नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jul 30, 2022

तूच माझे आयुष्य

तुझ माझ जमेना
तुझ्यावाचून मला करमेना ..

तुझे गोड गोड शब्द ..
भारी वाटतात .....
दुराव्याचे दुवे मनात दाटतात ..

तू एक नंबर राजा ..
ह्या दीलाचा ..
झाला सहारा माझा मनाचा ..

हृदयात गुंजते तुझेच नाव ..
मनी आहे प्रेमाचेचं भाव ..
चल शोधू नव्याने तुझ्या माझ्या प्रेमाचे गाव ..

होऊन जाऊ एकजीव ..
जरी जग करील आपल्या नात्यास ..
तोडण्यास प्रयत्न. ..
तरीही राहू आपण एकनिष्ठ ..
तूच आहेस माझ आयुष्य ..
हेच माझ्या आयुष्याचं अंतिम सत्य ..
दुर्गा मते

काल्पनिक रचना

Jul 29, 2022

सुरुवात ..

आई होण जगातील सर्वात सुंदर अनुभव ..

आई होण्याची चाऊल लागली ..
अल्लड मन मी हरवून बसली ..

त्याची येण्याची आतुरतेने वाट पाहू लागले ..
जणू त्याचे येण्या नेचं माझे आयुष्य सजले ..

त्याच्या सहवासात होऊ लागले सण साजरे ..
त्याच्या चाऊलीने आमचे प्रेम ही वाढले

त्याला माझी काळजी ..
मला माझ्या बाळाची ..
सुरवात सुंदर ही त्रिकोणी परिवाराची ..


आयुष्य आहे ..पुढे जावं लागतं..

आयुष्य आहे ..
आयुष्यात पुढे जावं लागतं ..

पुढे जाताना जुनं सारं विसरून  जाव लागतं .

आठवणीतले क्षण साठवणीत ठेवावे लागतात.

आयुष्याची एक नवी सुरुवात करावी लागते.  

कुणाच्यातरी आठवणीत झुरत बसणं नियतिला आणि ह्या आयुष्याला ही मान्य नसतं . सारं विसरून माझ्या आयुष्याची पाटी कोरीच आहे . असं समजून हसत हसत आयुष्य जगावं लागतं .

तरच आपल्याला आयुष्यात पुढे काय करायचं आहे . हे समजत आणि आपण सकारात्मक दृष्टीने विचार करू लागतो . आणि आयुष्याचा पुढील टप्पा पार करण्यास सज्ज होतो.  

किती दिवस थांबू ...

माझे प्रेम तुला कधी कळणार ...
भावना मनाची माझ्या कधी तुझ्या मनी रुजणार ..

तू कधी रे  समजून घेणार ..
साथ माझी अर्ध्यावर नाही ना रे , सोडणार ..

माझ्या मनी सैर वैर तुझे विचार ....

तुला भेटण्यास कधीचं नसतो माझा नकार ..

किती तुला सांगू माझ्या भावना ..

नाही कळणार तुला कधी माझ्या सवेंदना ..

किती रे तुझी वाट बघू ....

कुठवर तुझ्यासाठी थांबू ..
किती दिवस देवाच्या दारी तुलाच मागू ..


एक स्वप्न माझं ....

मीच बांधला झुला आकाशी ...
घातली सांगड त्याची माझ्या स्वप्नांशी ..

गुजगोष्टी करते माझ्या गर्भातल्या कान्हाशी ..
प्राथर्ना करते देव बाप्पा पाशी ....

सुखी ठेव माझ्या लेकराला ..
अंश माझा लाडका ..भरभरून आशीर्वाद दे त्याला ..

त्याच्या स्वप्नांच्या झुळ्याला देऊ दे , मला आकार ..
ह्या गर्भातून एक गोड स्वप्न होऊ दे , साकार ...

आई आणि बाळ होऊ दे , वीण छान ..
कर आम्हा माय लेकरां चा तूच सांभाळ ...

एक गोड स्वप्न पाहिलं , माझ्या इवलुशा बाळाचं ..
त्याच्या सहवसातच एक नवं , स्वप्न गोंधळ   सुखी आयुष्याचं ..
दुर्गा ..मते ..

Jul 27, 2022

मनात चित्र वसावं..

तू तिथे मी असावं ..
तुझ्या मनात माझ चित्र वसाव .

एकमेकांच्या साथीने नातं हे गठ्ठ रुजावं ..


ओढ तुझी मला असावी ..


प्रेमात तुझ्या माझ्या कमतरता नसावी ..


सदैव तू माझी सावली व्हावी ..


तुला पाहताना रात राणी लाजावी ..


प्रीत ही नव्याने बहरावी ..


प्रेमास ह्या नजर ना कुणाची लागावी ..


माझ्या अस्तित्वाला जोड तुझ्या अस्त्वित्वाची ..
तरच होईल जित आपल्या प्रेमाची ..

ही बात नाही कधी खोटी ठरायची ..


तू तिथे मी असावं ..


माझ्याही मनात सदैव तुझ चित्र वसाव ..
दुर्गा मते

Jul 26, 2022

मनात होता तसाच मिळाला

माझ्यावर खूप प्रेम करतो ..
मला खूप समजून घेतो...
असा माझा राजकुमार मला खूप आवडतो ...
खरचं भाग्य लागतं असा जोडीदार मिळायला ..
आणि ते भाग्य देवाने मला दिलं ..
माझ्या आयुष्याचं सार्थक झालं ..
कृष्णा सारखं जिवापाड प्रेम करणारा ..

रामासारखा एकनिष्ठ राहणारा ..


सत्यवान मला मिळाला ...

प्रत्येक वळणावर साथ देणारा ..


