात पाणीच नव्हतं ...
ती वैतागून बेड रूम मध्ये आली आणि अंग बेड वर झोकून दिले. खिडकीतून येणारा रत्यावरील पिवळ्या रंगा च्या दिव्याचा कवडसा बेड रूम च्या खिडकी मधून समोरच्या भिंतीवर पडत होता. तिचे लक्ष सहज तिकडे गेले तिकडे कोणाची तरी तसबीर् लावली होती ज्यावर घातलेला सफेद् फुलांचा हार पिवळा पडला होता. माझ्या घरात हा कोणाचा फोटो तिला आश्चर्य वाटले आणि ती बेड वरून उठून त्या फोटो समोर उभी राहिली. तीने तो फोटो पाहिला आणि तिच्या पाया खालची जमीन सरकली . तो फोटो तिचाचं होता आणि त्यावर मृत्यू दिनांक दोन दिवस पूर्वीची होती. हे सर्व पाहून तिला आपल्या डोळयांन वर विश्वास बसत नव्हता. तीला एवढे आठवत होते की ती कामा वरून आली होति कोण तहान लागली म्हनुन किचन कडे जात असताना तिचा पाय मूरगळला आणि तोल जाऊन ती सोफ्याच्या कोण्यावर आपटली आणि तिचे डोळे बंद झाले. पण तिला आज समजले होते की ह्या मधेच तिचा मृत्यू झाला होता. फोटो कडे पाहत असताना हळू हळू ती हवेत विरु लागली.

समाप्त

मी पहिलाच अलक लिहून बघितला होता .. वैशू ताईला दाखवल्या नंतर तिने बदल करण्यास हेल्प केली ..thanks vaishu tai

हा बदल भयकथासुर ( डेव्हील ) नी सुचवलाय...

Dec 22, 2021

इवलस मन ...


इवलस मन माझं आकाशाला गवसणी घालण्याच स्वप्न 
बघू लागलं ...
 कोमजलेल्या मनाला फुलण्याचं आश्वासन देऊ लागलं .

आकाशी झेप घेण्याचे वेध लागले ,
जणू भुईला माझे ओझे झाले  ... 

पक्षी बघते जेव्हा , पक्षी व्हावे वाटते , 
इवलंसं रंगीबिरंगी फुलपाखरू व्हावे वाटते ..

गंध फुलाचे आयुष्याला लाभले असते ,
तर रुसलेली मन ही परतून आले असते ,
म्हणून कधी कधी फुलांचा सुगंध ही व्हावेसे वाटते ...

************
   
             राणी ही कविता तिच्या आईला वाचवून दाखवत होती ..." बघ ना ग ,  किती छान कविता लिहिली आहे . 
कवयित्री ने ..तिचं ईवलस मन आकाशी झेप घेण्याचे स्वप्न बघू लागल .... कोमजलेल्या मनाला आश्वासन देऊ लागल ...मला ही बघायचं आहे ग आई असच एक स्वप्न , सत्यात उतरनार ...आभासी जगातून मला वास्तवात नेणार ...."

तिची आई रागाने तिच्याकडे डोळे मोठे करून बघू लागली ...आणि तिला सांगू लागली ..." हे बघ राणी आमची जेवढी ऐपत होती ...तेवढं आम्ही तुला शिकवलं.
आता आमची ऐपत नाही बाळा तुला शिकवण्याची ..
आता आमची मुख्य एकच जबाबदारी ..तुझ्यासाठी तुला योग्य असा मुलगा बघायचा आणि तुझे दोनाचे चार हात करायचे ...." 

आईच्या अश्या बोलण्यावर राणी खूप नाराज झाली.  राणीचा नाराज झालेला चेहरा बघून आई ही अस्वस्थ झाली ...तिला काहीच कळेना तिच्या कोमजलेल्या फुलाला कस समजावं ते .... आई तिच्याकडे बघते तर , तिच्या डोळ्यांतून टप टप पाणी गळत होत ...  आईच्या ही डोळ्यात नकळत पाणी आलं ..जणू तिच्या डोळ्यातील पाणी हिच्या डोळ्यांत साचलं ...


आई राणी जवळ गेली , तिला मायेने एक झप्पी दिली ..
 आणि म्हणाली. ,.   " स्वारी बाळा ...पण मला तुला कुठल्याच खोट्या आशेवर ठेवायचं नाही बाळा ...जे वास्तव आहे . ते मी तुला सांगितलं बेटा ...तू ही आता हे वास्तव मान्य कर ..." 

" पण आई तुला नाही का ग वाटत ..? मी शिकावं , शिकून खूप मोठं व्हावं ..स्वतःच्या पायावर उभ रहावं .." 
हुंदके देत देत राणी आईला म्हणाली ...

" वाटत होतं बाळा , जेव्हा तू लहान होतीस ..पण आता तू मोठी झालीस बाळा ..समाजाच्या दृष्टीत तू आमच्या डोक्यावरचं ओझ आहे...आणि ते ओझ वेळीच खाली करायला हव . हे प्रत्येक आई वडिलांना वाटतं असतं . आम्हालाही वाटलं तर , ह्यात आमचं काही चुकल का बाळा ...? " 
  आई खूप समजूतदारपने तिच्याशी बोलत होती ..ती ही समजूतदार होती . त्यामुळे आईची सोज्वळ भाषा तिला सहज कळतं होती ...आईला  समजून घेतांना आपली स्वप्न आपल्याला विसरावी लागतील ह्याची तिला जाणं होती ...

" बाळा तू काळजी करू नकोस , मी तुझ आयुष्य आणि स्वप्न अदृश्य होऊ देणार नाही ...मी तुझ्यासाठी एक चांगलाच मुलगा बघेन ...तुझ्या आयुष्याच कल्याण करणारा तुझी सारी स्वप्न त्याच्यात सामावून घेणारा ...
तू फक्त लग्नाला होकार दे , विरोध देऊन कोणाचेही मन दुखवू नकोस ... आयुष्याचं कल्याण होईल राजा ..." 
असं म्हणत आई जरा वेळ शांत राहिली  ...राणीच्या उत्तराची वाट बघू लागली ....

राणी ने शब्दही ही न बोलता  फक्त मानेने होकार दिला. ..आईला ही खूप आनंद झाला ..लेकीने लग्नाला होकार दिला .. दोघींनीही एकमेकींना घट्ट मिठी मारली ...आणि स्वप्न मूर्तीची एक नवी ओढ मनात स्फुरली ...

तुम्हाला ही कथा कशी वाटली ..वाचून नक्की सांगा ...

मी तुझा द्वेष कधीच करू शकत नाही ..

तमा कशाची मी बाळगली नाही ,
तुझा द्वेष मी कधी करूच शकत नाही 

तुला जेवढी नावं , तोंडावर ठेवते ,
तेवढीच नावं पाठीमागून ठेवते ..

Attitude , igo तुला दिलेली उपमा आहे मी ,
आकडू - खडूस तुझ्यासाठी हे , शब्द शोधून काढले मी ..

तुझ्या खूप गोष्टी मला खटकतात ,
तरीही शब्द तुझेच ऐकावेसे वाटतात ...

रियल लाईफ मध्ये मी अजुनही ,
कोणाला भाव दिला नाही ,
आणि देणारही नाही ....

तू पहिला मित्र आहेस ,
ज्याला मी एवढं महत्व दिलं ,
तुझ्या खटकणाऱ्या गोष्टीला सहज ,
Unfollw केलं ...

अकाऊंट वरुन uofallw केलं
मनातून नाही ,
Wp वरुन डिलीट केलय ,
मनातून नाही ...

नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात करायला ,
विसरणार नाही ,
सुरुवात कर अस म्हणत प्रेशर ही करणार नाही ..

ओन्ली my friend ....r.patil

Dec 21, 2021

नारी ...

मन मारत जगते ती एक नारी ,
होऊन निराधार श्वास घेत असते ,
ती असते एक नारी ...

मान - अपमान सहन करत ,
जगत असते ,
चेहऱ्यावर प्रत्येकाच्या हास्य फुलवत असते ...
ती असते एक नारी ...

प्रेम , माया ममता , 
मनी जपते ,
नात्यांची वीण जी अतूट विणते ..
ती असते एक नारी ...

प्रत्येकाच्या मनासारखं वागताना ,
दररोज मरत असते ,
असंख्य यातना भोगून ही हसत हसते ...
ती असते एक नारी ...

नारी ह्या शब्दात खूप ताकत आहे ,
ज्याला कळली त्याला खरी स्त्रित्वाची जाणं आहे ...

दुर्गा मते 
©® 

का रे दुरावा ...

तुझ्या उद्योगाची कल्पना ही करवत नाही ,
मला माझीच ओझी झेपत नाही ....

किती म्हणून मी सहन करायचं ,
तुझ्यासाठी का मी मन माझं मारायचं ..

तू रुसायच , चीडायच , फुगायच ,
आणि मी तुला मनवायच ...
का मी एवढं सहन करायचं ..

तुझ्या अबोल्याने जीव नकोसा होतो ,
तुझा परके पना मनास छळतो ..

तुझ्यावर प्रेम केलं हा का गुन्हा माझा ? 
तू देतो त्याची एवढी मोठी सजा ...


दुर्गा मते
©®

काल्पनिक रचना माझ्या वास्तवाशी संबधित नाही..

Dec 20, 2021

माझ्या आसुसल्या देहाचा तू एक पराग हो ...

 " मृण्मयी अग काय झालं ? तू अशी रडतेस का ? आणि आज लायब्ररितून एवढ्या लवकर कशी आली . " 

नायरा , मृण्मयीची रूम मेट तिला सतत विचारत होती . 
मृण्मयी मात्र काहीच न बोलता , बाथरूम मध्ये गेली . आणि सतत चेहऱ्यावर पाणी शिंपडत होती . 
स्वतः चा चेहरा जेव्हा जेव्हा ती आरशात बघत होती . तेव्हा तेव्हा तिला अजूनच रडू येत होतं . स्वतःच्या हातांना जेव्हा ती स्पर्श करत होती.  तेव्हा तिला स्वतःशिच किळस येत होती... ती तशीच रडत रडत किती तरी वेळ शॉवर खाली भिजत होती . नायराचा आवाज जेव्हा शांत झाला तेव्हा ती बाथरूम मधून बाहेर आली .......

       तिला अशा अवस्थेत बघून नायरा एकदम शॉक झाली . 
         " मृण्मयी अगं काय झालं ? "

मृण्मयी मात्र निशब्द होऊन तिच्या कुशीत शिरली , आणि हुंदके देत देत रडू लागली ....

" अगं अशी रडतेस का ? काय झालं सांग मला "
तिला धीर देत नायरा तिला तिच्या अशा परिस्थितीच कारण विचारत होती ....

" नायू सगळं संपलं ग ... " असं म्हणत ती अजुनच , जोर जोरात रडू लागली ...

" अगं काय संपल ? नीट सांगशील तर कळेल ना मला "
असं म्हणत ती तिचे डोळे पुसत होती ...

" सगळ संपलं " 
ती सारखी सारख अशीच बोलत होती , आणि एक सारखी रडत होती . नक्कीच काहीतरी भयानक झालं .
ह्याची नायराला खात्री पटली होती ...

" हो .... जे ही काही भयानक झालं , ते सांग मला बोलून मोकळी हो ....अशी गप्प बसून कुडत राहू नकोस ..

नायरा चे कणखर सुर ऐकल्यानंतर मृण्मयी तिला म्हणाली , " मी तुला सांगते पण तुला मला एक प्रॉमिस द्यावं लागेल ..."

" कसलं प्रॉमिस "  नायरा जरा गोंधळली ..

" ते आता नाही सांगत . पण तू आधी प्रॉमिस कर नंतर तू माझी विश कंप्लीट करशील ..." 
ती अंत्यत तळमळीने बोलत होती ....

" कसली विष ? ओके बोल !! नक्की पूर्ण करेन ..प्रॉमिस 🤝🤝🤝🤝🤝🤝

तिचे बोल ऐकुन मृण्मयी च्या जीवात जीव आला ...
आणि ती तिला सांगू लागली ..तिच्या आजच्या अशा परिस्थितीच कारण ...

" नायरा गेल्या कित्येक दिवसांपासून '  राज पाटील '
कॉलेज च्या ट्रस्टी चा मुलगा ...
मला खूप त्रास देत होता ...घाणेरडे घाणेरडे प्रश्न विचारून मला खूप छळत होता . माझ्या मोबाईल मध्ये घाणेरडे घाणेरडे व्हिडिओ सेंड करायचा ...
आणि सारखं म्हणायचा ....

" तुझ्या आसुसल्या देहाचा , मला एक पराग होऊ दे ."

मला त्याची ती घाणेरडी भाषा कधी कळलीच नाही ..

