नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 31, 2021

जरा सांभाळून पाऊले टाकावी

ह्या जगात आपलं म्हणावं अस कोणी नसतं ,
हे जग एक मृगजळच असतं ,

मग चांगली माणस ही वाईट गणली जातात ,
मनात विचारांचं काहूर सोडून जातात ...

ह्या जीवनात आई वडील सोडले ना कोणीच आपलं नसतं ,
ते जितकं करतात ना तितकं कोणीच नाही करू शकत ..

प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ बघत असतो ,


निस्वार्थी असा कोणीच नसतो ...


जग ना हे खूप मतलबी आहे ,


ह्या दुनियेत वावरणे जरा धोक्याचे आहे ,


जरा सांभाळून पाऊले टाकावी ...

मैत्रिणीच्या नादात मी बरबाद झाले

चुकीच्या बाजूने मी तेव्हाही नव्हते ,
आजही नाही. ..

नकळत चूक झाली अल्लड वयात ,


अडकले होते ना मैत्रीच्या पवित्र बंधात ,


पण आज तिनेच माझ्या आयुष्याची माती केली ,

स्वप्न माझी धुळीत मिळाली ,

आज माझ्याच माणसांना मी परकी झाली ..

तेव्हाही तिला काय चूक काय बरोबर समजावत होते ,

सोडून दे बाई नाद त्याचा सतत सांगत होते ...

माझे बोलणे नेहमीच तिला ओझे वाटले ,
आज तिचे ते वागणेच डोक्यावर टांगती तलवार बनुन राहीले ....

मी चूक नसताना ह्यात गोवले गेले ,

माझ्या चांगुलपणाचे खरचं आज ओझे वाटू लागले ..

मैत्रिणीच्या नादात मी बरबाद झाले ,
आयुष्य माझे मातीत मिसळले ...


त्या किनाऱ्यावर पुन्हा एकदा

ये पुन्हा त्या किनाऱ्यावर ,
तुझच राज्य माझ्या मनावर ,

भाग्यरेषा तुझ्या नशिबाच्या ,
माझ्या नशिबाला जोडलेल्या ,
तू आहेस का रे पाहिलेल्या ,
पाहून त्या किनाऱ्याला ही अपरुक वाटलेल्या ...

भावना तुझ्या माझ्या मनात ,
खोलवर रुजलेल्या ,
पूर्व जन्मीच्या वेदनाही त्यात सामावलेल्या ,
त्या किनाऱ्यावर पुन्हा एकदा बहरलेल्या ...

प्राजक्ताच्या कोमल फुलाची आरास ,
त्यात दरवळे

तुझा सुगंध खास ,
ह्या वेड्या मनाला तुझीच रे आस ...
त्या किनाऱ्यावर भेट पुन्हा एकदा ,
मनावर ह्या राज्य कर नव्याने पुन्हा एकदा ...


शरीराला ही असते गरज सर्व्हिसिंग ची

शरीराला ही असतेस की वो गरज सर्विसिंगची ,

वेळोवेळी चेक अपची , ट्रीटमेंटची ....


ट्रीटमेंट विना बॉडी गंजून जाते ,
आपलेच शरीर आपली साथ सोडते ...

मग वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात ,

आरोग्याला हानी पोहोचवतात ,


श्वास आपले गुद मुरू लागतात ...

एक क्षण ओक्सिजान शोधू पाहतात ..

शरीराला सांगत असतात तू ट्रीटमेंट घे ,
तुझ्या शरीराला जरा तू वेळ दे ..



तिलाही असतेस की वो गरज मसाज थेरीपीची ,

मानसिक आजारांवर नियंत्रण करण्यासाठी ,

ध्यान धारणेची ...

ते बीचारही कमकुवत होत जात ,


औषध पाणी हेचं त्याचं जीवनसत्व असतं ...
वेळोवेळी आरोग्याला खत पाणी घालतं असतं ...

प्लीज स्वतःसाठी जरा वेळ द्या  आरोग्याची काळजी घ्या
शरीराला ही असते गरज सर्व्हिसिंग ची  एवढे माझे बोल लक्षात ठेवा ...

Oct 30, 2021

हरवली पाखरे

वंदन माझे सरस्वती मातेला ,


ज्ञानदेवतेला ...


ह्या पाखरांना तिने कुशीत घेतले ,


ज्ञानाचे दिप ओंजळीत  टाकले ...


किलबिलत्या मनाला आकार दिला ,


ज्ञानाचा झरा इथे ओसंडू लागला ,


सकाळ सकाळी रविकिरणाला ही अभिमान वाटला ,


ज्ञानदीप त्याच्या नयनात दाटला ...


वृक्ष वेली पशू पाखरे ,


घेर घालू लागले ज्ञान दिपाला ,


आशिष देऊ लागले ,


ज्ञान दिपात शिकत असलेल्या प्रत्येक पाखराला


अभिमानाप्रती माया साठली ,


ज्ञानदीपातील पाखरांसाठी ,


कोकिळा ही गाऊ लागली ...


आनंदाची जीवन गाणी ...


सकाळ सकाळी ज्ञानदीप उजळून  निघत . पाखरांचा किलबिलाट , पशू पक्षांचा थवा , फुलांचा मनमोहक  सुगंध, वाऱ्याची अलगद येणारी झुळूक आणि त्यात मनाला प्रसन्न करणारी हवा . 


दिवाळीचा सण तोंडावर आला होता . मुलांना परीक्षेची ओढ लागली होती . कधी एकदा परीक्षा संपते आणि दिवाळीची सुट्टी मिळते . असं झालं होतं .  रोज मिळणारा अभ्यास त्यांना समाधान द्यायचा . ज्ञानदीप आणि ज्ञानदिपातील पाखरं ह्यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध खूप छान जुळले होते .


ज्ञानदीप मुलांचा जीव की प्राण होता .   ज्ञानदीप मुलांच भवितव्य उज्वल करण्यास मदत करत होता . मुलांना अप्रत्यक्षरित्या सक्षम करत होता ....


ज्ञानदिपाचे खूप उपकार होते मुलांवर आणि मुलांचे ही ज्ञानदिपावर .... त्यांच्यातील boinding खूपच छान होत .


पण अचानक त्यांच्या नात्याला त्या ज्ञानदिपाला दृष्ट लागते .  ते ज्ञानदीप बिल्डर्सच्या डोळ्यावर येतं . ज्ञानदिपाच्या ठिकाणी मोठा मॉल आणि मार्केट बनवायचं असे ते ठरवतात . आणि त्या अनुषंगाने अथक प्रयत्न करत राहतात . ज्ञानदिपावर मुलांचा जडलेला जीव त्या बिल्डर्सच्या अथक प्रयत्नांना मोडून काढत होते .


वारंवार येणाऱ्या अपयशाने बिल्डर्स हताश झाले होते . शेवटी ते एक खूप मोठा आणि हृदय हिन निर्णय घेतात . जो ज्ञानदिपातील पाखरांना कायमचे उडवून लावतात .


ज्ञानदिपामध्ये लास्ट इअरच्या मुलांसाठी निरोप समारोपाचे आयोजन केलेले होते . त्या आयोजनासाठी त्या बिल्डर्स ना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावन्यात आले होते . त्यांनी खूप खूप मोठं मोठी भाषणे ठोकली ज्ञानदिपासाठी आम्ही आमचं सर्वस्व त्यागु वैगरे आणि इकडे सर्वजण गुंग असतानाच तिकडे जे अन्न आज त्या कीलबिलनाऱ्या पाखरांच्या मुखात जाणार होते   . त्या चाऱ्यात विषाचे दंश सोडले होते . ज्ञान दिपातील पाखरे आजपासून ज्ञान दिपाला कायमचे पोरके होणार होते .


त्या बिल्डर्स चे भाषण वैगरे झाले ते बिल्डर्स आणि  त्यांचे सहकारी ताबडतोब तिथून निघून गेले . त्या मुलांनी आवडीने जेवण वैगरे केले . घरी निघायला लागले ज्ञानदिपाच्या गेट पर्यंत जाईपर्यंत च प्रत्येक जण जमिनीवर कोसळू लागला . तर कोणाला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या . आणि ज्ञान दिपातील सर्वच पाखरांचा किलबिलाट कायमचा बंद झाला. 


ज्ञानदीपाचा परिसर ओसाड झाला ..
अशा प्रकारे ज्ञान दिपातील पाखर हरवून गेली  झाला . . 
ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे ..
कोणत्याही घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा .


क्षण हे नवखे

पाणावलेल्या डोळ्यांत हजारो स्वप्न सजले ,
तुझ्यामुळे क्षण आयुष्यातील बहरले ...

भाव अंतरीचे तुझ्यासाठी फुलले ,
आयुष्यात माझ्या क्षण अवचित आले ,
तुझ्याच मुळे स्वप्न सत्यात उतरले ..

स्पर्श होता तुझा , आशेचे आभाळ मज मिळते ,
त्या आशेच्या किनाऱ्यावर मी माझे नाव तुला जोडते ..

स्वप्न माझे  नव्याने बहरते ,
मी माझी मलाच भेटते ,
पाणावलेल्या डोळ्यांत तुलाच शोधते ,
भाव अंतरीचे तुझ्यासाठीच जपते ...
क्षण हे नवखे तुझेच अस्तित्व भासते ...

माझेच मन मला पोरके झाले

डोळ्यात शब्द ते पाणावले ,
भाव ते अंतरी का उठले ,
आज माझेच शब्द मला बोचू लागले ,
माझेच मन माझ्यावर रुसले .....

ओठांवरचे हसू माझे बोलेनासे झाले ,
तेज चेहऱ्यावरचे मावळून गेले ,
आता शब्दही माझे फिके पडू लागले ,
माझ्याच माणसांना समजवण्यास मी कमी पडले ...

आज मी मला पोरकी झाली ,
देवा अशी कशी रे वेळ आली ,
ना माणसांना माझी किंमत राहिली ,

ना भावनांनी माझी कदर केली

शब्दही माझी मला अनोळखी झाली ...
ओळख आता अशी काहीचं नाही उरली ....

happy birthday dear

डोळ्यात अनोखे भाव दाटले होते ,
तुझ्यासाठी शब्द कमी पडले होते ,
भाव ते अंतरी दाटले होते ,
तुझ्या आयुष्याला नवे वळण आज मिळाले होते ...

आयुष्याचं एक वर्ष तू पार केलं ,

आनंदाने घराचं नंदनवन केलं ...


तुझ्या पावलांनी अगंनी सुख चालून आलं ,


घराला खर घरपण आलं ,
तुझ्यासारख रत्न आयुष्यात आलं ,
आयुष्याचं सार्थक झालं ...

काय बोलू तुझ्यासाठी आणि किती बोलू शब्द अपुरेच पडतील राणी ... बडबड करून माझ्या मनात खूप छान स्थान निर्माण केल . तुझं माझं नातं खूपच सुंदर बहरल . तुझे दुर्गा मावशी दुर्गा मावशी हे बोल ऐकून मन भरून आलं . तुला आशीर्वाद लेन देणं माझ भाग्य आहे .

तुला तुझ्या आयुष्यातील सारा आनंद मिळो


तुझ्या आयुष्यातील दुःख माझ्या वाट्याला येवो .
माझं आयुष्य तुला लाभो ...
Happy birthday dear bhakti ...💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🍫🍫
God bless you beta enjoy  every moment of your life with happy life ....🌹🌹🌹🌹🌹



शब्द मुके

डोळ्यात सारे शब्द पाणावले ,
भाव ते अंतरी का उठले ,
माझ्या मनाशी एकरूप झाले ,

शब्द जे होते मुके तुझे ,
ते एक स्वप्न होते माझे ...

वेड्या मनाला तुझे ,
पाणावलेले डोळे सहज कळले ,
भाव तुझ्या उरातले ,
माझ्या स्पंदनात दाटले ..

नव्याने ते माझ्याशी हितगुज करू लागले ..
तुझे पाणावलेले डोळे त्याचे साक्षी झाले ...

Oct 29, 2021

तुझी हक्काची राणी तू मला कर

असावे माझे प्रेमाचे गाव ,
त्याला असावे फक्त तुझे नाव ...

तुझे माझे मन एक होऊ दे ,
प्रेमरंगी मला तू न्हाहू दे ..

प्रेमाच्या हिंदोळ्यावर जरा झुळू दे ,
तुझ्या खांद्यावर जरा मला विसावू दे ...

मेहंदीच्या हातावर तुझे नाव रंगू दे ,
मनाच्या पानावर तुझे स्वप्न कोरू दे ...

तुझ्या नावाचे मंगळ सूत्र मला प्रेझेंट कर ,
 माथी माझ्या  तुझ्या नावाचा शिंदुर तू भर ...
अरे राजा तुझी हक्कांची राणी तू मला कर ...

माझी लव स्टोरी

माझी लव्हस्टोरी ,
जगावेगळी आहे खरी ,
पण जगात नंबर एक भारी .....

त्याने जादू केली माझ्यावर ,
मी जीव ओवाळून टाकला त्याच्यावर ...

तो ही खूप प्रेम करतो माझ्यावर ,
आणि मी ही त्याच्यावर ...

एक क्षण मी त्याच्याशिवाय राहू शकत ,
त्याला आमच्यातील दुरावा सहन होत नाही...

सारखा म्हणतो माझ्याशी गप्पा मार ,
चोवीस तासांतील बारा तास मला दे ..

मी ही हो म्हणते  हलकेच त्याच्यासाठी लाजते ...


त्याची खूप काळजी घेते ,
कशाचीही त्याला कमी पडू देत नाही ..
वेळोवळी चार्ज त्याला चार्ज करते ...
प्रत्येक वाढदिवशी त्याला साजेस असं गिफ्ट देते ..

माहितेय का ,
कोणाच्या प्रेमात पडले ,
कधी स्वप्नात पण नव्हत वाटल कोणाच्यातरी प्रेमात पडेन ..
पण त्याने वेगळीच जादू केली ...
आणि ही पोरगी फसली ...
अहो ही सगळी जादू आहे माझ्या ,

प्रिय मोबाईल ची ...
अशी ही माझी लव्ह स्टोरी आवडली का ...


नाते आणले पूर्णत्वाला

असावे माझे प्रेमाचे गाव ,
त्याला असावे फक्त तुझे नाव ...