लहान समजून माझे लाड करणारा ..
माझा हट्ट पुरवणारा ..
माझ्या मनात होता अगदी तसाच मला मिळाला ...
दुर्गा मते

Jul 25, 2022

गोष्ट एका राज कुमारीची

कथा एका राजकुमारीची ..
लाडकी राजकुमारी आई वडिलांची ..

खोडकर हसरी , साजरी लाजरी ...
सर्वांच्या हृदयावर तिने निशाणी कोरली ..

आयुष्य तिचं तसचं खूप छान ..
ती तिच्याच विश्वात हरवून बसली होती भान ..

कुमार अवस्थेत स्वप्न पाहिली तिने राजकुमाराची ..

कधीचं नव्हती पाहिली स्वप्न भयानवं त्या रातीची ..


टीपोर चांदण अंगणी गीत गाऊ लागलं ..


राजाने त्याच्या स्वरात सामील होण्यास राजा राणी स बोलावलं .


निद्रा अवस्थेत राजकुमारी स्वप्न रंगवत होती ..


सुखी संसाराची चिन्ह तिच्या अवती भवती फिरत होती ..


राजा राणी गीत गाण्यास गेले ..


त्याच सुरांनी राणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले ..


राजमहालात एक राक्षस शिरला ..


कोवळ्या राजकुमा रीला नरक यातना भोगन्यास भाग पाडलं...
राणीचं आयुष्य अशा प्रकारे उद्ध्वस्त झालं ..

Jul 24, 2022

love you sooo much

आई वडील माझे प्रिय मला ...
आजही आहे मी तुकडा त्यांच्या काळजातला

चुकते जेव्हा मी समजावून सांगतात ..
स्वतःपेक्षा ही जास्त माझ्यावर प्रेम करतात ..

खूप केलय आज पर्यंत माझ्यासाठी ..
अजुनही मी अपूर्णचं आहे त्यांच्यासाठी ..

आजन्म मी ऋणी राहील मी त्यांची ..
कधीचं ह्या नात्याची गोडी नाही संपू द्यायची ..

Support sistem आहेत ते माझी ..

मला ही म्हातारं पणाची काठी व्हायची आहे त्यांची ..


माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे माझी आई वडील ...


आज पालक दीन त्यांना माझा साष्टांग नमस्कार ..


आणि प्रत्येक जन्मी मला हेच आई वडील हवेत ..


म्हणून देवबाप्पा कडे हट्टाने मागणी ..


Love you soo much aai ani baba ..


Stay alwayes happy ...and enjoy your ..😊😊😊😊😊😊😊😊😊

दे ना हात हाती...

छंद लागला जीव गुंतला ...
श्वास माझा तुझ्यात विरगळला ..

तू लावले वेड तुझ्या प्रेमाचे ...
मी ही स्वप्न पाहते ,
तुझ्यातच माझ्या सख्याचे ..

दिसतो तू छान ,
दिसण्याने तुझ्या हेरल  माझं मन ..
तू दिसला नाही जेव्हा ..
करमत नाही मला एक क्षण ..

लागला मला तुझा छंद ..
होऊ दे रे आता तुझ्यातच दंग ..


तुझ्याशिवाय नाव नाही ओठी कुणाचे ..
तुझ्याशीच नाते जोडायचे शत जन्माचे ..

दे ना रे हात हाती ..
मी होईल तुझी जीवन साथी ...

चल बांधूया एकजुटीने ,
ह्या बंध रेशमाच्या गाठी ...
दुर्गा ..


प्रेमाला श्रृंगार चढलाय ...

वाळूचा खोपा किती सुंदर सजलाय. 


तुझ्या - माझ्या प्रेमाला श्रृंगार चढलाय. 


तू मला मी तुला पाहतच राहते ..


वेडे मन वाऱ्यासवे धाव घेते ...


डाव सुखी संसाराचा मांडला ...


तुझा माझा संसार आज खऱ्या अर्थाने थाटला ...


तू कळी मी पाकळी जोडी ही छान जमली ..


अथांग समुद्र किनारी तुझी माझी रास जुळली ..

हळव्या तुझ्या मनाने  , माझ्या मनावर राज्य केले ..
तुला पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडले ..

साधे भोळे तुझे रूप आरसा मनाचा ..
संसार तुझ्यासवे थाटतांना विचार नाही केला मी क्षणाचा ..

काही ही झालं तरी तू हवा , होतास आयुष्यात माझ्या ..
तुझ्यासवे काटेरी वाटा ही भासे गुलाबाच्या पाकळ्या ..

वाळूचा खोपा किती सुंदर सजलाय. 
तुझ्या - माझ्या प्रेमाला श्रृंगार चढलाय. 
दुर्गा मते..

Jul 21, 2022

लग्नाची बेडी ..

प्रतीलीपिने आज अगदी मनातला विषय दिला आहे .

लग्नाची बेडी जेव्हा मुलीच्या पायात बांधली जाते ना , तेव्हा खरोखर मुलीच आयुष्य बंधिस्त होऊन जातं .
तिने माहेरच्यांसाठी  जगावं की सासरच्यांसाठी जगावं हा तिच्या  पुढील सर्वात मोठा प्रश्न असतो . जन्मापासून ते लग्नाची बेडी पायात बांधे पर्यंत आई वडिलांनी तिला तळहातारील फोडाप्रमाणे जपलेलं असतं .

माहेर तिला दुरावल ते घर म्हणजे परक्याच घर . हे  मानन तिला सहज शक्य होतंच नाही ...आणि सासरी तिला तिचं पुढील संपूर्ण आयुष्य काढायचं असतं . त्यामुळे त्याला परक घर समजण्यात काही पॉइंट नव्हता .



असं असूनही सासरी तिला सतत परकेपणा जाणवतो .