जेव्हा आम्ही ....कॅम्प साठी गेलो होतो , बघ लोणावळ्याला तेव्हाही त्या रात्री ती लाईट चुकून नव्हती 
गेली . ती घालवण्यात आली होती. मी स्विमिंग पुल मध्ये चुकून नव्हते पडले मला पाडण्यात आलं होतं ...
माझ्या शरीराला घाणेरडा स्पर्श करण्यासाठी ...
मला तेव्हा काहीचं नव्हत कळतं . आणि आज जेव्हा कळलं तेव्हा सार संपल ग ...."

" म्हणजे ? नेमक काय झालं आज ...आणि लोणावळ्या बद्दल तुला कोणी सांगितलं ? " 
आश्चर्य चकित होऊन नायरा मृण्मयीला विचारत होती ...

तिचे डोळे ओलेचिंब झाले होते ...ती स्वतचे हुंदके दाबत बोलू लागली ...
                 " राज पाटील ने सांगितल आणि ते कारस्थान त्यानेच केलं होतं ...तेव्हा त्याला माझ्या शरीराचा आस्वाद घेता नाही आला , म्हणून आज त्याने पूर्ण पने घेतला . आज ला यब्ररित कोणीच नव्हतं. 
त्याने जाणून बुंजून मला एकटीला बोलावलं .
आणि माझ्या शरीराला हवा तसा घाणेरडा स्पर्श केला .
त्याची जित त्याने खरी करून दाखवली ....

त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. तो शेवटी जिद्दीने झालाच माझ्या आसुसल्या देहाचा एक पराग .... आणि मी काहीच नाही करू शकले ...त्याला अडवू नाही शकले .
त्याच्या शक्ती पुढे माझी शक्ती कमी पडली ...."

असं म्हणत ती ओक्साबोक्सी रडु लागली ...थोडी थांबली डोळे पुसून कणखर झाली ...
" पण मला ह्याचा बदला घ्यायचा आहे ....मला सूड हा घ्यायचाय .... माझ्यावर झालेल्या अन्याविरुद्ध मला लढा द्यायचाय ..."

हातात असलेली एक क्लिप ती नायराला देते .....
" माझी विश कंप्लीट कर ...मला न्याय मिळवून दे ..
मी कधीच तुझे उपकार विसरणार नाही ...आयुष्यभर तुझी ऋणी राहील ..."

तिची कहाणी ऐकून नायरा ही खूप रडते ....

अचानक बेभान अशी हवा सुटते , बाहेरून खूप आवाज येत होता . काही तरी भयानक घटना घडल्याचे ते संकेत होते ...आणि अचानक आपल्यासमोर दुःख व्यक्त करत असलेली मृण्मयी hide होते....त्यानंतर ती खूप शॉक होते ....आणि बाहेर नेमकं काय घडलं ? हे बघण्यासाठी म्हणून बाहेर जाते ...
 
तर , समोर पोलिसांच्या गाड्या आणि समोर मृण्मयी च प्रेत सार शॉक किंग होतं.....तिला तिचं प्रेत बघून खूप रडू येत.  ती त्या प्रेता जवळ जाऊन खूप रडते... आणि मनातून तिला प्रॉमिस करते ...मी तुझी शेवटची विश कंप्लीट करेन . मी तुला न्याय मिळवून देईन ... तिच्या प्रॉमिस करण्याने ते प्रेत ही तिला smile देतं . तिला आश्चर्य वाटतं ....

ती लगी बगीने रूममध्ये जाते ...हातात असलेली क्लिप बघते ...ती क्लिप म्हणजे तिला न्याय मिळवून देणारा सर्वात मोठा पुरावा असतो ...तिच्यावर राज ने फक्त रेपचं केला नव्हता ... तर तिच्या खुनालाही तोच जबाबदार होता ...ते त्या क्लिप मध्ये स्पष्ट स्पष्ट दिसत होत ......तिने क्षणाचाही विलंब न करता ती क्लिप पोलिसांच्या हवाली केली ...आणि राज पाटीलला जन्म ठेपाची शिक्षा झाली ......
मृण्मयीच्या आत्म्याला ही शांती मिळाली तो हसत हसत स्वर्गवासी झाला ......

ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे...कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ....



गोड माझी आई ....

आई एकांत हा खूप छळतो ,
तुझा अबोला नकोसा वाटतो ...
हास्य तुझे बघण्यासाठी जीव तडफडतो ,
बोल ऐकण्यासाठी कान आतुर होतो ...

स्वारी आई चूक झाली ,
तुझ्याशी मी खोट बोलली ,
तूझी परी आज खूप रडली ,
कारण तू तिच्यावर रुसली ,
सारी मुलं तिच्यावर हसली ,

आई बोल ना ग ,
माझ्या डोक्यावरून एकदा तरी ,
हात फिरव ना ग ,
कुशीत तुझ्या घेऊन मला ,
एक कहाणी सांग ना ग ,
आई प्लीज बोल ना ग ...

 ये , परी नको रडू अशी ,
आई तुझी मजाक घेते जराशी ,
ये माझ्या कुशीत ,
सांगते तुला एक नवीन कहाणी ,
तुझ ग राणी ,
माझी जीवन वाहिणी ...
हक्काची एक अशी मैत्रीण ,
जिच्यावर मी चिडू शकते जराशी ...

किती गोड माझी आई ,
खरच पूर्व जन्मीची पुण्याई ,
फळास आली ,
तुझ्यासारखी आई मला मिळाली ...
थँक्यू सो मच आई ....

दुर्गा मते ...
©®

मानवाचे मन ...

मानवाचे मन ,
देवाला कधी कळलेच नाही ,
म्हणूनच त्याने गप्प राहणे स्विकारले ...

अस्तित्व त्याचे असूनही ,
मृगजळ ते भासू लागले ...
कलियुगात त्यालाही त्याचे ,
रूप लपवावे लागले ....

जरा दुःख आलं ,
की जगात देव नाही ,
मन हे सहज बोलून जातं ,
सुख अगंनी खेळू लागलं की ,
ही सारी ईश्वराचीचं कृपा ,
नकळत शब्द हे बोलके होते ...

याचेच तर वाईट ,
त्या देवालाही वाटते ...
किती ही मानव जात स्वार्थी ,
अगदी त्याचा नजरेतून , 
हा देव ही सुटत नाही निस्वार्थी ....

Dec 19, 2021

गोधडी माझी आसुसलेली ...



गोधडी माझी आसुसलेली ,
मायेच्या स्पर्शासाठी व्याकुळलेली ,

उबदार माया तिच्यात दाटलेली ,
तरीही एका कोपऱ्यात ती पडलेली ..

पंचवीस वर्षांपूर्वी कणखर हातांनी ती विणलेली ,
नातवडांसाठी आजीबाई ने जपून ठेवलेली ...
आज पूर्णपणे ती उसवली ,
तरीही कोणी न पाहिली ...

गोधडी माझी आसुसलेली ,
धुडू धुडू धावणाऱ्या पावलांसाठी ,
माया तिच्यातील वाटण्यासाठी ....
आठवण आजीची जपण्यासाठी ,
गोधडी माझी आसुसलेली ....

दुर्गा मते ©®

आधा अधुरा रह गया

आधा अधूरा ,
रह गया है ।
एक सपना ,
जुदा हो गया है।

कोई मेरा अपना ।।

दिल का दर्द ,

मै कैसे बताऊं ।
रूठा हुआ एक दिल ,
उसे कैसे मनाऊ ।।

कितना प्यार था ,

एक दूजे से ।

फिर भी क्यू ,

नाराज हुआ मुझ से ।।


दिल में ,
एक अरमा तेरे लिए ,
ही बनाया है ।।
हजार बार कह चुका था ।
फिर भी ऐसे ,
बिना वजह से ,
क्यू वो मुझसे जुदा हो गया ।।

दुर्गा मते
©®

Dec 18, 2021

विरहाच्या वळणावर ...

विरहाच्या वळणावर ,
प्रीत ही नव्याने बहरली ,
स्वप्न माझी सत्यात उतरली ...

रातराणीचे फुल अलगद कुशीत आले ,
गंधाळलेल्या मनास माझ्या ,
ऊब देऊन गेले ..

प्रितीच्या मिलनाचे डोहाळे त्या चंद्राला लागले ...
पाहून प्रीत वेडे दोन दिवाने ,
निरभ्र त्या आकाशालाही अपरुक वाटले ...

विरहाच्या वळणावर ....
प्रीत ही नव्याने बहरली ,
श्रावणातील जणू लतिका ही नटली ,
वृक्ष - वेली , मेघ - अंबर स्वप्न पूर्तीस त्यांच्या धावून आली ...

दुर्गा मते ©®


प्रेम बंधन भाग 16

मागच्या भागात आपण पाहिले शेखर आणि नित्या कोल्हापूर ला देव दर्शनासाठी गेलेले असताना ....
जे गेल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी शेखरला फोन आला त्याच्या पोलिस स्टेशन मधून आणि त्याला ही लगेच परतावं लागणार होतं . कारण तो आय.पी.एस होता . त्याच्यावर खूप मोठी responsibiliti होती ...

शेखरला ज्या दिवशी फोन आला होता , त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते औरंगाबादच्या दिशेने प्रवास करू लागतात . स्वतःची फॉर व्हीलर असल्यामुळे फार काही प्रेशर नव्हत . पण प्रवास खूप लांबचा असल्यामुळे 9 ते 10 तास लागतील हे विधिलिखित होतं . 

त्यांचा तो प्रवास दहा तासाचा होता ..नवीन कपल असल्यामुळे तो  प्रवास रोमँटिक आणि सुखकर असेल हे काही सांगायला नको . प्रवासाचा वेळ तर खूपच छान गेला . 
गप्पा टप्पा ह्यात त्यांनी कोल्हापूर हून कधी औरंगाबाद गाठल कळलंचं नाही ......

गाडीचा आवाज ऐकताच कोणीतरी आल्याची भनक रंगू मावशीला लागली ...रंगू मावशी शेखरच्या आई ..लहान पणापासून शेखरच्या मावशीची मुल शेखरच्या घरी राहायचे . ते त्यांना मावशी मावशी म्हणायचे . त्यामुळे शेखर आणि शेखरच्या बहिणीही मावशीचं म्हणायचे . 

गाडीचा आवाज ऐकताच रंगू मावशी ओवळणीच ताट घेऊन दारात उभ्या राहिल्या . दूरवरून प्रवास करून आलेल्या पाखरांची भाकर तुकडा ओवाळून दृष्ट काढू लागल्या .... " माझ्या लेकरांच्या सुखी संसाराला कोणाचीही दृष्ट न लागो अस म्हणत त्या नवजात जोडप्यांच स्वागत करू लागल्या . "

दोघांनीही घरातल्या देवांचे आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले . चहा पाणी झाल्यानंतर शेखर लगेच पोलीस स्टेशन मध्ये गेला . असा अचानक एवढ्या उशिरा आणि ते ही एवढ्या दूरवरचा प्रवास करून आल्यानंतर हा  असा पोलीस स्टेशन मध्ये का गेला ?
हा प्रश्न मावशीच्या मनात सतत येत होता . ह्याचं निराकरण व्हावं म्हणून त्यांनी नित्या ला आपल्या रूम मध्ये बोलावून घेतलं ... जसा निरोप नित्याला मिळाला की , मावशीने आपल्याला बोलावलं आहे . तशी नित्या मावशीकडे गेली ...
 " मावशी आत मध्ये येऊ का ? " परवानगी मागत दरवाजात चं  उभी राहिली ....

मावशी जागच उठून तिच्यापाशी येऊन तिचा हात आपल्या हातात घेऊन ....

" अगं बाळा , अशी बाहेर का ग उभी राहिली . ये , ना आतमध्ये ये .." 

त्या दोघेही रूम मध्ये आल्या आईनी , "प्रवास वैगरे कसा झाला ? प्रवासात काही त्रास तर नाही झाला ना ? " 
असे अनेक प्रश्न विचारून नीत्याला बोर केलं होतं . 
ती आधीच एवढ्या दूरवरच्या प्रवासामुळे बोर झाली होती . त्यात हे मावशीचे प्रश्न म्हणजे .. आगीवर मीठ चोलण्यासारख झालं होतं . तिचा जीव अगदी नकोसा झाला होता . पण तिला त्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागली . तिच्या चेहऱ्यावर आठ्या पडलेल्या पाहून मावशीला समजलं होतं . ही फारच बोर झाली . मग लगेच ह्यांनी विषयाला हात घातला ..

