नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खास एक नवीन कथा घेऊन आली आहे . ती तुम्हाला आवडेल ही आशा करते . आवडल्यास कॉमेंट जरूर करा . कारण ही कथा मी एका स्पर्धेसाठी लिहीत आहे . त्यामुळे प्लीज स्टिकर्स अँड कॉमेंट द्यायला विसरू नका ...
कथेचा शिर्षक आहे ..
खऱ्या प्रेमाला ब्रेक अप नसतो ..
ही स्टोरी आहे . राज आणि दिव्याची एक अनोखी प्रेम कहाणी खास तुमच्यासाठी . राज आणि दिव्या एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे . त्यांना एक क्षण ही एकमेकांशिवाय कधी राहवत नव्हतं . ते लास्ट इअरला एकाच क्लास मध्ये होते . त्यामुळे त्यांचं बॉण्ड खूप छान होत . पण अचानक का कुणास ठाऊक हे प्रेम बंधन ब्रेक अप ह्या स्टेज ला येऊन पोहोचल . का पोहोचलं असेल त्यांचं प्रेम ब्रेक च्या ठिकाणी ? असं काय घडलं होतं नक्की की त्यांना ब्रेक अप करावं लागलं ..
बघुया काय झालं होतं नक्की त्यांच्या आयुष्यात .
उर्वशी दिव्याची मोठी बहीण तिच्यामुळे त्यांचं प्रेम जुळल होत. ती त्याच्या प्रेमाचा आधार स्तंभ होती म्हणायला हरकत नाही . उर्वशी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना दिव्याने उर्वशीच्याचं कॉलेज मध्ये एडमिशन घेतलेलं .राज उर्वशीचा अगदी जवळचा मित्र त्यामुळे त्याचे सारे गुण तिला चांगलेच तोंडपाठ होते .
राज खूप मोठ्या घरातील मुलगा दिसायला तर हँडसम होताच पण स्वभावाने ही खूप चांगला , सुसज्ज आणि प्रेमळ होता . सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप कमी वयात मॅचुअर होता . कुठलीही मुलगी त्याच्यावर सहज फिदा होईल अस त्याचं व्यक्ती महत्त्व होतं. उर्वशी पेक्षा वयाने लहान असल्यामुळे ती त्याला फक्त एक चांगला मित्र मानत होती . पण तिच्या मनात त्याच्याबद्दल मैत्री पेक्षा ही खूप खास जागा होती . तिने ते कधीच कोणाला ही कळू दिले नाही .
पण हा मित्र आपल्या आयुष्यात आपल्या सहवासात कायम रहावा ही तिची मनापासून ईशा होती . त्यामुळेच तिने खूप प्रयत्नाने दिव्या आणि राज ची लव्ह स्टोरी जुळावी म्हणून अथक प्रयत्न केले होते त्यांच्या ही नकळत . ते ही आज पर्यंत कोणालाही माहित नव्हत .
आणि ते कधी माहीत ही होणार नाही . जेव्हा जेव्हा राज आणि दिव्या मध्ये वाद - विवाद व्हायचे . तेव्हा तेव्हा ती त्यांना समजावयाची . ती जेव्हा जेव्हा त्यांना समजावयाची तेव्हा तेव्हा त्यांची प्रीत नव्याने बहरायची .
आज उर्वशी कॉलेजला गेली नव्हती . त्यामुळे कॉलेज मध्ये काय प्रकार घडला .ह्याची तिला जराही कल्पना नव्हती . संध्याकाळचे सहा वाजले असतील . तेव्हा दिव्या नेहमीप्रमाणे घरी आली . पण आज तिच्या वागण्यात बराच फरक जाणवत. तिने आज नेहमी प्रमाणे आल्या आल्या बरोबर उर्वशीला मिठी मारली नव्हती . की तिच्या लहानग्या भावांना हाय हॅलो केलं नव्हत . आली तशीच रूम बंद तिच्याच रूम मध्ये बसली .
फ्रेश ही न होता तिच्या बेडवर रड रडली . ह्याची घरात कोणालाही कल्पना नव्हती . ती घरी येऊन बराच वेळ झाला होता . पण ती काही रूम च्या बाहेर पडली नाही .
" आज दिव्या बाहेर का येत नाही . जाऊन बघ ग .
