नऊ महिने गर्भात वाढवलं ..
माझ्यासाठी मातृत्व तू काळजात फुलवलं ..
तुझी लेक होण्याचं भाग्य मला दिलं ..
बाबांचं प्रेमळ छत्र तुझ्यामुळेच भाळी आलं ..
हर एक नखरे झेलत लाडा कोडात वाढवलं ...
असेल त्या परिस्थितीत कधीच काही नाही, कमी पडू दिलं ...
जेव्हा वाकड पडलं पाऊल माझं ..
रागाने लाल झालं नाक तुझ ..
आयुष्यात मी सक्षम होण्याचे संस्कार तू केले ..
खरचं तुझ्या पोटी जन्म ल्याले , मी धन्य झाले .
मागचे जन्मीचेचं पुण्य माझे ..
तुमच्या सारखे आई वडील मिळाले ..
आयुष्याचे सार्थक झाले ..
दुर्गा मते ..
No comments:
Post a Comment
Comments plz.