" नित्या , हा लगेच असा पोलीस स्टेशन मध्ये का गेला ? 
 नाही म्हणजे , एवढ्या दूरवरचा प्रवास .. तुझी इथे मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची ईशा नाही . आणि तो लगेच पोलीस स्टेशन मध्ये गेला ? "

" हा हा ..आई ते डी.एस.पी साहेबांचा फोन आला होता .
म्हणून ताबडतोब आम्हाला यावं लागलं. नाहीतर अजुन
दोन दिवस राहण्याची प्लॅनिंग होती .." 

" Hmm " मावशी असं बोलल्या आणि लगेच शेखर ..
नित्या  , मावशी ...सरू ताई 
सरूताई त्यांची खूप जुनी कुक खरं सांगायचं तर , मोलकरीणचं .पण त्यांनी कधीच तिला मोलकरीण मानलं नाही . ते तिला ताईचं म्हणून हाक मारायचे . 
असा आवाज देतच तो घरा मध्ये एंट्री करतो . 

" अरे  !! काय ?? " 
गप बस असं आपल्या हाताने खुणावत मावशी त्याला शांत बसायला सांगत होत्या . मग तो ही लाजत काजत का होईना , शांत बसतो . पण त्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद पसरलेला होता . की त्याला शब्दात ही व्यक्त होता येतं नव्हत ..पण त्याने सांगी तलचं ...
" आई मला प्रमोशन मिळाल . " तो सांगता नाही भारावून गेला होता . 
प्रमोशन म्हंटल्यावर मावशी गोंधळलेल्या , " प्रमोशन म्हणजे , ट्रान्स्फर होणार ..." असं त्या पुट पुटल्या ..

" हो तीन वर्षासाठी " अस शेखरने उत्तर दिलं . " पण 
मावशी तू अजिबात काळजी करू नकोस . मी वेळोवेळी पैसे पाठवत जाईल . आणि माझ्यासोबत नित्या राहीलच त्यामुळे माझीही खाण्या पिण्याची आबाळ होणार नाही."
हे तो फार आनंदाने मावशीला सांगत होता . 
त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मावशी ही सुखावून गेल्या होत्या . पण मनातून त्यांना बिलकुल वाटतं नव्हत.
की शेखरन आपल्याला सोडून पुण्यात राहायला जावं .
पण त्याने आय. पी.एस होण्यासाठी घेतलेली मेहनत मावशीने उघड्या डोळ्यांनी पाहिलेली होती . त्यामुळे त्या शेखरला जाण्यापासून कधीच थांबवु शकणार नव्हत्या . 

" ओके बाळा , कधी जावं लागणार आहे पुण्याला .."

हातातील प्रमोशन लेटर मावशीला दाखवत , " हे बघ मावशी उद्या गेलो तरी ही काही प्रोब्लेम नाही . पण आम्ही दोन दिवसांनी जातो . तोपर्यंत नित्या ही तिच्या फॅमिली ला भेटून येईल . आणि मी ही काही माझी राहिलेली महत्वाची काम पूर्ण करून घेईल . "

" ओके बाळा ..तुला जे योग्य वाटतं ते तू कर . मी तुला कधीच अडवल नाही आणि ह्यानंतर ही कधी अडवणार नाही . ते बघ रात्रीचे बारा वाजले . एवढ्या दूरवरच्या प्रवासाने थकला असशील ना . जा आता जाऊन झोप . उद्या बोलू आपण . " 

" ओके मावशी good night " असं म्हणत ते दोघेही आपल्या रूम मध्ये गेले . तो एवढा खुश झाला होता की,
काय करू आणि काय नको करू . असं त्याला झालं होतं . ते रूम मध्ये गेल्यानंतर पहिले दरवाजा लावून घेतो.  आणि आनंदाच्या भरात नित्या ला एक मीठी मारतो , त्याची ती मिठी त्याला खूपच uncomfrtable वाटते . त्याने तिला स्वीकारलं असलं तरी , अजुनही ती त्याला आपलं सर्वस्व देण्यासाठी वेळ मागत होती. हे शेखरच्या लक्षात आल्याबरोबर तो तिला स्वारी बोलतो आणि झोपायला जातो . 
" इट्स ओके " म्हणून ती त्याला प्रत्युत्तर देते . दुसऱ्या दिवशी त्याला प्रमोशन मिळाल्याची बातमी नित्याच्या महेराच्यांस समजते . सगळेच खुश होतात .  ती एक दिवस माहेरी राहते . आणि दुसऱ्याचं दिवशी bags वगैरे भरण्यासाठी लगेच सासरी येते . माहेर आणि सासर फार फार तर एक किलोमीटर  अंतर असेल , त्यामुळे ती लगेच सासरी गेली . 
पुण्याला जाण्याची पूर्ण तयारी केली.  थोडीफार शॉपिंग करायची होती , ती शॉपिंग पण करून घेतली . 
दुसऱ्या दिवशी ते पुण्याला जाणार होते . लेक एवढ्या दूर जाणार म्हणून मावशीचे डोळे पाणावले होते . त्यांना खूप भरून आलं होतं . त्या कितीतरी वेळ रूम मधून बाहेर आल्याचं नाही . त्या बाहेर येत नाही म्हंटल्यावर शेखर आणि नित्या चं रूम मध्ये जाऊन मावशीचा निरोप घेऊ लागले . 
मावशीने पाणावलेल्या डोळ्यांनी च शेखर आणि नित्या ला निरोप दिला . ते जाणार म्हणून नित्या ची माहेरची मंडळी ही त्यांना निरोप देण्यासाठी आली होती . त्यांनी सर्वांचे आशीर्वाद घेऊन त्याच्या नवीन आयुष्याचा नवीन प्रवास सुरू केला ... 
 
बघुया लवकरच त्यांचा पुणे प्रवास तो पर्यंत वाचत रहा ..प्रेम बंधन ..

क्रमशः ...

Dec 17, 2021

नाही होतं सारीच स्वप्न पूर्ण ...

नाही होत सारीच स्वप्न पूर्ण ,
राहतात  तिचं अपूर्ण ,
ज्यासाठी आपण पणाला लावलेले असते ,
आपले संपूर्ण आयुष्य ....


 मनाला जे हवं हवंस वाटत असत ,
ते कधीच आपलं होतं नसत ,
म्हणून तर जे नशिबात लिहिलेलं असतं ,
तेच स्वीकारायचं असतं ...हसत हसत ..

सुख  असो दुःख असो ,
सारचं स्वीकारायचं असतं ,
ऊन असो वारा असो ,
येणारा प्रत्येक वादळ झेलायच असतं ...
पुन्हा उठून उभे नव्याने रहायचं असतं ,
तेच नावीन्य निर्माण करत असतं ,
आपलं खरं अस्तित्व ....
जे आपल्याला एक नवी ओळख देत ,
जगण्याची उमेद देत ...


मी माझ्यातच रमावे ..

मी माझ्यातच रमावे ,
तुझ्या माझ्यात मी स्वतःला शोधावे .. 

डाव सुखाचे नव्याने मांडावे ,
डाव मांडताना हे जग भूलावे ..

हात तुझा दे , हातात माझ्या ,
जिवापाड प्रेम करेल तुझ्यावर राजा ..

एकदा धरलेला हात ,
परत कधी सोडणार नाही ...
तुझ्याशिवाय मनात माझ्या ,
कोणालाही स्थान देणार नाही ...

मी माझ्या तचं रमावे ,
तुझ्या माझ्यात मी स्वतःला शोधावे ...
तुला माझ्यात जपताना .. 
भान ना जगाचे रहावे ... 

Dec 16, 2021

मी येईल प्रकाश घेऊन ...

यशचा आज शाळेचा पहिला दिवस .. 
 यशला शाळेबद्दल   खूपच आपलेपणा वाटत होता , म्हणुनच अगदी चार वर्षाचा असल्यापासूनच तो  त्याच्या मोठ्या भावाबरोबर  शाळेत जात होता ... तो एवढा गोड आणि हुशार होता , की शाळेतल्या बाईही त्याला शाळेत बसण्याची सहज परवानगी देत होत्या ....

आज मात्र यश खूपच खुश होता , कारण तो आज मोठा झाला होता . तो आज स्वतः स्वतःच्या शाळेत जाणार होता . त्याच नावं आज हजरी पटावर आलं होतं ..तो ही आज " yes mam " म्हणून प्रेझेंटी देणार होता ...
त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता ...दोन दिवसापासून तो शाळेत जाण्याची तयारी करत होता .

आजही अगदी पाच वाजता उठला होता . तो तर उठलाच होता , त्याने एवढ्या सकाळी सकाळी आईला ही उठवल . एवढ्या सकाळी काय चाललं ह्याचं ..हे बघायला म्हणून आई उठली ...

     " यश ,  बाळा काय  एवढ्या सकाळी का उठलास ?"
झोप थोडा वेळ ..". डोळे चोळत आई त्याला विचारत होती ...

" आई , अग झोपायच नाही आता , शाळेत जायचं ना मग ,  मला  असं झोपून कसं चालेल ? " 
तो त्याने शाळेत जाण्यासाठी जी तयारी केली होती , ती आनंदाने आईला दाखवत होता . अंगोळी पासून ते बूट चे नॉट बांधून ठेवलेले सार आईला दाखवत होता ..

" बाप रे ! माझा यश तर फारच मोठा झाला ..किती छान तयारी केली शाळेत जाण्याची ..." 
आईचं मन भरून आलं होतं..तिने त्याला जवळ घेतले आणि प्रेमाने कुरूवाळले ....

" आई , हे तर झालं पण ; मेन तयारी बाकीचं आहे अजुन .." तो तिच्या कुशीतून अलगद बाजूला येऊन तिला सांगत होता .."

" कोणती तयारी रे बाळा ? "

" आई अशी कशी ग तू ? "

" कशी रे  बेटा " 

" आई माझा टीपिन बाकी आहे ना अजुन .." तो जरा चिडून बोलला ...

" अरे !  एवढी छान तयारी केलीस तू ... टीपिन ही बनव की तू ..." आई त्याची मजाक घेत आणि त्याला चिडवत बोलली ... 

तो जरा तिच्यावर चिडला , " मी एवढी तयारी केली आणि तू मला साधा टीपिन ही बनवून देणार नाही .."

" अरे ! मी तुला नाही कधी म्हणाले , तू एवढी छान तयारी केलीस तर , टीपीन ही बनव असं बोलले .." 

आई त्याचा उदास झालेला गोड चेहरा बघून मनोमन हसत होती ..वाईट ही वाटत होतं त्याचा लहान झालेला चेहरा बघून ... तो आईच्या अश्या बोलण्यावर चिडून बाहेर जाऊन बसून राहिला ...त्याला आवडतात म्हणून आईने ही खास त्याच्यासाठी ब्रेड वडे केले ...आणि त्याच्या टिपिन बॉक्स मध्ये ठेवले ...यश बाहेर जाऊन बसला होता ... कोणाशिही बोलला नाही ..
आई त्याच्याकडे गेली .. टीपीन आपल्या दोन्ही हातात पाठीमागे लपवून ठेवला ...

" यश बाळा चल , नाश्ता करायला ..." असं म्हणत आई त्याला दुरूनच आवाज देत होती ...

" तूच कर नाश्ता ...मला नाही करायचा .." असं म्हणत तो  आई कडे पाठ करून उभा राहिला ..आईने जाऊन त्याला एक कोमल स्पर्श केला ... आणि त्याच्यासमोर जाऊन दोन्ही पायावर बसली  आपल्या हातातील
टीपिन दाखवत त्याला बोलली ... 
 " हा घे तुझा टीपिन " आणि  त्याला एक गोड स्माइल दिलं ... तो ही खूप खुश झाला ... आईच्या हातातील टीपीन घेऊन त्याने आईला खूप सारे गोड - गोड पापे दिले ...
" अरे ! बास बास आता .." तिनेही त्याला मिठीत घेऊन एक गोड किस त्याच्या कपाळावर केलं ..
" चल जायचं आहे ना शाळेत "  असं म्हणत ती त्याला
आतमध्ये घेऊन गेली ...

त्याने ही पटपट आवरल आणि मोठ्या भावाबरोबर तो शाळेत जायला निघाला ...शाळेत जात असताना त्याला एक झोपडी दिसली ... अस्थाव्यस्थ झालेली ...ती झोपडी त्याच्या घरापासून फार अंतरावर नव्हती ..

शाळेत गेल्यानंतर  त्याला फार काही विशेष वाटलं नाही.
कारण तिथे सगळेजण त्याच्या ओळखीचे होते . वेगळेपणा फक्त हाच की ,  तो आज त्याच्या भावाबरोबर नाही तर  त्याच्या मित्रांबरोबर शाळेत बसणार होता ...
शाळेचा पहिला दिवस तर खूपच छान गेला होता ....

शाळेतून घरी येताना परत त्याला ती झोपडी दिसली..
आता फक्त रिती झोपडी नाही तर , झोपडीत असणारी एक थकलेली आजी बाई ही दिसली ...
ती त्याच्याकडे बघून त्याला हसली , तो ही तिच्या कडे बघून तिला हसला ..

