आयुष्याचे गणित सोडवण खूप कठीण ..
पण एवढं अवघड ही नाही ..
येणाऱ्या प्रत्येक संकटावर हसत हसत मात करायची.
जिंदगी आपली दिलखुलासपणे जगायची .
हातावरील मेहंदी जशी रंगते ..
त्यामध्येच इंद्र धनुष्याचे रंग सामील करून आयुष्य रंगवायचं....
कधी हसायचं तर कधी हसवायच ...
रडताना क्षणभर थांबायचं.
आयुष्याचं गणित सोडवायच.
मला कुठल्याही परिस्थितीत रडायचं नाही हे ..तर , रडणाऱ्याचे डोळे पुसायचे ..मनी रुजवायच ..
आयुष्य हे संगीताच्या सुरेल मैफिली प्रमाणे रंगवायचं.
आयुष्य हे सुंदर प्रकारे जगायचं ...
स्वतः ही जगायचं आणि इतरांना ही जगायला शिकवायच ..
खूप छान अप्रतिम लिखाण 👌
ReplyDeleteआबा
🙏