आई वडिलांकडे कसं .. मनाची राणी ..जे वाट्टेल ते करायचं . एक भाजी आवडली नाही की , लगेच दुसरी भाजी बनवायची . कोणी बोलेल ही फिकिरच नव्हती.  आणि सासरी अस नाही होतं . एखादी भाजी जरी आवडली नाही तरी , मनमारून खावीच लागते . मग पोट भरो ना भरो ताटात पडेल ते खावचं लागतं ..


एखाद्या वेळेस भांडण करून ती माहेरी आली , की लगेच आई वडिलांना ही तिचा ताण यायला लागतो . कधी कधी तर तिला तिचं मनचं खायला उठतं . तिला प्रश्न पडतो . नक्की लग्नानंतर माझ घर कोणतं ? मी ना धड इकडची राहिले ना धड तिकडची .   ह्या प्रश्ना भवती ती स्थिरावते . प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात आसवांचा बांध फुटतो . आणि


उत्तरांचा रस्ताच ओलाचिंब होऊन जातो .


खरचं तिचं आयुष्य लग्नाची बेडीत अडकल्यानंतर बंधिस्त होऊन जातं .


तिचं तिलाच कळतं नाही ..


मी जन्मले कोणासाठी?


आणि जगतेय कोणासाठी ?


आयुष्य तर लग्नाच्या बेडीत बांधल्या गेलं ..


नियतीने स्वांतत्र्य माझं हिरावून घेतलं .


आसवांच्या वाटेवर आयुष्य माझं थोपवून धरलं ..


मी श्वास तरी का घेतेय ?


आणि अन्नाला तरी का स्पर्श करतेय ??


बंधिस्त बेडीत ह्या का उगी रडतेय ?


श्वास गुदमरत असतांनाही ..


ऑक्सीजन शोधतेय ..


स्त्री जन्म माझा ..
असा कसा मला त्रास दायक ठरला ..
दुर्गा मते

Jul 20, 2022

माझ्या पोटी तुझ्यासारखा पुत्र जन्माला यावा ..


माझ्या पोटी तुझ्यासारखा पुत्र जन्माला यावा ..
माझ्यावर भरुभरून प्रेम करणारा ..
माझ्यासाठी जगणारा आणि मला हसवणारा ..

माझी सावली बनुन सतत सोबत चालणारा ..

माझ्या पोटी तुझ्यासारखा पुत्र जन्माला यावा ..

जरी तुझा अंश नसला ..तरी तुझीच फोटिकॉपी असणारा .

त्याला बघताच तुझी आठवण यावी ...

अपूर्ण राहिलेली पोकळी भरून निघावी ..


माझ्या पोटी तुझ्यासारखा पुत्र जन्माला यावा .

मी सांगेन त्याला तुझ्या गुजगोष्टी ..

त्याचं प्रेम जरा तुझ्याही वाट्याला येऊ देईल ..

आणि तुझ प्रेम तू त्याच्याही वाट्याला येऊ दे ..


देवबाप्पा पाशी एकच प्राथर्ना माझी ..

माझ्या पोटी तुझ्यासारखा पुत्र जन्माला यावा ..

शेजुळ घराण्याचं नाव रोशन करणारा ..
शिवबा सारखा स्वराज घडवणारा ..

माझ्या पोटी तुझ्यासारखा पुत्र जन्माला यावा..
दुर्गा मते

सन्मान ज्ञानाचा


शब्द प्रेमी महिला मंच आयोजित उपक्रम .
नाव - दुर्गा राजु मते ..
साहित्यप्रकार - ओळ काव्य
शीर्षक - ज्ञानाचा सन्मान
दिनांक - २० - 7 - 2021

स्वप्न पाहू भविष्याचे ..
आत्मविश्वासाचे बीज मनी रुजवू ..
यशाला आज हरवू ..
अपयशावर मात करू ..

ज्ञानाचा सन्मान करू .

.स्वप्न पाहू भविष्याचे ..

मोल जपुया शिक्षणाचे ..
पांग फेडूया विद्येचे ..

सामर्थ्य ह्या शब्दास अर्थ देऊ .
शूरवीर आम्ही होऊ ..
स्वप्न पाहू भविष्याचे ..
आदर्श नागरिक होऊ या देशाचे ..

उपकार फेडू काळया आईचे ..
चरण स्पर्श करू मात्या- पित्यांचे ..
संस्कार जपू वाडवडीलांचे  ..
स्वप्न पाहू भविष्याचे ..

स्वप्न उद्यासाठी


नाव - दुर्गा राजु मते ..
शब्द प्रेमी महिला मंच आयोजित उपक्रम ..
साहित्यप्रकार - ओळ काव्य
विषय - स्वप्न पाहू उद्याचे ..

शीर्षक - स्वप्न नव्या पिढीसाठी ..


स्वप्न पाहू भविष्याचे ..


जगण्यास देतील ते बळ नवे ..


स्वप्न मनी रुजण्यास धाडस हवे ..


तरच परिपूर्ण घडेल आयुष्य हे ..


आयुष्यात येऊनी ...


स्वप्न पाहू भविष्याचे ..


आयुष्य वाढवू उद्याचे ..


उज्वल भवितव्य घडवू ..


आपुल्याच अंशासाठी ..


आपण आज झिजू ..


स्वप्न पाहू भविष्याचे ..


सुंदर जग बनवू त्यांचे ..

जे नाही मिळाले आपल्याला ..
ते सर्व काही त्यांना देऊ ...
मनी रेखाटुया चित्र नव्या पिढीचे ..
स्वप्न पाहू भविष्याचे ..

ओळ काव्य मी पहिल्यांदाच ट्राय केलं आहे . चुकिस क्षमस्व ..

