नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 6, 2022

आकर्षक कमाई ..

मी कमावलेली माणसच माझी आकर्षक कमाई ..
नात्यात कधीच नाही केली मी बेइमानी ..

आपुलकीच्या छायेत आनंदात वाढले ,


प्रेमळ सहवासात अश्रूंची ही  फुले झाले ...


दीन दुबळा राजा माझा कधीच  नाही रुसला ...


त्याच्या साथीने जीवनाचा हर एक क्षण मी साजरा केला ..
संघर्ष माझा त्यानेच झेलला ...
साथ देण्यास कधीचं कमी नाही पडला ..


प्रेमळ आई माझी गुंजगोष्टी सांगते ..


बाबा लाडक्या लेकीसाठी नेहमीच ग्रेट ठरते ..


नाते हे एकाच अंशाचे क्षणोक्षणी फुलते ...


सासरी असताना ही माहेरच्या ओढीने डोळे पाणावते ..


आगळा वेगळा ग्रुप आम्हा सखींचा ...


डाव रंगे सुरेल सुख दुःखाच्या मैफिलीचा ..


पासवर्ड असे तो माझी नाराजगी दूर करण्याचा ..


ओठांवर गोड smile आणण्याचा ..


ताई ताई म्हणत अनेक भावांची लाडकी झाले ,


रक्ताच्या नात्यापेक्षा हक्काच्या,


  नात्यांची ओढ मनाला जास्त असते , नव्याने कळाले ..


छोटे मोठे सारेच माझे भाऊ मला प्यारे ..
मनी एकच ईशा वसे ताई ह्या गोड शब्दाचे सुर ..
आयुष्यभर कानी पडावे ..

सासू सास र्यांची लाडकी सून नाही ,
तर लेक होण्याचं स्वप्न रोज पाहते ...
हे स्वप्न ही बाप्पाने लवकरच साजरे करावे. 
आयुष्याचे सार्थक व्हावे ....
वेलीवर ह्या नवे फुल उमलावे ..
जाई -  जुई , प्राजक्ताचे गंध त्यास लाभावे ..

माझी माणस हीच आकर्षक कमाई ..
नात्यात कधीच नाही केली मी बेइमानी ...
आणि कधीच करणार नाही मी बेइमानी ..
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...