प्रेम माझे तुला कळणार कधी ..
सांगते मी तुला कळण्याआधी ...
नको रुसू माझ्यावर ..
मी तान खाईल तुझ्यावर ...
समजून मला घे , हातात हात दे ..
प्रीतीचा मळा फुलू दे ....
प्रेम माझे तुला कळणार कधी ..
सांगते मी तुला कळण्याआधी ..
मन माझे हळवे तुला वाहिले ..नयनात ह्या स्वप्न तुझ्यासाठी सजले ..
तरीही तुला काही नाही कळले ..
तू मागे वळून ही न पाहिले ..
प्रश्न चिन्ह माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले ..
मन तुझे माझ्यात अडकलेले ...
ते ही तुला नाही कळले ...
मी ही मग तुझ्यावर रुसले ...
तुला कळण्याआधी ,
सांगितले मनातले गुंज सारे ..
पुन्हा एकदा त्याचं त्या प्रश्ना भवती हरवले ..
प्रेम माझे तुला कळणार कधी ?
सांगते मी तुला कळण्याआधी ..
दुर्गा मते
खूपच सुंदर 👌👌👌
ReplyDelete