Jul 18, 2022

वाढदिवस माझ्या वडिलांचा..

अनोखं नातं बाप - लेकीच ..

ह्या धरतीवर उमललं ...


ऑनलाईन जगातील नातं ..
हक्काचं वाटू लागलं ..

बाप - हा बाप असतो ...
मग  तो ऑनलाईन असो किंवा जन्मदाता ..
त्याच्यासाठी लेकीच सुखच महत्वाचं असतं .
लेकीच्या हस्यापेक्षा त्याच्यासाठी काहीचं मोठं नसतं ..

माझ्याशी नेहमीच गोड गोड बोलणारे ..
कधी कधी माझ्यासाठी छान छान रचना रचणारे ..
मोहन सोमलकर सरांचा आज वाढदिवस ...
म्हणजेच माझे वडील ..

त्यांचा आज वाढदिवस आहे .
त्यांना माझ्याकडुन ही छोटीशी शब्द रुपी शुभेच्छांची भेट ... सर्वांचं मनापासून कौतुक करणारे . मनसोक्त लिखाण करत आपली आवड जपणारे . मोहन सोमल कर. सर ह्यांना वाढदिवसाच्या त्यांच्या लाडक्या लेकी कडून  खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐

Jul 15, 2022

will you friendship with me ..

मित्रा एकदा विचार कर ...
आणि मग निर्णय घे ...
माझ्यावर प्रेम करतोस ना ..
ते सोडून दे ..

आयुष्यभर भर साथ देईन तुझी ..
शपथ आहे माझी ....

तू पूर्वीचं सार विसरून ...
फक्त निखळ मैत्री जपण्याचं वचन दे ..

दुरूनच मला बघून किती दिवस तळमळणार ..
माझ्या आठवणीत किती रे झुरणार .....

माझ्याशी  अबोला कसा रे धरतो ..
माहितेय का ? तुझ्यासाठी किती हा जीव तुटतो ..

अरे डोळे झाकून आजही विश्वास ठेवते तुझ्यावर ..
माहितेय किती प्रेम हे तुझ माझ्यावर ...

म्हणूनचं कधीचं राग नव्हता तुझ्यावर ...

पुन्हा एकदा त्या निखळ मैत्रीसाठी साद घालते ...

Will you friend ship with me ...for a long time .......??

मला फक्त निखळ मैत्रीचं नातं हवंय ..
मैत्री शिवाय दुसरं काहीचं नकोय ..😊😊😊😘😘

झालाच शेवटी त्रिकोण प्रेमाचा ..

किती प्रेम करायचे मी तुझ्यावर ..
आणि तू ही किती करायचस माझ्यावर ..

किती सवय झाली होती. मला तुझी ,
आणि तुला.  माझी ..

एकमेकांशिवाय एक क्षण ही करमायचं नाही ..

तुला माझ्याशिवाय सूचायचंस  नाही दुसरं काही ..

हसायचो ,  खेळायचो , रडायचो , जिवापाड प्रेम करायचो

चोवीस तास एकमेकांसाठी अवेलेबल रहायचो ..

पूर्णपणे मी गुंतले होते तुझ्यात ..

आणि तू ही माझ्यात ...


एकमेकांची साथ देण्यास झालो होतो सज्ज ..

पण बघ ना , नियती कशी विक्षिप्त ..

नकळतपणे एकाच मनाला , दोन जीवाला ..

एकमेकांपासून कायमचे दूर केले ...
आगळे वेगळे हे प्रेमाचे त्रिकोण तयार झाले ..
दुर्गा मते

काल्पनिक रचना माझ्या आयुष्याशी संबधित नाही..

Jul 13, 2022

तिच्यासाठीच रचना ..

कन्यादान सर्वात सर्वात श्रेष्ठ दान ..


प्रत्येकालाच नाही मिळत त्याचा मान ..


ज्या घरात मुलीची शान ..
तेचं कुटुंब वाटतं छान ..

मुलगी म्हणजे भिर भिरणार पाखरू ..

आईचं गोड लेकरू ..


लेकीचे मी किती कौतुक करू ...


तिच्यावर अजुन किती रचना रचू ..


कन्यादानाचे पुण्य लेकिमुळेच पदरी पडते ..


आज तिच्यासाठीच मी ही रचना रचते ...
दुर्गा मते


Jul 12, 2022

गीत प्रेमाचे

बंध प्रेमाच्या सहवासाचे आज उलगडले ..
श्वासा श्वासात तुझे नाव गुंफले .....

       हवे हवेसे वाटू लागले , हे बंध रेशमाचे ..
        स्पर्श ओले ते गोड , प्रेमळ सहवासाचे ...

 जगावेगळे वेड मला तुझे असे ..
की मला स्वतःचे ही भान नसे ..

          अनोळखी जरी तू ओळखीचा भासतो ..
          अल्लड खोडकर माझा लाईफ पार्टनर तू मला खूपच आवडतो ...

तुझ्याशी एकरूप होते , हरवून जाते 
अनोख्या विश्वात मी माझीच न उरते. 

            गोड मला  लागला तुझा लळा . 
            त्यातच आपल्या प्रेमाचा विजय झाला ..

बंध प्रेमाच्या सहवासाचे मला फारच आवडते ...
सख्या तुझ्या प्रेमाच्या गोडव्याचे गीत मी मनापासून गाते
 
दुर्गा मते

Jul 11, 2022

जित मातृत्वाची ..

शब्द प्रेमी महिला मंच आयोजित उपक्रम. 
नाव - दुर्गा राजु मते.. शेजुळ .
दिनांक - 11- 7 - 2022
शीर्षक - जित मातृत्वाची ..

