नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 31, 2022

स्वागत नव वर्षाचे ...

निरोप सरत्या वर्षाला..
केले खास आज ..
येणाऱ्या वर्षाची लागली आस ..

गेली वर्षभर जपलेली नाती ,
पुढेही जपायची ..

येणाऱ्या वर्षी अजुनही काही नवी नाती जोडायची. 


आणि ती ही आयुष्यभर जपायची ..


मनातील क्रोध - लोभ - द्वेष ..


सारे संपवून टाकायचे ...


अवती - भवती फक्त फक्त प्रेमाचे जाळे विणायचे ..
येणाऱ्या वर्षाचे हसत - हसत स्वागत करायचे ..

ज्यांनी ह्या वर्षी मैत्रीचा हात सोडला ..
हात नाही केवळ ..मनाचा एक धागा तोडला ..
त्यांना पुन्हा कधीचं मैत्रीचा हात नाही द्यायचा ..
येणाऱ्या वर्षी जरा स्वतः मध्येही बदलाव करायचा ..

इगो बाजूला सारायचा ..
पण स्वाभिमान मात्र पुरेपूर जपायचा ..
येणाऱ्या वर्षाचा प्रवास आनंदाने सुरू करायचा ...

Happy new year all of you

Written by - durga mate

Dec 30, 2022

आशीर्वाद दे ...

हा प्रवास हळव्या क्षणांचा ..
नव्या आयुष्याचा ..
नव्या प्रवाहाचा ..
देवा सुरेल होऊ  दे ..

संकट आली तरी चालेल ..
मी हिंमतिंने त्यांना झेलेन ..
भक्तीत तुझ्या समरस होऊन ..
देवा तू जगण्याचा विश्वास दे ..

चेहऱ्यावरील हास्य ,
नाही गमवायच मला. .
सांगते तुला...
सोनेरी आयुष्यात माझ्या. 
देवा तू आनंदाची पहाट फुलू दे...

वादळ वाऱ्यांशी संगत करायची. 


सत्याची मला कास धरायची ..


निर्भय पने जगण्याचा वसा घ्यायचा...


गरजवं ताला आदाराचा हात द्यायचा.....

देवा तू माझ्यातील माणुसकी अखंड असू दे. 

देवा तू मला ...
माझी स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ,
भरभरून आशीर्वाद दे ..

Written by - durga mate

Dec 29, 2022

सारथी.

तू मला पर्सनल स्पेस दिली ..
मी तुझ्यातील क्वालिटी ओळखली ..
तिथूनच तर खरी सुरुवात झाली मैत्रीला ..

निखळ मैत्री ...
हवा हवासा वाटणारा संवाद ..
एकमेकांमध्ये मुरणारा गोड सहवास. 

किती सुंदर ना ..
ते क्षण मी तुझ्यासवे जगलेले ..
आयुष्यभर ही मैत्री जपण्यासाठी किती त्यागले. .
हे फक्त तुलाच माहीत. 

आज ही हवा हवासा वाटतो ..
तो गोड संवाद ..
अजुनही हवासा वाटतो तुझा सहवास .


एकदा नव्याने पुन्हा ...
द्यावासा वाटतो तुला मैत्रीचा हात ..

तो ही आयुष्यभरासाठी अर्ध्यावर सोडण्यासाठी नाही. 


तू ही धरशील ना माझा हात घट्ट पकडून ..
आणि होशील ना साथीदार माझ्या मैत्रीचा ..

जगुनी पहा ..

आनंदाने जगण्याची आस ..
देवाने आयुष्य दिलय खास ..
मग का व्हावा दुःखाचा भास ..
प्रत्येक क्षण आहे खास ..

तू जगुनी पहा ..


आभास मान येणाऱ्या दुःखाला ..


विनवणी नको करू सुखाला ..


तू येना आयुष्यात ..


म्हणून रडगाण नको गाऊ त्याच्यापाशी ..


सार सोडून दे त्या ईश्वरापाशी ..


हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही ..


जाणून घे ..


जीवनाचे सार समजून घे ..


कितीही येऊ देत दुःख ...


किती होऊ दे ..


संकटाचा मारा ..

तू फक्त प्रामाणिक पने आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न कर ...ह्या सर्वांग सुंदर आयुष्याला मनातून आपलसं कर . तुझी तुलाच गोडी वाटेल .. आयुष्य हे सर्वात सुंदर होऊन जाईल ...

Written by - durga mate

Dec 27, 2022

अनमोल क्षण

अनमोल क्षण ..
मनाच्या कुपीत जपून ठेवले ...
जपून ठेवलेल्या क्षणांना

आठवणींचे तोरण बांधले ..