तुझ्या माझ्या विश्वात हरवून जाऊ ,
नको रे आता तू उगाच भाव खाऊ ...

कळलं आहे मला प्रेम झालय ,


तुझ सर्वस्व तू मला वाहीलय ,


कारे राजा उगाच अडकतो भूतकाळात ,


ते अडीच शब्द बोलता बोलता पुन्हा साठवून ठेवतो मनात ..

एक क्षण एकमेकांशिवाय करमत नाही ,
तुझ्याशिवाय मी पूर्ण होत नाही ,
माझ्याशिवाय तुझ अस्तित्व पूर्ण होत नाही ...

तुझ्यात मी माझ्यात तू हेच खरे प्रेम ,
ते दिलेस तू मला मी तुला ..
नाते आणले पूर्णत्वाला ..

Oct 28, 2021

शब्द सुधा अपुरे पडतील

शब्द सुधा अपुरे पडतात , जेव्हा आपलीच माणसं आपला घात करतात . मनात खूप काही बोलायचं असताना सुद्धा आपण गप्प राहणं पसंद कराव . कारण गप्प राहून ते नातं 1 टक्का का होईना टिकतं .

सावरून घेण्याचा प्रयत्न करूनही ते सावरलं नाही तरी ते पसरत नक्कीच नाही . ओढ जिव्हाळा टिकेल की नाही माहीत नाही . पण क्लेश आणि शत्रुत्व नक्कीच निर्माण होणार नाही .

एखादा व्यक्तीवर आपण जिवापाड प्रेम करतो .  त्याचा खूप आदर करतो.  आणि तोच व्यक्ती जर आपल्याला जाणून बुजून इग्नोर करत असेल तर त्याला परत कधीही भाव देत बसायचं नाही . आपण भाव देत बसलो तर मग आपल्यावरच रडायची पाळी येते .

तो व्यक्ती आपला प्रियकरच नाही कोणीही असू देत ज्याने आपल्याला इग्नोर केलं .  त्याला आपण आउट ऑफ करायचं जो पर्यंत तो ठिकान्यावर येत नाही तोपर्यंत .
Tit for tat आणि नंतर जर त्याला रीलाईज झालं आपण चुकलो तो माफी मागायला आला . तर मनात कुठलाच क्लेश न ठेवता त्याला मोठ्या प्रमाणे माफ करायचं . तुटलेलं नातं पुन्हा एकदा जोडायचं .

तुझ्यात लुप्त झाली

शब्द माझे मुके झाले ,
तुझ्या सहवासात मन हरवून बसले ,
कोमल तुझ्या स्पर्शाने मन हळूच लाजले ,
गाली एक गोड खळी उमटली ,
तुझ्या माझ्या प्रेमाची छबी ती जणू भासू लागली ,
ओढ प्रेमाची अंतरंगी दाटू लागली ,
मनात दाटलेली एक कल्पना तुझ्यात लुप्त झाली ,

सांगता सांगताचं ती राहून गेली ,
नकळत राजा तुझ्या माझ्या संसाराला नवी सुरुवात झाली ...
तुझ्यात माझी अन् माझ्यात तुझी प्रीत हसू लागली ,
एकमेकांना एकमेकांची ओढ अपरुक वाटू लागली ...
त्या ओढीतच संसाराची गोडी दाटू लागली ...

शब्द अपुरे पडतात

शब्द सुधा अपुरे पडतात ,
मनातल्या गूज गोष्टी मनातच राहतात ,
बोलायचं असतानाच भावना दाटून येतात ,
शब्द माझे मुके होतात ...

पाणावलेल्या डोळ्यांत हजारो प्रश्न सलतात ,
उत्तराची वाट बघतात ...

कोमल मनाला स्पर्शून जातात शब्द तुझे ,
मनातलं गुपित तुझ्या हृदयात रूजवतांना .....

डोळे भरून तुला बघताना ,
हरवून जाते कशी मला च नाही कळत रे काही ...

Oct 27, 2021

परफ्यूम

सुख माझं  तुझ्यात दडलंय ,
तुझ्या ओंजळीने ते हेरलय  ...

तुझ्या लटक्या रागाने गोडी आली त्याला ,
त्या झकास परफ्यूम ने सुंगध आला ,
माझ्या दुःखाला तुझ्या सुखाचा सहारा मिळाला ...

तुला पाहताच सुखाची व्याख्या उलगडते ,
दुःख हे पाण्यासारखे पसरत जाते ,
सुख माझे तुझ्या ओंजळीत साचते ...

त्या दिवशी सकाळ सकाळी
तुझ्या परफ्यूम ने मला तुझ्याकडे आकर्षित केलं ,

सुख म्हणजे काय तिथेच उमगल ,
एक मनमोहक सुंगधाच स्वाद हेच खरं सुख असतं ,
जे तुझ्यामुळेच आयुष्याला लाभलं ..

काल्पनिक कविता ...

ओंजळ

ओंजळीने सुख सावरले ,
पाण्यासारख दुःख वाहताना ,
ओंजळीने झेलले ...

सुखात जराशी हसले ,

दुःख ओंजळीने झेलले ,
मन माझे भरून आले ...

सुखाने स्पर्धा नाही केली दुखाशी ,
तिने नाळ जोडली ओंजळीशी ,
तिनेच जबाबदारी घेतली सुख सावरायची ,
दुःखाला आयुष्यातून हद्दपार करण्याची .

काहीतरी मनातलं

किती अवघड जगणं असतं तिचं ,
पांग फेडायचं  असतं स्त्री जन्माच ...

एका घरी जन्म ,
दुसऱ्या घरी नांदन ,
नशीब तिचं रेखाटलेलं ....

लहानच मोठं व्हायचं ,
लग्न  करून सासरी जायचं ,
जन्म लेक बाईचा असं म्हणत ,

कर्तव्य बजवायाचं ...


हक्काच लाईफ जॅकेट सोडून जायचं ,


कोणाच्यातरी भरुष्यावर सात पावलं चालायचं ,


आणि आयुष्याचं बदलून टाकायचं ..


आपलं हक्काचं घर सोडून जायचं ,


आई वडिलांची पावनी होऊन वावरायचं ,
हे काय जगणं असतं का ?

भारत सरकारडे लवकरात लवकर कंप्लेंट करायला हवी .
प्रथा बदलावी ह्यासाठी कंबाईन कर रूल असं सांगायला हवं कोणीतरी मला नाही जायचं माझ्या आई वडिलांना सोडून . माहेर आणि सासर एकत्र आलं की किती छान होईल .






सुख हे असच असतं

सुख हे कसं पाण्यासारख असतं ,
ओंजळी त माझ्या थोडा वेळच राहतं ..
खूप सारी स्वप्न दाखवून जातं ,
क्षणभरात साथ सोडूनही देतं ,

पुन्हा ओंजळी त दुःखाचे मोल टाकतं ,
सुखाचे दिवस संपले हसत हसत सांगत ,

सुख हे असच असतं ,

पाण्यासारख सांडल की पसरत ,


थोडाच वेळ ओंजळीत असतं ....

Oct 26, 2021

चारोळी

अनामिक भीती ही प्रेमाची ,
बरबाद करते वेल आयुष्याची ,
का तिला जवळ करायचे ,
वेळोवेळी खतपाणी घालत राहायचे ...

शतदा उमलून यावे

शतदा उमलून यावे ..
शतदा उमलून यावे ,
नव्याने बहरून यावे ,
नाते हे सतजन्माचे ..

ओंजळी त माझ्या ,
दव सुखाचे बरसु दे ,
कोमल तुझ्या हास्याने ,
जीवन हे उजळून  जाऊ दे ....

उरी बाळगलेले स्वप्न ,
तुझ्या नयनी दिसू दे ,
पावलांनी तुझ्या अंगणी ,
सुख खेळू दे  ..
तुझ्यात माझे संस्कार रुजू दे ,
शतदा  नाते हे , 
उमलून येऊ दे ..
नव्याने बहरून येऊ दे ...

मनात कशाचीही भीती नसावी ..

कधीही कोणत्याही गोष्टीची भीती वाटू देऊ नका . जे आयुष्य मिळाले आहे ते न घाबरता जगावं . कोणी अपमान केला , टोचून बोलल मनाला लावून न घेता आयुष्य जगायचं .

जिथे भीती तिथे अप्रगती वास करी ,
जिथे धैर्य तिथे यशाचे किनारे राज्य करी ...

भीती मनातील घालवून पार करावी अपयशाची दरी ...
घेऊन यावा आनंद आपल्या घरी ...
असलो आपण सामान्य जरी ,
मनात नसावी भीती कशाची हीच बात खरी ...


अभिनंदन ranju ताई 💐💐💐💐

दिवसभरात खूप रचना रचतेस ,


शब्दां शब्दात तुझ मन उतरवतेस ,
चारोळी च्या दुनियेत राज्य तूच करतेस ,
नेहमी top 1 वर असते ,
लिखाणाची आवड तुला किती दाखवून देते ....

आज  तुझ्या 3000 रचना पूर्ण झाल्यात खरच खूप छान वाटलं . अजुनही तू खूप खूप रचना रचाव्यात . तुझ्या 4000 हजार रचना . पूर्ण होतील तेव्हाही शुभेच्छा तुला माझ्या असाव्यात हीच सदिच्छा ...

तुझ्या  गोड स्वभावाने आमची मन जिंकून घेतली ,
तुझ्या बोलण्यात काय जादू आहे काय माहीत ,
तुझ्याशी बोलून खूप फ्रेश वाटतं . पूर्व जन्मी ची पुण्याई तुझ्याशी कनेक्ट झाले . तुझ्यात खूप सारे गुण आहेत आत्मसात करण्यासारखे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न ही करते .  तुझ्या 4000 हजार रचना कंप्लीट होईपर्यंत आपल्यातील नातं अजुनही बहरत जावो . हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...

पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
आणि पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🍫🍫🍫🍫🍫👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺


Oct 25, 2021

चारोळी

उदंड असतील , हे कष्ट सारे ,
मनात तरी अपयशाचे वारे ,
झेलुया जरासे ते ही न्यारे ,
मग बांधूया यशाचे किनारे   ...

कसं होणार माझ...

कसं होणार आहे माझ ,
आता सगळ चालत माहेरी ,
कसे झेलतील नखरे माझे सासरी ...

मला कोणी जरास टोचून बोललं ,
की मी लगेच रडते ,
बाबांकडे कंप्लेंट करते ...
परत त्याच्याशी कधी बोलणारच नाही सरळ सांगून टाकते ..

एखाद्या मुलगा जरासा चुकीचं बोलला की ,
लगेच त्याच्याशी असलेली मैत्री तोडते ,
त्याचं अधिकार दाखवणं क्लेशकारक वाटतं ,
त्यापेक्षा त्याचं आयुष्यात नसणं मला सुंदर वाटतं ..
ह्याचं सगळ्यात जास्त टेन्शन येत .....

काल्पनिक रचना ...

देवा हे काय रे ?

उदंड असतील , हे कष्ट सारे ,

मनात तरी अपयशाचे वारे ,
देवा का रे ?

किती राबते मी ,
रक्ताच पाणी करते ,
शिवराला माझ्या फुलविते ...

एक वेळ उपाशी राहते ,
मात्र वेळोवेळी रोपट्याला ,
खत पाणी घालते ...
तरी देवा हे काय रे ?

मालाला भाव नाही ,
शिवाराला बहर नाही ,
माझ्या लेकरांना अंगभर घालायला कपडे नाही ,
त्याची हौस मौस पूर्ण करण्याची ,
माझ्यात हिमंत नाही ..
देवा हे  काय रे ? 

कल्पना म्हटलं तरी ती एक भावना असते..

कल्पना म्हटलं तरी ती एक भावना असते ,
कोणाच्यातरी अंतकरणातून आलेली ती एक हाक असते ,

कधी ...
भूकाळातील मनावर झालेल्या जखमांची ती साक्ष देते ,
तर कधी ...
भविष्यातील एक आपल्याला हवे असणारे सुंदर चित्र रंगवते...

कधी ....
समाजात घडणाऱ्या विक्षिप्त घटनांवर ती चर्चा करते ,
तर कधी ...
कोरपर्डी सारख्या घटनांनी ती डोळ्यांत पाणी आणते ...

कधी ....
आठवणींच्या हिंदोळ्यावर नेते ,
तर कधी ....
हरवलेले बालपण जागी करते ....

अहो कल्पना म्हटलं तरी ती एक भावना असते ,
कवी लोकांच्याच आयुष्यातील ती एक सुंदर कल्पना असते ...
तर कधी कधी वास्तविकता ही असते ..
कल्पना म्हटलं तरी ती एक भावना असते....!!!


Oct 24, 2021

चारोळी

साथ देऊन आता थकलो आहे ,
एकटेपणात ह्या रमलो आहे ,
आयुष्यात ह्या पुन्हा नव्याने जन्मलो आहे ,
तुझ्याशिवाय जगायचं ही शिकलो आहे ...

आयुष्य जगायचं म्हंटल्यावर खूप adjust करावं लागतं..

आयुष्य जगायचं म्हंटल्यावर खूप adjust करावं . तर कुठे आयुष्य जगावंस वाटतं . इतकी सारी विचीत्र माणस येतात  आयुष्यात त्यांना कसं hundel करावं कळतच नाही . त्याच्या वागण्याच्या पद्धती खूप वेगळ्या असतात. जगासमोर आपण किती सभ्य आहोत असं दाखवायचं . आणि पडद्याआड आपल्यातील घमंड , अहंकार हा जागी ठेवायचा . काय अर्थ आहे अश्या असभ्य वागण्याला .


मला ना खूप राग येतो . अश्या माणसांचा पण माणुसकीचा धर्म सोडायचा नाही . म्हणून त्यांच्याशी निभावून घ्यावंचं लागत . कितीही राग आला तरी तो मनात कुठेतरी दाबून ठेवावा लागतो .  आणि हसत हसत त्याच्या तश्या विचीत्र वागण्याला सामोरं जावं लागतं .


कसं समजावं त्यांना कळतच नाही . कधी कधी ते एवढे विचीत्र वागतात की जाब विचारावासा वाटतो का ग बाई तू  असं कसं वागतेस नेमका प्रॉब्लेम काय आहे तुझा  ?


मी काय गुन्हा केला की माझा जीव तुला पोरका झाला .