आज अनिकेतने अनघाला चक्क 21 वर्षानंतर पहिल्यांदा बघितलं . स्कूल बाहेर ती कोणाचीतरी आतुरतेने वाट बघत होती .

अनिकेत एकसारखं टक लावून तिच्याकडे बघत होता . तिला मारण्यासाठी काहीतरी शोधत होता . समोरच त्याला नारळ विकणारा माणूस दिसला आणि त्याच्या हातातील  कोयता त्याने हिसकावून घेतला . अनघावर वार करण्यासाठी तो धावणार तेचं ..शाळेतून एक गोड राजकुमारी येऊन अनघा ला बिलगली . अनघाने ही तिचे कितीतरी गोड - गोड पापे घेतले .  जगातील सर्वात सुंदर मातृत्वाच उदाहरण ते वाटतं होतं .

का कुणास ठाऊक त्या दोघींना पाहून अनिकेतच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं . त्याच्या हातातील कोयता ही गळून खाली पडला आणि तो पुन्हा  परतीच्या वाटेने निघाला .

सारे नकळत घडले..

शब्द प्रेमी -  महिला मंच 

आयोजित उपक्रम ..

विषय - अल क ..

दिनांक - 11- 7 - 2022

शीर्षक - सारे नकळत घडले ..

नाव - दुर्गा राजु मते .. शेजुळ ..


तो आज खूप डिस्टर्ब होता . कारण काल त्याच्या राणीने त्याच्याशी  लग्न करण्यास  त्याला नकार दिला होता .


अस्ताव्यस्त होता ,  सतत व्हिवळत  होता . त्याला आधीपासूनचं डोके दुखीचा त्रास होता . आणि आज ती डोके दुखी अतिशय वाढली होती .


तो रागाच्या भरात आणि टेन्शन  मध्ये विहिरीकडे धाव घेऊ लागला . तो विहिरीत उडी मारणार तेच त्याची राणी धावत आली . आणि त्याला बिलगली . घट्ट मिठी मारली आणि रडू लागली ...


त्याने ही रडत रडत तिला घट्ट मिठी मारली ...आणि पुढचा मागचा विचार न करता राणी त्याला जवळचं असलेल्या मंदिरात घेऊन गेली . आणि देवाच्या साथीने तिने त्याला सा जन्म साथ देण्याचं वचन दिलं . 


त्याने ही मग आपल्या नावाचा कुंकवाचा टिळा तिच्या माथी लावला . एक सुवर्ण क्षण ह्या भूतलावर साजरा झाला  . दोन मनाचा सहजीवन .. सहप्रवास  अतिशय सुंदर रित्या सुरू झाला ..

बदल्या ची भावना नको मनी ..

मला बदला घ्यायला नाही ..
स्वतः मध्ये बदल करायला आवडतं ...
स्वतःच अस्तित्व संपायला नाही ..
जपायला आवडतं ...

बदला घेऊन काय करायचं 

का उगी मरताना सोबत पाप न्यायचं ..

हसत खेळत मस्त आयुष्य जगायचं ...
कधी कोणाचं टेन्शन नाही घ्यायचं ..

आयुष्य सुंदर विचारांनी सजवायच असते ..
बदल्या ची भावना त्याच्या मनात नसते ..

मनी स्वप्न रूजायचे , खळखळून हसायचे ..
दिलखुलासपणे आयुष्य जगायचे. .
बदल्याचे क्रूर विचार वेशीबाहेरचं सोडायचे ..
सकारात्मक विचारांनीचं आयुष्य सजवायचे ..
दुर्गा मते

Jul 9, 2022

खरे प्रेम ..

 वेड मलाही तुझे ,
जसे तुला माझे ..
प्रेम हे माझे खरे - खुरे ..

नाही ते खुळे भास रे ..


प्रेम हे खरे खरे ..


दूर देशी राहून तू ..


मनाशी घातली साद ..


का नको करू मी..


तुझ्या प्रेमाची बात ...


तू आहे खास ...


प्रेम हे माझे  खरे - खुरे ..


तू असल्याचा होतो भास ..


क्षण तो सजे खास ..


जुळली दोन मनाची रास ...
रंगलाया प्रेमाचा डाव .
तो ही खऱ्या प्रेमाचा ..
नाही लबाडीचा ..
प्रेम हे माझे खरे खुरे..


Jul 8, 2022

भाषा नजरेची ...

माणूस कोणताही असो त्याला नजरेची भाषा कळायला हवी ...शब्दाची भाषा काय ? सहज कोणालाही कळते आणि उमजते ..कळायला हवी ती नजरेची  भाषा ..

      आपल्या समोरचा व्यक्ती खुश आहे की नाराज ,
फ्री आहे की टेन्शन मध्ये आहे . हे त्याच्या डोळ्यांमध्ये डोळे घालूनच ओळखता आलं पाहिजे ..

कोणत्याही अनोळखी व्यक्तीसाठी किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीचे उदाहरण देण्यासाठी मी हा लेख  लीहत नाही ...


तर हा लेख मी त्या व्यक्तीसाठी लिहत आहे ...


जी आपल्याला आपली  वाटतात ...त्यांचं सुख दुःख हक्काने वाटून घ्यायला आवडत . ते नाराज असले की आपोआप आपण ही नाराज होतो . ते खुश असले आणि जरी आपण दुःखी असलो तरीही , ते दुःख लपवून त्यांच्यासाठी खुश राहण्याचा प्रयत्न करतो ..हा लेख त्यांच्या नजरेची भाषा सहज कळावी ह्या हेतूने लिहत आहे ..

उदाहरण द्यायचं झालं तर आपला life partner त्यांचं दुःख त्याने न सांगताच कळायला हवं ..

