भावनांचा असा बाजार मांडू नकोस ..
खोट्या भ्रमात राहू नकोस ....
उगाच कोणात अडकु नकोस ...
कुमार अवस्थेत तू असा भटकू नकोस ...
जगावेगळी फिलिंग येईल आयुष्यात ...
स्पेशल ती समजू नकोस ...
उगाच प्रेमात कोणाच्या पडू नकोस ...
उज्ज्वल भविष्य तुझे नको आणू अंधारात ..
प्रेमात पडावंस वाटेल तुला ..
प्रेम पत्र लिहिण्याची आवड जडेल तुला ..
एकच चेहरा सारखा सारखा बघावासा वाटेल तुला ..
त्या सगळ्याकडे दुर्लक्ष कर बाळा ..
सोन्यासारखे आयुष्य तुझे सोन्यासारखे जग ..
नको भोगुस कधी विरहाचे भोग ...
आयुष्य बरबाद करते , हे प्रेम रोग ...
तू ह्या आजारापासून दूरचं रहा बघ ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.