नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 4, 2022

दोन बाजू सौंदर्य च्या

मनातील डायरीचे पान विषय अंतर्गत 🌿🌿🌿


स्त्री साैंदर्य शाप की वरदान 🌹🌹🌹


खूपच छान विषय आज ह्या मनातील डायरी चे पान ह्यातून उलगडला ..


खरचं प्रश्न पडतो कधी कधी स्त्री साैंदर्य शाप की वरदान ..


कुरूप माझे दिसणे वाटे कधी कधी मजला शाप ....


आईची नजर ही त्या कुरूप सौंदर्यास न करे माप ..


तब्येतिने जाडी कोणाशीच नाही जुळली जोडी ..


सात पाऊल चालण्याची हरवली स्वप्न होडी ..


रंग माझा सावळा ....


कोणताही कृष्ण माझ्यावर न भाळला ..


कपाळ माझे सूने सूने कुमकुम विना वाटते ..


कुरूप साैंदर्य माझे मलाच खाते ..


स्त्री दिसायला  थोडीशी कुरूप नाही म्हणता येणार पण थोडी कमी छान असली की तिला साैंदर्य हिन म्हणावंस वाटत नाही . पण लिहीन गरजेचं आहे . म्हणून लिहिते कोणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नाही ..


स्त्री दिसायला थोडी कमी सुंदर असली , की तिच्या आयुष्यात बरेच प्रोब्लेम क्रिएट होतात . रचनेतील प्रोब्लेम उदाहरण म्हणून परफेक्ट आहे .


स्त्री सौंदर्याची दुसरी बाजू ...


स्त्री दिसायला कुरूप असेल तेव्हाच तिच्या आयुष्यात प्रोब्लेम क्रिएट नाही होतं . तर , गरजेपेक्षा जास्त सुंदर दिसत असेल तर जास्त प्रोब्लेम तिच्या आयुष्यात क्रिएट होतात ..


गोरा गोरा रंग माझा दृष्ट नजरेस पडला ...


वासनेचा किडा त्याचा वळवळला ...


सडपातळ शरीर माझ ..


काळीज फुलून गेल त्या राक्षसाचं ..



दृष्ट नजरेने त्याच्या मनावर अधिराज्य गाजवल ..


भीतीच सावट मनावर पडलं ..


सुंदर दिसणं माझं मलाच त्रासदायक ठरलं ..


चार भिंतीच्या आवरणाने आयुष्यावर कुंपण बांधल ..


सौंदर्याने माझं स्वंतत्र हिरावून घेतल. .


जिवंत पणीच मरणयातना भोगण्याच वरदान लाभल ..


दिसायला सुंदर म्हणून आई वडिलांनी लवकर लग्न लावून दिलं ...


आयुष्याचं सोनं होण दूरचं ..


नवऱ्याने फक्त शरीरावर प्रेम केलं ...


बाहेरच्या जगापासून दूर ठेवलं ..


गुलामगिरीच आयुष्य पत्करायला भाग पाडलं ..


सौंदर्य माझं मला वरदान नाही शाप ठरलं ..
दुर्गा मते


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...