घरी गेल्यानंतर तो जेवण वैगरे करून खेळायला चाललो म्हणून त्या झोपडीकडे गेला ...
ती म्हातारी आजी झोपडी बाहेरचं बसलेली होती ...
तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतंच होती , ती फक्त उदासीनता ...यश त्या आजी जवळ येऊन उभा राहिला .
आजीने परत त्याला एक स्माईल दिली .. यश ने पण आजीला एक स्माईल दिली ...

" कोण आहेस बाळा तू ? " आजीने त्याला प्रेमाने विचारलं .."

" इथेच राहतो आजी समोरच्या घरात ..." यशने आजीला उत्तर दिलं ...

" हो का बाळा ...नाव काय रे तुझ ? " 
आजीला यशला बघून खूपच आनंद झाला होता ..आज किती तरी दिवसांनी आजीला आजी म्हणणार कोणी तरी तिच्याकडे आलं होतं ...

" माझं नाव यश ...तू एकटीच राहते का आजी .." 
असा प्रश्न यशने आजीला केला ...

" हो रे बाळा ..." 

" का ग आजी .." त्याच्या निरागस मनाला कुतूहल 

" असच रे बाळा ...माझी मुलं शहरात राहतात .. कधीतरी येतात भेटायला ..." 

" अश्चा " यश असं म्हणत नाही तर , त्याला त्याच्या आईचा आवाज आला ..." चल आजी मी येतो परत " 
असं आजीला सांगून यश घरी गेला ...

" काय रे यश कुठे गेला होतास ? अभ्यास करायच सोडून कुठे उंदडत होता .." असं म्हणत त्याची आई त्याला रागे भरते ...

" आई खेळायला गेलो होतो .." असं म्हणत तो आईला  गोडी  लावून मनवतो.....

" यश तू पण ना खूप भारी आहेस ...चल आता लगेच अभ्यासले बस .." 
त्याला चांगलचं बजावून आई किचनमध्ये गेली ...आई मागे यश ही गेला ...

" आई तुला एक विचारू का ? " असं म्हणत तो किचन मध्ये लुटुपुटू करत होता ...

" काय रे बाळा , तुला आज अभ्यास नाही का ? जा आणि अभ्यास कर ना ...आज सूर्यकांत काका आपल्याकडे जेवायला येणार आहे . माहितेय ना तुला..
मला स्वयं पाक करू दे राजा , तुझे जे ही काही प्रश्न आहेत ...त्याची उत्तर मी उद्या देते ..." असं म्हणत ती यशला समजावत असते ....

" ओके , आई  मी जातो ...पण मला आधी काहीतरी छान खायला देना ..." असं म्हणत तो परत आई भोवतीच फेऱ्या मारत राहतो ...

' काय हवं तुला खायला ...फ्रिज मधे बाबांनी आणलेले आईस क्रीम आहे ...ते खायचं का ? ' फ्रीज मधील आईस क्रीम दाखवत आई त्याला विचारत होती ...

" पूर्ण देशील का ? दोन पॅक आहेत ना , एक पूर्ण पॅक देशील ..." ते पूर्ण पॅक आपल्या हातात घेत ...यश आईची परवानगी मागत होता ...

" ये , पूर्ण पॅक कशाला हवा तुला ? एवढं खाशील तर आजारी पडशील ...परत बाबा रागवतील माझ्यावर ."
यशच्या हातातील पॅक आपल्या हातात घेत आई त्याच्यावर रागवत होती ...
 
" ये , आई मी एकटाच नाही खाणार आहे काही ..माझ्या फ्रेंड्स ला पण देणार ..." आईच्या हातातील पॅक हिसकावून यश दरवाजाच्या दिशेने पाऊल टाकत होता .

" एवढ्या रात्री कोणते फ्रेंड आहेत तुझे , लवकर ये घरी परत ..उशीर झाला तर बाबा चीडतील .." आई किचन मधूनच यशला सांगत होती ...

" हो ग आई  , बाबा यायच्या आत मी घरात यू डोन्ट वरी"
असं म्हणत यश झोपडीच्या दिशेने धाव घेऊ लागला ..

झोपडीत पूर्णपणे अंधार पसरला होता ...यश आजीला अंन आजी यशला ...कोणीतरी आल्याची चाहूल आजीला लागताच ...

" कोण आहे रे तिकडे , एवढ्या उशिरा काय काम इकडेच....".
 आजी काठी टेकवत टेकवत झोपडीच्या दाराशी आल्या.
यशला त्यांनी सहज ओळखल . 
" बाळा एवढ्या उशिरा इकडे काय करतोस ? घरी जा नाहीतर परत आई रागवेल .."

" हो ग आजी जातो ...पण आधी , हे तर बघ मी तुझ्यासाठी काय आणलय ..." आपल्या हातातील आईस क्रीम पॅक आजीला दाखवत तो बोलला ..

" काय आणलं स रे बाळा ..." आजीने कुतुहलाने विचारल ...

" आजी आधी आत तर चल मग दाखवतो तुला .." 

" आत नको रे बाळा , पूर्ण अंधार आहे ..इथेच बसू आपण .." आजीने  हातातली काठी टेकवली आणि खाली बसली .. 

" बरं आजी तू म्हणतेस तस , बरं मी आलोच तू एक मिनिट थांब ..."
    " कुठे चाललास बाळा , आतमध्ये पूर्ण अंधार आहे ..
तुला काहीच दिसणार नाही ..."

" हो ,  ग आजी आलोच बास दोन मिनिट .." असं म्हणत त्याने पटकन झोपडीतून जाऊन चमचा आणि वाटी आणली ....आणि सोबत असलेले आईस क्रीम त्यात टाकले . एक प्लेट आपल्या हातात घेतली . आणि एक प्लेट आजीच्या हातात देत . " हे घे आजी खा ..." 
आजीने हे प्लेट घेतली ...आणि यश ने आणलेल्या आईस क्रीम चा मनमुराद आनंद घेतला ...
यश ने न राहून आजीला प्रश्न केला ... आजी तुझ्या झोपडीत एवढा अंधार का ग ?

" अरे ! बाळा ह्या अंधाराची सवय आहे मला ...आता अंधारातच जगायचं आहे ..जाणून चुकले .." 
" ये  आजी  , असं का ग बोलतेस ? तुझ्या ही आयुष्यात येईल ग कोणी प्रकाश घेऊन ..असं नाही बोलायचं .."
यश आजी वर चिडत बोलला ...

" हो का ? कोण येईल रे बाळा माझ्यासाठी प्रकाश घेऊन. " असं आजी त्याला मजाक मध्ये बोलल्या ..

" आजी मी येईल तुझ्यासाठी प्रकाश घेऊन ..." यश आजीला आत्म विश्वासाने सांगत होता ...आजीला त्याच्या त्या बोलण्याच कौतुक वाटलं ...
" चालेल हा , मी वाट बघेन तू माझ्यासाठी प्रकाश घेऊन येण्याची . पण आता जा बाळा तू घरी खूप उशीर झालाय ... आई वाट बघत असेल , काळजी वाटत असेल तिला तुझी ....

" हो आजी तू  बरोबर बोलतेस .." असं म्हणत तो तिथून धूम ठोक तो ...

 घरी आल्यावर बघतो तर , काय त्याची आई घरासमोरच येरझाऱ्या घालत होती ..त्याच्या काळजीने तिचा जीव नकोसा झाला होता ...  तो दिसल्या दिसल्या आईने त्याच्यावर ओरडायला सुरुवात केली .. 

" यश , एवढा वेळ कुठे होतास ...तू बोलला होतास बाबा ह्यायच्या आत मी घरात येईल म्हणून  , बाबा  येऊन झोपले पण ..सूर्यकांत काका पण तुझ्याबद्दल विचारत होते ... असं का रे करतोस राजा .. एवढा जीव का घेतोस माझा .." त्याच्यावर रागवून आई रूममध्ये जाऊन रडत असते ...यश लवकर तिच्याकडे जातो ..जाऊन तिला घट्ट मिठी मारतो ..तिचे डोळे पुसत तिला स्वारी स्वारी म्हणत तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो . 
आई पण त्याला प्रेमाने जवळ घेत बोलते , " बाळा असं नाही रे करायचं ..एवढ्या रात्री बाहेर भटकण चांगलं नाही . काळजी वाटते तुझी म्हणून चिडते तुझ्यावर स्वारी  बाळा .."

" आई तू रडताना छान नाही दिसत ग ..नको ना रडू प्लीज " तो तिचे डोळे पुसत होता .. 

" नाही रडत .. चल आता झोपूया आपण खूप उशीर झालाय ..." 

" ओके , आई तुला एक विचारू .." असं म्हणत तो तीच्याभवती पिंगा घालत होता...

ती खूपच बोर झाली होती ..." हो विचार .."

" आई अशी कुठली वस्तू  आहे ग  , जी कमी पैशाची असेल आणि घरभर प्रकाश देईल ...' त्याच्या ह्या प्रश्नावर आई किंचित स  हसते ...

" कुठून आणतो स रे  हे प्रश्न ...पणती आहे कमी पैशात घरभर प्रकाश देईल अशी वस्तू ..."

" किती रुपयाला येते ग आई ती .." 

 " आता हे काय ? आणि तुला कशाला हवी पणती , आपल्या  घरात तर प्रकाशच  प्रकाश आहे ...

" तू सांग ना .." 

" 10 रुपयाला येत असेल , मे बी आय डोन्ट नो ."

" मला देशील का उद्या 10 रू " 

" हो ...देईल ..पण तुला कशाला हवी पणती ..."

" मला नको ग आई , त्या झोपडी त आजी नाही का ? त्यांच्या झोपडीत खूप अंधार आहे .. त्यांना द्यायची आहे.
देशील ना मला पैसे .." 

" शहाण ग माझं बाळं ते , किती विचार करत दुसऱ्याचं.
देईल मी तुला उद्या पैसे ..झोप आता आणि मला पण झोपू दे ...
ते दोघेही झोपी जातात ..दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठून लवकर यश यशच आवरून घेतो ..त्याची आई स्वंय पाक करत होती . तो आज परत तीच्यापाशी जाऊन काहीचं न बोलता उभा राहिला .. आईला कळलं होतं हा कशासाठी आला ..त्याची माजाक घेतं ..

" लक्षात आहे हा माझ्या आपलं कालच बोलण .." 
डब्यातून 10 रू काढून आईने यशच हातावर टेकवले ..
" हे घे , आणि दे , आजीला प्रकाश नेऊन ..."

10 रू बघून यश खूपच खूष झाला होता ..." थँक्यू आई लव्ह यू ..."

" लव्ह यू टू बेटा " 

यश ने धावत पणती खरेदी केली आणि आजीला नेऊन दिली ....
" हे बघ आजी मी आलो तुझ्या साठी पणती घेऊन...."
आजीला ही त्या इवल्याशा जिवाचं खूपच कौतुक वाटल 
आजीने त्याला एक घट्ट मिठी मारून खूप खूप आशीर्वाद दिले ...माझे आयुष्य तुला लाभो . तोंडातून नकळत उद्गार उच्चारले...!!!

नको नको म्हणताना...

नको नको म्हणताना ,
अजूनच जवळ तू येतो ,
जातो जातो म्हणताना ,
ओठांवर अलगद ओठ तू टेकतो ..
ठोका काळजाचा चुकतो ,
अशी कशी रे लाईन तू मारतो ...

रडतांना अलगद शिरते तुझ्या मिठीत ,
अशी कशी रे जमते तुला ,
मला मनवण्याची चिटींग ...

तुझ्या परफ्यूमचा सुगंध ,
कसा रे मला भुलवतो ,
लाडी - गोडी करत ,
का रे तू मला मनवतो ...
तुटलेल्या ह्रदयाला किती रे तू जपतो ...

ओन्ली रोमँटिक ...❣️❣️❣️❣️

दुर्गा मते ..



चहा ...

अन्न , वस्त्र निवारा ...
मानव जातीचा मुख्य आधार ..
जीवनाचे करी सार ..

 अन्न , वस्त्र निवारा मानवाच्या मूलभूत गरजा ..ह्याच्या साथीनेंच मानवाचे जीवन होते सुखकर ...

मी हा लेख माझ्याच अनुभवावरून लिहिते ..आज मार्गशीष महिन्यातील गुरुवार म्हणजे आज माझा उपवास आहे ...सकाळपासून काहीचं खाल्ल नाही ..मागच्या वेळेस तरी खाल्ल होत ...त्यामुळे उपवास वैगरे आहे . असं काही जाणवलं नव्हत ..