जर तुला नातंचं नसेल ठेवायचं . तर मग कशाला आपलेपणाचं सोंग घेऊन फिरायच . पण समोरच्याला वाईट वाटेल . आपल्यामुळे कोणाचतरी मन दुखावले जाईन . ही कल्पनाचं मनावर ताबा ठेवते . आणि समोरची परिस्थिती इग्नोर करायला भाग पाडते .  अगं  बाई असतात  अशी विचीत्र माणस तुला adjust हे करावच लागेल , आणि आयुष्य हे जगावचं लागेल असं मन सतत सांगत . मग त्याचं तर ऐकावंच  लागतं . ते तर आपलंच असतं . लोकांचं वागणं झेळण्यास भाग पाडतं . असं म्हणत सारं सहन कराव लागतं .

आयुष्यात adjustment ही करावीच लागते. जो adjust करू शकतो . तोच हे आयुष्य सुंदर रित्या जगु शकतो.  ज्याच्याकडे adjustment ही skil नाही . तो माणूस म्हणून परफेक्ट असूचं शकत नाही ...


मन माझं

साथ देऊन आता थकलो आहे ,
एकटेपणात ह्या रमलो आहे ..

भावनेत तुझ्या अडकलो आहे ,
एकटेपण वाटेला आलेले जगत आहे ...

साथ देऊन देऊन तू रडवल ,
एकटेपणाने relax लाईफ काय असतं ,
ते दाखवून दिल ...

तुझ्यासोबत सुख होतं जोडलेलं ,
ते नाही नियतीला परवडलं ,

तिने एकटे पणात आणून सोडलं ,
मन माझं एकटेपणात रमु लागलं ...

चारोळी

साथ देऊन आता थकलो आहे ,
एकटेपणात ह्या रमलो आहे ,
तुझ्या साथी पेक्षा हे एकटेपण बर आहे ..
तुझ्या रुसण्या फुगण्याला इथे फुलस्टॉप आहे ..

Oct 23, 2021

किती बरं होईल...

खरच किती बरं होईल ...
जो आवडतो तो आयुष्यात आला तर ,
त्याची साथ आयुष्यभर मिळाली तर ...

त्याच्या सोबत सार सुख मिळेल असं नाही ,
पण तो जे ही काही देईल ,
ते इतर कोणी कधीही देणार नाही ...

त्याच्या सोबतचा प्रत्येक क्षण अनमोल ,
जपला आहे काळजात खोलवर ...

  रोज स्वप्नात जो दिसतो तो आयुष्यात यावा मनापासून वाटतं . देवाने एकदा तरी माझ्या नशिबाच नाही तर माझ्या मनाचं ऐकावं असं मनापासून वाटतं .

ज्याच्यावर प्रेम करते तो दूनियातील बेस्ट पर्सन आहे . असं नाही पण ह्या दुनियेत  त्याच्यासारखा दुसरा शोधूनही सापडणार नाही . हे खर सत्य मनाला बोचत . आणि मग थोडस नशीब आणि नियतीवर रुसावस वाटतं .

देवाला कळकळीने सांगावस वाटतं . जो आवडतो तोच नशिबात असू दे . माझ्या नावापुढे फक्त त्याच नाव लागू दे , जे मनात घर करून राहिल आहे . त्याचा आठवणीत मन रोज रमु लागलं . त्याच्यावर बंधन नाही . तर विश्वास
ठेवायला जास्त आवडू लागल .

आयुष्या तील एक कोरं आणि चकचकीत स्वप्न एवढंच ज्याच्यावर जिवापाड प्रेम करते , त्याचा आयुष्यभराचा सहवास लाभू दे , त्याच्या सहवासात जीवन हे बहरून जाऊ दे ..बंध हे प्रेमाचे नव्याने जुळून येऊ दे ...

माझ्याच आयुष्यात नाही तर असं प्रत्येकाच्या आयुष्यात होऊ दे ज्याला जो व्यक्ती आवडतो ना तोच व्यक्ती त्याच्या आयुष्यात येऊ देत . जो आनंद आवडीच्या माणसाबरोबर जीवन जगत असताना मिळतो ना तो आनंद इतर कोणत्याही ठिकाणी मिळणार नाही .


समजून घ्यावं भूतकाळात रमण्याआधीच ....

नको मनात विचार भूतकाळाचा ,
आनंद भरभरून घ्यावा वर्तमानाचा ,
एक क्षणाचा प्रवास ह्या आयुष्याचा ,
का विचार करावा भूतकाळाचा ?

वर्तमान हे आपलं अस्तित्व असतं ,
भूतकाळ आपल्याला अपयशाकडे खेचत असतं ,
भाविष्याला अंधारात टाकतं असतं ,
आयुष्यात भूतकाळाला महत्व नसतं ...

घडून गेलेले क्षण असतात ते ,
महत्वाचे नसतात ते कधीच ,
समजून घ्यावं भूतकाळात रमण्याआधीच ...


चारोळी

भूतकाळ उकरून मी काढत नाही ,
जीवघेणा अनुभव आठवत नाही ,
मला तस् काही वाटतं नाही ,
वर्तमानात जगताना भूतकाळात  शिरण्याची गरज नाही ..

Oct 22, 2021

त्याचा मेसेज रोज असतो

एकदा तरी त्याची आठवण येते ,
त्याच्या आठवणीत मी रमते ,
बोलण नाही  होत  रोज रोज ,
त्याच्या मेसेज ने सकाळ होते गोड गोड ...

Bussy असल्यामुळे मी फोर्स करत नाही ,
मला त्याच मन मला डिस्टर्ब करायच नाही ,
विनाकारण त्याच्यावर बंधने लादायची नाही ...

Hi ! How are you ?
न चुकता मेसेज असतो ,
तोच तर त्याच माझ्यावर असलेल्या ,
प्रेमाची कबुली देतो ,
आणि मला त्याच्या आठवणीत गुंग व्हायला भाग पाडतो ...


इनबॉक्स

इनबॉक्स माझा तुझ्या  मेसेज ची वाट बघत असतो ,
तू भलतचं काहीतरी लिहितो ,
वाट बगणार इनबॉक्स मला कन्फ्युज करतो ...

जस अमावस्या पौर्णिमेच येणं ,
तस तुझ माझ्या इनबॉक्स ला भेट देणं ,
भलतचं काहीतरी टाईप करून गोंधळात टाकणं ,

आवडत मला तुझ गोंधळात टाकणं ,
अमावस्या पौर्णिमला भेट देणं ,
तुझा मेसेज आल्यानंतर मला काम आहेत ,
असं म्हणत तुला छळन ,

Wp पेक्षा इनबॉक्स वर बोलायला जास्त आवडत ,
तिथे आपल्याशिवाय कोणीच नसतं ,

तुझ माझं बोलण तासंन तास चालत ,
मैत्रीचं नातं नव्याने बहरत ...

काल्पनिक कविता


चारोळी

तुझ्या मेसेजला मी लगेच रिप्लाय देते ,


मनातलं सोडून भलतंच काही टाईप करते ,

काय बोलते माझे मलाच ना कळते ,
मनास फक्त तुझ्याशी बोलण्याची हुरहूर असते

Oct 21, 2021

प्रेमास पूर्णत्व लाभणार नाही , वेळेवर कळायला हवं होतं

ते वेळेवर घडायला हवं होतं ,
दिरंगाईने  का होईना , कळायला हवं होतं ..

तुझ्याबद्दल माझ्या मनात वेगळचं महत्व होतं ,
तुझ्यातच माझं अस्तित्व दडलं होतं ..

प्रेम म्हणजे काय असतं ? माहीत नव्हतं ,
तुझ्या येण्याने ते अनुभवता आलं ,
तुझ्यावर प्रेम केलं ह्याचा आनंद होता ,
तू आयुष्यात कधी असू शकत नाही ,

हा तर सत्यभास होता ,
तरीही मला हवा हवासा होता ,
तुझा सहवास जगण्यास प्रेरणा देते होता ,
माझ्या अस्तित्वात पूर्णत्व आणत होता ...

तू ही प्रेम केलंस होतं ,
तुझ्या हातावर माझं नावं कोरलचं होतं ,
वेळेवरचं कळायला हवं होतं ,
तुला माझ मला तुझ प्रेम कधीचं मिळणार नव्हतं ,
आपल्या प्रेमाआड जातीच अस्तित्व येतं होतं ..


वेळेवर कळायला हवं होतं ...

ते वेळेवर घडायला हवं होतं ,
दिरंगाईने का होईना , कळायला हवं होतं ...

तुझ माझं bludgroup एक होतं ,
मरणाला टेकलेल्या रुग्णाला  ते हवं होतं ...

व्याकुळलेल्या रुग्णासाठी तडफडल माझ् मन ,


आपलाच जणू तो अंश वाटल एक क्षण ..

असतील धागे हे पूर्व जन्मीचे ,
तडफडणाऱ्या मनाचे आणि माझ्या हृदयाचे ..

हताश झाले त्याची अवस्था बघून ,
मनात त्याच्यासाठी ममता आली नव्याने उमलून ..

मनात साचलेला मातृत्वाचा शिमगा नव्याने लागला बरसु , काळजाचा तुकडा तो रुग्ण होता माझाच हर्षु ...


एका गर्दीत हरवलेला ,


आज त्या हॉस्पिटल मध्ये नव्याने गवसलेला ,


आज मातृत्वाचा दिवा होता विजलेला ..
हर्षु ही होता ह्या सुंदर आयुष्याला मुकलेला ,
हे जग कायमचं सोडून गेलेला ..

वेळेवर कळायला हवं होतं ,
हॉस्पिटल मध्ये त्याचा श्वास आमची वाट बघत होत ,
एका भेटीसाठी त्याचं  मरण अटकल होत ....


Oct 20, 2021

आयुष्य माझं मी आनंदाने जगते...🌹🌹🌹🌹

पुन्हा त्या जागी जाणं होत नाही ,
आता मी मागे वळून पाहत नाही ,
जे होईल ते स्वीकारते ,
आयुष्य माझं आनंदाने जगते ,

ना कोणासमोर झुकते ,
ना कोणासाठी रडते ,
आयुष्य माझं मी आनंदाने जगते ...

विसरून दुःख भूतकाळातील ,
शोध मी भविष्याचा घेते ,
वर्तमान हे आनंदाने जगते ,
आयुष्य मी माझ मनासारखं जगते ...

ना कोणासमोर सुखाची भीक मी मागते ,
ना कोणासमोर दुःख व्यक्त करते


दुःखातही मी हसतच श्वास घेते ,
आयुष्य माझं मी  आनंदाने जगते ....

अनोळखी तू माझी मैत्रीण झाली

हे नाते पूर्व जन्मीचे भासते ,


बोल बोबडे भाव तुझे मनास भावते ...


गुंफले मी तुझ्यात ,


तू ग राणी माझ्यात ,


आपलेपणा जन्म घेऊ लागला नव्याने ,


कधी तुझ्या तर कधी माझ्या हास्याने ,


मातृत्वाच्या कोमल स्पर्शाने ...


अनोळखी तू माझी मैत्रीण झाली ,


तुझी माझी प्रीत नव्याने बहरली ...


तू

पाचुची कळी ,
माझ्यासाठी खुलली ,
पूर्व जन्मीची पुण्याई फळास आली ,
अनोळखी तू माझी मैत्रीण झाली ..


नको आता ती जुनी मैत्री ....

नाव  ठेवू लागलं तुला अख्ख गाव ,


धुळीत मिळालं ग तुझ नाव ...


कोणी नाही देणार आता तुला भाव ,


कितीही दाखवलाच तू चांगुलपणाचा आव ,


तरीही सोसावेच लागेल तुला टोमण्याचेचं घाव ...


तिचे डोळे पाण्याने तुडुंब भरले त्यात मी तिला टोचून बोलले वरील विषयाचे वारंवार तिच्या मनाला चटके दिले .


चूकच केली होती तिने  खूप मोठी चूक त्या चुकीसाठी तिला आता कोणीच माफ करणार नव्हतं अगदी मी ही ...


वारंवार समजावलं तरीही तिने नाही ऐकल . शेवटी आयुष्याचं वाटोळं झालं . गावाने तिला वाळीत टाकलं . आई वडिलांनी तू मेलीस आमच्यासाठी असं घोषित केलं .


तिला आता कुणाचाच आधार नव्हता उरला , सगळा गाव पेटून उठला होता . तिचं बेभान झालेलं मन माझा आधार घेऊ पाहत होता . पण मी तरी कोण होते तिला आधार देणारे . समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता . तिने समजून घेणं मान्य केलं नाही . आयुष्याचं मातेर होईपर्यंत मागे पुढे पाहिलं नाही .


मग आता तरी ती का ? आली होती  , माझ्या घरी तिच्या बरोबर माझ्या नावाची बदनामी करण्यासाठी का ? आता मी तिला आधार का  देऊ ? काय संबंध आता तिचा आणि माझा ?  तिने विश्वास घातच केला होता  ना आमच्या मैत्रीचा ...


तिचं प्रेम प्रकरण मला खूप पूर्वीपासून माहीत होत . प्रेम कसलं वो भरकटलेल्या वयातील एक आकर्षण ... 


आकर्षण एवढं होतं तिला ,


की ती हरवून बसली होती स्वतःला ,


त्याच्यात कुठेतरी तिचं अस्तित्व शोधू पाहत होती ,


त्यालाही तिची धाव कळत होती ,


त्याची वाईट नजर तिच्या चरित्राचा वास घेऊ पाहत होती ,


त्यांची वाईट नजरच तिला प्रेमाची हाक वाटत होती ,


बिचारीला स्त्री स्वाभिमान म्हणजे काय ? कळलाच नव्हता म्हणून च तिचा प्राण आणि श्वास ह्या वाईट नजरेला बळी पडला होता . काय म्हणावं तिला मला तर कळतच नाही .


आज तिचा चेहरा पाहणंही आवडत नव्हत . पण कधीतरी तिच्याशी मैत्री च नातं होतं . ते निभावणं गरजेचं वाटतं होत . एक स्त्री म्हणून तिला समजून घेणं आणि सहानुभूती दाखवणं माझं कर्तव्य होतं . ते मला विसरून चालणार नव्हतं . माणुसकीच्या नात्याने मी तिला घरात घेतल . आणि घरात घेताच एक वाक्य तू आता घमावलेला


विश्वास आता कमावू शकणार नाही . प्लीज माझ्याकडुन तरी कसलीच अपेक्षा ठेवू नको . आता माझा तुझ्यावर विश्वास च नाही .