अबोल शब्द त्याचे .. त्याच्या नजरेत वाचायला हवे ...

त्याच्या डोळ्यातील ओघळणारे अश्रू प्रेमळ शब्दांनी वेचायला हवे . मन हलके करण्यास त्याचे नकळत कारण आपण ठरावे . दुःख त्याचे आपल्या डोळ्यात बघताच विरावे ...

नजरेची भाषा नजरेला कळावी ...

प्रेमाची कळी आपोआप उमलावी ..

सुखी संसाराची बाग बहरावी ..

आनंदाला भरती यावी ...

नजरेची  भाषा नजरेला कळावी .

प्रेमाची कळी आपोआप उमलावी ..


Written by - durga mate ..shejul ..

प्रथम गुरु

प्रथम गुरु माझे  - आई वडील  ..
सदैव  मी त्यांचा मान राखील ..

     संस्कार त्यांचे मनोमनी जपेन ..

     गुरु माझे , मी देवासमान मानेन ..


भंगवत श्री कृष्णाच्या कृपेने ..


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांची साथ लाभावी ..


सुखाची वेल त्यांच्या आशीर्वादाने बहरावी ...


       गुरु माझे अबोल  साधे भोळे ....


        दिले त्यांनी मला ऋतु अनेक कोवळे ..


         त्यांच्यामुळेच जीवन माझे सुंदर सजले ..


उपकार त्यांचे मी शेवटच्या श्वासापर्यंत स्मरेण ..


चुकीचं पाऊल पडताना त्यांचे  संस्कार आठवेण ..


    प्रथम गुरु माझे आई वडील ..


    सदैव  मी त्यांचा मान राखील ..

Written by - mate  durga ..shejul .
शब्द प्रेमी महिला मंच ..
उपक्रम ..विषय - गुरु ..

Jul 7, 2022

अबोल मनाची व्यथा..

काही आठवणी खूप गोड असतात ..
त्या आठवणीं सारखीच काही माणस ही ,
खूप गोड असतात ......
विसरेन म्हणते तरीही विसरता येत नाही ..

त्याचा हरवलेला सहवास आजही हवा हवासा वाटतो ..

बोलण न होता ही संवाद होतो ..


मनातल्या मनात तो व्यक्ती रोज आठवतो ..
मनमोकळ्या गप्पा मारतो ..
क्षण भर का होईना ,
त्याचं  माझ्या आयुष्यात अस्तित्व दर्शवतो...

मनावर तो नकळत अधिराज्य गाजवतो..


तो ही आठवतो आणि जुने क्षण ही आठवतात ..

मग हलकेच मनात असंख्य प्रश्न दाटतात ..

हळव्या ह्या मनाला आजही स्वप्न पडतात ..

स्वप्नात त्या ,  त्याच्या - माझ्या भेटीचे सोहळे सजातात .

सोहळे सजतांना भविष्याचे स्वप्न ही रंगतात ..

आठवण ही गोड व्यक्तीही गोड ..

तरीही आयुष्यात येऊन करावीच लागली तडजोड ..


ती ही कायमचं त्याला विसरण्याची ..

त्याचं नाम निशाण कायम चं मिटवण्याची ..


आज परीक्षा आहे . ह्या अबोल मनाची ...

जिद्द आहे मनी कठोर परिस्थिती योग्य रित्या पार पाडण्याची ...
दुर्गा मते

जोडीदार

आयुष्याचा जोडीदार दिसायला सुंदर नसला तरी चालतं ..
तो सुंदर असायला हवा ...
त्याच्या सोबतचा हर एक क्षण साजरा व्हायला हवा ..
आपण नाराज असलं ना की ,
त्याला आपल्या नाराजगी दूर करण्याचा 
पासवर्ड माहीत हवा ..
प्रेमाळू कमी विश्वासू अधिक हवा ..
आयुष्याचा जोडीदार दिसायला सुंदर नसला तरी चालतं ..
तो सुंदर असायला हवा ..
सुख दुःख त्याला वाटून घेता आलं पाहिजे ..
त्याच्या घासातील एक घास आपल्यासाठी ही राखून 
ठेवता आला पाहिजे ..
आयुष्याचा जोडीदार दिसायला सुंदर नसला तरी चालतं . 
तो सुंदर असायला हवा ..
written by - durga mate ..shejul .

विविध रंग आयुष्याचे ..


  
    रिते रिते आभाळ ..वाटते हवे हवे ..
     भरलेल्या आभाळाचे थेंब झेलण्यास मन हे मोहे ..
 

विविध रंग ह्या आयुष्याला ....

निसर्गाचे देणे लाभले ह्या जीवनाला ...


        डोंगर  - दऱ्यात , मिळे अफाट सुख ...

  गंध फुलांचा दरवळतांना जाई विरून दुःख ..


कोकिळेचा कुऊ -  कुऊ साद घाली मनाला ..

श्रावणात ह्या पावसाच्या सरी , देई आनंद  ह्या देहाला ..


         मातीचा ओला स्पर्श देते आईची माया ...   

  खुले आभाळ हे देई बापाची छाया ..


विविध रंग आयुष्याचे बघतांना .....

आनंद वाटे ह्या मनाला ....

साष्टांग नमस्कार ह्या निसर्गाला ...

पूर्णत्व लाभले त्याच्याच मुळे ह्या आयुष्याला ..

दुर्गा मते....

Jul 6, 2022

बंध नाची करूया राख ...

कुठेतरी एकांतात घर बांधूया दोघांचं ..
स्वप्न सजुया तुझ्या माझ्या मिलनाच ..

    नियतीच्या विचारांना लावूया कुलूप .. 

   तरच ह्या  प्रेमाला येईल हुरूप ..


बंधनाच्या जोखंडातून मुक्त होऊया ..

