आजचा माझा विषय आहे ऑनलाईन नाती .....
सहज नाही सुचला माझ्या मैत्रिणीने आज मला खूप रडवल ती चा फोन झाल्यानंतर मी खूप रडले . नंतर माझ्या आवडत्या उर्मिला ranju ताईला कॉल केला . खूप वेळ बोललो खूप छान वाटलं . आणि मग कळली खऱ्या अर्थाने ऑनलाईन नात्याची परिभाषा ......
सोशल मीडिया वाटते तितकी चांगली नाही . पण जितकी वाईट वाटते. तितकी वाईट ही नाही . कारण इथे माणसाचं असतात . काही वाईट तर , काही खूप चांगले . आवड म्हणून ते इथे येतात. आणि मग ओढ आपुलकी ह्यामुळे इथे रुळतात .
माझही तसचं झालं मी प्रतीलीपी वर आले तेव्हा स्वप्नातही नव्हत वाटलं . मला इतकी चांगली माणस भेटतील . मी ही त्यांच्यात आनंदाने सामील होईल . पण माया , आपुलकी जिव्हाळा ह्यामुळे ते सहज शक्य झालं .
सुरुवातीचे काही दिवस कोणाशीच नाही बोलले इनबॉक्स मेसेज आले तरी मी रिप्लाय देत नव्हते . भीती वाटायची आणि वेळ ही नव्हताच . त्यामुळे दुर्लक्ष करत राहिले . मग प्रोब्लेम यायला लागले मग बोलण सुरू मदतीसाठी सगळ्यात पाहिले बोलले असेल ते गणेश दळवी ला खूप प्रेमळ व्यक्ती मला खूप सपोर्ट करतात . नेहमीच मार्गदर्शन करतात .
नंतर खूप मित्र मैत्रिणी झाल्या . अनिल दादा मुलगी मानतात मला . मोहन सोमलकर हे तर मला बेटी म्हणतात मी ही त्यांना बाबा बोलते . तुषार दादा आहे तो मला छोटी बहीण मानतो . अजुन माझे खूप मित्र आहेत . सतीश ह्याला तर मी खूप छळलं बिचाऱ्याला नेहमीच कन्फ्युज केलं . तरीही तो बिचारा खूप आदर देतो मला मैत्रीण म्हणून आमचं bonding छान आहे . R . Patil पण आहे तो पण चांगला आहे . जरासा अखडू आहे पण ठीक आहे . काही असे काही तसे पण छान आहे मला नेहमी समजून घेतो . लहान म्हणून सोडून देतो . त्यामुळे त्याच्याबद्दल विशेष स्थान आहेच मनात .
सुविधा आई पण छान आहे . अगं ना परांजपे आहे ती पण मुलगी मानते , मला सुवर्णा मालपुरे , प्रीती ताई ,
पिऊ ताई आणि जयश्री ताई . खूप जनी आहेत . आणि माझी लाडकी करिश्मा ताई मला खट्टू बोलणारी .
तू डिस्टर्ब असली की कॉल कर हक्काने सांगणारी मला लहान बहीण मानणारी अजुन. खूप सारे आहेत . कोणा कोणाची नावं घेऊ .
आणि सगळ्यात आवडत व्यक्ती महत्त्व माझा आदर्श आई बाबा ह्या शब्दाला पूरक असे आमचे आबा देवमाणूस ते माझ्या आयुष्यात आले मी माझ भाग्य समजते . मला खूप सपोर्ट करतात . त्यांच्या एवढा प्रेमळ माणूस ह्यापूर्वी कधी भेटलाच नाही . खूप सुंदर माझ्या वडीलांप्रमाने आहेत .
मानसी ताई पण खूप छान आहे . राजश्री ताई पण कोणाची नावं राहिली असतील तर सॉरी कारण खूप जण आहेत . त्यांच्याशी माझे संबंध खूप चागले आहेत .
मला एवढी चांगली माणस भेटली . मला समजून घेणारी
माझ्यावर प्रेम करणारी . ती frod असू शकत नाही . आणि असेल तर मग मी पण frod मध्ये गणल्या जाईल .कारण मी पण आहे इथे अकाऊंटला .
ज्यांनी ऑनलाईन नाती कमावलीच नाही त्यांना ऑनलाईन नात्यांचं महत्त्व कळणारच नाही . ऑनलाईन नात्यांची किंमत पण कळणार नाही . सोशल मीडिया म्हणजे वाईटच हे ठरवून ते मोकळे होतात . ब्रम्हा पलिकडे ही एक सुंदर जग आहे हे ते विसरून जातात . त्या जगात खूप सारी चांगली माणस आहेत ह्याचाही त्यांना विसर पडतो . पण खरच ऑनलाईन नाती खूप छान असतात . ओळख नसतानाही जुळली जातात. मग मन गुंतली जातात . सवय लागते . खरच खूप छान असतात ही ऑनलाईन नाती मी खूप नशीबवान आहे . मला ती मिळाली ...
प्रतिलीपीवर खूप गोड गोड माणस मिळाली त्या गोड माणसांना समर्पित .....
अप्रतिम
ReplyDeleteखुप सुंदर पध्दतीने नात्यांचे विश्लेषण केले दुर्गाताई
ReplyDeleteअतिशय सुंदर अप्रतिम
खूप छान नित्या 👌👌👌👌ऑनलाईन नातीही खूप जीवाभावाची
ReplyDeleteअसू शकतात, ह्याचे खूप सुंदर रित्या विश्लेषण केले आहे.
नित्या.. ऑनलाईन नात्या बद्दल खूप छान पद्धतीने आपले मत मांडले आहे...इतक्या कमी वयात खूप समजदार आहेस तू... सगळ्यांचे मन जिंकतेस...👌👍✍️✍️✍️🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫😘
ReplyDelete