नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jun 30, 2022

दोघांचं विश्व सजावं..

प्रेम म्हणाव की जादू मला कळेना ..
तुझे वागणे काही उमजेना ...

स्पर्श तुझा हवा हवासा वाटतो ..
तू येतोस मणभर आनंद देतोस

क्षणभर राहतोस स्वर्ग सुख देऊन जातोस ..

तू सतत आसपास रहावं असच वाटतं .

तू मला सोडून जाणं खूप सतावत ..

तुझी ओढ भारी मला भुरळ पाडते ..

धुंदी तुझ्या प्रेमाची वेड लावते ..

मी तुझ्या आस पास लुटपुटत असावं ..

माझ्या व्यतिरिक्त तुझ्या सावलीस कोणी नसावं ..

तू फक्त माझ्यासाठी हसावं आणि माझ्यासाठीच जगावं ..

हेचं स्वप्न मी दीन रात पहावं .

स्वप्नं माझ मी न सांगताच तुला , तू पूर्ण करावं ..

दोघांचं विश्व प्रेम फुलांनी सजावं ..
दुर्गा मते

राखून ठेवले..

जीवनी माझ्या पसरते सुखाची वर्दळ .
तेव्हा दाटून येते तुझ्या आठवणीचे वादळ ..

हसता हसता मी रडू लागते .....

तुझ्या आठवणीत शिरताना तुझ्यासाठीचं जगून पाहते ..

भास छळतात मला तुझे ..

तुझ्या आठवणीचे डोईवर माझ्या अनामिक ओझे ..

तुझा भास नकोसा वाटतो ..

मी घेत असलेला माझा श्वास तो हिरावून घेतो ..

स्तब्ध होते मी हरवून जाते मी ...

माझ्यासाठीचं नाही उरत मी ,

माझ्या तूनही हरवून जाते मी ..

तू दुरवून ही माझ्यापासून ,

वेड असे कसे रे मला तुझे ..?

का राखून ठेवले तुझ्यापाशी ,

हृदयाचे ठोके माझे ..

तुला मनापासून जीव लावला चूक झाली ..

त्याची शिक्षा भोगता भोगता मी रडकुंडीला आली ..

दुर्गा मते


Jun 29, 2022

मी मनासारखं जगणार...

मनातील डायरीचे पान विषय अंतर्गत ..

थोडस मनातल बोलूया सखी ..मनातील एखादी करायची राहून गेलेली गोष्ट मनाला खूप चटका लावून जाते .

" किती बरं झालं असतं ना , मी ज्या वेळी जी गोष्ट करायची मला संधी मिळाली होती . ती गोष्ट त्याचवेळी केली असती तर , मनात आज ही रुख रुख राहिली नसती .

एवढं सुंदर आयुष्य जगलो आपण पण जगताना   एक क्षण जगायचा राहूनच गेला .. जो मला भर भरून जगायचा होता . पण ; समाजाचा विचार करत सामाजिक बंधने स्वतःवर लाधून  जिथे मला मोकळा श्वास घ्यायचा होता . तिथेच मी स्तब्ध झाले ..आणि स्वतः चाचं आनंद मिळवण्यास कुठेतरी कमी पडले ..


ही सल माझ्या मनात कायम स्वरुपी टिकून राहील . पण त्याच बरोबर एक समजूत मी मनाची घातलीय . ह्यानंतरचं माझ जे ही काही आयुष्य उरलंय ते मात्र मी भरभरून जगणार ..समाजाने जी जोखंड माझ्या सभोवताली बांधली आहेत ना , ती मात्र मी तोडून टाकणार .


.आयुष्य माझं मनासारखंचं  जगणार ..नंतर मनातलं थोडस बोलण्यासाठी कोणतीच पोकळी निर्माण होऊ ही देणार नाही . आणि मनात काही ठेवणारं ही नाही .

दुर्गा मते

तिचा हक्क

तिचा हक्क तिला द्यायलाच हवा ..
पणती तूनही प्रकाश घ्यायला हवा नवा ..

तिच्या अस्त्वित्वा पलीकडेही तिची ओळख व्हावी ..
स्त्री जन्माची कहाणी नव्याने उलगडावी ..


अत्याचाराला वाचा तिनेच फोडायला हवी ..

शिवबा सारखा पुत्र ह्या स्वराज्यास द्यायला ,
तिनेच जिजाऊची ओवी रचायला हवी ..

चार भिंतीत राहूनही  तिला ,
जगाची ओळख व्हायला हवी ..
तरच ती कहाणी रचू शकेल नवी ..

