ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ...
सुहास आणि सुवासिनी लग्न झालेलं नवीनच जोडपं .
सुहासला वडील नसल्यामुळे त्यांनी लहान पणापासूनचं संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्याचं खांद्यावर घेतलेली . कुटुंब होतं तरी किती आई आणि तोच . एकलुता एक म्हणून आईचा खूप लाडाचा. शारदा त्याच्या आईच नाव शारदा ताईने त्याला खूप खूप लाडात वाढवलेल . वडिलांची कमी त्याला कधीही भासू दिली नाही . आणि सुहास साठी ही त्याची आईच त्याचं सर्वस्व होत . आई म्हणे ल तिचं त्याची पूर्व दिशा ..
त्याच्या आईच्या इश्चे खातर त्याने सुवासिनीशी लग्न केलं . त्याला तिच्याशी कधीच लग्न करायचं नव्हत .कारण त्याच एका मुलीवर खूप प्रेम होतं . आणि ती मुलगी त्याच्या आईच्या नापसंदीच्या लिस्ट मध्ये होती .
ह्याची सुहास पूर्ण कल्पना होती . म्हणून त्याने ती गोष्ट कधीही त्याच्या आई समोर बोलून नाही दाखवली .
आईच्या इश्चे खातर त्याने लग्न केलं सुवासी निशी .
सुवा दिसायला सुंदर जरीच्या साडीत अजुन शोभून दिसायची. मनमिळावू आणि प्रेम त्यामुळेच तर आईच्या पसंदिस उतरली .
लग्न अगदी थाटा माठात झालं . सुवाला ही तिचं सासर खूपच आवडलं. कमी माणस कमी काम शेवटी संसार हा राजा राणीचा ह्या आशेवर तिने ही खूप स्वप्न बघितली .ती पूर्ण होतील ह्याची तिला खात्री ही होती. पण घडल अजबच ज्याची कधी कल्पना केली नव्हती. लग्नाच्या पहिल्या रात्री ती खूप उत्सुकतेने रेडी होऊन रूम मध्ये बसली . सुहास ची वाट बघत . बराच वेळ झालेला पण तो काही रूम मध्ये येत नव्हता .
" का येत नसेल हे रूम मध्ये लग्न झाल्यानंतर आमचं फार काही बोलण ही नाही झालं . ह्यांना मी नक्की पसंद होते ना " असे कितीतरी विचार तिच्या मनात येऊन गेले .
ती त्यांना हाक मारन्यासाठी बाहेर जाणार तेवढ्यात सुहास चं आत आला .
" अहो , एवढा वेळ कुठे होता तुम्ही ? " तिने विचारलं.
" बाहेरचं होतो . तू अजुन झोपली नाहीस ?" त्याने तिची नजर चोरत विचारल .
" तुम्ही आल्याशिवाय कशी झोपणार " ती म्हणाली .
" बर मी झोपतो तू ही झोप " अस म्हणत तो झोपी गेला .
तिला त्याच वागणं खूप खटकल . पण तिने तात्पुरते इग्नोर केलं.
लग्नानंतर ची जशी पहिली रात्र झाली थोडक्यात संवादात तशाच किती तरी रात्री झाल्या . ती तर आता पूर्ण पने कंटाळली होती. त्याच्या तशा वागण्याचा तिला खूप त्रास होत होता . जवळ पास दीड वर्ष त्यांच्यात नवरा बायको च नातच नव्हत. तिने आता पर्यंत खूप सहन केलं होतं . पण आज तिला त्याच्याशी बोलायचं होतं . आणि ती बोलणारच होती .
तो आला तसा तिने विषयाला हात घालनार तर त्याने नेहमी प्रमाणे प्रश्न केला ..
" तू अजुन झोपली नाहीस ? "
" कशी झोपणार तुम्ही आल्याशिवाय " तिने रिप्लाय दिला.
" बर मी झोपतो तू ही झोप " तो तिला म्हणाला
" किती दिवस अस चालणार " ती चिडून बोलली .
" म्हणजे " त्याने विचारलं
" म्हणजे बोलावं का मी त्या विषयावर ..अशी ईशा आहे का तुमची ? " ती म्हणाली .
" म्हणजे मला काहीच कळत नाही तू काय बोलतेय ते " तो म्हणाला ..
" ओके लग्न का केलं माझ्याशी " तिचा दाटून आलेला कंठ फुटला . त्याला ही तिच्या वागण्याचा मर्म्म कळलं .
त्याने तिला कस बस शांत केलं .
" तू शांत हो ग ! रडू नकोस " तो प्रेमाने बोलला
" किती दिवस शांत होऊ आणि किती दिवस रडू नकोस ."
ती म्हणाली .
" मला कळतय ..पण मी काहीही बोलू नाही शकत "
" का एवढे दिवस नाही बोललात आज तरी बोला माझ्यापासून एवढे दूर का पळता मी तुम्हाला आवडत नाही का ? आवडत नव्हते तर मग लग्न का केलं माझ्याशी" ती कळवळून म्हणाली .
" सांगतो . ऐक माझ् एका मुलीवर खूप प्रेम होतं . ती आईला आवडत नव्हती . म्हणून मी कधी तिच्या समोर बोलू नाही शकलो . मला माफ कर मी तुझा गुन्हेगार आहे . पण स्वारी मी कधी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत ."
" म्हणजे तुमचं अजुन ही अफेअर आहे का ? " तिने विचारलं.
" नाही अस काही नाही .तिचं लग्न झालं " तो म्हणाला
" म्हणजे ती पण तिच्या नवऱ्या सोबत अशीच वागते का?"तिने विचारलं
" ते मला कस माहीत असणार " त्याने सांगितल
" अहो मग तुम्ही असे का वागता . तिने जर तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात केलीय तर , तुम्ही का तिच्यामध्ये अडकून आहात . करा ना एक नवीन सुरुवात एका नवीन आयुष्याची . का तुमचं आणि माझं आयुष्य विनाकारण बरबाद करत आहात ."
ती बोलत होती तो तिच्याकडे बघत होता .
" अहो प्रेम सगळेच करतात. ह्याचा अर्थ ज्याच्याशी लग्न केलं त्यांच आयुष्य विनाकारण बरबाद करायचा असा नाही होत. ते प्रेम विसरून आपल्या जोडीदाराला साथ द्यायची असते. विसरा तिला आणि करा एका नवीन आयुष्याची सुरुवात .. " ती एवढं बोलून थांबली .
ती बोलत असताना त्याला जाणवलं आपण खूप मोठे गुन्हेगार आहोत सुवाचे . त्याने तिची माफी मागितली . आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात करण्यास तिची साथ देण्याची शपथ घेतली ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.