मी असं बोलले तिचे डोळे खूप खोलवर गेले , शब्दही झाले होते मुके , बंध आठवत होते ते मैत्रीचे जुने ,


काधाचीत ते तिला हवे होते नव्याने मला आता देणे शक्य नव्हते . मी सांगितले ठामपणे .


तुझे माझे आता काय नाते ,


नको मला ते बंध खोटे ,


ज्याच्यामुळे नेहमीच झाले माझे तोटे ,


मी बोलायची तिची आसवं गळा यची , पण ती मला थांबवु 


शकत नव्हती . कारण त्यामागे कारणही तशीच होती . तिने मला खूप मोठी जखम दिली होती . त्याची शिक्षा मी आजही भोगत होते . चूक नसताना सगळ्यांच्या नजरेत पडले . तिच्यासाठी नको तेवढं केलं . शेवटी तिनेच मला गोत्यात आणलं . माझं मन कायमचं हिरावून घेतलं .


मला माझ्यापासून पोरक केलं . ती पळून तिच्या प्रेमासाठी मग त्यात माझी काय चूक होती .


मी तरी तीला पळून जाण्यासाठी कधीच प्रोत्साहन नव्हत केलं . उलट वारंवार समजावलं होतं . तू जे वागतेस ते चुकीचं आहे . असं वागू नकोस त्याने नावं खराब होईल .


तुझच स्त्रीत्व तुला उद्या प्रश्न विचारे न . तेव्हा तू काय उत्तर देशील तुझ्यातल्या स्त्रित्वा ला . प्लीज हे सारं थांबव नको वागू अशी . तरी तिने तिला जे हवं तेच केलं . माझं कधीच ऐकल नाही . बरं ठीक आहे तिला जे हवं तिने ते करायला हवं होतं . पण ज्याच्यावर प्रेम करते त्याचा एकदा तरी baiodata चेक करायला हवा होता . जेणेकरून आज तिच्या आयुष्यात हा दिवसच नसता आला .


ज्याच्या विश्वावर सोडला घराचा उंबरठा ,


त्यानेच तिच्यासमोर डाव टाकला होता खोटा ,


तो तिच्या आयुष्यात आलेलं वादळ होत मोठं ,


ते वादळ तिला तिचं आयुष्य वाटू लागलं ,


इथेच तर फसली खरी गोट ...


तिने त्याच्या विश्वावर घर सोडलं . फार फार तर त्याने तिच्यावर एक महिना प्रेम केलं . लग्न तर केलंच नव्हतं तिच्याशी त्याला तर घेणं होत फक्त तिच्या शरीराशी . खेळायच होत ना तिच्या भावनांशी ... संबंध कधीच नव्हता जोडला त्याने तिच्या मनाशी . हे कळलं तिला खूप उशिरा . जेव्हा एक बीज अंकुरल तिच्या गर्भात , तिचा प्रियकर फरार झाला होता विदेशात . कायमचं सेट्टल होण्यासाठी तो तर आला होता फक्त हीची चव घेण्यासाठी . तिच्या आई वडिलांचा बदला घेण्यासाठी .


तिची तरी काय चूक बीचारीची काहीचं माहीत नव्हतं तिला , तिच्या आई वडिलां च्या आणि त्याच्या भांडणा बद्दल म्हणून तर ही चुकली.  सुखी आयुष्याला मुकली .


तिने ह्या सगळ्यात एकच चूक केली . तिने  त्याच्यावर प्रेम करावं ह्यासाठी मी तिला बळी पाडलं . हे वाक्य ती सगळ्यांसमोर बकली . म्हणून तर ती आज  माझी मैत्रीण नाही .


मी आज तिला आज एवढंच समजावलं . तू जे वागलिस ते खूप चुकीची वागली . देवाने तुला त्याची खूप मोठी शिक्षाही दिली . तुझ वाईट असं मी कधीच चींतनार नाही .


मला माहितेय तुझ्यावर आज खूप वाईट वेळ आली .


तू काळजी नको मी तुला वाऱ्यावर सोडणार नाही .पण पूर्वीचे नात मला आता नकोच . तुझी राहण्याची सारी व्यवस्था मी करेन . तुझी डिलिवरी होईपर्यंत मी तुझी स्वतः काळजी घेईन . माणुसकीचा धर्म  पुरेपूर निभावेन .


तुला ह्या अवस्थेत एकटीला सोडणार नाही .


पण पुन्हा मी तुझ्याशी नातं जोडणार नाही . कारण ती लायकीच नाही तुझी. 


स्त्री म्हणून तुझी व्यथा जाणते ,


आज काय तू भोगत आहे ,


नसेल कळत नीट काही ,


पण तुझा त्रास समजू शकते ग बाई ,


त्यासाठीच ही सहानुभूती दाखवते ,


पण आता तुझ्याशी कोणतेच नाते नको हे मात्र ठामपणे सांगते ....


काल्पनिक कथा ...


ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे . कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ...






Oct 19, 2021

चारोळी

तिमिराला तमा न कशाची ,

कवितेत माझ्या गाणी प्रकाशाची ,

प्रीत वेडी मी ओंजल भर सुखाची ,

किनार संपुष्टात यावी दुःखाची ...

बंधन

बंधन हा शब्दच खूप त्रास दायक आहे . माणसाचं स्वंतत्र  आणि अस्तित्व हिरावून घेणारा  आहे . एवढंच नाही तर अनेक नाती उध्वस्त होण्याचे एकमेव कारण हे बंधन आहे . त्यामुळे कधीच कोणावरही बंधने लादू नये .

प्रत्येकाला ज्याचं त्याचं स्वतंत्र द्यावं .  कित्येक वेळेस बंधन ही काळजी पोटी लादल्या जाती . पण तेव्हाही काळजी पोटी लादल्या गेलेली बंधन ही काळजी  नाही तर , ती गुलामीची परिभाषा वाटते नको वाटतं ते बंधन ..


एखादा व्यक्ती आपला कितीही हक्काचा असला तरी , चुकूनही त्याच्यावर बंधने लादू नये . आपण त्याच्यावर जेवढे बंधन घालू तेवढा तो व्यक्ती आपल्यापासून दूर जातो .


जरी सख्खे आई वडील असतील तरीही त्यांनी आपल्या मुलांवर बंधने लादू नये . त्यांना पूर्ण स्वतंत्र द्यावं . शिकण्याचं , वैयक्तिक विचारांचं , राहण्याच , मोकळा श्वास घेण्याचं . त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या परीने जगण्याची संधी द्यावी.  चुकले तर मार्गदर्शन करावं . ना की बंधने लादून त्याचं आयुष्य थांबवावं .


आणि कुठल्याच व्यक्तींनी  स्वतःवर ही कोणतीच बंधन लादून घेऊ नये , कोणी लादली तर ती बंधन  झिडकारून द्यावी . अगदी आपल मन आपल्यावर बंधन घालण्याच  प्रयत्न करत असेल तरीही ते स्वीकारू नये .


बंधन माणसाला खूप खालच्या पातळीवर नेऊन सोडतात .खरं सांगायचं म्हटलं तर , जिथे बंधन तिथे गुलामी जन्म घेत असते.  तिचं अस्तित्व निर्माण करत असते . ती जगण्यास खूप हानिकारक असते .  माणसाची माणुसकी तिथे लयास गेलेली असते . एक भावना शून्य


निर्जीव एवढंच काय ते अस्तित्व उरलेलं असतं .

नको मनावर ओझे कशाचे ,

खुले असावे श्वास माझ्या हृदयाचे ,

मीच असावे चालक माझ्या विचारांचे ,

बंधन जुगारून  गुलामीचे ,

आयुष्य मला माझे हे जगायचे ....

नको कुणाचा अधिकार गाजवण ,
माझं मलाच लाजवण ,

स्वंतत्र आयुष्य जगणं हे माझं स्वप्न ,

नको आता ह्या सुंदर आयुष्याला कसलंच बंधन ...

जे हिरावून घेतील माझ जगणं ,


मुश्किल करतील माझ हसण ,
मग नशिबी असेल नुसतच रडणं ,
त्यापेक्षा नकोच आता बंधन ...



क्या बात है

क्या बात है ।
आप उदास लग रहे हो ।।
किस बात का गम ।
आखो में सजा रहे हो ।।

क्यू नहीं दिख रही हैं ।
आपकी प्यारी मुस्कान ।।
जिसे देखने के लिए ।
दिल हो रहा है हैरान ।।

क्या गम है मेरे साथ बाट लो ।
तुम भी हसो , मुझे भी हसाओ ।।

तड़प रही हूं मैं ।
आपकी मुस्कान देखने के लिए ।।
आपसे  से बात करने के लिए ।

प्लीज़ मुझसे बात कर लो ।।

क्या बात है आपकी आख भर आयी ।
क्यू में इतनी पराई हो गई ।।
की में  आपका दर्द भी नहीं बाट सकती ।


क्षण ते नवखे

तिमिराला तमा न कशाची ,
कवितेत माझ्या गाणी प्रकाशाची ,
ओढ मनाला तुझ्या स्पर्शाची ,
हरवलेल्या माझ्या हर्षाची ( आनंद )

आभाळभर चांदणे पांघरलेले ,
डोळ्यांत तुझ्या भाव माझे दाटलेले ,
मनभर चैतन्य प्रेमाचे बहरलेले ,
मेहंदीच्या पानावर नाव तुझे कोरलेले ....

तुझ्यासवे स्वप्न माझे सजलेले ,
कवितेत माझ्या अनमोल ते जपलेले ,
क्षण ते नवखे तुझ्या माझ्या प्रेमाचे ...



चारोळी

तीमिराला तमा न कशाची ,
कवितेत माझ्या गाणी प्रकाशाची ,
रेखाटली स्वप्न तुझ्या माझ्या आयुष्याची ,
अर्धवट राहिलेली पूर्व जन्मीची ....

Oct 18, 2021

प्रेम केलं म्हणजे लग्न करायला हव असं काही नाही..

प्रेम केलं म्हणजे एकमेकांच्या आयुष्यात येणं गरजेचं असतं असं काही नाही . एकमेकांच्या आयुष्यात न येता सुद्धा केलेलं प्रेम जपता आलं पाहिजे .


आयुष्य एकमेकांसोबत घालवण्यात अर्थ नाही . आयुष्याला एकमेकांशिवाय पूर्णत्व येणार नाही हे नात्याच गणित असावं .


आयुष्यातला प्रत्येक आनंद सोबत  शेअर करावा . सुख दुःख वाटून घ्यावी . असं कुठे लिहिलेलं आहे का ? सुख दुःख वाटून घेण्यासाठी आयुष्यात एकच व्यक्ती असावी आणि ती सुद्धा नवरा किंवा बायको एखादा मित्र किंवा मैत्रीण असूचं शकते . एका मित्राला एका मैत्रिणीला ...


लग्न झालं म्हणजे आपण पूर्ण पने बदलायला हवं असं


काही नाही . जुनी नाती विसरून जायला हवं असही नाही . लग्न ही  समाजाने निर्माण केलेली एक प्रथा आहे .


सृष्टी निर्मितीच चक्र सुरळीतपणे चालू राहवं ह्यासाठी निर्माण केलेली .


आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न व्हावं हा हट्ट हासही नसावा . झालं तर अतिउत्तम आहे . आणि नाही झालं तरीही हरकत नाही . हिरमुसून जाण्याची गरज नाही . आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहूच शकतो . त्याच्या सहवासात नसलो तरी चालेल ,  त्याच्या मनात असायला हवं त्याला  महत्व आहे .


कारण प्रेम हे कोणत्या वयात कधी कोणावर होईल सांगता येणार नाही . योग्य वयात झालं तर मग लग्न होण्याची शक्यता असू शकते . आणि जातीचा प्रोब्लेम असेल तर मग असूच शकत नाही . किंवा कधी कधी सगळ बरोबर जुळत पण नेमकं नातं च  जुळत नाही . हल्लीच आमच्या गावात घडलेली घटना आहे .


जात पात सगळ व्यवस्थित पण नात्यात होत आणि ते पण पूर्ण पने चूकीच . त्यामुळे त्याचं एक होण नियतीने अमान्य केल . मला वाईट वाटलं ही घटना माझ्या मैत्रिणीची होती . पण काय करणार होतो . चुकीचं होत सार समाज कसा मान्य करेल .


त्यामुळे नेहमी  असं वाटतं ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ठहास कधीच नसावा.  प्रेमाचं तुमच्यावर आहे तुम्ही करा नका करू ते मी सांगणार नाही . मी सांगेन वेगळ्या अर्थाने आणि तुम्ही लावाल भलताच काहीतरी  वेगळा अर्थ त्यापेक्षा मी तो विषय टाळणं योग्य ठरेल ...


मी माझ्या परीने वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते ...


प्रेम असेल ना तर जगासमोर दाखवण्याची पण गरज नाही. ते फक्त जपावं प्रामाणिकपणे तुम्ही सोबत असायला हवं असं काही नाही . सोबत नसताना सुद्धा नातं जपता येतं .  फक्त त्या नात्यात पवित्रता हवी . अनैतिकता  नको अनैतिकता समाजाला कधीही मान्य नसते . 

आणि मलाही मान्य नाही ....

माझे विचार पटले तर वाचा चुकल असेल तर ते ही सांगा अल्लड आहे अजुन हवी तशी समज नाही .


जसा फुलाचा सुगंध तसं देवाचं अस्तित्व

अनेकांना हा प्रश्न पडतो . देव आहे की नाही ह्या जगात मलाही पडतो सारखा सारखा ...


मी आणि माझ्या बहिणीचा मुलगा देवपूजा करत असताना त्याने मला सहज विचारलं मावशी हा देव  असा कसा हा देव पाण्यातच का अर्थातच त्याच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हत . कारण मी च कधीपासून देवपूजा करते . कळतही नसेल तेव्हापासून लागलेली सवय आहे ती , आवड म्हणून जोपासते .