तिनेही बघायला हवी स्वप्न ..
स्वप्न बघताना ती पूर्ण करण्याची ,
आस ही मनी ठेवावी ..


चार चौघात ती आदर्श स्त्री म्हणून झळकावी ..

तिचा हक्क तिला समाजाने द्यायलाच हवा ..
समाजाने देण्याआधी तिच्या कुटुंबाने तिला .
जगण्याचा विश्वास आणि सामर्थ्य द्यायला हवे ..
ते घडवेल तिचे भवितव्य उज्वल नवे ..
दुर्गा मते

Jun 28, 2022

का कुणास ठाऊक

का कुणास ठाऊक ?
आज मला तुझ्याशी खूप बोलावस वाटतंय ..
पुन्हा एकदा नव्याने ..
फक्त तुझीच म्हणून जगावस वाटतयं ..

खूप एकट  एकट वाटतंयं
सभोवतालीचं जग परक भासतयं ..

सुन्या सुन्या मैफिलीत तुझी कमी जाणवते ...
तुला भेटण्याची ओढ अंतरंगी नव्याने दाटते ..

स्वप्नांना माझ्या पंख लावले होतेस तू ..
बघ नवल !  किती हे आगळे वेगळे ..
माझ्या छाटलेल्या पंखाच कारण ही बनलास तू ..

का कुणास ठाऊक ..
ज्यांच्याशी शी कधी शब्द ही बोलायचा नव्हता .
आज त्याचाच उच्चार ऐकायचा होता .

का कुणास ठाऊक ?
आज असा कसा नव्याने त्याचा लळा लागला
त्याच्या साठी जीव पुन्हा तळ मळू लागला.
written by - durga rahul shejul

छंद वेडा मला लाभला .

छंद जगण्याचा मी जोपासते ..
स्वतःच्याचं विश्वात धुंद असते ..

नाही राहत मला भान जगाचे ..
मी तर आजमावते शिखर माझ्या छंदाचे ..

साथ लाभते मला शब्दाची ..
शब्दांना हळुवार आस लागते लेखणीची ..

सुंदर जग माझ मुक्त स्वप्नांनी सजवलेलं ..
त्या स्वप्नांना ही छत जिद्द आणि चिकाटीचं लाभलेलं ..

राग द्वेष मत्सर दूरच फेकते ..
मी तर प्रेम रंगाची उधळण करते ..

ह्या वेड्या मनाला आस भक्तीची ..
ती आस लाड पुरविते माझ्या छंदाची ..

मनी सुरू होतो गजर विठ्ठल नामाचा ..
मी जपते वसा वाड वडिलांचा ..
छंद वेडा मला लाभला भक्ती नामाचा ..
दुर्गा मते

Jun 27, 2022

करणार नाही मागणी ..

आयुष्य म्हणजे तडजोड .
राहील जो गोड गोड ..

त्यालाच मिळेल सुंदर फळ ..
न सोसावी लागेल कळ ....

जो ठेवील मन स्वच्छ ..
तोच घडवेल उज्वल भविष्य ..

जो राखेल समतोल मनाचा ..
तो  होईल राजा उभ्या जगाचा ..

गोर गरीबांप्रती माया ज्याच्या मनी ..
तो यशाच्या सिडी वर स्वार होईल क्षणोक्षणी ..

जो असेल

सदा सर्वदा समाधानी ..
त्याच्या कडे आयुष्य करणारच नाही तडजोडीची मागणी ..
दुर्गा मते

Jun 26, 2022

जरी घेतली तू भरारी.

जरी घेतली तू भरारी आकाशी ..

नाळ तोडू नका ह्या मातीशी ..

आपुलकीची असू दे वीण ह्या धरणीशी ..

गगनी फडकवताना झेंडा यशाचा ..

पाठपुरावा करून ठेव अपयशाचा ..

मोह वाढवू नको अहंकाराचा ..
वसा जपून ठेव माणुसकीचा ..

सारे दिवस सारखेच नसतात ..
जे मनात हे गोंधून ठेवतात ..
स्पर्धेच्या युगात तेचं सर्व श्रेष्ठ ठरतात ..
चार चौघात सन्मानाने वागतात ..
दुर्गा मते

Jun 25, 2022

नको रडवू मला .

ये माझी परी ..
चल ना घरी ..

नको रडू अशी ..
तुझ्या दुधात पडेल बघ माशी ..

असं का ग करते राणी ..
आईची किती होते परेशानी ..

तुला मनवताना मीच हिरमुसून जाते ..
 तुझ्या बाबांचे मग बोलणे खाते ..