उर्वशी " आई म्हणाली .
नक्कीच काही तरी प्रोब्लेम झाला असेल परत राज आणि दिव्या मध्ये ह्याची चटक उर्वशी लागली . ती राजशी भांडण झाल्यावरचं अस वागते. ह्याची तिला जाणीव होती . म्हणून ती लगेच तिला समजावयला नाही गेली .
तिच्याशी बोलण्या आधी तिने राजला कॉल केला .
" हॅलो राज कसा आहेस ? " उर्वशी
" बरा आहे " राज ने एवढा उत्तर दिलं . आणि त्याच्या ह्या उत्त रावरून तिची पक्की खात्री पटली. की ह्यांच्यात पुन्हा वाद झाला . तिने लगेच विषाया ला हात घातला .
" काय रे राज परत भांडलास माझ्या बहिणीशी ..का भांडतोस रे अस सारखं सारखं तिच्याशी " ती जरा चड्या
आणि केविलवाण्या स्वरात बोलली .
" भांडू नको तर काय करू ग ? आज व्हॅलेंटाईन डे . म्हणून मी कॉलेजच्या कॅफे मध्ये खास तिच्यासाठी खूप छान प्लॅनिंग केलेलं. आज खास तिच्यासाठी ते पूर्ण कॅफे बुक केलेलं . छान पार्टी अरेंज केलेली . सर्व मित्र मैत्रिणी समोर तिला प्रपोज केलं . आणि तिने मला पूर्ण मित्र मैत्रिणी समोर मला वेड ठरवलं . " आणि एवढ्या वेळ उरात दाटलेले हुंदके फुटले आणि कोसळला रडायला लागला . उर्वशी ला ही त्याच्या बोलण्यावरून त्याची काय अवस्था असेल आता ह्याचा अंदाज आला होता . पण वेड ठरवल म्हणजे नक्की दिव्याने काय केलं असेल . हे तिला नाही समजल म्हणून तिने त्याला आधी सावरलं आणि मग ती त्याला म्हणाली .." आपण आता लगेच भेटूया का ? प्लीज येतोस ? " त्यालाही आता सध्या मानसिक आधा राची खूप गरज होती . म्हणून त्याने भेटण्यास होकार दिला .
" आई मी आता लगेच जाऊन येते ग " अस म्हणत ती बाहेर निघाली ..
" अग कुठे चाललीस ? आणि त्या दिव्याला बघ ना आधी नक्की काय झालं आहे तिला " आई तिला म्हणाली
" हो ग आई तिला पण बघते पण आधी जाऊन येते " आणि ती त्याला भेटायला जाते .
नेहमी प्रमाणे खळखळून हसत असणारा चेहरा आज खूप कोलमडून गेलेला तिला दिसला. रडून रडून डोळे ही बरेच सुजले होते . तिला त्याची तशी अवस्था बघवली नाही .
तिने चहा ऑर्डर केली . आणि त्याला बसायला सांगितल .
" मला कळतीय तुझी अवस्था पण नक्की काय झालं ते नाही माहीत प्लीज सांगशील का जरा . म्हणजे मी हेल्प करेन ..काही .. दिव्या ने तुला पूर्ण मित्र मैत्रिणी समोर वेड ठरवलं म्हणजे नक्की काय केलं ? " तिने विचारलं .
तो डोळे पुसत तिला सांगू लागला ." तिने मला पूर्ण मित्र मैत्रिणी समोर आज माझ प्रेम तर स्वीकारलं नाहीच . आजपासून मला कॉल आणि मेसेज ही करायचा नाही अशी सक्त ताकीद दिली . आजपासून तू माझा कोणी नाही . आणि मी तुझी कोणी नाही . असं बजावून सांगितल ."
तिला तर अजुनही कळत नव्हतं अस का झालं . " काल पर्यंत तर सगळ ठीक होतं . मग आज अचानक अस का ?" तिने विचारलं .
" ते तिलाच माहीत . ते मला ही नाही माहीत ग " एवढं बोलून तो शांत झाला खूप डिस्टर्ब झाला होता . हा घडलेला प्रकार त्याला बिलकुल सहन होतं नव्हता .
