जगणे माझे सख्या तुझ्यासाठी ..
जीवन
थांबले हरवलेल्या ध्येयासाठी ...
जेव्हा शोधते हरवलेल्या वाटा ...
उसळून येई हुंदक्याच्या लाटा ..
नयनात तुझ्या शोधते आधार ..
नको घेऊ आता माघार ..
साथ दे , श्वास घेण्यास बळं दे ..
स्वप्नांना माझ्या तू नव्याने आकार दे ..
गुंफले माणिक मोती ह्या नात्यात ..
हरवून गेले मी तुझ्या गंधाळलेल्या स्पर्शात ..
जीवनाची कविता तुझ्या साथीने रेखाटते ..
तुझ्या मनातील मौन स्वप्न ही , मी माझ्या मनात गोंधते ..
व्यक्त करण्यास प्रेम आतूरले ....
ध्येयवेड्या मनाचे श्वास ही रोखले ..
तुझ्यासाठी जगणे हेच स्वप्न मी दिनरात पाहिले ..
माझे सर्वस्व तुझ्यासाठी त्यागले ..
आयुष्य माझे मी तुझ्याच नावी केले ...
आणि परिपूर्ण झाले ..
Written by - Durga mate - shejul
No comments:
Post a Comment
Comments plz.