पण आज जाणवलं काहीचं खाल्ल नव्हत त्यामुळे , आज चिडचिड होत होती . आणि मेन म्हणजे लिहायला ही काहीचं सुचत नव्हतं . तीन वाजेपासून एक स्टोरी लिहायला घेतली . ती तर अजुनही पूर्ण नाही झाली ..
कारण लक्षच लागत नव्हत ..लिहायला लागले की , सुचलेलं होतं ते ही विसरून जातं होते ...

मग काय मध्येचं एखादी स्टोरी वाचत होते . तिथे लक्ष नाही लागलं तर परत tyipe करत बसत होते . Tyipe करताना तर मला शब्दच सुचत नव्हते ...

खर खास म्हटल तर आज स्टोरी ची सुरुवात आणि शेवट काहीचं मनामध्ये ठरवलेलं नव्हत , आणि आता ही नाही नेमका शेवट काय करावा ...पण सुचेल ह्याची खात्री आहे . कारण स्वंयपाक झाला की मी लगेच जेवणार आहे . आणि अपूर्ण राहिलेली स्टोरी पूर्ण करणार आहे . 
हे ही लिहिलं असं वाटलं नव्हत ..पण चहा मुळे शक्य झालं .

 व्याकुळलेल्या देहाला माझ्या 
चहा ने एनर्जी प्रेझेंट दिली ...
भूक माझी घाबरून पळून गेली ...
चहा नावाची एक गोड मैत्रीण मला मिळाली ...
तिच्यामुळेच तर आज मी एवढं लिहू शकली ...

कविता ...

तूच मला आधार आहे ,
तूच जीवनाचे सार आहे ...

तू येतेस हृदयातून ,
कल्पनेच्या काल्पनिक जगातून ,

स्पर्श करते मनास ,
चालना देते लिखाणास ...

रोज वेगवेगळ्या विषयांवर, 
 लिहायला लावते ,
काल्पनिक जगातच खूप सारे ,
अनुभव देऊन जाते ....

तूच सार आहे माझ्या आयुष्याचे ,
एक गोड स्वप्न आहे , 
माझ्या उज्वल भवितव्यांचे ...

ही रचना मी रोज लिहिते त्या कवितेसाठी कविता लिहायला मला खूप आवडत ...

प्रीत ही नव्याने जागवू नकोस ....

लयास गेलेली , प्रीत ही पुन्हा जागवू नकोस ,
सुखी आयुष्य माझे तू असे हिरावून घेऊ नकोस ...

तुझ्या साठी आता नाही मन तळमळत ,
कसं रे तुला नाही कळत ....

तुझी माझी प्रीत  मी पूर्ण पने विसरले ,
तुझ्या आठवणीत रडण्याचे दिवस ही सरले ...
आयुष्याला मी माझ्या नवीन वळण दिले ...

त्याच्याकडे बघत ती पाणावलेल्या डोळ्यांत त्याच्या , त्यांच्याप्रती  परकेपणा असणारे शब्द रेखाटत होती . आज ती त्याला पूर्ण पने विसरून गेली होती , तिच्याच आयुष्यात ती हरवून गेली होती . स्वप्न सुखी आयुष्याचे जपताना त्याला विसरून जाणेच योग्य , ती कळून 
चुकली होती . त्याच्याबद्दल तिच्या मनात ना प्रेम होतं , ना काळजी होती , ना तिरस्कार होता ...होता तो फक्त परकेपणा ...... 

तिच्या मनात आपल्याबद्दल एवढा तिरस्कार का ? हा प्रश्न त्याला सतत सतावत होता ...तो जरा भित भित तिला काहीतरी विचारत होता ....

" कशी आहेस ? "

" कशी असणार एकदम मस्त , माझ्या पर्सनल आयुष्यात हॅपी अँड फ्री ..."   ती जराशी चिडून चं  बोलली ...

तो तिच्या उत्तरावर फक्त हसून खुश झाला . त्याला अस निरुत्तर बघून न राहून तिनेच प्रश्न. केला ...

" बायद वे , आपण कसे आहात ..." ती फारच परकेपणा ने बोलत होती . 

" मी पण मस्त " त्याला तिचा परकेपणा नकोसा वाटत होता . उगाच आलो आपण इथे साध्य काहीचं होणार नाही . माहीत असून सुधा इथे येण्याची खूप मोठी चूक केली . 

दोघेही जरा वेळ शांत झाले ..एकमेकांशी काहीचं बोलले नाही . पण अशी शांतता ही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती . 
मग बोलण सुरू झालं . सुरुवात तिनेच केली ....

" मग काय म्हणत आहे ...तुमची पहिली gf ..."
ति आता त्यां ला मनापासून torcher करत होती ...

" ये , प्लीज अशी नको ना बोलू ...किती दिवसानंतर भेटलो आपण , प्लीज जरा चांगलं बोलूया त ना .. "
तो नमव लेल्या स्वरात तिच्याशी बोलत होता . 

" का त्रास होतो का ? तिच्याबद्दल बोलले तर , तिच्यासाठीच तर तू मला सोडलं स ना , मग तिच्याबद्दल बोलले तर एवढा त्रास का ? " ती खूपच तिरकसपने बोलत होती...

" तू असच बोलणार आहेस का ? तुला मला समजून घ्यायचं चं नाही का ? एवढा वाईट आहे का मी ..." 
तो खूपच समजूतदार पने बोलत होता ...

" तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही माझी , समजून घेण्याचा प्रश्नच नाही ...कोण लागते मी तुझी ? काय संबंध तुझा आणि माझा ...? " ती खूपच चिडलेली होती . 

" मी तुझा राग समजू शकतो .. तुझा राग तुझ्या दृष्टीने बरोबर आहे . " तो दोषी असल्यामुळे त्याला नमत घेणं गरजेचं होतं ....

" समजू शकतोस ना मग का ? मला असा त्रास देतोस जाऊ दे मला ..बोलण्याची इच्छा नाही तुझ्याशी ..."
तिच्या बोलण्यात त्याला बिलकुल ही आपलेपणा जाणवत नव्हता ..."

" मला एकही संधी देणार नाही का ? मी आता पूर्णपणे बदललो आहे . माझ्यात तुला जे बदल अपेक्षित होते . ते पूर्ण बदल मी स्वतःमध्ये केले . तू मला फक्त एक संधी दे , मला एकदाचं समजून घे ..." 
     तो आज पूर्ण प्रामाणिकपणे बोलत होता , पण त्याच्या प्रामाणिक तेवर तिचा तीळ भरही विश्वास नव्हता . 

" तू दिली होतीस का , मला संधी ? " ती खूपच चिडून बोलली , तिच्या ह्या प्रश्नावर तो निशब्द झाला ...काहीचं नाही बोलू शकला ...न राहून गेल्या तीन वर्षांपासून जे मनात , होत ती आज सगळ बोलून मोकळं होणार होती .

" मी जेव्हा तुझ्यासमोर प्रेमाची भीक मागत होते , तेव्हा तुला तुझी जिवाभावाची दारू प्रिय होती. तू तिच्यासाठी मला सोडलं ..हे कसं रे मी विसरू ? नंतर मी किती वाईट दिवस काढले ह्याची कल्पना तरी आहे का तुला ? खूप वाईट परिस्तिथी तून मी स्वतःला सावरल आहे . परत त्या परिस्तिथी चा अनुभव घेण्याची इच्छा नाही . मी तुला पूर्ण पने विसरून गेली आहे . तू ही मला पूर्ण पने विसरून मला तुझ्याकडून कुठल्याच अपेक्षा नाही. आणि तुला ही नसाव्यात कारण , तुझ्या कुठल्याच अपेक्षा आता पूर्ण होणार नाही ... 

निद्रस्त झालेली प्रीत कुठल्याच परिस्थितीत नव्याने जागणार नाही ...लक्षात असू देत , मनात कोरून ठेव कायमचं कारण माझी स्वप्न आता खूप वेगळी आहे. त्या स्वप्नामध्ये तुला कुठेच स्थान नाही ..."

ती असं बोलून त्याची बाजू न समजून घेताच तिथून निघून गेली , त्यांनीही समजून घेतलं ही प्रीत पुन्हा नव्याने जन्मनार नाही . त्यानेही मनात हेच कोरून ठेवल ..

ही प्रीत पुन्हा नव्याने जागवू नकोस ....
भातुकलीतील तुझ्या बाहूलीच सुंदर आयुष्य तू हिरावून घेऊ नकोस ...
तिच्या आयुष्यात पुन्हा कधी नव्याने परतू नकोस ..

ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे...कुठल्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ...




Dec 15, 2021

विचार सारे उधळून दे ..

विचार सारे उधळले होते ,
मी माझेच मला छळले होते ...

भुकेल्या मनाला मी सतावत होते ,
तहानलेल्या देहाला व्याकुळत होते ....

हृदय माझे जळत होते ,
त्याचे आठवणीचे पेट्रोल ,
जळलेल्या हृदयाची आग वाढवत होते ...
त्यात मी भस्म होतं होते ...

आत्मा माझा मलाच विचारत होता ,
जगतेस कोणासाठी ? 
त्याच्यासाठी की तुझ्यासाठी ? 

का छळ तेस बाई स्वतःला ,
विचार सारे उधळून दे ,
एक नवी भरारी तू घे ....

दुर्गा मते ...

Dec 14, 2021

तू माझे म्हणणं समजूनच घेत नाही ....

मी माझे म्हणणे लादत नाही ,
तू माझे काहीचं समजून घेत नाही ...

तुला हवं ते तू करतो ,
कुठे काही बिघडल तर ,
मग माझ्यावरचं राग काढतो ...

स्टडी कर म्हंटल तर , खेळत बसतो ,
मार्क कमी पडले तर , मग माझ्यावरती च चिडतो ...

लवकरच उठ शाळेत जायच आहे ...
माझ्या अश्या बोलण्यावर ,
आई , पाच मिनिट झोपू दे ना ,
असं म्हणत झोपून राहतो ...
मग नाश्ता न करताच शाळेत जातो ...

तुला हवं ते तू करतो ,
तू माझे म्हणणं समजूनच घेत नाही ....

दुर्गा मते ...

Dec 13, 2021

वरदान ...

बालपण सरले ,
गुण्यागोविंदात दिवस गेले ,
कोवळ्या कळीतून ,
मी पुन्हा एकदा जन्मले ...

आज नव्याने ...
उलगडले कोडे स्त्री जन्माचे ,
सार्थक होई तिच्या अस्तित्वाचे ,
कोडे उलगडले त्या क्षणांचे ...

गाय आणि माय सारखीच ...
दोघींनाही वरदान एकच ...

गर्भात नऊ महिने वाढवायचं ,
एक अनोळखी अर्भक ...
आपल्याच रक्तामासाच् ,
सार्थक करी ते आपल्या जन्माच ...
ते मनात गोंदून ठेवायचं ...

हे वरदान लाभलेलं ..
त्यानेच तर हे निसर्ग सौदर्य आहे बहरलेलं ...

दुर्गा मते ...

उत्तररातीने पहाटेला बोलावले ...

चहाचा कप घेऊन , मी खिडकीजवळ बसले ,
उत्तर रातीने पहाटेला बोलावणे धाडले ,
उत्तर रातीने लावला मला लळा ,
अनुभवायला शिकवली पहाटेची कला ,

सारं जग सुन्न असतं ,
अन् पहाटेच आगमन होतं ,
पशु - पक्षांशी , वृक्ष - वेलींशी तिचं नातं जुळत ,
ह्या साऱ्यांच्या सहवासाने पहाटेच येणं फुलत ,

हे सारे समीकरण मला आवडते ,
उत्तर रातीच मन पहाटेला बोलावते ,
पहाट झाली फुलांचे सुगंध खुणावते ,
फुलांच्या साथीला पक्षी हे कुजबुजतते ,

पहाटेच कोकीळीची मधुर वाणी ऐकू येते ,
प्राजक्ताचे फुल अंगणात सडा टाकते ,
घरातील लक्ष्मी केसांत अबोलीचा गजरा माळते ,
अशा मोहक वातावरणाला उत्तररात ही गोंदते ... 

दुर्गा मते ....

Dec 12, 2021

संकल्प

निस्वार्थी पने नाती जपावी ,
बहरणाऱ्या वेलीप्रमाने ती बहरू द्यावी ,
शेवटपर्यंत ती जपण्याची तळमळ असावी ...
तरच नाती जोडावी ...

संकल्प करूया आज ..
नाती जिवापाड जपण्याचा ...
जोडलेली नाती निभावण्याचा ...

रुसवा फुगवा क्षणात घालवू ,
एकमेकांना समजून घेत ,
ही अवखळ नाती टिकवण्याचा प्रयत्न आपण करू ...

दुर्गा मते...


आता नाही वेगल व्हायचं ...

