नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jun 24, 2022

फुलच झाले काटे ...

का आठवतात मला दिवस पूर्वीचे ..

फुलच काटे बनुन मनात रूतलेले ..

छंद त्याचा माझा एक , देह ही एक ,

मन ही एक , श्वास हि एक ..

तरीही दुराव्याने का उघडले दरवाजे अनेक ..

डोळ्यात त्याच्या पाहता हरवून मी जायचे ..

त्याचे नाव जरी ऐकले तरी , ओठांवर स्मित यायचे ..

तरीही रोपटे अनोखे का गेले होरपळून ..

छबी त्याची अजुनही बसलीय मनात रुतून. 

आठवण त्याची येता मन येई गहिवरून ..

आसवे ही येतात हंबरून

जेव्हा आठवण येते मनातून ..

सांगतात मला हर क्षण ..

तो गेलाय निघून आयुष्यातून ..
दे वाट त्याला निघण्यास मनातून ..

तू ही , हो बेदखल त्याच्या जीवनातून ..
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...