सुख - दुःख ..
दोन्हीही सवडीने जपले ..
प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकले ..

म्हणून ते सारेच क्षण अनमोल ठरले ..

जीवन जगताना ..

फक्त आनंदच नाही वेचला ..

ह्या हळव्या मनाने ..

दुःखाच्या झळा ही सोसल्या ..

सोसलेली प्रत्येक झळ ..
हवी हवीशी वाटू लागली ..
कारण तिचं झळ जगण्याची प्रेरणा देत गेली ..

त्यामुळे माझ्यासाठी ..

प्रत्येक क्षण अनमोल ठरले ..

त्यानीच माझे सुंदर आयुष्य घडवले .


Written by - durga mate

Dec 26, 2022

लेक माझी खास...

काव्य पुष्प कवी कविता ..

दिनांक - 26 - 12 - 2022

विषय - चित्र चारोळी

फुलपाखराचे पंख लेवुन ..
हाती पुस्तक घेऊन
मनी स्वप्न रंगवले माझ्या परीने ..
ते साजरे करण्यास मी सामील झाले आनंदाने ..

एकनिष्ठ राहिली ती तिच्या द्येयाशी ..

मी ही प्रामाणिक राहिले माझ्या मातृत्वाशी ..

तिला माझ्या कुशीची ऊब दिली ..

तिने मला खूप माया लावली ..

तिने स्वप्न साकारले ..

जे होते मी पाहिलेले ..

माझ्या डोळ्यांत सामावलेले .

तिने तिच्या मनी रुजवले...

ती एक सुरेल सांज ..

माझ्या आयुष्यातील खुललेकी पहाट ..

आनंदाची सुंदर बाग ..

अशी माझी लेक खास ..

Written by - durga mate

Dec 25, 2022

हॅपी ख्रिसमस....

साष्टांग नमस्कार माझा येशू ख्रिस्ताला ..
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा ..
माझ्या बांधवांना ..

सांता क्लॉज कडे आज ..
निरोगी आयुष्याची मागणी करू ..
तुझ्यावर आम्ही भरभरून प्रेम करू .. सांता क्लॉज .
असं आश्वासन त्याला देऊ .

लहान मुलांना सांता क्लॉज बनुन ..

त्यांच्या आवडीच एक गिफ्ट देऊ ..
एक ख्रिसमस ट्री purchuse करू
खूप सुंदर रित्या ख्रिसमस डे सेलिब्रेट करू. 

तुम्हाला सर्वांना ख्रिसमस च्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐

Written by - durga mate

Dec 24, 2022

आयुष्य बहरून गेले

तुझ्या मिठीला सारी स्वप्न व्हाहीली ..
प्रेम वेल ही थोडी थोडी करत वाढली ..

दुःख माझे हरून गेले ..
मी तुझ्या आयुष्यात पाऊल टाकले ..
सुखचं फक्त पाहिले ..

छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधले ..
भाग्य माझे उजळले ..
अंगणात चांदणे तुझ्या चाऊली ने शिंपले ..

भास सारे खरे झाले ..
आभासी जग हे ,  मजला आवडू लागले.  
आयुष्य माझे बहरून गेले ..

Written by - durga mate

प्रेम ऋतु

ना ठाव मजला ..
काय नाव आपल्या नात्यात ..

तरीही नातं भरलं हे मनात ..

आलास तू आयुष्यात ..
गेला कारभार बदलून ..
मी जगू लागले मनापासून ..

प्रेम ऋतु बहरू लागला ..
जीव गहिवरून आला ..
सख्या , हा जीव फक्त तुझ्यावरच जडला ..
Written by - durga mate

Dec 22, 2022

शीर्षक - निरागसता खूप सुंदर असते..

काव्य पुष्प कवी कविता ..

दिनांक - 22- 12- 2022

विषय - गुंता

प्रकार - अलक ..



त्यांच्या लग्नाला जवळपास महिना झाला असेल , तरीही त्यांच्यात नवरा बायकोच तर नातं नव्हतंच पण साधं माणुसकीचं ही नातं नव्हत . तो खूप समजूतदार आणि ती आपलंच खरं ठरवणारी ..
त्याच्यात ती आधीच कोणावर तरी खूप प्रेम करत होती.  आज तिचा लास्ट इअरचा लास्ट पेपर होता . 

तिचा नवरा तिची बाहेर वाट पाहत उभा होता . आणि तिने मनातून ठरवलं होतं.  आज पेपर संपल्यानंतर प्रियकरा सोबत पळून जायचं . पेपर सुटला ठरल्या प्रमाणे ती मागच्या दिशेने जाऊ लागली . 