हे तिला जाणवत होत . तिच्या डोक्यात एक एक प्लॅन येतो . आणि ती लगेच त्याला तो प्लॅन सांगते. त्याला ही तो प्लॅन आवडतो . आणि ठरलेल्या प्लॅन प्रमाणे ड्रामा करायचा , असे ते ठरवतात . दोघेही आपल्या आपल्या घरी निघून जातात .
" अग एवढा वेळ आणि एवढ्या रात्री तू नक्की कुठे गेली होतीस .." आईने उर्वशी ला बघताच प्रश्न विचारला .
" अग आई ! खूप महत्वाचं काम होतं. म्हणून गेले होते .
एवढ्या रात्री बाहेर फिरायची मला हौस आहे का ? " ती आई वर जरा चीडली आणि लगेच दिव्याच्या रूम मध्ये तिच्यासाठी जेवणाच ताट घेऊन गेली .. दिव्या सुरुवातीला दरवाजा ओपन करतच नव्हती . पण ; उर्वशी ने खूप हट्ट केलेला मग शेवटी दिव्या ने दरवाजा ओपन केला .
" ताई तू का आलीस इथे आणि हे जेवण कोणासाठी आणल ? मला जेवायचं नाही हे , घेऊन जा तू हे ता ट " दीव्या रडवलेल्या स्वरात म्हणाली ..
" अग हे ता ट तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी आणल . मी पण जेवले नाही ग अजुन " एवढंच बोलून ती बेडवर बसली
" तू का नाही जेव ली ? " दिव्या
" तू जेवल्याशिवाय मी कधी जेवते का ? आणि रडू बाई काय झालंय रडायला कळू शकेल का आम्हाला " उर्वशी ने दिव्याला कुशीत घेऊन विचारल . उर्वशी च्या कुशीत दिव्या ने हंबरडा फोडला
" ये वेडा बाई काय झालं ? का रडतेस शांत हो आधी आणि सांग मला नक्की काय होतंय तुला ? " उर्वशी ने आईच्या मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरला आणि तिला विचारल . तरीही ती गप्पच होती . बोलायला तयारच नव्हती . मग उर्वशिने एक छान स गाणं तिच्यासाठी गायल ..
काल्पनिक : छोट छोट बाळ माझ
का बरं ? रडत आज
कोणाचा आलाय एवढा राग ?
की त्याची डोळ्यात दिसतेय आग .
की ताईचाच आला राग
खरं खरं सांग !!!!
असं म्हणत ती हसते आणि ह्या काल्पनिक गाण्यावर दिव्या पण हसायला लागते आणि तिला म्हणते , " ताई कोणत्या मूवी मधलं आहे ग हे , गाणं ? "
" दिव्याच्या ताईच्या कळजातल आहे . खास दिव्यासाठी.
तिने रचल आज " अस म्हणत ती स्मित करते " आणि सांग बरं लवकर काय झालं तुला ? "
दिव्या चा चेहरा पूर्ण उतरला होता . ती खाली मान घालुन हळुवार आवाजात म्हणते , " ताई ब्रेक अप झालं ग आज आमचं " आणि रडायला लागते ..
" का ग ? " उर्वशी शॉक होऊन विचारते . आपल्याला सर्व हकिकत माहीत आहे . हे तिला कळू न देता.
" आमचं ब्रेक अप झालं कारण त्याने आज मला प्रपोज केलं . आमचं ठरलेलं होतं . तो मला कधीच प्रपोज करणार नाही . आणि त्याने मला आज सर्वासमोर प्रपोज केलं . तो माझ् काहीचं ऐकत नाही . त्याच माझ्यावर प्रेमचं नाही " अस म्हणत ती पुन्हा रडायला लागते .
" ओके ! रडू नकोस ब्रेक अप त्याने केलं की तू " उर्वशी ने विचारल
" त्याने प्रपोज केलं आणि मी ब्रेक अप केलं . आणि बघ अजुन ना अजुन कॉल नाही . मेसेज नाही काहीचं नाही . त्याच ना माझ्या वर प्रेमच नाही " परत तोच पाढा तिने सुरू केला .
