प्रश्न सारे अडवत होतो ,
एकाच उत्तराला जवळ घेत होतो ,
नात्यात सतत गैर समज निर्माण करत होतो ,
कळत असताना सुद्धा नकळत एकमेकांना दुखवत होतो ..
का असे वागत होतो ,
भलतेच भाव मनात आणत होतो ,
नव्हतं हवं होतं का आपल्याला रिलेशन ,
कळेना नेमकं कुठे शोधाव सजेशन ...
सतत भांडण चिडचिड त्रासदायक ,
वाटत खूप भयानक ...
आता पुरे झाला प्रश्न उत्तरांचा खेळ ,
नको वाया फुकट वेळ ,
बसू दे नात्याचा मेळ ...
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर👌👌👌
ReplyDelete