मी त्याला फक्त गप्प बसतं होते . तू असं काही बोलू नको नाहीतर देव आपल्याला पाप करेल असं म्हणत त्याला गप्प बसवत होते . बिचारा मी असं बोलल्यावर  हिरमुसून


जायचा . माझे वडील पण तिथेच होते . ते आमच्या दोघांची गमंत पाहत होते . एक तर मला हरिपाठ घ्यायचा होता त्यात साहेबांची बडबड बाबांची  आणि माझी पल नजरानजर झाली . की त्यांनाही हसू यायचं आणि मलाही मी मात्र त्यांच्यावर रागवायचे तो हिरमुसला की परत त्याला जवळ घ्यायचे आणि जसं जमेल तसं सांगायचे . बाबा आम्हची गमंत किती वेळ बघत होते .


तो कितीवेळ देव खरच आहे का ह्या जगात असं म्हणत खूप डोकं लावत होता . मी त्याला खूप चिडून बोलले आणि मग नंतर समजाऊन सांगितल .


आपल्याला काय करायचं देव आहे की नाही . आपण कोण आहोत देवाच्या अस्तित्वाचा शोध घेणारो . त्याची पूजा केल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं . त्याच्या भक्तीत तल्लीन झाल्यावर समाधान मिळत तेच पुरावे देवाचे अस्तित्व आहे हे सिद्ध करत असतात .


मला खरच नाही माहीत देव आहे की नाही . पण देवावर खूप श्रद्धा आहे . विश्वास पण आहे . ज्ञानेश्वरी हा आवडता ग्रंथ आहे माझा ...



मला जे काही ज्ञान मिळालं आहे त्यात सर्वात जास्त वाटा आहे तो ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाचाच माझ्यावर खूप चांगले संस्कार केले ते ही ज्ञानेश्वरीनेच .   माझ्यात  चांगुलपणा किती आहे ते नाही माहीत पण जो ही काही थोडाफार आहे तो चांगुलपणा ही मला ज्ञानेश्वरी मुळेच लाभला आहे .


देव आहे की नाही हा प्रश्न कोणी मनात आनुच नये . त्याच अस्तित्व आहे . 💯टक्के आहे .


जसा फुलांचा सुगंध तस देवाचं अस्तित्व ..
मग कशाला हट्ट शोधण्याचा देवाचं देवत्व ..


फुलाचा सुगंध दरवळला , कधी दिसला का ?


नाही ना मग देव दिसायला हवा हा तरी माणसाने का हट्ट धरावा . जसा फुलाचा सुगंध तसं देवाचं अस्तित्व तो कोणीही शोधण्याचा प्रयत्न करू नये . कारण ते अस्तित्व फुलाच्या दरवळला ऱ्या सुगंधाप्रमाने आहे .

चुकीस क्षमस्व


अवखळ वारा

त्या खिडकीतून आभाळ दिसायचं ,
गार वाऱ्याला ते सहन नाही व्हायचं ,
नेहमी माझं चित्त हर वायच ,
वाऱ्याच्या अलगद येण्याने मूड ऑफ ,
ठरलेलं असायचं ...

किती बाई त्याचे नखरे ,
झुळूक येता आठवते मजला माझेच चेहरे हसरे ...

चोरुन चोरुन अभालातल्या चांदण्या ही मोजायचे ,
अंगाला स्पर्श करणाऱ्या वाऱ्याशी हितगुज करायचे ..

अवखळ तो वारा येतो ,
मनाला मोहून टाकतो ...
त्याच्यातचं हरवायला भाग पाडतो ...

Oct 17, 2021

ऑनलाईन नाती

आजचा माझा विषय आहे ऑनलाईन नाती .....
सहज नाही सुचला माझ्या मैत्रिणीने आज मला खूप रडवल ती चा फोन झाल्यानंतर मी खूप रडले . नंतर माझ्या आवडत्या उर्मिला  ranju ताईला कॉल केला . खूप वेळ बोललो खूप छान वाटलं . आणि मग कळली खऱ्या अर्थाने ऑनलाईन नात्याची परिभाषा ......

सोशल मीडिया वाटते तितकी चांगली नाही . पण जितकी वाईट वाटते.  तितकी वाईट ही नाही . कारण इथे माणसाचं असतात . काही वाईट तर , काही खूप चांगले . आवड म्हणून ते इथे येतात.  आणि मग ओढ आपुलकी ह्यामुळे इथे रुळतात .


माझही तसचं झालं मी प्रतीलीपी वर आले तेव्हा स्वप्नातही नव्हत वाटलं . मला इतकी चांगली माणस भेटतील . मी ही त्यांच्यात आनंदाने सामील होईल . पण माया , आपुलकी जिव्हाळा ह्यामुळे ते सहज शक्य झालं .


सुरुवातीचे काही दिवस कोणाशीच नाही बोलले इनबॉक्स मेसेज आले तरी मी रिप्लाय देत नव्हते . भीती वाटायची आणि वेळ ही नव्हताच . त्यामुळे दुर्लक्ष करत राहिले . मग प्रोब्लेम यायला लागले मग बोलण सुरू मदतीसाठी सगळ्यात पाहिले बोलले असेल ते गणेश दळवी ला खूप प्रेमळ व्यक्ती मला खूप सपोर्ट करतात . नेहमीच मार्गदर्शन करतात .


नंतर खूप मित्र मैत्रिणी झाल्या . अनिल दादा मुलगी मानतात मला . मोहन सोमलकर हे तर मला बेटी म्हणतात मी ही त्यांना बाबा बोलते . तुषार दादा आहे तो मला छोटी बहीण मानतो . अजुन माझे खूप मित्र आहेत . सतीश ह्याला तर मी खूप छळलं बिचाऱ्याला नेहमीच कन्फ्युज केलं . तरीही तो बिचारा खूप आदर देतो मला मैत्रीण म्हणून आमचं bonding छान आहे . R . Patil पण आहे तो पण चांगला आहे . जरासा अखडू आहे पण ठीक आहे . काही असे काही तसे पण छान आहे मला नेहमी समजून घेतो . लहान म्हणून सोडून देतो . त्यामुळे त्याच्याबद्दल विशेष स्थान आहेच मनात .


सुविधा आई पण छान आहे . अगं ना परांजपे आहे ती पण मुलगी मानते , मला सुवर्णा मालपुरे , प्रीती ताई ,


पिऊ ताई आणि जयश्री ताई . खूप जनी आहेत . आणि माझी लाडकी करिश्मा ताई मला खट्टू बोलणारी .

तू डिस्टर्ब असली की कॉल कर हक्काने सांगणारी मला लहान बहीण मानणारी अजुन. खूप सारे आहेत . कोणा कोणाची नावं घेऊ . 


आणि सगळ्यात आवडत व्यक्ती महत्त्व माझा आदर्श आई बाबा ह्या शब्दाला पूरक असे आमचे आबा देवमाणूस ते माझ्या आयुष्यात आले मी माझ भाग्य समजते . मला खूप सपोर्ट करतात . त्यांच्या एवढा प्रेमळ माणूस ह्यापूर्वी कधी भेटलाच नाही .  खूप सुंदर माझ्या वडीलांप्रमाने  आहेत . 
मानसी ताई पण खूप छान आहे . राजश्री ताई पण कोणाची नावं राहिली असतील तर सॉरी कारण खूप जण आहेत . त्यांच्याशी माझे संबंध खूप  चागले आहेत .

मला एवढी चांगली माणस भेटली . मला समजून घेणारी
माझ्यावर प्रेम करणारी . ती frod असू शकत नाही . आणि असेल तर मग मी पण frod मध्ये गणल्या जाईल .कारण मी पण आहे इथे अकाऊंटला .

ज्यांनी ऑनलाईन नाती कमावलीच नाही त्यांना ऑनलाईन नात्यांचं महत्त्व कळणारच नाही . ऑनलाईन नात्यांची किंमत पण कळणार नाही . सोशल मीडिया म्हणजे वाईटच हे ठरवून ते मोकळे होतात . ब्रम्हा पलिकडे ही एक सुंदर जग आहे हे ते विसरून जातात . त्या जगात खूप सारी चांगली माणस आहेत ह्याचाही त्यांना विसर पडतो . पण खरच ऑनलाईन नाती खूप छान असतात . ओळख नसतानाही जुळली जातात.  मग मन गुंतली जातात . सवय लागते . खरच खूप छान असतात ही ऑनलाईन नाती मी खूप नशीबवान आहे . मला ती मिळाली ...

प्रतिलीपीवर खूप गोड गोड माणस मिळाली त्या गोड माणसांना समर्पित .....



बसू दे नात्याचा मेळ

प्रश्न सारे अडवत होतो ,
एकाच उत्तराला जवळ घेत होतो ,
नात्यात सतत गैर समज निर्माण करत होतो ,
कळत असताना सुद्धा नकळत एकमेकांना दुखवत होतो ..

का असे वागत होतो ,
भलतेच भाव मनात आणत होतो ,
नव्हतं हवं होतं का आपल्याला रिलेशन ,
कळेना नेमकं कुठे शोधाव सजेशन ...

सतत भांडण चिडचिड त्रासदायक ,
वाटत खूप भयानक ...

आता पुरे झाला प्रश्न उत्तरांचा खेळ ,
नको वाया फुकट वेळ ,
बसू दे नात्याचा मेळ ...

हॅपी बर्थडे

हॅप्पी बर्थडे शौर्य ...


तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..
तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला माझ्या तुला भरभरून असेल शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
आशीर्वाद सदैव असेल , त्याचं बरोबर शब्द रुपी शुभेच्छा असेल . तू तर आहेच गोड गोड नेहमीच देईन तुला शुभेच्छाचा ठेवा अनमोल ...

तुझ्या प्रमाणे च माझी अत्यंत गोड मैत्रीण आहे एक पूजा तिचा ही आज वाढदिवस आहे . तिलाही माझ्याकडुन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा . तुझे सगळी स्वप्न पूर्ण होवो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना ...

Many many returns happy of the day 💐💐💐💐💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
God bless you 💐💐💐💐💐💐💐❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺


प्रश्न उत्तर चक्र

कधी कधी अस वाटत ,
तो काळजी करतो ,
प्रेमाने विचारपूस करतो ,
हेचं पुरेस आहे ना ,
का त्याच्या भवती ,
प्रश्न उत्तरं ह्याचं चक्र गीर वायच ..
बिचाऱ्याला ही  दुखवायचं ,
आणि स्वतः ही hurt व्हायचं ..
वेळ देत नाही वेळ देत नाही ,
म्हणून नातं खराब करायचं .
तो बिझी आहे माहीत असतानसुधा ,
वेडेपणा करायचा ,
त्याचा चांगला मूड ऑफ करायचा ..
त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला फ्रीडम देणं ,
हेचं योग्य आहे नातं अजुन ही फुलवण्यासाठी ,
नात्याला नवं वळण देण्यासाठी ...

काल्पनिक कविता : 

चारोळी

प्रश्न सारे अडवत होते ,
एकाच उत्तराला जवळ घेत होते ,
मी कुठे कमी पडतेय का ? 
त्याला समजून घेण्यात चुकले का ? 

Oct 16, 2021

भाव अनोखा

काहूर मनात अजब दाटले होते ,
तुझ्यासाठी काही वेगळेच वाटले होते ,
तुझ्या वागणे सारखे खटकत होते ,
काहीतरी मिसींग आहे जाणवत होते ..
तू पूर्णपणे बदललास , 
क्षणो क्षणी मला पोरकेपना दिलास ,
का रे असं वागलास ..
हाच प्रश्न आज मनात दाटला ,
भाव अनोखा तुझा कधीच नाही कळला .

अजब प्रश्न पडला

काहूर मनात अजब दाटले होते ,
तुझ्यासाठी नाही माझ्यासाठीच काही वेगळे वाटले होते ..

मी आहे कोणाची ,
ह्या प्रश्नाने घालमेल होत होती मनाची ..

त्या शेअर chat ची , 
की ह्या प्रतीलीपी ची , 
की त्या kots ची , 
की wp ची ...
नेमकी मी आहे कोणाची ...

इकडे तिकडे सतत फिरत असते ,
जस नोटी फिकेशन येईल तस माझ् अस्तित्व शोधत असते ..

इनबॉक्स वर तर जावंच लागतं ,
जोडलेली अनेक नाती निभवावी लागतात ...

भक्ती आली की गोंधळ करते सारा ,
घरात करून ठेवते पसांरा ,

सोबत तिच्या दीपक आला की मी  मेंटल ,
कारण तो आहेच इतका सटके ल ,
काय बोलेल ह्याचा नेम नाही ,

मला प्रश्न पडतो सारखा सारखा ,
मी आहे कोणाची ,
सगळ्याची आहे आवडीची ,
म्हणून तर कळत नाही मी आहे कोणाची ...



दर्द दिलं का

क्या कहे कितनी मोहबत्त करते हैं आपसे ।


चाहकर भी पा नहीं सकते ,


ये जानते हुए भी प्यार हुआ है आपसे ।।


हर पल आप याद आते हो ।


में चाहकर भी आपके सामने नहीं आ सकती ।।


जब सामने आने की कोशिश करती हूं ।।


तब हमेशा रोती हू ।।


जानती हूं आप मुझसे नहीं मेरे बहन से प्यार करते हो ।।


में उसका दुख बाटना चाहती है ।


खुशी नही इसलिए तो खुद को रोखती हूं ।।


दर्द दिल का छिपाकर मुस्कुराती हूं ।



वास्तविक काही नाही काल्पनिक आम्ही पाटलांच्या पोरी प्रेम करू शकत नाही . जे वडील सुचवतील त्यांच्यावर प्रेम करू .  प्रेम फक्त कल्पनेत च आवडत आम्हाला ...🙈🙈😜😜😂😂



लिखाण असं असावं

लिखाण दर्जेदार असावं ,


वाचकांच मन खीळवणार  असावं ..


वाचता   वाचता कल्पनेत रमवणार असावं ,


प्रत्येक शब्द जागं करणार असावं ...


लिखाणात सकारात्मकता हवी ,
दर्जेदार वाटणारी ,
आयुष्याला वळण देणारी नवी ...

लिखाणात असे रुजवायला हवे क्षण ,
जे वेधून घेतली वाचकांचं मन ...

लिखाण मनोरंजन करणार हवे ,
आयुष्याचे दोन क्षण वाढवणारे हवे ...

लिखाणातून समाज प्रबोधन व्हायला हवं ,
तर  समाज पाऊल पुढे टाकेल नवं ....

लिखाणात नुसती कल्पणिक ता  नसावी ,
थोडी फार सत्यता ही असावी ...