जाण्याआधी तिला दिसला तिच्या नवऱ्याचा निरागस चेहरा त्याच्याकडे बघता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली . 
आणि पळून न जाता त्याच्याकडे धावत आली आणि  त्याच्या मिठीत शिरली ..

Written by - durga mate

Dec 21, 2022

बंध हे अतूट

बंध हे अतूट ..
तुझे माझे ..
सत जन्माचे नाही ..
आहे गत जन्माचे ..

बंध हे अतूट ..
खुले मनाचे द्वार ..
प्रेम स्पर्श होई हळुवार ..
हलक्या स्वप्नांवर होई मी स्वार ..

बंध हे अतूट ..
दोन जीवांचे होईल मिलन ..
दोन देहाचा एक देह ..

अनमोल असे तो संगम ..

बंध हे अतूट ..
होई स्वप्न सारे पुरे ..
सख्या तुझ्या सवे ..
नव्या आयुष्याचे गीत मी गाते ..
मग बंध हे होई अतूट ..

Written by - durga mate

बकेट लिस्ट

बकेट लिस्ट माझ्या स्वप्नांची ..

त्याला जोड माझ्या ईशा - आकांक्षाची ..


घर सजलेले आनंदाने ..


डोळे तृप्त झाले समाधानाने ..


जे हवं ते सारं मिळालं ..


बाकी न काही राहिलं ..


तरीही बकेट लिस्ट मात्र अधुरी ..


आज मांडते तुमच्यासमोर माझ्या इच्छा - आकांक्षांची यादी पुरी ..


1 ) aeroplane सफर .


२ ) कोल्हापुरच्या लक्ष्मी देवीला आणि ज्योतिबा च दर्शन
3 ) काही दिवस पुण्यात शिफ्ट व्हायचं ..
4 ) आयुष्यातील कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 30 ते 35 वर्ष दुसऱ्यांसाठी जगायचं . मग पूर्ण पने स्वतःसाठी जगायचं ..
5) थोडं सोशल वर्क करायचं ..
6 ) जे जगायचं आणि अनुभवायचं बाकी राहिलं . ते मन भरून जगून घ्यायचं ..अनुभवून घ्यायचं ..

Written by - durga mate

Dec 20, 2022

आत्म हत्या करणे पाप

आत्म हत्या करण हे पाप ...
नाही त्यासाठी माफी देवाच्या दारी ..
जो पर्यंत त्या जीवाची खरी वेळ येत नाही .
तो पर्यंत तो आत्मा भरकटच तचं असतो .
जीवन यात्रेतील यातनेतून सुटूनही पुन्हा .
पुन्हा मरण यातने त अडकत असतो ..
त्यामुळे कोणीही आत्महत्येचा विचार न करन चं 
योग्य ठरेल ..

आयुष्य हे खूप सुंदर आहे ..ते आनंदाने जगावं .

Written by - durga mate

Dec 15, 2022

ते भास ..

उमलले मनी भास ..
ते भास ...
काळजाच्या कोपऱ्यात जपले खास
ते भास ..

नव्या नात्याची सुरुवात ..
ते भास ..
उमलले अंतरात ...
जपले हृदयाच्या मनोऱ्यात ..
ते भास ..

गालावर चढे लाली ..
ते भास ..

घेऊन येई आनंद दारी ..


मी जाणार सख्याच्या घरी ..


मग होई पूर्ण ..


ते भास ..


सखा देई हातात हात ..


नव्या भासाची ती सुरुवात ..
फुले कळी अंतरात ..
दोघे खुश ह्या मिलनात ..
दोघांनाही होई एक भास ..
खास ठरे ..
ते भास ..

Written by - durga mate

प्रेम एक धोका

काव्य पुष्प कवी कविता .

दिनांक - 15 - 12 - 2022

विषक - ओढ

साहित्य प्रकार अलक .

शीर्षक - प्रेम एक धोका ..

तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं . त्याच्या म्हणण्यानुसार घरून पळून जाण्याचा निर्णय तिने कठोर मनाने घेतला होता ....

त्याच्या सांगण्यानुसारचं तिने घरून दागिने पैसे चोरुन आणले होते.  त्याने खूप हुशारीने तिच्याकडे असणारे दागिने आणि पैसे आपल्या ताब्यात घेतले ..आणि तिला सांगितले मी येईपर्यंत माझी ह्याचं स्टॉप वर वाट बघत उभी रहा ..


