नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 3, 2022

संसार माझा आगळा वेगळा ..

एक अवचित सोहळा आज सजला ..
क्षण कोवळा नभी बहरला ..

एक सोहळा आगळा वेगळा ...
होऊ लागला पृथ्वीवर साजरा ..

स्वप्न मी पाहिलेले ..
आज पूर्ण होताना डोळे भरून आले ..

आकाशाची लग्न करण्याचे स्वप्न साकार झाले ..
आशीर्वाद देण्यास देव - देवता पृथ्वीवर अवतरले ..

संसार माझा आगळा वेगळा ,थाटतांना मी बावरले ...
आकाशाच्या कुशीत एकरूप झाले ..

त्याच्या साथीने स्वप्न सुखी संसाराचे मी पाहू लागले ..
खरचं आज मी धन्य झाले ...
आकाशाशी माझे लग्न झाले ....

त्याच्या सावलीत मला मायभूमी न्याहळता येईल सुखावले ....
सजीव असूनही निर्जीव जिवशैली पत्करावी लागेल डोळे पाणावले ..

सुख ह्याचेच आहे ...
आकाशाशी माझे लग्न झाले ..
मी पाहिलेले स्वप्न अर्धवट न राहिले ..
दुर्गा मते


1 comment:

  1. खूपचं छान...आमच्या सदिच्छा आहेत तुमच्या पाठीशी.....👍👌✍️✍️✍️🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...