काही आठवणी खूप गोड असतात ..
त्या आठवणीं सारखीच काही माणस ही ,
खूप गोड असतात ......
विसरेन म्हणते तरीही विसरता येत नाही ..
त्याचा हरवलेला सहवास आजही हवा हवासा वाटतो ..
बोलण न होता ही संवाद होतो ..
मनातल्या मनात तो व्यक्ती रोज आठवतो ..
मनमोकळ्या गप्पा मारतो ..
क्षण भर का होईना ,
त्याचं माझ्या आयुष्यात अस्तित्व दर्शवतो...
मनावर तो नकळत अधिराज्य गाजवतो..
तो ही आठवतो आणि जुने क्षण ही आठवतात ..
मग हलकेच मनात असंख्य प्रश्न दाटतात ..
हळव्या ह्या मनाला आजही स्वप्न पडतात ..
स्वप्नात त्या , त्याच्या - माझ्या भेटीचे सोहळे सजातात .
सोहळे सजतांना भविष्याचे स्वप्न ही रंगतात ..
आठवण ही गोड व्यक्तीही गोड ..
तरीही आयुष्यात येऊन करावीच लागली तडजोड ..
ती ही कायमचं त्याला विसरण्याची ..
त्याचं नाम निशाण कायम चं मिटवण्याची ..
आज परीक्षा आहे . ह्या अबोल मनाची ...
जिद्द आहे मनी कठोर परिस्थिती योग्य रित्या पार पाडण्याची ...
दुर्गा मते
मी केलीये comments
ReplyDeleteखूप छान लिहिलंय..👌