स्वप्नांहूनही सुंदर भास व्हावे ..
त्यात तुझे चित्र स्मरावे ...
अनोळखी हे बंध नव्याने जुळावे
व्याकुळलेल्या विरहाच्या गिताचे शब्द मुके व्हावे ..
प्रेमाचे प्रतिक तुझ्या नयनात मी पहावे ..
तुझे आयुष्य तू मला समर्पित करावे ..
हे बंध नव्याने जुळावे ..
श्वासाचे गणित तुझ्या मी मोजावे ..
मोजता मोजता त्यातच तुझे भान हरावे ..
आणि डोळ्यांत पाहताच तुझ्या मी मजला भूलावे ..
नाते हे दिवसागणिक बहरावे...
हे बंध नव्याने जूळा वे ..
Written by - durga mate