हा लेख त्या प्रत्येक दुर्दैवी मुलासाठी ज्यांनी ज्यांनी जन्म दात्या आई वडिलांतूनच वेगळ होण्याचा करार केला . आणि त्यांच्या अस्तित्वावर कलंक लागेल असा पराक्रम केला .
आज माझा मुड खूप खराब आहे . कारण कानावर पडणारी गोष्ट खूपच विक्षिप्त आहे. काय तर मुलगा त्याच्या सख्या आई वडिलांतून वेगळा निघाला . भावातून भाऊ वेगळा निघाला असता तर , normal अँड natural वाटलं असतं . पण सख्खे आई वडील ज्यांनी जन्म दिला , प्रेमाने पहिला घास भरविला . आज त्याच घास भरवणाऱ्या देवतेच्या डोळ्यात पाणी आणलं .
खरचं किती विचीत्र घटना घडतात ना आसपास , डोकं सुन्न पडेल अशा घटना घडतात . एक क्षण असं ही वाटतं . आज ही परिस्थिती तर , अजुन काही दिवसानंतर
हिचं परिस्थिती किती रौद्र रूप धारण करेल . असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो .
आई वडील अपत्यांच संगोपन करताना कमी पडतं नाही .मग अपत्य आई वडिलांचं संगोपन करताना कमी का पडतात ? हा प्रश्न मनात पेटून उठतो . पण भ्रष्टाचाराच्या ह्या गर्दीत त्या प्रश्नाचं उत्तर निपचित पडून द्यावं तेच योग्य असच वाटतं .
घडणाऱ्या घटना आपण फक्त बघू शकतो . अँक्शन् घेण्याची कितीही ईशा असली तरी , गप्प बसावं लागतं . हीच ह्या क्षणी माझ्या मनाची सर्वात मोठी वेदना आहे. आणि ती वेदना फार काळ टिकेल अस ही वाटतं नाही ..
कारण दुर्गा आहे मी जेव्हा पेटून उठेल तेव्हा इतिहास हा घडेलच ...
जोवर माणूस म्हणून जगतो ... तोवर आपण श्वास घेत असतो . श्वास संपला की आयुष्य ही संपत . जोवर हे सुंदर आयुष्य आपण जगतोय तोवर भरभरून प्रेम द्यायला शिकावं माणसाने . द्वेषाचा स्पर्श ही मनाला नको व्हायला . हो पण समोरचा जर प्रेम करण्यायोग्य नसेल ना , तर त्याच्या पदरात माणुसकीच्या भीक ही नको घालायला . हे कलियुग आहे . ह्या कलियुगात जशाच तसे वागणेच बेस्ट ठरते . तेच माणसाचे अस्तित्व घडवते .
नाही तर , अन्याय सहन करत आपण गप्प बसत राहिलो ना , तर आपल आयुष्य मातीमोल ठरते 💯💯 शासन करणाऱ्याची मजल वाढते . आणि आपली सहन शक्ती संपते . त्यापेक्षा योग्य हेच ना आपण अन्याय सहन करायचा . आणि ना की कोणावर अन्याय होऊ द्यायचा .
जगण्याचं स्वंत्रत स्वतः ही कमवायच . आणि ते कमवण्याच ज्ञान इतरांनाही द्यायचं .
थँक्यू सो मच 🙏🙏🙏
दुर्गा मते