शेवटी माहेर हे माहेर असतं ..
त्याच्या सारखं स्वर्ग सुख कुठेच नसतं ..
सासरी किती ही प्रेमळ मिळालं ..
तरीही ते प्रेम कुठेतरी कमीच पडतं ..
शेवटी ते ही दाखवून देतं ..
माहेर हे माहेरच असतं ...
माहेरची ऊब कुठल्याच शिवराला येणार नाही ...
त्याचे सारखे मातृत्व कुठेच फुलणार नाही..
माहेरची माया कधी आटणार नाही ..
सासरची ओढ कधी सरणार नाही ..
शेवटी माहेर हे माहेरच असतं ...
वाक्य कधी खोटं ठरणार नाही ..
आई बाप लेकीच माहेरपण सुखी करण्यासाठी कधी कमी पडणार नाही ....
लेक ही कधी माहेरपण अनुभवण्याचा हक्क सोडणार नाही ..
आई बापाचा लळा तिला कधी सुटेल का ?
सासरचा उंबरठा कधी पोरका वाटेल का ?
माहेवाशीण लेक ती कधी डोळ्यांत पाणी आणेल का ? त्त
तिच्या डोळ्यांतील आनंद ती कधी लपवेल का ?
आई वडिलांना त्रास तिचा ती कळू देणार नाही ..
आई वडिलांचे हसू हिरावून घेणार नाही ..
शेवटी माहेर माहेर असतं ह्याचा विसर कधी तिला पडणार नाही ...
दुर्गा मते ..
No comments:
Post a Comment
Comments plz.