निरोप सरत्या वर्षाला..
केले खास आज ..
येणाऱ्या वर्षाची लागली आस ..
गेली वर्षभर जपलेली नाती ,
पुढेही जपायची ..
येणाऱ्या वर्षी अजुनही काही नवी नाती जोडायची.
आणि ती ही आयुष्यभर जपायची ..
मनातील क्रोध - लोभ - द्वेष ..
सारे संपवून टाकायचे ...
अवती - भवती फक्त फक्त प्रेमाचे जाळे विणायचे ..
येणाऱ्या वर्षाचे हसत - हसत स्वागत करायचे ..
ज्यांनी ह्या वर्षी मैत्रीचा हात सोडला ..
हात नाही केवळ ..मनाचा एक धागा तोडला ..
त्यांना पुन्हा कधीचं मैत्रीचा हात नाही द्यायचा ..
येणाऱ्या वर्षी जरा स्वतः मध्येही बदलाव करायचा ..
इगो बाजूला सारायचा ..
पण स्वाभिमान मात्र पुरेपूर जपायचा ..
येणाऱ्या वर्षाचा प्रवास आनंदाने सुरू करायचा ...
Happy new year all of you
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.