नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jun 29, 2022

मी मनासारखं जगणार...

मनातील डायरीचे पान विषय अंतर्गत ..

थोडस मनातल बोलूया सखी ..मनातील एखादी करायची राहून गेलेली गोष्ट मनाला खूप चटका लावून जाते .

" किती बरं झालं असतं ना , मी ज्या वेळी जी गोष्ट करायची मला संधी मिळाली होती . ती गोष्ट त्याचवेळी केली असती तर , मनात आज ही रुख रुख राहिली नसती .

एवढं सुंदर आयुष्य जगलो आपण पण जगताना   एक क्षण जगायचा राहूनच गेला .. जो मला भर भरून जगायचा होता . पण ; समाजाचा विचार करत सामाजिक बंधने स्वतःवर लाधून  जिथे मला मोकळा श्वास घ्यायचा होता . तिथेच मी स्तब्ध झाले ..आणि स्वतः चाचं आनंद मिळवण्यास कुठेतरी कमी पडले ..


ही सल माझ्या मनात कायम स्वरुपी टिकून राहील . पण त्याच बरोबर एक समजूत मी मनाची घातलीय . ह्यानंतरचं माझ जे ही काही आयुष्य उरलंय ते मात्र मी भरभरून जगणार ..समाजाने जी जोखंड माझ्या सभोवताली बांधली आहेत ना , ती मात्र मी तोडून टाकणार .


.आयुष्य माझं मनासारखंचं  जगणार ..नंतर मनातलं थोडस बोलण्यासाठी कोणतीच पोकळी निर्माण होऊ ही देणार नाही . आणि मनात काही ठेवणारं ही नाही .

दुर्गा मते

1 comment:

  1. Anonymous5:51:00 PM

    खूप छान ...✍️👍👌🍫

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...