छंद जगण्याचा मी जोपासते ..
स्वतःच्याचं विश्वात धुंद असते ..
नाही राहत मला भान जगाचे ..
मी तर आजमावते शिखर माझ्या छंदाचे ..
साथ लाभते मला शब्दाची ..
शब्दांना हळुवार आस लागते लेखणीची ..
सुंदर जग माझ मुक्त स्वप्नांनी सजवलेलं ..
त्या स्वप्नांना ही छत जिद्द आणि चिकाटीचं लाभलेलं ..
राग द्वेष मत्सर दूरच फेकते ..
मी तर प्रेम रंगाची उधळण करते ..
ह्या वेड्या मनाला आस भक्तीची ..
ती आस लाड पुरविते माझ्या छंदाची ..
मनी सुरू होतो गजर विठ्ठल नामाचा ..
मी जपते वसा वाड वडिलांचा ..
छंद वेडा मला लाभला भक्ती नामाचा ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.