निर्जीव म्हणावं की सजीव ,
नातं तुझं माझं भूतकाळ रमलेल
भविष्य काळीन ओढीत गुंतलेलं..
आसवांच्या धारेत चिंब चिंब भिजलेल .
.नातं तुझ माझं मनातल्या मनात बहरलेलं ..
मनातल्या मनात करपलेल ..
तिन्ही सांजेला नव्या उमेदीने सजलेलं ..
ओठी हास्य फुलवून ,
तू मला रडवलेल ...
निरोप देताना तुला ,
मी तुला डोळे भरून पाहिलेलं ..
नातं तुझ माझं सजीव म्हणावं की निर्जीव ..
हे समजण्यास मी आहे अजुनही बच्चू ..
तुला कसे रे समजून सांगू ..
दुर्गा मते
खूप छान
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌
ReplyDelete