जबरदस्ती प्रेम कोणी कोणावर करूच नये . ते प्रेम निरर्थक असते . जेव्हा आपण कोणावरही अती प्रेम करायला जातो. तेव्हा त्या व्यक्तीला ना त्या प्रेमाची कदर असते . ना तो आपल्याला पर्सनल स्पेस देतो . ना योग्य तो मान सन्मान देतो . तो आपल्याला दुबळा समजू लागतो .
त्याच्याशिवाय आपण पूर्ण होऊच शकत नाही . असा भ्रम त्याच्या मनात तयार होतो . त्यामुळे कधीच कोणावरही अती प्रेम करूच नये . समोरच्याला मला तुझी खुप गरज आहे . असं चुकूनही दाखवू नये . नाही तर आपल्याला आयुष्यभर लापटा सारखं आयुष्य जगावं लागतं. दुसऱ्याच्या तालावर आयुष्य समर्पित करावं लागतं .
प्रेम करण चांगलं .
बोलून दाखवण आणि व्यक्त करणं वाईट ..
त्यातही मी तुझ्याशिवाय जगुचं शकत नाही . असं वाक्य प्रेयसीने प्रियकरासमोर किंवा प्रियकराणे प्रियसी समोर बोलण म्हणजे गाढवपणा ..तो गाढवपणा ज्याने केला तो आयुष्यभर बरबाद झाला ...त्याचं आयुष्य मातीमोल झाल्यात जमा असं म्हटलं तरी हरकत नाही .
अती प्रेम करणं म्हणजे लाचारीचं जगणं ..
श्वास घेत असतानाही अतोनात मरण ...
त्यापेक्षा बर ते अती प्रेम न करणं ..😊😊😊
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.