तिचे गाल लाजेने टवटवीत झाले होते . कारण आज चक्क तीन वर्षानंतर तो तिला भेटायला येणार होता . तिचा हमसफर तिचा जीव की प्राण ....तीन वर्ष रिलेशन शिपमध्ये राहिले . आणि तीन वर्ष गॅप आणि आता परत नव्याने ते आज नवीन वळणावर भेटणार होते...

सीमा आणि विशाल ही लव्हस्टोरी आहे त्या लव्हबर्डची ..
जे कारण नसतांना एकमेकांपासून दूर झाले होते.  
तिला भेटायला आज विशाल येणार होता , तो तिच्या आत्याचाच मुलगा होता . पण तिच्या घरच्यांना तो बिलकुल ही पसंद नव्हता.  तसा मनाने खूप चांगला होता . पण खूप दारू प्यायचा . त्याची पहिली gf कोण असेल तर , ती त्याची दारू ...आणि नंतरची सीमा त्याची जाण .....आज चक्क तीन वर्षानंतर तो त्याच्या जानला भेटणार होता ...

दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी  आतूर झाले  होते .
तीन वर्षानंतर ची जी ओढ असते , ती शब्दात थोडी ना सांगता येते ...

त्याच्या गाडीचा आवाज आला हिचे कान तृप्त झाले . घरात लुटपुट करणारी सीमा बाहेर कपडे धुण्यासाठी आली . त्याला बघताच ती भारावून गेली , पण स्माईल न देताच आत गेली . तीन वर्षानंतर त्याच्यासमोर जरा attitude दाखवू लागली . त्याला कळेना ही अशी का वागते ?  " काल भेटायला ये , असं सांगायला कॉल केला आणि आज अशी attitude का दाखवते . "

तो ही मग सारखं सारखं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला . ती अजुनच भाव खाऊ लागली . तो अजूनच प्रेमाने मनवू लागला . 
" ये आयटम ..एवढ्या काय भाव खातेस ..बोल की भेटायला बोलवलं आणि मग आता अशी का वागतेस . 
त्याने तिच्या हाताला घट्ट विळखा घालत तिला थांबवलं .

" सोड रे , "

" का सोडू " ह्या नंतर जाऊन तिने त्याला एक घट्ट मिठी मारली . आणि त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून हमसून हमसून रडू लागली . 

" ये वेडा , काय झालं ? का रडतेस ? " तो तिच्या डोळ्यातील पाणी पुसत तिला विचारू लागला ..

ती त्याच्या छातीवर आपल्या हाताने हलकेच मारत , " रडू नको तर काय करू ..गेल्या तीन वर्षांत तुला एकदाही माझी आठवण नाही का आली ? कधी माझी विचारपूस नाही का करावीशी वाटली ? "

" तुला वाटलं का असं काही ? माझे वडील गेले तेव्हा तुला माणुसकी म्हणून एक साधा कॉल ही नाही करावासा वाटला . " 
तो जरा चिडून बोलला . ती निशब्द झाली त्याच्या ह्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हत . ती काहीच बोलली नाही . थोडा वेळ दोघेही शांत राहिले मग परत थोड्या वेळाने त्यानेच सुरुवात केली बोलायला ...

" संपवलं तू होत आपलं नातं मी तरी कधीच नाही ? "

" मग काय करणार रे तेव्हा माझ्या आई वडिलांना संशय येत होता. त्यामुळेच बंद केलं होतं. " ती मान खाली घालुन बोलत होती शब्द तोंडातून बाहेर निघत नव्हते . 

" हो का ? आता परत संशय आला तर काय करायचं ग ?"
 तो तिच्यावर जरा चिडतच बोलला . 

ती त्याच्याकडे भावनाशून्य होऊन बघत होती , आणि त्याला खूपच प्रामाणिकपणे सांगत होती .
" आता काहीही झालं तरी वेगळं व्हायचं नाही . तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही . प्लीज मला इथून घेऊन चल , मला लग्न करायचं तुझ्याशी ...मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय ..."

तो तिला सावरत तिची समजूत काढत , " सीमा मला ही लग्न करायचं आहे तुझ्याशी , तू जर मामाची मुलगी नसती ना , तर मी खरचं तुला पळवून नेलं असतं . पण मामाची मान खाली जाईल असं काही करायचं नाही ग मला ..तू प्लीज समजून घे . "

ती निशब्द होऊन , " काय समजून घेऊ तुला ? तू मला समजून घे , यार मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय ...तू मला प्रॉमिस कर आता आपण वेगळं होणार नाही ."

" करतो मी तुला प्रॉमिस आता आपण काहीही झालं तरी वेगळं होणार नाही . पण तू शांत हो . "

ते दोघेही शांत होतात आणि आपले भूतकाळातील गोड क्षण आठवतात . त्यांचं ते रोज चोरुन भेटणं , कॉलेज मध्ये जातो सांगून बाहेर फिरायला जाणं . हातावर काढलेले एकमेकांच्या नावाचं गोंदण सारच त्यांना आठवू लागल ... 

त्यांच्या गप्पा खूपच रंगल्या होत्या तेवढ्यात सिमाच्या आईने आवाज दिला ..

" सीमा यांना जायचं आहे जेवणाचे ताट तयार कर . "
" हो आई " असं म्हणत ती घरात जाते . 

जेवण वैगरे झाल्यानंतर ते जायला निघतात . तेव्हा सीमा त्याला डोळ्यांनीच खुणवत होती ..नको ना जाऊ प्लीज थांब ना .. तो ही डोळ्यांनेच इशारा करत होता . स्वारी जावं लागेल ....तेवढ्यात त्याची आई आली आणि तो बाईक वर बसून निघून गेला . तो खूप दूरवर जाईपर्यंत ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडेच बघत होता ...
 क्रमशः 

जाईल का ही लव्ह स्टोरी बघुया पुढच्या भागात ....



खूप काही गोष्टी इथेच विसराव्या लागतात ..

आयुष्य खूप सुंदर आहे , जगता आलं पाहिजे .
निसरगसौंदर्याने नटलेला परिसर न्याहाळता आला पाहिजे .
माणुसकीचे मर्म जपता आले पाहिजे ...प्रत्येकाशी प्रेमाने वागता आले पाहिजे . आणि जगताना खूप काही गोष्टी विसरताही आल्या पाहिजे. इथल्या इथेच . कारण काही गोष्टी खूप त्रासदायक असतात. Exmpal घ्यायचं ठरलं तर , एकाद्याचा past . 

           Past हा जर वाईट असेल ना तर , तो माणसाला दुःखच देतो . तेव्हा तो past विसरून जाणंचं बेस्ट ठरतं .
त्याला कवटाळत बसण्यात काहीचं पॉइंट नसतो .

तसचं असतं काही मानसांच खूप त्रास देणारे माणसं असतात . ह्या समाजात त्यांच्यापासून दूर राहण्यातचं आपलं भलं आहे. एखादा व्यक्ती आपल्याला कितीही आवडत असला ना , तरी त्याला कवटाळत बसू नका ,
 आपण त्याला कवटाळत बसू तर , तो अजूनच आपल्यापासून दूर दूर पळण्याचा प्रयत्न करेन . त्यापेक्षा त्याला जा म्हणायचं पळ जितक्या दूर पळता येईल तितक्या दूर पळ , शेवटी तो तुमच्याकडेच परत येईल .

मला माहितेय , जो व्यक्ती आपल्याला आवडतो . तोच व्यक्ती अनेकवेळा आपल्या डोळ्यांतील अश्रूंच कारण ठरतो . तोच व्यक्ती सगळ्यांत जास्त आपल्याला दुःख देतो . तिथेही मन भरलं नाही तर , तो आपल्याला गृहीत धरायला लागतो . त्याला माहित असतं ना , ह्याला आपली सवय आहे . त्यामुळे तो नक्कीचं आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करेन .
   
                त्याला आपली सवय नसते , असं काही नसतं पण आपण एक चूक करतो , आपण आपली सवय दाखवतो , त्याच्या पुढे पुढे करून त्यामुळेच तो आपल्याला गृहीत धरायला लागतो . काहीही झालं तरी कोणाच्याही पुढे पुढे करायचं नाही . एकद्या बद्दल आपल्याला कितीही आपुलकी , जिव्हाळा , माया वाटतं असली तरीही , स्पेशली ज्यांना attitude असतो ना , त्या लोकांपुढे चुकूनही मला तुझी गरज आहे . हे दाखवायचा नाही . देवालाच ठाऊक कसला माज 
असतो  . Attitude वाल्या लोकांना .....!!

तसल्या विचीत्र ग्रह फिरलेल्या माणसांना ही विसरून जाणं योग्य ठरतं . तो व्यक्ती कधी आपल्या आयुष्यात आलाच नाही , किंवा तो व्यक्ती अस्तित्वातच नाही . असं समजून त्याला विसरून जाण्याचा प्रयत्न करायचा .
मला माहितेय एकाद्या व्यक्तीला विसरून जाणं एवढं सोपं नसतं . पण काही अवघड ही नसतं .

आयुष्य आहे खूप काही गोष्टी इथे विसराव्याच लागतात. नवीन गोष्टी एक्सेप्ट करण्यासाठी जुन्या गोष्टी इग्नोर कराव्याच लागतात ...

मी हा लेख कोणाचेही मन दुखवण्याच्या हेतूने लिहिलेला नाही . पण खरंच जगताना खूप विचीत्र माणसं भेटतात .
त्या विचीत्र माणसांना विसरून जानच बेस्ट असतं .
सर्व सामान्य माणसाला तुम्ही जरूर प्रेम , आपुलकी , माया , विश्वास आपलेपणा द्या . पण ज्या ही व्यक्तीला. माज attitude असेल ना , त्या व्यक्तीला तुमच्या सावलीला ही उभ राहू देऊ नका .....तेचं बेस्ट आहे , नाहीतर नंतर पस्थाव होतो ....

आणि चुकून ही कोणी असा विचार करू नका , की हा माझा अनुभव आहे . सुचलं म्हणुन लिहिलं. रियल लाईफशी काही संबंध नाही ....

दुर्गा मते ....

Dec 11, 2021

गरीबा घरची चुल ...

गरीबा घरची चूल ,
न पेटताचं विझली ,
तव्यावरची भाकर ,
तेला वाचून करपली ...

झोपडीला चांदण्यांनी वरदान दिले ,
म्हणून दिवे तरी लागले खरे ,
नाहीतर अंधारातच जगावे लागले असते बरे ...

मोळी विकली नाही , 
म्हणून लेकरं माझी उपाशी राहिली ,
पोटात पेटलेली आग ,
पाण्यानेच विझवली ..
ह्या वेदनेने आई ती घायाळ झाली ...

लेकरासाठी राब राब राबली ,
तरीही बिचारी ती लेकरं माझी ,
उपाशीच झोपी गेली .....
ह्या विचारांनेच ती माऊली अर्धी अर्धी झाली ...

दुर्गा मते ...

द्वेषाची एक ठिणगी ....

द्वेषाची एक ठिणगी पुरेशी होती ,
पेटलेल्या रानात करुनेला ही जागा नव्हती ....

मनाच्या स्मशालीत ,
वणवे पेटले होते गैरसमजाचे ,
तिथे पहारेकरी पहारा देत होते ,
निर्दयी मनाचे ...

अस्ताला गेलेले गैरसमज ,
पुन्हा पेटून उठायचे ...
वेदनेचे कारण ठरायचे ...

जोडलेली घडी पुन्हा विस्कळीत व्हायची ,
द्वेषाची एक ठिणगी त्याचं कारण ठरायची ...
मग मनात करुनेलाही जागा नसायची ..

दुर्गा मते ..

Dec 10, 2021

बाळाला जन्म द्यायचा म्हणून द्यायचा नसतो ..

आई वडील कोणतेही असो , त्यांनी मुलांना जन्म पूर्ण विचार करून द्यायला हवा . अपत्य संख्या ही लिमिटेड हवी . बरं झालं भारताने वेळेवरच   ' हम दो औ र हमारे दो ' हा रूल लागू केला . नाहीतर आजही अनेक कुटुंब मागासलेलीच राहिली असती . कारण एकच अपत्य संख्या ......
खरच मला तरी मनापासून वाटतं ' हम दो और हमारे दो ' ची ही काही गरज नाही . " हम दो और हमारा सिर्फ एक "
हे सगळ्यात सुंदर समीकरण आहे . कारण आता काही राजा महाराजांचा काळ नाही हे , की शंभर दोनशे एकर जमिनीला वारस हा हवास . अष्टपुत्र हे हवेच . सर्वसामान्य माणसाकडे . फार फार तर एक ते दीड एकर जमीन . ह्या पेक्षा जास्त मोठी प्रॉपर्टी नसते . 

मग कशाला हवे दोन तीन मुलं ?
' हम दो और हमारा एक ' केव्हाही चांगलं . 

