मी कधीच घाबरले नाही कोणालाही गमवायला कोणीतरी माझी साथ अर्ध्यावर सोडून जाईल . या विचारावर ही कधी चर्चा करत बसले नाही . कारण मला स्वतःला गमवायच नाही हे , स्वावलंबी होऊन आयुष्य जगायचं आहे . नेटाकुटीच नाही . समोरच्यावर अवलंबून राहून आयुष्य जगणं माझ्या तत्वात बसत नाही .
स्वतंत्रपणे आयुष्य जगायला आणि विचार मांडायला मला खूप आवडत . माझी जीवन शैली माझ्या कल्पने प्रमाणे आणि मनासारखी असावी , हे स्वप्न मी रोज पाहते. दुंभगले जरी स्वप्न माझे तरी मी नव्या आशेने नव्या उमेदीने पुन्हा पुन्हा तेच स्वप्न पाहते . ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करते .
गमवण्याची भीती नाही हे , कारण गवसण्याची धमक आहे . रडण्याची सवय नाही हे , कारण रडवण्याची पद्धत माहीत नाही . आयुष्याचं सर्वात मोठं सुख समाधानी राहण्यात वाटतं . समाधानी आयुष्य जगतांना दुःख सारं विसरून जावंस वाटतं .
नकारात्मक विचार ऐकायला ही नकोसे वाटतात . आचरणात आणणे तर दूरचं ...सकारात्मक विचारांचाचं मी मान ठेवते आणि त्याचाच स्वीकार आणि सन्मान करते ...
दुर्गा मते
अप्रतिम सुंदर
ReplyDelete