ती बिचारी तो येईल ह्या ओढीने त्या स्टॉप वर गेली दोन दिवस त्याची वाट पाहत उभी होती...पण तो काही आला नाही ......ती त्याची वाट पाहून पाहून थकली .  आई वडिलांच्या प्रेमाच्या काळजीच्या ओढीने पुन्हा घरी परतली ..

Written by - durga 

Dec 14, 2022

आयुष्यात रंग भरले

काव्य पुष्प कवी कविता ..

दिनांक - 14 - 12 - 2022

विषय - रंग आयुष्याचे ..

शीर्षक - आयुष्यात रंग भरले

खूपच सुंदर विषय काव्य पुष्प ग्रुप ने दिलाय ..

आयुष्यात मी रंग भरले ...
कलेचे माणुसकीचे ..आनंदाचे ...सोसले चटके अनुभवाचे . गिरून घेतले कोऱ्या पाटीवर बोल अनुभवाचे .. सत्याच्या मार्गाने जीवन जगते ..हिंसा 
ह्या शब्दाचाही तिरस्कार आहे.  ना अन्याय सहन करते . ना कोणाला सहन करायला  लावते ..अन्याय विरूद्ध लढा द्यायला हवा . तरचं सुखी जीवनाचा मार्ग गवसेल नवा . समजावून सांगते ..

आयुष्यात रंग भरले ..स्वतंत्र विचार मांडले .. आगळे- वेगळे स्वतःचे अस्तित्व निर्माण केले ..मनासारखे मनाप्रमाणे मी आयुष्य जगू लागले ..

Written by - durga mate

भक्तीचा रंग ..

फुले मनी भक्तीचा रंग ..

राऊळात शोभे फुला - धुपाचा गंध ..

देई जगण्याला अर्थ ..


भक्तीचाच रंग ...


सांज  होई ,


तुळस ही वाट पाही ..


उदबत्तीच्या गंधाची ..


मी शुभम करोति म्हणण्याची ..

सखी खास माझी ..
तुळशी माता ..
शिकवते सारं जीवनाचे ..
गोड गाणे भक्ती गीताचे ...

भक्तीचा रंग ..
आने  आयुष्याला गंध ..
प्रत्येकाने जोपासायलाचं हवा भक्तीचा रंग ..

Written by - durga mate

अबोल स्पंदने ..

हृदयाची अबोल स्पंदने ..
तुझ्यासाठी राखून ठेवली ..
प्रीत मनी तुझ्यासाठीचं जागली .
आज वर मी तुझ्यासाठी त्यागली ..

वाट बघायची राऊळा

त ..
स्वप्नं रंगवायची मनात ..
उपास तापास करायची देऊळा त ..


हरवून जायचे अनोख्या विश्वात ..

हरवलेल्या जगात एकटीच भटकायचे ..
का कुणास ठाऊक कोणासाठी ..
पण ; खूप मटकायचे ....

निराशा पदरी पडली की मात्र खूप रडायचे ..

स्वप्नांच जग फसव असतं ..
तिथे काही खरं होणार नसतं ..
मग स्वतःला चं समजावायचे ...
नव्या उमेदीने पुन्हा श्वास घेण्यास उठायचे ..

Written by - durga mate

Dec 13, 2022

मोबाईलचे राज्य आले ..

मोबाईल ने हिरावून घेतली नाती गोती ..
आज काल सगळेच ,
स्टेटस अन् reels बघण्यातच बिझी ...

आज काल गप्पांची मैफिल बघायला मिळत नाही ,.

की कुठे सारीपाठाचा खेळ रंगत नाही ..


कारण ,


लोकांना मोबाईल शिवाय सुचत नाही दुसरं काही ..


अबोल झालीत मन ...


हरवून गेले आनंदाचे क्षण ...


मोबाईल नेचं सुरू केले राजकारण ..

माणसाला माणसापासून हिरावून घेतलं ..
जसं हिरावून घेतलं तसं जवळ ही केलं ..
सातासमुद्रापलीकडे असलेल्या व्यक्तीशी ही बोलू शकतो ..
त्याच्याशी जवळीक साधण्याचा नादात ..जवळ असलेला व्यक्तीला अंतर देऊन बसतो ..

मोबाईल नावाच्या राजाने ..
कबजा केलाय प्रत्येकाच्या मनावर ..
म्हणूनच आज मला लीहाविशी वाटली कविता
त्याच्या जीवनावर ..

Written by - durga mate

कळ ..

काव्य पुष्प कवी कविता ...
दिनांक - 13 - 12 - 2022 ..
शीर्षक - कळ ..