काम माझे सारे विस्कटून जाते ..
चित्त माझे तुझ्या भवती रेंगाळते ..

ऐक राणी एक कहाणी ..
तू परी माझी शहाणी ..

चल ना ग घरी ..
ये परी ..
नको रडवू मला अशी ..
दुर्गा मते

Jun 24, 2022

तू ही बता दे

तुझे भूल जाऊ या पाने की कोशिश करूं ।

तेरे इंतजार में आंखे कैसे भरू ।।

जहा अटकी हुई हूं ।
वहीं थम जाऊ क्या आगे बढू ।।
कुछ समझ नहीं रहा है ।

ये बेवफ़ा दिल ,
सिर्फ तुझे पुकार रहा है ।

तुही बता दे , ये खुदा
करू मैं तो क्या करू ।

दुर्गा मते

फुलच झाले काटे ...

का आठवतात मला दिवस पूर्वीचे ..

फुलच काटे बनुन मनात रूतलेले ..

छंद त्याचा माझा एक , देह ही एक ,

मन ही एक , श्वास हि एक ..

तरीही दुराव्याने का उघडले दरवाजे अनेक ..

डोळ्यात त्याच्या पाहता हरवून मी जायचे ..

त्याचे नाव जरी ऐकले तरी , ओठांवर स्मित यायचे ..

तरीही रोपटे अनोखे का गेले होरपळून ..

छबी त्याची अजुनही बसलीय मनात रुतून. 

आठवण त्याची येता मन येई गहिवरून ..

आसवे ही येतात हंबरून

जेव्हा आठवण येते मनातून ..

सांगतात मला हर क्षण ..

तो गेलाय निघून आयुष्यातून ..
दे वाट त्याला निघण्यास मनातून ..

तू ही , हो बेदखल त्याच्या जीवनातून ..
दुर्गा मते

Jun 23, 2022

मुस्कुरा कर जीना चाहिए

ह्या मायानगरीत जन्मतांना नात्याची जाणं ही नव्हती आणि पारख ही नव्हती . रक्ताच आणि हक्काचं एकमेव नात म्हणजे लेकरू आणि आई वडील .   एका मनाने दुसऱ्या मनाशी जोडलेले नाते म्हणजे मनाचे नाते . 
आणि ह्याच मनाच्या नात्याची व्याख्या करायची ठरली तर ,  त्यासाठी योग्य शब्द मायाजाळ आणि मायानगरी ..

ह्या मायानगरीत नात्यांचा नुसता बाजार मांडलेला आहे . 
जेव्हा गरज भासेल तेव्हा परके ही लगेच आपले होतात . आणि गरज भागेल तेव्हा लगेच आपले ही परके होतात . 

काय करावी माणुसकी आणि आयुष्याची व्याख्या कळतच नाही . नात्याला काही इंपॉर्टन्ट आहेत की नाही ते ही कळत नाही . मनाचे नाते तर , हल्ली जोडावेसे वाटतच नाही . कोण कधी imotional blackmail करेल सांगताच . Out of करणाऱ्याला माणुसकीची व्याख्या उमगली नाही . असं मला वाटत . 

छोटी सी है जिंदगी 
दिल खोल कर जीना चाहिए ।
यही है जीवन की मंजिल , 
हर एक इन्सान दिल से मुस्कुराए ।।

Jun 22, 2022

मी फोटोग्राफी शिकले ...

लाईट कॅमेरा अॅक्शन म्हणत ,
मी फोटोग्राफी शिकले ..

रंगी बेरंगी निसर्गाचे चित्र कॅमेरात कैद केले ..
बालपण माझे खासच होते जगलेले ..
लाईट कॅमेरा अॅक्शन च्या दुनियेत नव्याने अनुभवले ..

पूर्वजांचे फोटो हाती लागताच ,
न्यू कॅमेरात मी न्यू स्टोरी त्यांची बनवते ..
मृत व्यक्ती ही मग जवळ - आसपास जिवंत भासते. 

प्रत्येक क्षण आयुष्यातील मी कैद करणार ..
फोटोग्राफी शिकले ह्याचा पुरेपूर फायदा घेणार ..

Jun 19, 2022

कंबाइन ...

होतात का  इच्छा पूर्ण ..
नाही राहत का स्वप्न अपूर्ण ..

    प्रश्न मनात उपस्थित राहतात ..
    उत्तराची वाट बघतात ..

कधी होतात स्वप्न आणि इच्छा पूर्ण विश्वास बसतो ..
नाही होत , ह्याच्यावर ही अविश्र्वास नसतो ....

प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेळ ही गळे ..