 बाळाला जन्म द्यायचा म्हणून द्यायचा नसतो . जन्म देताना त्याच्या अस्तीत्वाचा जरूर विचार करावा . आपण बाळास योग्य शिक्षण देऊ शकतो का ? त्याची सारी स्वप्न पूर्ण करण्याच बळ आपल्यात आहे का ? ह्याचा जरूर विचार करावा . जर आपण तिथेच कुठेतरी कमी पडत असू तर , काही अधिकार नाही आपल्याला एका निरागस जिवाचं आयुष्य विस्कळीत करण्याचा . त्या जीवाला त्याचं जीवन मनमारून जगावं लागणार असेल तर , तो जन्माला न आलेलं च केव्हाही चांगल . काही अधिकार नाही आपल्याला कोणत्याची जीवाचा आयुष्य कोलमडून टाकण्याचा , मग ते आपल्या रक्ताच हाडा मासाच बाळं का असेना ? 
    
    जेव्हा ते निरागस बाळ जन्माला येत . तेव्हा ह्या जगाशी त्याचा फार काही संबंध नसतो . कोण आपल? कोण परक ? ह्याची त्याला जाणं ही नसते . हळू हळू त्याचा ह्या जगाशी संबद्ध येतो . हळू हळू आपले आई वडील कोण ? हे त्याला कळायला लागत . आपण कोणाच्या विश्वासावर ह्या सुंदर जगात आलो , आपले आयुष्याचे शिल्पकार कोण ? ह्याची त्याला हळू हळू ओळख व्हायला लागते . तो त्याच्या त्या शिल्पकाराच्या विश्वासावर स्वप्न बघायला लागतो . स्वप्न नक्की पूर्ण होईल . ह्या आशेवर तो जगत असतो . काही ठिकाणी होतात स्वप्न पूर्ण त्या निरागस जीवाचे , पण बहुंता श ठिकाणी नाही होतं. 

 जिथे स्वप्न पूर्ण होतं नाही ना , तिथे त्या जीवाला वाटायला लागतं. आपल्याला ह्यांनी जन्मच का दिला ? जगताना मरणयातना काय असतात ? त्या अनुभवायला . 
थोड्याच वेळात त्याच्या लक्षात येतं आपली स्वप्न का पूर्ण होऊ शकत नाही . कारण आपले बहिण - भाऊ ते ही आपल्यात वाटेकरी आहेत . कधाचीत ते नसते तर , आपले स्वप्न झालेही असते पूर्ण , आपल्या आईवडील फक्त आपले असते . आणि त्यांनी आपल्यासाठीच त्यांचं आयुष्य पणाला लावले असते . आपल्यात कोणी वाटेकरी नसता . आपले स्वप्न काहीही झालं तरी पूर्ण होणारच नाही . असं समजून तो आपल्या स्वप्नांना पूर्ण विराम देतो . आणि असेल तस आयुष्य स्विकारतो . ते आयुष्य स्विकारताना नक्कीच त्याचा श्वास गुदमरत असतो . पण दुसरा त्याच्याकडे काहीचं पर्याय नसतो . कारण माहीत असतं ना त्याला , आपले आई वडीलचं आपले शिल्पकार आहेत आणि ते जसे आपल्याला घडवणार तसेच आपण घडणार ...

प्लीज बाळाला जन्म देताना आपण त्याच्या संपूर्ण आयुष्याचा विचार करावा . केवळ द्यायचा म्हणून द्यायचा जन्म देऊ नका . काही फायदा नाही मग त्याला जन्म देण्याचा ... !!

आपल्यात आपल्या बाळाला स्वप्न दाखवायचं ही बळ हवं , आणि ते त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता ही हवी. दोन मुलाला जन्म देण्यापेक्षा एकाच मुलाला जन्म देऊन त्याचं अस्तित्व परिपूर्ण करावं . तुमची जशी क्षमता तशी तुम्ही फॅमिली प्लॅनिंग ठेवा . 

एक सांगू , केवळ बाळाला जन्म देऊन आपलं कर्तव्य नाही पूर्ण होत . आपलं खरं कर्तव्य तेव्हा पूर्ण होत . जेव्हा आपण आपल्या बाळाला एक चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न करत असतो . त्याच्या साऱ्या स्वप्नाचा शिल्पकार होऊ . त्याच्या आयुष्याचा सहारा होऊ . त्याच्या जगण्याचा आपण आधार होऊ . 

जेव्हा आपण एकाच बालकांचे आई वडील असू , तेव्हा अजुन एक चांगली गोष्ट होईल . तो पण म्हातारंपणी आपल्याला वाऱ्यावर नाही सोडणार. कारण जर आज त्याच्यात कोणीही वाटेकरी नसेल ना तर , उद्या कोणी आपलेही वाटे नाही करणार . तुम्ही करणार तर , उद्या हमखास तुमचेही वाटे होणार . कारण सुरवात तुम्ही केली त्याने कधीच नाही . तुम्ही दाखवलेल्या रस्त्यावरचं तो चालणार कारण , तो मार्ग तो रस्ता तुम्हीच दाखवलेला आहे त्याला अगदी लहान पणापासून . त्या रस्त्यावरच तो चालणार त्यात त्याची काहीचं चूक नाही .

मी हा लेख ' हम दो औंर हमारा सिर्फ एक ' हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजवण्या च्या हेतूने लिहिलेला आहे .
कोणाचंही मन दुखवण्याचा माझा हेतू नाही ...

दुर्गा मते ...


Dec 9, 2021

काही सुचेना ...

शब्द हरवले की काय ?
कल्पना माझी माझ्यावर रुसली की काय ?
विचार माझे लपून बसले की काय ? 

काहीचं कळेना ....
मला आज काहीचं सुचेना ...
शब्दही बोलके होईना ...
वाक्य माझ्याशी संवाद साधेना ...

सुचेल तरी कसं ,
ह्या चार भिंतीत ..
विषय तरी कुठून येतील ...
माझे शब्द तरी का माझ्याशी बोलतील ?
वाक्य ही माझी माझ्याशी अबोलाच धरतील ...
आज विचार माझे निशब्दचं होतील ...

आज मला छान अस काही सुचेना ....काय माहित काय झालं . उद्या करते छान काहीतरी ट्राय ...

दुर्गा मते ...

चाफ्याला लागले डोहाळे , तुझ्या हास्याचे ..

"  पार्थ , बाळा काय झालं रे ? बोलत का नाहीस तू असा गप्प गप्प का ? "

सकाळपासून जान्हवी पार्थशी बोलण्याचा प्रयत्न करत होती . पण पार्थ काही तिला रिस्पॉन्स देईना . 
आज हा असं विचीत्र सारखं का वागत असेल . ह्या विचाराने जान्हवी उदास झाली होती . 
उदास झालेल्या जान्हवीला बघून जान्हवीची सासू तिला समजावते ,
" हे जान्हवी नको उदास होऊ बेटा . शाळेत भांडण झालं असेल कोणाशी त्याचा राग तो आपल्यावर काढत असेल . होईल थोड्या वेळाने शांत आणि बोलेल आपल्याशी काळजी नको करू .. 

डोळे पाण्याने तुडुंब भरलेले उरात दाटलेले हुंदके सांभाळत , " आई उदास कशी नको होऊ , पार्थ ला नेहमी हसताना , बडबड करताना बघण्याची सवय आहे . 
पण तो आज सकाळ पासून शांत शांतच आहे . शाळेत जातानाही फार काही बोलला नाही . जाताना मला साधं बाय बाय ही केलं नाही . दररोज साध्या साध्या गोष्टीसाठी त्याला आई लागते . 
 आणि आज आपली बॅग , आपली पुस्तक , टीपिन सगळ बरोबर घेऊन शाळेत गेला . माझा पेन कुठे ? माझी वही कुठे ? असं म्हणणारा माझा पार्थ आज असा गप्प का ? "

तेवढ्यात मेघना जान्हवी ची मोठी मुलगी तिच्या डोळ्यात आलेले पाणी . आपल्या हाताने पुसते . आणि तिला एक गठ्ठ् मिठी मारते ....

      " हे आई रडू नको ना ग , अग पार्थ बोलेल तुझ्याशी तुझ्याशी अबोला धरण्याची हिम्मत नाही ग त्याची . तू आठवून बघ . तू काही त्याला प्रॉमिस केलं होतं का ? की जे तू पाल कळ नाहीस . त्यामुळेस चिडला असेल तो . तू प्रॉमिस पूर्ण केलं की , बघ कसा येऊन घट्ट मिठी मारतो ते. " 
     " नाही ग बाळा , मी त्याला काहीही प्रॉमिस केलेलं नाही. आणि केलं भी असेल ना , तर लगेच पूर्ण केल असेल ग . तुला माहितेय ना त्याला जी गोष्ट हवी असेल ती घेतल्याशिवाय तो गप्प बसतो का ? "

" Hmm बरोबर आहे तुझ " मग काय झालं असेल ह्याला 
ह्या गोष्टीचा मेघना विचार करू लागली . 
 
तेवढ्यात मेघनाचे वडील घरी आले . पार्थ त्यांना खूप घाबरतो . जान्हवी ला रडताना पाहून , त्यांना खूप वाईट वाटलं . " काय झालं जान्हवी ? का रडतेस ? "
 
जान्हवी काही बोलणार तर तेवढ्यात मेघणाने येऊन पार्थ ची खोडी काढली. आज त्यांचा मुड छान होता . त्यामुळे पार्थ ला त्यांनी प्रेमाने जवळ बोलावलं ...
  " पार्थ बेटा , इकडे ये ..." बाबांचे स्वर कानी पडल्यावर पार्थ जरा घाबरला . पण त्याच्या बा बाने त्याला दोनदा आवाज दिला होता . त्यामुळे त्याला जावंच लागलं. 
पार्थ मान खाली घालून त्यांच्या समोर येऊन उभा राहिला . त्यांच्या बाबांनी त्याला जवळ घेतले , " काय झालं बाळा ? तू आई शी आज का बोलत नाहीस ..असा अबोला का धरला तिच्याशी ? ती रागवली का तुझ्यावर , की ओरडली ..? " 
पार्थं ने मान हलवून नकार दिल्यावर , " मग काय झालं बाळा ? का बोलत नाही तू तिच्याशी ? "

" आठ दिवस झाले बाबा तो चाफा हसला नाही . आई बोलली होती मला तो चाफा दररोज हसतो . मी दररोज त्याला बघतो . तो मला एकदाही हसताना नाही दिसला ."

त्याच्या अशा बोलण्यावर सगळेच हसले , आजीने तर कपाळावर च हात टेकवला . जान्हवी कोणीही हसू नका .
असं डोळ्यांनीच खुणवत होती . तिने त्याला जवळ घेतले आणि सांगितले हो हसतो , ना तो चाफा बघायचं आहे का तुला ? चल , मी दाखवते . 
 
  ती मेघनाला सांगते , " तू सर्वांना जेवायला वाढ मी आणि पार्थ त्या चाफ्याच्या ओट्यावर बसून जेवतो आज , सकाळपासून काहीचं खाल्ल नसेल माझ्या पार्थ ने .."
मेघना सर्वांना जेवण वाढते . आणि जान्हवी च्या हातात तही एक ताट देते . ते दोघे जाऊन त्या ओट्यावर बसतात . 

 पार्थ च केव्हाच एकच रडगाण सुरू , " आई सांग ना ग कधी असणार हा चाफा ..."

    " थांब रे बाळा हसेल , आपण एकदा जेवून घेऊया ..."
असं म्हणत ती पार्थ एक एक घास भरवायला सुरुवात करते . आणि घास भरवतांना पार्थ एक गोष्ट सांगते. 

 " पार्थ तुला माहितेय का ? "
  " काय ग आई .."
" हा चाफा आहे ना ... ह्याला डोहाळे लागले .."
" डोहाळे म्हणजे काय ग आई ? "
" म्हणजे एखादी गोष्ट तूर्तास हवी हवीशी वाटते . ती गोष्ट मिळाली नाही ना की नकोस वाटत . ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे हट्ट...."
" हो का ? कशाचे लागले ग आई ह्या चाफ्याला डोहाळे ."
" तुझ्या हास्याचे ....तू हस ना मग बघ ..तो चाफा पण , कसा हसतो . तुला हसताना बघून एक तरी फुल उमलेल .
आणि जे फुल उमलल ते फुल तुझ्या हसण्यात सामील झाल .. असं आपण समजायचं ."