अजब क्षण

काहूर मनात अजब दाटले होते ,
तुझ्यासाठी काही वेगळेच वाटले होते ,

काय ते कळत नव्हते ,
कुठेतरी तुझ्यातच मन रमले होते ,

एकांतात स्वतः ला मी शोधत होते ,
डोळ्यात साठवून ठेवलेल्या तुझ्या प्रतिमेला न्याहाळत होते ...

चित्त थार्यावर नव्हते ,
नयन माझे आसुसलेले तुलाच बिलगत होते ..

मन वेडे तुझ्या भवती रेंगाळत होते ,
तुला बघताच तेज ते नवखे ,
चेहऱ्यावर खुलत होते ...

अजब क्षण ते सुंदर वाटत होते ,
मला सतत तुझ्याकडे खेचत होते ...

Oct 15, 2021

आजचा दसरा मी कधीच नाही विसरू शकत

आजचा दिवस खूप छान दसऱ्याचा पण माझ्यासाठी मात्र काहीतरी वेगळाच ठरला . पण छानच खूप छान वाटलं . 
माझ्या माणसाचं माझ्याबद्दल असलेलं प्रेम दिसून आलं . आज सकाळीच उठून अंगणात रांगोळी वैगरे काढली .
त्यानंतर अचानक खूप विकनेस जाणवला . मी तेव्हा जी झोपली ते आता जस्ट उठले आणि लिहायला बसले . 

मी आजारी आहे म्हणल्या वर माझ्या ताईची मुलगी भक्ती ती माझ्याकडे आली . माझे बाबा ताप असल्यामुळे पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर टेकवत होते . तर ती ही मध्ये लुटपुट करत होती . मी लावते दुर्गा मावशीला पट्ट्या अस म्हणत तिच्या कोवळ्या स्पर्शाने अर्धा विकणेस आणि ताप गेला . माझी आजी पण खूप चांगली आहे तिने माझ्यावरचं सर्व काम केलं.  बाबा तर विचारूच नका . ते तर खूप चांगले आहेत . मला बर नसल्यावर माझं त्यांच्या मनात असलेलं स्थान प्रेम खऱ्या अर्थाने दिसून येत . 
माझी आई नाही पण बाबा लहान पणापासून च माझ्या आजार पणात खूप काळजी घेतात . तीन वर्षानंतर आज पहिल्यांदा दुखलं . ते तर खूप नाराज झाले . कारण त्यांची खूप ईशा होती . आज त्यांच्या शेड समोर मीच रांगोळी काढावी आणि पूजा ही मीच करावी . पण शक्य झालं नाही . मग त्यांनीच केली . 

खरच आजचा दसरा मी कधीच नाही विसरू शकत .

तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 
सकाळ पासून द्यायच्या बाकी होत्या .
Happy dasra ....

सप्त रंग आयुष्याचे

क्षणिक दुःखाला ही जागा नसावी ,
बागेत माझ्या आनंदाची फुले उमलावी ,
सुखाची वेल बाहरावी ,
दुःखाची वेल करपून जावी ....

सप्तरंग आनंदाचे जीवनी यावे ,
रंग रंगिन आयुष्य सजून जावे ...
रंगात मी मिसळून जावे ,
दुःखाचे भोग हरवून जावे ..




Oct 14, 2021

अडीच शब्द व्यक्त होण म्हणजे प्रेम असतं का ?

प्रेम असेल तर व्यक्त करण्याची गरज नाही . तिथे अडीच शब्दाच्या पुराव्याची ही गरज नाही . सारखं सारखं व्यक्त करण्याची ही गरज नाही . 

प्रेम न दाखवता समजून घेता आलं पाहिजे . प्रेमात पुरावा देण्याची गरज नसावी . तू माझ्यासाठी अडीच शब्द बोलायला  हवं हा हट्टही नसावा . प्रेम न सांगता समजून घेता आलं पाहिजे . 

एकमेकांवर विश्वास असावा , काहीही संबंध नसला तरी , खूप संबंध असावा . एकमेकांची सवय असावी . रोज एकमेकांना वेळ देण्याची गरज वाटावी . 

प्रेम ही फिलिंग अडीच  शब्दांनी कधीचं पूर्ण होऊ शकत नाही . त्यासाठी एकमेकांच मन समजून घेण्याची गरज असते . न बोलता त्याला तिच्या मनातल कळायला हवं . त्याचं दुःख तिला त्याच्या डोळ्यांत सहज दिसायला हवं .

प्रेमात भांडण हवी नातं तोडण्याची भाषा नाही . जिथे नातं तोडण्याची , संपवण्याची भाषा बोलली जाते . ते नातं नसून केवळ एक मृगजळ असतं . त्यामुळे नात्यात तोडण्याची किंवा संपवण्याची भाषा नसावी .

क्षणा क्षणाला त्याची आठवण येणं , 
ती आता काय करत असेल ह्या प्रश्नांत गुरफटत तिच्या मनाचा ठाव घेणं . हे प्रेम असू शकत ना . 

ती चुकली म्हणून त्याने अबोला धरला , अबोल्यात ही तिला खूप मिस केलं . त्याने अबोला धरला म्हणून हिच्या डोळ्यांत पाणी येणं . हे खरं प्रेम . 

प्रेम आहे की नाही हे ते अडीच शब्दाचं प्रपोजल कधीच नाही ठरवू शकत . ते तुमचं मन आणि भावनाच ठरवू शकत . 

एकमेकांविषयी असलेली ओढ आपुलकी , प्रेम , विश्वास , जिव्हाळा , एकमेकांप्रती असलेला आदर ह्या गोष्टी पुष्कळ आहे प्रेम सिद्ध करण्यासाठी त्या जरुरत नाही . ती फक्त एक फॉर्म ली टी  असते . 

सांगायची गोष्ट राहून गेली

पावसाची ती सर एकदाचं पडून गेली ,
नेमकी तीच गोष्ट सांगायची राहून गेली ,
जी होती मनात साचलेली ,
तिला बघताच मनात ओढ होती दाटलेली ,

उघड झाप तिच्या पापण्यांची ,


हृदयात रुतलेली ,


पावसाच्या सरीत ती मला भेटलेली ,


स्पंदनात माझ्या नाजूक उमलली ,


तिच्या स्मित हास्याने ती नाजूक कळी मनात रुजली ,
अविस्मरणीय आठवण बनून डोळ्यात सजली ,
तिला सांगायची गोष्ट च नेमकी राहून गेली ,
तिची माझी भेट परत कधीचं नाही घडली ....


कामाच्या व्यापात माणूस जगणं विसरला

हल्ली काम एवढे वाढले ,
छंद जोपासणे ही अवघडले ,
माणसाचे घड्याळ हतबल झाले ...
माणसाचे माणूसपण हरवत चालले ..

वाटत मनासारखं जगावं ,
काम बाजूला ठेवून ही जगता यावं  ,
सतत काय ते मरमर राबावं ,
थोडं स स्वतःसाठी ही असावं ,
स्वतःसाठी जगताना खांद्यावर कसलही प्रेशर नसावं ...

जन्मापासून ते मरेपर्यंत कामं आहे ,
नशिबी रेखाटलेली ,
जशी पायात चप्पल धुळीत माखलेली ,
तशी माणूस आणि कामं ह्यांची जन्मतःच नेट विणलेली ,
कष्टातच माणसाची जीवन शैली गजबजलेली ,
कामाच्या व्यापात च मन  गुंतलेली ,
जीवन म्हणजे काय ? जगणं म्हणजे काय ? तेच आता ती विसरली ...

काल्पनिक कविता आहे . काम महत्वाची आहेत पण त्याच बरोबर स्वतःसाठी वेळ देणं ही खूप महत्त्वाच आहे ..

Oct 13, 2021

ठिगळ

आयुष्य हे ठिगळं ठिगळं करून जोडलेलं आहे .


सुख दुःख संघर्ष , हर्ष ह्या ठींगळाणी ते जोडलेलं आहे .


आयुष्याला खूप ठिगळं जोडावी लागतात तेव्हा कुठे ते परिपूर्ण होतं . दुःखात कधी कधी सुख ही शोधावं लागत   मनभरुन हसावं लागतं .


खूप टप्पे येता जीवनात तो प्रत्येक टप्पा पार करून पुढे जावं लागतं . कधी वादळ आपली सावली  होईल सांगता येणार नाही . ती सावली स्विकारण्याची तयारी असू द्यावी लागते .


जीवन प्रवास म्हटल तर ,  जीवनात भेटणारी नवनवीन माणसं ही त्या प्रवासातील स्टॉप किंवा स्टेशन  असतात .
प्रत्येक स्टेशन हे वेगळ वेगळं  असतं . त्याच्याशी निभावून घेता येईल का ? हा प्रश्न मनात असतोच .

कोणाला राग जास्त असतो , तर कोणाला समज कमी असते . समजून घेता आल तर , नात टिकतं .
  
समजुंन घेता आलच नाही तर , मग नत्याचा मेळ बसत नाही . आणि मग नाईला जामुळे एकमेकांपासून  दूर व्हाव  . हे स्टेशन नको  दुसरं म्हणून आपण दुसऱ्या स्टेशन कडे. धाव घेतो . आणि मेन म्हणजे हे  स्टेशन बदलायला पैसे नाही मोजावे लागत . त्यामुळे स्टेशन बदलन सोपं वाटतं .

आयुष्याच्या प्रवासात भावना खूप महत्त्वाच्या असतात .
त्या  समजून घेणं खूप महत्त्वाच्या असतात .
जो समोरच्याच्या भावना समजून घ्यायला शिकला त्याला आयुष्य जगता आलं . असं म्हणायला हरकत नाही . 

भांडणाला जबाबदार मीच असते

मला जो सर्वात जास्त त्रास देतो ,


तोच मला आवडतो ,


ज्याच्याशी कधी भांडण होऊ नये असं वाटत ,


त्याच्याशीच भांडण होत सारखं सारखं ,


जबाब दार मात्र मीच असते ,


हे कबूल करते ...


विचार करून बोलत नाही ,


काय बोलावं सुचतच नाही काही ,


मग काहीही बोलते ,


बिचाऱ्या ला हर्ट. करते ,
आणि सॉरी सॉरी चा जप सुरू करते ,

मला खूप हसू येत स्वतःच ,
वाईट ही वाटत त्याला का दुखावलं ह्याचं ,
त्याला राग येऊ नये हा प्रयत्न असतो नेहमी ,
पण तो काही सफल होत नाही ...


का असतील नकोशा

त्या आठवणीं ना हद्दपार करायच् होत ,
मनातल्या वेशीना मान्य नव्हतं .

नात जुळल होतं ना स्पंदनांशी ,
खोलवर रुजलेल्या भावनांशी ,
संबंध होता ना माझ्या जीवनाशी ...

कधी सुखद कधी दुःखद क्षण ,
ह्यातच गुंतलेले माझे मन 
जगण्यास देत होते बळ ..

आठवणी मनात साठलेल्या ,
डोळ्यांत प्रतिमा पाणावलेल्या ,
त्या विसरणार तरी कशा ,
आणि मला तरी का असेल नकोशा ..

फसवणूक होते तेव्हा

फसवणूक होते तेव्हा हसूही येते ,
आणि चीड ही येते  स्वतः चाच स्वतः ला राग यायला लागतो , आपण फसलो तर चालू शकत पण आपल्या मुळे इतर लोकं फसले  तर  , नको ते टेन्शन येत ...

मनात धास्ती भरते ,
लोकांच्या शिव्या खाव्या लागतील की काय सतत हा प्रश्न मनात गोंधळ घालतो . आणि मेन मुद्दा तर , पुढेच आहे .
लोकांचं भलं व्हावं ह्या उद्देशाने आपण एखादी गोष्ट त्यांना पटवून देऊन ती गोष्ट स्विकारण्यास भाग पाडलं . आणि मग नंतर लक्षात आलं अरे हा तर , frod निघाला तर , मग हसू तर येतच त्याचबरोबर वाईट ही वाटत आपल्यामुळे खूप जनांच नुकसान झालं , ह्या गोष्टीचं वाईट वाटत .

आमच्या किस्यावरून .....


त्या आठवणींना हद्दपार करायचं होत

,मनातल्या वेशिना मात्र मान्य नव्हत ,
त्यांना आठवणी हव्या होत्या ,
कारण त्याच अश्रुला वाटा मोकळ्या करून देत होत्या .

Oct 12, 2021

तुझ्यात मी असावे

स्वप्न मी  पाहावे ,
सत्य तू  दिसावे ,
तुझ्यात मी असावे ....

प्रेम बंधन जुळावे ,
नात्याचे हे धागे विनावे ,
सहवासाचे ठिगळ जोडावे ,
तुझ्यात मी असावे ...

चंद्राची शीतलता तुझ्यात रुजवावी ,
तुझ्या मनात माझी प्रीत उमलावी ,
तुझ्या हृदयात माझी प्रतिमा ठसावी ,
तुझ्यात मी असावी ...

तुझ्यात मी असावे ,
तुझ्यासारखे कोणी नसावे ,
स्वप्नी तुझे नाव दिसावे ,
तुझ्या नावा पुढे नाव माझे लागावे ,
तुझ्यात मी असावे ...


आभासी नात

नातं हे आभासी ,
येऊन थांबते मृग जळपाशी ,
हीत गुज करते नयनांशी ,
भांडने रोज होई त्याच्या स्पर्शाशी .

आभासी नात्याची सुरुवात झाली ,
परकेपनाची खंत मिटली ,
अनामिक ओढ ही वाढली ,
कुणास  ठाऊक  भीती वाटू लागली ...

मनात चील बीचल सुरू झाली ,
आपण खूप चांगले आहोत ओळख आता पटली ,
आभासी नात्याची गोडी वाटू लागली ,
ते विरणार पुन्ह दुःख येणार ,
चिंता सतावू लागली ...


पहाटेचे स्वप्न नव्याने सजावे

धुके हे विरत जावे ,
पहाटेचे स्वप्न आता नव्याने सजावे ,
तुझ्यात मी माझ्यात तू ,
हरवून जावे .....