कळ ही ,
सोसवेना वेदनेची ..
सांगू कुणास मी .
व्यथा मनाची ..

भोगिले मी  दुःख ...
नाही कधी ,
पाहिले सुख ...
आयुष्यात येऊन ..

कित्येक राती ..
यातनेत गेल्या ..
स्वप्नांच्या माळा ..
सरणावर पेटल्या ..

झळ लागली ,
माझ्याच मनाला ..
कळ सोसावी लागली ..
ह्या हाडामासाच्या देहाला ..

देवळात देव ..
आहे की नाही ?
मुक्या मनाची ..
त्यास पर्वा आहे का काही ?

Written by - durga mate

Dec 12, 2022

हे बंध रेशमाचे

हेबंध रे

शमाचे ..


जिव्हाळ्याचे आपुलकीचे ..


लाभले वरदान निसर्गाचे ..


पांग फेडू कसे  ह्या जन्माचे ..


करेन रक्षण मानव जातीचे ..


सदैव मोल जपेंन माणुसकीचे ..


नाही होऊ देणार शोषण सत्याचे ..


डोळ्यांदेखत नाही लक्तरे तोडू देणार दीन - दुबळ्या ..


माझ्या माणसांचे ..


सैदव रक्षण करेन मी माझ्या धर्माचे ..


नाही उडू देणार दिंडोडे संस्काराचे .


नाव रोशन करेन आई वडिलांचे ..
सैदव जपेन मोल माणुसकीचे ..

ह्या कविता संग्रह मध्ये तुम्हाला अशाच वेगवेगळ्या विषयांवर नात्यावर कविता वाचायला मिळतील ..
करा ल ना तुम्ही सर्व जण माझ्या ह्या कविता संग्रहाच स्वागत ..😊😊😊😘🥰🥰


मी आणि तू

अबोल प्रेम तुझ ..
फुललेलं वक्तव्य माझं ..

प्रेमळ स्पर्श माझा ..
त्याला मधुर सहवास तुझा ..

मी निखळ निनाद लेला सुर ..
तू तुझ्या स्वप्नांत च गुर ..

तू कळी ..
त्या कळीची मी कोवळी पाकळी ..
जोडी आपली खूपच चांगली ..

तुझ प्रेम सैद व हवं ..
तुझ्यात उमलताना ..
शोधेन मी काहीतरी नवं नवं .
Written by - durga mate

Dec 11, 2022

मैत्री तुझी नि माझी

हे बंध तुझे नी माझे ...
नंबर वन मैत्रीचे ..
गोड जिव्हाळ्याचे ..
जपू कायम ..

एकमेकींना सुख दुखात देऊ साथ...
कधींच नको सोडू तू माझा हात ..
मी ही नाही सोडणार कधी तुझा हात ..
मैत्री आपली स्नेह बंधनात बांधलेली ..
जिवापाड जपले ली ...
ह्या पुढे ही अशीच जपू ....
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ,

मैत्री ही अशीच टिकवून ठेवू .

Dec 10, 2022

देवबाप्पा स पत्र

काव्य पुष्प कवी कविता ..

दिनांक - 10 - 12 - 2022

विषय - देवास पत्र .

सर्व प्रथम काव्य पुष्प परिवाराचे खूप खूप आभार ..त्यांनी खूपच सुंदर विषय दिलाय लिखाणासाठी ..🙏🙏

प्रिय देवबाप्पा  ..

तूला माझा साष्टांग नमस्कार 🙏

सर्व प्रथम तुझे  खूप खूप आभार तू मला हे सर्वांग सुंदर आयुष्य दिलं .. त्यात ही स्त्री जन्म दिला ...दोन कुटुंबाची लेक होण्याचं सौभाग्य मिळालं .

कळत नकळत नेहमीचं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला . माझ्या डोळ्यांतील अश्रू नेहमीचं पुसले . मला तुझ्या आशीर्वादाने जे हवं ते सारं मिळालं ..आणि जे  नसेल मिळालं ते कदाचित माझ्या साठी चांगलं नसेल किंवा मी ते मिळवण्याच्या योग्यतेची नसेल . मिळालं नाही म्हणून तुझ्यावर राग नाही माझा ..

कारण तू मला गरजेपेक्षा जास्त दिलंय .. स्वतः पेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करणारे आई वडील ...प्रेमळ आजी ..काक्या ..चुलते .. सारच मनासारखं ..सख्खी बहिण नाही पण ज्या चुलत बहिणी आहेत.  त्या कधीही परकेपणा दाखवत नाही . त्यामुळे मला बहिण नाही . ह्या गोष्टीची उणीव भासत नाही . तीन तीन भाऊ आहेत खूप प्रेम करणारे . जीव लावणारे ..