" आई पण उमलेल ना ग , एक तरी फुल मला हसतांना बघून ..."
" हो बाळा तू हस तर खरं ..."
तिच्या त्या बोलण्यावर विश्वास ठेवून आई ला घट्ट बिलगला आणि तिच्या खुशीत च हसू लागला . त्यांची सारी ओढ त्या चाफ्याच्या फुलांकडे होती . तो हसत असतानाच एक कळी अचानक उमलली , जशी ती कळी उमलली , तसा पार्थ अजूनच घट्ट आईला बिलगला ..
" आई ती बघ एक कळी उमलली. माझ्या हास्यात सामील झाली...."
" अरे खरच की रे , अरे व्वा ! पार्थ तू चाफेचे डोहाळे पुरवले की राजा ...." 
तो अजूनच खुश झाला आणि आईला जाऊन बिलगला. 
आई ही खूप खुश झाली . त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून....त्याला घट्ट मिठी मारून कुरवाळू लागली .आणि पुन्हा रडू लागली . त्याच्या ओठांवरील हास्य बघण्यासाठी सकाळपासून तळमळत होती....!!!

दुर्गा मते...

बास ना आता वाद- विवाद ..

वाद हा किती वाढवू ? 
मनात आता किती कटुता साठवू ....

बास ना आता , वाद - विवाद ,
साधूया ह्या ना खुला संवाद ...

मनमोकळे पणाने एकदा बोलूया ,
झालेले गैरसमज दूर करूया ...

तू ही एक पाऊल पुढे ये ,
मी ही एक पाऊल पुढे येते ,
वाद - विवादाला ह्या आज ,
पूर्णविराम देते ..

दुर्गा मते ....

Dec 8, 2021

प्रेम ह्या फिलिंग पासून दूर राहिलेलेचं बरं ..

उलाढाल दोन जीवांची ,
काही क्षणांची .. 
सोबत त्या अडीच शब्दांची ,
राख रांगोळी जीवनाची ...
काहीचं कळत नाही .

प्रेम ही  जगातील सर्वात सुंदर फिलिंग असली ना तरी , चांगल्या चांगल्या माणसाच आयुष्य बरबाद करण्याचं एकमेव कारण तिचं फिलिंग आणि त्या फिलिंग ला व्यक्त करणारे ते अडीच शब्द ठरतात . 

सुरुवातीला खूप भारी वाटत हे प्रेम पण , नंतर हेच प्रेम जगतानाच मरणयातना देत . जेव्हा दोन जीव एकमेकांमध्ये गुंततात . तेव्हा खरच खूप अवघड होऊन बसतं . कारण प्रेमाचा शेवट हा लग्नानेच होईल हे काही विधिलिखित नसत . 
  
    भगवान श्री कृष्णला ही त्याचं प्रेम कधी मिळालं नाही , तर मग शेवटी आपण सर्व सामान्यच आहोत . आपल्यालातरी कस मिळेल ? 
प्रेमात पडणं हे काही आपल्या हातात नसत . अचानक व्यक्ती प्रेमात पडतो . त्याची त्याला जाणीव ही नसते . 

पण खर सांगू का ? प्रेम ह्या फिलिंग पासून ना दोन हात दूर राहिलेले च बरं . कारण प्रेमात पडून दूर होताना जो त्रास होतो . ना तो खूप भयानक असतो . त्यापेक्षा प्रेम न केलेले बरं असतं . 

    आई वडील आपल्या प्रेमाला स्वीकारतीलच हे ही काही नक्की नसतं . त्यांना आपल प्रेम हा एक पोरखेळ ही वाटू शकतो . ते कधी आपलं प्रेम समजू शकतील ही अपेक्षा ठेवणे ही चुकीचं ठरत . कारण आई वडिलांची निवड कधी ही मुलांना आवडत नाही . आणि मुलांची निवड कधी आई वडिलांना आवडत नाही . हे ठरलेलं आहे ... 
घर घर की यही कहाणी है !!

त्यामुळे प्रेमापासून थोड दूर राहिलेलं च बरं . कारण ते प्रेम  हे  सुंदर आयुष्य कधी बरबाद करून टाकेन सागता नाही येणार ....

प्रेम बंधन - 16

शेखर एवढा समजूतदार आहे . हे कळल्यावर नित्या आणि राहुल ह्यांच्या जीवात जीव आला . त्यांची मैत्री कधीही तुटनार नाही . ह्याची त्यांना खात्री वाटू लागली .
शेकरच्या इश्चेखातर राहुल त्या दोघांना आपल्या घरी घेऊन जातो. 

त्याच्या घरचं वातावरण खूप छान होत . घर ही खूप मोठं नव्हत पण जेवढं होत . तेवढंच खूप छान होतं . 
 त्याची आई ही स्वभावाने खूप छान वाटल्या . रिदिमा ही चांगली वाटतं होती ...पण थोडीशी चिडचि डी होती . चहा वैगरे आणला तिने आमच्यासाठी ...ओठांवर ही गोड स्माई ल होती . पण मनात मात्र ती गोंधळलेली होती ...
" कोण आहेत हे ? तुम्ही ओळखता कसे एकमेकांना ? "
तेवढ्यात शेखर उठून उभा राहिला . आणि सांगू लागला.
" आम्ही फ्रेंड्स आहोत . एफबी वर भेटलेलो ..."
" Ohh ! Nice ..."

असं म्हणत ती चहाचा ट्रे घेऊन आतमध्ये गेली . आणि पोहे घेऊन बाहेर आली ...
आज रिदिमाला काय झालं आहे . तिच्यात अचानक असा बदल कसा झाला ? ह्या विचारात राहुल गडून गेला होता . 

रिदिमा नित्या आपली खूप जवळची मैत्रीण असल्यासारखी तिच्याशी बोलू लागली ..

"कशी आहेस तू ? नुकतच लग्न झालं ..एन्जॉय कर तुझ आयुष्य हे दिवस परत परत येत नाहीत आयुष्यात ...एकदा गेले की गेले .."

" हो नक्की !! थॅन्क्स फॉर सजेशन मी .."

" इट्स ओके डिअर .."

त्यांच्यातील तो गोडवा पाहून राहुल ही अचंबित झाला होता ... अरे व्वा ! ह्यांचा तर फार छान जमल असं म्हणत मनोमन खुश होत होता ...

शेखर आणि नित्या राहुलच्या घरी बराच वेळ थांबतात . 
संध्याकाळच्या वेळेस ते त्यांच्या घरीच जेवतात . आणि मग पुन्हा हॉटेल ब्रीज वर जातात . 

शेखर मनाने खूप चांगला होता . त्यामुळेच नित्याला त्याच्यापासून काहीही लपवून ठेवण्याची गरज भासत नव्हती . पण तिच्या मनात एक प्रश्न सतत रेंगाळत होता.
तो म्हणजे हा ह्याने  आपली आणि शेखरची मैत्री कशी काय except केली . ते हॉटेल ब्रीज वर पोहचन्यापूर्वी एका कॅफे मध्ये कॉफी घेण्यासाठी थांबले . त्याने कॉफी ऑर्डर केली . तेवढ्यात नित्या त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली . पण तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते . तिचा गोंधळलेला चेहरा पाहून शेखरने तिला प्रश्न केला . 
  " काय प्रोब्लेम आहे ?  काही बोलायचं आहे का ? बोलायचं असेल तर , बिनधास्त बोल . मी आय.पी.एस 
जगासाठी आहे . तुझ्यासाठी फक्त तुझा नवरा आहे . नवरा होण्याआधी एक जनरल फ्रेंड आहे . हा आता राहुल इतका नसेल जवळचा पण , दूरचा का होईना ."

नीत्याला त्याच्या बद्दल अजूनच कुतूहल वाटत होत .
किती फ्री आहे हा माणूस तिने त्याला प्रत्युत्तर दिलं . 
" राहुल इतका नाही राहुल पेक्षा ही खूप जवळचे मित्र आहात तुम्ही माझे ..."
तो लगेच मध्ये बोलला , " म्हणून हा अरे तुरे चा परकेपणा का मला ..."
" अहो पण पती आहात ना तुम्ही माझे ..."
" हो ... पतिधर्म म्हणून तू मला अरे तुरे करायचं ... " 
" ओके करेन पण फक्त आपल्या दोघांतच ..ओके ना "

तेवढ्यात वेटर कॉफी घेऊन येतो . आणि ते कॉफी घेतात  . शेखर कॉफी घेत घेत तिला विचारतो . 
" बरं तुला काय विचारायचं होत मला ते विचार की "
विचारू की नको ह्या विचारातच ती त्याला विचारते ..
" रागवनार नाही ना .."
तेवढ्यात प्रेमळ आणि आपलेपणाने " नाही ग राणी विचार "
" तुला माझ्या आणि राहुलच्या मैत्रीचा खरोखर काहीचं प्रोब्लेम नाही ...आणि नसेल तर मग का नाही ..कारण ह्या जगातील कुठल्याच पुरुषाला आपल्या पत्नीला एक मित्र आहे ..ही कल्पना सुध्धा सहन होतं नाही ..

   " कॉफी  चा एक गोठ घेत आणि मान हलवत , " बरोबर आहे तुझ म्हणणं ..पण मला नाही आहे प्रोब्लेम तुझ्या आणि राहुल च्या मैत्रीचा ..तुमची मैत्री आहे तशीच राहू देत . जगापासून लपवून का होईना पण ती टिकवून ठेवा . प्रत्येकाच्या नशिबात नसते अशी मैत्री ..ती तुमच्या नशिबात आहे . तिचा आदर करा . "

तो बोलतांना खूपच हळवा झाला होता . त्याच्या ही आयुष्यात असेल का कोणी मैत्रीण हा प्रश्न नकळत नित्याच्या मनात आला आणि तिने सहज विचारलं ..
" तुला पण आहे का ? एखादी मैत्रीण .."


   त्याचे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते . त्याच्या डोळ्यातील पाणी भूतकाळाला आठवत होते . तिने त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला ..आणि त्याच्या डोळ्यातील एक दवबिंदू आपल्या बोटावर झेललं ती त्याला विचारू लागली ..
      " डोळ्यात हे पाणी का ? डोळ्यात आलेल्या ह्या पाण्याचं नक्की कारण काय ? कळू शकेल का तुझ्या ह्या नव्या मैत्रिणीला ...."

त्याने मानेने च होकार दिला आणि आपल्या व्हायलेट मध्ये असणारी एक फोटो कॉपी काढली . आणि नित्याला ती दाखवली ...

" नेत्रा माझी गर्लफ्रेंड ...लग्न करायचं होतं आम्हांला पण हा समाज खूप वाईट नसत होऊ दिलं आमचं लग्न कारण काश्ट ...वेगळ्या समाजाची होती . ती त्यामुळे आम्ही लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाकला होता . पण मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत जपण्याचा निर्धार होता . पण तो ही जपण्यासाठी आम्ही अपूर्ण पडलो .
तिचं लग्न झालं मी तिचा मित्र आहे . हे तिच्या नवऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिचं फ्रीडम लाईफ तिच्याकडून काढून घेतलं . साधं गल्लीत न विचारता जाण्याचीही तिला परमिशन नाही . हे ती जेव्हा माहेरी आली होती.  तेव्हा तिने मला सांगितल . आणि मग आम्ही आमच्या मैत्रीच्या नात्याला पूर्ण विराम दिला .
त्याच्यानंतर तिच्या नवऱ्याची बदली झाली . मग आमचा कॉन्टॅक्ट नाही ...आता मी तिला ओळखू शकेन की नाही. हे ही मला मला माहित नाही. "

प्रत्येक शब्द उच्चारताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते . नित्या निशब्द झाली होती ...
" थॅन्क्स शेखर माझ्या आणि राहुलच्या मैत्रीला सपोर्ट करण्यासाठी ...थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात माझा श्वास बनुन आलात त्यासाठी ..."
असं म्हणत ती त्याला कधी बिलगली हे तिच्याही लक्षात नाही आलं ...त्यांची लव्हस्टोरी आजपासून नव्याने सुरू होणार होती ..किती चड उतार येणार आहेत. देव जाणे .

         ते  कॉफी वैगरे घेतात आणि हॉटेल ब्रीज वर जातात . हॉटेल ब्रीज वर गेल्यानंतर शेखर ला एक कॉल येतो . त्याच्या पोलीस स्टेशन मधून त्याच्या सिनिअर चा त्याला तूर्तास पोलीस स्टेशन मध्ये बोलावण्यात येते . काही खास कारणास्तव ...पण ते कारण काय आहे . ते काही त्याला कळल नव्हत ...
स्टेशन मधून कॉल आल्यानंतर ते लगेच परत निघण्याची तयारी करतात....

तुम्हाला काय वाटतं काय कारण असेल शेखरला तूर्तास पोलीस स्टेशन मध्ये बोलेवण्याच ....आहेत ना वाचण्यासाठी उत्सुक मी पण आहे लिहिण्यासाठी ...
तुम्ही वाचत रहा मी लिहीत राहते ...


 क्रमशः 
पुढील भाग लवकर ...

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...