गोधडी माझी आसुसलेली ,
मायेच्या स्पर्शासाठी व्याकुळलेली ,
उबदार माया तिच्यात दाटलेली ,
तरीही एका कोपऱ्यात ती पडलेली ..
पंचवीस वर्षांपूर्वी कणखर हातांनी ती विणलेली ,
नातवडांसाठी आजीबाई ने जपून ठेवलेली ...
आज पूर्णपणे ती उसवली ,
तरीही कोणी न पाहिली ...
गोधडी माझी आसुसलेली ,
धुडू धुडू धावणाऱ्या पावलांसाठी ,
माया तिच्यातील वाटण्यासाठी ....
आठवण आजीची जपण्यासाठी ,
गोधडी माझी आसुसलेली ....
दुर्गा मते ©®
No comments:
Post a Comment
Comments plz.