म्हण आठवते अपूर्ण ईश्चांची मुहूर्त मेड पुन्हा मनात रोवते .पूर्ण - अपूर्ण - संपूर्ण परिभाषा इच्छा पूर्तीची .

व्याख्या ही तशीच नवलाईची - इच्छा - आकांक्षाची . 

इच्छा पूर्ण - अपूर्ण कंबाइन ...
अर्थ त्याचे तेवत राहतील लाँग टाईम ..
दुर्गा मते

Jun 16, 2022

मी घाबरत नाही ..

 मी कधीच घाबरले नाही कोणालाही  गमवायला कोणीतरी माझी साथ अर्ध्यावर सोडून जाईल . या विचारावर ही कधी चर्चा करत बसले नाही . कारण मला स्वतःला गमवायच नाही हे , स्वावलंबी होऊन आयुष्य जगायचं आहे . नेटाकुटीच नाही . समोरच्यावर अवलंबून राहून आयुष्य जगणं माझ्या तत्वात बसत नाही .


स्वतंत्रपणे आयुष्य जगायला आणि विचार मांडायला मला खूप आवडत . माझी जीवन शैली माझ्या कल्पने प्रमाणे आणि मनासारखी असावी  , हे स्वप्न मी रोज पाहते.  दुंभगले जरी स्वप्न माझे तरी मी नव्या आशेने नव्या उमेदीने पुन्हा पुन्हा तेच स्वप्न पाहते . ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करते .


गमवण्याची भीती नाही हे , कारण गवसण्याची धमक आहे . रडण्याची सवय नाही हे , कारण रडवण्याची पद्धत माहीत नाही . आयुष्याचं सर्वात मोठं  सुख समाधानी राहण्यात वाटतं . समाधानी आयुष्य जगतांना दुःख सारं विसरून जावंस वाटतं .


नकारात्मक विचार ऐकायला ही नकोसे वाटतात . आचरणात आणणे तर दूरचं ...सकारात्मक विचारांचाचं मी मान ठेवते आणि त्याचाच स्वीकार आणि सन्मान करते ...
दुर्गा मते

Jun 12, 2022

माझ्या आयुष्याची स्टोरी..

माझ्या आयुष्याची स्टोरी खूप सुंदर आहे .
एका लेखिकेचं आयुष्य असावं , अगदीच तसचं माझ आयुष्य ...

प्रत्येक नवीन वळणावर नवीन chapter open होतो . मला चांगलाच धडा शिकवतो . खूपच हसवतो . कधी मूर्ख ठरवतो . तर , कधी चालाक ठरवतो . असं नी तसं कसतरी प्रत्येक क्षण माझ आयुष्य सुंदर घडवण्यात पटाईत असतो .

मी हसते , हसवते ..रडते , रडवते . प्रेम ही करते . द्वेष ही पत्करते . मला कोणी समजून घेईल अपेक्षा नसते.  समोरच्या ला समजून घेण्यासाठी नेहमीच तत्पर असते .
माझ्या आयुष्याची स्टोरी बेस्ट आहे . माझ्यासाठी ग्रेट आहे. 


Jun 11, 2022

विवाह एक करार ..

विवाह एक करार ..


दोन मनामध्ये न येवो दरार ..


साथ जन्मो जन्मीची ...


गोडी जशी मधाची ..


असावी तशीच प्रीत दोघांची ..


चांदणे प्रेमाचे अंगणी शिंपावे ..


आकाशाच्या कुशीत दुरव्याने निजावे ..


स्वप्न सुखाचे दोघांनी पहावे ..


Jun 9, 2022

अती प्रेम न करणं बर ..

जबरदस्ती प्रेम कोणी कोणावर करूच नये . ते प्रेम निरर्थक असते . जेव्हा आपण कोणावरही अती प्रेम करायला जातो.  तेव्हा त्या व्यक्तीला  ना त्या प्रेमाची कदर असते . ना  तो  आपल्याला पर्सनल स्पेस देतो . ना योग्य तो  मान सन्मान देतो . तो आपल्याला दुबळा समजू लागतो .

त्याच्याशिवाय आपण पूर्ण होऊच शकत नाही . असा भ्रम त्याच्या मनात तयार होतो . त्यामुळे कधीच कोणावरही अती प्रेम करूच नये . समोरच्याला मला तुझी खुप गरज आहे . असं चुकूनही दाखवू नये . नाही तर  आपल्याला आयुष्यभर लापटा सारखं आयुष्य जगावं लागतं.  दुसऱ्याच्या तालावर आयुष्य समर्पित करावं लागतं .