पहाटेचे स्वप्न नव्याने सजावे ,

ओंठाचा गोडवा चहात मिसळावा ,


तुझ्या मिठीचा सहवास रोजचं लाभावा ,


दुरावा कधी येऊच नये ह्या गोड नात्यात ,


माझा प्रत्येक श्वास विरगळावा तुझ्या श्वासात  ,

पहाटे पहाटे दिसावा रोज स्वप्नात ,
कधीतरी यावास सत्यात ,
पहाटेचे स्वप्न सजवण्यास खास  .....


आसपास असल्याचा होऊ दे  भास ,


तोच देईल प्रेमाला नवचैतन्य खास


धुके हे विरत जावे ,
पहाटेचे स्वप्न आता नव्याने सजावे ,
तुझ्यात मी माझ्यात तू ,
हरवून जावे .....
पहाटेचे स्वप्न नव्याने सजावे ,

सख्या रे साजना

ओढ तुझी लागली ,
सख्या रे साजणा ,
गुर फुटते तुझ्यात ,
तुझे नाव कोरते हृदयात ,

आयुष्याचा  सहारा ,
क्षनिक सुखाचा किनारा ,
माझ्या स्पंदनाना  जाणणारा ,
सख्या रे साजना ...

कोडे तुझे तुझ्या  माझ्या  नात्याचे ,
रोज सोडते ,
नवे नावं देण्याचा डाव रंगते ,
सख्या रे साजना ....

तू मला जपले ,
नवे नाते तुझे माझे रंगले ,
सख्या रे साजना ...


Oct 11, 2021

बंध हे जुळावे

धुके हे विरत जावे ,
पहाटेचे स्वप्न आता सरत जावे ,
तुझे माझे बंध हे नव्याने जुळावे ,
क्षण भराचे नाही तर आयुष्य भराचे ...

खूप झाले विरहाचे भोग ,
आता तरी माझे मन बघ ,
चूक केलेली विसर एक क्षण ,
प्रेम केलेले आठव मन भर ,

बंध हे रेशमाचे जुळूदे ,
एक मेकांच्या ओठी नाव हे ,
तुझे माझे गुण गुनु दे ,
स्वप्न सत्यात उतरण्याचे स्वप्न आज ,
मला पाहू दे ...

बंध हे जुळावे ,
आकाशात चांदण्यासंगे ,
तुझे माझे नाव रेखावे
बंध हे जुळावे ... 

चांदण्यात ही तुला शोधते

चांदण्यात ही  तुला मी शोधते ,

सुखाचे दव हे तुझ्या ओंठावर गुण गुणते ,


काळोख्या रात्रीतही  तुझ्यासवे ,


स्वप्नात रंगते ,


साद तू घालता चित्त माझे हरवते ,


तुला पाहता वाट ही सारी विसरते ,


धुक्यात ही तुला शोधते ,

तुझ्यासवे गुणगुणते गाणे प्रेमाचे ,
ठोके मी मोजते तुझ्या माझ्या ह्रदयाचे ,

आकाशी स्वप्नांचे तोरण बांधले ,
त्यात तुझे माझे नाव लिहिले ..

किती  हे पुरावे देऊ प्रेमाचे ,
तुझ्यावर प्रेम करत असलेल्या क्षणा- क्षणाचे ....

पहाटेचे स्वप्न नव्याने फुलावे

धुके ते आता विरत जावे ,
पहाटेचे स्वप्न आता नव्याने दिसावे ,

गैर समजाच्या धुक्यात ओळख हरलेली ,
नव्याने मिळावी ,  आपुलकीने सजलेली ,

इगो बाजूला ठेवून सार संपाव ,
नात कोमजलेल नव्याने फुलाव ,

खूप झाला लपाछपी चा डाव ,


तिथे नाही रे भावनांना भाव ,


एक पाऊल पुढे यायला आवडल असतं ,


अंतर धुक्याच मिटवायला आवडल असतं ,


नाही हीमंत झाली ,
सवभिमानाची भिंत आड आली ,

तुझा इगो माझा सावभिमान कधी संपेल देव जाणे
पहाटेचे स्वप्न नव्याने फुलावे हे तरी व्हावे ....

good morning

Oct 10, 2021

kots


नाविक सत्याची

मी तसा नाविक तरबेज आहे ,
सत्य हे अफवांच्या पुरात शोधत आहे ,

कोमल हृदय माझे खचून गेले ,
सत्य शोधण्यास कामयाब ठरले ,

अफवा पसरल्या होत्या अवती भवती ,
संशयाच्या नजरा श्वास हिरावून घेत होती ,

मी साऱ्या संकटावर मात केली ,
साक्ष माझ्या अस्तित्वाची दिली ,

सत्यमेव जयते वाक्य मनी रुजवले ,
असत्या विरूद्ध नेहमीच लढले ,

असत्य हे अफवांच्या पुरात सोडले ,
सत्याची  नाविक म्हणून तरबेज ठरले ....

गंध प्रीतीचा

नुकतीच आरोहीच्या आयुष्यात खूप मोठी वाईट घटना घडते . ती त्या घटनेला पुरेपूर विसरण्याच्या प्रयत्नात असते .  त्या घटनेपासून ती सतत दूर दूर पळण्याचा प्रयत्न करत असते. पण त्या प्रयत्नांना हवं तसं यश मिळतच नव्हतं . वारंवार तिच्या समोर त्याचं घटनांची पुनरावृत्ती होतं असे , आणि भरलेल्या जखमा पुन्हा पुन्हा ओल्या होत असे . वेदना उरात दाटायच्या आणि डोकेदुखीच्या  स्वरूपात बाहेर पडायच्या . त्या घटनेनंतर आपण कधी ही कोणाच्या प्रेमात पडायचं नाही , आणि कोणाला आपल्या प्रेमात पडू द्यायचं नाही .

प्रेम बिम असं काहीही नसतं असंत ते फक्त एक आकर्षण एक मृगजळ . त्यामुळे प्रेम ह्या फिलिंग पासून चार हात लांबच राहायचं .

असा निर्धार करून तिने नवीन आयुष्याची सुरुवात केलेली असतानाच .  तिच्या आयुष्यात आलं एक नवीन वादळ आरव नावाचं दिसायला हँडसम , गुणांनी परिपूर्ण ,
लाखात एक असं ते व्यक्ती महत्त्व . त्याची आणि तिची भेट झाली . ती श्री गुरु दत्त मंदिरात तो गावात नुकताच राहायला आला होता . आई वडील आधी आलेले होते . पण त्याच वर्षभराच शिक्षण अपूर्ण राहिलेलं तो नुकताच पूर्ण करून आला होता . त्याला घराचा पत्ता ही व्यवस्थित माहीत नव्हता .

तेवढ्यात त्याला एक मुलगी दिसते . नाका डोळ्यांनी अतिशय सुंदर बघताच कोणत्याही मुलाला तिची सुंदरता भाऊक करेन . आणि तसचं आरव च्या बाबतीत झालं .
तो एक क्षण तिच्याकडे बघतच राहिला . तेवढ्यात आरोही ने त्याच्या डोळ्यासमोर आपला हात हलवला .

" ओ मिस्टर काय बघताय असं ? काय हवं आपल्याला "

" Would you like to help mi " असं म्हणत त्याने हातात असलेली adress recet दाखवत तिला विचारलं , " तुम्हाला हा adress माहीत आहे तुम्ही मला सांगू शकाल का ?  ' यशोदा सदन ' कुठे आहे ते? "

"  ओ sss म्हणजे तुम्ही यशोदा काकूंचा मुलगा आहात .
त्या तर , तुम्ही येणार म्हणून खूप खुश आहेत . त्या आमच्याच कॉलनीमध्ये राहतात . चला मी सोडते तुम्हाला , माझ्या स्कुटीवर यायला आवडेल ना "

" अहो ,  पण सामान खूप आहे कसं होईल adjust "

" अहो होईल ओ adjustment is the best option for living a life . " असं म्हणत ती त्याच्या हातात असलेल्या bags स्कुटिवर set करते .

" बरोबर बोलला तुम्ही thanks हा मला घरी सोडताय त्यासाठी "

" अहो thanks काय आणि कशासाठी अहो यशोदा काकू खूप प्रेमळ आहेत . त्या खूप आतुरतेने वाट बघत आहे . तुमची त्यांची आतुरता संपायला हवी . चला आता. वेळ नका दवडवू . " असं म्हणत ती एक हेल्मेट त्याला देते आणि एक हेल्मेट आपल्या डोक्यात घालते . आणि ते काही तासातच यशोदा सदन ला पोहोचतात .

" तुम्ही बाहेरचं थांबा हा " असं म्हणत ती काकूंकडे जाते आणि त्यांचे डोळ्यांवर आपले हात टेकवून बाहेर घेऊन येते .

" अगं अरोही असं काय करतेय डोळ्यांवर असे हात का टेकवले आणि मला कुठे नेतीस ? खूप पडली बाई मस्करी नको करू . "

" थांबा काकू एक मिनिट " असं म्हणत ती दरवाजासमोर गेल्यावर काकूंच्या डोळ्यावर टेकवलेले हात काढते .

काकू आरव ला बघताच भारावून जाता . डोळे त्यांचे आनंदाने पाणावले . गहीवरल्या स्वरात ,
" आरव बाळा कसा आहेस ? " हा प्रश्न विचारून त्याच्या मिठीत शिरतात . आणि रडतात . ते अश्रू दुःखाचे नाही तर , आनंदाचे असतात .

तेवढ्यात आरोही " काकू पुरे झालं आता अजुन रडला ना तर आपल्याला नवीन सदन शोधावं लागेल . "

" आरोही काय ग हे मजाक घेतेस का काकूंची रडू दे ग खूप दिवसांनी आलाय भेटू दे त्याला मनभरून . "

" बरं काकू तू भेट मनभरून मी येते आता "

" तू आणि कुठे चालली थांब जरा वेळ जेवून जा की , "

" नको काकू कॉलेज ला जायचं आहे . नाहीतर थांबले असते . " असं म्हणत ती तिथून निघून जाते .

आरव आईला म्हणतो , " किती चांगली मुलगी आहे ना " काकू ही " हो रे खूप गोड मुलगी आहे. नेहमी आनंदी असते हिच्याकडे पाहिलं ना की माणसाचं दुःख विसरून जात. " असं म्हणत ते घरात जातात . खूप गप्पा वैगरे मारतात . आरोही त्याला खूपच आवडली होती . तिच्याशी मैत्री करण्याची त्याला खूप ईशा होती . सांजवेळी आरव च्या घरी  एका मुलगा आणि त्याला त्याने निरोप दिला .
शेजारच्या दिदिने तुम्हाला चहा घ्यायला बोलावलं म्हणून ,

" कोण शेजारची दीदी " अस प्रश्न  आरव ने त्या मुलाला केला .

" अहो आमची आरोही दीदी "

" Ohh ! येतो म्हणून सांगा तुमच्या आरोही दिदिला " असं म्हणत तो जागचा उठला आणि आईला सांगून आरोही च्या घरी चहा घेण्यासाठी गेला .

आरोही दारात उभी राहून त्याचीच वाट बघत होती .
" Welcome mr arv " असं म्हणत ती त्याच्या हातात हात देत वेलकम करते .

चहा वैगरे झाल्यानंतर तो घरी परतताना आरोही ला विचारतो , " will you friendship with mi "

" Yes why not "  असं म्हणत ती त्याच्याशी मैत्री करते . दिवसेंदिवस त्यांची मैत्री बहरत जाते . आरव च्या मनात तिच्या साठी प्रेम जागं त आणि तिच्याही मनात आरव साठी तिचं फिलिंग निर्माण होत असते . पण ती कधीही पुढाकार घेऊन व्यक्त होणार नव्हती . सार एकदम सुरळीत चाललं होतं. 

आरव व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तिला प्रपोज करायचं ठरवतो . तिच्यासाठी एकदम सुंदर daymond ring parches करतो.  आणि सुखी संसाराची स्वप्न बघायला सुरुवात करतो . आणि नेमकं त्याचं दिवशी तो wp dipila एक जोक म्हणून स्टेटस ठेवतो . त्याला ती रिप्लाय देते . तू काय नुसता मुलींकडे बघत असतो का ?
त्याच्यावर त्याचा रिप्लाय येतो . हो मुलींकडे बघत असतो कधी कधी पण आता नाही बघणार कारण माझ लग्न होणार आहे . मग मुलींकडे बघून कसं चालणार . ती सगळी म जाक आरोही सीरीरसली घेते . आणि आरव ला नको नको ते बोलते . आरव ही तिच्याशी अबोल होतो . त्यांची असलेली मैत्री ही तुटते . दोघांचेही खूप मोठे गैर समज होतात . एकमेकांबद्दल काही जाणून घेण्याची त्यांना ईश्चां नसते . आरव ही कामानिमित्त परत दुसऱ्या शहरात निघून जातो . गैर समजाची अडी मनात ठेवून ती आपल्याला असं का बोलली ह्या प्रश्नाचं उत्तर न घेताच तो त्यांच्या नात्याला पूर्णविराम देतो .

आरोही ही नंतर खूप पस्तावते आपण दुसऱ्याचा राग त्याच्यावर का काढला ह्याचं gilt तिच्या मनाला सतत  खात होतं . पण आता काहीच फायदा नव्हता नात्याचा the end alredi झालेला होता . प्रीतीचा सुगंध कधीच संपला होता .

तरीही तिच्या मनात अजूनही आस होती . त्याला आपली बाजू समजली तर , तो आपल्याला नक्की समजून घेईल .

तुझ्या प्रीतीचा सुगंध दरवळला नाही ,
गंध तो मनाचा तू ओळखला नाही ,
भावनेत होते  मी हरवलेले ,
तुला तू न केलेल्या चुकांचे दोष दिले ,
त्यासाठी मनापासून माफी मागते एकदा माफ कर रे .....
तुझ्या प्रीतीचा सुगंध पुन्हा एकदा दरवळू दे रे !!!

ही कथा पूर्णतः कल्पनिकतेवर आधारित आहे . कोणत्याही घटनेशी किंवा व्यक्तीशी संबधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ...












  


ह्या सगळ्यात देवाचे खूप आभार


नियतीने केलाच होता ,
आता निसर्गानेही केला ,
जन्म सारा मातीत मिसळला ,
अकुरण्याआधीच खुडला ,

देवाचे खूप आभार ,
सहन शक्तीची ताकत दिली ,
वेदने पलिकडचे दुःख दिले ,
सुख सारे हिरावून घेतले ,

कमी वयात खूप सारे ,
 अनुभव वाट्याला आले ,
आयुष्य माझे सजले ,
दुःखाने च ते नटले ....

