जरी घेतली तू भरारी आकाशी ..
नाळ तोडू नका ह्या मातीशी ..
आपुलकीची असू दे वीण ह्या धरणीशी ..
गगनी फडकवताना झेंडा यशाचा ..
पाठपुरावा करून ठेव अपयशाचा ..
मोह वाढवू नको अहंकाराचा ..
वसा जपून ठेव माणुसकीचा ..
सारे दिवस सारखेच नसतात ..
जे मनात हे गोंधून ठेवतात ..
स्पर्धेच्या युगात तेचं सर्व श्रेष्ठ ठरतात ..
चार चौघात सन्मानाने वागतात ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.