मनातील डायरीचे पान विषय अंतर्गत ..🌿🌿🌿🌿
विषय - स्पर्श ...
माझ्या
लेखाचं शीर्षक आहे .." स्पर्श जाणिवांचा "
आयुष्यात जाणीव असणे खूप महत्त्वाची असते .
माणसाला गरिबीची जाणीव असावी , पैशाची जाणीव असावी , कष्टाची जाणीव असावी . सर्वांत महत्त्वाची म्हणजे माणुसकीची जाणीव असावी .
जसा कोवळ्या बाळाला आईचा कोमल स्पर्श होतो . तसाच माणसाला खडतर परिस्थितीत जाणिवांचा स्पर्श होतो . तो कोमल नाही तर , कठोर असतो . जीवन जगण्यासाठी प्रेरक असतो .
जेव्हा माणसाला अनुभव येतो ...अनुभव चांगल्या वाईट गोष्टीची जाणीव करून देतो . तेव्हाच एक मन दुसऱ्या मनाची बाजू आणि परिस्तिथी समजून घेण्याच ज्ञान ही ग्रहण करतो .
उदा : हे उदा हरण मी काल्पनिक देते . वैयक्तिक आयुष्याशी संबधित नाही ..
उदा : मी एखाद्या मुलाच्या प्रेमात आहे . त्याने आणि मी दोघांनी मिळून लग्नाची स्वप्न ही पाहिली . ते स्वप्न सत्यात उतरण्याचे क्षण ही आयुष्यात आले . आणि लगेच नशिबाने खेळ बदलला . माझ्या आवडीचा व्यक्ती काही कारणास्तव माझ्या आयुष्यातून बेदखल झाला . तेव्हा मला पहिला आणि शेवटचा अनुभव आला . प्रेम बिम ह्या फक्त म्हणण्याचा आणि कल्पनेच्या जगात खऱ्या होणाऱ्या गोष्टी . ज्याच्या नशिबात प्रेम ही संकल्पना पूर्ण होण असतं . त्याचच प्रेम कुठेतरी पूर्ण होत . बाकीचे प्रेमी युगल ह्यांच्या नशिबी रडगाणेचं लिहिलेलं असतं . ह्या गोष्टी मी नवा अनुभव घेत असलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी ना सांगू शकते . कारण प्रेम केल्यानंतर विरहाची जाणिव माझ्या मनाला स्पर्शून गेलेली असते . आणि त्याच्या यातना ही मी अतोनात भोगलेल्या असतात .
जेव्हा आपल्याला जाणीव होते . तेव्हा आपण त्या जाणिवेची जाणिव समोरच्याला शब्दात का होईना करून देऊ शकतो ..समोरच्याला थोडसं का होईना शाब्दिक मार्गदर्शन करू शकतो ..
दुर्गा मते
छानच लिहिले आहे 👌
ReplyDeleteअनुभवातून साक्षर होत जाते
मग विषय काहीही असो..!
खूपच छान...!
🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा...✍️