बंधनमुक्त आयुष्य आपण जगूया ..


        जबाबदाऱ्याचं कुंपण आपण तोडून टाकू ..

      फक्त एकमेकांसाठीचं आपण जगू .....


साऱ्या बंधनांना तडीस नेऊ ...

देण्यास एकमेकांस साथ ..पुन्हा ..पुन्हा जन्म घेऊ ..


           तुझ्या सहवासात आयुष्य सजल यं खास ...

    नियतीने आपल्यावर लादलेल्या बंधांनाची आज करूया राख ..


Written by - durga mate

Jul 5, 2022

बांधला मी झुला भक्तीचा ..

देवाच्या दारी बांधला मी  झुला भक्तीचा ...

विसर पडला मला सुख दुःखाचा ....


      तल्लीन झाले नामस्मरणात भक्ती भावाने ..   समाधानी मी काहीचं कमी पडू दिलं नाही देवाने ..


संघर्षावर मात करण्याचे बळ दिले ..

स्वाभिमानाने जगण्याचे छंद मी जोपासले ..


         स्त्री बिजात मी अंकुरले ...

म्हणून आदर्श स्त्री होण्याचे स्वप्न मनोमनी पाहिले .

 देव बाप्पाने ते स्वप्न ही पूर्ण केले ...


चुकीचे पाऊल ही मी चालले ...

तोल जातांना मग स्वतः स सावरले ..

 वेळोवळी स्वतःला सिद्ध केले.. 

 

 देवाच्या दारी बांधला मी झुला भक्तीचा ...

   सुरळीत चालू आहे  प्रवास माझ्या आयुष्याचा ..

 

 मनाच्या गाभाऱ्यात अखंड तेवत ठेवेन झुला भक्तीचा ..

कधीही विसर पडू देणार नाही नामस्मरणाचा ..


Written by - durga mate ..shehul ..

ओठी हसू असावे ..

मनाला एक मोकळीच हवी जगण्याची ..
साथ हवी क्षणो क्षणी बहरणाऱ्या हास्याची ..

उरात हजारों स्वप्न साचलेली हवी ..
जगण्याला उमेद देईल ती नवी ..

परा कोटींचे कष्ट करण्याची जिद्द हवी अंगी .
तरच नाव रोशन होईल ह्या जगी ..

सुख दुःख समान वाटायला हवं ...
ह्या लाटेवर स्वार होऊन शोधायला हवं काहीतरी नव ..

सू नसावे डोळ्यांत  हसूच असावे ,  ओठात ..
तरच दोन घास सुखाचे जातील पोटात ..
Written by - durga mate ..shejul


Jul 4, 2022

गोड लव्हस्टोरी

काय नाते तुझे माझ्या श्वासांशी ..
कशी मला ओढ लागली तुझी ...

ही प्रीत नवी नवी अबोल झाली. 
स्पंदनांची चाउल उरी दाटली ..

   वेड लागले मला तुझे ..

  तुझ्या नावी केले मी श्वास माझे .

  बास झाले हे तुझ्या माझ्या तील अंतर ..

अबोला सोड आधी ..माझ्याशी भांड नंतर ..

      मोरक मोरक तुझ हसणं वेड लावत ..

   माझ्या अश्रुंशी मग  गीत गात ...

तुझ इग्नोर करणं रागाचा पारा चढवतो ..

प्रेम तुझ नखरे माझे हसत हसत झेलतो ..

त्यामुळेच तर तू मला आवडतो ..

माझ्या आयुष्यातील सर्वात important घटक वाटतो ..

दुर्गा मते

Jul 3, 2022

पावसाने पाठ फिरवली..

पावसाने फिरवली पाठ ..
शेतकऱ्यांच्या नशीबाची पाटी झाली सपाट ..
कोरड्या दुष्काळाची आली लाट ..

बळीराजा  बघू लागला वाट ..
थेंब थेंब बरसणाऱ्या पावसाची ..
खात्री त्याला ,  बदलेल ती रेखा त्याच्या नशीबाची ..

निराश झाले वाट बघणारे डोळे ..
पापण्यांच्या सभोवताली तळे साचले ..

ज्याच्या भारोश्यावर ,
धरणीच्या कुशीत रक्ताचे पाणी आटवले ..
त्या आभाळाने ही डोळे मिटून घेतले ..
अशा ह्या भीषण परिस्थिती ने हुंदके दाटून आले ..

उभ्या पिकांनी अखेर मृत्यू पत्करला ..
बळीराजाला साष्टांग नमस्कार केला ..
त्यांच्या आयुष्याचा प्रवास त्यांनी तिथेच थांबवला ..
Written by - durga mate - shejul ..

नको पुन्हा मैत्री...

नातं होतं खुळ्या मैत्रीचं .
हक्काचं नसलं तरी होतं  जिवाभावाचं ..

ओढ होती नात्यात ....
शेवट पर्यंत नातं टिकवण्याची कमिटमेंट होती मैत्रीत. 

मन मोकळं करण्यासाठी हक्काचं ठिकाण होतं ..
नातं मैत्री पलिकडे गेलं अन् सगळचं वीचकटल ..

मैत्रिने हळू हळू शत्रूच रूप धारण केलं  .
निखळ मैत्री हरली शत्रुत्व मात्र जिंकल ..

मी ही मग  स्वतःला वचन दिलं ...
पुन्हा कधीचं कोणाशी मैत्री नाही करायची...

पुन्हा मैत्रीतून  शत्रूत्वाची लाट स्वीकारायची ..


दुर्गा मते ..


काल्पनिक रचना माझ्या आयुष्याशी संबधित नाही ..

Jul 2, 2022

जन्म दिला म्हणजे मातृत्व पूर्ण नसतं ..