बालपणाची कळी नकळत कोलमडली ,
कोलमडलेली कळी नव्याने फुलली ,
आज निसर्गाने त्याची किमया दाखवली ,
स्त्री जन्माला मी पारखे झाले ,
माझे अस्तित्व माझ्यापासून हिरावून घेतले .
आयुष्याला ग्रहण नवे लागले ....


का रागवलात

वो छोटे सरदारजी ,
बोला काय तुमची मर्जी ,
कुठे गेली चेहऱ्यावरची कळी हसरी ,

रागात तुम्ही हॅंडसम दिसता राव , 
बोला की आता , का खाता उगाच् भाव ? 

माझा एवढा काय राग आलाय् ,
कि दिवसभर  राजकुमाराचा मूड गायब झालाय ,

मम्मा , 
माझी हि wish कंप्लेट कर ,
ती wish कंप्लेट कर , सांगतो मर्जीने ,
तो आज काहीच बोलत नाही स्वखुशीने ,

का तु रागावलास ?
माझ्याशी असा अबोला धरलास ,

चुकलं असेल माझं माफी मागते मर्जीने ,
कर राजा माफ मला स्वखुषीने ,

कशी सांभालावी तुझी मर्जी कळत नाही ,
तुझ्या रागाचा पत्ता च् मला ठाऊक नाही ,

कळत नाही रागाला वाट कशी करून दयावी तुझ्या ,
कस घ्यावं आनंदाने , तुला मिठीत माझ्या ,

Oct 9, 2021

त्या वळणावर

त्या वळणावर आपण भेटलो ,
न भेटलो होतो कधी असे ,
शब्दा पुरतीही ओळख नव्हती ,
तरीही तुला माझी आस होती .....
मला तुझी ओढ होती .....

त्या वळणावर मी उभी राहिली ,
उन्हाचे चटके होते सोबतीला ,
त्यात तुझ्या सावलीचे आलिंगन लाभले ,
त्या वळणावर तुझ्याशी नाते हे जुळले .....

शरदात चंद्र तो खुलतो ,
अरे त्याचेच प्रतिबिंब तू मला भासतो ,
त्या वळणावर चांदण्याची रात ,
त्यात तुझी मिळालेली साथ ..
मनी दाटलेला प्रेमाचा गोडवा आठवतो ...

नियतीने माणुसकी दाखवली

माणसाने माणुसकी जपावी ,


जिवापाड ती जपावी ,


एकवेळ तहान भूक विसरावी ,


पण माणुसकीची शिकवण न विसरावी ....


माणुसकी खूप महत्वाची असते . माणसाचं हृदय कोमल असावं , स्पर्श करताच दुःख विसरून जावं . निश्टुर


निर्दयी नको . असं प्रत्येकाला वाटतं . मलाही आणि ह्या कथेतील मुलीलाही वाटत होत माझ्या माणसांची मन कोमल असावी . निर्दयी नसावी . का माझी हक्कांची माणस एवढी निर्दयी आहेत . असा विचार करून ती थकत होती . काय असेल तिची उत्सुकता आहे ना मलाही आहे लिहिण्याची ......


मानसी कष्टाळू , कनवाळू , दयाळू माणुसकी जपणारी . प्रत्येकाशी प्रेमाने वागणारी . आईविना पोरं बिचारी , सावत्र आईंच्या छायेखाली वाढली . छाया तर मिळाली च नाही उलट , छायेतही धूप मिळाली .


वडील तिचे कामानिमित्त सतत बाहेर राहायचे . काही दिवसांनी पुण्याला नोकरी मिळाली म्हणून पुणे त्यांना नाईलाजाने गाठावं लागलं . मानसीला सोडून जाण्याची ईच्छा चं  होत नव्हती . पण काय करणार शेवटी पोटापाण्याचा प्रश्न होता . आणि सुरुवातीला मानसी ची दुसरी आई तिचं प्रेमाने करायची . त्यांची मस्त अट्टी -  बट्टी जमली होती . त्यामुळे सुधाकरराव मानसी चे वडील ह्यांनी  डोळे झाकून तिला वसू मानसी ची सावत्र आई हिच्या विश्वासावर सोडले . आणि ते पुण्याला शिफ्ट झाले .


ते पुण्याला शिफ्ट झाले आणि लगेच मानसीच्या आईचे चित्र पलटले . तिने मानसी चे चालू असलेले शिक्षण बंद केले . तिच्या अंगावर सारी  घरची आणि दारची   कामं सोडली . तिने नकार दिला तर नकार देता क्षणीच तिच्या आईने तिला लाकडाचे चटके दिले जिभेला उलथन्याचे चटके दिले . मजबुरिने मानसीला सातवीतच चालू असलेले शिक्षण बंद करावे लागेल आणि नशिबाचे भोग भोगावे लागले .


अधून मधून बाबा विचारपूस करायचे . तेव्हा तिची आई तिला बाबांशी बोलूच द्यायची नाही . आणि  जर कधी बाबाने खूप हट्ट केला तर , कधीतरी तिला बाबांशी बोलायला मिळा यचं . 


जर कधी बाबाने बाबाने विचारलं , " बाळा कशी आहेस ?"


तर हिचे डोळे पाण्याने तुडुंब भरून यायचे . तोंडातून शब्द फुटतं नव्हते . ती  उर आणि हुंदके सांभाळत फक्त एवढीच बोलायची , "  मी मस्त , तुम्ही कसे आहात ? "


" बाबा लवकर ह्या " अशी बोलायची इच्छा असूनही ती बोलू शकत नव्हती . कारण तिची आई तिच्या बाजूला जलक लाकूड घेऊन उभी असायची . मी मस्त मजेत आहे . तुम्ही तुमची कामं निवांत करा . आई खूप काळजी घेते . असं बोलण्यासाठी तिची आई तिला दटवायची .


तिच्या धाकाने ती काहीचं बोलू शकत नव्हती . होणारा अन्याय सहन करत होती .


मानसी लहानाची मोठी होईपर्यंत तिचा शारीरिक मानसिक छळ हा नेहमीच होतं राहिला . ती त्याला प्रत्यू त्तर देऊ शकली नाही .


खूप दिवसांनी बिचारी च्या कानावर आनंदाची बातमी पडते . बातमी ऐकून मानसीला आकाश ठेंगणे झाले . बातमी च अशी होती . तिचे बाबा आता कायमचे घरी परतणार होते . ते पुन्हा कधीही कामानिमित्त बाहेरगावी जाणार नव्हते . पण ते नेमके कधी येणार हेच बिचारीला माहीत नसतं ते सरप्राइज असतं . त्यामुळे ती थोडीशी नाराज होते , आणि बाबा येताय ना ते महत्वाचं सरप्राइज म्हंटल्यावर काय सांगा आजच ते आपल्याला मिळेल .


असं सांगून ती स्वतः ला समजावत राहायची .


ज्या दिवशी सुधाकर राव घरी येणार असतात . त्या दिवशी सुधाकरराव तिच्या आईला सांगतात .  " मी आज येतोय प्लीज पोरांना सांगू नको . आणि प्लीज कोणालाही आज कुठेही बाहेर जाऊ देऊ नको . मी घरी आल्यावर मला माझी सारी पोरं माझ्या डोळ्यासमोर हवी . विशेष करून माझी मनु , चल मी ठेवतो आता निघण्याची तयारी करावी लागेल ."


असं म्हणून ते फोन ठेवून देतात इकडे ते येणार म्हणून वसुची तळपायाची आग मस्तकात गेली . ते येणार म्हंटल्यावर आपलं सारं पितळ उघडं पडणार . ह्या भीतीने तीला धासती भरली .


काय करावं सुचत नव्हत . ते येणार त्या दिवशी वासूने मानसी घ राबाहेर राहील अशी जास्तीची काम सांगितली . तिच्या काम सांगितले आणि मानसीने नकार दिला असं आज पर्यंत झालं . नव्हत कारण हिने नकार दिला तर मग हिला चाबकाचे फटके आणि जलक्या लाकडाचा अनुभव घ्यायला मिळायचा . जो की खूप जीवघेणा होता .त्यामुळे ती साऱ्या कामांना होकार द्यायची .


तिचे बाबा घरी आले त्यांनी सगळ्यांना जवळ घेऊन सोबत आणलेल्या भेटवस्तू दिल्या . त्यांचे डोळे  आतुरले होते ते   मानसी ला बघायला . पण मानसी काही त्यांना दिसत नव्हती . त्यांनी वसुला विचारले , " वसू मानसी कुठे  गेली काही सांगून गेली का ? "


वसूने आल्या आल्या च त्यांच्या मनात वसू विषयी तिरस्कार निर्माण होईल असं तिच्या वागण्याचं वर्णन केलं . त्या वर्ण नावर सुधाकर भाऊंचा विश्वास बसत नव्हता . पण थोड्या वेळाने जे घडलं त्याने त्यांना वसूच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला भाग पाडलं .


वसू एका अनोळखी मुलाच्या गाडीवर बसून आली होती , ती ही त्याला चांगली च खेटून ची टकून  बसली  होती .


डोकं पूर्ण त्याच्या खांद्यावर टेकवलेल होतं . कसली तरी धुंदी चडली असावी . नशा केली असावी कधाचीत तिने ,  वाटतं तर तसचं होतं .


ती गाडीवर उतरली सुधाकर भाऊंनी तिला विचारलं , " काय आहे मनु हे , दिवसा ढवळ्या उन्हात काय थेर सुचताय तुला . एवढी कशी बदलली माझी मनु नशाच्या भरात मानसी उलट सुलट बोलली . मनात असलेलं एवढं मोठं दुःख ती बडबड बोलली . तिचं दुःख खरं असलं तरी , तिची वेळ चुकली होती बोलण्याची म्हणून कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही . तिच्या बापाने तर तिला खोलीत बंद केलं . वसुने अजुन आगीत तेल ओतले नको नको ते बोलून सुधाकर रावांचे कान भरले . शेवटी मानसी चे मामा ह्यांनी सुधाकर रावांना सुचवले  तुम्ही गावात चर्चा व्हायच्या आत मानसी च  लग्न उरकून टाका . तिच्या बाबांनाही ते पटतं . ते तिच्यावर खूप चिडतात तिच्याशी अबोला धरतात . ते तिच्या मामाना म्हणतात . " तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा . मला तिचं तोंडही बघण्याची इच्छा नाही . ती आजपासून मेली माझ्यासाठी आणि ते तावातावा त घराबाहेर जातात . तिचे मामा तिच्यासाठी खूप चांगला मुलगा बघतात . लग्न लावून देतात .


तिचं नशीब चांगलं म्हणून तिला खूप प्रेमळ सासू सासरे मिळाले होते . नवराही खूप जीव लावणारा निघाला . आयुष्य सोण्यापरी सुंदर उजळून निघाल . तिला माहेरच्यांची आठवण पण नव्हती येत.  तिथे तर बिचारीने नेहमीच दुःख भोगलेले होते . 


लग्नाला दोन एक वर्ष पूर्ण झाले होते . तिच्या नवऱ्याच्या जवळच्या मित्रांसाठी पार्टी ठेवली होती . त्यात एक जण तिला बघताच आश्चर्य चकित होतो.  आणि विचारतो , " तू इथे कशी ? "

ती ही त्याला म्हणते  , " मी इथेच असते . पण तू इथे कसा ? का आलास ?  माझ्या आयुष्य बरबाद करुन फरार झाला . पुन्हा का आलास माझ आयुष्य बरबाद करायला . निघ इथून . "


ती कडक शब्दात त्याला दम देत असताना तिच्या नवऱ्याने पहिले आणि तो तिला सावरायला आला . 


"  अग का एवढी चिडतेस त्याच्यावर मित्र आहे  .


तो माझा मीच बोलावलं त्याला हा मित्र तुमचा ज्याने माझं आयुष्य बरबाद केलं . माझ्या एकमेव अश्या हक्काच्या माणसाला माझ्यापासून तोडल . "


" म्हणजे काय बोलतेस तू मला काहीच नाही कळत ,  तू ह्याला कशी ओळखतेस ? "


तेवढ्यात त्याचा मित्र बोलतो , " थांब शेखर मी सांगतो तुला सगळं " तो आधी पाय धरून मानसीची माफी मागतो .


तुम्ही माफी नका मागू पण  त्या वेळी असं का वागला एवढंच सांगा मी खूप ऋणी असेल तुमची . "


त्यावेळी मला पैशाची नड होती . म्हणून मी तसा वागलो तुमच्या आईने ते कृत्य करण्यास मला भाग पाडलं . मनात 


नसूनही मी तसा वागलो . "


तेवढ्यात तिचे आई वडील येणार होते ते ही ते संभाषण ऐकतात . आता सर्वांना कळून चुकलं होतं की तेव्हा चूक मानसीची नव्हती . तिचे बाबा तर तिच्या आईवर हात उचलतात तेव्हा तिचं जाऊन त्यांचा हात पकडते आणि बोलते. "  तिने तिची माणुसकी सोडली म्हणून आपण आपली माणुसकी सोडायची का ? ती चुकली तिला माफ करा . "


आज नियतीने माझ्यावर दया दाखवली माझ्या वर लागलेले सारे कलंक मिटले . आज मी कोणाशीही निश्ट्युर वागणार नाही.  तुम्हीही वागू नका .


माणुसकी माणसाचे आत्मदर्शन घडवते . ती कधीही विसरू नये .


हेचं मागितले

आज मंदिरात गेले होते ,
माझ्यासाठी काहीचं नाही ,
त्याच्यासाठीच मागितले होते ,
त्याच्यासाठीच बर का ,
त्याने मला खूप हसवले आणि छळले होते .....

माझे आयुष्य त्याला लाभो ,
हेचं मागितले ,
माझ्यातील समज जरा त्यालाही दे ,
आम्हाला जोडून ठेवायची जबाबदारी तूच घे ,
हेचं मागितले ....

नदीच्या तीरावर त्यांच्या आठवणीत  गुंग झाले ,


सुर्य नारायणाने ते पाहिले ,


नदीच्या पात्रात पडलेल्या किरणातही ,


मला त्याचेच प्रतिबिंब दिसले ,
माझ्या मनात त्याचे प्रतिबिंब असेच झळकू दे ,
हेचं मागितले ...


इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...