गरजे पेक्षा जास्त समजून घेणारा नवरा दिला . प्रेमळ आणि मनासारखं वागू देणारे सासू सासरे दिले . माझ्यावर खूप प्रेम करणारे दोन छान - छान पुतणे दिले .
आणि सर्वात महत्त्वाच मला खूप लवकर आई होण्याचं भाग्य दिलं ..त्यासाठी तुझे मनापासून खूप खूप आभार ..

आता फक्त एकच मागणं आहे .

माझ्या पोटात जो माझा अंश वाढतोय ना त्याला खूप  सुंदर आणि निरोगी आयुष्य दे ..त्याला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सुखरूप ठेव . मला जे काही नाही मिळालं ना  , ते सारं त्याला मिळू दे . त्याच्या वाट्याला सुख च दे अस नाही म्हणणार मी दुःख ही दे...चांगले वाईट अनुभव ही दे ..त्याला एक सच्चा नागरिक बनण्याची जिद्द दे ...
जसा मला छान लाईफ पार्टनर मिळाला ..ना तसचं त्याला ही त्याच्या वाट्याच सार सुख मिळू दे ..

आणि सर्वात महत्त्वाच मला माझ्या पूर्ण भरलेल्या कुटंबा समोर मरण दे . मी माझ्या आयुष्यात माझ्या डोळ्यांसमोर कोणालाही मिस नाही करू शकत ..
माझं पूर्ण आयुष्य सेट्टल झाल्यानंतर माझ्या बाळाचं आयुष्य सेट्टल झाल्यानंतर ..सगळं ठीक होईल ना .... ज्याचं मरण जवळ आलं असेल ते मरण मला दे ..कारण मी माझ्या पूर्ण कुटुंबावर खूप प्रेम करते ..हा मी मेल्यानंतर ही माझ्या बाळाचे माझ्या नवऱ्याचे माझ्या आई वडिलांचे हाल नाही होऊ द्यायचे ...माझ्या नंतर तू त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहायचं ..

तुझीच लाडकी लेक
दुर्गा  ...

आणि हो कळत नकळत काही चुकीचं बोलल्या गेली असेल तर , माफ कर बाप्पा कारण माझा अनुभव खूप कमी आहे अजुन ..

Written by - durga mate

Dec 9, 2022

स्वप्नात तू ..

काव्य पुष्प कवी कविता -

दिनांक - 9 - 12 - 2022

विषय - अंत्य शब्द काव्य रचना ..

शीर्षक - स्वप्नात तू

स्वप्नात दिसतो चेहरा तुझा सतत ..
सतत मनी असतो विचार तुझा ..
तुझा श्वास ऑक्सीजन पुरवतो मला ..
मला तुझा विचार केल्याशिवाय करमत नाही ..
नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय ..
तुझ्याशिवाय जगणं  नकोस वाटतं ..
वाटतं का रे तुला तेचं जे  मला वाटतं ..
वाटत का मला साथ द्यावी ..

द्यावी वाटते का मिठी हक्काची ..
हक्काची जुळून यावे रेशीम बंध ..
बंध रेशमाचे हे अतूट व्हावे वाटतं का तुला ?
तुला हवा का चान्स डोळे भरून मला आयुष्यभर पाहण्याचा ...

Dec 8, 2022

अर्धांगिनी

प्राण तुझा ..श्वास माझा ..


आयुष्य तुझ  ,

तुझ्या आयुष्याचं समतोल राखण्याचं कर्तव्य माझ ..


स्वप्न तुझी ..


पूर्ण करण्याची चिकाटी माझी ..


अंश तुझा ..


त्याला आलिंगन माझं ..


घरं तुझं ..
घराला घरपण आणण्याचं कर्तव्य माझं ..
एक हाक  तुझी ..
त्याला लाख साथ माझी ..
थकलेलं मन तुझ ..
त्याला सहवासाचं लेणं माझं ..
शरीर तुझ..
त्या शरीराला एनर्जी माझी ..
कारण मी तुझी अर्धांगिनी ..
एकमेकांशिवाय अपूर्ण आपल्या आयुष्याची कहाणी ..

Dec 7, 2022

तिचा सहवास

काव्य पुष्प कवी कविता ..

दिनांक - 7 - 12 - 2022

विषय - तिचं अस्तित्व ..

साहित्य प्रकार - लेख ..

शीर्षक - तिचा सहवास ..

तिचा सहवासचं तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. 