प्रेम करण चांगलं .
    बोलून दाखवण आणि व्यक्त करणं वाईट ..
त्यातही मी तुझ्याशिवाय जगुचं शकत नाही . असं वाक्य प्रेयसीने  प्रियकरासमोर किंवा प्रियकराणे प्रियसी समोर बोलण म्हणजे गाढवपणा ..तो गाढवपणा ज्याने केला तो आयुष्यभर बरबाद झाला ...त्याचं आयुष्य मातीमोल झाल्यात जमा असं म्हटलं तरी हरकत नाही .

अती प्रेम करणं म्हणजे लाचारीचं जगणं ..
श्वास घेत असतानाही अतोनात मरण ...
त्यापेक्षा बर ते अती प्रेम न करणं ..😊😊😊

दुर्गा मते

फक्त तुझीच आस ..

ह्या वेड्या मनाला फक्त तुझीच आस ..
तू आहेसच खास ....
तरीही नाही झाली नशीबाची एक रास ..

वाटतं यावं सार सोडून तुझ्याकडे ..

तुझ्याशिवाय काहीचं नसावं स्वतः कडे ..

तुझी साथ आणि प्रेम हवं मला ..

दुसरं काहीच नको रे ...

त्या देवाला सांग रे ..

होऊ दे भाग्य तुझे आणि माझे एक ...

आता हा दुरावा नाही होत रे सहन ..

होऊ दे ना ह्याचे दहन...
दुर्गा मते

Jun 8, 2022

नको हे अस्ताव्यस्त आयुष्य ...

भरभरून प्रेम करणार ...
असूनही नसल्यासारखं आहे ह्या आयुष्यात ..

अश्रू च आता मित्र झालेत माझे ..
काहीचं नाही बदललं आयुष्यात ..
सुख असूनही आहे , मी दुःखात ..

अस्ताव्यस्त झालं सोनेरी आयुष्य ..

नको वाटतं य जगणं ..

ह्या निरपेक्ष जीवन जगत राहण्यापेक्षा ..

खूपच सुंदर हसत हसत येणार मरण ..

खरच आतुरतेने वाट बघते मी मरणाची ..

शेवटचा श्वास घेण्याची ...

हौस मिटली माझी अस्ताव्यस्त जीवन जगण्याची ..

देवा तुझ्या दारी ,

मी उभ्या आयुष्यात काही पुण्य कमावलं असेल तर ,

मला मरण दे , मरण्याआधी एक मोकळा श्वास घेऊ दे ..

देवा मला मरण दे ..

दुर्गा मते..

Jun 3, 2022

स्त्री जन्मा तुझी कहाणी ...

कधी सरणार स्त्री जन्मा तुझी कहाणी ...

तुझ्या वनवासाचीची कधी संपणार जवानी ..

भोग तुझ्या नशिबाचे कधी फिटणार ...

भाग्य तुझ्या जन्माचे कधी तुला उमगणार ..


पिडा

तुझी किती दिवस आतल्या आत गुसमटणार ,

कधी तू खळखळून हसणार ..

किती ग दुसऱ्यासाठी जगणार ...

स्वतः साठी जगायचं कधी ग शिकणार ...

दुसऱ्याच्या तालावर नाचताना , स्वतःची स्वप्न विसरू नको .

स्वतःसाठी ही जग , मानव जन्म पुन्हा नाही ..

तू स्त्री म्हणून पुन्हा जन्माला येणार नाही ..

मनमोकळे पणाने आयुष्य हे जग ...

आधी स्वतःच मग दुसऱ्याचं बघ ...

ही दुनिया खूपच मतलबी ,
हे पहले तू जान ले बी ...
फिर दिलं खुल के जी ले जिंदगी ..
दुर्गा मते..

आता नाही थांबायचं ..

तुला विसरु शकत नाही ...
खरच तुझ्याशी नातं तोडू शकत नाही ...
तुझ्यावर भरभरून प्रेम करण्या व्यतिरिक्त मला काही येत नाही ..

तुझ्यासाठी नाही दुनियेचे नियम मोडले ..
आणि ना की दूनियेसाठी ह्या मनाचे त्या ..
मनाशी असलेले नाते तोडले ..

तू आयुष्यातील महत्वाचा घटक आहे ..
मी मनाने निवडलेला ..
माझ्यात गुरफटलेला , माझ्यावर भरभरून प्रेम करू पाहणारा ..

तू अविभाज्य भाग आहेस ..
माझ्या आयुष्याचा नाही थांबवायचा रे ..
प्रवास ह्या गोड नात्याचा ..
दुर्गा मते

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...