" बरं तू रडू नकोस शांत हो . जाऊ दे बर झालं तू ब्रेक अप केलं ते ...तुझ ही त्याच्यावर कुठे प्रेम होत ग ? " उर्वशी
" ताई अस नको बोलू माझ त्याच्यावर खूप प्रेम आहे . स्वतः पेक्षा जास्त मी त्याच्याशिवाय एक क्षण ही नाही राहू शकत . " असं म्हणत ती पुन्हा रडते .
" ह्म्मम म्हणून आज सर्वां समोर त्याच्याशी ब्रेक अप केलं . हो ना " उर्वशी
ताईचं हे बोलण तिच्या मनाला खूप टोचल पण ती काहीच बोलू शकत नव्हती कारण तिच्या त्या बोलण्याच समर्थन कस करावं हेच तिला कळत नव्हत . आणि उर्वशी सुद्धा ती शांत झाली . हे पाहून तिच्या रूम मध्ये झोपायला गेली .
दिव्या जरा शांत झाली आणि विचार करायला लागली .
" खरच आज आपण काही चुकीचं तर केलं नाही ना , त्या बिचाऱ्या ने आपल्यासाठी एवढं छान प्लॅनिंग केलेलं . आणि आपण खुशाल ब्रेक अप केलं . किती हर्ट झाला असेल तो " असा विचार करत ती लगेच त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करते . पण कॉल काही तो रिसिव्ह करत नव्हता . ती खूप वेळ कॉल ट्राय करते . पण त्याने काही रिसिव्ह केला नाही . आणि शेवटी . कॉल नेट वर्क कवरेज एरिया दाखवत होते . उद्या सकाळी पहिले राज ला भेटायला जायचं आणि त्याला स्वारी बोलायचं . हा विचार करून ती झोपी जाते ..
सकाळी सकाळी उर्वशी दिव्या ला हाका मारते ते ही जोर जोरात " अग ताई काय झालं एवढ्या सकाळी एवढ्या मोठ्या ने का ओरडते स ? " दिव्या ने दरवाजा ओपन न करताच तिला विचारल ..
" अग तू आधी तू दरवाजा तर ओपन कर मग सांगते तुला" उर्वशी
" ओके " म्हणत ती दरवाजा ओपन करते. आपल्या मोबाईल मध्ये आलेला राजचा मेसेज तिला दाखवते . दिव्या जसा तो मेसेज बघते .तशी होती त्या अवस्थेत सिटी हॉस्पिटल च्या दिशेने धाव घेते. तिच्या मागे मागे उर्वशी ही जाते .
राज ला पेशंट बेड वर बघून ती पॅनिक होते . तिला त्याची तशी अवस्था बघवली नाही . लगेच ती त्याच्या जवळ जाऊन रडायला लागते . आणि त्याच्याशी संवाद साधते . " राज तू काय केलंस हे ? मी ब्रेक केलं म्हणून तू चक्क नस कापली . अरे प्रेम आहे माझं तुझ्यावर एक क्षण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही . फक्त प्रेम व्यक्त करण्याची गरज नव्हती. आणि तू हे काय केलंस ? वेडा आहेस का ? खऱ्या प्रेमाला कधी प्रेमाला कधी ब्रेक असतो का ?
आणि असला बी तर तो फक्त तात्पुरता असतो " अस म्हणत ती त्याचा हात आपल्या हातात घेऊन रडायला लागते .
" हो ग राणी खऱ्या प्रेमाला कधी ब्रेक अप नसतो . हे मी मान्य करतो . " आणि तो लगेच उठून बसतो .
त्याचा आवाज ऐकुन ती खुश होते " राज " अशी हाक मारत त्याच्याकडे बघते . त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद पसरलेला होता . आणि त्याला एवढं आनंदी बघून ती ही खुश झाली होती .
" राज म्हणजे तुला काहीच झालं नव्हत . तू मजाक करत होतास माझी ? " दिव्या
" हो स्वारी त्यासाठी पण तूच ही मजाक घ्यायला मला
भाग पाडलं " राज
" इट्स ओके ! आय लव्ह यू " अस म्हणत दिव्या त्याला एक घट्ट मिठी मारते " आय लव्ह यू टू" म्हणत राज ही तिला मिठी मारून तिच्या कपाळावर नाजूक किस करतो .
काय मित्रांनो आवडली का मग स्टोरी खऱ्या प्रेमाला कधी ब्रेक नसतो . आवडल्यास कॉमेंट जरूर करा .