भाग्य माझे तुलाही लाभो ...
सुख माझे तुझ्याही वाट्याला येवो ...
सोबतीने तुझ्यासवे चालतांना ....
सावली माझी तूच होवो ..
हेचं मागणे माझे ....
कष्ट सारे तुझ्यासाठी झेलेन ....
स्त्री जन्म हा पेलेन
मातीच्या गर्भातूनी तुझ्याचसाठी मी अंकुरेल ..
आयुष्य माझे तुला समर्पित करेन ..
दान भाग्याचे उदरी माझ्या जपेन ..
तूच दुनिया माझी सारी , तूच जग ..
अजुन काय हवे ते सांग ..
सारे मिळाले तूझ्याचपाशी काय हवे मज ..
ते ही सांग ..
काय हवे तुला माझ्याकडुन ते ही माग ..
दुर्गा मते - शेजुळ ..
No comments:
Post a Comment
Comments plz.