नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jun 25, 2022

नको रडवू मला .

ये माझी परी ..
चल ना घरी ..

नको रडू अशी ..
तुझ्या दुधात पडेल बघ माशी ..

असं का ग करते राणी ..
आईची किती होते परेशानी ..

तुला मनवताना मीच हिरमुसून जाते ..
 तुझ्या बाबांचे मग बोलणे खाते ..

काम माझे सारे विस्कटून जाते ..
चित्त माझे तुझ्या भवती रेंगाळते ..

ऐक राणी एक कहाणी ..
तू परी माझी शहाणी ..

चल ना ग घरी ..
ये परी ..
नको रडवू मला अशी ..
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...