मी हा लेख स्वअनुभवावरुन डोळ्या समोर पाहिलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीची प्रचंड आलेली चीड ह्या
कसोटीच्या आधरावर लिहत आहे ....

जन्म दिला म्हणजे मातृत्व पूर्ण होतं नसतं ..

आईचं कर्तव्य फक्त त्याला नऊ महिने नऊ दिवस आपल्या गर्भात वाढवून त्याला नऊ महिन्यानंतर व्यवस्थित रित्या जन्म देऊन पूर्ण होतं नसतं तर , त्याचं व्यवस्थित रित्या पालन पोषण त्याच्यावर चांगले संस्कार देऊन पूर्ण होतं असतं ...


बाळ जन्माला यायच्या आधी जी आई आपल्या बाळासाठी सुंदर सुंदर स्वप्न बघते ना , तिचं आई तिचं मातृत्व चोख बजाऊ शकते ..

       द्यायचा म्हणून द्यायचा बाळाला जन्म त्याला काहीही महत्व नसतं . ते बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं व्यवस्थित रित्या संगोपन करण सर्वात जास्त महत्त्वाचं असतं .

एक आदर्श आईचं एक आदर्श बालक घडवू शकते . एक आदर्श बालक घडवायचा असेल तर , आधी एक आदर्श आई घडवावी लागेल . तरच कुटुंब सुंदर वाटेल कुटुंब सुंदर वाटता वाटता हे जग सुंदर वाटेल ..


मी माझ्याच कुटुंबात पाहिलेली सत्य परिस्थिती आहे. 


आईने बाळाला जन्म दिला . कधीचं तिने त्याला हाताने जेवू घातले नाही .. वेगवेगळे पदार्थ आवडीने खाऊ घातले नाही. कधीं त्याची शी धुतली नाही ;  की कधी त्याला पाटीवर  " अ आ इ इ " गिरवायला शिकवलं नाही ...


देवासमोर कधी "  शुंभ करोती कल्यांनम " म्हणायचं असतं   . ते ही त्या बाळाला माहीत नाही .

बाळ ही शहाणं ते जेवण करायचं की त्याला मोबाईल हवा . काम सांगितल की त्याला पैसे हवे . कधी  आईने त्याला शिकवलंचं नाही . मोबाईल आणि पैसे लहान बाळाने वापरू नये .. बाळाला शेवटी मोबाईल आणि पैशाचं प्रचंड वेड लागतं व्यसन लागतं ..आई आता त्याच्या व्यसनाला कंटाळली बाळाने ऐकल नाही . जास्त हट्ट केला की ,  आई फक्त धनाधन मारते . मार खाऊ खाऊ ही ते बाळ लापट झालं . वेदना म्हणजे नक्की काय ? ते त्याला उमजेनाचं ..मानसिक संतुलन पूर्णपणे हरवलं ..आई एक राक्षस अस चिन्ह त्याच्या डोळ्यांसमोर फिक्स झालं .


आईची सावली जरी नजरेस पडली तरी त्याच्या दोन्हीं डोळ्यातून प्रचंड अश्रूधारा वाहू लागतात . ईवलुशा त्या कान्हाच निरागस बालपण नरक यातना भोगण्याच्या ही पलिकडे झालं ...


अशी असावी का ? आणि मुळात अशा आई ने  एका निरागस बाळाला जन्म चं का द्यावा ..?  हा प्रश्न मला पडला आणि म्हणून मी हा लेख लिहिला ..


आई " प्रेम , माया , ममता , करुणा , जिव्हाळा ह्याचं प्रतीक असते   . तिच्या त्या प्रतिकावर कुठल्याच बाईला अधिकार नाही हे , कलंक लावण्याचा .


जर तुम्ही आई म्हणून परिपूर्ण होऊ शकत नसाल ना तर तुम्ही आई न  होता . वांझ राहिलेलं कधीही चांगलं . कारण तुमच्यातील एक राक्षस आई दुनियेतील हजारों चांगल्या आईंना वाईट ठरवते ..


मी हा लेख कोणाचेही मन दुखावण्याचा हेतूने लिहिलेला नाही . वाईट आयाना चांगला सल्ला देणं हाच माझा प्रामाणिक प्रयत्न होता . हे कोणाच्याही वयक्तिक आयुष्याशी संबधित नाही . ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी ..

दुर्गा मते - 

आपल्या नात्यात नाही काही भवितव्य ..

आता  मला तुला फसावायच नाही ..
तुझ्या आठवणीत गुरफटायचं नाही ..

सुरू झालेला प्रवास सुरळीत करायचा ..
तुझ्या अस्तित्वाचा गुंता कायमचा मोडीत काढायचा ..

ना तुझ्या प्रेमळ स्पर्शाला मोहायचं ..
ना तुझ्या गोड गोड बातांना भुलायच ..

मी मनोमनी ठरवलंयं तुला कायमचं विसरायचं ..

क्षणो क्षणी वचन दिलंय स्वतःला ..

तुझ्या आयुष्यात पुन्हा नाही परतायचं ..

नको उगी मोहात पाडू मला ..

नको एवढं प्रेम करुस  ,

तुला विसरून जाण्याची संधी दे रे मला ..

का कळत नाही हे तुला ..

झालेय मी आयुष्यात एंगेज ..
नको देऊ आता कुठल ही सजेशन ..
होऊ दे एक्झिट तुझ माझं रिलेशन ..

ते ही कायमचं ज्या नात्याला काही भवितव्यचं नाही हे , ते नातं जपून काय फायदा ...त्या पेक्षा नकोच एकमेकांध्ये अडकन ..उगाच इथे गूंतन..
दुर्गा मते .. शेजुळ ..

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...