तिचं असणं सर्वांना हवं हवंस वाटतं.  तिच्या असण्यानेचं घराला घरपण येतं.  उगाच नाही तिला गृह लक्ष्मी म्हणतात ...तिच्या शिवाय कुटुंब ही पूर्ण होतं नाही . आणि खुश ही राहू शकत नाही ..


ती घरात असली की घर कस भरल्या भरल्या सारखं वाटतं . चार दिवस गावी गेली की लगेच तिची उणीव भासते .


ती आई , बाबा , अहो ... " अरे !  बाळा घे ना ये दूध पिऊन " असं म्हणत सर्वांच्या पुढे पुढे करते . तेव्हा खरचं खूप प्रसन्न वाटतं . तिच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडावंस वाटतं .


पदर कमरेला एका हाताने केस सावरत ती जेव्हा किचन मध्ये लुडबुड करते तेव्हा फक्त तिच्याकडेच टक लावुन बघावंस वाटतं .


सकाळी सकाळी सर्वांची उठायची घाई आणि तिची मंजुळ आवाजात सुरेख आरती ... घरातील सर्व वातावरण प्रसन्न होऊन जाते .


ती हसते तेव्हा अजूनच सुंदर दिसते ..


तिचा कोमल स्पर्श ती जेव्हा करते ..
तेव्हा ती अजुनच आवडायला लागते ..
तिच्या सहवासाने स्त्रित्वाची खरी परिभाषा समजायला
लागते ..

Written by - durga mate

संवेदना

नाते नवखे तुझे नि माझे .

शत जन्माचे ...


नेण्यास पुढे तू साथ दे ..


हात तुझा हाती दे ..


पैल तीरी मजला घेऊन चल ..


हातावरच्या रेषा तूच बघ ..


प्रितीच्या खुणा ही तूच ओळख .


जीवनी तुझ्या नि माझ्या ..


बहरल्या बागा प्रेमाच्या ...
फुलल्या संवेदना तुझ्या नि माझ्या मनाच्या ..


Dec 6, 2022

घरपण ..

सप्तरंगानी सजलेले आयुष्य आपले ..
किती सुंदर बहरले ......

प्रत्येक रंगाचा गंध जीवनी आला ...
साक्षात्कार नवा घडला ...

अबोल भिंतीना वाचा फुटली ..

इवली - इवली पाऊले धुडू धुडू धावू लागली ..

बागेतील फुल टवटवीत दिसू लागली ..
मुक्या पाखरांना ही घराची ओढ लागली ..

आनंदाने घरकुल सजले आपले ..
आपल्याच वेलीचे फुले बघ कसे बहरले ..

इंद्र धनुचे रंग घरी अवतरले ..
साऱ्या घराचे गोकुळ झाले ..
माझ्या घराला घरपण आले ..
Written by - durga mate

Dec 5, 2022

मी सावली तुझी

ये , घाबरु नको अशी ..
जवळ ये जराशी ..
डोळ्यांतून पाणी येईल जेव्हा - जेव्हा 
आईचा चेहरा आठव तेव्हा - तेव्हा ..
आई सदैव तुझ्या सोबत आहे ..

मिठी प्रेमाची ..
प्रेमळ ह्या आईची ..
स्पेस तिथे हक्काची ..
ह्या लाडक्या लेकीची ..
बाळा ..ह्या आईचा तू जीव की प्राण आहेस ..

जीवन जगण्याचे कौशल्य शिकवणारी ..
चिऊ ताऊचा घास भरवणारी ..
तुझ्यासवे लपाछपीचा खेळ खेळणारी ...
तुझ्यावर रागवून स्वतःच रडणारी ..
तुझा स्पर्श होताच नव्याने उमलनारी ..
मी तुझी आई ..तुला एकटीला कधीचं सोडणार नाही ..

तुझ्यासाठी तुझ्यासारखी चं होणार ..
तुझ्या आयुष्याला सुंदर आकार देणार ..
प्रेम करण्यास तुझ्यावर कधी मागार नाही घेणार ..
आयुष्य भर अशीच तुझी साथ देणार  ...
आई मी तुझी आई नाही , तर तुझी सावली होणार ..
Written by - durga mate

Dec 3, 2022

पुस्तकांच्या जगात ...

पुस्तकांचे जग माझे ..
माझ्या जगात मी हरवून जाते ..
स्वप्नांना शब्दात मांडते ...
शब्दांना मनात साठवते ..

कल्पनेचा गंध सुरांना देते...


सुर हलकेच गुणगुणते....


पुस्तकांशी एकरूप होते ..


नव चैतन्याचे बीज मनी रुजते ..


ओळींचा अर्थ समजून घेते ..


सुविचार जीवनात माझ्या लागू करते...


उंच भरारी घेण्याचे स्वप्न पाहते ....


पुस्तकांच्या जगात खरोखरचं हरवून जाते ..

Dec 2, 2022

तुझ्यासवे

तुझ्या असण्याने किती सुंदर ओळी ..
नशिबाच्या रेखाटल्या ...
हाता वरच्या रेषा ही सजल्या ..
सबोवताली असलेल्या बागा ही फुलल्या ..
भावना अनोळखी मनी स्फुरल्या ..

जीव माझा  गुंतला तुझ्यात  ..


श्वास तुझा स्फुरला माझ्यात ...


दोघेही खुश एकमेकांच्या आयुष्यात ..


सामील झालो सहजीवन एकमेकांत ..


आता आस ना राहिली कुणाची ..


मधाळ गोडी चाखते मी तुझ्याच प्रेमाची ..


ओठी रोजचं खुले कळी हास्याची ..


तुझ्यासवे किती सुंदर ओळ रेखाटली माझ्या नशीबाची ..



Written by - durga mate

Dec 1, 2022

नेहमी कर्तव्य श्रेष्ठ ठरतं.

जगताना आज ही मरते ..
माझं मलाच माहीत कशी ?
मी तुझ्याशिवाय जगते ..

प्रेम केलं तुझ्यावर ..
शिक्षा भोगते आजही ..

आई वडिलांसाठी सोडली साथ तुझी ..


खरी आहे जूबानी माझी ..


प्रेम आणि कर्तव्य ...


ह्यात श्रेष्ठ कर्तव्य ..


आणि मी तेच निवडलं ..


तरी ही तुझ्या वाट्याचं प्रेम अजुनही मनात जपलं .


धोकेबाज , मतलबी ,


ह्या उपमा देऊ नकोस तू मला ..


किती प्रेम करायचे मी तुझ्यावर ..


आठव तू माझ्यातील तुझ्या प्रियसिला ..


बिन मुडाचे आरोप नको करूस माझ्यावर ..


खरं सांगते आज ही जिवापाड प्रेम करते रे तुझ्यावर ..


फक्त जाबाबदाऱ्यांच्या बंधनात बांधल्या गेले ..


ह्याचा अर्थ तुला विसरले ..


असा नाही होतं ..


माझ्या आयुष्यातील तुझी जागा दुसरं कोणीही नाही घेऊ शकत ..पण मी पुन्हा तुझ्या आयुष्यात पुन्हा परतू ही नाही शकत . कारण आता आपल्या वाटा वेगळ्या आहेत . आणि मला माहितेय मी जर आता तुझ्या आयुष्यात पुन्हा परतले ..तर तू डिस्टर्ब होशील .. आणि माझ्यामुळे तू डिस्टर्ब व्हायला नकोय मला . तू खूप मॅच्युअर आहेस . खूप पुढे जाशील आयुष्यात .


राधा कृष्णाचं प्रेम ही कधी पूर्ण झालं नाही . मग आपलं तरी कसं होईल . आपण तर सर्व सामान्य माणस  ! राधा कृष्णाच्या प्रेमाची दुसरी बाजू माहितेय  . ते  अपूर्ण ही राहील नाही . कधाचीत तसचं असावं आपलं भाग्य .


विचार कर आज मी तुझ्यावर निस्वार्थी पने प्रेम करते . नशिबाने मी जर तुझी झाले असते . तर कोणी सांगितल मी आजही तुझ्यावर प्रेम केलं असतं.  कदाचित माझ तुझ्या विषयी असलेलं मत बदललं असतं.  आणि त्या बदललेल्या मता बरोबर तुझ्यावर असलेलं प्रेम ही कमी झालं असतं.


बरं झालं मी प्रेम आणि कर्तव्य ह्यात कर्तव्य निवडलं कारण कर्तव्य तर श्रेष्ठ ठरलचं पण माझ प्रेम ही श्रेष्ठ ठरलं.


आणि नियतीने घेतलेल्या परीक्षेत मी पास ही झाले.  आणि आई वडिलांच्या नजरेत ही शाबूत राहिले.


खरचं अभिमान वाटतो माझा जरी मी तुला , मी तुला कशाला तूच मला गमावलं ....


मी काहीचं न गमवता खूप काही मिळवलं...


हा वैचारिक लेख आहे.  ह्याचा माझ्या आयुष्याशी काही संबंध नाही.  फक्त वैचारिक पद्धतीने लिहिलेला आहे. 


Written by - durga mate

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...